रवा डोसा पण वेगळा !

Prajakta२१'s picture
Prajakta२१ in पाककृती
20 Apr 2014 - 2:32 pm

मावशीकडे गेले होते तेव्हा तिथे एक डोसा नुसताच खाल्ला तो मस्त लागला म्हणून त्याची कृती मावशीला विचारून इथे लिहितेय.

साहित्य: १. एक वाटी बारीक रवा
२. एक वाटी मैदा (diet बद्दल जागरूक असलेल्यांनी मैद्याऐवजी तांदळाचे पीठ वापरले तरी चालेल)
३. २-३ कांदे किसून
४. ताक
५. मीठ , साखर चवीनुसार
फोडणीसाठी - जिरे, तूप,३-४ मिरच्या बारीक चिरून

कृती :

१. रवा + मैदा/ तांदळाचे पीठ ताकात भिजवून डोशासार्खेच सरबरीत मिश्रण करा आणि ते
साधारण ६-८ तास ठेवा ( रात्री भिजत घालून सकाळपर्यंत ठेवा किंवा मग सकाळी भिजत घालून संध्याकाळी करा ) ते तितका जास्त वेळ भिजेल तेवढे ते आंबेल
२. सकाळी / ६-८ तासांनी ते काढून त्यात किसलेला कांदा आणि चवीपुरते मीठ -साखर घालून मिश्रण चांगले एकजीव करा
३. साधारण ३-४ चमचे तूप गरम करून त्यात जिरे आणि मिरच्या घालून खमंग फोडणी करा फोडणी मिश्रणात घालून मिश्रण साधारण ५-१० मिनटे ठेवा

1

४. आता ह्या मिश्रणाचे नेहमी घालतो त्याच पद्धतीने डोसे/ धिरडी नॉन स्टिक pan वर घाला
नॉन स्टिक तवा असेल तर बाजूने तेल सोडण्याची पण गरज नाही ते अलगद निघून येतात झाल्यावर ! :-)

झाल्यावर गरम गरम खा

2

मिश्रणालाच फोडणी दिल्याने हे नुसते खाल्ले तरी मस्त लागते बरोबर चटणी / सॉस नसले तरी चालते

टीप:
१. तांदळाचे पीठ वापरले तर जास्त कुरकुरीत होतात
२. फोडणी आपण नेहमीची पण करू शकतो पण हि जास्त चांगली लागते
३. वरच्या फोडणीत कढीपत्ता पण वापरू शकतो
४. ताक नसले तर पाण्यात भिजवले तरी चालेल पण मग आंबवल्याची चव येणार नाही

माहितीचा स्त्रोत: माझी मावशी आणि आई

प्रतिक्रिया

अत्रुप्त आत्मा's picture

20 Apr 2014 - 3:12 pm | अत्रुप्त आत्मा

फोटुंची लिंक दिल्यामुळे>>> छान..छान...! ;)

दिपक.कुवेत's picture

20 Apr 2014 - 3:17 pm | दिपक.कुवेत

एकदा करुन बघायला हवेत.

एकदम मस्त आणि सोप्पा प्रकार आहे!

यशोधरा's picture

20 Apr 2014 - 5:32 pm | यशोधरा

मस्त. :)

सानिकास्वप्निल's picture

20 Apr 2014 - 5:47 pm | सानिकास्वप्निल

मस्तं पाकृ, तांदळाची पिठी घालून बघते.

Prajakta२१'s picture

20 Apr 2014 - 10:02 pm | Prajakta२१

धन्यवाद

इरसाल's picture

21 Apr 2014 - 3:38 pm | इरसाल

माझा गणेशा की काय मग ?

मधुरा देशपांडे's picture

21 Apr 2014 - 9:26 pm | मधुरा देशपांडे

वेगळाच प्रकार. आवडला.

मीता's picture

22 Apr 2014 - 3:55 pm | मीता

तांदळाची पिठी घालून करून बघितले आजच .मस्त झाले होते ..

अनन्न्या's picture

22 Apr 2014 - 4:06 pm | अनन्न्या

मिरचीचे बारीक तुकडे, आलं, कढीलिंबाची पाने अणि फोडणी तेलाची देते मी. तुमची कृती पण चांगली वाटतेय.

तुमचा अभिषेक's picture

22 Apr 2014 - 11:27 pm | तुमचा अभिषेक

डोश्याचे सर्व प्रकार आवडतात. कोणी करून घातला तर हा पण आवडेल :)

शुचि's picture

23 Apr 2014 - 7:32 pm | शुचि

पा़कृ आवडली.