शिल्पे घडविली बहु कुशलता..

सूड's picture
सूड in भटकंती
20 Apr 2014 - 9:31 am

तर!! सांगायची गोष्ट अशी, की मिपाकर कुठेही गेले की धागा हा निघालाच पाह्यजे (असं म्हणतात). बरं, असे काही प्रवासवर्णाचे धागे लिहायचे म्हणजे जाम टेंशन येतं. त्यात लेण्यांबद्दल लिहायचं म्हणजे आणखीच टेंशन!! तरीही म्हटलं आता लोक एवढा आग्रह करतातच आहेत तर खरडाव्या चार ओळी.

पुष्कळ दिवसांपासून हो-नाही करत लांबत चाललेला वेरुळ लेण्यांच्या भेटीचा विषय पुन्हा एकदा निघाला. आणि व्हॉट्स अ‍ॅप, प्रत्यक्ष भेटीतून प्लान बनू लागले. दोन दिवसांचाच प्लान करायचा असं कळल्यावर बर्‍याच जणांनी हात वर केले, म्हणजे सहमती दर्शवली. पुढे कोणत्याही सहल/ट्रेकच्या अलिखित नियमानुसार काही जणांच्या दातांच्या ट्रीटमेंट (दाताच्या ट्रीटमेंट असणे हा एक अख्ख्या मिपावर जगप्रसिद्ध वाक्प्रचार आहे, अर्थ माहित नसल्यास अर्थातच अभ्यास वाढवा.) आड आल्या आणि पुणे येथून जाण्यास इन मीन चार मंडळी उरली. ती चार मंडळी म्हणजे अस्मादिक, धन्या, प्रशांत आणि जे वेरुळला येणार म्हणून सगळ्यांनी उत्सुकता दाखवली असे वल्ली. नंतर इस्पिकचा एक्का हे आधी अजिंठा बघून मग वेरुळ आमच्यासोबत करणार असल्याचे कळले.

ठरल्याप्रमाणे पुणे स्टेशनावर भेटून आमचा प्रवास सुरु झाला. सकाळचीच वेळ असल्याने एफेम वर सुरेश वाडकर चालू होते. मग त्यांची कोणती गाणी चांगली, कोणती अमुक एका प्रसंगी सतत लावली जातात इथपासून सुरु झालेली चर्चा जगजित-चित्राच्या गजलांपर्यंत येऊन पोचली. सूर्य अंमळ वर आल्यामुळे पोटात हत्ती धावायला सुरुवात होण्याची लक्षणं दिसत होती त्यामुळे एका धाबावजा हाटेलापाशी थांबून पोटपूजा झाली. मग पुन्हा प्रवास सुरु. पुन्हा गप्पा टप्पा. दरम्यानच्या वेळेत ठराविक मंडळींनी आदल्या दिवशीच्या झोपेची थकबाकी गोळा करुन घेतली. तोवर साधारण साडेदहा पावणेअकराला वेरुळास पोहोचलो.

जरा चहापाणी घेतलं आणि थेट लेण्यांकडे निघालो.
हा लेण्यांकडे जाणारा मार्ग.

लेण्याच्या बाहेरील भिंतींवर दिक्पाल, वरुण-इंद्रादि देवतांची शिल्पे आहेत. लेण्यात प्रवेश केल्या केल्या समोरच हे गजांतलक्ष्मीचं अत्यंत सुंदर शिल्प आहे.

पुढे ही महिषासूरमर्दिनी

हे थोडं वल्ली मोड मध्ये. "हे रती-मदन. आणि त्यांच्यातील प्रेमाच्या गोडव्याचं प्रतीक असलेला ईक्षुदंड"

पुढील तीन सरित्शिल्पे:
मकरवाहिनी गंगा

कूर्मवाहिनी यमुना

पद्मस्थित सरस्वती

विदारण नृसिंह

शेषशायी विष्णू

रावणानुग्रह

गजासूर वध

महायोगी शिव

महाभारत घटनापट

लिंगोद्भव शिव

गंगावतरण

छतांवर काढलेल्या चित्रांचे अजूनही शिल्लक असलेले काही अवशेष

नक्षीदार कळस

जटायू वध

मार्कंडेयानुग्रह

वराह व भूदेवी

स्थौण नृसिंह

शिलालेख

कैलास लेण्याच्या कळसावरील नक्षीकाम

स्कंद

शिवपार्वती विवाह

'तरुण कुलीन गोरा, पाहिजे मुलीला सुशील सद्गुणी सुंदरसा नवरा' अशी हिमालयपंतांनी झायरात केल्यावर स्थळ घेऊन आलेले ब्रह्मदेव.

अक्षक्रीडेत गुंग शिवपार्वती

कूर्मचिती

पुढे जैन लेण्यांतील काही शिल्पे. या लेण्यांत तितकासा उजेड नसल्याने फारशी छायाचित्रे घेता आली नाहीत.
अंबिका

सर्वानुभूती यक्ष

अजूनही बर्‍यापैकी सुस्थितीत असलेली जैन लेण्यांच्या गाभार्‍यातील चित्रे.

जैन लेण्यातील एक शिलालेख

सर्व लेणी पाहून झाल्यानंतर औरंगजेबाच्या कबरीला भेट देण्यात आली. तिथून निघून बिरुटे सरांकडे पाहुणचार घेऊन सगळी मंडळी मार्गस्थ झाली.

सर्व शिल्पं पाहताना एक ओवी सतत आठवत होती..

चित्रे रेखिली बहुकुशलता। वारु आणि गजरथा॥
चित्रकारे चित्रे रेखितां। आळस काही न केलां॥

प्रतिक्रिया

प्रकाशचित्रांसहितचा छोटासा वृत्तांत आवडला.

किसन शिंदे's picture

20 Apr 2014 - 10:23 am | किसन शिंदे

(सूड मोड आॅन) आॅस्सम!! (सूड मोड आॅफ) ;-)

अत्रुप्त आत्मा's picture

20 Apr 2014 - 3:25 pm | अत्रुप्त आत्मा

=)) +++१११ =))

शिकवणीला सुरुवात झालीय वाटते..... उत्तम उत्तम उत्तम लेख लिहीलाय .....

यसवायजी's picture

20 Apr 2014 - 10:35 am | यसवायजी

लै भारी.

पैसा's picture

20 Apr 2014 - 11:11 am | पैसा

पण ती मोडतोड बघून दर वेळी नव्याने वाईट वाटतं. :(

यावेळी धन्या दगडं बघून कंटाळला वाटतं!

कंजूस's picture

20 Apr 2014 - 11:29 am | कंजूस

चांगलाच सूड काढला आहे .वल्लीची दशावतार सहल ती हीच का वेगळी आहे ?पुण्याहून कारने किती वाजता निघालात ?
दगडं बघून बरेच कंटाळतात .घोळके येतात आणि "इकडंबी मूर्तीच हाईत"म्हणत बाहेरूनच अर्धा तासात लेणी उरकतात .गुजराती जैन समाजाच्या सहलींच्या बसेस सरळ ३० ते ३४ जैनलेण्यांकडे पार्क करतात .तिथूनच परत फिरतात .अजिंठ्याकडे (=फर्दापूरची चित्रे ,इति जळगावकर) जातपण नाहीत .

दशावतार सहल मागच्या महिन्यात झाली होती. ही सहल मागच्याच शनिवारी रविवारी.
एका महिन्याच्या आतच दुसर्यांदा वेरूळला जायचा योग आला.

दिपक.कुवेत's picture

20 Apr 2014 - 11:42 am | दिपक.कुवेत

अर्थात आम्हि पण "धन्या" कॅटिगरीतलेच!

धन्या's picture

20 Apr 2014 - 5:59 pm | धन्या

स्वतःला लेणी, गड असल्या गोष्टी अजिबात आवडत नसताना (किंवा त्याचं विशेष कौतुक नसताना) मित्रांसोबत फिरायला जाण्यातही मजा असते.

वूई एंजॉय जर्नी, नॉट डेस्टीनेशन. ;)

यसवायजी's picture

20 Apr 2014 - 10:49 pm | यसवायजी

वूई एंजॉय जर्नी, नॉट डेस्टीनेशन
टाळ्या.. *ok*

प्यारे१'s picture

22 Apr 2014 - 7:12 pm | प्यारे१

टाळ्या.. +११११

आवडला वृत्तांत ! कूर्मचिती काय आहे?

रामदास's picture

20 Apr 2014 - 1:38 pm | रामदास

विचारणार होतो.
फोटो सुंदर. वल्लींणि धाग्याकडे खास लक्ष दिले तर लेण्यांविषयअचेक उत्तम चर्चा घडेलसे वाटते.

प्रचेतस's picture

20 Apr 2014 - 3:59 pm | प्रचेतस

चिती म्हणजे यज्ञवेदी. थोडक्यात यज्ञकुंड. चितीच्या आकारांवरून तिला वेगवेगळी नावे पडली आहेत आणि वेगवेगळ्या स्वरूपाच्या यज्ञांच्या वेळी विशिष्ट चितीच वापरली जाते.
ही कूर्मचिती म्हणजे कासवाच्या पाठ उलटी केली असता जसा आकार होईल तसा. थोडक्यात ही कासवाच्या आकाराची असते.
अग्नीचिती, द्रोणचिती, श्येनचिती हे चितींचे अजून काही प्रकार.

प्यारे१'s picture

20 Apr 2014 - 3:52 pm | प्यारे१

मस्त रे सूड!
ओवेसोमे ;)

जोशी 'ले''s picture

20 Apr 2014 - 8:09 pm | जोशी 'ले'

मस्त

भाते's picture

20 Apr 2014 - 8:27 pm | भाते

फोटो छान आले आहेत.
पण, मिपाकरांचे फोटो कुठे आहेत?

सर्व फोटो, सुंदर आले आहेत. गजलक्ष्मी, महीषासूरमर्दिनी, रती-मन्मथ सर्वच!!!

प्रचेतस's picture

22 Apr 2014 - 8:25 pm | प्रचेतस

'तरुण कुलीन गोरा, पाहिजे मुलीला सुशील सद्गुणी सुंदरसा नवरा' अशी हिमालयपंतांनी झायरात केल्यावर स्थळ घेऊन आलेले ब्रह्मदेव.

ते ब्रह्मदेवाच्या उजवीकडे आहेत ते देवगुरु बृहस्पती. आता लग्नाची बोलणी सुरु करा म्हणून ब्रह्मदेवाच्या डाव्या दंडाला ते हलकेच स्पर्श करीत आहेत तर शंकरासारखा पती आपल्या कन्येला मिळणार म्हणून आनंदाने, अभिमानाने हिमवंताने आपला उजवा हात स्वतःच्या छातीवर ठेवला आहे तर हिमालयाच्या शेजारीच त्याची पत्नी मेना ही बोलणी ऐकत उभी आहे.

जैन शिलालेख

श्रीसोहिल ब्रह्म
चारिणा शान्ति भट्टा
रक प्रतिमेय

सोहिल नामक ब्रह्मचार्‍याने शांतिनाथ तीर्थकरांची ही मूर्ती कोरवून घेतली आहे

सूड's picture

22 Apr 2014 - 9:39 pm | सूड

>>शंकरासारखा पती आपल्या कन्येला मिळणार म्हणून आनंदाने, अभिमानाने हिमवंताने आपला उजवा हात स्वतःच्या छातीवर ठेवला आहे

हिमालयाचा पण लग्नाला विरोध होता ना?

प्रचेतस's picture

22 Apr 2014 - 9:51 pm | प्रचेतस

नाय रे.
विरोध होता तो दक्ष प्रजापतीचा. हा सतीचा पिता. ह्याच्या आद्न्येविरुद्ध सतीने शिवाशी लग्न केलं म्हणून दक्षाने यद्न्यात शिवाचा अपमान केला हे पाहून सतीने स्वत:ला जाळून घेतले ह्यामुळे कोपित होऊन शिवाने वीरभद्राचे रूप धारण करून दक्षाचे मस्तक उडवले व त्यानंतर त्याला बोकडाचे मस्तक चिकटवले व स्वत: संन्यासी झाला तर हीच सती पुढे पार्वतीरूप घेऊन हिमालयाच्या पोटी जन्मास आली व् गतजन्मीचे स्मरण असल्याने शिवप्राप्तीसाठी तप करू लागली तर उमा माहेश्वर पुत्रच (स्कंद) हां तारकासुराचा वध करू शकणार असल्याने देवांना हे लग्न जुळवायची घाई झाली. ;)

लॉरी टांगटूंगकर's picture

22 Apr 2014 - 11:48 pm | लॉरी टांगटूंगकर

ओढा! ओढा लेको पैसे! करा चैन! जा ! रोज वेरूळला जा ! अजिंठ्याला जा!!

छान झालीये तुमची वेरूळ भेट!

कुसुमावती's picture

23 Apr 2014 - 2:29 pm | कुसुमावती

फोटो आणि वृत्तांत दोन्ही छान.