एका फुलाची गोष्ट (गूढ कथा)

विवेकपटाईत's picture
विवेकपटाईत in जनातलं, मनातलं
19 Apr 2014 - 6:54 pm

आश्रमात स्वामी त्रिकालदर्शी ध्यानावस्थेत बसले होते, मला पाहताच त्यांनी डोळे उघडले, क्षण न गमविता मी प्रश्न विचारला, स्वामीजी, वातावरण लय तापलंय, काय निकाल लागेल काहीच कळत नाही.

स्वामी त्रिकालदर्शी: वत्सा तुझ्या समाधाना साठी एक कथा सांगतो, एका पुष्प वाटिकेत गुलाबाचे सुंदर फुल उमललेले होते. एक द्वाड मुलगा सायकल चालवीत तिथे आला. सुंदर गुलाबाच्या फुलाला पाहून त्याने आपल्या हाताने देठा सकट गुलाबाचे फुल उपटले. सायकलवर स्वार होऊन तो घरी पोहचला. पूजा घरात पूजा करीत असलेल्या आईच्या हाती त्याने फुल दिले. गुणाचा माझा पोर म्हणत आईने प्रेमाने हात त्याचा पाठीवर फिरविला आणि नमो-नमो म्हणत ते गुलाबाचे फुल देवाच्या चरणी अर्पित केले. दुसऱ्या दिवशी पहाटे निर्माल्य झालेले फुल तिने रस्त्यावर फेकून दिले. अनेक वर्ष रस्त्यावर झाडू लावल्या मुळे अस्थमासम आजाराने ग्रस्त झाडूवाला खोकलत-खोकलत झाडू लावत होता. त्याने कचऱ्या सोबत गुलाबाच्या फुलाला ही उचलून कचरा गाडीत टाकले. स्वामीजी थांबले आणि प्रश्नार्थक नजरेने मजकडे बघितले. मी म्हणालो, स्वामीजी माझ्या सारख्या अल्प ज्ञानी जीवाला, काहीच उमगले नाही.

स्वामीजी ने स्मित केले आणि म्हणाले ‘नादान है, बच्चा’ आणि डोळे मिटून पुन: समाधिस्थ झाले.

कथाआस्वाद

प्रतिक्रिया

पैसा's picture

19 Apr 2014 - 11:03 pm | पैसा

सायकल = समाजवादी
नमो नमो = भाजपा
झाडूवाला = आआप
द्वाड मुलगा आणि आई = काँग्रेस?

बाकी कळलां नाय!

सगळ्यांनी मिळुन लोकशाहीची वा सामान्य नागरिकांची वाट लावली. इति प्रथम अध्याय समाप्ती.

विवेकपटाईत's picture

20 Apr 2014 - 9:23 am | विवेकपटाईत

गुलाबगुलाबाचि= ????

विवेकपटाईत's picture

20 Apr 2014 - 9:30 am | विवेकपटाईत

ज्योती ताई,
गूढ आहे ते म्हणजे गुलाबाचे फुल
बाकी काय सांगण्याचा प्रयत्न केला आहे ते.

Rajesh K's picture

21 Apr 2014 - 1:43 am | Rajesh K

स्वामीजी, वातावरण लय तापलंय

शब्दशः तापलंय! स्वामीजींकडे या उकाड्या-वर काय उपाय आहे का पहा ना! अंगाची लाही लाही होतेय !! :)

बाकी सुंदर व मार्मिक कथा ! :)

गुढ प्रतिसाद.

पोटे's picture

21 Apr 2014 - 12:16 pm | पोटे

एप्रिल फूल बनाया

माहितगार's picture

21 Apr 2014 - 12:27 pm | माहितगार

गुलाबाचं झाड = मतदानाची स्लीप ?
गुलाबाचं फुलं = मत ?

* नसण्याची सुद्धा शक्यता आहे.

मृगनयनी's picture

21 Apr 2014 - 1:11 pm | मृगनयनी

स्वामी "त्रिकालदर्शी" असल्यामुळे त्यांच्याबद्दल जास्त आदर वाटतो.... बाकी गुलाबाचं फूल झाडावर राहिलं असतं... तरी कधी ना कधी सुकुन कचर्‍यात गेलंच असतं ना!... किमान ते फूल देवाच्या चरणी अर्पण तर झाले....... अर्थात त्या मुलाने माळ्याला विचारून गुलाब तोडला असता... तर अधिक उचित ठरले असते.!!!! किमान त्याच्या आईने त्यास विचारायला हवे होते.. की "हा गुलाब कुठुन आणलास बाळ?"
पण जे सुन्दर दिसेल.. ते हिसकावण्याची जी मानवी वृत्ती आहे... ती "स्वामी त्रिकालदर्शी" नक्की बदलवू शकतील.. असे वाटते.

विश्लेशण मस्त... आवडल एकदम....
निकालाची (वाट...?) बघतोय....

सप्पुभाई's picture

21 Apr 2014 - 6:35 pm | सप्पुभाई

गुलाबाचे फुल म्हनजे सामान्य जनता.

विवेकपटाईत's picture

21 Apr 2014 - 7:32 pm | विवेकपटाईत

गुलाबाचं फुलं = मत ? अचूक ओळखले, धन्यवाद , सप्पुभाई ही जवळपासच आहे.

आपल्या मतांचा उपयोग राजनेता बहुतांश स्वत:च्या स्वार्थाकरता करतात, आपले मत व्यर्थच जाते.

हेच स्वामीजींना सांगायचे होते.

आत्मशून्य's picture

26 Apr 2014 - 12:52 am | आत्मशून्य

हे उलटे टाइप करा म्हणजे मत्पत्रिका असे उत्तर मी आधीच दिसलेले दिसले असते. आम्हाला सौधा गुढवाणी जमते हो :) तुम्ही मात्र ती ओलखायला चुकलात :)

गुलाबाचे फुल पायदळी तुडवणे अजिबात योग्यं नाही. शहाणा माणूस ते कधीच करणार नाही.

फुलाचे आयुष्य जरी एका दिवसाचे असले, तरी त्याचा गुलकंद करता येतो, अत्तरही छान होते, आणि काहीच नाही तरी गुलाबपाणी करण्यासाठी तरी वापरता येतेच.