.......चीनमधे व्हायरस

आशु जोग's picture
आशु जोग in काथ्याकूट
19 Apr 2014 - 11:58 am
गाभा: 

चीनचा एक प्रांत आहे सिकीयांग, तिथले आतंकवादी चीनमधे आतंक माजवतात आणि पाकिस्तानच्या सीमावर्ती प्रदेशात आश्रय मिळवतात. मागे चीनच्या राष्ट्रप्रमुखांनी झरदारी अंकल पाकिस्तानचे अध्यक्ष होते तेव्हा झरदारींना याबाबत सूचना दिली होती. की चीनमधल्या अतिरेक्यांना पाकिस्तानात पनाह(आश्रय) मिळता कामा नये.

याकडे आम्ही भारतीय कसे पाहतो...

चीन पाक सहकार्य गेली अनेक वर्षे अधिकच दॄढ होताना दिसते आहे. पण पाकिस्तानबरोबर हस्तांदोलन करताना चीनच्या शरीरात काही व्हायरस शिरत आहेत. पुढील काही वर्षामधे सिकियांगमधे दिसणारे व्हायरस चीनच्या इतर भागातही आपला प्रभाव दाखवायला सुरुवात करतील... नव्हे केलीच आहे...

या व्हायरस वरची लस भारताकडे काही प्रमाणात तयार आहे कारण गेल्या १००० वर्षात त्याच्याशीच लढाई चालू आहे...
त्यामुळे भारताचे सहकार्य घेण्याशिवाय चीनला पर्याय राहणार नाही...

अन्यथा चीनचेही पाकिस्तान बांगलादेश असे तुकडे झाल्याशिवाय राहणार नाहीत...

जय हो !
- आशु जोग

प्रतिक्रिया

सुहासदवन's picture

19 Apr 2014 - 12:14 pm | सुहासदवन

चीनकडे प्रचंड शस्त्रसामुग्री, उत्तम सैन्य आणि सर्वात महत्वाची म्हणजे जबरदस्त हिम्मत आहे की त्यापुढे पाकिस्तान किस झाड की पत्ती.....
उद्या चीनने पाकिस्तानचे काही बरे वाईट करायचे ठरवले तर कोण जाब विचारणार त्याला.....

इथे साठ वर्षे झाली आपण पाकिस्तानला प्रश्न काय विचारायचा हे साधं एकमताने ठरवू शकत नाही तर चीनचे आपण काय करणार....

आणि चीनला जर अरबी महासागरात आपला तळ बनवायचा असेल तर तो बनविणारच.... त्यासाठी काही काळासाठी पाकिस्तानची घुसखोरी सहन करावी लागली तरी चीनचे काही नुकसान नाहिये त्यात.....

अवांतर - आधीच MH370 नावाचा एक प्रयोग करुन झालाच आहे!

आशु जोग's picture

19 Apr 2014 - 12:39 pm | आशु जोग

>> इथे साठ वर्षे झाली
भारताला श्या घातल्या की हुकमी टाळ्या मिळतात
पण

चीन विरुद्ध पाकिस्तान अशी लढाई म्हणतच नाहीये मी

सुहासदवन's picture

19 Apr 2014 - 12:52 pm | सुहासदवन

या व्हायरस वरची लस भारताकडे काही प्रमाणात तयार आहे कारण गेल्या १००० वर्षात त्याच्याशीच लढाई चालू आहे...

हजार वर्षे लढून देखील जर रोग आटोक्यात येत नसेल तर लस तरी बदलावी किंवा डॉक्टर तरी.....

भारताला श्या घातल्या की हुकमी टाळ्या मिळतात
मी भारताला शिव्या देत नाहीये पण एवढंच म्हणतोय की आपल्याला घरचंच झेपत नाहीये तिथे आपल्या शेजारचे काय करताहेत हे पाहायला आणि जोखायला कोणाला अक्कल आहे?

कैलासवासी सोन्याबापु's picture

29 Jan 2015 - 5:33 pm | कैलासवासी सोन्याबापु

आहे ना! काही लोकांस आहे अक्कल! त्याना फ़क्त शेजारी काय करतात ते शोधायला आवडते! तीच त्यांची अक्कल! सरकारी भाषेत त्यांस "रिसर्च एंड एनालिसिस विङ्ग" उर्फ़ R&AW म्हणतात! असे ऐकले आहे!!!

अत्रुप्त आत्मा's picture

19 Apr 2014 - 12:48 pm | अत्रुप्त आत्मा

@सर्वात महत्वाची म्हणजे जबरदस्त हिम्मत आहे >>> +++++१११११

आशु जोग's picture

29 Jan 2015 - 1:56 pm | आशु जोग

सुहासदवन आणि अत्रुप्त आत्मा

यांनी आपले प्रगाढ ज्ञान कुठे मिळवले हे आम्हाला सांगावे

अत्रुप्त आत्मा's picture

29 Jan 2015 - 5:39 pm | अत्रुप्त आत्मा

यात ज्ञान-मिळवायची काय गरज आहे? कैच्याकै निरर्थक आपलं!

आशु जोग's picture

19 Apr 2014 - 1:08 pm | आशु जोग

चीन म्हटलं की फक्त कौतुक आणि हिंदूस्थान म्हटलं की श्या
सोडा रे पट्ट्या डोळ्यावरच्या

राष्ट्रप्रमुखाला झरदारींची भेट घेवून सांगावे लागते यातच सगळे आले. भिवंडी मुझफ्फरनगर अशी शहरे तिथे तयार होवू लागली आहेत

मी तर म्हणेन या चीन मधे सौदी तत्त्वज्ञानाचा होवू दे आणखी प्रसार

आत्मशून्य's picture

19 Apr 2014 - 1:42 pm | आत्मशून्य

सौदी हे एका व्यक्तीचे चक्क आडनाव आहे ज्यावरुनच अख्ख्या देश/नाव वसल्या आहे. फक्त सौदी आडनाव आहे म्हणून त्या देशातील अशा (प्रत्येक) व्यक्तीला महिन्याचा एक ठरावीक तनखा (तो काहीही नकरो) अदा केल्या जातो....

आशु जोग's picture

28 Apr 2014 - 12:25 am | आशु जोग

https://www.youtube.com/watch?v=diEC9evfs2I

हे पाहीले का

सुहासदवन's picture

19 Apr 2014 - 1:47 pm | सुहासदवन

पाकिस्तानसाठी ही भेट खास होती कारण चीन बरोबर खाजगी आणि सरकारी स्तरावरील उद्योग आणि व्यापार संबंध वाढविणे.
आणि तथाकथित घुसखोरीबाबत फक्त एक औपचारिकता म्हणून चीनला पाकिस्तानला हे सांगायचे असेल अन्यथा त्यांना ह्याचा बंदोबस्त करण्यासाठी निदान त्यांच्या खंडप्राय देशात तरी कोणाच्या परवानगीची आवश्यकता नाही.

ह्या दोन देशांचा एकमेकांशी टक्कर देण्याचा किंवा लढण्याचा सध्या तरी विचार नसावा कारण भारतासारख्या देशाला जर थोपवायचे असेल तर ह्या दोन देशांनी एकत्र येणे आणि एकमेकांशी संबंध वाढविणे गरजेचे आहे.

चीन म्हटलं की फक्त कौतुक आणि हिंदूस्थान म्हटलं की श्या
सोडा रे पट्ट्या डोळ्यावरच्या

डोळ्यावरच्या पट्ट्या काढल्यावर आता तेच दिसत असेल तर आम्ही काय करणार?
भारताला आपल्या सीमेबाहेर जे चालले आहे ते बघायचेच नसेल तर आम्ही जनतेने तरी पट्ट्या का म्हणून सोडाव्यात.... जगू देत ना आम्हाला सुरक्षिततेच्या भ्रमात....

आशु जोग's picture

19 Apr 2014 - 5:58 pm | आशु जोग

>> ह्या दोन देशांचा एकमेकांशी टक्कर देण्याचा किंवा लढण्याचा सध्या तरी विचार नसावा
दोन देशांची टक्कर.... इथे काय संबंध ...

आशु जोग's picture

3 Jul 2014 - 12:28 am | आशु जोग

चीनच्या झिनझियांग प्रांतात सरकारी नोकर, शिक्षक आणि विद्यार्थ्यांना उपवासाला बंदी...

धार्मिक स्वातंत्र्यावर गदा.. पाकिस्तानकडून नाराजी व्यक्त

असो
पण हा प्रांत चीनला जड जात आहे... सुरक्षा दलांना विरोधाचा सामना करावा लागत आहे

आशु जोग's picture

30 Jul 2014 - 12:42 pm | आशु जोग

आपले समज खरे असतातच असे नाही. वस्तुस्थितीच्या कसोटीवर ते घासून घ्यावे लागतात. वर काही लोकांनी केलेल्या कमेंट्स पाहून यांना काहीच माहिती नाही. असे म्हणावेसे वाटते.

काही वस्त्यांमधे आणि पोलिस ठाण्यांमधे काही सशस्त्र नागरीकांना धूमाकूळ घातला.

माहितगार's picture

29 Jan 2015 - 4:04 pm | माहितगार

त्यामुळे भारताचे सहकार्य घेण्याशिवाय चीनला पर्याय राहणार नाही...
अन्यथा चीनचेही पाकिस्तान बांगलादेश असे तुकडे झाल्याशिवाय राहणार नाहीत...

....आपले समज खरे असतातच असे नाही. वस्तुस्थितीच्या कसोटीवर ते घासून घ्यावे लागतात.

आशु जोग's picture

30 Jan 2015 - 7:02 pm | आशु जोग

प्रगाढ पंडितांनो

माझ्या शब्दांना चिवडत बसण्याऐवजी वस्तुस्थिती समोर ठेवून माझा मुद्याला विरोध करा वा समर्थन करा

यात ज्ञान-मिळवायची काय गरज आहे? कैच्याकै निरर्थक आपलं!
हे अतृप्त रावांनी स्वतःच सांगितलं हे बरं झालं

जाता जाता
सदाशिव पेठेतील सफरचंदाच्या झाडाखाली बसून चीनबाबतचे साक्षात्कार होतीलच असे नाही.