हत्ती गेला आणि शेपूट राह्यलं...

माधुरी विनायक's picture
माधुरी विनायक in जनातलं, मनातलं
15 Apr 2014 - 5:10 pm

पूर्वा म्हणजे धमाल मस्ती, पूर्वा म्हणजे अखंड बडबड आणि चैतन्याचा धबधबा... पूर्वा म्हणजे आमचं एकुलतं एक कन्यारत्न. वय वर्ष साडेचार. तिला नाचायला आवडतं, गायला आवडतं. आई-बाबा जेवायला बसले की त्यांना जेवण वाढायला आवडतं, फोटोसाठी वेगवेगळ्या पोझेस द्यायला आवडतं... ही ‘आवडतं’ प्रकारातली यादी खूप मोठी लांबलचक आहे. त्यामुळे त्याविषयी अधनं-मधन बोलत राहूच.

तर अशी ही आमची कन्या बोलतेही भरपूर आणि अनेकदा अगदी सहज आमची विकेटही काढते.

परवा असेच आम्ही बाईकवरून चाललो होतो. मुलुंड ते शिवडी असा प्रवास. तिच्यासाठी तो सुद्धा तसा जास्तच. खरं तर तीचा खास मूड नव्हता यायचा, पण आई-बाबासोबत तर राह्यचंय, त्यामुळे आलीच सोबत. दर दहा मिनीटांनी ‘आपण कधी पोहोचणार’ चं पालुपद सुरू होतं... आम्ही दोघं आळीपाळीने ‘आत्ता पोहोचू, आलंच, हे काय’ असं सांगून तिला दिलासा देत होतो. असं पाच-सहा वेळा झालं.

आता तिने बाबाला आणखी एकदा विचारलं, ‘काय रे बाबा, आलं, आलं म्हणतोस सारखा, कधी पोचणार आपण?’ बाबा म्हणाला, ‘हे काय बाळा, हत्ती गेला आणि शेपूट राह्यलं. बस, आत्ता पोहोचू आपण’. तिचं उत्तर, ‘कुठेय? मला नाही ना दाखवलास…’ आणि मग तिने गाडी वळवायचा हट्ट धरला.

आधी बाबाला कळेच ना, काय झालंय ते. मग तीच म्हणाली, ‘हत्ती गेला नं बाबा, मला बघायचाय.’ आधी तर बाबाने कचकचून ब्रेक मारला नकळत आणि आम्ही दोघं हसत सुटलो... त्यावर ती आणखीच रूसली. मग तिथे रस्त्यावर थांबून तिला पाणी आणि चॉकलेट देऊन शांत करत ‘हत्ती गेला आणि शेपूट राह्यलं’ या म्हणीचा अर्थ सांगितला समजावून आणि मग निघालो पुढच्या प्रवासाला...

मुक्तकअनुभव

प्रतिक्रिया

दिपक.कुवेत's picture

15 Apr 2014 - 5:48 pm | दिपक.कुवेत

कित्ती गोड. आता तिच्यासमोर काहिहि बोलताना जपुन.

आम्हीपण असेच शिकलो .रेल्वेतून अबूला चाललेलो .सकाळी अहमदाबाद सोडल्यावर शेतांत मोर दिसल्यावर तो बघ मोर दोन तीनदा झाले पण गाडी वेगात .पाच वयाच्या मुलीला दिसेनात .रुसली .मग आम्ही गप्प .शेवटी एकदा पालनपूरला एक मोर दाखवला आणि कळी खुलली .

यसवायजी's picture

15 Apr 2014 - 6:12 pm | यसवायजी

मला वाटले, आता "शेतात मोर दिसणे" या म्हणीचा अर्थ सांगताय काक्काय? ;)

पाच वयाच्या मुलीला दिसेनात .

होय आपली नजर सरावलेली असते. लहान वयात नक्की काय दृष्टीस पडणे अपेक्षित आहे ते माहीत नसते. तिला इतक्या कमी वेळात दिसलाच नसता.

जेपी's picture

15 Apr 2014 - 6:14 pm | जेपी

आवडल मन्नारा मी पयला .

अर्धवटराव's picture

15 Apr 2014 - 8:15 pm | अर्धवटराव

अश्या विकेट पडण्यातला आनंद अवर्णनीय असतो. दिल खुष झाला एकदम.

शुचि's picture

15 Apr 2014 - 8:23 pm | शुचि

:)

ज्ञानव's picture

15 Apr 2014 - 8:30 pm | ज्ञानव

माझा मुलगा लहान असताना त्याचे शब्द समजून घेणे म्हणजे दिव्य गम्मंत असे एकदा भर रस्त्यात गन्डेलगुल्लीवर जाऊ म्हणू लागला ह्या शब्दाचा अर्थ शोधताना नाकी नउ आले सगळे हातवारे करून आणि त्या शब्दाच्या जवळपास वाटणारे सगळे शब्द विचारून सुद्धा हा नाही नाही गन्डेलगुल्लीवर जाऊ करून हळू हळू चिडू लागला आणि आम्ही त्याची समजूत काढत बागेत घेऊन गेल्यावर त्याने "घसरगुंडीकडे" धाव घेऊन "गन्डेलगुल्ली" अशी आरोळी ठोकली तेव्हा अनपेक्षित सुटकेचा जो आनंद मिळाला त्याने आजही आम्ही हसून हसून वेडे होतो.

सखी's picture

15 Apr 2014 - 8:49 pm | सखी

हा हा गन्डेलगुल्ली मस्तच! तुमच्या मुलाचाही जीव तेव्हा भांड्यात पडला असेल शेवटी यांना कळलं मी कुठ जायचं म्हणत होतो ते. माझ्या मुलालाही गाणी (हिंदी, मराठी, इंग्लिश) ऐकायला खुप आवडतात पण त्याला नेमकं कोणतं गाणं कधी हवं आहे हे ओळखणं फार अवघड होतं ते आठवलं.

आदूबाळ's picture

15 Apr 2014 - 9:09 pm | आदूबाळ

:))

भारी किस्सा!

माझ्या मित्राची मुलगी याला "गुंडरघुशी" म्हणते

तुमचा अभिषेक's picture

15 Apr 2014 - 11:04 pm | तुमचा अभिषेक

हा हा मस्तच, मला पण हा शब्द जमायचा नाही, मी घसरगुंडीलापण झोपाळाच म्हणायचो, अगदी मला आठवतेय त्या वयापर्यंत ;)

असाच अजून एक शब्द माझ्या एका बालमित्राचा, "अवलंडर" ........ नाही समजले, अहो तो नाही का क्रिकेटमध्ये असतो, ज्याला बॉलिंग बॅटींग दोन्ही जमते .. हा तोच तो ऑलराऊंडर ;)

माझ्या मुलीचा आणि तिच्या वर्ग शिक्षिकेचा संवाद पहा, हा मला वर्गशिक्षिकेने सांगितला

माझी मुलगी - मी रोज शाळेत येणार नाही.
वर्गशिक्षिका - का ?
माझी मुलगी - कशाला यायचे ?
वर्गशिक्षिका - कारण मग तुला डिग्री मिळणार
माझी मुलगी - आणि मग ?
वर्गशिक्षिका - तुला चांगली नोकरी मिळणार
माझी मुलगी - आणि मग ?
वर्गशिक्षिका - मग तुला भरपूर पैसे मिळणार
माझी मुलगी - मला नको पैसे. माझी पिगी बँक आधीच फुल आहे.
वर्गशिक्षिका - Facebook smileys

तुमचा अभिषेक's picture

15 Apr 2014 - 11:06 pm | तुमचा अभिषेक

हा हा हा .. लहान मुले नेहमीच निरुत्तर करून जातात.. म्हणून कोणाशी वाद घालावा तर लहान मुलासारखा च :)

ज्ञानव's picture

16 Apr 2014 - 9:42 am | ज्ञानव

निरागसतेशी पंगे घेऊच नयेत.
माझा मोठा मुलगा ७-८ वर्षाचा होता तेव्हा मी सौ.ला एक किस्सा सांगत होतो कि चर्चगेटला इरोस थियेटरजवळ एक मुलगी संध्याकाळी ६-६.१५ वाजता उभी होती आणि गाडी पकडण्याची प्रचंड घाई असूनही सर्व पुरुष तिच्या ८०% उघड्या पाठीकडे वळून वळून पहात होते (आणि पुर्शी मानसिकता वगैरे सर्वापांग चर्चा झाली)हे सगळे शेवटच्या पूर्ण विरामापर्यंत ऐकून मुलाने शांतपणे विचारले "बाबा, तुमचे लक्ष कुठे होते?" ओशाळणे हा शब्दप्रयोग एक संस्कार मनावर करून गेला आणि आई-वडील जसे मुलगा म्हणून आपल्यावर संस्कार करतात / घडवतात तसेच लहान मुलेही बाबा घडवण्याचे संस्कार आपल्यावर करत असतात हे आजतागयात लक्षात राहिले.

पैसा's picture

16 Apr 2014 - 9:50 am | पैसा

खतरनाक आहे!

डॉ सुहास म्हात्रे's picture

16 Apr 2014 - 9:55 am | डॉ सुहास म्हात्रे

जबरी पकडलं ! :)

ज्ञानव's picture

16 Apr 2014 - 10:33 am | ज्ञानव

मी आणि सौ २४ तास घरातच असल्याने दोन्ही मुलांचे लहानाचे मोठे होणे क्षणाक्षणाला अनुभवले आहे.
त्यांचे "पकडणे" "रुसणे" हे पहिलेच आहे.
पण अत्यंत कठीण काळात त्यांच्या वयाच्या मानाने त्यांनी दिलेली साथ ह्यासाठी मी जन्मभर त्यांचा ऋणी आहे.

तुमचा अभिषेक's picture

15 Apr 2014 - 11:08 pm | तुमचा अभिषेक

भारी किस्सा आहे.. पण तिला व्यवस्थित समजला का म्ह्णीचा अर्थ, काय उदाहरणे द्यावी लागली समजवायला..

माधुरी विनायक's picture

17 Apr 2014 - 3:35 pm | माधुरी विनायक

लेक शाळेत जाणारी.. त्यामुळे मधल्या सुट्टीत डबा खाऊन झाला की नंतर लवकरच शाळा सुटते... म्हणजे खूप वेळ गेलेला असतो आणि थोडासाच शिल्लक असतो. अर्थात हत्ती......
हे लगेच समजलं हो तिला... त्यानंतरचे काही दिवस लेक ही म्हण शक्य त्या सर्व ठिकाणी वापरून पाहत होती..

अशा घटनांना तर मी रोज तोंड देते ..अद्वेय (माझा मुलगा)सध्या ३.६ वर्षाचा आहे ..एक दिवस त्याच्या daddy ना म्हणाला ,"तुम्ही मम्माचे कोण "??मग त्याच्या daddy ने त्याला सांगितले कि," husband आहे मी तुझ्या मम्माचा" ..मग काय स्वारी झाली न सुरु रोज त्याच्या daddy ना,"ओ मम्माचे husband,इकडे या" ..आणि मला," मम्मा, तुझे husband आले असे सुरु झाले ".
कहर म्हणजे त्यावेळी तो अडीच- तीन वर्षाचा होता फक्त ..+)

तुमचा अभिषेक's picture

15 Apr 2014 - 11:39 pm | तुमचा अभिषेक

हा हा हा यावरून एक जोक आठवला.
एक चार वर्षाचा मुलगा दारात रडत बसला असतो. तिथून त्याचे वडील येतात आणि रडण्याचे कारण विचारतात. तर पठ्या काही सांगायला मागत नाही. मग वडील त्याच्या खांद्यावर हात टाकून बोलतात, अरे मला आपला मित्र समजून सांग. तसा मुलगा म्हणतो, काय यार तुझ्या आयटमने खूप मारला मला आज :D

टवाळ कार्टा's picture

18 Apr 2014 - 1:45 pm | टवाळ कार्टा


काय यार तुझ्या आयटमने खूप मारला मला आज

=))

आरोही's picture

15 Apr 2014 - 11:25 pm | आरोही

बाकी मुलांच्या या वयात त्यांना पडणाऱ्या नवीन नवीन प्रश्नांना उत्तर देताना आपल्यालाही बर्याच गोष्टी शिकायला मिळतात ..+)

पैसा's picture

15 Apr 2014 - 11:54 pm | पैसा

सगळे किस्से एकापेक्षा एक भारी आहेत!

माझ्या मुलाने दुसरीत असताना "आणखी किती वर्षं शिकायचं?" हा प्रश्न गंभीरपणे विचारलेला आठवतोय! अजून बिचारा शिकतोच आहे!

खटपट्या's picture

16 Apr 2014 - 12:05 am | खटपट्या

हो अजून एक आठवलं - माझी मुलगी तिसरीत असताना माझ्याकडे हट्ट करू लागली कि तिला शाळा सोडायची आहे आणि मग ती डायरेक्ट १० वि ची परीक्षा देणार. आजूबाजूची कोणीतरी ताई डायरेक्ट १० वी ची परीक्षा देणार होती. आणि हि तिच्याकडून सर्व माहिती काढून आली होती.
शेवटी तिला सांगितले के असे "ढ" लोकांना करावे लागते. तर म्हणे "म्हणजे ती ताई ढ आहे का?" मला काय बोलावे कळेना.

सखी's picture

16 Apr 2014 - 6:32 pm | सखी

मुलगी बरीच खटपटी आहे हो तुमची :)
माझा मुलगा मध्ये हडकसिंग पाहीजे म्हणत होता, आम्हाला कळतच नव्हते हा हडकसिंग कोण ते. नंतर ४-५ दिवसांनी काही मुले आली तेव्हा मी त्यांना विचारले तुम्हाला हाईड आणि सिक खेळायचे आहे का? तर हा लगेच उड्या मारत टाळ्या वाजवत म्हणाला हो हडकसिंग खे़ळायचे आहे :)

खटपट्या's picture

17 Apr 2014 - 1:00 am | खटपट्या

Skype Emoticons

रेवती's picture

17 Apr 2014 - 7:57 pm | रेवती

अगदी असाच किस्सा माझ्या मुलाचाही झाला होता. प्रीस्कूलातून आल्यावर काहीही खेळ केला की मला म्हणायचा एकलांबा म्हण! मला कळत नव्हतं. शेवटी त्याच्या बाईंना विचारलं तर त्या म्हणाल्या की ते ऐ कारांबा आहे. मुलांनी नवीन काही केल्यावर आम्ही (आश्चर्य वाटल्यासारखे दाखवून)म्हणतो.

ज्ञानव's picture

16 Apr 2014 - 9:18 am | ज्ञानव

गन्देल्गुल्ली फेम मुलाने पहिलीत असतानाच जबरदस्त लोजीक ऐकवले कि "मी फेल झालो तर बरे म्हणजे मला परत सिनियर मध्ये जाता येईल आणि नंतर जुनियर कि संपली शाळा!!!" आणि हे इतक्या आत्मविश्वासाने गंभीरपणे तो सांगत होता की बास्स !!अवर्णनीय

सगळेच किस्से मस्त आहेत :). माझी पण एक भर. रोज पिल्लू सांगायचं बॉल मंमं हवी. सगळी गोल फळ दाखवून झाली, लाडू झाले. सगळ्याला नाही म्हणायचा. परत बॉल मंमं हवी चालूच. जवळपास १ आठवडा पिच्छा पुरवला.

नशिबाने लगेच संकष्टी आली तेव्हा कळलं साबुदाण्याची खिचडी हवीये. माझ्या मैत्रिणीकडे गेलो असताना बहुतेक त्याने तिची मुलगी खात असताना थोडी खाल्ली. मी पण खाल्ली, पण तो थोडे कडकपणा असलेले किंवा कोरडे पदार्थ आवडीने खात नाही (केळ्याचे वेफर्स कसे खातो ते विचारायचं नाही), म्हणून मी दिली नाही. त्यामुळे मला अंदाज पण आला नाही.

हा धागा बघायचा राहिला होता.

माझ्या नणदेचा मुलगा त्याच्या बाईंना म्हणाला की रोज ए बी सी डी शिकवता ते मला येतय. नवीन काही शिकवाल तेंव्हा फोन करून कळवा मी शाळेत येतो.
माझ्या नवर्‍याने एकदा सहज हापिसातून फोन करून "काय चाललय?" असं विचारलं तेंव्हा माझा मुलगा अडीच वर्षाचा असेल. त्यावर मी आपलं सहज उत्तर दिलं की "(मन रमवायला) काहीतरी करू, काहीतरी करू म्हणत चाललय" आम्ही भेंडीचा काप रंगात बुडवून शिक्के मारत बसलो होतो. नंतर जेंव्हा त्याला शिक्के मारायचे असतील तेंव्हा तो मला "ऐ कायली कलू नं" म्हणायचा आणि मला ते समजलं नाही. कायली म्हणजे काहीतरी म्हणजेच भेंडीच्या कापाची अ‍ॅक्टिव्हीटी आहे याचा उलगडा झाला तेंव्हा तो मोठा झाला होता व मला अजूनही वाईट वाटते, पण आम्ही पुष्कळवेळा असे शिक्के मारले होते.

धमाल! सगळ्यांचे किस्से एकसे एक.
एकदा माझी मुलगी ३ वर्षाची असताना मी श्रावणात सोमवारी केळीची पाने आणली होती. सहज बोलताना माझ्या तोंडुन गेलं की आज केळीच्या पानावर बसायचं. झालं तेव्हढ ऐकुन बाईंनी मी मांडलेल्या केळपानावर मांडी ठोकली.
एकदा प्रवासात बस मधुन तिला चंद्र दाखवत होतो मन रमवायला की बघ चांदोमामापण येतोय म्हणुन. ही तशीच झोपुन गेली. सकाळी आम्हाला जेथे जायचे होते तेथे खुप पहाटे चारला पोहोचलो. तेथुन रिक्षाने बरेच अंतर जायचे होते. हा गुंडाळलेला आणखी एक सामानाचा नग (झोपल्यामुळे तिची नगात गणना) रिक्षात एकदम जागा झाला. डोळे उघडले अन बाईसाहेब एकदम फुरंगटल्याच! "आलाय बघ कसा मगे लागुन" म्हणाली आम्हाला कळेचना काय म्हणतेय. मग सांगते "चांदोमा!"

चौथा कोनाडा's picture

16 Apr 2014 - 9:04 am | चौथा कोनाडा

छान निरागस किस्सा, आवडला. येवू द्या असे अजून, मस्त संग्रह होईल.

पिलीयन रायडर's picture

16 Apr 2014 - 10:42 am | पिलीयन रायडर

सध्या माझा मुलगा जवळ येतो आणि गालाला हात लावुन म्हणतो की "बच्चु..: आणि मग डोळ्याला हात लावुन म्हनतो "डोळ्याला काय झालं?" (संदर्भः- दुनियादारी.. )

काल दिवसभर साहेब पाळणाघरात सांगत फिरत होते "बाबांनी आईला मारलं.." .. असं काहिही नाहीये हे सांगता सांगता नाकी नऊ आलेत माझ्या!!

आमचाही एक किस्सा आठवला-यद्यपि तेव्हा वय लै कमी नव्हते-१०-१२ असेल. पेप्रात कैतरी बातमी होती- "लैंगिक शिक्षण दिले पाहिजे" इ.इ. ते वाचून लगेच तीर्थरूपांस विचारले-

"लैंगिक म्ह. काय?"
"लैंगिक म्ह. शारीरिक."
"मग शाळेत शारीरिक शिक्षणाचा तास असतो त्याला लैंगिक शिक्षण का म्हणत नैत?"
"....."

तरी तीर्थरूपांनी अशासाठी कधी मारले इ. नाही हे महद्भाग्यच.

स्वप्नांची राणी's picture

17 Apr 2014 - 8:18 pm | स्वप्नांची राणी

माझ्या पोराचा 'तो' महान किस्सा टाकु का ईथे...?

शुचि's picture

17 Apr 2014 - 8:24 pm | शुचि

टाका ;)

टाका टाका, वाट कस्ली बघतांव ;)

नाहीतर आमच्या मातोश्री,चुकुन असला काही प्रश्न विचारला की फाटकन कानफाटात.त्याच्यापेक्षाही वाइट गोष्ठ पुढच होती की मेडीकलला द्वितीय वर्षाला प्रिवेंटीव्ह व सोशल मेडीसिनला अर्थात स्वस्थवृत्तला मास्तरच नव्हता,त्यामुळे पहिल्या सहामाई परिक्षेला ओरलला जेंव्हा काँट्रासेप्टीव्ह विचारले तेंव्हा गोलीकी हमजोली माला डी आणी प्यार हुआ इकरार हुआ काँडम या दोनच गोष्टी माहित होत्या, आणी ही अवस्था माझी एकट्याची नाही माझ्या बरोबरच्या ८०% पोरांची होती,साला त्यामानाने पोरींना बरिच माहिती होती,पण आम्हाला मात्र कोनी सांगितलच नाही.निदान परिक्षेला काय वाचायच हे पण कोनी बोलल नाही राव अगदी माझी गर्लफ्रेंड सुद्धा.त्यामुळे जेंव्हा ओरला मास्तरीन बाई परिक्षा घ्यायचे सोडुन लेक्चर घ्यायला लागल्या सगळी पोर खुळ्यासारखी एकमेकांच्या थोबाडाकडे बघत बसली होती.

बॅटमॅन's picture

16 Apr 2014 - 1:56 pm | बॅटमॅन

=))

असं होतं खरंच.

दिव्यश्री's picture

16 Apr 2014 - 8:32 pm | दिव्यश्री

सगळे किस्से भारी आहेत . मुलांची ग्रहणशक्ती / आकलन शक्ती हि या वयात जास्त असते . त्यांच्यापुढे जपूनच बोलावे लागते . :)

माझ्या मैत्रिणीची मुलगी आमच्या सगळ्या सोसायटीत सांगत सुटली होती कि मे लि मम्मा को बेबी होणेवाला हय . प्रत्यक्षात तसं काही नव्हत . हे सगळे सिरीयलचे परिणाम .ती अगदी वर्षाची असल्यापासून मां साहिब तिला टी.व्ही . लावून द्यायच्या आणि किचन मध्ये कामे करायच्या . हि बया भोचकासारख कुठेही काहीही बोलायची .
अजून एक किस्सा आमच्या शेजारी एक खूप गोड मुलगी होती . आमच्याकडेच असायची . नयन नाव होत तीच . एक दिवस बाबांनी माझ्या आईला चेष्टेणी हळूच फटका मारला नेमकी हि घरात होती . मग तिने तिच्या घरी जाऊन सांगितलं आईला काका काकूला मात्तो . :D

कंजूस's picture

16 Apr 2014 - 9:01 pm | कंजूस

या जुन्या आठवणी जुन्या फोटोंसारख्या अधूनमधून उजळायच्या आणि हसायचं .मुलांनाही आवडतं आपण कित्ती चमकु आणि दिव्य होत्तो लहानपणी ते ऐकून.

माधुरी विनायक's picture

17 Apr 2014 - 3:30 pm | माधुरी विनायक

सगळेच किस्से धमाल आणि अफलातून...मस्त....

मार्मिक गोडसे's picture

17 Apr 2014 - 7:27 pm | मार्मिक गोडसे

एकदा माझे मेहुणे आपल्या ३ वर्षाच्या मुलाला गाडितुन फेरफटका मारयला बाहेर पडले. नाक्यावर पान खान्यासाठी गाडीतून मुलाला घेउन उतरले. पान घेउन निघाले, परंतू चिरंजीव गाडीत बसायला तयार नव्हते. समोरच्या अंडिवाल्याकडे बोट करुन अंड पाहिजे असा हट्ट धरुन बसला. अरे वेड्या तुझि आजी आपल्याला घरात तरी घेइल का? चिरंजिवांनी ब्रम्हास्त्र बाहेर काढले जोरजोराने दुकानासमोर डोके आपटू लागला.शेवटी घेतले अंडे. ठेवले चिरंजीवांच्या हातात. खुदकन हसले. पळत पळत गाडीकडे गेले. अंडे गाडिच्या पुढच्या चाकाखाली ठेवले. स्वारी गाडीत जाउन बसली. अब चलाओ गाडी...आदल्या दिवशी शेजारचे गाडी करून मुलाच्या लग्नाला गेले होते... जिजुंनी हा किस्सा जीवहत्येच्या अपराधिभावनेने आम्हाला ऐकवला. मी म्ह्टले कायको टेंशन लेते हो जिजू... वो ब्रोयलर मुर्गीका अंडा होता है! उसमे जान नही होती ... जिजू के जान मे जान आयी.

स्वप्नांची राणी's picture

18 Apr 2014 - 2:44 am | स्वप्नांची राणी

मुलगा तिसरी-चौथीत असल्यापसुन बाहेरच आहोत. त्यामुळे त्याचा मराठी गाण्यांशी फारसा संबंध नव्हता आणि हेच मला खटकत होतं. मराठि सारेगमप ली'ल चॅम्प्स सुरु असतानाची गोष्ट..

एकदा मी त्याला हा कार्यक्रम ऐकायला जबरदस्तीने बसवले. पल्लवीताईचा लाडका 'मोदक' प्रथमेश रानडे गात होता, माझं खूप आवडतं गाणं..'जेव्हा तुझ्या बटांना, उधळी मुजोर वारा...'

मुलानी खुप पेशंस दाखवत पुर्ण गाणं ऐकल आणि खुश होउन म्हणाला,'आई, आता मला पण मराठी गाणं थोडं थोडं कळायला लागलय हां..'बटांना' म्हणजे ढुंगणाला ना...?

मी अवाक....तेव्हापासुन या गाण्यातला रोमान्टीकपणा माझ्यापुरता तरी पूरता संपला..
आमच्या घरात अतिशय गाजलेला कीस्सा आहे हा!!

इरसाल's picture

18 Apr 2014 - 9:04 am | इरसाल

जेव्हा तुझ्या बटांना, उधळी मुजोर वारा

म्हणजे ते व्यक्तिमत्व फारच हलके असावे ! ;)

इरसाल's picture

18 Apr 2014 - 9:17 am | इरसाल

म्हणजेच मला आता माझ्या वर्गातल्या सुंदर मुलीचे वर्णन सुध्दा करता येणार नाही.
मी असेही म्हणु शकत नाही की " शीतल हवेच्या झुळुकेने तिची एक बट तिच्या कपाळावर झुलु लागे आणी मग माझ्या काळजाला चरे/घरे पडत"
सरळ सरळ हे अश्लिल म्हणुन गणले जाईल. देवा .....पांडुरंगा......काय हे.

स्पंदना's picture

18 Apr 2014 - 9:09 am | स्पंदना

:))

:))

आज मरणार आहे मी हसुन हसुन.
माझ पोरग 'पल पल दिलके पास.." म्हणजे पळायच ना महणला होता म्हणुन काय मेलं कौतुक वाटल होतं. पण या कौतुकापुढे ते फिक्क हो फिक्क!!

बाबा पाटील's picture

18 Apr 2014 - 1:03 pm | बाबा पाटील

हाताखालचा स्टाफ् आणी पेशंटस, मास्तर का खुळ्यासारख हसतय म्हणुन बावचळाय.

खी खी खी. स्वराताई, हे गाणं आधीही फारसं आवडत नव्हतं आता तर ऐकवणारही नाही. हसून पुरेवाट झालीये. मग एक प्रयोग म्हणून माझ्या मुलाला विचारले" काय रे, जेंव्हा तुझ्या बटांना उधळी मुजोर वारा याचा अर्थ तुला कोणता लागतोय?" त्यावर तो असेच म्हणाला. ;)

मराठी म्हणीतला शाब्दिक अर्थ मुलं घेतात आणि खरा अर्थ समजावतांना नाकी नऊ येतात (पुन्हा मराठी म्हण ) .तसं पाहिलं तर आता बऱ्याच म्हणी रोजच्या जीवनातील व्यवहारांतून निर्माण झाल्या होत्या आणि त्या गोष्टींच नाहीशा झाल्यामुळे अर्थ कळत नाही .
मुलांशी बोलतांना त्यांना आवडणाऱ्या वस्तुचं नाव ऐकलं की त्याचा हट्ट सुरू होतो .कधीकधी वेळ मारून नेण्यासाठी काहीतरी सांगतो पण ती गोष्ट त्यांच्या डोक्यातून जात नाही .उदा मरणे याला 'फोटोत गेले '.नंतर कित्येक दिवस फोटोचा धोशा लावतात .

आतिवास's picture

18 Apr 2014 - 7:22 am | आतिवास

किस्से वाचताना मजा आली.

जिन्गल बेल's picture

18 Apr 2014 - 11:26 am | जिन्गल बेल

माझी २ वर्शाची मुलगी 'टेडी बेअर' चा उच्चार असा काही करते की ते फक्त मलाच कळते....ईतर सर्वाना ती 'जिलेबी' म्हणतेय असच वाटते.....*lol*

मिरची's picture

18 Apr 2014 - 2:47 pm | मिरची

माझा मुलगा ३-३.५ वयाचा होता तेव्हाचा किस्सा...हा नेहमी भाजी घेताना बरोबर असायचा आणि भाजीवाल्यांच्या बोलण्याकडे अति बारीक नजर....आणि मग त्यांची नक्कल घरी...

एकदा आम्ही पुस्तक प्रदर्शनामध्ये फिरत होतो..तेवढ्यात एका जाड्जूड पुस्तकाकडे बोट दाखवून हा जोरात ओरड्ला..."इकडे ये आई...हे पुस्तक घे...हे छान पिकलयं..." आजूबाजूचे बघायला आणि हसायला लागले....जाऊन बघितंल तर महाराजांच्या चेहर्‍यावर आपण आईची खूप मोठी मदत केल्याचे भाव...आणि साहेबांनी निवडलेलं पुस्तक होतं ज्ञानेश्वरी.....

जिन्गल बेल's picture

18 Apr 2014 - 3:04 pm | जिन्गल बेल

*smile* :-) :)

यसवायजी's picture

18 Apr 2014 - 3:36 pm | यसवायजी

पिकलंय
'पिक केलंय' असं म्हणायचं असेल त्याला. ;)

स्वप्नांची राणी's picture

18 Apr 2014 - 11:15 pm | स्वप्नांची राणी

>>> हे पुस्तक घे...हे छान पिकलयं.. >> किती निरागस..!!

खतरनाक किस्से एक एक! भन्नाट. :)

स्वप्नांची राणी ह्यांच्या चिरंजीवांना कृ. शि. सा. न.
ज्ञानव ह्यांच्या चिरंजीवांना शि. सा. न.
इतर चिल्लर पार्टीला सा.न.

हा व्हिडीओ अजुन कोणी बघितला नसेल तर इथे बघा, हे बाळ कसं वाद घातलय त्याच्या वडीलांशी, बहुतेक बाहेर जाण्यासाठी.