कोकिळ कुहू कुहू बोले...

शशिकांत ओक's picture
शशिकांत ओक in जनातलं, मनातलं
15 Apr 2014 - 12:53 am

कोकिळ कुहू कुहू बोले...

कोकिळाचा फक्त आवाज मंजूळ असून चालत नाही. त्याचे अन्य वर्तन तसेच लाघवी व हवे हवेसे वाटावे असे असले तर त्या कूजनला दाद मिळते.

2

निसर्गतः काही वैशिष्ठ्ये प्रत्येकाला मिळालेली आहेत. त्यात कोकिळा आपली अंडी इतर पक्षांच्या खोप्यात सोडून ती वाढवण्याची जबाबदारी परस्पर सोपवण्याच्या कृतीतून अगोचरपणाची झाक दिसते. मित्रांनो, सोबतच्या या चित्र फितीतून जीवन संघर्ष प्रवृत्ती जन्मजात कशी असते याचे उदाहरण डकवले आहे.

काही अन्य पक्षी प्राणी निसर्गाच्या करामतीमुळे काहीसे बदनाम झालेत. उदा. बगळ्याचे ध्यानस्थपण, नक्राश्रू, उल्लूचे पठ्ठेपण आणि अन्य...

बकध्यान - दुष्ट कामनेचा भोळा आव

3

मगरीचे अश्रु – दांभिक सहानुभूती

1

उल्लूचा पठ्ठा - हुच्चमतीचा चिरकुट वारसदार किंवा नेत्याचा चमचा

4

आपण सुद्धा असे काही प्राणी व त्यांचे मजेशीर वर्तन आढळल्यास सादर करावे ही विनंती.
(विकी व तू नळीच्या सौजन्याबद्दल धन्यवाद.)

मौजमजाविरंगुळा

प्रतिक्रिया

शशिकांत ओक's picture

17 Apr 2014 - 1:05 am | शशिकांत ओक

प्रतिसाद जरूर मिळतो. इथल्या कोकिळाच्या धाग्यावर वसंत ऋतु यायला विसरलाय!

परवाच लिहिणार होतो पण मजेशीर नसल्यामुळे थांबलो होतो.प्रतिसाद जरा ग्रिश्मकालीन आहे .
आमच्याकडे एक कावळा बरीच वर्षे बाल्कनीच्या कट्टयावर सकाळी आठ आणि दुपारी तीन वाजता बसतो .चिमुटभर फरसाण ,शेव भरवले की महाशय निघतात .हातातून फक्त सौच्या घेतात .आमच्या नाही .(कर्क आणि सिंह रास हा माझा तर्क) .कधीकधी जास्तवेळा येऊन ओरडत बसला की हाकलतो .मग मात्र जमदग्नि बनतो कुंडीतली रोपे उपटून टाकतो ,वाळत घातलेले कपडे चोच मारून फाडतो .
हाच अनुभव आमच्या पाटील मित्राला आला .त्यांच्या अंगणात वीस पँचवीस कावळयांना खाऊ घालायचा पण एकदा खाऊ न मिळाल्यावर अंगणातल्या दुचाक्यांच्या सीट कवरस टोचून फाडून गेले .

आमच्या एका ओळखीच्या मुलीचे लग्न झाल्यावर तिच्या नवीन घरी गेलो होतो .घर गच्चीवर होते .कुत्रा ,पोपट होता .गप्पा सुरू झाल्यावर पोपट किंचाळू लागला .मग तिने पोपटाला खाऊ देऊन 'मेहमान आया' सांगितले तेंव्हा किंचाळणे थांबले .तिने कोणाशी बोललेले त्याला आवडत नाही .पोपटाने मग "मोहमॉन ऑयॉ "चे पालूपद चालू केले आणि आमच्या गप्पा चालू झाल्या .
राग आणि मत्सरचा प्रत्यय आला .

'या' ठिकाणी दिलेली आपण लिंक पाहिली असेल. त्यातील अजून दृष्टी न आलेल्या कोकिळ बालकाची इतरांना जगू न देण्याची स्पर्धा पाहून हा धागा सुचला. रंजक नसेल पण निसर्गाने दिलेल्या स्वभावधर्माचे रंजक व थोडेसे भीषण सत्य तो दर्शवतो. इतकेच.

काकांकडे मनाली नावाचा एक लबाड बोका अन मोती नावाचा मोठा कुत्रा होता. मनाली अन मोत्याची खूप दोस्ती होती. हा बोका इतर कुत्र्यांची खोडी काढायचा अन ते मागे लागले की मोत्याच्या पोटाखाली येऊन उभा रहायचा :D

या भल्याथोरल्या मोत्यापुढे कोणा अन्य कुत्र्याची डाळ शिजत नसे त्यामुळे बोक्याचे फावत असे. :)

मार्मिक गोडसे's picture

17 Apr 2014 - 9:28 pm | मार्मिक गोडसे

कावळा धुर्त जरी असला तरी तो कोकिळेचे पिल्लु प्रेमाने वाढवितो, कारण कावळा समुहप्रिय प़क्षी आहे. असे पक्षी सोशल असतात व पिल्लू मोठे होइपर्यंत नर मादिशी एकनिष्ठ असतो. ह्याउलट कोकिळ नर मादीला कावळ्याच्या घरट्यात अंड ठेवन्यापर्यंतच साथ देतो व दुसर्या मादीशी संग करन्यास सज्ज होतो. कोकिळेच्या पिल्लाबाबतीत म्हनाल तर ते जन्मजात स्वार्थी असते, त्याला इन्नेट बिहेवीअर असे म्हण्तात. बर्याच वर्षंपूर्वी प्राणी जीवनावर आधारीत 'ब्युटिफूल पीपल' नावाचा सिनेमा येउन गेला होता. त्या सिनेमात रोमांस, प्रेम, नृत्य,पार्टी(मजेशिर),द्वेष, ऐक्शन, ड्रामा, ट्रेजेडी सबकुछ आहे.चिमण्यांच्या घरट्याच्या आगीचे चित्रण तर अप्रतिम . ह्या सिनेमाच्या डिव्हिडी मी मित्रांच्या मुलांच्या वाढदिवसाला गिफ्ट दिल्या आहेत. ह्या विषयावर एक स्वतंत्र धागा होउ शकतो.

होय कावळा फार हुषार पक्षी आहे. सर्वात हुषार!!

तो सिनेमा बघायचा राहीलाच बरं झालं तुम्ही आठवण करुन दिलीत :)