गुरूपुष्यामृत योग

लोकहो,

गुरूपुष्यामृत योग दिनांक ३१ जुलै रोजी येत आहे. यालाच गुरू पुष्य अमृतसिद्धीयोग असेही म्हणतात.

हा योग सायंकाळी ०७ वाजून २६ मिनिटांपासून ते शुक्रवारी सकाळी ०६ वाजून १९ मिनिटांपर्यंत आहे.

आपला,
(पंचांगी) धोंडोपंत

पण काय करायचं !!!

पंत,
गुरूपुष्यामृत याचं महत्त्व सांगा ना !!!
अमृतसिद्धीयोगाचे फायदे-तोटे कळले असते तर अधिक उत्सुकता निर्माण झाली असती, आणि आपण दिलेल्या वेळेत काय करायचं तेही सांगा ना !!! ( मला वाटलं काथ्याकुट करायचा आहे Wink )

-दिलीप बिरुटे
(अज्ञानी नागरिक आणि
पंताचा मित्र.)

होय भाऊ.

मला पण असंच वाटलं.या निमीत्तानी काहीतरी नविन भर पडेल.
अवांतरः बायकोला हा दिवस आधीच कसा कळतो.त्या दिवशी सकाळीच मराठे सोनाराच्या दुकानात हजर असते.या निमीत्तानी काहीतरी नविन भर पडेल असेच म्हणते.

सध्याचे भाव पाहता :)

प्रतिक खरेदी केले तर चालतात का ? Wink
लोक हा दिवस का निवडतात कोणास ठाऊक Sad

चला, म्हणजे आता खर्च आला! :)

गुरुपुष्यामृत योग जवळ आला आहे म्हणजे आता आम्हाला खर्च आला! Smile

"अरे आज गुरूपुष्य आहे रे, थोडं तरी सोनं विकत घेऊन ये रे!" असं आमची म्हातारी आम्हाला हमखास सांगणार. नेहमीचा अनुभव आहे हा! Smile

आपला,
(मातृभक्त) तात्या.