"राजकारण जातीकडून वर्गाकडे" प्रकाश पवारांचे विश्लेषण, वास्तव की निश्कर्ष घाईचे ?

माहितगार's picture
माहितगार in राजकारण
28 Mar 2014 - 8:52 pm

डॉ. प्रकाश पवार हे राज्यशास्त्राचे प्राध्यापक आणि नविन पिढीतील ताज्या दमाचे मराठी राजकीय निरीक्षक, अभ्यासक आणि विश्लेषक असून; त्यांच्या अभ्यासपूर्ण, संयत, समतोल विश्लेषणांकरीता परिचीत आहेत. त्यांचे लेखन मला स्वतःला दखल घेण्याजोगे वाटत आले आहे.

डॉ. प्रकाश पवारांचा दैनिक सकाळ मध्ये "राजकारण जातीकडून वर्गाकडे" नावाने लेख आला आहे. त्यात ते म्हणतात

निवडणुकीच्या विश्‍लेषणात आणि अंदाज व्यक्त करताना अद्यापही आपल्याकडे जातीची समीकरणेच मध्यवर्ती मानली जातात. परंतु देशाच्या राजकारणात हळूहळू का होईना, जात हा घटक दुय्यम स्थानावर जात असून, तो "वर्गा'कडे सरकत
आहे.

संदर्भ लेख : राजकारण जातीकडून वर्गाकडे- डॉ. प्रकाश पवार ( दैनिक सकाळ)

पण उपरोल्लेखित लेख वाचताना मी डॉ. प्रकाश पवारांचा लेख वाचतोय का त्यांच अथवा प्राध्यापक पळशीकरांच चष्म्यातलं स्वप्न वाचतोय ? ; की प्रकाश पवारांचे विश्लेषण वास्तव की निश्कर्ष घाईचे ? असा काहीसा प्रश्न पडला. त्यांच्या लेखात व्यक्त विश्लेषणाबद्दल तुम्हाला काय वाटते ? प्रतिसाद कृपया प्रकाश पवारांचा लेख वाचून नंतरच द्यावेत. प्रकाश पवारांचा लेख न वाचता प्रतिसाद देण्याचा मोह टाळावा ही नम्र विनंती.

* डॉ.प्रकाश पवारांबद्दलचा मराठी विकिपीडियावरील परिचय लेख

प्रतिक्रिया

माहितगार's picture

28 Mar 2014 - 8:58 pm | माहितगार

या लेखास राजकारण या टॅग मध्ये टाकावयाचे होते ते का झाले नाही कल्प्ना नाही करून मिळावे ही विनंती.