विकासक्रम भाषा आणि लिपीचा!

माहितगार's picture
माहितगार in काथ्याकूट
24 Mar 2014 - 10:26 am
गाभा: 

लोकप्रभा मासिकाच्या २८ मार्च करताच्या अंकात विकासक्रम भाषा आणि लिपीचा! हा मनोहर भिडेंचा माहितीपूर्ण लेख आला आहे. यात प्राच्य विद्येच्या अंगाने भाषा आणि लिपींच्या विकास क्रमाचा विचार केला आहे.

यातील सातव्या मुद्द्यात ऋग्वेद पुर्व कालीन संस्कृत भाषेचा प्रमाण भाषा म्हणून विकास कसा केला गेला असावा याचे ससंदर्भ रोचक विवेचन आले आहे. लेखक म्हणतात :

असं व्याकृत करणं म्हणजेच इंद्राने या देवभाषेला पहिल्यांदा शब्द कसे वापरायचे ते शिकवलं, म्हणजेच 'शब्दानुशासन' सांगितलं, अर्थात त्याने भाषेला 'व्याकरण' दिलं, शब्द आणि त्यांच्या उच्चारणाचे नियम दिले आणि 'प्रमाण'भाषेची निर्मिती केली. अशी प्रमाणभाषा जी कुठेही उच्चारली गेली तरी तिच्यामधून निघणारा अर्थ एकच असेल, व्यक्त होणारे विचारही एकच असतील. हीच भाषा आपल्या सर्वाची मूळ भाषा असं म्हणता येतं.

या निष्कर्षात संस्कृतला मूळभाषा ठरवण्याचा आग्रह कायम आहे, पण महत्वाच म्हणजे संस्कृत भाषा ही भाषेचे प्रमाणीकरण करण्याच्या प्रयत्नातून तयार झाली असण्याची शक्यता अंशतः स्विकारली आहे असे दिसते.

लेखात इतरही बर्‍याच मुद्यांच विवेचन आहे.

*लेख दुवा: विकासक्रम भाषा आणि लिपीचा! - मनोहर भिडें

प्रतिक्रिया

आयुर्हित's picture

27 Mar 2014 - 9:44 pm | आयुर्हित

अत्यंत माहितीपूर्ण संदर्भ!
मनोहर भिडे व आपले मनापासून आभार.

मारकुटे's picture

28 Mar 2014 - 7:28 am | मारकुटे

मनोहर भिडें

अनुस्वार देण्याची पद्धत बंद झाली आहे. जुनं ते सोनं अशा पद्धतीने अजूनही आडनावानंतर अनुस्वार देण्याची आणि तसे बोलतांना अनुस्वारासह उच्चार करण्याची पेठेतील नगांची पद्धत केवळ डोक्यात जाते. १८ व्या शतकात जगणारी माणसे अजुनही पाचहजारवर्षांपुर्वी मरुन बेपत्ता झालेल्या भाषेचा अभिमान बाळगत जगतात कशी हा मला पडलेला प्रश्न आहे.

सुनील's picture

28 Mar 2014 - 8:53 am | सुनील

लोकसत्ताच्या जालीय आवृत्तीत पाहिले असता भिडे असाच शब्द दिसला, भिडें असा नव्हे. तेव्हा हा अनुस्वार माहितगार यांच्याकडून (अनवधानाने) पडला आहे काय?

छापील आवृत्ती अद्याप पाहिलेली नाही.

माहितगार's picture

28 Mar 2014 - 9:40 am | माहितगार

टायपो बद्दल क्षमस्व !

(बाकी भिडेंनी त्यांच्या लेखनात जुन्या पद्धतीच्या अनुस्वार लेखनाचा अवलंबही केला असावा असे वाटते पण तो वेगळा मुद्दा आहे.)