नरेन्द्र (मोदी) वर्सीस नरेन्द्र (रावत)

संतोषएकांडे's picture
संतोषएकांडे in जनातलं, मनातलं
24 Mar 2014 - 4:15 am

भाजपाच्या तीसर्या यादीत नरेन्द्रमोदी वडोदराहून नीवडणूक लढणार हे निश्चित झाल्यावर वडोदरा शहर-जिल्ल्याची लोकं खूपच एक्साइट आहेत. अमदावाद, वडोदरा, राजकोट, सुरत आणी गांधीनगर अशा पाच जागे वरचे भाजपा कार्यकर मोदींची मागणी करुन त्यांना प्रचंड बहुमतांने विजयी करुन देण्याची खात्री पटवून देत होते. पण शेवट फाइनल शिक्का वडोदरावर लागला. कदांचीत मोदींच्या डाव्या हाताच्या पहिल्या दोन बोटांचा तो प्रताप असावा. स्वतःच्या प्रत्येक रेलीत मोदी डाव्या हाताचे दोन बोटं वी च्या शप मधे उचलून वी फॉर वीकटरी असं म्हणत उजव्या हाताने लोकांचं अभिवादन करत असतात. आता वी फॉर विक्टरी,वी फॉर दोन आणी वी फॉर वाराणसी आणी वडोदरा असा सोपा प्रास जुळत असावा, असा इथल्या लोकांचा ठाम मत आहे.
तर दूसरी कडे कॉंग्रेसचं काय ते बघूया. राहूलबाबाच्या हठाग्रहा मूळे देशाच्या वेगवेगळ्या १५ जागे वरून कॉंग्रेस हाइकमान्डने स्वतः उमेदवार न नीवडता प्रायमरी इलेक्शन करून घेवून ज्या त्या विस्ताराच्या कार्यकरांना उमेदवार नीवडण्याची सत्ता दिली. आणी नेमकं वडोदरा पण या पंधराच्या यादीत आहे. पंधरा दिवसांपूर्वीच शहराहून १५ कि.मी. लांब एका प्राईवेट फार्महाउस मधे हे प्राइमरी इलेक्शन संपन्न झालं. शहर-जिल्ल्याच्या चार मजबूत उमेदवारांपैकी नरेन्द्र रावत हे विजयी झाले. कॉंग्रेस हाइकमान्ड कडून समर्थन मिळवून ते वडोदराचे कॉंग्रेस उमेदवार झाले.
प्रायमरीझ मधे नीवडून येउन उमेदवार झाल्या मूळे त्यांच्यात भरपूर आत्मविश्वास असणं स्वाभाविक आहे. आल्यआल्याच त्यांने इथल्या वर्तमानपत्रां द्वारे वडोदराच्या विकासा उध्धाराची वचनं द्यायला सुरुवात केली.पण हे सगळं फक्त शब्दातच नाही तर अक्षरशः चार दिवसां पूरतं चाललं. चार दिवसांनी मोदींच्या नावाची जाहीरात होताच त्यांच्या चमूत जणू काही सन्नाटा व्याप्त झाला. त्यांची जशी काही हवाच निघून गेली.
वाराणसी जसं उत्तर भारताचा भाजपाचा गढ आहे तसाच वडोदरा हा गुजरातचा भाजपाचा अजिंक्य गढ आहे. भाजपाच्या नावाने साध्या दगडाला जरी तिकीट मिळाली तर तो पण प्रचंड बहुमताने जिंकून येइल एवढा मोठा भाजपा समर्थक समाज इथे आहे. १९८९ ची भाजपा उमेदवार दिपीका चीखलीया (रामायण मालीके ची सीता) पासून आत्ताच्या बाळकृष्ण (बाळू) शुक्ल पर्यंतचे उमेदवार अशाच बहुमताने विजयी झाले. बाळू शुक्ल आत्ता शेवटच्या नीवडणूकीत १,०२,००० मताने विजयी झाले. मोदींमूळे त्यांचं भविष्य धोक्यात आलं. (त्यांच नाव अजून पर्यंतच्या उमेदवारी यादीत आलेल नाही.)
वडोदराची प्रजा मोदींना निश्चितच बहुमताने जिंकवणार. पण पंचेत अशीकी समजा मोदी पंतप्रधान झाले तर वडोदराच्या एखाद दुसर्या कामा साठी त्यांना शोधणार कुठे...? पंतप्रधानत्व स्वीकारल्या नंतर त्यांना १,मुख्यमंत्री निवास, गांधीनगर रिकामं करावं लागणार.त्यांचं कायदेशीर निवासस्थान वडनगर,साबरकांठा उत्तर गुजरात आहे तिथे की दिल्ली ला...?संपूर्ण भारताच्या विकासाचं ओझं डोक्यावर असताना आमच इवलसं शहर त्यांना आठवेल तरी का....आणी या हून अधिक म्हणजे समजा ते वाराणसी व वडोदरा दोन्ही जागे वरून विजेते झाले तर कायदेशीर त्याना एक जागे वरून त्यागपत्र द्यावं लागेल. हाइकमान्ड त्यांना वाराणसी हून राजीनामा देवू देणार नाही.तर मग काय वडोदराचा नंबर लागणार...?आणी वडोदराहून राजीनामा दिला तर वडोदराचं रणी धनी कोण...?(असो काहीही झालं तरी आपला उमेदवार पंतप्रधान झाल्याचं समाधान तरी घेवू शकु.)
इकडे कॉंग्रेस पक्षात पण नरेन्द मोदी समोर नरेन्द्र रावत एक अतिशय कमजोर उमेदवार असल्याची भीती उभी ठाकली आहे. मोदीं समोर सशक्त उमेदवार आणायची मांगणी बळावत चालली आहे.पण उमेदवार बदलला तर राहूल गांधीच्या प्रायमरी इलेक्शनच्या परिकल्पनेला ठेच लागेल. आणी कदांचीत त्या मूळेच कॉंग्रेसी प्रवक्ता म्हणतायत की काहीही झाल्ं तरीही उमेदवार बदलणार नाही. आणी नरेन्द्र रावतच नीवडणूक लढणार.
आता वडोदराची नीवडणूक होणार नरेन्द्र मोदी नरेन्द्र रावत यांच्या मधे...

राजकारणलेख

प्रतिक्रिया

रमेश आठवले's picture

24 Mar 2014 - 11:44 am | रमेश आठवले

मोदी हे वाराणसी आणि बडोदे या दोन ठिकाणावरून निवडून आले आणि पन्तप्रधान झाले तर ते बडोदा न निवडता वाराणसी चे प्रतिनिधित्व स्वीकारतील असा माझा तर्क आहे.मोदी अहमेदाबाद पूर्व च्या जागेवरून ही लढू शकले असते. ते सध्या विधानसभेत ज्या भागाचे प्रतिनिधी आहेत तो मणीनगर भाग या लोकसभेच्या जागेत समाविष्ट आहे. परंतु अडवाणींना खेटून उभे रहावयास लागू नये म्हणून त्यांनी बडोदा निवडले असावे.
ते लवकरच बडोद्याची जागा सोडतील आणि बडोद्याला फक्त त्याच्या हितास जपणारा लोक प्रतिनिधी आणखी सहा एक महिन्यात मिळेल असे वाटते.

सुनील's picture

24 Mar 2014 - 12:08 pm | सुनील

मोदी हे वाराणसी आणि बडोदे या दोन ठिकाणावरून निवडून आले आणि पन्तप्रधान झाले तर ते बडोदा न निवडता वाराणसी चे प्रतिनिधित्व स्वीकारतील असा माझा तर्क आहे

आणि पंतप्रधान न झाले तर वाराणसी न निवडता बडोद्याचे प्रतिनिधित्व करतील असाही तर्क आहे काय?

ऋषिकेश's picture

24 Mar 2014 - 3:25 pm | ऋषिकेश

तर ते बहुदा मुख्यमंत्रीच राहतील व दोन्ही जागा सोडतील! ;)

रमेश आठवले's picture

24 Mar 2014 - 6:17 pm | रमेश आठवले

ऋषिकेश यांच्या विचाराशी सहमत.

रमेश आठवले's picture

24 Mar 2014 - 12:45 pm | रमेश आठवले

आगे आगे देख लो होता है क्या

रमेश आठवले's picture

25 Mar 2014 - 10:55 pm | रमेश आठवले

नुकत्याच आलेल्या बातमीनुसार नरेंद्र रावत यांनी मोदींविरुद्ध लढण्यास नकार दिला आहे.
त्यामुळे आता कॉंग्रेस चे जनरल सेक्रेटरी आणि राज्यसभेवर गुजरातच्या कोन्ग्रेस कोट्या मधून निवडून आलेले आणि म्हणून सेफ असलेले मधुसूदन मिस्त्री हे बडोद्यात निवडणूक लढणार आहेत.