कच्च्या कैरीचा चुंदा (चटणी)

प्रमोद्तम्बे's picture
प्रमोद्तम्बे in पाककृती
22 Mar 2014 - 7:01 pm

परवाचे दिवशी आम्ही मंडईत गेलो तेंव्हा कैर्या बघून तोंडाला एकदम पाणीच सुटले. मग आम्ही कैर्याू विकत घेतल्या. काल कैरीची चटणी केली व आज कच्च्या कैरीचा चुंदा (आंबट-गोड चटणी) केली आहे त्याचीच रेसिपी पुढे देत आहे.
साहित्य : एक मोठ्ठी कैरी (किसून) ,चवीनुसार गूळ ,साखर,मीठ व लाल तिखट व फोडणीचे साहित्य तेल,मोहरी.जिरे,हिंग,मेथया दाणे व हळद.
कृती : विळीवर कैरीची जाड साले काढून टाकावीत व कैरी किसून घ्यावी, एका मोठ्या काचेच्या बाउलमध्ये कैरीचा कीस घेऊन त्यात चवीनुसार गूळ,साखर मीठ व तिखट घालून चमच्याने चांगले हलवून मिक्स करून तीन-चार तास मुरत ठेवावे. गॅसवर एका काढल्यात तेल तापवून घेऊन मोहरी,जिरे,मेथया दाणे ,हिंग व हळद घालून फोडणी करावी व ती मुरलेल्या मिश्रणावर घालून पुन्हा एकदा चांगले हलवून घ्यावे.
जेवणात तोंडी लावणे म्हणून हा झटपट होणारा चुंदा कशाबरोबरही फारच चटकदार व चविष्ट लागतो. आठ-दहा दिवस टिकतोसुद्धा !

प्रतिक्रिया

जेपी's picture

22 Mar 2014 - 8:02 pm | जेपी

पाकक्रुती छान आहे . पण फक्त गुळच घालावा . साखरेची गरज नाही .

रेवती's picture

22 Mar 2014 - 8:37 pm | रेवती

छान कृती पण फोटू?

प्रभाकर पेठकर's picture

23 Mar 2014 - 12:40 am | प्रभाकर पेठकर

चुंदा नाही, 'छुंदा'.

विवेकपटाईत's picture

23 Mar 2014 - 9:40 am | विवेकपटाईत

मस्त पदार्थ. आमची सौ. ही पुष्कळदा करते. कैरीची कोय सुद्धा त्यात घालते. आंबट गोड आणि तिखट अशी कोय चोखायला आमच्या सारख्या मुलांना काय मजा येते सांगता येत नाही.
(१) बीटच्या पुऱ्या आणि बटाट्याची भाजी