सत्ययुग कधी येणार...?

संतोषएकांडे's picture
संतोषएकांडे in जनातलं, मनातलं
21 Mar 2014 - 3:50 pm

चहुकोर वेगवेगळे अत्याचार, दुराचार, भ्रष्टाचाराच्या बातम्या आपण ऐकतो.बहुतांश लोकं म्हणत असतात की कधी एकदाचा हा कलीयुग संपतो आणी सत्ययुग येतो. आपल्या प्रत्येकाच्या मनात पण कधीतरी हा विचार आलाच असणार.
आपण पृथ्वीच्या प्रलयाच्या बर्‍याचशा भविष्यवाण्या ऐकल्या. त्या पोकळ असल्याचा अनुभवही केला. या विषयाचे बरेचशे चित्रपट बघीतले.'२०१२' तर जणूकाही पढे आपल्याशी काय घडणार' ह्याची भीती दाखवणारंच चित्रपट होतं. तर कधी होतोय या पृथ्वीचा विनाश..! कधी येणार हा सत्ययुग...!
नोस्ट्राडमस ची भविष्यवाणी सन ३७९७ चं वर्ष पृथ्वीचा आयुष्याचं शेवटचं वर्ष असण्याचं दाखवत आहे. म्हणाकी नोस्ट्राडमसच्या भविष्यवाण्या अगदी काटेतोलपणे खर्‍या ठरल्या असंही नाही.
पण आपले भविष्य कथनकार आणी पुराणकार काय म्हणत आहेत या बाबतीत ?
पौराणीक खगोलीय गणितावर आधारीत आपलं वैदीक पंचांग ब्रह्मांडाला अनूलक्षून बनले आहे. मनुष्यनिर्मित्त केलेन्डर किंवा पंचांगाशी त्याचा काहीही संबंध नाही.हिन्दु पुराणकर्त्यांनी 'समय'याला विशाल फलकाच्या महायुगा पासून सीमीत फलकाच्या क्षणा पर्यंताच्या अनेकविध भागात वर्गीकृत केला.त्यानुसार एक महायुग ४३,२०,००० वर्षाचा असतो. त्यात १७,२८००० वर्ष सत्ययुग, १२,९६,००० वर्ष त्रेता,८,६४,००० वर्ष द्वापर आणी ४,३२,००० वर्ष कलीयुगाचे. अशे चार युग त्यात समाविष्ट आहेत.
हे सगळे मनुष्य वर्ष असून देवताइ म्हणजे दैवी वर्ष वेगळेच असतात. एक दैवी वर्ष ३६० मनुष्यवर्षाचं असतं.
त्या प्रमाणे प्रत्येक महायुग ४३,२०,००० भागीले ३६०=१२००० दैवी वर्षाचा असून सत्ययुग ४८००,त्रेता ३६००,द्वापर २४०० तर कलीयुग १२०० दैवी वर्षाचा होय.प्रत्येक युगाचे प्रारंभिक आणी अंतिम वर्ष अनुक्रमाने संध्या आणी संध्यांशाचे आहे. प्रत्येकाची संख्या बाकी रहाण्यार्या वर्षांच्या दहाव्या भागाची आहे. उदाहरणार्थ सत्ययुगाच्या ४८०० दैवी वर्षां पैकी ४०० वर्ष संध्या तर ४०० वर्ष संध्यांशाचे आहे. बाकी रहाणार्या ४००० वर्षांना माध्यिका म्हटलेले आहे.
युगाचं नाव संध्या माध्यिका संध्यांश दैवी वर्ष गुणांक एकूण मानववर्ष
सत्ययुग ४०० ४००० ४०० ४८०० ३६० १७,२८,०००
त्रेतायुग ३०० ३००० ३०० ३६०० ३६० १२,९६,०००
दापर युग २०० २००० २०० २४०० ३६० ८,६४,०००
कलीयुग १०० १००० १०० १२०० ३६० ४,३२,०००
चार युगांचा महायुग एकूण वर्ष ४३,२०,०००
महायुगाचा शेवटला युग कलीयुग असून अंती प्रलय.आणी त्याचा लयकाल संपलाकी नवा सत्ययुग सूरू होतो.वर लिहील्या प्रमाणे २ कलीयुग =१ दापर युग,३ कलिय़ूग =१ त्रेतायुग,आणी ४ कलीयुग=१ सत्ययुग होयं. उल्लेखनीय बाब ही आहेकी प्रत्येक युग सलग चालत नसून प्रत्येक युगात पण हे चारी युग त्यंच्या गुणोत्तरा प्रमाणे भ्रमण करतात.
उदाहरणार्थ सत्ययुगात ४,३२,००० वर्षाचा सत्ययुग, २,१६,००० वर्षाचा त्रेता,१,०८,००० वर्षाचा द्वापर तर ५४,००० वर्ष कलीयुगाचे आहे.
त्यानंतर त्रेतायुगात परत हेच परिवर्तन परिवर्तीत होत जातं.
या प्रकारचा आंतरीक कलीयुग सध्या चालु आहे. याच उतरत्या गाणितीक विभाजना अनुसार चालु असलेल्या कलीयुगाचे वय १९.२ दैवी वर्ष असून ६९१२ मानववर्ष आहे.
ब्रहमगुप्तानी लिहील्या प्रमाणे (आणी एन्साइक्लोपीडीया ब्रिटानीका च्या लेखनानुसार)वर्तमान कलीयुगाचा प्रारंभ इ.स.पूर्वी (बी.सी.)३१०२ला भगवानश्री क्रुष्णाच्या देहोत्सर्गा बरोबर लगेच झाला. म्हणजेच ३१०२+२०१४= ५११६ वर्षा पूर्वी.
कलीयुगाचं वय=६९१२- ५११६=१७९६ उरलेले वर्ष.
उरलेले वर्ष १७९६+ २०१४= ३८१०.
या प्रमाणे सन ३८१० ला प्रलय आणी नव्या सत्ययुगाचा आरंभ...
या प्रमाणे नास्त्रोडमसची भविष्यवाणी आणी आपली शास्त्रोक्त पुराणवाणी यांचात फक्त १३ वर्षाचा फरक आहे.
विषय हिन्दु कॉस्मोलॉजीचा असून त्यात दर्शवीलेल्या कालगणनेचा आहे.त्याला कॉस्मोलॉजीकल दृष्टिने पहावा. विज्ञानाचा याचाशी स्नाना-सूतकाचा ही संबंध नाही.

ज्योतिषलेखमाहिती

प्रतिक्रिया

चित्रगुप्त's picture

21 Mar 2014 - 4:02 pm | चित्रगुप्त

बरं, यात आता आम्हा वाचकांनी नेमके काय करायचे आहे?
इ.स. ३८१० तर पर्यंत तर आपल्यापैकी कुणीच नसणार बहुधा.

शिद's picture

21 Mar 2014 - 4:09 pm | शिद

आता आहे ते जीवन सुखासमाधानाने जगा आणि जगू द्या म्हणजे झाले... उगाच फालतू गोष्टींचा विचार का आतापासूनच करुन डोक्याला शॉट लावून घ्या.

आत्मशून्य's picture

21 Mar 2014 - 4:15 pm | आत्मशून्य

.

मी असेन बहुतेक ३८१० पर्यंत.ंकाय झाले तोवर त्याचा मिपावर वृत्तांत लिहिन तेव्हाच. ;)

ऐया कसं काय???? एखादी जडीबुटी असेल तर सांगा बरं आम्हांलाही!

अजया's picture

21 Mar 2014 - 4:38 pm | अजया

सांगेन हं .

बॅटमॅन's picture

25 Mar 2014 - 12:31 am | बॅटमॅन

सांगा हां, वाट पाहतोय!

हाडक्या's picture

21 Mar 2014 - 11:25 pm | हाडक्या

जडी बुटी नाय ब्याटम्यान भौ .. भूत-लोकामध्ये नायतर हाडळ-विश्वात त्यांचा ज्याक असणार है.. मी सांगतो तुमाला..

नाव बघा काय आहे स्वतःचं...चाललेत भूत हडळी जॅक शोधायला !!

हाडक्या's picture

2 Apr 2014 - 8:54 pm | हाडक्या

हा हा हा .!!
नावात काय आहे हो.. :D

हाय का नाय जॅक खरं खर्रर्र सांगा पाहू..

हम्म, शक्यता नाकारता येत नाही...

पण या सत्ययुगातही जातिभेद राहणारच, नै का हो?

अगदी रामराज्यातही रामानं मारुतीचं शेपूट आपल्या पाठीला लावलं नाही. हा नरच राहिला तर तो वानरच राहिला.

(बॅटू बर्वा, मधली आळी, गॉथमगिरी.)

अत्रुप्त आत्मा's picture

21 Mar 2014 - 5:21 pm | अत्रुप्त आत्मा

(बॅटू बर्वा, मधली आळी, गॉथमगिरी.) >>> http://www.sherv.net/cm/emo/laughing/smiley-face-laughing.gif

बाकि लेख म्हणाल तर.. http://www.sherv.net/cm/emoticons/jobs/fireman-smiley-emoticon.gif

विकास's picture

22 Mar 2014 - 1:19 am | विकास

रामराज्य सत्ययुगात नव्हतेच की हो! :)

बॅटमॅन's picture

25 Mar 2014 - 12:32 am | बॅटमॅन

प्वाइंट बराबर काढलात बघा! :)

तुषार काळभोर's picture

21 Mar 2014 - 4:43 pm | तुषार काळभोर


ब्रहमगुप्तानी लिहील्या प्रमाणे (आणी एन्साइक्लोपीडीया ब्रिटानीका च्या लेखनानुसार)

ड्वाले पाणावले...
(आमचं) घोडं (गंगेत) न्हालं!!!

चिगो's picture

21 Mar 2014 - 5:09 pm | चिगो

आआप जिंकल्यास, निवडणूकांनंतर लगेचच येणारै सत्ययुग.. किती दिवस टिकेल, ते मात्र नाही सांगू शकत ब्वॉ.. ;-)

मृत्युन्जय's picture

21 Mar 2014 - 5:33 pm | मृत्युन्जय

या प्रमाणे नास्त्रोडमसची भविष्यवाणी आणी आपली शास्त्रोक्त पुराणवाणी यांचात फक्त १३ वर्षाचा फरक आहे.

नॉस्ट्री संस्कृती नाश पावलेल्या पाश्चात्य जगाबद्दल बोलत असावा, तिथे जगबुडी होइल (पाश्चात्यांनुसार ते म्हणजेच जग) आणि महान संस्कृतीचे लेणे असलेला भारत आजुन १३ वर्षे जगेल असे तर यातुन सूचित होत नसेल ना? शिवाय कलीयुग संपुन परत सतयुग सुरु होणार म्हणहे तेव्हाही भारत राहणारच, जग बुडे भारत उडे असेच यातुन सिद्ध होते.

विज्ञानाचा याचाशी स्नाना-सूतकाचा ही संबंध नाही.

हे वाक्य काळजाला भिडले.

प्रसाद गोडबोले's picture

21 Mar 2014 - 5:59 pm | प्रसाद गोडबोले

लेख मनाला स्पर्शुन गेला ...

*crazy*

सस्नेह's picture

21 Mar 2014 - 10:29 pm | सस्नेह

टँजंट का पॅरलल ?

प्यारे१'s picture

21 Mar 2014 - 7:02 pm | प्यारे१

वाट बघा...सत्ययुगाची !

खरंतर ते असं आहे-
एक महायुग १०८ लक्ष वर्षाचा असतो. त्यात एक्शाठ हजार वर्षं त्रेता, मंग तेवढीच द्वापर आणी मग चार्शाठ वर्षं कलीयुगाचे. (हे तीन्-तीन्दा). तेवढं झालं की मंSSSग सत्ययुग.

(नो-स्टार-डॅम्बीस)

आयुर्हित's picture

21 Mar 2014 - 8:59 pm | आयुर्हित

लेख छान लिहिला आहे.बराच सखोल अभ्यास केलेला दिसतोय. असेच लेख लिहित रहा.

बाकी "कलियुग जायेगा"....सतयुग आयेगा.... जय .....बाबा..?" अशा भीती रंगवलेल्या आठवतात.
नाव आठवत नाही पण उत्तर भारतीय बाबा होते/आहेत.
या भिंती रंगविल्यामुळे नक्कीच बऱ्याच लोकांना रोजगार मिळाला असावा!
भारताची अर्थव्यवस्था सुधारायची असेल तर या ....बाबांना परत एकदा आठवण करून द्यायला हवी!
जय हो ........बाबा!

मदनबाण's picture

22 Mar 2014 - 9:45 am | मदनबाण

"कलियुग जायेगा"....सतयुग आयेगा.... जय .....बाबा..?" अशा भीती रंगवलेल्या आठवतात
खरं आहे, ते ताठे लिहण्याच्या प्रकरणा नंतर ह्या लिखाणाचा प्रसार अनेक भिंतींवर पाहिला होता. जय बाबा गुरुदेव ! असे लिहलेले असायचे.

गब्रिएल's picture

21 Mar 2014 - 9:41 pm | गब्रिएल

सत्ययुग कधी येणार...?

आमाला म्हाय्तीय पन तुमाला नाय सांगनार ! काय्च्याकाय, आम्च शिक्रेट हाय्ते !!

पैसा's picture

21 Mar 2014 - 10:10 pm | पैसा

गणित बरोबर दिसतंय. पण ते सुरू होईल तेव्हा मिपावर त्याबद्दल लिहायला आपला कितवा अवतार सुरू असेल हो?

चित्रगुप्त's picture

21 Mar 2014 - 10:19 pm | चित्रगुप्त

अमूक युगाची कारणे बीजरूपात त्यापूर्वीच्या काळात असणार, म्हणजे कलियुगाची कारणे बीजरूपात द्वापारयुगात होती म्हटले, तर ती कोणती, जेणेकरून कलियुगातील अवनती झाली ?? आणी सध्याच्या कलियुगात बीजरूपाने कोणती कारणे आहेत, ज्यांचा आणखी विकास होऊन पुढे (लवकरच) सत्ययुग अवतारणार आहे?
यावर धागाकर्त्याने कृपया प्रकाश टाकावा.

आम्हाला तर सध्याचे कलियुग भारीच आवडते. मिपावर उत्तमोत्तम लेख वाचायला मिळतात, उत्तमोत्तम सिनेमे, संगीत, चित्रे, साहित्य, काव्य, यांचा आनंद घेता येतो, नेटवरून नाना विषयांची सांगोपांग माहिती घेता येते आणि बरेच काय काय करता येते....वगैरे वगैरे... यात वाईट काय आहे? जगाच्या एकूण लोकसंख्येच्या मानाने दुराचार, भष्टाचार इ.करणारे लोक अगदी कमी आहेत. बहुसंख्य तुमच्या-आमच्या सारखे लोक सरळ्, सद्वर्तनी आहेत. मिडियावाले वाईट गोष्टींचाच फार गवगवा करतात, त्यामुळे "चहुकोर वेगवेगळे अत्याचार, दुराचार, भ्रष्टाचाराच्या बातम्या" पसरतात.

आयुर्हित's picture

21 Mar 2014 - 10:25 pm | आयुर्हित

कलियुगाची कारणे बीजरूपात........
रामायणातील "मंथरा दासी" चा कलियुगातला अवतार "एकता कपूर" असावा बहुतेक.

विजुभाऊ's picture

22 Mar 2014 - 3:05 pm | विजुभाऊ

रामायणातील "मंथरा दासी" चा कलियुगातला अवतार "एकता कपूर" असावा बहुतेक.
मग त्राटीका = राखी सावन्त का?
अन शूर्पणखा = डॉली बिन्द्रा ?

विकास's picture

22 Mar 2014 - 1:17 am | विकास

आणी सध्याच्या कलियुगात बीजरूपाने कोणती कारणे आहेत, ज्यांचा आणखी विकास होऊन पुढे (लवकरच) सत्ययुग अवतारणार आहे?

मला वाटते, सध्या मिपाची टिआरपी जे वाढवत आहेत ते केजरीवाल हे येऊ घातलेल्या सत्ययुगाचे बीजरूप आहेत. कोण जाणे कदाचीत त्यांच्यामुळे सत्ययुग या दशकात देखील सुरू होऊ शकेल. लई भय वाटतया बघा! *shok*

पिवळा डांबिस's picture

22 Mar 2014 - 1:28 am | पिवळा डांबिस

यांच्या कळफलकाची ० ची की नक्की झिजली असणार!!!
:)

कळफलकाची ० ची की नक्की झिजली असणार
कारन नक्की तेच आहे का? की आणखी काही वेगळे?

तिमा's picture

22 Mar 2014 - 3:30 pm | तिमा

सध्ध्याचे कलियुग हे दुसरे कलियुग आहे. चढत्या क्रमाने यानंतर द्वापारयुग, मग त्रेतायुग आणि शेवटी सत्ययुग. त्यानंतर उतरत्या क्रमाने पुन्हा त्रेतायुग .. द्वापारयुग.. कलियुग वगैरे!
मला सगळ्या युगांतले जन्म आठवतात. त्यावरुन सांगू शकतो की कलियुगच बेस्ट आहे.

प्रसाद गोडबोले's picture

23 Mar 2014 - 6:13 pm | प्रसाद गोडबोले

कलियुगच बेस्ट आहे.

१००००००००००००००% सहमत :)

कलियुगच बेष्ट .

विनायक प्रभू's picture

23 Mar 2014 - 7:13 pm | विनायक प्रभू

एक सल्ला,
तुम्ही सं क्षि आणि नानासाहेबांचे लेखन वाचत रहा,
म्हणजे तुम्हाला अशी ऊबळ येणार नाही?

जेपी's picture

23 Mar 2014 - 7:25 pm | जेपी

सत्ययुग कधी येणार ?>>>>>>>
काय माहित नाही बॉ .....

नितिन थत्ते's picture

24 Mar 2014 - 8:22 pm | नितिन थत्ते

१ एप्रिल २०१४ रोजी भारतीय प्रमाण वेळेनुसार सकाळी १० वाजून १७ मिनिटे आणि ३५ सेकंदांनी सत्ययुगाची सुरुवात ठाण्याहून होईल. तेथून ते पसरत जाईल आणि २ एप्रिल २०१४ रोजी मुंबई शहरात पसरेल. त्यानंतर त्याचा प्रसार झपाट्याने होऊन ६ एप्रिल पर्यंत ते आख्खा महाराष्ट्र व्यापेल. पुढच्या विस्ताराचा प्लॅन ६ एप्रिल २०१४ ला याच धाग्यावर मिळेल.

सत्ययुगाची सुरुवात ठाण्याहून होईल.
या वाक्यातील शहराच्या नावासंदर्भात तज्ञांचे दुमत असून वाक्यातील शहर हवे असणारी माणसे अल्पमातात आहेत.
या शहराच्या जागी फडके रोड डोंबीवली , किंवा पुणे ३० असे असावे असा एक अंदाज आहे.
परंतु असे झाल्यास नागविदर्भावर अन्याय होईल.
तसेच बारामती अहमदनगरसह पश्चीम महाराष्ट्रावर देखील अन्यायाचे सावट पसरले आहे.

हो ना. त्यामुळे सरळ मिरजेहून सुरुवात करतो, उगा टेण्षण नको.

बरं आता २ एप्रिल आलेय, कुठंवर पोचलात सत्ययुग घेऊन..?
नाइ म्हंजे निवडणुकांच्या आधी मुंबईला पोचता आलं तर बघा बुवा. ;)