सन्मान बीच रिसॉर्ट(वर्सोली बीच)

त्रिवेणी's picture
त्रिवेणी in भटकंती
9 Mar 2014 - 1:29 pm

तस माझ मिपावर आणि एकुणातच लिखाण खुप कमी असते. थोडीशी लुडबूड फक्त पाककृती विभागात होते तेवढेच. तर आता भटकंतीमध्ये थोडा प्रयत्न करते तो गोड मानून घ्यावा ही विनंती.
बरेच दिवस कुठे बाहेर जाणे झाले नव्हते, म्हणुन जवळच कुठेतरी जावु या असा विचार केला. मध्ये मितान ताई वेळासला जावून आली होती आणि आता तिथे कासव बघायला(आता तिथे खुप कासव असतात म्हणुन) जावु असा विचार करून मितानताईला फोन केला कुठे थांबली होतीस वै. विचारायला पण तिच्या कडून कळले की रस्ता खूपच खराब आहे सो तो प्लान कॅन्सल करून अलिबाग ठरवले. ट्रीप adviser वर सर्च करून हॉटेल सन्मानला फोन केला बुकिंगसाठी तर त्यांनी संगितले ½ तासात बघून सांगतो, मला वाटले की बहुतेक नाही करणार फोन, पण खरच सांगितल्याप्रमाणे ½ फोन आला आणि त्यांनी फेबमधले सर्व Friday-sat. फुल्ल आहेत म्हणुन संगितले. मग विचार करून रविवार –सोमवारचे बुकिंग करून टाकले.
रविवारी सकाळी 5:30 ला घर सोडले आणि 9:00 वाजता अलिबाग बीचला पोहोचलो. त्यावेळी ओहोटी होती आणि बरेच लोक पायी किल्ल्यात जाताना दिसत होते पण माझ्या चालण्याच्या क्षमतेची पुर्ण जाणीव असल्याने घोडागाडीतून ठरवले
400 रुपयात जावून येवून.
beach
आता मुक्कामच्या ठिकाणी जायचे असल्याने हॉटेलला फोन लावला नक्की कसे यायचे म्हणुन. तर त्यांच्या कडून रीप्लाय आला तुम्ही आता आहात तेथेच थांबा, तुम्हाला घ्यायला येतो. 15 मिनिटात एकजण 2 व्हीलरवर घ्यायला आहे(मी नाव विसरले त्यांचे).
s
s
सन्मान बीच रिसॉर्टचे सी फेसिंग 3 एसी रूम्स आणि 3 एसी cottages आहेत(फक्त कॉटेज नो 6ला थोडा sea view) आहे.
rooms
rooms
cottage
cottage
रूम नं. 2ला सर्वात चांगला sea view मिळतो.
room
room
t
t
t
l
p
p
p
p
p
p
मलातरी खुप चांगले वाटले हे रिसॉर्ट आणि स्टाफ सुद्धा खुप चांगला आहे.
मुंबई, पुणेकरांनी एकदा जायला हरकत नाही.

प्रतिक्रिया

त्रिवेणी's picture

9 Mar 2014 - 1:31 pm | त्रिवेणी

मी पिकासावर फोटो टाकताना 640 ने टाकले होते आता साइज कमी झाला. फोटो मोठे करण्यासाठी काय करावे.

उपेन्द्र's picture

16 Apr 2015 - 9:35 pm | उपेन्द्र

पिकासासोफ्ट्वेअरमध्ये फाईल मेनूत - एक्स्पोर्ट पिक्चर म्हणून ओप्शन आहे. त्यात फोटो रिसाईझ करता येतात.

रिजॉट छान दिसतंय .काही रेटचा (शनि रवि)चा अंदाज ?फक्त रूम देतच नसतील .

त्रिवेणी's picture

9 Mar 2014 - 4:46 pm | त्रिवेणी

३५०० रूमचे आणि बहुतेक ३००० हजार कॉटेजचे आहेत. फक्त रूम्स सुद्धा available असतात. अलिबागमध्ये जे सन्मान हॉटेल(खाण्याचे) आहे त्यांचेच हे रिसॉर्ट आहे. पण खर सांगू का टेरेसवर बसुन समुद्र बघत जेवायला मला तरी खुप आवडले. आणि मेन बीच चालत 5 मिनिटावर आहे(water sports) वै. साठी. तिथे सुद्धा एक कपलची गाडी होती गरम गरम मछली फ्राय मस्त होते त्यांच्याकडेपण. या रिसॉर्ट शेजारी रतन टाटांचे घर आहे. मला सगळ्यात जास्त आवडलेली गोष्ट म्हणजे त्यांची सर्विस.

राही's picture

9 Mar 2014 - 6:06 pm | राही

फोटोज छान आहेत.
वेळासच्या कासवांचा उल्लेख आहे म्हणून एक सूचना. वेळासला कासवे केव्हाही बघायला मिलतील असे नाही. ऑलिव-रिड्ले नावाची कासवांची एक दुर्मीळ प्रजाती वेळासच्या किनार्‍यावर अंडी घालते. त्याचा मोसम असतो. शिवाय अंडी घातल्या दिवसापासून पंचावन्न दिवसांनी ती फुटून त्यांतून पिल्ले बाहेर पडतात. गेली सुमारे वीस वर्षे सह्याद्रि निसर्ग मित्र मंडळ नावाची संस्था ग्रामस्थांच्या सहकाराने या (किनार्‍यावरच्या वाळूत घातलेल्या) अंड्यांचे संरक्षण करते. किनार्‍यावरच्या एका सुरक्षित जागेत टोपल्यांखाली ती ठेवून त्यांच्या पिल्ले बाहेर पडण्याच्या निश्चित केलेल्या तारखा टोपल्यांवर लिहिल्या जातात आणि ते दिवस नेटवर प्रकाशित केले जातात. या दिवशी बाहेरून आलेल्या लोकांसाठी काही माहिती-मनोरंजनाचे कार्यक्रमही ग्रामस्थ ठेवतात. मग त्या त्या दिवशी किनार्‍यावर जाऊन या लोकांसमोर त्या टोपल्या काळजीपूर्वक उघडल्या जातात. छोटी-छोटी नवजात पिल्ले समुद्राच्या दिशेने तुरुतुरू धावत सुटतात आणि जगाचा प्रवास करायला निघून जातात. फार सुंदर क्षण असतो तो.
सांगायचा मुद्दा हाच की कासवांच्या मुक्ततेचे दिवस ठराविक आणि ठरलेले असतात. एरवीही वेळासकिनारा आणि जवळपासची बाणकोट किल्ला, हरिहरेश्वर ही ठिकाणे सहलीसाठी चांगली आहेत पण कासवे बघायची असल्यास काही नेमक्या दिवशींच जावे लागते.

छान फोटू व राहींनी दिलेली माहितीही आवडली. कासवाची पिल्ले गोड दिसतात.
बाकी ते घोडे पाण्यातून का जातायत? ज्यांना चालत जायचे आहे ते कसे जातात मग?

रेवती,ओहोटी असताना चालत किल्ल्यावर जाता येते. आत बघायलाही छान आहे.

वेल्लाभट's picture

11 Mar 2014 - 5:34 pm | वेल्लाभट

वाव! सॉलिड आहे. आराम करायला मस्त वाटतंय. जायला हवें!

स्पंदना's picture

12 Mar 2014 - 4:54 am | स्पंदना

आहा!
घोडागाडीतुन समुद्रात शिरायच?
मस्त दिसते आहे ठिकाण छोट्याश्या श्रमपरिहारासाठी.

राही माहितीबद्दल धन्यवाद.

मस्त आहेत फोटो ..खरेच बीच वर जाऊन अथांग समुद्राला न्याहाळत राहणे मला खूप आवडते ,मीही मागच्या महिन्यात नागाव बीच ला गेले होते ..मस्त शांत, स्वच्छ समुद्र किनारा होता आणि सागर तरंग रेसोर्ट ला थांबले होते ,सी facing होते आणि मस्त होते ...+)

कवितानागेश's picture

14 Mar 2014 - 8:11 pm | कवितानागेश

तिकडचं जेवण कसे काय आहे ते लिही ना.

आरोही's picture

14 Mar 2014 - 9:30 pm | आरोही

मौ ताई,
जेवणाच्या बाबतीत आमचा थोडा पोपटच झाला ,त्याचे काय झाले नागाव मध्ये अन्नपूर्णा नावाची एक खानावळ आहे तेथे जेवण खूप छान मिळते असे ऐकले असल्याने मी ठरवले तेथे जेवायला जायचे आणि रेसोर्त मध्ये असेही आम्ही असेही तिघे च असल्याने तिघांसाठीच कशाला एक नोन वेज थाळी आणि एक वेज थाळी बनवायला सांगायचे असे म्हणून मी तेथे जेवण नको असे सांगितले आणि गेलो अन्नपूर्णेला ते गाडीने अगदी ५ मी. च्या अंतरावर आहे म्हणून तर तेथे काही काम चालू असल्याने ते त्या दिवशी नेमके बंद झाले होते मग आता नवर्याला तर नोन वेज च खायचे होते आणि त्यात गुरुवार होता म्हणून एक दोन ठिकाणी अजून चौकशी केली तर तेथे फक्त वेज जेवण तयार होते मग त्यांनाच विचारले कुठे मिळेल ते त्यांनी एका ठिकाणी पेट्रोल पंपाजवळ मिळेल असे सांगितले आम्ही विचारात ,विचारात पेट्रोल पंपाच्या शोधत सुमसाम रस्त्यावरून जवळ जवळ १२ किमी गेलो मग मी म्हटले कि आता बास आता मागे वळूया तेवढ्यात एक जन भेटला त्याला विचारले तर तो म्हणाला कि २.मी वर आहे पेट्रोल पंप त्याच्या बाजूला आहे सोय जेवणाची मग गेलो तेथे एकदाचे आणि तेथे एक घरगुती खानावळ होती त्यांच्याकडे विचारले तर ते फिश मिळेल म्हणाले आणि आम्ही थांबायची तयारी दर्शविली मग काय त्यांनी ४५ मी. मध्ये मस्त एक वेज आणि एक नोन वेज थाळी तयारी करून दिली ..
वेज जेवण मला तरी आवडले पण फिश थाळी मनासारखी नाही मिळाली नवर्याला ..पण ठीक होती.
पण यापुढे लक्षात ठेवले आहे जेथे थांबणार तेथेच जेवणाची order देणार बाबा यापुढे ...
हो पण याची कसर दुसर्या दिवशी सकाळीच भरून निघाली रेसोर्त पासून शिवाजी चौक च्या पुढे ५ ..मी अंतरावर आम्हाला एका ठिकाणी मस्त मिसळ पाव आणि अंडा भुर्जी चापायला भेटली .

आनन्दिता's picture

14 Mar 2014 - 9:39 pm | आनन्दिता

व्वा व्वा मजा केलेली दिसतेय.. फोटो आवडले

छान आहेत फोटो, अर्थात जागाही, बघून हलके झाल्यासारखे वाटले..

जयदिप नाईक's picture

15 Mar 2014 - 12:41 pm | जयदिप नाईक

वा अति सुन्दर

अनन्न्या's picture

19 Mar 2014 - 4:29 pm | अनन्न्या

जायला हवं एकदा!

पैसा's picture

28 Mar 2014 - 5:15 pm | पैसा

वर्सोली मस्तच आहे! वर्णन आणि फोटो छान!

नितिन५८८'s picture

16 Apr 2015 - 1:50 pm | नितिन५८८

आंजर्ले बीच ला एकदा जाउन या, मी आणी माझे ३ मित्र २ दिवसासाठी तिथे रहिलो. जेवण + रहाणे मिळून ३००० घेतले. आम्ही वर्षभरातून एकदा तरी इथे जातोच. आंजर्ले संपर्क - रेश्मा tondankar ८२७५४३०४४२
Photos

ही लिंक उघडल्यावर खालील मेसेज दिसतो
This content is currently unavailable

उपेन्द्र's picture

16 Apr 2015 - 9:29 pm | उपेन्द्र

अलिबागला ३ वर्ष राहिलोय. वरसोलीचा बीच मस्तच आहे.

चौथा कोनाडा's picture

16 Apr 2015 - 11:09 pm | चौथा कोनाडा

छान झकास वृतांत अन सुंदर फोटो !

वरसोलीचा बीच बघायचा र्‍हायलाय. इथे जायचे प्लानिंग केलेच पाहिजे आता !

मनीषा's picture

19 Apr 2015 - 8:39 pm | मनीषा

सर्व छायाचित्रे सुंदर.