किती मराठी लोक दुसर्‍या मराठी माणसाला आपला भ्रमणध्वनी क्रमांक(मोबाईल नंबर) मराठीतुनच सांगतात ?

छ्या भ्रनणध्वनी क्रमांक इंग्रजी मधे सांगण्यास काय हरकत आहे ?ते सोप्प वाटत..
27% (16 votes)
मी माझा भ्रमणध्वनी क्रमांक नेहमी मराठीतुनच सांगतो..
34% (20 votes)
नाही मला जमणार नाही असं मराठीतुन क्रमांक सांगणे..ते फार कठीण आहे..
2% (1 vote)
या पुढे मराठीतुनच सांगायचा प्रयत्न करीन..
37% (22 votes)
एकुण मतं : 59

मी नेहमी

मी नेहमी मराठीच सुरु करतो पण समोरच्याची गोची होत आहे अस लक्षात आल की मग विन्ग्रजीत सांगावा लागतो. Smile

................
http://picasaweb.google.co.in/zakasrao

समोरच्याल

समोरच्याला जि भाषा सोपि जाइल त्या भाषेत सांगतो. (इग्रजि किंवा मराठि )

मी...

ज्यांना मराठी कळत नाही त्यांना इंग्रजीतून सांगत नाही आणि ज्यांना इंग्रजी कळत नाही त्यांना मराठीतून सांगत नाही.

मनस्वी
* केस वाढवून देवआनंद होण्यापेक्षा विचार वाढवून विवेकानंद व्हा. *

मग कोणत्या भाषेत?

ज्यांना मराठी कळत नाही त्यांना इंग्रजीतून सांगत नाही आणि ज्यांना इंग्रजी कळत नाही त्यांना मराठीतून सांगत नाही.
Thinking
तुम्ही मग हिंदीतून सांगता की स्वाहिलीतून? Smile (ह. घ्या)

हेहेहेहे

ज्यांना मराठी कळत नाही त्यांना इंग्रजीतून सांगत नाही आणि ज्यांना इंग्रजी कळत नाही त्यांना मराठीतून सांगत नाही.
Rolling On The Floor =)) Rolling On The Floor

हे तुम्ही पीजे च्या धाग्यात टाकायला हव प्राजु तै ...

असो .. मी फोन नंबर हातवार्‍यांनी सांगतो , ते ही फोन करून.

अवांतर : एकदा मी १० एसेमेस केले. की "युवर नंबर इज डिलीटेड बाय मिस्टेक, प्लिज गिव्ह मी मिस कॉल सो दॅट आय कॅन सेव्ह युवर नंबर"
मला ७ मिस कॉल आले होते. आणि मजेची गोष्ट अशी की ७ही मुलीच होत्या.

टारझन (गेल्या जन्मीचा खविस)
(आमच्या येथे अस्थी व दंत विमा आणि सायकल पंक्चर काढून मिळेल तसेच सर्व प्रकारचे मोबाईल-संगणक रिपेर* करून मिळेल. )
नोट : लग्न पार्ट्यांच्या ऑर्डरी स्विकारतो.


तू भारी तर जा घरी

मी माझ्या

मी माझ्या कडुन माझा नंबर मराठीतच सांगण्याचा प्रयत्न करणार आहे !!( हो आत्ता पर्यन्त मी इंग्रजीतुनच सांगायचो )पण जेव्हा थोडी फार कोकण,,कोल्हापुर,,इं ठिकाणी भ्रमंती केली तेव्हा हे जाणवल की इथली लोक अगदी सहजपणे आपला क्रमांक मराठीतुन सांगतात्..आणि लक्षात सुध्द्दा ठेवतात !!
आपण आपल्या कडुन असा प्रयत्न केल्यास यात काही कठीण नाही असे वाटते..
वाचकांनी आपले काही अनुभव असतील तर येथे ते नोंदवावे ही विनंती..

(माय मराठी प्रेमी)
मदनबाण.....

"First, believe in the world-that there is meaning behind everything." -- Swami Vivekananda

आधी इंग्रजीतुन सांगत होतो. गावी गेलो तेव्हा लक्षात आले की लोक एकमेकांना मराठीत क्रमांक सांगतात, मदनबाण यांच्यासारखाच अनुभव आला मला पण्.तेव्हापासुन कटाक्षाने मराठीत सांगतो.
(माय मराठी प्रेमी)
अनिकेत

काय कू विचारा ये मला समझ्या नाही

पण असा अनुभव आहे की
मोठ्या वयाच्या लोकांना मराठीत पटकन समजते.
समवयस्क लोकांना मराठी-इंग्रजीत
तरीही बहुसंख्यवेळा "रिपिट" करताना समजला आहे हे जाणुन घेण्यासाठी, तसेच "फोन लाईन" खराब असल्याने समोरच्याला सांगीतलेला आकडा ऐकू आला आहे की नाही हे जाणुन घेण्यासाठी मराठी बरोबर इंग्रजीत आकडा बोलला जातो.

मत नोंदवले नाही कारण हा असा कौल कशासाठी , नेमके प्रयोजन लक्षात आले नाही?

मत नोंदवले

मत नोंदवले नाही कारण हा असा कौल कशासाठी , नेमके प्रयोजन लक्षात आले नाही?
मराठी जिवंत ठेवण्याच्या,,मराठीपण वाढवण्याच्या गप्पा भरपुर हाणल्या जातात्,,पण आपण आपल्यात बदल घडवुन मराठीचा जास्तीत जास्त वापर वाढवावा.. हा उद्देश आहे हा कौल इथ देण्यामागे आहे..
आपणच जर मराठी बोललो नाही तर नुसता काथ्याकूट करुन उपयोग काय ?
कृपया आपले मत नोंदवावे विनंती.

"First, believe in the world-that there is meaning behind everything." -- Swami Vivekananda

मराठीतुनच

मराठीतुनच सांगतो
ज्यांना मराठी कळत नाही त्यांची आयमाय (A-I-M-I - Awareness in Marathi Interaction) काढुन त्यांना समजेल अशा भाषेत सांगतो. दुरध्बनी आल्यावर हाय हेलो न म्हणता राम राम अशी साद घालतो तेच बंद करताना सुद्धा.

नाना

वित्तीय संस्थांपासुन सावध रहा. त्या प्रथम पतपुरवठा (क्रेडिट) करुन तरलते च्या साहाय्याने (लिक्विडीटी) किंमती वाढवतील (इन्फ्लेशन) नंतर तरलता रो़खुन किंमती उतरवुन (डीप्लेशन) तुमचे सर्वस्वाचे हरण करतील

ज्यांना

ज्यांना मराठी कळत नाही त्यांची आयमाय (A-I-M-I - Awareness in Marathi Interaction) काढुन त्यांना समजेल अशा भाषेत सांगतो.
Rolling On The Floor

मला एकदा एकाने फोनवर "डाव्या बाजूला वळ"असं म्हटल्यावर "डाव्या म्हणजे काय" विचारलं होतं ... आणि उत्तर काय द्यायचं ते मला लेफ्ट आणि राईट असे दोन पर्याय आल्यावर समजलं... तो मुलगा काही दिवस माझ्याकडे (भौतिकशास्त्र) शिकायला यायचा.

(मराठी) अदिती

मला एकदा

मला एकदा एकाने फोनवर "डाव्या बाजूला वळ"असं म्हटल्यावर "डाव्या म्हणजे काय" विचारलं होतं ... आणि उत्तर काय द्यायचं ते मला लेफ्ट आणि राईट असे दोन पर्याय आल्यावर समजलं
लेफ्ट आणि राईट अस सांगायचच नाही

ज्या हाताने खातो तो उजवा आणि ज्याने धुतो तो डावा अस कानफटात वाजवुन सांगितली की पोरेच काय त्यांचे अख्खे खानदान मराठी शिकुन तयार होते Smile

नाना

अगदी योग्य...

बरोबर म्हणालात नाना...

मी समोरचा माणुस मराठी असेल तर माझा भ्रमणध्वनी (किंवा दुरध्वनी )क्रमांक कटाक्षाने मराठीत सांगतो...

पुन्हा,
सतीश गावडे
आम्ही इथेही उजेड पाडतो -> मी शोधतो किनारा...

दोनदा

दोनदा झाल्याने संपादित केला

भ्रमणध्वनी क्रमांक.

मी माझ्या कडुन माझा नंबर मराठीतच सांगण्याचा प्रयत्न करणार आहे
पण लोकांना हल्ली मराठीत सांगितलेलं कळतं का?
हा मुद्दा पण लक्शात घ्यावा लागेल ना भाऊ.....

पण लोकांना

पण लोकांना हल्ली मराठीत सांगितलेलं कळतं का?

ज्यांचा वरचा मजला रिकामा झाला आहे त्यांना बहुधा कळणार नाही !!

मदनबाण.....

"First, believe in the world-that there is meaning behind everything." -- Swami Vivekananda

आम्ही

आम्ही सदैव सर्व व्यवहार मराठीतच करतो. आमची दूरध्वनी क्रमांकांची वही सुद्धा देवनागरीतच आहे.

इनकम टॅक्स साठी असलेल्या गोष्टी सोडल्या तर सर्व व्यवहार मराठीतून .

बेस्ट चे विजेचे बिल इंग्रजीतून यायला सुरूवात झाली आहे. ते आम्ही मराठीत मागून घेतले. आता विद्युतदेयक मराठीत येते. त्यावर चेक क्रमांक बॅंकेचे नाव, रक्कम हे सर्व मराठीतून भरतो.

एखाद्या टॅक्सीवाल्या भय्याला मराठी कळत नाही आणि तो हिंदीत बोलायला सांगतो, तेव्हा

" तेरे मां की **, मादरचोद, मुंबई मे रहता है और मराठी नही आता ?" एवढेच हिंदीत बोलतो .

कारण हे मराठीत बोललो तर त्याचा नेमका अर्थ त्याला कळणार नाही.

एचडीएफसी आणि इतर बॅंकातून क्रेडिट कार्ड वा तस्तम गोष्टींसाठी आलेल्या फोनवर फक्त मराठीच येते असे सांगतो आणि मराठीत बोलायचे असेल तरच बोला हे बजावतो.

त्याने हिंदीत बोलायचा आग्रह धरल्यास "भोसडे में जाओ" एवढेच हिंदीत बोलतो.

अजूनही बरेच सांगण्यासारखे आहे. पुन्हा केव्हा तरी.

आपला,
(कट्टर मराठीप्रेमी) धोंडोपंत

ता.क. वर उल्लेख केलेल्या शिव्या या माय मराठीवर होत असलेल्या मुस्कटदाबीमुळे येतात. संपादक मंडळाला त्यात गैर वाटल्यास ती वाक्ये किंवा हे संपूर्ण लेखन उडविण्याचा त्यांचा अधिकार आम्ही मानतो. त्यांनी तसे केल्यास आमची हरकत नाही.

॥ जय महाराष्ट्र ॥

नंबर १

॥ जय महाराष्ट्र ॥

मनस्वी
* केस वाढवून देवआनंद होण्यापेक्षा विचार वाढवून विवेकानंद व्हा. *

शिव्या

शिव्या ह्या भाषच्या अविभाज्य घटक आहेत.... पण आपल्या कडिल काहि मंडळिना कायमच त्याचे वावडे असते....

सामान्य इग्रज व अमेरिकन त्याच्या बोलन्यात.. साहित्यात... चित्रपटात मूक्तपणे F** च्या शब्दावलिचा राग व्यक्त करतांना वापर करतात व ते अगदि नैसर्गिक व वास्तविक वाट्ते.

मात्र आपल्या मराठि चित्रपटा/सिरीयल मध्ये राग व्यक्त करताना पूचकट शिव्याचा वापर हे खूपच नाटकि वाट्ते...

बाकि धोंडोपंत तूमचि प्रतिक्रिया जाम आवडलि

:)

हा हा हा!

मायझव फोकलिच्या धोंड्या, सह्ही प्रतिसाद रे! Smile

आपला,
(मराठी) तात्या.

जबराच पंत

जबराच पंत Smile
................
http://picasaweb.google.co.in/zakasrao

मी लोकाना

मी लोकाना फोन क्रमांक सांगताना ब्याण्णव असे सांगितले तर बरेच जण ब्याण्णव म्हणजे किती असे विचारतात.विषेशतः हे पुण्या मुम्बैत होते

पडत्या पावसाला पाहुन तुम्ही आतुन भिजला नाहीत तर स्वतःच्या कोरडेपणाची तारीफ करु नका तर हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात भिजवणारे क्षण आलेच नाहीत

पुण्यात हे.....

पुण्याबाहेरच्या लोकांबरोबर होत असेल.

मनस्वी
* केस वाढवून देवआनंद होण्यापेक्षा विचार वाढवून विवेकानंद व्हा. *

पुण्या

पुण्या बाहेरच्या लोकांसोबत नव्हे तर अगदी शुद्ध खानदानी पुणेरी मराठी एकरांत नावे असलेल्या लोकांसोबत पण होते. बहुतेक वेळा त्यांच्या सोबत असणार्‍या आया/माया मुलांशी "सी अरु डोन्ट डू धिस हां "एल्स तो तुला बाईट करेल " नीट बघ रे रस्त्यात पॉटहोल्स आले तर त्यात शू टाकायचा नाही हं " असे बोलत असतात.

पडत्या पावसाला पाहुन तुम्ही आतुन भिजला नाहीत तर स्वतःच्या कोरडेपणाची तारीफ करु नका तर हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात भिजवणारे क्षण आलेच नाहीत

पुणे मुंबई

पुणे मुंबई म्हणजे महाराष्ट्र नव्हे... द्या सोडुन पुण्याला....

गावाकडं या की राव ... ब्याण्णवच काय .....सावी सकुम किती ते पण सांगतो ...

नाना

वित्तीय संस्थांपासुन सावध रहा. त्या प्रथम पतपुरवठा (क्रेडिट) करुन तरलते च्या साहाय्याने (लिक्विडीटी) किंमती वाढवतील (इन्फ्लेशन) नंतर तरलता रो़खुन किंमती उतरवुन (डीप्लेशन) तुमचे सर्वस्वाचे हरण करतील

.

फोन च्या की पॅड वरचे आकडे इंग्रजीत असल्याने मी नंबर इंग्रजीत सांगतो.

फोन च्या

फोन च्या की पॅड वरचे आकडे इंग्रजीत असल्याने

ते हिंदु अरेबिक आकडे आहेत इंग्रजी नाहित

http://en.wikipedia.org/wiki/Arabic_numerals

नाना

वित्तीय संस्थांपासुन सावध रहा. त्या प्रथम पतपुरवठा (क्रेडिट) करुन तरलते च्या साहाय्याने (लिक्विडीटी) किंमती वाढवतील (इन्फ्लेशन) नंतर तरलता रो़खुन किंमती उतरवुन (डीप्लेशन) तुमचे सर्वस्वाचे हरण करतील

माझे उत्तर

वास्तवीक सुचवलेल्या उत्तरात विशिष्ठ "ऍटीट्यूडा" पण ओतला असल्याने त्यातील कोणचेच उत्तर १००% योग्य होणार नाही. म्हणजे असे:

माझे उत्तर होते, "छ्या भ्रनणध्वनी क्रमांक इंग्रजी मधे सांगण्यास काय हरकत आहे ?ते सोप्प वाटत..." हे जवळचे उत्तर होते कारण मी इंग्रजीत दू.क्र. सांगतो. पण ते सांगताना "काय हरकत आहे?" हा मुद्दा डोक्यात नसतो. एक म्हणजे सवय, दुसरे म्हणजे स्थान (अमेरिकेत मराठीत क्रमांक कसा सांगायचा). पण म्हणजे, "नाही मला जमणार नाही असं मराठीतुन क्रमांक सांगणे..ते फार कठीण आहे..." असे काही माझे उत्तर नाही.

एक गोष्ट मात्र होते: फोन उचलल्यावर जर मराठी माणूस असेल तर "नमस्कार" , अ-मराठी भारतीय असेल तर "नमस्ते" आणि अभारतीय असेल तर "हॅलो"

+१

असेच म्हणतो.
केवळ कौलाचा निकाल पाहण्यासाठी त्यातल्या त्यात जवळचा पर्याय १ ला मत दिले आहे.
माझी असे करण्याला(इंग्रजीतून नंबर सांगायला) हरकत आहे पण सवय असल्याने बोंबाईल क्रमांक विंग्रजीतून सांगितला जातो. आणि कदाचित मुंबईत जन्मलो-वाढलो असल्याने किंवा मराठी शाळेत असूनही पुढे कॉलेजात/हाफिसात (जेव्हा बोंबाईल हातात आला तेव्हा) बरेचसे अमराठी मित्र झाल्याने सवय लागली असावी.

बा़की कौलात काय करतो असे पर्याय असताना मधेच शेवटचा काय करू धर्तीचा पर्याय खटकला

-('मिसळ'लेला) ऋषिकेश

दोन्ही

दूरध्वनी क्रमा॑क (लॅ॑डलाईन) मराठीत सा॑गतो आणि भ्रमणध्वनी क्रमा॑क इ॑ग्रजीत...तस॑ लक्षात रहायला सोप॑ जात॑ असा माझा अनुभव आहे...

१ नंबर

धोंडोपंताचा अभिप्राय खुप आवडला. एकदम बरोबर लिहिले आहे...सर्वांनी असाच प्रयत्न करायला हवा...

जिथे कमी तिथे आम्ही ..Smile

मराठीत

मराठीत सांगण्याचा प्रयत्न करतो पण पहिले ३ आकडे सांगताच समोरचा पुन्हा विचारतो.
त्यामुळे बहुतेक जणांच्या सवयीमुळे/सोयीमुळे इंग्रजीतून सांगतो.

मोठ्या

मोठ्या व्यक्तीन्शी बोलताना मराठीत पण इतर वेळी इन्ग्रजीतून

मी

मराठीतच सांगते पण ज्या व्यक्तीला सांगीतला त्याला बहुतेक वेळा कळत नाही (ती मराठी असली तरी) ....मग इंग्रजी मधे सांगावा लागतो...
(मराठीत क्रमांक लक्षात ठेवायला सोपे जाते... मला तरी)

मराठीतूनच ..

मी मराठी माणसाला मराठीतूनच सांगतो. ....आणि तोच पटकन लक्षातही रहातो असा माझा अनुभव आहे.
मराठी माणसाला मराठीतून सांगितलेला क्रमांक समजत नाही, हे मला पटतच नाही. वर आलेली याबद्दलची मते अतिशयोक्तीपूर्ण आहेत.

हम्म्म्म!

मी आत्तापर्यंत सगळ्यांनाच इंग्रजीत क्रमांक सांगत होतो......यापुढे मराठी माणसाशी बोलताना मात्र कटाक्षाने मराठीतच क्रमांक सांगेन!

अवांतर - मदनबाणा, ह्या लेखानंतर जेव्हा आपलं बोलणं झालं तेव्हा तु इंग्रजीत क्रमांक सांगितला होतास....आठवतयं का? Wink Tongue

वो किसका नंबर था ?

मदनबाणा, ह्या लेखानंतर जेव्हा आपलं बोलणं झालं तेव्हा तु इंग्रजीत क्रमांक सांगितला होतास....आठवतयं का?
हो आठवतय तो दुसर्‍याचा क्रमांक होता (पु पे चा),,,पण लगेच मी माझा भ्रमण्ध्वनी क्रमांक तुला मराठीतुनच सांगीतला हे ही तुझ्या लक्षात आले असेलच !!

मदनबाण.....

"First, believe in the world-that there is meaning behind everything." -- Swami Vivekananda