अथ: जंगल कथा: सत्तेचा संघर्ष- शेरखान आणि महाबली रेडा

विवेकपटाईत's picture
विवेकपटाईत in जनातलं, मनातलं
1 Mar 2014 - 7:55 pm

उन्हाळ्याचे दिवस होते. जंगलातील टेकडी खालच्या एका गुहेत शेरखान लपून राहत होता. महाबली रेड्याच्या भीतीने शेरखानला गुहेत शरण घ्यावी लागली होती. रात्रीच्या वेळी लपत-छपत छोटे हरीण किंवा सस्याना मारून तो कशी-तरी गुजराण करत होता. गुहेत शेरखान गहन विचारात दडलेला होता, अनेक विचार त्याच्या मनात येत होते. गुहे समोर असलेल्या छोट्याशा डबक्यातले पाणी बहुतेक आठवड्यात आटून जाईल. जंगलातल्या मोठ्या तलावावर महाबलीचा कब्जा आहे. पाण्या विना जगणे अशक्य. उभे आयुष्य ज्या जंगलात गेले, कदाचित ते जंगल सोडण्याची पाळी येणार. पण कुठे जाणार? काय करावे काहीच त्याला सुचेनासे झाले होते.

खरं म्हणाल तर शेरखान जंगलाचा राजा होता. त्याच्या डरकाळीने जंगलातल्या सर्व जनावरांच्या हृदयात थरकाप व्हायचा. भले मोठे रेडे ही त्याला घाबरायचे. शेरखान जंगलाच्या मध्यभागी असलेल्या तलावाजवळ दबा धरून बसायचा, संध्याकाळी पाणी पिण्यासाठी येणाऱ्या हरीण, डुक्कर आणि कधी कधी तर एखाद्या रेड्याचा ही शिकार करायचा. असं सुख-समाधानाने आयुष्य जगत होता. अचानक त्याचा सुखाला ग्रहण लागले. महाबली नावाचा एक रेडा जंगलात आला. आधी रेड्यांच्या कळपावर त्याने कब्जा केला नंतर त्याने स्वत:ला जंगलाचा राजा घोषित केले. सर्व शाकाहारी रेड्यांना तो म्हणाला आज पासून मी जंगलाचा राजा झालो आहे. शेरखान पासून मी सर्वांचे रक्षण करेल. कुणावर शेरखान ने हल्ला केला तर मला आवाज द्या, मी धावत मदतीला येईल. फक्त शेरखान वर लक्ष ठेवा. मी त्याला जंगलातून हाकलून लावेल किंवा आपल्या शिंगांच्या प्रहाराने त्याला यमसदनी पाठवेल. महाबलीने रेड्यांसह जंगलातल्या मध्यवर्ती तलावावर आपला कब्जा केला. शेरखान ने पळून, टेकडी खालच्या गुहेत शरण घेतली. महाबली रेड्याने कित्येकदा रेड्यांसोबत त्याच्या वर हमला केला, नेहमीच टेकडीवर चढून शेरखान आपले प्राण वाचवत असे. तसं म्हणाल तर अधिकांश जंगलावर महाबली रेड्याचा कब्जा झालेला होता. आता शेरखान नुसता नावाचा राजा होता.

एक दिवस सकाळी, तवाकी नावाचा तरस आपल्या बायको व पोरांसह जंगलात आला. एका रेड्याने त्याला बघितले. तो तवाकीला म्हणाला, तरसा या जंगलाचा राजा महाबली रेडा आहे, त्याने तुला बघितले तर तुझे काही खरं नाही. शेरखान सुद्धा त्याला भिउन लपून बसला आहे. मांसाहारी जनावरांना या जंगलात येण्याची सख्त मनाई आहे. त्याचे बोलणे ऐकून तवाकी जोर-जोरात हसूं लागला. तुमच्या सारखे आम रेड्यांना दोघांनी ही मूर्ख बनविले आहे. रेडा म्हणाला: कसं, तवाकी: मूर्ख रेड्या, महाबली कधीच शेरखानला मारणार नाही आणि शेरखान ही हरीण आणि ससे खाऊन आपला मस्त राहील. तवाकी पुढे म्हणाला आम्ही तरस रेड्याना खात नाही, माझ्या परिवार पासून रेड्यांना काहीच भीती नाही. छोटे हरीण,ससे ही गवत खातात, त्यांना मारून आम्ही आपली गुजराण करतो, त्यात तुम्हा रेड्यांचे ही भलंच आहे तुम्हाला जास्त गावात खायला मिळेल. शिवाय तू इथे पहारा देतो आहे आणि महाबली माद्यांबरोबर मजा मारतो आहे. तवाकीचा बाण वर्मी लागला. रेडा म्हणाला खरं, महाबली आल्या पासून मादींकडे ढुंकून ही पाहणे अशक्य. तवाकी म्हणाला मित्र चिंता नको करू, मी राजा झाल्यावर सर्व रेड्यांना, मादीचे सुख मिळेल. उद्या मी दोघांचा वध करून राजा बनणार आहे. फक्त तुम्ही तमाशा पाहत राहा, मधे पडू नका. ही आनंदाची बातमी सर्व रेड्यांना जाऊन सांग.

दुसऱ्या दिवशी भल्या पहाटे, तवाकी आपल्या परिवार सह महाबली समोर उभा ठाकला व त्याला म्हणाला, महाबली आज पासून मी जंगलाचा राजा झालो आहे, तू जंगल सोडून पळून जा अन्यथा मला तुझा वध करावा लागेल. महाबली, हसून म्हणाला, मूर्ख एका पायेच्या लाथेने तुला तुडवेल, ‘जान प्यारी असेल’, तर आला तिथे परत जा. तवाकी: तुझे दिवस भरले, हिम्मत असेल तर लढ. महाबली म्हणाला: रेड्यांनो, याला हाकलून लावा. पण सर्व रेडे शांत उभे राहिले, कुणीच प्रतिसाद दिला नाही. महाबली म्हणाला तुम्ही शांत का? पळवून लावा त्याला. त्या वर एक रेडा म्हणाला: महाबली, तवाकी पासून आम्हाला काहीच भीती नाही, उलट तो राजा झाला तर आमच भलंच होईल. तुझ्या जाचा पासून तरी मुक्ती मिळेल. महाबली उतरला: असं होय. आधी याला संपवतो, नंतर तुम्हाला बघतो.

उंदीर-मांजराचा खेळ सुरु झाला. महाबली तवाकी वर हल्ला करायचा, तर त्याचे पोरं मागून हल्ला करायचे. दिवसभर त्यांच्या मागे पळत-पळत महाबली दमून गेला. उगाचच याचा नादी लागलो, असे त्याला वाटू लागले. एकट्याने तवाकीच्या परिवाराशी निपटणे शक्य नाही. बाकी रेड्यांची मदत नक्कीच लागेल. नकळत महाबली टेकडी जवळ पोहचला होता. इथे जवळच शेरखान असायला पाहिजे. संध्याकाळ ही होत आली आहे. समोर पाण्यचे डबके दिसले. महाबलीला तहान ही लागली होती, पाणी पिऊन आपण परत फिरले पाहिजे. तवाकीचे काय करायचे, उद्या बघू. महाबलीला तहान लागली आहे, तवाकीने ओळखले उडी मारून तो सरळ महाबली समोर येऊन उभा राहिला व म्हणाला, महाबली कालच शेरखानला मारून मी त्याच्या गुहे वर व या तलावावर अधिकार केला आहे. पाणी पिण्या आधी, माझ्याशी युद्ध करावे लागेल. आता मात्र महाबली भयंकर वैतागला म्हणाला सकाळ पासून ऐकतो आहे, युद्ध कर युद्ध कर, पळपुटा लेकाचा. हिम्मत असेल तर तसाच समोर उभा राहा. या वर तवाकी उतरला, काल शेरखान ही असेच म्हणत होता, शेवट काय झाले, जगातून गेला बिचारा . आज तुझी पाळी आहे, तुझे मरण मला समोर दिसत आहे, ये हल्ला कर आपल्या तीष्ण नखांनी तुला फाडले नाही तर माझे नाव तवाकी नाही. याहून अधिक ऐकणे महाबलीला शक्य नव्हते, आपली खुर आणि शिंग आपटत, तो तवाकी वर चालून गेला. तवाकी आपल्या जागेवरून तिळमात्र ही हलला नाही. महाबली आपल्या शिंगात उचलून तवाकीला फेकणारच, पण आपल्या पाठीवर कुणीतरी झेप घेतली आहे, असे त्याला वाटले, पण क्षणातच त्याची मान शेरखानच्या जबड्यात होती. तवाकी बरोबर वादावादी होत असताना शेरखान हळू हळू सरकत महाबलीच्या मागे पोचला होता आणि त्याने महाबलीच्या मानेवर सटीक हमला केला. त्याच क्षणी तवाकीने ही आपल्या परिवारासह महाबली वर हल्ला चढविला. त्याचा बायको ने महाबलीची शेपटी पकडली, पोरांनी त्याचे पाय पकडले. तवाकीने दोन्ही पंज्यानी त्याचे शिंग पकडले. बेचारा महाबली काहीही करू शकला नाही.

कित्येक महिन्यानंतर, शेरखान ने रेड्यावर यथेच्छ ताव मारला. तवाकीच्या परिवाराला ही त्यात हिस्सा मिळाला. आनंदाने तवाकीने ही शेरखान महाराजांचा विजय असो अशी घोषणा दिली. शेरखान ने पूर्वी प्रमाणेच डरकाळी फोडली. जंगलातल्या सर्व जनावरांच्या हृदयात थरकाप झाला. रेड्यांना आपण मूर्ख बनलो हे जाणविले. पण आता काही उपयोग नव्हता. शेरखानने आपल्या बुद्धीने हे युद्ध जिंकले होते.

सूतजी म्हणाले हे राजन, कलयुगात जो कुणी या कथेचे मनपूर्वक श्रवण करेल, विपरीत परिस्थितीत ही शेरखानप्रमाणे आपल्या गादीचे रक्षण करण्यास समर्थ ठरेल.

साहित्यिकआस्वाद

प्रतिक्रिया

आयुर्हित's picture

1 Mar 2014 - 8:11 pm | आयुर्हित

शत्रूला असावध करा म्हणजे राज्य आपलेच आहे.
उत्तम मार्गदर्शक कथा!

ही कथा कोठली आहे ? पंचतंत्र,हितोपदेश कि भागवत?

विवेकपटाईत's picture

2 Mar 2014 - 9:39 am | विवेकपटाईत

जम्बू द्वीपे भरतखंडे, नुकतीच घडलेली आणि काही महिन्यात घडणारी घटना आहे. डोक चालवा. कथेला पुन्हा एकदा वाचा.

आयुर्हित's picture

5 Mar 2014 - 12:31 am | आयुर्हित

"सूतजी म्हणाले" हे वाचुन जरा भागवत वाटले !

तुषार काळभोर's picture

2 Mar 2014 - 10:52 am | तुषार काळभोर

चाची ४२० मध्ये कमल भाऊ जेव्हा माकारेना म्हणायला सुरुवात करतात, तो प्रसंग आठवल

तिमा's picture

1 Mar 2014 - 8:31 pm | तिमा

yaa जंगलकथेची आठवण झाली.

पैसा's picture

1 Mar 2014 - 11:11 pm | पैसा

फोडा आणि झोडा

मजा आली.

पंचतंत्र मधील कथा आहे का हि ?

विवेकपटाईत's picture

2 Mar 2014 - 5:51 pm | विवेकपटाईत

मे महिन्याच्या अखेर पात्रांची नवे आपोआप कळतील. बाकी कथेची कल्पना दिल्लीच्या निवडणुकी नंतर मनात आली. आधी ही एक कथा लिहली होती:

ससा कासव शर्यतीचे

नवनाथ पवार's picture

3 Mar 2014 - 10:09 am | नवनाथ पवार

वाह! थोडा फार अंदाज़ येतो आहे पात्रांचा. बोधकथा आवडली.

माहितगार's picture

3 Mar 2014 - 10:32 am | माहितगार

चांगला प्रयास; व शुभेच्छा !!

रामपुरी's picture

5 Mar 2014 - 2:00 am | रामपुरी

हिंदी आहे कि मराठी?

विवेकपटाईत's picture

5 Mar 2014 - 7:51 pm | विवेकपटाईत

आजकाल हिंग्लिश प्रमाणे हिमराठीचा जमाना आहे. बाकी आजपासूनच 'तवाकी आणि महाबली मध्ये युद्धाला सुरवात झाली आहे.

रामपुरी's picture

5 Mar 2014 - 10:19 pm | रामपुरी

"आजकाल हिंग्लिश प्रमाणे हिमराठीचा जमाना आहे"
असं का? अरे वा!!! मग जोरात चालू द्या...

llपुण्याचे पेशवेll's picture

6 Mar 2014 - 10:26 am | llपुण्याचे पेशवेll

पटाईत भाऊ तुम्ही दिल्लीत राहता मान्य आहे.
परंतु शक्यतो मराठी मराठी सारखी लिहा अशी विनंती आहे. हिमराठी वगैरे म्हणणे म्हणजे शुद्ध फालतूपणा आहे. तुम्ही अमराठी भागात राहता म्हणून तिथला प्रभाव तुमच्या भाषेवर आहे हे मान्य आहे पण त्याचं लंगडं समर्थन करू नका प्लीज. मराठी भूमीवर आपल्या भाषेच्या चिंधड्या पाहण्याचे दु:ख सध्या तुम्हाला कळणार नाही कारण सध्यातरी तुम्ही अमराठी भूमिवर आहात.
बाकी कथा छान.
शेरखान = काँग्रेस
तवाकी = केजरी
महाबली = मोदी

विवेकपटाईत's picture

7 Mar 2014 - 7:40 pm | विवेकपटाईत

साहेब, गमतीने म्हंटले होते. राग मानू नका.
बाकी मराठी विषयी प्रेम असल्यामुळेच वयाच्या पन्नासी नंतर मराठीत लिहायला सुरवात केली. या करता मराठीत लिहिणे सोडू का? जर आम्ही शास्त्रशुद्ध पद्धतीने मराठी न शिकलेले लोकांनी मराठी लिहिणे-बोलणे सोडायचे का? आता चांगले मराठी लिहायला वेळ लागणारच. भाषेच्या चिंधड्या पाहण्याचे दु:ख मलाही समजत. त्यासाठी क्षमस्व.

चैतन्य ईन्या's picture

7 Mar 2014 - 8:34 pm | चैतन्य ईन्या

जाऊ द्यात हो, तुम्ही लिहीत रहा. खरे म्हणजे तुमचे कौतुक करायला पाहिजेल की ४ पिढ्या महाराष्ट्रा बाहेर राहून तुम्ही अजूनही मराठी बोलताय आणि नुसते बोलत नसून प्रय्न्त्पुर्वक लिहिता पण आहात. इथे अस्सल पुण्यातले लोक आता धड मराठी बोलू आणि लिहू शकत नाहीत तेंव्हा जास्त मनावर घेऊ नका.

जेपी's picture

6 Mar 2014 - 4:20 pm | जेपी

मोगली किदर हय