मेन्स टॉक

सिफ़र's picture
सिफ़र in जनातलं, मनातलं
26 Feb 2014 - 4:39 pm

(शुक्रवारी संध्याकाळी जुन्या मित्रांची ओली-सुकी पार्टी करायचा बेत एका गार्डन रेस्टारंन्ट मध्ये ठरला. सगळ्यांना कधीनव्हे ते बायकांकडुन परमिशन पण मिळाली)

कारे जानव्या! उरफाट्या न्हाई आला अजुन? … बन्ट्या
(ठुश्या वैतगलेल्या सुरात)
तुले लै आठोन येउन र्‍हायली त्याची? असन भहिनमाय कुठ्तरी फकाल्या तानत! ...ठुश्या

तु काहुन अंगार मुतुन र्‍हायला बे? ...बन्ट्या

अंगार? भाडखाव परवा घरी आला अन भांड्न लाउन गेला आम्च्यात.
हीले सायचा हा वहीनी नाय म्हन्नार तं, काय,
" ताई! कश्या आहात? बरं चाल्लये ना? आजकाल काम जरा वाढलयं वाटतं साहेबांच? फीरायला नाही गेले एव्हाना कुठं? आम्ही जाणार नेक्स्ट विक गोव्याला, आमच्या हीची इच्छाच होती तशी, स्त्रिहट्ट शेवटी! आपण काही कोणाचं मन नाही मारत बॉ! साहेबांना विचारलं येता काय तर ऑफिसमध्ये काम आहे म्हणे."
बायक्या सायचा!!! हा चाल्ला गोव्यात दारु प्याले अनं काय तं स्त्रिहट्ट म्हने!
अन माया बाय्कोले हा लै आयडीयल वाट्टे, मायची कटकट साले दोन दिवस झाले, बायको अजुनही सरकी बोलुन न्हाई र्‍हायली.
(सगळे खि खि खि *LOL* )
तुमालेकाय खि खि खिदडा सायचेहो. ...ठुश्या

(परिस्थीतीचा वेध घेत, एक डोळा मारत :db: )
अरेओ पिठमांग्या! माया चुगल्या करुन र्‍हायला काबे ? … उरफाट्या

तुले त कुशीत गुद्दे माराले पायजे भाडखाव … ठुश्या
तुवा ह्याच्या घरी भांड्न लावले म्हन्ते हा ...जानव्या
ऑ! मंग रोज काय काकडा अन भजनं होते कायरे ठुश्या तुयाघरी? भौ याले आपुन आधिच सान्गतलं होत बॉर्न एन्ड ब्राऑटप पुन्यातली शायनी बायको करु नको म्हनुन!
बेट्या बाय्को कशी लठ्ठं आनी मठ्ठं पाह्य्जे. (डोळा मारत) हुश्शार अस्न अनं समजदार अस्न याच्यात जमीन-आस्मान असते भौ! घेना मंग आता बहिरम बुवाचे टोले :wink: ... उरफाट्या
काल तुयी त लै ताई होती रे आज लगे शायनी झाली नै? लै हरामी हायेस बे तु … ठुश्या
आजै ताईच हाय आपली, पन ताई शायनी नस्ते हे कोनं म्हन्टलं ?
ह्या शायन्या पोट्ट्या काय तं सावित्रीच्या लेकी म्हने. र्‍हाइले जिजाउ अन सावित्री समजल्या काय? ह्यायची मुक्ती म्हन्जे कमी कपडे अनं चार लफडी. ... उरफाट्या
(बन्टी, ठुश्याची चिडचिड वरुन उरफाट्या च्या आई-बहिणींचा कडक शब्दात उद्धार. अर्थात शिव्यांना काही अर्थ नसतोच हा सर्वमान्य नियम)

जौद्यानाबे! ठुश्या अन फाट्याचं रोज्चच हाये ऑर्डर द्या आधी ....बन्ट्या
हा भाडकाव कै खात नै का पेत नै अन घैइ यालेच, तु आम्चा चकना खतम कर फक्त बेटा आज,..... जौदे तु देवाचं नाव घ्युन प्याले सुर्र्वात करं आज पासुन ...उरफाट्या
न्हाई बे बन्ट्या न्हाई पेनार, मले पेल्यावर घरी कोन सोडत जैइन मन्ग? :wink: … ठुश्या
(खि खि खि )
(बीयर, विस्कि, शितपेय इ. ऑर्डर देण्यात आली)
बरं कारे जानव्या पोरगी पाहाले गेल्ता तं काय झालं तिकडे? ...बन्ट्या
टींक्के लाग्ले म्हन्ते ? ... उरफाट्या
तुले कोनं सान्गतलं बे फाट्या ?... जानव्या
अरे वॉ! अभिनंदन! अभिनंदन! ...बन्ट्या
अइ हाई व! देख देख लोंढा शरमा रहा है :wink: इस बात पे गले मिल दोस्त, कॉन्गर्रट्स! कॉन्गर्रट्स! … ठुश्या
मले फोन आल्ता केशव चा, त्यानंच साग्तलं ...उरफाट्या
भाडकाव साला! ...जानव्या
केशवसुत चिड्ले, भाडकाव कोण मी का माया दोस्तं केशव? :wink: ...उरफाट्या
( खि खि खि *biggrin* *biggrin* केशव म्हणजे जानव्या चे वडील)

पाहलेच गेलतो तसा, पोरगी दीसाले व्यवस्थीत वाट्ली, दोन्ही साईडची पसंती झाली. त्याच दिवशी टिक्के लौन घेत्ले डबल चक्कर केल्यापेक्षा, एक्दम सुपरफाश्ट ... जानव्या

तुले फ्याल्ट घ्याचा म्नजे नौकरी वालीच असन न्हाई? बरं जौदे कोन्त्या कंपनीत हाये ते सांग आघी ... उरफाट्या
ठुश्या झाला मोकळा आत्ता मायी बारी न्हाई? ...जानव्या
कारे फाट्या तुवा कधीतरी सर्रका प्रश्न विचार्रला कारे कोनाले … ठुश्या
तु सर्काच त बोल्तं रे भौ माया ताई शी कै फाय्दा झाला का तुया? मादरटट्टु साला! ... उरफाट्या
'ग' च्या 'गां'त जाय. तुया तोन्डाले तोन्ड देनं म्हन्जे डुकराशी कुस्ती ...ठुश्या
गुड ठुश्या देव तुय जितकं झालं त्याच्यापेक्षाई जास्त भलं करो! ... उरफाट्या
मादरटट्टु खि खि खि नवीन शब्द डिक्श्नरीत अ‍ॅडेड! ...जानव्या

जौद्यानारे बावा! पोरगी कॉग्नीझंटात सॉफ्टवेयर टेस्टर आहे. ...जानव्या
बापरे जानव्या! भहिनमाय तुयी होनारी म्हन्जे एक्सपर्ट विथ एक्सपिरीयंन्स हाय राजा, लागले बेट्या तुये! ... उरफाट्या
ऑ! म्हन्जे? ...जानव्या
अरे बावा बाय्का आधिच चुका काढ्न्यात माहिर.. म्हन्जे एक्सपर्ट.. अन तुयी होनारीले टेस्टिंग चा अनुभव म्हन्जे तुया सॉफ्टवेयर चे लागले का नाय? खि खि खि तुया लग्नात स्टेजवर येउन पक्क्यात दोन मिन्टाचं मौन पाळू बेट्या आपुन खि खि खि. ... उरफाट्या
खि खि खि भाडखाव साला, तुले मनबिन हाय का नाही बे, जाउदे खुश र्‍हाउ दे बिच्चार्याले काही दिवस :wink: ...ठुश्या
मंग रात्रिचे फोनंगिनं झाले अस्तीन? अन लग्नाची तारिख? ... जानव्या
होत र्‍हायते बोलनं कधी कधी, लग्नाची तारिख दिवाळी नन्तर म्ह्नुन र्‍हायले सगळे ... बन्ट्या
ते पाय्ह तिकडे मस्त आय्टम चाल्लीये ... उरफाट्या
(सगळ्यांच्या नजरा गप्पांना स्वल्पवीराम देउन जाणार्‍या पोरीकडे)
अरे बावा असं एकदम सगळेच्यासगळे नका पाहु नाबे! तुम्च्यासोबत बसाचीई लाज वाटुन र्‍हायली. अन तुय तं आत्ताच लग्न जुळलं नाबे जान्व्या? ... बन्ट्या
बर्र! तुले लाज वाटुन र्‍हायली न्हाई? मले एक सांग त्या पोट्टीनं एव्हढे कमी कपडे कार्‍हुन घात्ले असनं? ऑ ? चांग्ल दिसावं, लोकांईन तिच्याक्डे पायलं पाईजे म्हनुन्नच ना? ... उरफाट्या
हाव ...बन्ट्या
मंग आम्ही पाय्ल तं लगे तोन्ड काहुन तिरपं केलं तिनं? भौ ह्या बाय्काईच्या डोकशात अल्ल्ग्चं कॉन्फ्लिक्ट रायते? म्हन्जे एक मन म्हन्ते लोकांईन पाय्लई पायजे अनं दुसर मन म्हन्ते नाही पाय्ल पायजे. ते म्हन्तात ना "ऑल मेन आर पिग्स एन्ड हाउ टु इम्प्रेस पिग" तंस्स काईतरी .म्हनुन तं मी म्हन्तो का पोट्ट्या अर्ध्या म्याड र्‍हायतात . ... उरफाट्या
(हाउ टु इम्प्रेस पिग खि खि खि ...सगळेच :-D :-D :-D :-D )
बर्र! म्हन्जे तुले म्हनाच आहे का पुरुष लै सुधे र्‍हायतात नाई? ...बन्ट्या
नाई, म्हन्जे निसर्गानच पुरुषांले दिसाले लैच बाप बनोलं हाये पन डोक्शानं पुरे पैदल.म्हन्जे बाई दीसली का डोक्सं पुरं बंद. ... उरफाट्या
म्हन्जे? ...बन्ट्या
प्रुव्ह करु काय? ऑ? ... उरफाट्या
हाव तु प्रुव्ह करचं ...बन्ट्या
आता मले सांग दिसाले कोण जास्त भारी? ... उरफाट्या
मोर का लांडोर ? ... उरफाट्या
मोर ...बन्ट्या
सिंह का सिंहीन? ... उरफाट्या
सिंह ...बन्ट्या
कुत्रा का कुत्री? ... उरफाट्या
कुत्रा ...बन्ट्या
स्त्रि का पुरुष? ... उरफाट्या
आ$$$.... स्त्रि ...बन्ट्या
स्त्रि! हेन्स प्रुव्ह्ड! बाई दीसली का डोक्सं पुरं बंद भौ! ... उरफाट्या
(खि खि खि :-D :-D :-D :-D )
बर्र! उरफाट्या तु सांग स्त्रि का पुरुष?...बन्ट्या
नॅचरल अनं लॉजिकली पुरुष दिसाले भारी र्‍हायते, ... उरफाट्या
हेन्स प्रुव्ह्ड! यु आर अ गे. खि खि खि ...बन्ट्या
(एकचं ठ्ठो ,हा हा हा ही ही ही खि खि खि :-D :-D सगळेच *LOL* )

कारे जानव्या तुय लग्न दिवाळीनन्तर, अ.. म्हन्जे हिवाळा जोरात म्ह्नाच नाई (डोळा मारत) बरं जौदे मंग हनिमुन ले कुठं? ...ठुश्या
माया त कुठच जाचा विचार नाही भौ पन गेलोच त कश्मिर ले जाव म्हन्ट्ल ... बन्ट्या
हिवाळ्यात कश्मिर! डोक्स फिरलं काय तुय? भौ आपला चम्या हाय ना? तो गेल्ता म्हन्ते थंडीचा तिकडे, काय त हाउस बोट मध्ये हौस फेडाची होती म्ह्नते त्याच्या बाय्कोले, काय इचारतं खत्रा थंडी .. लागली ना भौची... आपल्या चम्याच्या सामानचा जागेवार काजु झाल्ता म्हन्ते.. मंग काय त उरलेली हौस रम अन विस्कि पिउन पुरी करा लागली म्हने. भोकाड्या तुही इज्जत गमावशीन काय आम्ची तिकडे जौन ? ... उरफाट्या
मी म्हन्तो आपली होमपिचच बेश्ट ,कम पैशात घरच्याघरी एक्दम बेश्ट. पाच्सहा महिन्यान जाना बावा मंग फिराले कोन अडवलं तुमाले? फाल्तु कामात खर्च नाही आवडत आपल्याले. म्हन्जे काम तसं फाल्तु नाही (डोळा मारत) पन खर्च हुन्च र्‍हायला त मंग फिरनंइ झालं पाह्यीजे बॉ. ...ठुश्या
अशे सल्ले देते ना हा ठुसक्या मंग शिव्या खात माया ताई च्या (डोळा मारत) हनीमुन ले तं भौ जाचं लागते. आयुष्यभर शिव्याखाची तय्यारी अस्नतच या ठुसक्याच आईक. आप्ल ऐकशीन त केरळले जाय एक्दम बेश्ट!... उरफाट्या
(खि खि खि :-D ....सगळे)
कारे मंग आता तु 'उपवरा'हुन 'वर' झाला नै? ...ठुश्या
पन भौ आजकाल 'वर' फक्त लग्नपत्रिकेत्च 'वर' र्‍हायले बाकी सगळीकड खालीच, योगासनबिगासणंही पार बद्द्ले भौ आता, कलीयुग अजुन काय? न्हाई कारे ठुश्या (डोळा मारत) ...उरफाट्या
(...सगळेच :-D :-D )
आजकाल च्याबहिन कोनाचंही लगन झालं का पहिले सारखं "अरे वा! मज्जा हाये मंग" असं नाई निंगत तोन्डतुन. पयला प्रश्न बरं चाल्लं हाय नारे भौ? ... बन्ट्या
हाव ना राजा पयले सालं बाय्कालै माहेरी जौ नव्हते देत म्ह॑न्ते तं आज्काल बाय्का जा जा केलं तरी जातचं न्हाई बहिनमाय ...ठुश्या

मले आपल्या सगळ्याइत तो चम्या खुश दिसते भौ. बाय्कोई एक नंबर हाय त्याची अन बम्बाट खुश दिस्ते दोघच्या दोघही, कधी पायलं का हाथात हाथ अन तोन्डानं खि खि खिदडनं ... जानव्या
आपलं त एक ऑबझर्र्वेशन हाये भौ! असं बोलु नै पन बाहेर नवर्राबाय्कोनं लै आगावु कल्ला केला अनं लोकांइसमोर लै प्रेमगिम दाखवलं का काईतरी गेम र्‍हायते. काई दिवसात भांड्न-तंट्टा काडीमोडीची खबर उभी. त्यात चम्याच्या बाय्कोवर शाहारुख खान चे संस्कार मंग काय पाहा लाग्ते, ओम शान्ती ओम. ... उरफाट्या
लैच हरामी हायबे तु, तुले कोनाचच चाग्ल पाहावतच नाही ... बन्ट्या
जौदे रे बॉ! माय ऑबझर्र्वेशन माग घेतो अन अस काई नसावं अशी देवाले प्रार्थना कर्र्तो झाल समाघान?. ... उरफाट्या
खरंत चम्या येनार होता आज ... बन्ट्या
तुम्च्या गोष्टी आय्कून मायी तं लैइच फाटुन र्‍हायली लग्न कराले भौ ... जानव्या
कै भेउ नको तु, मैई हु ना! भौ इच्छा असो का नसो, गोड लागो का कडु, आप्ल्या इंडीयन सोसायटीत मरेपर्यंत जरा बरं जगाचं असन तं लग्न कराच लाग्ते ...उरफाट्या
पटलं ... बन्ट्या

भौ बाय्का कश्या पतंगी सारख्या पायजे म्हन्जे दोरी कशी हरदम आप्ल्या हातात. पतगं सलकली तं कै वांधा नै पन सन्नावाले नै पाह्यीजे. ... उरफाट्या
अन सम्जा सन्नावलीच तं ? ... जानव्या
अन सम्जा सन्नावलीच तं शेपुट द्याची लौन एक ... उरफाट्या
शेपुट म्हन्जे? … ठुश्या
म्हन्जे एक लेकरु गिफ्ट कराचं बाय्कोले वीषय कट. खेळा म्हना वात्सल्य! वात्सल्य! ... उरफाट्या
तुले खरचं मन नाहीच, लैच क्रुर विचार हायेत बे तुये विचार ... बन्ट्या
तु क्रुर म्हन का कै म्हन. आपुण जातीवंत हरामी पन आप्ले सन्सारं एक नंबर चाल्तात भौ!
एकही फेमिनीस्ट बाई फेमिनाइन नस्ते अन एकही फेमिनीस्ट पुरुष मस्क्युलीन असुचं शकत र्‍हाई असं आप्ल पक्कं मतं! तुम्ही म्हजे हिजाडी जमात, उद्या बाय्काईन म्हन्ट्ल ना तर ऑपरेशन करुन गर्भपीशव्याई बसुन घ्यान तुम्ही, मेट्रोसेक्सुअल साले! ....उरफाट्या
(बन्टी अचानक शांत पण थोडासा अनकर्फरटेबल)

सांगाव का नाई विचारच करत होतो पन चम्या चा फोन आल्ता महिन्याभर्या पहीले,तीनचार महिन्यापासुन चम्याले सोडुन माहेरी गेली म्ह्न्ते त्याची बाय्को. पुरा कावला तो जिन्दगीले. ... ठुश्या
(सगळेच अवाक, शिट यार, fXXX , अरेरे ई. शांतता )
सगळ्यात पहीले भौ या अफझल गुरुपेक्षा या शाहारुख खान ले फाशी द्याले पाहीजे होतं. जिन्दग्या याईले म्हन्जे डीडीएलजे वाट्टे ना, फिल्मी साले! ... ठुश्या
(उरफाट्या खुश होउन हसत)
दे टाळी! तशेही आपले अंदाज चुकत र्‍हाईच म्हना. भौ सन्सारं करावं तं आम्च्या सारख्यानं. दु:ख इतकचं का च्यामारी चम्यासाठी केलेली प्रार्थना वाया गेली. तसं बरंच झालं सुटला चम्या एकदाचा. ... उरफाट्या
(उरफाट्या सोडुन कुणीच हसलं नाही)
हसावं कसंकाय वाट्टेबे तुले अश्या बातम्याईवर?
हरामी साल्या, थु तुया तोन्डावर. तुयी बाय्को सोडुन जाइन ना तेव्हा तुले सम्जन दुसर्याच्या भावना अन बायकोची किंमत. ... बन्ट्या
अबे ओ जोडव्या! मले नको शिकवु कसा दुसर्याच्या भावना अन संसार. ...उरफाट्या
(जोडव्या या शब्द उच्चारल्या क्षणी बन्टी प्रचंड चिडला आणी रागारागात, शिव्या देउन, भावणेच्या भरात उरफाट्याला धक्का देउन निघुन गेला. जानव्या धावत बन्टीला माघारी आणायला. उरफाट्या ने बन्टीला 'जोडव्या' का म्हणाला आणी एरवी शांत असणारा बन्टी असा का वागला हे सगळ्यानाचं कोड्यात टाकणारं होतं. कधीनव्हे ते उरफाट्या च्या चेहरयावर दु:ख आणी अपराधीपणाची भावना. काहीवेळ स्मशान शांतता. जानव्या एकटाचं परत आला )

बन्ट्याले काय झालं एकदम? तनंतनं निंगुन कार्‍हुन गेला? अनं हे जोडव्या म्हन्जे काय प्रकर्न बे फाट्या? ...जानव्या
ह्म्म्म...(थोडा वेळ सांगु की नाही हा विचार करत उरफाट्या)
अरे त्यादिवशी बन्ट्या च्या घरी गेल्तो तं काय हा आपला अमोल पालेकर हातात त्याच्या बाय्कोची जोडवी घेउन रडुन र्‍हायला होता. अनं टीव्ही वर गान कोन्तं तं गुलझारचं "एक अकेला इस शहर मै... आबोदाना ढुंढता हु". कडवं सुरु कोन्तं तं "दिन खाली खाली बरतन है और रात है जैसे अंन्धा कुवा." भौचा बाय्कोवर भारी जीव! बाय्को ले कोन्तातरी डेंजर मानसीक आजार होता म्हन्ते. म्ह्न्जे याले अनं डॉक्टरलेच तो आजार वाटे बाकी कोनाले भरोसा नव्हताच. बाकीच्याईले वाटे का पोट्टी मुद्दामच करते.
एकदिवस याची बाय्को याच्या आंगावर पायतली जोडवी फेकुन निघुन गेली म्हन्ते तेव्हा पासुन माहेरीच. होत आलं वर्ष आता.
(सगळे अवाक, चेहरे पडलेले. उरफाट्या थोडावेळ घेउन )

बंट्या बोल्ला न्हाई कधी ... ठुश्या

मले ते पोट्टी काही मेंटलगिंटल नाही वाटत बॉ! चांग्ली जॉब करते. तेव्हापासुन हा पालेकर "जीने की वजह तोह कुछ भी नही मरने का बहना ढुंढता हु!" टाइप वाग्ते. याले असं वाट्टे का ते पोट्टी याचं नाव घेउन "मेरा कुछ सामान तुम्हारे पास" म्हनुन "जब इसको दफनाउंगी खुद भी वही सो जाउंगी" म्हनत अस्न. चुत्या आहे भैXX.. म्या त्याले विचारलं कारे भौ "सोन्याचं मंगळसुत्र काहुन नाई फेक्ल मंग तिनं तुया आंगावर?" तं चिड्ला मायवर.

जौदे दु:ख अन स्वताहाले फसवनं ह्या मानसीक गरजचं हाये म्हना मानसाच्या. ...उरफाट्या
भडवे कीतना हरामी है बे तु? सीनेमे दिल नही है तेरे ...ठुश्या

देख भाई उसकी सारी गिरहें१ मुझे भी साफ दिखाई पडती है. पर उसको कोई तरकीब भी तोह हम दोस्तो को ही सिखानी पडेगी ना? एकटं चुत्यासारखं रडन्यात का अर्थ हाये ऑ ?
"एक अकेला" नन्तर जोडव्या च्या टीव्हीवर कोन्त गानं लाग्ल म्हाइत हाय? त्याच मातीखाऊ गुलझाराचच "नैनो की मत सुनीयों रे.. नैना ठग लेंगे"
"लिखत पढतं रसीद ना खाता" हे खर्रच हाये भौ! ...इति उरफाट्या

१-> गुलज़ार ची संत कबीराला उद्देशुन लिहलेली गिरहें नावाची नज़्म

विनोदजीवनमानलेख

प्रतिक्रिया

टवाळ कार्टा's picture

26 Feb 2014 - 5:13 pm | टवाळ कार्टा

=))

जोशी 'ले''s picture

26 Feb 2014 - 6:37 pm | जोशी 'ले'

छान लिहलय.. ..

प्रसाद१९७१'s picture

26 Feb 2014 - 6:52 pm | प्रसाद१९७१

जुने मित्र म्हणायचे आणि त्यांना एकमेकांच्या आयुष्याबद्दल अगदी बेसिक सुद्धा माहिती नसणे हे पटले नाही.

सिफ़र's picture

26 Feb 2014 - 7:17 pm | सिफ़र

बेसिक म्हन्जे ?
लग्न मोडने ही बेसिक गोष्ट नाहीये खरी. उराफाट्या ला माहीती होती.

जोशी 'ले''s picture

26 Feb 2014 - 6:55 pm | जोशी 'ले'

छान लिहलय.. ..

अनन्त अवधुत's picture

27 Feb 2014 - 1:12 am | अनन्त अवधुत

लय दिवसापास्न वर्हाडि वाचायले भेटली नव्हती.

आत्मशून्य's picture

27 Feb 2014 - 1:51 am | आत्मशून्य

हर सफर एक नई शुरुआत हाच अर्थ आहे ना नावाचा ?

अवांतर:- लेख ठीक होता. भाषाशैली ओघवती आणि तगडी वाटली. मज्या आली...!

सिफ़र's picture

27 Feb 2014 - 10:52 am | सिफ़र

धन्यवाद.

आत्मशून्य भौ सिफ़र म्ह्णजे पण 'शुन्य'च

आत्मशून्य's picture

27 Feb 2014 - 1:29 pm | आत्मशून्य

मी पहिल्यांदा हा शब्द लकि अलिच्या "सिफर" अल्बम मुळे वाचला... ज्यात सिफर (हर सफर एक नयी शुरुवात) लिहलेले असायचे. त्यामुळे नक्कि अर्थ गुलदस्त्यात होता.

बाकी लेखणी आपली तगडी आहे, अजुन येउ देत.

पिवळा डांबिस's picture

27 Feb 2014 - 1:57 am | पिवळा डांबिस

मस्त लिहिलंय, सिफरजी! आवडलं!!
जियो!

अत्रुप्त आत्मा's picture

27 Feb 2014 - 4:32 am | अत्रुप्त आत्मा

:D

यसवायजी's picture

27 Feb 2014 - 9:45 am | यसवायजी

आवडलं.

प्रमोद देर्देकर's picture

27 Feb 2014 - 11:19 am | प्रमोद देर्देकर

लय भारी लिहुन राह्ल्ये भाउ मले आवड्ले. मले तर माहे मित्र तो वो भरत गणेशपुरे त्याले आठ्युन राल्होना भाऊ.

विनायक प्रभू's picture

28 Feb 2014 - 8:44 am | विनायक प्रभू

चांगले पोस्ट
थोडासा शॉप टॉक पण चल्ला आसता.

बाय्कांच्या शॉपिंग चा टॉक काय ? मजा आली असती खरी ;)

जोशी 'ले''s picture

28 Feb 2014 - 6:51 pm | जोशी 'ले'

आली असती? अहो येईल ... टाका तो भाग जमल्यावर :-)

सुहास..'s picture

28 Feb 2014 - 7:37 pm | सुहास..

लईच ..

लिहीत रहा !!