सही रे सही....

मुक्त विहारि's picture
मुक्त विहारि in जनातलं, मनातलं
25 Feb 2014 - 10:00 pm

खालील लेख तद्दन फालतू आणि विनोदी आहे.जास्त विचार न करता लिहीलेला आहे.तस्मात ज्यांना खूप विचार करून लेख लिहायला आणि अति विचार असलेलेच लेख आवडतात, त्यांनी हा लेख वाचू नये.

===============================================================

गेली ३/४ वर्षे मिपावर वाचनमात्र होतो आणि मग एक दिवस मिपाचे सदस्यत्व घ्यावे असे वाटले.अर्ज केला आणि तो पास पण झाला.बाकी सगळी माहिती भरली पण ही "सही"ची भानगड काही सुटत न्हवती.इतरांच्या सह्या बघून झाल्या.पण सहीचे कोडे काही सुटत न्हवते.३/४ दिवस असेच गेले.आमची ही अवस्था, आमच्या बायकोच्या लक्षांत आली, आणि तिने सरळ आम्हाला घेवून बाबांचा आश्रम गाठला.

तसा मी बुवा-बाजीच्या जास्त फंदात न पडणारा मनुष्य.पण ह्या बाबांचा मात्र खूपच भक्त.एक तर ते पैसे घेत नाहीत आणि साधे सरळ उपाय देतात.कौटूंबिक समस्या तर एकदम चुटकीसरशी सोडवतात.आम्ही पोहोचलो, त्यावेळी पण एक २२/२५ चीचे जोडपे त्यांना भेटून परत जात होते.त्या दोघांचेही चेहरे आनंदीत झाले होते.बहुदा बाबांचा सल्ला त्यांना मानवला असावा.

बाबांच्या खोलीत गेलो तर ह्यावेळी जिकडे-तिकडे पाट्याच पाट्या लावल्या होत्या.

"पेंडसे वर राहतात."

"ऐक टोले पडत आहेत."

"पदराचा आणि वार्‍याचा संबंध, असतोच असेही नाही आणि नसतोच असेही नाही."

अशा वाक्यांच्या पाट्या तर होत्याच पण शिवाय काही कवितेच्या पण पाट्या होत्या.

"नांव गांव कशाला पुसता?"

"घटा घटाचे रूप आगळे."

मागच्या वेळी आलो होतो त्यावेळी , सगळ्या मालिकेंच्या पाट्या होत्या.तर ह्यावेळी ह्या पाट्या.असो.

एक २/४ मिनीटांतच बाबा आले.नेहमीप्रमाणे चेहरा एकदम हसतमूख.आम्ही दोघेही पाया पडलो.आमच्या हिने त्यांना "खीमा कटलेट आणि खजूराच्या वड्या" दिल्या.त्यांनी लगेच दोन्ही पदार्थांची चव घेतली आणि संभाषणाला सुरुवात केली.

बाबा : बोला काय काम काढलेत.

आमची बायको : बाबा, ह्यांचे ना गेल्या १०/१२ दिवसांपासून कुठे लक्षच लागत नाही आहे.मध्येच कधी तरी हसतात, तर कधी गंभीर होतात.सारखे संगणकावर चिकटून असतात.मी कुठला पदार्थ करायला घेतला की, लगेच कॅमेरा घेवून स्वैपाकघरांत शिरतात.आता मी पदार्थ करू की, ह्यांचा फोटो काढून होइस्तो वाट बघू?

बाबा : अगं मुली ते सध्या कुठल्या तरी संकेतस्थळाचे सभासद झाले असतील.काय हो, मुवि, बरोबर ना?

मी : एकदम बरोबर.सध्या मी "मिपाकर" आहे.

बाबा : (आमच्या बायकोकडे बघून) बघीतलेस.बरे मग आता तुम्हीच सांगा.काय अडचण आहे?

मी : बाबा एखादी छानशी सही सुचवा ना.लोकांच्या किती सुंदर सुंदर सह्या असतात्,मला पण एखादी सही सुचवा.

बाबा : अरे, मी तुला काय सही सुचवणार? आपल्या महाराष्ट्रात इतकी थोर थोर मंडळी बरेच काही लिहून गेली आहेत.त्यांत पण पु.ल. तर खूपच.तरी पण तुम्हाला सही सुचत नाही, म्हणजे कमाल आहे.गेले ७/८ दिवस हाच प्रॉब्लेम घेवून बरीच जण येऊन गेली.शेवटी मग मीच पाट्या तयार करून ठेवल्या.तुला हवी असेल तर कुठलीही पाटी निवड.

मी : आधी मला ह्या पाट्यांची थोडी माहिती तर द्या. उदा."पेंडसे वर राहतात." ह्या पाटीला काय महत्व? साधीच पाटी आहे. किंवा "ऐक टोले पडत आहेत." हिचा काय अर्थ?

बाबा : बघीतलेस.तुम्ही नुसतेच वाचता.पण त्यामागचा अर्थ समजून घेत नाही.अहो... "पेंडसे वर राहतात."...ही पाटी त्याच लोकांसाठी आहे, की जे फक्त लेखमात्र असतात.म्हनजे जे फक्त लेख लिहीतात किंवा प्रतिसाद देतात...पण त्यांच्या लिखाणावर चर्चा करायला त्यांना आवडत नाही.तुम्ही लेख पण लिहीणार आणि जमल्यास त्यावर चर्चा पण करणार.मग तुम्हाला ही पाटी काही उपयोगाची नाही.

तसेच ती दुसरी पाटी..."ऐक टोले पडत आहेत." .... तु ही कथा वाचली असशील.ह्या कथेचा थोडक्यांत सारांश पण तुला माहीत असेलच.पण दुसर्‍या व्यक्तीने ती कथा न वाचल्याने, त्याला ह्या वाक्याचा अर्थ समजणार नाही. थोडक्यात "ऐक टोले पडत आहेत." म्हणजे....बाबारे वाचन वाढव.जास्त काही लिहीलेस तर तुझी शंभरी भरलीच म्हणून समज, असे तुम्ही दुसर्‍या मिपाकराला सांगत आहात.

आता ही तिसरी पाटी घे..."पदराचा आणि वार्‍याचा संबंध, असतोच असेही नाही आणि नसतोच असेही नाही."

आता तुच सांग ह्याचा अर्थ आणि जमल्यास त्या कवितांच्या ओळीचा पण अर्थ सांग.

मी : "पदराचा आणि वार्‍याचा संबंध, असतोच असेही नाही आणि नसतोच असेही नाही." म्हणजे काही काही लेखांतील विचारधारांना, तुम्ही सहजासहजी स्वाकारु पण शकत नाही आणि नाकारू पण शकत नाही,

बरोबर ना?

बाबा : एकदम योग्य.जे लोक असे योग्य विचार करून लेख लिहीतात, त्यांच्या साठी ही सही आहे.तू काही ही सही घेवू नकोस.

मी : "नांव गांव कशाला पुसता?" ही कोल्हापुरकरांसाठी एकदम योग्य. बरोबर ना?

बाबा : अरे वा!!! तु तर एकदम योग्य विचार करायला लागलास.मग आता ती शेवटची कविता म्हण बरे.

मी : "घटा घटाचे रूप आगळे. प्रत्येकाचे दैव वेगळे.मुखी कुणाच्या पडते लोणी.कुणा मुखी अंगार.विठ्ठला तू वेडा कुंभार." थोडक्यात हे कंपूबाजी करणार्‍यांसाठी आहे.बरोबर ना? मग ह्या पाटीचा "मिपाकरांना" उपयोग नाही.

बाबा : एकदम बरोबर.मिपाकर सुज्ञ असल्याने,कंपूबाजीला जास्त महत्व देत नाहीत.मग आता तुच ठरव की कुठली पाटी पाहीजे.

मी : अजून पण काही सुचत नाही आहे.तुम्ही काही तरी सुचवा.

बाबा : तू ते "असामी असा मी" वाचले आहेस ना?मग त्यातील एक वाक्य निवड.

मी : मला ना त्यातले नानू सरंजाम्याच्या तोंडचे "मी झोपतो करून हिमालयाची उशी." हे वाक्य खूप आवडते. तेच टाकतो.

कारण

नानू = न + अ+ अनू (म्हणजे अनेक रेणूंचा बनलेला , थोडक्यात अनेक पैलू असलेला माणुस.)

सरंजामे = ज्याच्याकडे विचारांचा आणि अनुभवांचा साठा आहे.

झोपतो करुन हिमालयाची उशी = ह्या भारतवर्षातील सगळ्या माणसांमधून समविचारी माणसे शोधणे आणि त्यांच्या बरोबर "काव्य्,शास्त्र आणि विनोदाच्या" गप्पा मारत मारत रात्र रात्र जागवणे.

बाबा : बरोबर...आता तुला थोडे थोडे पुल समजायला लागले.

उद्या तुला " गाढवाला शिंग का नसते?" ह्या वाक्याचा पण अर्थ समजेल.

असो, पण तुझ्या ह्या सहीत अजून एक वाक्य पण टाक "मुद्दाम गहन विचार करणार्‍यांची आम्हाला गरज नाही."

मी : कशाला?

बाबा : त्याचे काय आहे, सध्या उगाच नको ते विषय काढून आणि विचारलेल्या शंकांची उत्तरे न देता पळून जाणारी माणसे जरा जास्तच झाली आहेत.समझनेवाले को इशारा काफी होता है.

मी : धन्यवाद बाबा.तुम्ही माझे मोठे काम केलेत.

बाबा : अरे नुसते कोरडे धन्यवाद देवू नकोस.मागच्या वेळीस दिल्या होत्यास, तशा मस्त आरोग्यवर्धक ओल्या नारळाच्या वड्या घेवून ये.अन सुन बाई, जमल्यास तू पण मिपाकर हो.

====================================================

तर अशा प्रकारे, आमचा सहीचा प्रश्र्न सुटला.चला आता बाबांसाठी वड्या करायला घेवू या.

विनोदविरंगुळा

प्रतिक्रिया

प्रचेतस's picture

25 Feb 2014 - 10:04 pm | प्रचेतस

मस्त.
एकदम खुसखुशित.

प्रशांत's picture

26 Feb 2014 - 9:54 am | प्रशांत

+१

सानिकास्वप्निल's picture

25 Feb 2014 - 10:22 pm | सानिकास्वप्निल

मस्तं लिहिले आहे.
चला आता खजूराच्या वड्या, आल्याच्या वड्यानंतर आरोग्यवर्धक ओल्या नारळाच्या वड्यांची पाकृ लवकरचं येणार तर :)

खटपट्या's picture

25 Feb 2014 - 10:23 pm | खटपट्या

चांगलंय !!!

__________________________________________________________
सही - "पदराचा आणि वार्‍याचा संबंध, असतोच असेही नाही आणि नसतोच असेही नाही."

पैसा's picture

25 Feb 2014 - 10:28 pm | पैसा

सहीच आहे!

अत्रुप्त आत्मा's picture

25 Feb 2014 - 11:09 pm | अत्रुप्त आत्मा

@उद्या तुला " गाढवाला शिंग का नसते?" ह्या वाक्याचा पण अर्थ समजेल.>>> http://www.sherv.net/cm/emo/laughing/free-laughing-smiley-emoticon.gif

मस्स्स्स्स्स्स्स्स्स्स्त........ धुतलय! =))

डॉ सुहास म्हात्रे's picture

25 Feb 2014 - 11:22 pm | डॉ सुहास म्हात्रे

बघा आम्हाला हसवता हसवता ती आरोग्यवर्धक ओल्या नारळाच्या वड्यांची पाकृ द्यायची विसरलात ! :)

पण खास मिपाकरांच्या वड्या लै खास पाडल्या... आपलं ते खोड्या लै खास काढल्या आहेत ;)

आत्मशून्य's picture

25 Feb 2014 - 11:50 pm | आत्मशून्य

लागते जिव्हारी ;)

आत्मशून्य's picture

26 Feb 2014 - 12:00 am | आत्मशून्य

खालील लेख तद्दन फालतू आणि विनोदी आहे.जास्त
विचार न करता लिहीलेला आहे.तस्मात ज्यांना खूप
विचार करून लेख लिहायला आणि अति विचार
असलेलेच लेख आवडतात, त्यांनी हा लेख वाचू नये.

हे वाचल्यावर संजय क्षीरसागर सरांची आठवण झाली तुम्ही माझे लेख वाचु नका मी माझ्या चात्यासाठी लिहतो असं ते हमखास लिहायचे...! हम्म नवा नवं राज्य...! तोच खेळ पुन्हा पुन्हा पुन्हा सहिरे सहीच!

पिवळा डांबिस's picture

26 Feb 2014 - 12:20 am | पिवळा डांबिस

खरं तर तुमची मिपावर सही अशी चांगली शोभेल..

"असेन जरी मी मुक्त विहारी, कट्टे करायची सदा तयारी"
:)
ह. घ्या

अत्रुप्त आत्मा's picture

26 Feb 2014 - 12:50 am | अत्रुप्त आत्मा

@ "असेन जरी मी मुक्त विहारी, कट्टे करायची सदा तयारी" >>> =)) जोरात सहमती! =))

अता, तुंम्ही याच सहि'त या हो मु.वि.! :D

आयुर्हित's picture

26 Feb 2014 - 12:46 am | आयुर्हित

आता कसं बरं वाटतय जरा.
आता तुमची सही बघून लोक आता वड्याचे तेल वांग्यावर काढणार नाहीत!

स्पंदना's picture

26 Feb 2014 - 5:38 am | स्पंदना

मुवि रॉक्स!!

जेपी's picture

26 Feb 2014 - 6:52 am | जेपी

सहि रे सहि .

यशोधरा's picture

26 Feb 2014 - 7:13 am | यशोधरा

:D

अजया's picture

26 Feb 2014 - 10:19 am | अजया

सही रे सही !

चलत मुसाफिर's picture

26 Feb 2014 - 10:58 am | चलत मुसाफिर

काही "सही" सूचना:

१. अजुन यौवनात मी.
२. बेळगाव, हुबळी, कारवार, इंदूर, बडोदा, दिल्ली, सिलिगुडी, तंजावर, कोचीन, मछलीपट्टनमसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे.
३. सगळीकडे बोंबाबोंब.
४. यंदा कर्तव्य आहे

इ. इ.

इरसाल's picture

26 Feb 2014 - 11:44 am | इरसाल

अन सुन बाई, जमल्यास तू पण मिपाकर हो.

हे बोलुन बाबांनी तुमच्या मिपालेखनाला बुच मारण्याचा प्रेयत्न केलेला दिस्तोय.

धर्मराजमुटके's picture

26 Feb 2014 - 11:48 am | धर्मराजमुटके

मा. मुवींचा त्रिवार निषेध !!!
बाबाने काय काय उपदेश केला ते सांगीतले पण बाबांचे नाव, गाव, पत्ता नाही दिला. मी या कोत्या मनोवृत्तीचा निषेध करतो.
:)

तिमा's picture

26 Feb 2014 - 12:02 pm | तिमा

भौं ना काँपिटिशन आहे.

दिव्यश्री's picture

26 Feb 2014 - 8:01 pm | दिव्यश्री

भारीच लेख ... लई म्हणजे लईच आवडला .
"पदराचा आणि वार्‍याचा संबंध, असतोच असेही नाही आणि नसतोच असेही नाही." >>> :D
अन सुन बाई, जमल्यास तू पण मिपाकर हो.>>> लवकर करा त्यांना मिपाकर .
चला आता बाबांसाठी वड्या करायला घेवू या. >>>आम्ही पण यायचं का मदतीला ? *beee* :D

ओसामा's picture

28 Feb 2014 - 5:01 am | ओसामा

कशी बदलायची हे सांगू शकाल का? खरा ओसामा जहन्नुम मध्ये गेल्यामुळे माझी सही बदलावी म्हणतो.
"जिथे दिव्यत्वाची प्रचीती तिथे मी दाढी खाजवी"

या लेखात बरेच मुद्दे दडलेले आहेत .ते सांगण्या अगोदर मुविंप्रमाणेंच माझाही प्रतिसाद हलकेच घेणे हेवेसांन सुचना .

नवीन वाचक इकडे फार छान हिरवे आहे समजून
एके दिवशी घाबरत घाबरत मिपाकर होऊन एक लेख टाकण्याचे
धाडस करतो .त्याच्यावर प्रतिसादांचा हल्ला होतो .काहीवेळा शंभरी गाठते .वाटते तितके हिरवे नाही
हे पचवेपर्यँत दोनचार "अमक्याचे तमक्यास पत्र "छाप विडंबनांचे निवडुंग उभे राहातात .तेही शंभरी गाठतात .
मग सगळे स्थिरस्थावर .हा नवा मिपाकर पुन्हा घाबरत नवा लेख टाकतो .आता नवीन संकट .संपूर्ण दुर्लक्ष ! लहान मुलांना पट्टीचा मार खायला तयार असतात पण अबोलाची शिक्षा फारच भारी वाटते .
आता कंपुबाजी तर नाही ना अशा भीतीने त्याला पछाडले जाते .त्यावर उपाय शोधणे आणि काही निवडक आईडींना कसे खरमरीत उत्तर देता येईल याची विवंचना .प्रत्यक्ष हल्ला न करता आपल्या सहीने (साळिंदराचे काटे)काही लोकांना टोचता येण्याचा विचार होतो .काही वेळा काटे आणखी टोकदार केलेले आढळतात .पुढे हा मिपाकर निर्ढावतो आणि त्याला कळते असं काहीही नाही केवळ मजा आहे .आता हसून घेऊ पुढे तेपण मिळेल की नाही कोण जाणे .(my bark is worse than bite .)

प्रमोद देर्देकर's picture

28 Feb 2014 - 11:08 am | प्रमोद देर्देकर

आयला मु.वि. षटकार मारलात आयला आता पुढिल लेख लिहताना Skype Emoticons विचार करिन म्हणतो.

सुधीर मुतालीक's picture

28 Feb 2014 - 5:15 pm | सुधीर मुतालीक

मुवि लेख एकदम आवडला. एकदम झक्कास. " पदराचा आणि वाऱ्याचा संबंध …" हे तर एकदम भारी.मज्जा आली वाचताना. लगे रहो.

छान लिहिलंय .... आवडला लेख .....+)

गणपा's picture

28 Feb 2014 - 7:39 pm | गणपा

या मणुक्षाला कट्टयांसंदर्भातले धागे उसवण्यावर बंदी घालावी म्हणजे असं काही याच्या लेखणीतुन बाहेर येईल असा प्रस्ताव मांडतो. ;)

ओ गणपाभौ,

मुवि आधीच मुंबईचे (अनधिकृत!) कट्टा नियोजन अधिकारी म्हणुन पुढे आले आहेत. मुविंशिवाय दुसरा कोणीतरी कट्टा नियोजन अधिकारी शोधा रे! :)

त्यामुळे मुविंना फक्त पाककृती विभागात आणि कट्टे आयोजित करण्यापासुन बंदी घातली तरी पुरेसे आहे.

मुविंकडुन असे धागे अपेक्षित पाहिजे असतिल तर हाच एक उपाय योग्य आहे.

जाताजाता, तुमच्या पाककृती का कमी झाल्या?

भाते's picture

28 Feb 2014 - 7:52 pm | भाते

आयला! धागा वाचुन मला वाटले होते मुविंनी सही रे सही नाटकाचे विडंबन वैगरे लिहिले असेल. :)
जाऊ दे... मुविंकडुन 'पुन्हा सही रे सही' असा आणखी एक धागा येईल अशी अपेक्षा. :)

'सध्यातरी मला सहीची गरज नाही कारण मुवि मला चांगली सही सुचवत नाहित.'
तोपर्यंत, हि माझी सही कशी वाटते? :)

इन्दुसुता's picture

28 Feb 2014 - 7:54 pm | इन्दुसुता

लेख आवडला.
"बाबां"च्या सल्ल्यानुसार सौ. मुवि मिपाकर झाल्यात हे ( त्यांनी एका धाग्यावर आवर्जून प्रतिसाद दिल्यामुळे) कळले ...
त्यांचे मिपावर स्वागत. :)
आता खर्र खर्र सांगा सौ. मुवि, तुम्ही पाकृ करता आणि मुवि फक्त फोटो काढतात ना? ( स्वगत : सुते, घारापुरी कट्ट्याला जाता येत नसल्यामुळे, खजूर/ नारळाच्या वड्या चाखायला मिळणार नसल्यामुळे झालेली जळ्जळ कुठे दिसत तर नाहीये ना?)

मदनबाण's picture

1 Mar 2014 - 4:34 pm | मदनबाण

जबराट !
सही रे सही... :)