चारोळी स्वरूपात शब्दकोष

विवेकपटाईत's picture
विवेकपटाईत in जनातलं, मनातलं
24 Jan 2014 - 9:57 pm

अंग्रेजीची 'daughter '
हिंदीत झाली 'बेटी'
मराठी आईची 'लेक'
शोभते खरी राजकुमारी.

दिल्ली मुंबई सारखी सत्ता व व्यापाराचे केंद्र असलेल्या मोठ्या शहरांमधे भिन्न-भिन्न भाषा बोलणार्‍या लोकांचा सतत वावर असतो. अमीर खुसरोच्या काळात ही दिल्ली सल्तनतची राजधानी होती. त्याचप्रमाणे व्यापाराचे मुख्य केंद्रही. दिल्लीचे स्थानिक निवासी हिंदी बोलणारे. दरबारात विदेशी राजदूत, सरदार आदि तुर्की- फारसी बोलणारे. मोठ्या प्रमाणावर विदेशी व्यापार्‍यांचा वावरही दिल्लीत होता. भाषेमुळे होणार्‍या समस्या दूर करण्यासाठी बादशाहच्या आदेशानुसार अमीर खुसरोने 'खालिकबारी' नावाचा तुर्की-फारसी-हिंदी शब्दकोष तैयार केला. त्यात दैनिक उपयोगात येणार्‍या शब्दांचे अर्थ तिन्ही भाषांमधे दिले होते. चारोळी स्वरूपातला हा शब्दकोष त्या काळी खूब लोकप्रिय झाला. त्यातले एक उदाहरण:-

फारसी बोली 'आई ना'
तुर्की ढूँढी 'पाई ना'
हिंदी बोली 'आरसी' आए
खुसरो कहें कोई न बताए.

त्या काळी तुर्की -फारसी महत्वपूर्ण भाषा होत्या तर आज मुम्बईत मराठी बरोबरच अंग्रेजी, हिंदी आणि उर्दू या बोलचालीच्या भाषा आहेत. आता वरील चारोळीचा मराठी अनुवाद आजच्या परिस्थितिनुसार:

अंग्रेजीच्या 'mirror' ला
उर्दू दाखविते 'आईना'.
'आरशात' मराठीच्या
दिसली हिंदीची 'आरसी'
.

खरं म्हणाल तर मी ही मराठीच्या'आरशात हिंदी भाषेची आरसी दाखविण्याचा प्रयत्न करतोच आहे. असो! कवितेच्या माध्यमातून आपण हसत-खेळत दुसर्‍या भाषेंतील शब्द सहज शिकू शकतो. त्याचा सर्वाना फायदाच होईल व भाषेवरून होणारे विवादही कमी होतील. आपण ही प्रयत्न करा. चारोळी रचा. कवितेत शब्दकोष सहज तैयार होईल. एक नमूना पहा:

हिंदीच्या 'बिल्लीला'
म्हणे मराठी 'मांजर'
अंग्रेजीची 'cat'
आहे मोठी धूर्त.

शेवटी मांजर असो व 'गोरा ' माणूस धूर्त असतात. फेसबुक किंवा संचार क्रांतीच्या माध्यमातून दुसर्यादेशांत अराजकता पसरवू शकतात. अरब स्प्रिंग चा काही परिणाम भारतात ही झालाच आहे. अराजकता काय असते थोड कळले आहे. जनतेनी सावध राहावं, देशाला 'इजिप्त बनण्या पासून वाचवावे हीच अपेक्षा.

आपण ही प्रयत्न करा.

शब्दक्रीडाप्रकटन

प्रतिक्रिया

आयुर्हित's picture

24 Jan 2014 - 10:27 pm | आयुर्हित

विषय व माहिती अतिशय छान आहे.
आजही मराठीत असे बरेच शब्द आहेत जे तुर्की/फारसीतुन आले आहेत.उदा: तारीख, बुरुज
अमीर खुसरो बद्दल अधिक माहिती वाचायला आवडेल.

भाषा ही विवाद कमी करून, संवाद साधण्याचे खरे माध्यम आहे हेच खरे!

अनिरुद्ध प's picture

25 Jan 2014 - 4:41 pm | अनिरुद्ध प

+१ सहमत

चारोळी स्वरूपात शब्दकोष आयडीया चांगली आहे.

शेवटी मांजर असो व 'गोरा ' माणूस धूर्त असतात.

म्हणण्याचा उद्देश लक्षात आला तरीही आपल्याला काय म्हणायच आहे ते वेगळ्या शब्दातही मांडता येऊ शकेल का ? कारण भारतीय लोकांनी मानवी त्वचेच्या रंगांचा संबंध मानवी दुर्गुणांशी लावून साचे बंद प्रतिमांचा उपयोग करण्याबद्दल अधीक संवेदनशील असण्याचा प्रयत्न येथून पुढच्या काळात करावयास हवा असे वाटते.