टंकलेखन साहाय्य
सामर्थ्यदाता : गमभन !
'कम्युनल' विरोधाच्या नावाखाली चालणारा संधिसाधुपणा
भारत देशात जरी हिंदु बहुसंख्य असले तरी त्यांच्यासाठी बोलणारा 'कम्युनल' म्हणजे सांप्रदायिक ठरतो.आणि हे ठरवणारे म्हणजे भारतातील बहुतांश धर्मनिरपेक्ष पक्ष आणि धर्मनिरपेक्ष पत्रकारीता.पण जर का याचा नीट अभ्यास केला तर अस दिसुन येत की सांप्रदायिक शक्तींना विरोधाचे कारण पुढे करुन प्सुडोसेक्युलर पक्ष संधिसाधुपणा करतात्.यामधे अनेक उदाहरणे देता येतील्.सध्याचच सगळ्यात गाजणार उदाहरण म्हणजे समाजवादी पक्ष्.
समाजवादी हा मुळात मुस्लिम लोकांमधे प्रसिध्द असलेला पक्ष्.या पक्षातील नेत्यांनी हिंदुंवर कारसेवा करायला गेले म्हणुन गोळ्याही झाडल्या होत्या.मागच्या लोकसभेच्या निवडणुकांपुर्वी 'आम्ही ज्यांना पाठींबा देउ तेच सरकार बनवतील' अशा थाटात यांचे मुलायम सिंग आणि अमर सिंग वावरत होते.पण निकालांनंतर चित्रच पालटल.कधी नव्हे ते कम्युनिस्टांचे ५२ खासदार निवडुन आले आणि त्यांनी काँग्रेसला बिनशर्त पाठींबा दिला.त्यांच्या व इतर युपीए च्या घटक पक्षांच्या आधारे सरकार बनणार हे स्पष्ट झाल्यावर समाजवादीच्या नेत्यांनी केलेल्या वल्गना खोट्या ठरल्या आणि त्यांच्याशिवायच सरकार बनु लागले.मग अमर सिंग तरीही काँग्रेसच्या स्नेहभोजनाला 'बिनबुलाये मेहमान' बनुन गेले.आधीच सरकार येणार हे स्पष्ट झाल्याने सोनिया मॅडम निश्चिंत होत्या त्यांनी सरळ सरळ 'अमर सिंग येथे काय करत आहेत??' म्हणुन त्यांना जवळपास हाकलुन दिले.त्यानंतर अगदी मागच्या वर्षीपर्यंत अमर सिंग 'काँग्रेसनी आमचा कसा अपमान केला' हे सांगत फिरत होते.पण मायावतींनी त्यांचा फडशा पाडल्यावर मात्र त्यांना महत्व मिळत नव्हते.आणि शेवटी अणुकरारावरुन डाव्यांनी सरकारचा पाठींबा काढल्यावर लगेच तेच अमर सिंग सोनिया व इतर काँग्रेस नेत्यांकडे फेर्या मारुन भाव खाउ लागले.आणि कारण सांगताना सांगु लागले की 'कम्युनल' पक्षांना सत्तेपासुन दुर ठेवण्यासाठी आम्ही सरकारला पाठींबा देत आहोत्.त्याचबरोबर कम्युनल आडवाणींपेक्षा बुश बरे अशीही टुम सध्या उडवत आहेत्.पण या सर्व निरर्थक गोष्टी आहेत हे तेही जाणतात आणि आपणही जाणतो.मुळात बसपचा 'हत्ती' अडवण्यासाठी काहीतरी करणे आवश्यक आहे म्हणुन समाजवादीने केलेला हा संधिसाधुपणा आहे.राष्ट्रीय पटलावर आपल महत्व दाखवुन देण्याचा प्रयत्न आहे.यात कम्युनल विरोध कुठेच नाही.मुलायम सिंग युपीच्या निवडणुका हरल्यावर अनेक कार्यक्रमात सांगत फिरत होते की 'राजकारणात कुणीही कायमचा शत्रु अथवा मित्र नसतो'.हे वाक्य सगळ काही सांगुन जात्.म्हणजे वेळ आली तर आम्ही काँग्रेसबरोबरच काय तर भाजपबरोबरही युती करु शकतो असे यात स्पष्ट होते.मग कम्युनल विरोध आलाच कुठुन???
दुसरा संधिसाधु पक्ष म्हणजे करुणानिधींचा द्रविड मुन्नेत कळघम म्हणजे 'द्रमुक'.यांचा संधिसाधुपणा तर फारच स्पष्ट आहे. हिंदुंना 'चोर' म्हणणार्या आणि आयुष्यभर हिंदुविरोध करणार्या या पक्षाने मागच्या वेळी त्यांच्याच वैचारीक शत्रु असलेल्या भाजपला पाठींबा दिला.आणि गेले ४ वर्ष तेच भाजपाला पाठींबा देणारे करुणानिधी आता म्हणतात की 'भाजपसारख्या सांप्रदायिक पक्षांना दुर ठेवण्यासाठी धर्मनिरपेक्ष पक्षांनी एकत्र याव्.कम्युनल पार्ट्या हिंदु मुस्लिम एकीसाठी मारक आहेत्'.आता कम्युनलविरोधाचा मुखवटा चढवुन द्रमुक त्यांच्या कट्टर विरोधी असलेल्या काँग्रेसशी युती करुन आहे.भारतीय राजकारणात सर्वाधिक विरोधाभास असलेली ही युती आहे.राजीव गांधीची हत्या करणार्या 'एलटीटीइ'ला द्रमुकचा पाठींबा होता आणि अजुनही तो पाठींबा आहे असे म्हणायला वाव आहे.मुळात राजीव गांधी हत्येची चौकशी करणार्या जैन आयोगाने 'द्रमुक नेतृत्वावर कायदेशीर आरोप ठेवणे शक्य आहे' असा अहवाल दिल्यानंतर काँग्रेस्-द्रमुक युती व्हायची शक्यताच निर्माण व्हायला नको होती.द्रमुकचा जन्म जिच्यापासुन झाला ती जस्टिस पार्टी काँग्रेसची स्वातंत्र्यलढ्यात कडवी विरोधक होती.काँग्रेस स्वातंत्र्यासाठी चळवळ करत होता तेंव्हा ही पार्टी ब्रिटीशांना समर्थन देत होती,काँग्रेसने सरदार पटेलांच्या नेतृत्वाखाली देश एकसंध ठेवला होता तेंव्हा द्रमुक 'द्रविडनाडु' या देशाची मागणी धरुन होता,काँग्रेसने हिंदी भाषा राष्ट्रभाषा असावी म्हणुन महात्मा गांधींपासुन तशी भुमिका घेतली होती तेंव्हा कट्टर हिंदीविरोधाचे नेत्रूत्व द्रमुक करत होता,राजीव गांधींनी श्रीलंकेत शांतीसेना पाठवली त्याकाळात तर द्रमुक लंकेतील तामीळींसाठी चिडला होता.इतका प्रचंड विरोधाभास असलेली द्रमुक-काँग्रेस युतीही 'कम्युनल्'ला सत्तेपासुन दुर ठेवण्यासाठी झाली.पण ही करताना (तसे सांगताना तरी),त्याच कम्युनल भाजपबरोबर आपण ५ वर्ष सरकारात राहीलेलो आहोत हे द्रमुक विसरतो.
देवेगौडांचे सेक्युलर जनता दल तर संधिसाधुपणा लपवायचाही प्रयत्न करत नाहीत्.आपण कधी इकडे तर कधी तिकडे अशी सततची पळापळ करुन आपल्याला कुठलीही वैचारीक बैठक नाही हे त्यांचा पक्ष दाखवुन देत असतो.आत्ता परवाच एकाच दिवशी युपीए बरोबर आणि युपीए विरोध्यांबरोबर देवेगौडा दिसले होते.यांनी काँग्रेसबरोबर युती करुन धरम सिंग यांचे सरकार कर्नाटकात आणले आणि मग लगेच ते पाडुन भाजपाबरोबर सरकार आणले.त्यांचा मुलगा २० महीने मुख्यमंत्री आणि पुढचे २० महीने भाजपचा मुख्यमंत्री असेल असे ठरले.पण स्वतःचा मुख्यमंत्रीपदाचा कार्यकाल संपल्यावर कारभार भाजपकडे सोपवण्यास गौडांनी नकार दिला मग परत काँग्रेसबरोबर जायचा प्रयत्न केला आणि ते जमत नाही म्हणुन परत भाजपला पाठींबा दिला आणि ७ दिवसात तो काढुनही घेतला.हे सगळ करत असताना आपला संधिसाधुपणा उघडा पडतोय याचीही त्यांना चिंता नव्हती.मग देवेगौडांनी मुलाचा निर्णय होता असे म्हणुन सारवासारव केली. हे सर्व होतानाच आपल्या पक्षाचे नाव सेक्युलर आहे म्हणुन कम्युनल राजकारणाचा विरोधही ते अधुनमधुन करतात्.पण काहीच दिवसात परत ते भाजपबरोबर युती होउ शकते असेही सांगतात. आत्ताच काही दिवसांपुर्वी 'केंद्रात भाजपबरोबर युती होउ शकते' असेही त्यांनी स्पष्ट केले आणि हे केल्यानंतर काहीच दिवसात दिल्लीचे वारे पलटले आणि त्यात आपणही बातम्यांमधे याव म्हणुन धर्मनिरपेक्षांचा पंगतीत जाउन देवेगौडा परत बसले आहेत.
या सर्वांपेक्षा मायावतींची बहुजन समाज पार्टी तरी बरी.कारण ते सरळ सरळ हे मान्य करतात की 'आम्ही संधिसाधु आहोत.फायद्यासाठी आम्ही कुणाबरोबरही जाउ'.संसदेत एकदा कांशीराम म्हणाले होते की 'आम्ही संधिसाधु आहोत असे तुम्हीच म्हणता आणि वरुन आम्ही भाजपबरोबर गेलो म्हणुन टिकाही करता.मग तुम्हीच सांगा की आम्ही कुणाबरोबर जाव की ज्यामुळे आमचा फायदा होईल?'.जुन्या काळी मनुवादी म्हणुन ,कम्युनल म्हणुन ज्यांच्यावर टिका बसपने केली,त्यांच्याच बरोबर बसपने अनेकदा युतीही केली.सध्या पक्ष देशभरात वाढवण्यासाठी मायावती प्रयत्न करत आहेत्.ते करण्यासाठी वेळ पडल्यास 'कम्युनल' पक्षांशी युती करतील आणि वेळ पडल्यास त्यांना 'कम्युनल' आहेत म्हणुन विरोधही करतील्.बाकी युपीए सरकारला बाहेरुन पाठींबा देताना उत्तर प्रदेशच्या विकासाबरोबर जातीयवाद्यांना विरोध हाही मुद्दा होताच की!सध्या मायावती देशात युपिबाहेर सगळीकडे स्वतःचे उमेदवार उभ्या करत आहेत आणि याचा फायदा अप्रत्यक्षपणे भाजपाला होतोय.कारण त्या काँग्रेसचा मतदार स्वतःकडे खेचत आहेत.गुजरातमधे १५-१६ काँग्रेसचे मतदार त्यांनी घरी बसवले तर कर्नाटकात १०-११ काँग्रेसचे उमेदवार त्यांच्यामुळे हरले.अनेकदा भाजपबरोबर युती करणार्या आणि नरेंद्र मोदींसारख्या कट्टर हिंदुत्ववाद्याच्या प्रचारासाठी सभा घेणार्या मायावती राष्ट्रपतीपदासाठी काँग्रेस उमेदवाराला पाठींबा देताना म्हणाल्या की 'भाजपला पाठींबा देण्याचा प्रश्नच येत नाही कारण ते कम्युनल आहेत.कम्युनल पक्षांना कुठल्याही प्रकारे मदत व्हायला नको म्हणुन बसपने नेहमीच लढा दिलेला आहे'.असे असले तरी त्यांनी संधिसाधुपणा मान्य केलाय हे तरी ठिक आहे.
बाकी एका दृष्टीने राष्ट्रवादीवरही हा आरोप ठेवला जाउ शकतो.कारण सोनियांच्या परदेशी मुळाचा मुद्दा घेउन राष्ट्रवादीची स्थापना झाल्यावर काहीच महीन्यात महाराष्ट्रात त्यांनी काँग्रेसशी युती केली आणि सरकार बनवले.ते करताना 'राष्ट्रिय स्तरावर हे होणार नाही 'हे सांगितले आणि मग हळुहळु पवार भाजपकडे झुकु लागले.वाजपेयींचा उघड गौरव करु लागले.मग काही जागांवरुन बोलणी फिस्कटल्यावर पवारांनी सोनियांच्या काँग्रेसबरोबर लोकसभेसाठी निवडणुकपुर्व युती केली.मग त्यांच्या सरकारातही ते सामील झाले.'सोनिया पंतप्रधान आमच्याशिवायच होतील म्हणुन आम्ही त्यांना पाठींबा देतो' असे पवारांनी सांगितले.आणि हे केल्यानंतर सोनियांनी पंतप्रधानपद नाकारले.त्यानंतर काहीच महीन्यात महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुका होत्या.त्यात शरद पवारांनी असेही सांगितले की 'सोनिया पंतप्रधान होणार नाहीत हे स्पष्ट झाल्यावर कृषीमंत्रीपद स्विकारले'.पण हे करत असताना 'डबल कम्युनल' शिवसेनेशी ते संबंध ठेवुन आहेत्.पुण्यात त्यांची सेनेशी युतीही आहे.
याप्रमाणे प्सुडोसेक्युलर कम्युनलच्या नावाखाली संधिसाधुपणा करतात्.तर या कम्युनल पक्षांचा इतका खरच दोष आहे का???आणि खरच हे पक्ष कम्युनल आहेत का हा प्रश्न कोणीच विचारत नाही.महाराष्ट्रात तर सेना-युती शासनाच्या वेळी सांप्रदायीक दंगे जवळपास झालेच नव्हते.नरेंद्र मोदींना धर्मनिरपेक्ष लोक शिव्या देत असतात पण १९६९ साली गुजरातमधे २००२ सालपेक्षा कितीतरी मोठी दंगल उसळली होती हे विसरतात्.अनेक दंगली धर्मनिरपेक्ष सत्तेवर असताना झाल्या आहेत तरीही शिवसेना-भाजप सारखे पक्ष सत्तेत आल्यास अराजक माजेल असे एक चित्र निर्माण केले जाते जे साफ चुकीचे आहे.मुळात हिंदुंवरील अन्याय आणि हेटाळणी बंद केली तर आपोआपच या पक्षांचा जनाधार कमी होईल्.पण हे लक्षात न घेता धर्मनिरपेक्ष पक्ष सत्तेत येताच हिंदुविरोध सुरु करतात्.रामसेतुचा मुद्दाही त्यातलाच्. भाजप्-शिवसेना या पक्षांना कम्युनल म्हणने कितपत बरोबर आहे हाही एक मुद्दा आहेच्.धर्मांध मुस्लिम देशविरोधी कारवाया करु शकतो म्हणुन त्यांच्या धर्मांधतेला आळा घालण्याची मागणी कम्युनल कशी ठरते??एका दृष्टीने बघितल्यास कम्युनला शक्तींना सत्तेपासुन दुर ठेवण्याच्या नावाखाली प्सुडोसेक्युलर संधिसाधुपणा करतात्.त्यामानाने शिवसेना-भाजप युती गेले २० वर्ष एका मुद्द्याच्या जोरावर टिकुन आहे.अनेकदा त्यांच्यातले संबंध ताणले गेले पण सत्तेसाठी संधिसाधुपणा करण्यासाठी त्यांनी त्यांच्या तत्वांशी तडजोड टाळली आहे.
- प्रतिक्रिया प्रकाशित करण्यासाठी येण्याची नोंद करा अथवा सदस्य व्हा.
- मुद्रणसुलभ आवृत्ती

मुलायम
हाच हरामखोर, @%$#^%$(या जागा वाचकांनी माझ्या तीव्र भावना लक्षात घेउन आपापल्या वकुबाप्रमाणे भराव्यात) एकदा म्हणाला होता-- दहशतवाद्यांना शिक्षा देउ नका. त्यांच्या घरच्यांना काय वाटेल???????
अर्थात या सगळ्या संधिसाधूपणाची सुरुवात महात्मा(?????) गांधींच्या काळातील काँग्रेसनेच केली आहे.
ह्याच माद***
ह्याच माद*** नि सिमिवरची बंदि उठ्वलि होति त्याच्ये फळ आपण आता भोगतोय...
आन्या
आन्या दमानी घे राजा!!!
कितीहे चिडलास किवा काहीही केलस तरी ही किड एका दिवसात जानारी नाही....
वाळवी सारखी आपल्या लोकशाही ला चिकटली आहे....
त्यावर अगदी पद्धत शीर पणे इलाज करावा लागेल ...
आणी सुरुवात स्वतः पासुन करावी लागेल....
सगळे ह``````` आहेत........
-- ऍनयू उर्फ बैल
~~~ आमची कोठेही शाखा नाही~~~
हिंदुत्त्वाच्या आणि इतर गोंडस नावावर चालणाय्रा हिंसेचं काय?
प्रिय मित्र चिन्या१९८५,
आपला लेख पाहून असं वाटत आहे की आपण शिवसेना, भा.ज.प., सगळे डावे, तेलुगु देसम, अकाली दल, रिपब्लिकन (अनेक) पक्ष, म.न.से. इत्यादी अनेक पक्षांच्या चुका, संधीसाधूपणाकडे दुर्लक्ष केलं आहेत. काही उदाहरणं देत आहे; माझी माहिती खूपच अपूर्ण आहे आणि थोडं विस्मरण यामुळे काहीच उदाहरणं असतील, सगळी नाही:
१. भा.ज.प.: सध्याचा महत्त्वाचा प्रश्न (म्हणे) अणुकरार आहे. याच भा.ज.प.ने पोखरणच्या ९९च्या चाचण्यांनंतर अणुचाचणी बंदी स्वतःहून (भारतावर) घातली आहे. यांनीच अणुकराराची बोलणी आणि प्रक्रिया सुरु केली आणि आता त्याच अणुकराराचा विरोध करत आहेत.
"मंदिर वहीं बनायेंगे" म्हणत सत्तेवर आले, पण मंदिराचं आता नावही काढत नाही. बहुतेक आता मंदिरावर मतं नाही मिळणार (मी मंदिरा बेदीबद्दल बोलत नाही आहे).
"पार्टी विथ डिफरन्स" असं स्वतःबद्दल म्हणवणारे हे हिंदुत्ववादी, जेव्हा लोकसभेत प्रश्न विचारण्यासाठी लाच घेण्याचा मुद्दा आला तेव्हा सगळ्यात शेवटचे होते आपल्या खासदारांवर कारवाई करण्यात!
मला १९६९ च्या कोणत्या दंगली, काय ते माहित नाही, पण म्हणून गोध्राकांड क्षम्य होत नाही. गरोदर बाईचं पोट चिरून तिला ठार मारणं हे आणि असं हिंदुत्व असेल तर मला कृपया कोणीतरी सांगा धर्मत्याग कसा करायचा ते! गरीब, असहाय्य लोकांना देशोधडीला लावणं हेच हिंदुत्व असेल तर मीपण डॉ. आंबेडकरांसारखं म्हणायला तयार आहे, "हिंदु म्हणून जन्माला आले, पण हिंदु म्हणून मरणार नाही." धर्म काय, कशासाठी हा तर वेगळाच मुद्दा आहे पण त्या बाबु बजरंगी सारखे लोक आणि मी एकाच धर्मात जन्माला आलो याचं मला वैषम्य वाटतं.
२. शिवसेना: यांचं विदेशी धोरण काय? या लोकांचं स्वतःचं अणुकराराबद्दल मत काय? हा पक्ष म्हणे, मराठी लोकांसाठी, मातीसाठी जन्माला आला. मग त्यांनी लोकसभेत जाऊन देशातल्या सर्व लोकांना बाधित होतील अशा मुद्द्यांवर मतप्रदर्शन का करावं? लोकसभेचे प्रवक्ते म्हणून हे खासदार उत्तम.
आपण म्हणता तसे धर्माधारित दंगे महाराष्ट्रात युतीच्या राज्यात झाले नव्हते. पण रमाबाई आंबेडकर नगरात झालेली हिंसा आपण सोयीस्कररीत्या विसरलात की काय? आणि युती सत्तेवर येण्याचं कारण काय होतं ... धर्माधारित दंगे झाले आणि हे लोकं सत्तेची मिठाई खाऊ शकले. आणि या दंग्यांमधे एका शिवसेनेच्या नेत्याने फूस लावली त्याला शिक्षा ठोठावली आहेच ... बाकीच्यांचं काय ते पाहूच! हे हिंदुत्ववादी सत्तेत येण्यासाठी दंगली करतात, करवतात, देवळं पाडतात, बांधायच्या गोष्टी करतात आणि सत्तेत आले की मढ्याच्या टाळूवरचं लोणी खातात. लोणी खाण्यातच सगळा वेळ गेला की दंगली करायला वेळ मिळत नाही आणि त्याची गरजच नसते.
३. डावे: वाजपयी सरकारच्या काळात अणुचाचण्या झाल्यावर या लोकांनी त्याचा निषेध केला होता. आता का बोंब मारतात की हा अणुकरार केला तर आपल्याला अणुचाचण्या करता येणार नाहीत म्हणून?
प. बंगालमधे किती लोकशाही आहे आणि किती ठोकशाही हा संशोधनाचा विषय ठरेल; तिकडे खेड्यांमधे म्हणे, "डाव्यांना मत नाही दिलं तर तुम्ही खपलात, पुन्हा घरी/गावी जायचं नाव काढता येत नाही" ... हे मी एका अनुभवी बंगाल्याकडून ऐकलं आहे.
४. रिपब्लिकन: मी काय बोलणार यांच्याबद्दल ... नियमितपणे पेपर वाचणाय्रा माणसाला मी काही अधिक सांगायची गरज नाही, या लोकांच्या निष्ठा कशा, कधी बदलतात ते!
आणि अशी अनेक उदाहरणं देता येतील. पण माझा मुख्य मुद्दा तो पण नाही आहे! धर्म हेच सर्वस्व आहे का? आज आपल्या देशासमोर धर्म हाच एकमेव प्रश्न आहे का? गरीबी, बेकारी, निरक्षरता, हुंडाबळी, संपत्तीचं आणि संधींचं असमान वाटप, लोकसंख्येची भरमसाठ वाढ, इतर सामाजिक-आर्थिक समस्या गेला बाजार ग्लोबल वॉर्मिंगही यांचं काय झालं हो? सगळे लोक धर्मपरायण हिंदु झाले तर या समस्या सुटणार आहेत का? आपलं इथलं घेतलेलं नाव पाहून माझा अंदाज की आपला १९८५ सालचा जन्म असावा! वयाच्या २२-२३ व्या वर्षी (खरंतर कोणत्याही वयात) आपण (प्रत्येकानेच) हिंदुत्व, धर्मनिरपेक्षता, pseudo-secularism यांचा विचार करावा का गरीबी, बेकारी, ग्लोबल वॉर्मिंग इत्यादी समस्या सोडवण्यासाठी आपण काय करु शकतो याचा??
धर्म हेच सर्वस्व असेल तर माझ्या माहितीप्रमाणे एक गोष्ट सांगते. तेव्हाच्या भारतात जोपर्यंत इतर धर्माचे लोक आले नव्हते तोपर्यंत तेव्हाच्या लोकांना धर्म ही चीज काय असते तेच माहित नव्हतं. ते जास्त सुखात रहात असतील या कट्टर हिंदुत्ववाद्यांपेक्षा!
आजच्या काळातलं एक राजकीय सत्य आहे, "फोडा आणि राज्य करा." चिन्या आणि संहिताची, हिंदू आणि मुसलमानांची, उच्चवर्णीय आणि बहुजनांची जुंपवून द्यायची आणि आपण सत्तेचा आणि त्या अनुषंगाने येणाय्रा पैसा, ताकद यांचा उपभोग घ्यायचा. आपल्यासाठी (तुम्ही, मी, आपण सर्व) हेच चांगलं आहे की आपण वेळेत डोळे उघडायचे आणि दुसय्रांचंही शक्य तेवढं प्रबोधन करायचं.
बघा विचार करा. पटलं तर ठीक आहे नाहीतर बॅण्डविड्थ / स्टोरेज-स्पेस फुकट घालवली म्हणून मला बोल लावा.
आणि मिसळपावाचा आनंद लुटा.
संहिता.
यांनीच
यांनीच अणुकराराची बोलणी आणि प्रक्रिया सुरु केली आणि आता त्याच अणुकराराचा विरोध करत आहेत.
यावर त्यांचे उत्तर आहे भारताच्या अण्विकअस्त्र सज्जतेवर टाच येत असेल तर हा करार मान्य नाही. कदाचित त्यानीच बोलणी सुरू केलेल्या कराराला विरोध का आहे ते समजून घेता येईल.
"मंदिर वहीं बनायेंगे" म्हणत सत्तेवर आले, पण मंदिराचं आता नावही काढत नाही. बहुतेक आता मंदिरावर मतं नाही मिळणार .
हा मुद्दा पटला. "पार्टी विथ डिफरन्स" असं स्वतःबद्दल म्हणवणारे हे हिंदुत्ववादी, जेव्हा लोकसभेत प्रश्न विचारण्यासाठी लाच घेण्याचा मुद्दा आला तेव्हा सगळ्यात शेवटचे होते आपल्या खासदारांवर कारवाई करण्यात!
हे मुद्दे पटले.
मला १९६९ च्या कोणत्या दंगली, काय ते माहित नाही, पण म्हणून गोध्राकांड क्षम्य होत नाही. गरोदर बाईचं पोट चिरून तिला ठार मारणं हे आणि असं हिंदुत्व असेल तर मला कृपया कोणीतरी सांगा धर्मत्याग कसा करायचा ते! गरीब, असहाय्य लोकांना देशोधडीला लावणं हेच हिंदुत्व असेल तर मीपण डॉ. आंबेडकरांसारखं म्हणायला तयार आहे, "हिंदु म्हणून जन्माला आले, पण हिंदु म्हणून मरणार नाही." धर्म काय, कशासाठी हा तर वेगळाच मुद्दा आहे पण त्या बाबु बजरंगी सारखे लोक आणि मी एकाच धर्मात जन्माला आलो याचं मला वैषम्य वाटतं
गोध्र्याची रेल्वे जाळली तेव्हा तिथे ३००० लोकांचा जमाव त्यात सामिल होता. त्या जमावामुळे आगीचा बंब पोचण्यात अडथळे आले आणले गेले. आता हा ३००० लोकांचा जमाव काय फक्त गावगुंडांचा होता का? गोध्र्यातले गरीब बिचारे लोक आले होतेच ना रेल्वे जाळायला?
बाकी हींदू धर्मत्याग करायचा असेल तर हरकत नाही पण मग कोणता धर्म घेणार? सगळीकडे या गोष्टी अशाच आहेत. आणि भारतात तरी धर्म जन्मावरूनच ठरतो जोपर्यंत तुम्ही आहे तो बदलून दुसरा स्वीकारत नाही तो पर्यंत.
पण रमाबाई आंबेडकर नगरात झालेली हिंसा आपण सोयीस्कररीत्या विसरलात की काय?
) . ती युती सरकारने घडवून आणली असे म्हणायचे आहे का? असे म्हणणे म्हणजे बुशनेच वर्ल्ड ट्रेड सेंटर पाडविले असे म्हणण्यासारखे आहे.
पोलिसांच्या गोळीबारासाठी युती सरकारला दोष देता येईल. पण मग त्याच्यानंतर पुणे, मुंबई, औरंगाबाद इथे झालेली हिंसा तुम्ही विसरलात का काय?माझ्या लक्षात आहे चांगली(कारण माझ्या शाळेला २ दिवस सुट्टी मिळाली होती
या दंग्यांमधे एका शिवसेनेच्या नेत्याने फूस लावली त्याला शिक्षा ठोठावली आहेच ...
हो पण त्याच वेळेला प्रक्षोभक भाषणे करणार्या कोणत्याही मौलवीला अटक झाल्याचे ऐकिवात नाही. किंवा वेळोवेळी प्रक्षोभक भाषणे करणार्या जामा मशिदिच्या इमामावरही कारवाई झाल्याचे ऐकिवात नाही. किंवा भिवंडीला २ पोलिस कर्मचार्याना दगडाने ठेचून मारणार्यांवरही काही कार्यवाही झाल्याचे दिसत नाही.
धर्म हेच सर्वस्व आहे का?
हो आहे. भारतात तरी. गेल्या १००० वर्षाचा इतिहास तरी तसा आहे.
गरीबी, बेकारी, निरक्षरता, हुंडाबळी, संपत्तीचं आणि संधींचं असमान वाटप, लोकसंख्येची भरमसाठ वाढ, इतर सामाजिक-आर्थिक समस्या गेला बाजार ग्लोबल वॉर्मिंगही यांचं काय झालं हो?
तसेच हुंडाबळी रोखण्यासाठी हुंडा न घेण्याचे ठरवले
इतर आर्थिक समस्या निवारण करता येतील कदाचित पण सामाजिक समस्या कशा निवारण करणार. सामाजिक समस्याविरहीत समाज कुठे अस्तित्वात असेल असे वाटत नाही.
तुम्ही काय केलेत?
त्यासाठी मी हापिसात जाणे येणे सोडून इतर सर्व ठीकाणी सायकल ने येणे जाणे चालू केले.
पुण्याचे पेशवे
.
.
पुण्याचे पेशवे
व्वा क्या बात है !!!
सुंदर प्रतिसाद !!!
बरोबर आहे
बरोबर आहे पेशवे आणि बिरुटे
+१
संहिताजी, अतिशय सुंदर प्रतिसाद.
असेच म्हणते.
संहिता, अतिशय अप्रतिम, संयत आणि मुद्देसूद प्रतिसाद.
धन्यावाद
धन्यावाद दोन्हीही आन्या आणि संहिता.
संहिता,तुमच्या प्रश्नांना उत्तरे देतो.
याच भा.ज.प.ने पोखरणच्या ९९च्या चाचण्यांनंतर अणुचाचणी बंदी स्वतःहून (भारतावर) घातली आहे
अशी कुठलीही बंदी नाहीये.त्यांनी परदेशी दबावाला न झुकता अणुचाचण्या घेतल्या ही मोठी गोष्ट आहे.
बहुतेक आता मंदिरावर मतं नाही मिळणार
आघाडीच्या राजकारणामुळे हे शक्य नाहीये.मंदिर बनवायच असेल तर भाजप्-शिवसेनेला लोकसभेत २७२ खासदार निवडुन आणावे लागतील.
जेव्हा लोकसभेत प्रश्न विचारण्यासाठी लाच घेण्याचा मुद्दा आला तेव्हा सगळ्यात शेवटचे होते आपल्या खासदारांवर कारवाई करण्यात
हो.पण कारवाई तर केली ना!!!
बाईचं पोट चिरून तिला ठार मारणं हे आणि असं हिंदुत्व असेल तर मला कृपया कोणीतरी सांगा धर्मत्याग कसा करायचा ते!
हा आक्षेपच मुळात चुकीचा आहे. आणि याचा आणि हिंदु धर्माचा काय संबंध्???आणि एका माणसाने अशी चुक केली म्हणुन तुम्ही धर्मत्याग करणार असाल तर जगातला एकही धर्म तुम्ही स्विकारु शकणार नाही.आणि हे काम मुस्लिम करत नाहीत का???आमच्या एका ओळखीच्यांनी भिवंडीच्या दंगलीत मुस्लिम माणसाने हिंदु गरोदर बाईचे पोट फाडताना बघितले होते.या गोष्टी दोन्हीकडुन होतात्.आणि ख्रिश्चनांनी 'विच हंट' च्या नावाखाली कित्येक हजारो महीलांची कत्तल केलेली आहे याचीही माहीती मिळवा. काफीराला मारल्याने मुस्लिमाला स्वर्ग मिळतो असे म्हणतात तर विचेस ना मारण्याने सतन विरुध्द जाउन ख्रिस्ताच्या राज्याला आवश्यक आहे असे चर्च म्हणे. हिंदु धर्मात तरी तुम्ही मुस्लिमाला मारा म्हणजे तुम्हाला स्वर्ग्,आध्यात्मिक प्रगती मिळेल असे कुठेही लिहिलेले नाही . हिंदु सामाजिक कारणांनी मारतो तर मुस्लिम्,ख्रिश्चन धार्मिक कारणांनी मारतात्.म्हणुनच इराकच्या युध्दाला 'क्रुसेड्सचे युध्द' म्हटले होते बुशने.त्यामुळे बाईच्या पोट चिरण्यावरुन धर्मत्याग करणार असाल तर तो बालिशपणा आहे. गोध्रामधे जर २००० मुस्लिमांनी ट्रेनचा डबा जाळला त्यामुळे दंगली भडकल्या. हिंदुंनी शांतपणे जळाव पण प्रतिकार करु नये असे तुम्हा धर्मनिरपेक्षांचे मत आहे.
धर्म काय, कशासाठी हा तर वेगळाच मुद्दा आहे पण त्या बाबु बजरंगी सारखे लोक आणि मी एकाच धर्मात जन्माला आलो याचं मला वैषम्य वाटतं.
जगातला कुठलाही धर्म सांगा ज्यात स्त्रीयांचा खुन करणारे जन्माला आलेले नाहीत. आमच्या धर्मात त्या खुन्याला प्रोत्साहन तरी मिळत नाही.इतर ठिकाणी तर त्यांना स्वर्गात जागा मिळते.
यांचं विदेशी धोरण काय?
कुठल्याही परकीय शत्रुला दयामाया न दाखवण व मित्राला मदत करण हे त्यांच परकीय धोरण आहे.
या लोकांचं स्वतःचं अणुकराराबद्दल मत काय?
अणुकरार देशाच्या हिताचा आहे पण हाईड ऍक्टकडे दुर्लक्ष केले जाउ नये.
मग त्यांनी लोकसभेत जाऊन देशातल्या सर्व लोकांना बाधित होतील अशा मुद्द्यांवर मतप्रदर्शन का करावं?
म्हणजे मला नक्की कळल नाही तुम्हाला काय म्हणायचय ते.
पण रमाबाई आंबेडकर नगरात झालेली हिंसा आपण सोयीस्कररीत्या विसरलात की काय?
मी जवळपास म्हटल होत्.काँग्रेसच्या राज्यात याहुन मोठ्या दंगली झाल्या आहेत.
धर्माधारित दंगे झाले आणि हे लोकं सत्तेची मिठाई खाऊ शकले.
हिंदुंच्या रक्षणार्थ ते उतरले त्याचा त्यांना राजकिय फायदा झाला.
या दंग्यांमधे एका शिवसेनेच्या नेत्याने फूस लावली त्याला शिक्षा ठोठावली आहेच
गणपतीच्या मंदिरात जाउन मुस्लिमांनी गणपतीची मुर्ती तोडल्यावर शिवसेनेच्या नेत्यांनी अजुन ४-५ मंदिर खुली करुन 'इथलिही मुर्ती तोडा' असे आवाहन मुस्लिमांना करायला हवे होते काय??
सत्तेत आले की मढ्याच्या टाळूवरचं लोणी खातात.
बेसलेस विधान आहे हे. अहो मुस्लिमांनी मुंबईत दंगलीची आधीच तयारी केली होती. शिवसेना होती म्हणुन मुंबईत हिंदु वाचला.
डावे: वाजपयी सरकारच्या काळात अणुचाचण्या झाल्यावर या लोकांनी त्याचा निषेध केला होता
डाव्यांबद्दल मला काडीचाही आदर नाही.ते चीनचे एजंट्स आहेत.
धर्म हेच सर्वस्व आहे का?
जोपर्यंत हिंदुंची त्यांच्याच देशात हेटाळणी होतेय तोपर्यंत हे होणारच.रामाच्या जन्माचा पुरावा का लागावा???अयोध्येतील एक मशिद मुस्लिमांनी हिंदु बांधवांना दिल्यास काय बिघडते???रामसेतु का तोडला जातो जेंव्हा की त्या प्रकल्पामुळे फारसा फायदा नाही हे स्पष्ट आहे???
तुम्ही मुस्लिम्,ख्रिश्चन्सना का नाही हे सांगत्???आम्हालाच हे लेक्चर्स का मिळतात??
यांचा विचार करावा का गरीबी, बेकारी, ग्लोबल वॉर्मिंग इत्यादी समस्या सोडवण्यासाठी आपण काय करु शकतो याचा??
या गोष्टी वेगवेगळ्या आहेत. तुम्ही हिंदुत्व करुनही गरीबी,बेरोजगारी,ग्लोबल वॉर्मिंग या समस्यांसाठी प्रयत्न करु शकता. हिंदुत्व यांच्याविरुध्द थोडीच आहे??
तोपर्यंत तेव्हाच्या लोकांना धर्म ही चीज काय असते तेच माहित नव्हतं.
मिशिनरीजनी तुमच्या मनात भरवलेल हे खुळ आहे. ऋग्वेदाच हस्तलिखित या परकीय धर्मांचा जन्मही झालेला नव्हता त्याच्या कित्येक हजारो वर्षांआधीपासुन आहे(सध्या वर्ल्ड हेरीटेजमधे आहे).जैन्,बुध्द धर्म हिंदु धर्माबरोबरच या देशात परकीय येण्यापुर्वीपासुन आहेत.
अशी
अशी कुठलीही बंदी नाहीये.त्यांनी परदेशी दबावाला न झुकता अणुचाचण्या घेतल्या ही मोठी गोष्ट आहे.
अणुचाचण्या घेतल्या ही खरंच मोठी गोष्ट आहे. आणि त्या झाल्यानंतर लगेचच स्वतःहून बंदी घोषित केली ही त्याहूनही मोठी गोष्ट आहे. माझा आक्षेप त्याला नाही आहे. माझा आक्षेप आहे तो अणुकराराचं राजकारण करण्यावर!
(मी त्याही पुढच्या काही गोष्टी सांगते: सुवर्ण-चतुष्कोन प्रकल्प, नदी-जोड प्रकल्प आणि असे इंफ्रस्ट्रक्चरचे (याला मराठी शब्द काय?) चांगले प्रकल्प वाजपयी सरकारने सुरु केले आहेत म्हणूनही अमेरीकन मंदीची झळ आपल्याला कमी बसली आहे, आणि भविष्यातही अशा संकटात कमी परिणाम होईल.
माझा कोणत्याही एका पक्षाला ना विरोध आहे ना मी कोणा एका पक्षाची प्रवक्ती आहे. चांगल्या गोष्टी चांगल्याच असतात, आणि वाईट गोष्टी वाईट)
हा आक्षेपच मुळात चुकीचा आहे. आणि याचा आणि हिंदु धर्माचा काय संबंध्???आणि एका माणसाने अशी चुक केली म्हणुन तुम्ही धर्मत्याग करणार असाल तर जगातला एकही धर्म तुम्ही स्विकारु शकणार नाही.
कोणाला (साला) इथे धर्म हवाय? चांगलं, निर्मळ, आनंदी आयुष्य जगण्यासाठी धर्माची काहीही आवश्यकता आहे असं मला तरी वाटत नाही.
या धर्मावरून भांडणच होताना दिसत आहेत. मंदिर बांधायचं का नाही याचा माझ्या रोजच्या आयुष्याशी काय संबंध? तिथे रामाच्या (किंवा कोणाच्याही) नावानी शाळा, दवाखाना, संशोधन संस्था सुरु करणार असतील तर मी आज, आत्ता उठून त्यांचं भरीव समर्थन करेन. अरे, या देशात कोट्यवधी लोकांना दोन वेळचं नीट खायला मिळत नाही त्यांचा विचार करायचा का मंदीराचा? मंदीरावर पैसे खर्च करायचे का गरीबांच्या उन्नतीवर?
आज आपल्याला दोन वेळचं खायला नीट मिळत असणार म्हणूनच आपल्याला धर्म सुचतोय! उपाशीपोटी कसला आलाय धर्म आणि कसला राम आणि कसला रहीम?
हे काम माझ्यासारखी तुच्छ लोक नाही करू शकत. त्यासाठी राजकीय, सामाजिक वजन लागतं. ज्यांच्याकडे ते आहे ते मंदीर आणि सेतूचं राजकारण करतात याचं दु:ख होतं.
जगातला कुठलाही धर्म सांगा ज्यात स्त्रीयांचा खुन करणारे जन्माला आलेले नाहीत. आमच्या धर्मात त्या खुन्याला प्रोत्साहन तरी मिळत नाही.इतर ठिकाणी तर त्यांना स्वर्गात जागा मिळते.
मी कोणताही धर्मग्रंथ वाचला नाही आहे. (आपण कुराण, बायबल, अवेस्ता का काय असतं पारश्यांचं ते, आणि इतर ग्रंथ वाचले असावेत असं मानून) आपल्या माहितीबद्दल मला आदर आहे. जगात एकही धर्म नाही ज्यात स्त्रिया, बालकं, गरीब यांचा खून झाला नाही आहे. "अश्वं नैव, गजं नैव, व्य्राघ्रं नैवच नैवच | अजापुत्रं बलिं दद्यात दैवो दुर्बल घातकः" असं आम्हाला शाळेत शिकवलं.
असो. मुद्दा असा आहे की हे सगळे फासिस्ट लोकं तेव्हा एक होऊन बाबू बजरंगी आणि अशा लोकांच्या विरोधात का नाही बोलले? तेव्हा का गुळणी तोंडात असल्याचा आव आणला? मोदींवर एवढे आरोप झाले गोध्राकांडावरून, एकदाही त्यांनी आपण निर्दोष असण्याचा पुरावा का नाही दिला? का नाही त्या स्टिंग ऑपरेशननंतर या पकडल्या गेलेल्या लोकांचा धिक्कार केला?
ख्रिश्चनांनी 'विच हंट' च्या नावाखाली कित्येक हजारो महीलांची कत्तल केलेली आहे याचीही माहीती मिळवा.
आज याच ख्रिश्चनांची बहुसंख्या असणारा युरोप कुठे आहे, काय करतो, त्यांची मतं काय याची आपणास किती माहिती आहे मला माहीत नाही. पण तिथे कोट्यवधी लोक उपाशी, अर्धपोटी जगत नाहीत. ऑस्ट्रेलियात एकेकाळी तिथल्या मूळ "माओरी" लोकांवर अत्याचार झाले त्याबद्दल पोप बेनेडिक्ट स्वतःच्या आणि चर्चच्या वतीने आजही बिनशर्त माफी मागतात. हिंदूंना पोप नाही; पण काही शंकराचार्य आहेत. त्यांची प्रतिक्रिया आजपर्यंत तरी माझ्या वाचनात नाही. आपल्याला माहिती असल्यास कृपया उपलब्ध करून द्या.
मी जवळपास म्हटल होत्.काँग्रेसच्या राज्यात याहुन मोठ्या दंगली झाल्या आहेत.
पुन्हा तोच मुद्दा! दुसय्राकडे बोट दाखवलं की आपण दोषमुक्त होऊ शकत नाही. आणि कोणत्या मोठ्या दंगली? जरा जास्त माहिती मिळेल का?
गणपतीच्या मंदिरात जाउन मुस्लिमांनी गणपतीची मुर्ती तोडल्यावर शिवसेनेच्या नेत्यांनी अजुन ४-५ मंदिर खुली करुन 'इथलिही मुर्ती तोडा' असे आवाहन मुस्लिमांना करायला हवे होते काय??
तुम्ही फारच टोकाची भूमिका घेता बाबा! गणपतीची पुनर्स्थापना करून "आतातरी सर्वांना सुबुद्धी, शांतता लाभो," एवढं बोलून शांत बसता आलं असतं.
पण गांधीजींच्याप्रमाणे आपण सुचवता तसंही म्हणता आलं असतं.
आता इथेच कोणीतरी "संहिताची अक्कलशुन्य टिका" असं म्हटलंय. यावर मी एवढंच म्हणेन, "मला अक्कलच नाही तर मी अक्कलपूर्ण टीका कशी काय करणार? थोडी अक्कल उधारीवर किंवा विकत द्याल तर मी जरा विचार करेन म्हणते." (उपवादः टीका करायला अक्कल लागत नाही. उचललं बोट आणि छापलं काहीबाही असं करता येतं.)
गोध्रामधे जर २००० मुस्लिमांनी ट्रेनचा डबा जाळला त्यामुळे दंगली भडकल्या. हिंदुंनी शांतपणे जळाव पण प्रतिकार करु नये असे तुम्हा धर्मनिरपेक्षांचे मत आहे.
मग पोलीस आणि न्यायालयांचं काम काय यावर जरा माझ्या (बेअक्कल) डोक्यात जरा कृपया उजेड टाका.
आणि दुसय्राने गाय मारली म्हणून आपण वासरू मारू नये अशी म्हण हिंदु धर्मातल्या गायीच्या पावित्य्रावरूनच आली आहे ना?
जे जळले ते तर जिवानिशी गेले. त्यांचा सूड घेण्याचा हक्क या दंगलखोरांना (जन्माचा पुरावा न देऊ शकणाय्रा) रामानी स्वप्नात येऊन दिला का? आणि काय त्या मेलेल्या गरोदर बाईने यांना पेटवण्यात भाग घेतला होता का? तिला का हकनाक शिक्षा झाली? त्या न जन्मलेल्या जीवानी काय बिघडलवलं होतं हो कोणाचं? तो का गेला जीवानिशी??
डाव्यांबद्दल मला काडीचाही आदर नाही.ते चीनचे एजंट्स आहेत.
काही पुरावा का हे पण रामाच्या जन्मासारखंच? सगळे म्हणतात म्हणून मी पण म्हणणार?
रामसेतु का तोडला जातो जेंव्हा की त्या प्रकल्पामुळे फारसा फायदा नाही हे स्पष्ट आहे???
रामसेतू ही मानवनिर्मित वास्तू नाही आहे. (आत्ता माझ्या तोंडावर पुरावा नाही; पण शोधण्याची तसदी घेऊ शकते मी.) ती रचना तोडायची अशासाठी की त्यामुळे भारतातच इंधन वाचेल. श्रीलंकेला वळसा घालून जी जहाजं येतात त्यांना सरळच पाल्कच्या सामुद्रधुनीमधून येता येईल. यातून ग्लोबल वॉर्मींगही कमी होईल. आणि तुम्हाला देव-धर्म हवे आहेत का सबंध पृथ्वीवरचे सजीव प्राणी, माणूस पकडून?
तुम्ही हिंदुत्व करुनही गरीबी,बेरोजगारी,ग्लोबल वॉर्मिंग या समस्यांसाठी प्रयत्न करु शकता. हिंदुत्व यांच्याविरुध्द थोडीच आहे??
मान्य! पण आपले हे (म्हणे) हिंदुत्ववादी पक्ष तर काही नाही करत आहेत पर्यावरणासाठी! (पुन्हा माझी माहिती आपल्यापेक्षा कमी असेल तर मला माहिती देऊन उपकृत करा).
आघाडीच्या राजकारणामुळे हे शक्य नाहीये.मंदिर बनवायच असेल तर भाजप्-शिवसेनेला लोकसभेत २७२ खासदार निवडुन आणावे लागतील.
मिशिनरीजनी तुमच्या मनात भरवलेल हे खुळ आहे.
मी आत्तापर्यंत एकाही मिशिनय्राला भेटलेले नाही आहे. आणि मी मनाने नाही विचार करत.
ऋग्वेदाच हस्तलिखित या परकीय धर्मांचा जन्मही झालेला नव्हता त्याच्या कित्येक हजारो वर्षांआधीपासुन आहे(सध्या वर्ल्ड हेरीटेजमधे आहे).
ऋग्वेद हा हिंदूंचा धर्मग्रंथ आहे याची मला कल्पना नव्हती. (आणि अजूनही माझा यावर विश्वास नाही). मी स्वतः जोपर्यंत तो वाचत नाही किंवा कोणी जाणकार माणूस त्यात काय आहे ते सांगत नाही तोपर्यंत ते का मान्य व्हावं?
आणि कृपया धर्म म्हणजे काय हे आपण मला सांगाल का? मला खरोखरच हा मोठा प्रश्न पडला आहे. या लेखाच्या निमित्ताने तो पुन्हा डोकं वर काढायला लागला आहे.
जैन्,बुध्द धर्म हिंदु धर्माबरोबरच या देशात परकीय येण्यापुर्वीपासुन आहेत.
मान्य!
आघाडीच्या राजकारणामुळे हे शक्य नाहीये.मंदिर बनवायच असेल तर भाजप्-शिवसेनेला लोकसभेत २७२ खासदार निवडुन आणावे लागतील.
आणि त्यानंतर सगळे (किमानपक्षी हिंदुतरी) सुखात रहातील का? "मंदिर बनवायच" हा अजेंडा मायावतींना पंतप्रधान व्हायचंय म्हणून ब.स.पा.ला मतं द्या एवढाच पोकळ आणि तकलादू आहे.
संहिता हिंदू आहे का ?
असेल तर..... हिंदु धर्माला तिच्या सारख्या स्वधर्मिय लोकांच्या विचाराची वाळवी लागली आहे....ति प्रथम साफ करायला हवि....
मी हिंदू आहे का नाही असल्या फडतूस प्रश्नांनी आपण व्यथित होऊ नका. वाळवी, राम-मंदीर, सेतूसमुद्रम सारख्या जास्त महत्त्वाच्या गोष्टी, प्रश्न अजून सुटायचे बाकी आहेत.
संहिता
अवांतरः या चर्चेत फार वेळ जात आहे माझा, टंकलेखन करण्यात. जर मी उत्तर दिलं नाही तर याचा अर्थ एवढाच की मी पृथ्वीबाहेरच्या अंतराळातील विश्वाला या धर्म, भाजप वगैरे गोष्टींपेक्षा जास्त महत्त्व देत आहे.
संहिता
अरे, या
अरे, या देशात कोट्यवधी लोकांना दोन वेळचं नीट खायला मिळत नाही त्यांचा विचार करायचा का मंदीराचा?
मशिदी आणि चर्चेस बद्दल हे वक्तव्य का येत नाही???ख्रिश्चन्स भारतात फक्त ३% आहेत तरी त्यामानाने चर्चेस प्रचंड आहेत. हा सगळा पैसा कुठुन येतो???
तिथे रामाच्या (किंवा कोणाच्याही) नावानी शाळा, दवाखाना, संशोधन संस्था सुरु करणार असतील तर मी आज, आत्ता उठून त्यांचं भरीव समर्थन करेन.
हो.तिथे शाळा,दवाखानेही सुरु होतील्.तुम्हाला माहीत नसाव पण या देशातील अनेक मंदिर शाळा,दवाखाने,अन्नदान इत्यादी अनेक प्रकारचे समाजकार्य करतात.
उपाशीपोटी कसला आलाय धर्म आणि कसला राम आणि कसला रहीम?
कालच तुम्हाला पेशव्यानी विचारल होत त्याप्रमाणे मीही विचारतो की तुम्ही यासाठी काय केलय्???तुम्ही काहीच चैन करत नाही का??ती चैन करण्याआधी तुम्ही उपाशी ,गरीबांचा विचार करत नाही का???मिसळपावचा आस्वाद घेण्यापुर्वी हा विचार का नाही येत??
हे सगळे फासिस्ट लोकं तेव्हा एक होऊन बाबू बजरंगी आणि अशा लोकांच्या विरोधात का नाही बोलले
त्या बाबु बजरंगीने कशावरुन सत्यच सांगितल???त्याने थापा कशावरुन नाही टाकल्या???आणि त्याला कोणी समर्थन केल्याचही आठवत नाहीये.
मोदींवर एवढे आरोप झाले गोध्राकांडावरून, एकदाही त्यांनी आपण निर्दोष असण्याचा पुरावा का नाही दिला?
पुरावा काय द्यायचाय त्यात्???प्रकरण न्यायालयात आहे.त्यामुळे असे पुरावे बाहेर दिले तर न्यायालयाचा अवमान होतो.
न्यायालयात ते पुरावा देतीलच
का नाही त्या स्टिंग ऑपरेशननंतर या पकडल्या गेलेल्या लोकांचा धिक्कार केला?
त्या स्टिंग ऑपरेशनच्या विश्वासार्हतेची तुम्ही काय तपासणी करुन पाहीली???दिसल की ठेवला विश्वास्.त्या स्टींग ऑपरेशनमधे एका मनुष्याला 'रिऍलिटी शो' सारखा एक शो करायचाय हे सांगुन त्याला एक स्क्रिप्ट देण्यात आली होती.त्या मनुष्याने स्क्रीप्टमधले डायलॉग्स म्हटले.आणि नंतर त्याने या लोकांवर अब्रुनुकसानीचा दावाही केला आहे.
आज याच ख्रिश्चनांची बहुसंख्या असणारा युरोप कुठे आहे, काय करतो, त्यांची मतं काय याची आपणास किती माहिती आहे मला माहीत नाही.
जे डिव्होट ख्रिश्चन्स आहेत ते प्रचंड कट्टर आहेत. अमेरीकेत एका चर्चने फलक लावला होता चर्चबाहेर 'ओसामा ऍन्ड ओबामा- आर दे ब्रदर्स???'. आणि नंतर म्हटल होत की 'अमेरिकेचा राष्ट्रपती जर नॉन ख्रिश्चन झाला तर काय होईल एव्हढच मला सांगायच होत'. आणि या इतरांचा धर्माला सैतानाकडुन आलेला म्हणणार्या ख्रिश्चनांना इतका पैसा युरोप,अमेरिकाच पुरवतो हे तुम्हाला माहीत नाही काय??
ऑस्ट्रेलियात एकेकाळी तिथल्या मूळ "माओरी" लोकांवर अत्याचार झाले त्याबद्दल पोप बेनेडिक्ट स्वतःच्या आणि चर्चच्या वतीने आजही बिनशर्त माफी मागतात.
पोपने मागच्याच वर्षी तुर्कस्तानला जाण्यापुर्वी 'मुस्लिम धर्म हिंसाचारी धर्म आहे' असे म्हटले होते ज्यावर त्यांनी प्रचंड टिका केली होती. आणि माओरी च काय धरुन बसलाय. 'विच हंट' द्वारे कित्येक हजारो महीलांना जिवंत जाळुन टाकण्यात आल होत चर्चद्वारे.ख्रिश्चन्सने इतिहासात ख्रिस्ती धर्माच्या नावाखाली जितके लोक मारले आहेत त्याच्या कितीतरी कमी लोक सध्याचा 'इस्लामी दहशतवादाने' मारलेले आहेत.
शंकराचार्य आहेत. त्यांची प्रतिक्रिया आजपर्यंत तरी माझ्या वाचनात नाही
त्यांची कुठलीच प्रतिक्रिया कानावर येत नसते.मुख्य म्हणजे शंकराचार्य आणि दंगलींचा काय संबंध???
कोणत्या मोठ्या दंगली? जरा जास्त माहिती मिळेल का?
खैरलांजीच्या वेळी कुठल सरकार होत्???मुंबईतल्या दंगलींच्या वेळी कुठल सरकार होत??पुण्यात काही वर्षांपुर्वी गणपतीच्या मंदिराची वटंबना झाली होती त्यावेळी कुठल सरकार होत???शिखांचे दिल्लीत्,कानपुरात हत्याकांड करणार कुठल सरकार होत???,कश्मिरातल्या हिंदुंना बेघर केल गेल तेंव्हा कुठल सरकार होत्???अशी अनेक उदाहरणे देता येतील.
गणपतीची पुनर्स्थापना करून "आतातरी सर्वांना सुबुद्धी, शांतता लाभो," एवढं बोलून शांत बसता आलं असतं
अस केल्यानी मुस्लिमांनी शांतता राखली असती तर या देशात कधीच दंगली झाल्या नसत्या.मुळात मंदिरात घुसुन मुर्ती तोडलीच का???मागच्या वर्षी गणपतीत खामगावमधे दंगल उसळली.कारण काय तर मुस्लिमांनी मागणी केली की विसर्जन मिरवणुक थांबवा कारण तांच्या नमाजाचा टाइम होतोय. ती थांबली नाही तर मुस्लिमांनी मिरवणुकीवर हल्ला केला. हा काय माज्???आम्ही तुम्हाला म्हणतो का की गणेशोत्सव आहे तुम्ही नमाज थांबवा???
मग पोलीस आणि न्यायालयांचं काम काय यावर जरा माझ्या (बेअक्कल) डोक्यात जरा कृपया उजेड टाका.
पोलिसांच काम पोलिस करत नाहीत म्हणुन लोकांना शस्त्र हातात घ्याव लागत्.भिवंडीत पोलिसांना अमानुषपणे मुस्लिमांनी मारुन टाकल तरी अजुनही काहीही झालेल नाहीये.
आणि काय त्या मेलेल्या गरोदर बाईने यांना पेटवण्यात भाग घेतला होता का? तिला का हकनाक शिक्षा झाली?
रेल्वेच्या डब्यात बसलेल्या भाविकांची मुस्लिमांना काय त्रास दिला होता???त्यांना हकनाक शिक्षा का झाली??
रामसेतू ही मानवनिर्मित वास्तू नाही आहे.
मुर्खपणाच विधान आहे हे. तो मानवनिर्मित आहे का नाही यावर अजुन संशोधनच झालेल नाहीये.ऐतिहासिक पुराव्यांअंती तो मानवनिर्मित आहे हे स्पष्ट होते.
श्रीलंकेला वळसा घालून जी जहाजं येतात त्यांना सरळच पाल्कच्या सामुद्रधुनीमधून येता येईल.
आजची जी अवाढव्य जहाज आहेत ज्यांचा वापर अतिशय मोठ्या प्रमाणात आहे ती जहाज तिथुन जाउ शकत नाहीत्.त्यांना लंकेला वेढा घालुन यावच लागणार.
यातून ग्लोबल वॉर्मींगही कमी होईल
तिथुन होणार ट्रॅफिक खुप कमी असणार आहे त्यामुळे ग्लोबल वॉर्मिंगवर काही फारसा फरक पडणार नाही.ग्लोबल वॉर्मिंग कमी करण्यास डीइंडस्ट्रिअलायझेशन आवश्यक आहे .ते कराव का आपण्??त्सुनामीची शक्यता रामसेतु तोडल्याने वाढेल.तुम्हाला कणवला असलेल्या हजारो गरीब कोळ्यांना या प्रकल्पाचा त्रास होणार आहे.म्हणुन त्यांनीही सेतुसमुद्रमला विरोध केलाय..अमेरिकेतल्या जहाज कंपन्यांच्या फायद्यासाठी भारतीय कोळ्यांच्या तोंडातला घास हिरावुन घेण तुम्हाला चालत का???
याबद्दल खालील लेख आवर्जुन वाचा- http://www.rediff.com/news/2007/apr/25tarun.htm?zcc=rl
'The Sethu Samudram does not make nautical sense'- http://www.rediff.com/news/2007/oct/01inter.htm
'Adam's Bridge a man-made structure'- http://specials.rediff.com/news/2007/jul/31slid1.htm
'Widening Ramar Sethu can amplify tsunamis- http://www.rediff.com/news/2007/jun/22inter.htm
'Project won't bring development or employment'- http://www.rediff.com/news/2005/jul/19inter.htm
The purely scientific case for Rama's Bridge- http://www.rediff.com/news/2007/sep/17rajeev.htm
हे सर्व व त्या ठीकाणचे इतर लेख वाचा आणि सांगा काय ते.
हिंदुत्ववादी पक्ष तर काही नाही करत आहेत पर्यावरणासाठी!
काय कराव अस तुम्हाला वाटत??
मी आत्तापर्यंत एकाही मिशिनय्राला भेटलेले नाही आहे.
मग ही खुळचट कल्पना कुठुन आली तुमच्या डोक्यात??
ऋग्वेद हा हिंदूंचा धर्मग्रंथ आहे याची मला कल्पना नव्हती.
म्हणजे वेद हे हिंदुंचे धर्मग्रंथ आहेत हेही तुम्हाला माहीत नाही??
कृपया धर्म म्हणजे काय हे आपण मला सांगाल का?
या देशातल्या लोकांना धर्म म्हणजे काय हे परदेशी येइपर्यंत माहीत नव्हत अस विधान तुम्ही केल होत. त्यामुळे धर्म म्हणजे तुमच काय मत आहे??
जैन्,बुध्द धर्म हिंदु धर्माबरोबरच या देशात परकीय येण्यापुर्वीपासुन आहेत.
मान्य!
म्हणजेच या देशातल्या लोकांना धर्म म्हणजे काय हे परदेशी येण्यापुर्वी माहीत होत.
आणि त्यानंतर सगळे (किमानपक्षी हिंदुतरी) सुखात रहातील का?
सुखाचा आणि याचा काय संबंध्???युरोप्,अमेरिकेत पैसा आहे म्हणजे कुठलीच समस्या नाही असे का??ते सुखात आहेत का???
मोदी, पुरावा वगैरे
जरा वेगळा मुद्दा येथे चर्चेला आणतो... मोदींच्या बाजूने नाही ..
मोदींवर एवढे आरोप झाले गोध्राकांडावरून, एकदाही त्यांनी आपण निर्दोष असण्याचा पुरावा का नाही दिला?
या संदर्भात मोदींच्या बाजूने म्हणून नाही पण योग्य भूमिका म्हणून पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी राज्यसभेत केलेले भाषण आठवले. संदर्भ होता अमेरिकेने मोदींना नाकारलेला "डिप्लोमॅटीक व्हिसा". मूळ भाषण लगेच मिळाले नाही पण रिडीफमधील दुवा मात्र मिळाला. या भाषणामुळे अनेक मोदी विरोधक संस्था/माणसांनी पंतप्रधानांवर टिका केली होती. त्यातील मूळ मुद्दा जो मला महत्वाचा वाटतो तो खाली त्याच शब्दात लिहीतो. (त्यातील ठळक गोष्टी मी मला महत्वाचा वाटणारा मुद्दा म्हणून दाखवत आहे):
"The American government has been informed that while we respect their sovereign right to grant and refuse visa to any person, we do not believe it is appropriate to use allegations or anything less than due legal process to make a subjective judgement," the prime minister said.
हे सांगायचे कारण काय? तर मोदींची चूक जी पंतप्रधान वाजपेयींना वाटली असे त्यांनी सांगीतले ती म्हणजे राजधर्म पाळला नाही ही होती. त्याबद्दल ते जाहीर बोललेपण होते. पण गंमत बघा इंदीरा गांधींच्या हत्येनंतर ३००० शिखांना निर्घृणपणे मारणारी दंगल झाली. त्याबद्दल सबरंग, टेस्टा सेटलवाड वगैरे अथवा तत्सम तत्कालीन सामाजीक नेते काही मानवी हक्काच्या नावाने बोलताना दिसत नाही. पण त्याहून ही आश्चर्य म्हणजे तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी काय म्हणाले होते? - "मोठे झाड पडल्यावर भुकंपासारखे होवून त्याखालील झाडे मरणारच!" ("When a big tree falls, the earth beneath it is bound to shak") पण गंमत पहा त्याबद्दल कोणी विशेष बोलले नाही मिस्टर क्लिन ना!
पण म्हणून माझा आक्षेप दोन गोष्टींना आहे, तुमच्याबद्दलच असे नाही तर एकंदरीत कुठेही:
माझा मुद्दा मी आधी म्हणल्याप्रमाणे मोदींच्या बाजूने म्हणून नाही तर तत्व (वरील दोन मुद्दे) म्हणून मांडला आहे. बाकी चर्चा चालू देत!
विकासराव उत्तम मुद्दा मांडला आहे तुम्ही..
इथे पहा. अशी हिम्मत कोणताही भारतीय सेक्युलर नेता दाखवेल तर त्याची धर्म निरपेक्षता खरी नाहीतर ते निव्वळ ढोंगच. असाच ढोंगीपणा शिखांच्या शिरकाणानंतरच्या राजीव गांधींच्या विधानात दिसतो असे वाटते.
पुण्याचे पेशवे
८४ साली
८४ साली दंगे झाले त्याची तुलना गुजरातच्या दंग्यांशी जशीच्या तशी होऊ शकत नाही. ८४च्या दंग्यांचे कारण हे भारताच्या पंतप्रधानांची निघृण हत्या हे होते. एखाद्या देशाच्या सर्वोच्च नेत्याची हत्या केल्यावर जनक्षोभ उसळणे स्वाभाविक आहे आणि त्यामूळे निर्माण झालेली परीस्थीती आटोक्यात आणणे जास्त कसोटीचे आहे. तरीही काँग्रेस नेत्यांनी दंगे थांबवण्यासाठी काहीही प्रयत्न केले नाहीत हे जरी खरे असले तरी माझ्या महिती प्रमाणे त्यावेळेच्या काँग्रेसला देखिल मिडीयाने चांगले झोडपले होते. (राजीव गांधींचे विधान बेजवाबदार असले तरी त्यांच्या पश्चात सोनिया गांधींनी ह्या बद्दल माफी मागीतली आहे.)
८४ साली काँग्रेसने चुका केल्या म्हणून आज भाजप किंवा इतर कुणाला चुका करायची मुभा मिळत नाही. मोदी सरकारने जे केले ते चूकच (ह्याबाबतीत तुमची सहमती ग्राह्य धरायची का?). त्याबद्दल जर मिडीयाने आवाज उठवला तर तुम्ही ८४ साली कुठे होता? आता गप्प बसा, असे म्हणण्यात काय हशील? निदान आतातरी प्रसार माध्यमांना खरी जाग आली असे म्हणू नये का?
विधाने, हत्या आणि ढोंग.
८४ साली दंगे झाले त्याची तुलना गुजरातच्या दंग्यांशी जशीच्या तशी होऊ शकत नाही. ८४च्या दंग्यांचे कारण हे भारताच्या पंतप्रधानांची निघृण हत्या हे होते. एखाद्या देशाच्या सर्वोच्च नेत्याची हत्या केल्यावर जनक्षोभ उसळणे स्वाभाविक आहे आणि त्यामूळे निर्माण झालेली परीस्थीती आटोक्यात आणणे जास्त कसोटीचे आहे. तरीही काँग्रेस नेत्यांनी दंगे थांबवण्यासाठी काहीही प्रयत्न केले नाहीत हे जरी खरे असले तरी माझ्या महिती प्रमाणे त्यावेळेच्या काँग्रेसला देखिल मिडीयाने चांगले झोडपले होते. (राजीव गांधींचे विधान बेजवाबदार असले तरी त्यांच्या पश्चात सोनिया गांधींनी ह्या बद्दल माफी मागीतली आहे.)
म्हणजे पंतप्रधानाच्या हत्येमुळे झालेला दंगा वेगळा आणि सामान्य माणसांच्या हत्येमुळे झालेला दंगा वेगळा असे म्हणायचे आहे का तुम्हाला. म्हणजे पंतप्रधानाच्या हत्येमुळे झालेली दंगल समर्थनीय आणि माफी मागितल्यामुळे अधिकच समर्थनीय असे का? मग माफी मागणे हे निव्वळ मतांसाठी केलेले ढोंग का वाटू नये. जर ते कुंपण झाड याच्या विधानासोबतच माफीची पुस्ती जोडली असती तर त्याला थोडाफार अर्थ होता असे म्हणता येईल.
प्रसारमाध्यामांबद्दल स्वतंत्र चर्चा करता येईल सदर विषय राजकारण्यांच्या दुटप्पीपणाचा आहे त्यामुळे त्यावर वेगळे लिहीता येईल.
पुण्याचे पेशवे
म्हणजे
होय,जमावाच्या प्रक्षोभाला आवरण्