एक संवाद

Primary tabs

शुचि's picture
शुचि in जनातलं, मनातलं
13 Jan 2014 - 8:54 am

ज्योतिषाचे वावडे असेल त्यांनी दूसरा धागा उघडावा
___________________________________________

"शुचि तुझी मजा आहे बाई नवीन नवीन पार्ट्या अन सोशल इव्हेंट्स नेहमी एन्जॉय करत असतेस. मला तुझा हेवा वाटतो बरेचदा" - कामिनी गेल्या काही महिन्यात तिसर्यांदा मला बोलली.

"कामे हजारदा तुला सांगीतले आहे - कितीका उडले तरी मी खरी किंचित पटकन विशवास न टाकणारी अन संषयीच आहे. तुला माझं "मिथुन" लग्न तेवढं दिसतं अन वृश्चिक स्टॅलिअम मात्र तू सोइस्कर रीत्या विसरतेस." - मी चिडूनच बोलले.

"शुचि तुझा प्रॉब्लेम काय आहे? तुझं मिथुन लग्न मला बरयापैकी आनंदी, फुलपाखरी, स्वच्छंद अन सकारात्मक देणगी वाटते." - कामिनी आपला मुद्दा रेटत म्हणाली.

"कामि तुझ खरे आहे माझा स्वभाव पहिल्या भेटीत खुपसा उथळ, स्वच्छंद अन फुलपाखरी असा तू म्हणतेस तसा भासतो. अन तशा प्रकारच्या स्वभावाकडे आकर्षित होणारे दिव्य लोक माझ्याभोवती रूंजीही घालतात. पण मी काय म्हटले ते तू ऐकलास का नीट? "भासतो" म्हणजे मी तशी आहे असे नव्हे. लगनराशी ही केवळ मुखवटा असते हे मी तुला सांगायला नको. तेवढं ज्योतिष तू ही जाणतेस. दर वेळी पुढे काय होते तुला माहीती आहे - वृश्चिकेच्या स्टलिअम ने आलेली खोली अन इंटेंसिटी लक्षात येताच बरेच जन टर्न ऑफ़ होतात अन पोबारा करतात."

"पण तू तुझी वृश्चिक बाजू दाखवातेसच कशाला?" कामी नी मठ्ठ गुगली टाकला.

"अगं कशाला म्हणजे काय कामे, मी तशीच आहे. त्यामुळे ते कधीना कधी बाहेर येतच. वृश्चिकेच्या कार्कत्वाखाली येणारे बरेच विषय मला हॉट वाटतात. माझा उपाय नाही."

"कोणते विषय?" - कामी विचारती झाली.

"मिस्टीकल, near डेथ, अब्यूस, सेक्शुअलिटी शी निगडीत अशा गंभीर विषयांची यादीच आहे. शिवाय अन्य जलराशीतील ग्रह मदत सोडाच उलट हे विषय हायलाइटच करतात Sad " - मी वैतागने म्हटले.

कामी विचारती झाली - "शुचि मग दुखते कुठे?"

"कामे प्रथमदर्शनी फुलपाखरी स्वभावाला भुललेले लोक जेव्हा एकेक करून काढता पाय घेतात तेव्हा ही मजा बाहेर निघते. अन म्हणे सकारात्मक जगते मी. तुझ्या नानाची टांग." - मी

कामीही तशी हुशार आहे. तिने मार्मिक प्रश्न टाकला - "शुचे कोणी वृश्चिक किंवा जल राशीचा मित्र नाही भेटला का मग?"

"माझ्याबरोबर राहून राहून हुशार झालीएस कामे" मी हसत म्हटले. "तसा एक मित्र सापडलाय अन अजून तरी त्याने सुम्बाल्या केलेला नाहीये. पण मी तुला इतक्यात काहीच सांगणार नाही." - (दात काढत) अस्मादिक!

यावर केस उपटत कामी म्हणाली "हेच हेच तुम्हा जल राशीच्या लोकांचे. अर्धवट सांगून उत्सुकता ताणायची अन मग एकदम गप्प होऊन जायचं.यावर मी म्हणाले "सांगेन गं योग्य वेळ आल्यावर. पण तुझ पटतय आता. I am quite lucky to have this planetary alignment.

कामी नी फ़क्त डोक्याला हात लावला.

ज्योतिषविरंगुळा

प्रतिक्रिया

धन्या's picture

13 Jan 2014 - 9:03 am | धन्या

मिथुन लग्न असलेले ईंटलेक्च्युअल असतात आणि वॄश्चिक लग्न असलेल्यांची कामवासना प्रबळ असते.
(असं मी ज्योतिषावरच्या काही पुस्तकांमध्ये वाचलंय ;) )

Pandit Dhanuresh Kashipande
Bhagyank Jyotish & Vastushastra Salla Kendra
Specialist in Astrology, Gemology & Vastushastra
info.bhagyank@femail.com
1234567890

शुचि's picture

13 Jan 2014 - 9:07 am | शुचि

I have read the same though have no experience ;) since am not either.

प्रभाकर पेठकर's picture

13 Jan 2014 - 10:05 am | प्रभाकर पेठकर

अरे बापरे! फक्तं ज्योतिषशास्त्राच्या अभ्यासकांसाठी दिसतो आहे हा धागा..

पास......

पण किंचीत (नगण्य) का होईना वैश्विक साहीत्यीक मूल्य आहेच की ;)

ज्ञानव's picture

14 Jan 2014 - 8:17 pm | ज्ञानव

सांगून उत्सुकता.....वगैरे

कवितानागेश's picture

13 Jan 2014 - 10:52 am | कवितानागेश

ही कामिनी कन्या राशीची दिसतेय.. :)

शुचि's picture

14 Jan 2014 - 7:30 pm | शुचि

नाही ग तिच्यातही थोडा मिथुनपणा आहेच. प्रश्न बघ ना किती विचारते ;)

तुळ या राशी विषयी काय मत आहे . म्हणतात लय रोमॅन्टिक असते रास ?

संतुलित रास असते. नवरा आहे माझा. सासू च्या कटकटी मी सांगायला लागले की मला बेमालूमपणे, थंड करतो.

ज्ञानव's picture

14 Jan 2014 - 12:06 pm | ज्ञानव

आणि वृश्चिक रास हे डेडली कॉम्बिनेशनच म्हणावे लागेल. कारण मिश्किलपणाच्या आवरणात दडलेली वर्मी घाव घालणारी नांगी फक्त इथेच पाह्यला मिळते.
तूळ रास "लय रोमॅन्टिक"...नाही हो. (आणि तुम्हाला अपेक्षित "लय रोमॅन्टिक"पणा कृत्तिकेचा शुक्र शोधा )

अवांतर " @शुची ह्या धाग्यावर प्रतिक्रिया खरड वहीतून खरडलीत तर आवडेल.

हो का? कृत्तिकेचा शुक्र का? मग तो वृषभेचा की काय?

ज्ञानव's picture

14 Jan 2014 - 8:22 pm | ज्ञानव

सांगून उत्सुकता....वगैरे.
(बाकी आम्ही मेषेत (एकच चरण असून) बरेच पहिले / पाहिल्या आहेत )

असेल. माझं ज्योतिषविषयक ज्ञान नगण्य आहे. पण मला स्वभाव नीरीक्षण खूप आवडते.

ज्ञानव's picture

14 Jan 2014 - 8:41 pm | ज्ञानव

अज्ञान अगाधच आहे.
पण चर्चा करायला आवडते ज्याने ज्ञान वाढेल अशी अपेक्षा....

जल्म १४ फेब्रुवारी चा असल तर रास कंची म्हनायची ?

शुचि's picture

14 Jan 2014 - 7:27 pm | शुचि

सूर्य रास = कुंभ.

खटपट्या's picture

16 Jan 2014 - 4:52 am | खटपट्या

ओके. मग रोजच्या पेपरात जे राशिभविष्य येते ते चंद्र राशीनुसार कि सुर्याराशीनुसार असते ?

मार्कस ऑरेलियस's picture

14 Jan 2014 - 12:53 pm | मार्कस ऑरेलियस

हेच हेच तुम्हा जल राशीच्या लोकांचे. अर्धवट सांगून उत्सुकता ताणायची अन मग एकदम गप्प होऊन जायचं

ही आयडीया भारी आहे ... उगाचच लोकांची क्युरीयॉसीटी ताणायची अन गप्प व्हायचं :-))))

( शिवाय आमची रास कर्क आहे ;) त्यामुले हे करायला नक्की जमेल )

बाबा पाटील's picture

14 Jan 2014 - 1:03 pm | बाबा पाटील

साला आमची व बायकोची दोघांची ही एकच रास आहे हो.पण ती आम्हाला शुद्ध बैल म्हणते हो....!

शुचि's picture

14 Jan 2014 - 7:27 pm | शुचि

हाहाहा :)

गवि's picture

14 Jan 2014 - 2:00 pm | गवि

अशी झोडिअ‍ॅक किलबिल मुलींच्यात खूप ऐकू येत असे. याच्याच इंग्रजी व्हर्शनमधे "ए कसला पक्का लिओ आहे ना हा?!" असे मंजूळ उद्गार ऐकून शिरशिरी की कायशीशी म्हणतात ती यायची. आयाळ उगवल्याचा रुबाब यायचा..इ इ.

पण पोरींचं हे कॉलेजातच संपतं अशी समजूत होती.

छान.

बॅटमॅन's picture

14 Jan 2014 - 2:28 pm | बॅटमॅन

सेम!!!!!!!!!!!!!

बाकी आमच्या मेषराशीबद्दलसुद्धा थोडे लिवा ही इणंती. (गविन्ना न्हवे शुचिमामींना, गविन्ना सुपारी दिली तं मेषपात्र म्हणून वाभाडे काढतील आमचे =)) )

टवाळ कार्टा's picture

14 Jan 2014 - 5:49 pm | टवाळ कार्टा

तु पण "डोक्या"ने विचार करणारा का :)

डायरेक्ट एक घाव दोन तुकडे

बॅटमॅन's picture

14 Jan 2014 - 6:26 pm | बॅटमॅन

काय की बॉ. लोक तरी म्हंटात.

अरे जालावर मेषचे दोघे माहीत आहेत. कसले, वादपटू आहेत. गेस त्यातला एक कोण असेल? ;)

बॅटमॅन's picture

14 Jan 2014 - 8:51 pm | बॅटमॅन

दुसरा कोण आहे ;)

शुचि's picture

14 Jan 2014 - 9:00 pm | शुचि

वा!! चक्कट्फु? वा रे वा!! ;)

शुचि's picture

14 Jan 2014 - 7:46 pm | शुचि

धनयवाद गवि,.

बर्फाळलांडगा's picture

14 Jan 2014 - 6:12 pm | बर्फाळलांडगा

सेन्स!

सर्व प्रतिसादकरत्यांचे आभार.

मिथुन लग्न वाल्यांचा खरोखरच लोच्या असतो नै !! ;)

(मिथुन लग्नवाला)सूड

शुचि's picture

14 Jan 2014 - 7:25 pm | शुचि

माहीत नाही ब्वॉ ;)

तुमचा अभिषेक's picture

15 Jan 2014 - 11:23 pm | तुमचा अभिषेक

कर्क बद्दलही सांगा हो काहीतरी .. म्हणजे रोमान्स वगैरे मध्ये ते कसे असतात.. बरेच जणांच्या तोंडून हि रास मुलांपेक्षा जास्त मुलींना सूट होते असे ऐकून बरेचदा हिरमोड झालाय माझा.. तेवढे तसे करू नका बस्स.. :(

सुबोध खरे's picture

16 Jan 2014 - 10:03 am | सुबोध खरे

मी पण कर्क राशीचा आहे. आमची बायको ते लिंडा गुडमन का कायतरी वाचून हे असंच बोलायची( टिपिकल कैन्सेरियन आहे वगैरे.आमच्या वर्गातील मुलीपण तसे काहीतरी(लिंडा पुराण) बोलत असत पण त्यातली कोणीही तशी (!) पाहण्यासारखी वाटली नाही त्यामुळे लिंडा पुरण वाचले नाही. नाहीतर आमच्या वर्गात IUPAP (international union for pure and applied palmistry) चे सदस्य बरेच होते. मी पण एक दोन मुलींचे हात वाचण्यासाठी हातात घेऊन पहिले आणि बरीच थापाथापी केली होती आणि आश्चर्य म्हणजे त्यांना ती पटली पण होती. पण अशी फसवणूक मनाला न पटणारी होती म्हणून ते सोडून दिले.
पण जगातील सर्व व्यक्ती फक्त १२ स्वभाव प्रकारात कशा वर्गीकृत करता येतील ते मला समजले नाही(आमची बाळबोध शंका). पुढे बायकोने पण तो नाद सोडून दिला असावा(किंवा हा अगदीच हा! आहे म्हणून माझ्याशी बोलत नसावी).