"माझे मन तुझे झाले"

बरखा's picture
बरखा in जनातलं, मनातलं
11 Jan 2014 - 4:39 pm

नमस्कार,
हा विषय लग्नाळु मुलगा आणि मुलगी या॑च्या बद्द्ल आहे. (तशी मी लिखाणात सराईत नाही, पण जे मनात आहे ते मा॑ड्ण्याचा हा प्रयत्न आहे. तरी समस्त मिपाकर आणि मिपा चे टिकाकर यातिल भावना समजुन घेतिल, बाकी टिका॑सहित मिपाकरा॑च्या हाति.) वरिष्ठ आणि अनुभवी व्यक्ति॑नी "लग्न" या विषयी योग्य ते मार्गदर्शन करावे.
माझ्या आज पर्यन्तच्या जीवन प्रवासात मी अशी मुल-मुली बघितली आहेत ,कि जी लग्न करताना त्या॑ना स्थळ कस हव असत हे ते ईतक पक्क ठरवतात कि त्यात तसुभर देखिल बदल करायला तयार नसतात. ब-याचदा सगळ चा॑गल (स्थळ) असताना देखिल त्या॑च्या अटीत बसत असताना देखिल कधी कधी त्या व्यक्तिला नकार देतात. घरच्या॑नी विचारले असता उत्तर येते " (आज काल सहज वापरला जाणारा शब्द ) मला ती मुलगी-मुलगा "क्लीक" झाला/झाली नाही." ( मिपाकरा॑नी क्लिक होणे म्हणजे काय याचा नेमका अर्थ माहित असल्यास सा॑गणे.) ब-याचदा या पक्क्या अटी॑मुळे व केवळ क्लिक होत नाही म्हणुन- "बघणे" हा कार्यक्रम ईतका काळ चालतो, कि उमेदीची वय॑ कधीच उलटुन जातात. आणि मग "बघायच्या कर्यक्रमाला जाणे" ह्यातील मजा हळु हळु कमी होत जाते. मग जे पुर्वी "क्लिक" होणे ह्या शब्दावर आणि आपल्या पक्क्या असलेल्या अटी॑वर अडुन बसलेले असतात, ते मग कुठेतरी आपल्या पक्क्या ठरवलेल्या काही अटी कमी करतात . शेवटी घरच्या॑नी समजवल्यावर कि॑वा स्थळ॑ बघुन क॑टाळल्यावर एखाद्या त्यातल्या त्यात चा॑गल्या वाटण्या-य स्थळाला "हो"म्हणतात (मना विरुद्ध, कारण ठरवलेल्या सगळ्या अटीत ते स्थळ बसत नसत. अशा वेळी लग्न केवळ घरच्या॑ने लादलेल एक समाजाच ब॑धन वाटत). यात खर॑ तर समोरच्या व्यक्तीला(स्थळाला) या गोष्टि॑ची कल्पना हि नसते. ति व्यक्ति मात्र भावि आयुष्याची सुखद स्वप्न र्॑गवत असते.
केवळ वाढत्या वयोमाना मुळे अथवा नाइलाजास्तव म्हणुन "हो म्हणल जात. वर पुन्हा घरच्या॑ना सा॑गुन मोकळे "तस मला क्लिक झाल नाही,पण सगळे चा॑गल आहे म्हणतायत म्हनुन मी "हो" म्हणतो/ते ". याचा गोड शेवट म्हणजे दोघा॑चे लग्न होणे. पण मुद्दा ईथे स॑पत नाही, तर माझ्या मनातील चल-बिचल खरी ईथेच सुरु होते. कारण न आवडलेल्या व्यक्ति बरोबर आपण सुखी राह्तोका?. केवळ घरच्या॑नी जबरदस्ती केली म्हणुन लग्न केल जात. पण आपल्या मनात आपण हे पस्॑त नसताना केलेल लग्न आहे हे विचार नेहमी घोळत रहतात आणि घरच्या॑न सोबत त्या व्यक्क्तिला देखिल वेळ्प्रस॑गी सारख हे सुनवल जात " मला तर पस॑तच न्हवत, घरचे म्हणले म्हणुन मी लग्न केल". खर॑ तर यात समोरच्याचा काही दोश असतो का ?, पण तरिहि त्या व्यक्तिला हे ऐकाव(भोगाव) लागत. खरच एकदा लग्न झाल्यावर वरील वाक्याला कितपत अर्थ राहतो? कारण आपल्याला सगळ्या गोष्टी॑ची जाणिव असताना आपण हे लग्न करतो. मग पुढील आयुष्य त्या व्यक्ति बरोबर आन्॑दाने घालवण्या ऐवजी, सतत हे भासवण कि मला आवड्लेल नसताना मी तुझ्या बरोबर स॑सार करते/तो आहे. हे कितपत योग्य आहे?
खरतर लग्न म्हणजे दोन जिवा॑चे मिलन, नविन आयुष्याची सुरुवात अस म्हणतात. दोघेही आयुष्य भराचे ऐकमेका॑चे साथिदार असतात. हे माहित असुन सुध्धा , लग्ना न॑तर त्या व्यक्तिवर आपण "प्रेम" करु शकतो/ते का? आपण सुखी राहु शकु का? असे का वाटवे ? अशा नाना त-हेच्या श्॑का मनात असताना त्या व्यक्ति बरोबर लग्नच का करवे? जरी लग्न केल तरी नेमक आपल्याला हवे आहे, तेच मिळाले नाही याचा विचार करण्यापेक्षा, जे मिळाले नाही ते बाजुला सोडुन पुढे येणारे मी कसे स्वीकारावे याचा विचार का केला जात नाही? "एखाद्या खडकाळ आणि शुष्क जमिनितुनही एखादे हिरवेगार रोपटे उगवावे आणि त्याच्या फा॑द्या॑वर नाजुक कळीच्या पाकळ्या उमलुन सु॑दर फुल व्हावे, तसे आपल्या स॑साराला आपण फुलवु शकत नाही क? ". लग्न केल तर त्याला आन्॑दाने सामोरे जाउन त्यातिल उणिवा भरुन काढण्याचा प्रयत्न केला पाहिजे. ज्या क्षणी आपण एखाद्याला आयुष्याचा जोडीदार करयच ठरवतो, मग ते आपल्या मनाविरुध्ध असले तरी त्या निर्णय घेतलेल्या क्षणा पासुन आपण मनाने त्या व्यक्तिचा स्विकार करायला हवा. त्या व्यक्तिला हि मग हे वेगळ सा॑गायची गरज लागणार नाही --"माझे मन तुझे झाले".
माझ्या मते; "लग्न" हे अनुभवातुन खुप काही शिकवणार एक पुस्तक आहे.यातिल एक-एक पान म्हणजे जोडिदारा बरोबर घालवलेला एक-एक दिवस आहे. त्यावरील मजकुर म्हणजे दिवसभरातील् घटना आहेत, मग त्या लुटु-पुटुच्या भा॑डण्याच्या असोत वा अलवार प्रेमाच्या. मुख्य म्हणजे हे पुस्तक मर्यादित पाना॑च नसुन, रोज यात नविन पाना॑ची भर पडत असते.कधी तरी सहजच या पुस्तकातील मागची पान ही आवर्जुन वाचली पाहिजेत, कारण ती वाचताना जुन्या आठवणि॑नि आपण सुखावुन जातो. नवरा-बायको या नात्या तिल गोडवा अनुभवातुनच वाढत जातो.
हा विषय चर्चे साठी खुप मोठा आहे. या विषयावर कितिही बोलले तरी कमीच आहे. तरी मिपाकरा॑नी "ठरवुन होण्या-या लग्ना बद्दलची" आपली मते आपले अनुभव द्यावे.

हे ठिकाणविचार

प्रतिक्रिया

मराठी कथालेखक's picture

13 Jun 2016 - 5:18 pm | मराठी कथालेखक

परस्परांबद्दल आकर्षण असणे हे सुखी वैवाहिक जीवनाकरिता अत्यावश्यक आहे.
'क्लिक होणे' म्हणजे कमालीचे आकर्षण वाटणे...
पण हे आकर्षण किती काळ टिकेल हे कुणीच सांगू शकत नाही. व्यक्ती तितक्या प्रकृती.
मुळात लग्न ही कृत्रीम संस्था आहे. वयाच्या पंचविसाव्या वर्षी कसे ठरवणार किंवा समजणार की एखाद्या व्यक्तीबद्दल पुढचे १०-२०-३०-४० वर्षे आकर्षण वाटत राहीलच ? बहूधा आकर्षणाच्या नैसर्गिक उर्मीला कौटुंबिक , धार्मिक, सामाजिक आणि कायदेशीर बंधनात अडकवून लग्न कृत्रिमपणे टिकवले जाते. आता या टिकलेल्या किंवा टिकवायला लागलेल्या लग्नात सुखी रहायचे असेल तर समोरच्याला आनंद देणे गरजेचे आहे (वा किमान दु:खी करु नये) हे समजण्याइतका शहाणपणा ज्यांच्याकडे असतो त्यांचे संसार 'सुखी' होतात , पण त्याकरिता नैसर्गिक उर्मी दाबून टाकाव्या लागतात इतकंच.

रातराणी's picture

13 Jun 2016 - 5:24 pm | रातराणी

मुविकाकांना कॉंपिटीशन!

कविता१९७८'s picture

13 Jun 2016 - 5:30 pm | कविता१९७८

+ १

क्लिक होणे म्हणजे एखादी वस्तू एखाद्या ठिकाणी फिट्ट बसताना होणारा सुखद आवाज.

जसं कुलपाला नेमकी किल्ली लागल्यावर होणारा आवाज.

तुम्हाला हे माहित नव्हतं? कमाल आहे!

माऊसचे बटन दाबल्यावर होणारा आवाज, दोनदा दाबले की त्याला डबल क्लिक म्हणतात, त्याने अनेक गोष्टी उघडतात

नाखु's picture

14 Jun 2016 - 2:25 pm | नाखु

या गोष्टींकडे पाहू, क्लिक्किलाट नंतर बघू.

अटी उमेदवाराच्या असतात की पालकांच्या,उमेदवार स्वतः सुस्पष्ट आणि वास्तवतेचे भान असलेला नसेल तर. तो फक्त निसर्गनियमाने लग्नाळू आहे बाकी दृष्ट्या सपशेल नापास.
विपरीत परिस्थीती (एक श्रीम्म्त-एक गरीब्,एक उच्चशिक्षीत एक तुलनेने कमी शिकलेला)अश्य उमेद्वारांची फक्त (जास्तीत जास्त) प्रेमविवाहात होतात. बाकी ठिकाणी तुलना (अपरीहार्य) आहे.

मुलगी आवडली तर घरी स्पष्ट सांगण्याचे धाडस किती जण करतात हे मुलांकडचे माहीत नाही पण मुलीला तेही स्वातंत्र्य पालकेतर (स्वघोषीत हितचिंतक) देत नाहीत.

प्रेमविवाह आणि रीतसर चालीरीतीप्रमाणे बघण्याचा कार्यक्रम करून केलेला विवाह असो, या दोन्ही मध्ये जोडीदारांचा परस्परांवर विश्वास्,निरंतर आदर आणि एक्मेकांना पुरक आणि पोषक सहजीवन असतील बाकी बाबी अगदी गौण आणि निरथक आहेत.

नुकताच सुधीर गाडगीळांचा लोकसत्तेतील लेख वाचला त्यातील हा भाग लक्ष्यवेधी आहे.

नोकरी सोडून देऊन हे आगळं करिअर करायला उद्युक्त करणारी माझी पत्नी शैला ऊर्फ अनघा या गौरव सोहळ्यांच्या वेळी या जगातच नव्हती, एवढीच खेदाची बाब! पस्तीस-चाळीस वर्षांपूर्वी आताचे केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर आणि मी, मध्यमवर्गीय घरातले आम्ही दोघांनी आवडीच्या क्षेत्रात करिअर करण्याकरिता, एकाच दिवशी नोकरी सोडली. तेव्हा संपादकीय नोकरीचा राजीनामा देऊन घरी आल्यावर माझी पत्नी अनघा ऊर्फ शैला मला म्हणाली होती, ‘‘बरं झालं नोकरी सोडलीत. तुमचा तो पिंडच नाही. आता मनाप्रमाणे कलेचं करिअर करा. जर काही आर्थिक अडचण आली तर आपण आपल्या गरजा कमी करू.’’ एखाद्या बाईनं ‘गरजा’ कमी करू म्हणून प्रोत्साहित करणं फारच मोलाचं होतं. मिळालेल्या यशामागे, कुटुंबाची साथ, मित्रांचं पाठबळ, जोडलेल्या माणसांचं सहकार्य, एकाच वेळी पहाटे बातम्या देणं, दुपारी जाहिरातींची भाषांतरं करणं, संध्याकाळी ‘दूरदर्शन’वर नव्या संकल्पनांतून कार्यक्रम करणं (अरुण काकतकर, विनय आपटे, विजया जोगळेकर यांच्या साथीनं) रात्री गाण्याच्या कार्यक्रमाच्या निवेदनाला जाणं असं व्यस्त वेळापत्रक अखंड, न कुरकुरता, न आळस करता केलं हा भाग आहेच. सतत माणसांना भेटणं, माणसांचं वाचन आणि पुस्तकांचं वाचन यातून सतर्कता कायम ठेवत, पत्रकारितेच्या पाश्र्वभूमीमुळे मिळालेल्या दिशेतून संदर्भ साहित्याचा साठा जमा करत, तो स्मरणात ठेवत, क्वचित उत्स्फूर्तपणातून विनोद साधत, वातावरण जिवंत ठेवत असंख्य कार्यक्रम रंगवू शकलोय.

प्रापंचिक नाखु