नाईट-ओव्हर!!!

Primary tabs

वडापाव's picture
वडापाव in जनातलं, मनातलं
11 Jan 2014 - 12:55 am

सुट्टीच्या दिवसात आई-वडील गावाला निघाले की पोरं जाम खुश होतात... लगेच ग्रुपमधल्या सगळ्या मेंबरांना फोनाफोनी होते. प्रत्येकाने किती किती पैसे काढायचे याचा एक अंदाज ठरतो. कोणकोणत्या मुलींना बोलवायचं(किंवा होस्ट मुलगीच असेल तर सोन्याहूनही पिवळं), कोणाला कटवायचं वगैरे बोलणी होते. प्रत्येकाचे आपआपल्या पसंतीनुसार आणि ऐपतीनुसार 'ब्रँड्स' ठरलेले असतात. कोणी नुकतीच भीष्म प्रतिज्ञा करून 'दारू सिगरेटला हात लावणार नाही' असा चारजणांचे ग्लास समोर भरलेले दिसल्यावर आपोआप ढळणारा अढळ निश्चय केलेला असतो. कोणा मुलीची आई पाठवायला तयार नसते म्हणून ती स्वतःबरोबर तिच्या आईच्या भरवशातल्या एखाद्या 'उत्सुक' आणि प्रसंगी 'उतावळ्या' मैत्रीणीला बरोबर घेऊन येते. ती दिसायला चांगली निघाली तर सगळे 'चीअर्स' तिच्या नावानेच होतात. बेताचीच पण निरुपद्रवी असली तर ब-यापैकी स्वागत वगैरे होतं. कटकटी निघाली तर सरळ फाट्यावर मारून दुर्लक्ष केलं जातं. ग्रुपमधल्या कपल्सना आयती संधी चालून आलेली असते. त्यामुळे ज्याच्या/जिच्या घरी 'पार्टी' असेल, ते घर जितकं मोठं आणि प्रशस्त, तितकं या युगुलांसाठी बरं असतं. या युगुलांनी बॅटिंग करताना बॉल चुकून बाऊंडरी बाहेर जाऊ नये म्हणून सगळे 'फिल्डर्स' सुद्धा बरोबर आणलेले असतात. कुणाचं नुकतंच हृदय दुखावलेलं असतं त्यामुळे देवदास किंवा देवदासी होण्याचा श्रीगणेशा ते इथे करणार असतात. काहीजणांसाठी हा पहिलाच अनुभव असतो त्यामुळे कुतुहल आणि उत्सुकता प्रचंड असते. सरावलेली मंडळी, पार्टी कोणाच्या का घरी असेना, 'ऑर्गनायझिंग' ची जबाबदारी आपल्या खांद्यांवर घेतात. अशा प्रकारे सगळा उतावळा गोतावळा जमतो, आणि 'पार्टीला' सुरुवात होते. अशा नाईटओव्हरना जाण्यात विशेष रस नसतानाही 'नाही आलास तर कंबरेत लाथ घालेन भे***' अशा त-हेच्या धमकावण्यांना बळी पडल्याचे नाटक करून एका नाईटओव्हरला जावं लागलं होतं.

या अशा नाईटओव्हरना जाण्यात फायदा हाच असतो, की रात्रभर आपल्याला हवं ते करता येतं, कोणीही अडवणारं नसतं. कधी कधी चांगल्या ओळखीसुद्धा होतात. क्वचितप्रसंगी माझ्यासारखा विचार करणारी माणसं सुद्धा भेटतात. माझा स्वभाव सगळ्यांना माहित असल्यानं मला कोणीही कधीच 'घे रे, एकदा ओढून बघ रे' असा आग्रह वगैरे करत नाही. कारण मग मी माझी लेक्चरबाजी सुरू करून त्यांचा सगळा मजा किरकिरा करून टाकेन याची सगळ्यांना खात्री असते. माझे शब्द सुद्धा बहि-या कानांवर पडतात याचा अनुभव असल्याने मीसुद्धा अशा वेळी त्यांच्या कोणत्याही 'कार्यक्रमाच्या' स्वतःहून आड येत नाही. जेवण झालं की कुठेतरी एका कोप-यात एकटाच जाऊन बसतो. अशा वेळी झोप येत नाही, कारण जो काही प्रकार चाललेला असतो तो मनाला पटणारा नसतो आणि असं असूनही मी हातावर हात घेऊन बसलोय या लाचारीच्या भावनेने कितीही दमलो असलो तरी झोप लागतच नाही. आजही मी असाच एकटाच बालकनीत जाऊन बसलो होतो. आतमध्ये गोंगाट चालू होता. कोणी रडत होतं, कोणी गात होतं, कोणी नाचत होतं, कोणी उगाच मोठमोठ्याने हसत होतं, कोणी टॉयलेटमध्ये जाऊन कमोडऐवजी आजुबाजुलाच ओकत होतं. आज पार्टीला पंधरा-वीसजणांनी हजेरी लावलेली होती. मुलींची हजेरी जास्त होती. ब-याच नव्या जणींशी ओळख झाली होती. त्यातली एक लगेच डोळ्यांत भरली होती. शांत, लाजाळू, हसतमुख चेह-याची. तिची आणि माझी जेवताना ब-याचदा नजरानजर सुद्धा झाली होती. पण जेव्हा मित्राने तिच्या नावाचा पेग भरला आणि तिने तो आधी संकोचाची हजार नौटंकी करून झाल्यावर शेवटी एका झटक्यात संपवला, तेव्हा डोकं फिरलं आणि सरळ जाऊन बाल्कनीत बसलो. आत बराच वेळ गोंगाट चालू होता. तिच्या हसण्याचा आवाजही येत होता. तो जरावेळाने असह्य झाला. म्हणून मग बोंडं कानात घालून गाणी ऐकायला लागलो. पण त्यांतही मन रमेना. तरी गाणी चालूच ठेवली. त्या मुलीच्या कानफटात मारावीशी वाटत होती. शेवटी 'छोड ना यार!! एवढे सगळे जण याच वाटेवर आहेत, तिच्या एकटीकडूनच अपवाद ठरण्याची अपेक्षा का ठेवा?' असं म्हणून स्वतःचीच समजूत घातली तेव्हा थोडा शांत झालो आणि बाहेरच्या थंडीमध्ये स्वतःला गुरफटवून घेऊन मी 'कधीतरी हे चित्र बदलेन' अशी स्वतःची समजूत घालत तिथल्या झोपाळ्यावर स्वस्थपणे बसून राहिलो.

ब-याच वेळाने कोणीतरी पाठी येऊन उभं राहिलंय असं वाटलं. पण जो किंवा जी कोणी असेल तो किंवा ती झिंगलेली असणार याची खात्री असल्याने मी तसाच न वळता बसून राहिलो.

'तू का असा इथे एकटाच बसलायस?' आवाजात स्थिरता होती. मी वळून बघितलं. तीच होती. मला स्वतःचा चेहरा निर्विकार ठेवता आला नाही. माझ्या डोळ्यांत राग धगधगत होता.
'सहज... हवा खायला' मी आवाज शक्य तेवढा शांत आणि सहज ठेवण्याचा प्रयत्न करत होतो. ती हसली.
'मघाशी आत जे काही चालू होतं ते तुला आवडत नाही ना??'
'ह्म्म!!'
'मलाही नाही आवडत'
'हो का!!'
'अरे खरंच...!! मी एरवी अशी पीत वगैरे नाही. स्मोकिंगचा तर भयंकर तिटकारा आहे मला. पण सगळे एवढं फोर्स करत होते... आणि त्यात थंडीसुद्धा होती ना!!'
'तू मला का एक्सप्लेन करून सांगत्येस हे सगळं?'
'तुझ्या चेह-यावरून कळतंय की तू रागावलायस माझ्यावर!! तुझ्या फ्रेंड्सनी सुद्धा सांगितलं की तू 'शहाणा बच्चा' आहेस म्हणून' हे म्हटल्यावर ती हळूच खिदळली. मला भयंकर राग आला. पण तरी मी शांत होतो.
'मी का रागवू तुझ्यावर? आपली धड ओळख सुद्धा नाही. आणि तसंही मी रागावलो तरी तुला का फरक पडावा?'
'सगळे मला फोर्स करत असताना तू माझ्याकडे एकटक बघत होतास. मी समहाऊ तुझ्या नजरेला नजर देऊ शकले नाही. मी तो पेग मारल्यावर तू सरळ उठून निघून गेलास. तेव्हा खरं तर मला तू खूप नॅरो माइंडेड वाटलास, फ्रँकली स्पिकींग अजूनही वाटतोयस बट आय अ‍ॅम शुअर यू हॅव अ‍ॅन एक्सप्लनेशन फॉर दॅट!!'
'मी का तुला एक्सप्लनेशन देऊ?? माझी मर्जी मला हवा खावीशी वाटली मी आलो उठून!! त्याचा तुझ्या पेग मारण्याशी काय संबंध??'
'बरं...'
'आणि इतकाच जर नॅरो माइंडेड वाटलो मी तर कशाला स्वतःची बेइज्जती करून घ्यायला आलीस इथे?'
'हेय हेय हेय चिल ओके!! मी आल्यापासून तू मला चेकआऊट करत होतास हे सगळ्यांच्या लक्षात आलं होतं. माझ्यासुद्धा- ऑबविअसली!! मी एक पेग काय घेतला तू लगेच उठून गेलास तेव्हा सगळे थोड्या वेळासाठी शांत झाले होते आणि मग एकदम सगळे तू किती चांगला आहेस, सगळ्यांची कशी हेल्प करतोस ब्ला ब्ला ब्ला... तुझी स्तुती करायला लागले. टू बी फ्रँक मला जरा गिल्टी वाटायला लागलं, म्हणून खरं तर गरज नसताना, काही ओळख पाळख नसताना मी उगाच तुला सॉरी म्हणायला आले होते.'
'तू सॉरी म्हणायला आली होतीस? "तुझ्या नॅरोमाइंडेड बिहेविअरचं एक्सप्लनेशन दे" हे तुझं सॉरी आहे का?'
'अफ कोर्स बिकझ आय ऑल्सो एक्स्पेक्टेड अ‍ॅन अपॉलॉजी इन रिटर्न'
'ओह आय माय सॉरी पण आय डोंट थिंक आय ओ यू वन!!'

तिने रागाने माझ्याकडे बघितलं. मीसुद्धा बघितलं. दोघं थोडा वेळ एकमेकांकडे खुन्नस देऊन बघत होतो. शेवटी मी झुला फिरवून तिच्याकडे पाठ केली आणि मग ती सुद्धा आत निघून गेली. थोड्या वेळाने पुन्हा आली, आणि दात ओठ खात म्हणाली,

'तुझा प्रॉब्लेम काय आहे हा?? तुझे एवढे सगळे फ्रेंड्स बिन्धास्त दारू ढोसतायत स्मोक करतायत, मारला मी एक पेग तर काय बिघडलं त्यात एवढं? जस्ट बिकझ आय अ‍ॅम अ गर्ल??'
'एक मिनीट... तू मुलगा आहेस किंवा मुलगी, याने याबाबतीत फरक नाही पडत मला. आत बसलेल्या माझ्या काही मैत्रीणी अट्टल बेवड्या आहेत माझ्या मित्रांहूनही जास्त फुकतात, पितात. मला मुळात हा प्रकारच आवडत नाही, गरज काय आहे याची? हे सगळं न करता तुम्ही एंजॉय करू शकत नाहीका??' माझ्या बोलण्यातल्या आक्रमकतेने ती जरा वेळ शांत झाली. माझ्यासमोरच्या कट्ट्यावर बसली.

'हे बघ... एंजॉय करू शकतो पण त्यात एवढी मजा नाही येणार ना रे... आता तू मघाशी बघायला हवं होतंस, कसे सगळे जण टाईट होऊन नाचत होते, हसत होते... एव्हरीवन जस्ट वेंट... क्रेझी... वाईल्ड!!'

मी हसलो... 'कसं आहे, क्रेझी आणि वाईल्ड होण्यासाठी मला तरी दारू प्यायची गरज वाटत नाही. हे लोक चढल्यावर जेवढा धिंगाणा घालतात त्याहून कितीतरी जास्त धिंगाणा मी शुद्धीवर असतानाही घालू शकतो. हवं तर माझं गुणगान गाणा-या माझ्या मित्रांना विचार... ते मस्करीत म्हणतात, "हा शुद्धीवर असताना एवढा येडा होऊ शकतो तर चढल्यावर काय होईल याचं?" अर्थात तेव्हा त्यांना हे कळत नाही, की आपण दारू प्यायलो की(च) आपण ओपन अप होतो, या त्यांच्या समजुतीमुळेच त्यांना चढल्यावर(च) क्रेझी आणि वाईल्ड होता येतं. मला नाही वाटत की मला चढल्यावर मी शुद्धीत असताना घालतो त्यापेक्षा जास्त धिंगाणा घालू शकेन. आणि मला प्रयोग करायचाही नाहीये.'

'ओके... पण काहीजण खरोखर दारू प्यायल्याशिवाय ओपन अप होऊच शकत नाहीत. फॉर एक्झाम्पल, सपोज एखाद्या मुलीचा किंवा फॉर दॅट मॅटर मुलाचा ब्रेक अप झाला असेल, एक्झाममध्ये केटी लागली असेल, फॅमिली इशुज असतील, जे तो किंवा ती नॉर्मली कोणाशीही शेअर करायला तयार नसतील, त्यांना दारू हेल्प करते ना फीलींग्ज बाहेर काढायला...'

'त्यासाठी सुद्धा दारूची खरंच गरज नाहीये. जर मी दु:खात असेन, आणि मला रडावंसं वाटलं, तर खुश्शाल रडेन मी... जेव्हा रडतो तेव्हा मुलीहून वाईट रडतो मी... दु:ख बाहेर काढण्यात जो संकोच वाटतो, क्रेझी आणि वाईल्ड होण्यात जो संकोच वाटतो, तो दारू चढल्यानंतर मिळण्या-या 'फॉल्स सेन्स ऑफ सिक्युरिटी' मुळे नाहीसा होतो. प्रत्यक्षात त्या व्यक्तीकडे ऑलरेडी एक पर्याय असतो, आत्मविश्वास!! दारू हा सोपा पण फसव्या ऑप्शन आहे. आपल्याला आपण दारूच्या नशेत कशासाठी रडलोय हे नंतर दारू उतरल्यावर लक्षात राहिलंच असं नाही, त्यामुळे माणूस पुन्हा पुन्हा त्याच कारणासाठी रडत बसतो. हेच जर स्वतःवर विश्वास ठेवून पूर्ण शुद्धीत असताना आजुबाजुला कोणीका असेना, रडून घेतलं की मग पुढे त्याचा तेवढा त्रास होत नाही, पुन्हा रडायची गरज भासत नाही...'

'ह्म्म... पण सगळे तुझ्यासारखा विचार नाही ना करू शकत... प्रत्येकाचं थिंकींग वेगळं असतं.'
'तीच तर दुर्दैवाची बाब आहे... गांडीतून पादायच्या ऐवजी नळकांडी वापरून तोंडाने जास्त घाण पादतात आणि त्याला कूल समजतात हे लोक... यांच्याकडून अजून काय अपेक्षा ठेवायच्या?'
'ए पण फक्त एकदा ट्राय करायला काय हरकत आहे? मी आज फर्स्ट टाईम घेतली होती रे.. खरंच आणि आय प्रॉमिस मी ही लास्ट टाईम घेतलीये. तू उठून गेल्यानंतर मी हात सुद्धा लावला नाही दारूला..'
'वेल दॅट इज नाईस... पण खरं तर जेव्हा तू स्वतःच्या मनावरचा ताबा सोडलास आणि पीअर प्रेशरला भुलून तो ग्लास उचललास तेव्हाच माझ्या मनातून उतरलीस... कारण व्यसनाची सवय सुरू करायला फर्स्ट ट्राय पुरेसा असतो... (ती हिरमुसली... तोंडातल्या तोंडात 'आय अ‍ॅम सॉरी' असं काहीतरी पुटपुटली) डोंट वरी... अशीच परिस्थिती माझ्यावर सुद्धा आलीये. तेव्हा मीसुद्धा स्वतःच्याच नजरेतून उतरलो होतो... नशिबाने त्यापुढे कधी ताबा सुटला नाही आणि माझी गाडी फर्स्ट ट्रायवरच थांबून राहिली'
'व्हॉट!!!? ए मग तुला याबद्दल काहीही बोलायचा काय अधिकार आहे??'
'खरं तर नाहीये मला अधिकार... पण मला कुठे माहिती होतं तुझा आजचा फर्स्ट ट्राय होता ते? माझं एवढं सगळं पुराण ऐकून झाल्यावर मग तू सांगितलंस फर्स्ट ट्राय होता ते. तरी आपली मैत्री असती तर मी तुला अडवलं असतं. मला ताबा ठेवता आला म्हणून तुला ठेवता येईलच असं नाहीना...'
'हो पण... यापुढे अडवशील ना??' मी भुवया उंचावून तिच्याकडे पाहायला लागलो. 'आता आपण फ्रेंड्स आहोत ना!!' मी हसलो... 'आहोत ना?? नाहीयोत का??'
'अगं आहोत आहोत... डोंट वरी, आहोत...' ती गोड हसली.
'ए पण...'
'काय?'
'काही नाही जाऊदे... पुन्हा केव्हातरी...'
'अगं बोल ना...'
'तुला एक विचारू?'
'हो विचार ना!!'
'तू व्हर्जिन आहेस ना??' मी चाट पडलो. हे काय मध्येच. हसायला लागलो.
'हो आहे मी व्हर्जिनच आहे अजून तरी...'
'हा मग ठीक आहे.'
'म्हणजे??? काय म्हणायचंय काय तुला?? नसतो व्हर्जिन तर मैत्री केली नसतीस??' ती गप्प. 'अगं बोल...'
'आता कदाचित मी नॅरो माइंडेड वाटेन तुला.. पण मला हे सगळं नाही आवडत...'
'अगं पण त्यासाठीच तर जन्म झालेला असतो आपला'
'अरे लग्नानंतर ठीक आहे रे... आधी काय!! मघाशी आतमध्ये तुमच्या ग्रुपमधली ती दोघं जणं सगळ्यांसमोर बिनधास्त... श्शी.. मला तिथे बसवेनाच...'
'अच्छा... म्हणून तू इथे आलीस काय!!'
'हो... मला हे नाही आवडत असलं काही. माझा होणारा पार्टनर किंवा इव्हन माय फ्रेंड्स... दे ऑल शुड बेटर बी व्हर्जिन... आता खरं तर मला माझ्या इथल्या फ्रेंड्स वर डाऊट येतोय... बट स्टिल...'
'हे बघ... एकदा का मुलगा-मुलगी जवळ आले ना, की उत्साहाच्या, भावनेच्या भरात हे सगळं घडणं स्वाभाविक आहे - कारण ते नैसर्गिक आहे. मग त्यांचं लग्न झालेलं असेल काय किंवा नसेल काय - कारण लग्न ही मानवी संकल्पना आहे!! कन्सेप्ट - ह्युमन कन्सेप्ट आहे (तिच्या चेह-यावरून तिला संकल्पना म्हणजे काय हे कळलं नसल्याचं जाणवलं मला). मी या सगळ्याचं समर्थन करतोय असं नाही. सध्याची सामाजिक परिस्थिती पाहता अनमॅरीड कपल्सनी या भानगडीत पडणं म्हणजे मूर्खपणा ठरेल असंच माझं मत आहे... पण समजा... एखाद्या मुलीने भावनेच्या भरात व्हर्जिनीटी घालवली असेल, आणि नंतर पुढे तिचा ब्रेक अप झाला, मग मला ती आवडली, तिला मी आवडलो, तिने मला तिच्या पास्ट बद्दल सगळं सांगितल, आणि तेव्हा जस्ट बिकॉझ ती आता व्हर्जिन नाहीये म्हणून तिला दूर सारलं तर ते चुकीचं आहे. हेच मुलाच्या बाबतीतही लागू आहे हा.. फक्त मुलींनाच लागू असं नाही. तिने किंवा त्याने मूर्खपणा केला, नो डाऊट!! पण तो जेव्हा केला, तेव्हा त्यांना कुठे माहिती होतं की पुढे जाऊन त्यांचा ब्रेक अप होणार आहे ते!! मुलामुलीनं नात्यात असताना "रोमान्स"च्या किती पाय-या गाठल्या ही त्यांची पर्सनल गोष्ट आहे आणि तिचा विषय, तिचं महत्त्व हे त्यांच्या नात्याच्या शेवटाबरोबरच संपायला हवं. हां... हीच चूक उद्या वारंवार एखाद्याकडून एकाहून अनेक जणांच्या बाबतीत घडू लागली, तर त्या व्यक्तीला तू कॅरेक्टरलेस वगैरे म्हणायला मोकळी आहेस!! पण एक चूक सबको माफ है यार!!' ती माझ्याकडे एकटक बघत होती. तिच्या त्या नजरेतून पोरगी माझ्या बोलण्यात इंटरेस्ट दाखवत होती, की फक्त माझ्यात, ते कळणं मुश्कील होतं. 'थोडं तरी पटतंय का मी काय म्हणालो त्यातलं?'
'अं... हो.. कळलं मला.. म्हणजे पटतंय थोडं थोडं...'
'नशीब...'
'तुझे मित्र बरोबर म्हणाले तुझ्याबद्दल'
'मी खूप चांगला आहे ना... आय नो' मी हसून म्हटलं.
'ते नाही रे... तू खूप बोलतोस...!!' आणि असं म्हणून, माझी रिअ‍ॅक्शन बघून ती हसायला लागली. मीही ओशाळून थोडासा हसलो. मग अजुन गप्पा रंगल्या... आता मी मुद्दामून तिला जास्त बोलायला दिलं. एकटक बघत बसण्याची पाळी माझी होती. आणि असं बघता बघता पहाट झाली.

कथाविचारमतवाद

प्रतिक्रिया

अर्धवटराव's picture

11 Jan 2014 - 1:21 am | अर्धवटराव

म्हणजे पहिला चान्स पण नाहि आणि पहिली माफी पण नाहि ?
छ्या.

बॅटमॅन's picture

11 Jan 2014 - 1:29 am | बॅटमॅन

अविदितगतयामा रात्रिरेव व्यरंसीत्????? मजाये भौ. लगे रहो.

प्यारे१'s picture

11 Jan 2014 - 2:33 am | प्यारे१

लिखाण आवडलं. जास्त 'सोललं' आहे असं वाटतंय.

बाकी डिस्क्लेमर वगैरे काही नाही. योगायोग समजावा वगैरे काही नाही.
चलो अच्छा ही होगा!
अवांतर : मधे मधे आमच्या अभिषेकची आठवण आली मला.

प्यार्या च्यामारी कस्काय शेम टू शेम आठवण आली रे.
.
.
.
धान्य बदलले की चक्किवाला बी सेटिंग बदलतो. ते बी नाय :-D

अनिरुद्ध प's picture

15 Jan 2014 - 4:55 pm | अनिरुद्ध प

शी अंशता सहमत्,शिर्षका वरुन आधी NITE-HANGOVER असे काही असावे असा समज झाला होत.

खटपट्या's picture

11 Jan 2014 - 4:12 am | खटपट्या

मस्तै !!!

संजय क्षीरसागर's picture

11 Jan 2014 - 11:36 am | संजय क्षीरसागर

सदस्यकाळ 5 years 11 months. टीवायबीकॉम चे वर्ष चालू

प्रोफाईल अपडेट करायला हवायं का?

मारकुटे's picture

11 Jan 2014 - 11:40 am | मारकुटे

पुण्यामुंबैबंगळूरातील उच्चभ्रुंचा विरंगुळा.

पण भिकारचोट धंदे कधी केले नाही आणी कुनाला करुन पण दिले नाही.पोरग जास्त उतमात करायला लागल तर तिथल्या तिथे कानफाटात ठिवुन द्यायचो.त्यामुळे बरोबरीच्या कन्या जरा जास्तच वचकुन असायच्या.
बाकी कॉलेज संपल्यावर बायकोकडुन कळल आमच्या सन्मानिय मैत्रिणींनी आमच नामकरण औरंगजेब केल होत.

पैसा's picture

15 Jan 2014 - 11:44 am | पैसा

आजकालची कॉलेजची पोट्टी फक्त हेच करतात की कालिजात जाऊन काही अभ्यास गिब्यास पण करतात?

कॉलेजची पोट्टेच काय आयटी मधील कॉर्पोरेट मधील पोट्टे पोट्ट्या हेच करतात.

कपिलमुनी's picture

16 Jan 2014 - 5:18 pm | कपिलमुनी

तुमच्या पोटात दुखता का ?

बॅटमॅन's picture

15 Jan 2014 - 12:49 pm | बॅटमॅन

आधीच्या पोट्ट्यांना मुभा नव्हती म्हणून असलं काही करत नव्हती इतकं आणि इतकंच!!!!

सोत्रि's picture

15 Jan 2014 - 1:05 pm | सोत्रि

ह्या पैसातैला नं नसत्या चवकश्याच भारी ;)

- (कॉलेजात जाउन अभ्यास-गिब्यास 'सुद्धा' केलेला) सोकाजी

आदूबाळ's picture

15 Jan 2014 - 12:44 pm | आदूबाळ

खूप काय काय लिहायचं होतं, वडापावसाहेब...पण राहूच द्या...

लेखन आवडलं. पुलेशु!

प्रत्येकाचा आपापला माईन्डसेट आणि त्याची स्पष्टीकरणं...

मुळात आपण अमुक असे असतो.. आणि असतो म्हणून त्याचं स्पष्टीकरण देतो.

कोणाला दारु पिऊनच्या कैफाचं कौतुक तर कुणाला दारु न पिताच्या कैफाचं..

कोणाला व्हर्जिन असल्याचं कौतुक तर कोणाला व्हर्जिन असल्याचा कॉम्प्लेक्स..

माणसाची घडण आणि घट्ट धारणा खूप इंटरेस्टिंग असतात.. :)

लेख नेहमीप्रमाणेच रंजक..

चामरी गवि, सेंट परसेंट अशी प्रतिक्रिया (पोलिटिकली करेक्ट) कशी लिहावी ह्याचा विचार करत करत खाली आलो ते तुझ्याच प्रतिसादाच्या शोधात आणि भरून पावलो! :)

- (गविबरोबर एक नाइट-आउट करायची इच्छा असलेला*) सोकाजी

*: कसलाही पांचट विनोद केल्यास अपमान केला जाईल

अभ्या..'s picture

15 Jan 2014 - 2:27 pm | अभ्या..

च्यामारी मला सोकाजिच्या प्रतिसादा ऐवजी मुझे नौलखा मंगा दे हेच गानं ऐकू आले. ;-)

अत्रुप्त आत्मा's picture

15 Jan 2014 - 2:39 pm | अत्रुप्त आत्मा

+१ टू अब्या..डब्या!
http://www.sherv.net/cm/emo/laughing/rofl-smiley-emoticon.gif

कपिलमुनी's picture

16 Jan 2014 - 5:19 pm | कपिलमुनी

** *** ****

बर्फाळलांडगा's picture

15 Jan 2014 - 12:50 pm | बर्फाळलांडगा

ती द्वैत संपवून टाकते विविध वय जात लिंग कर्तुत्व अधिकार वगैरे भ्रम माया वगैरे तात्पुरते बाजुला पडून नशापान करणारे फ़क्त एका सामान भावावर स्थिर होतात तो म्हणजे आपण फक्त एक एंटिटी आहोत अगदी एकसमान, म्हणुनच मैत्री घट्ट करणारी विण म्हणजे नशा होय.

पोरीने एका घोटात पेग घेतला म्हणजे नक्किच नवखि आसणार, अट्टल असती तर सावकाश मारत रेङ्गाळ्त बसली असती. असो सेक्स ला महत्व कितपत द्यायचे ज्याचे त्याने ठरवावे परंतु फ़क्त यूरोपियन लोकांसोबत पार्ट्या केलेल्या असल्यानी त्यातिल मुली भारतीय व्याक्तिसोबत मेकाउट टाळायचे प्रमुख कारण हे सांगतात की तुम्ही लगेच सिरिअस होता अन नंतर पिछ्चा सोडता सोडत नाही... रात गयी बात गयी हे तुम्हाला कळतच नाही

मारकुटे's picture

15 Jan 2014 - 12:51 pm | मारकुटे

सहमत आहे. युरोपीयन देशात उतरल्याबरोबर भारतिय लोकांचे ट्रेनिंग घेऊन त्यांना समजाऊन सांगितले पाहिजे.

म्हणुन अगदी यूरोप मधील विद्यार्थी सुधा इन्टर्न म्हणुन भारतीय (पुणे)कंपन्यात यायचे. अर्थातच प्लेसमेंट एजंसी थ्रू.

मग शनिवार रविवार विविध कंपनीत कामे करणारी पण समान एजन्सी तर्फे पुण्यात आलेल्या मुलांचा आपोआप ग्रुप बनायाचा व पार्टी ऑल नाईट असायची. आता त्यांची पार्टी म्हणजे फक्त ओली... मद्य अन इतर पेय जलाचा महापुर. जेवण स्वत: आधीच थोडसे करून मगच हजर व्हायचे.

तिथे तुम्ही कंपनीत मित्र वगैरे किती बनवले वर्तनुक कशी होती हे बघितले जायचे त्यामुळे हे युरोपिअन्स कामाच्या ठिकाणच्या तथा कथित इन्टुक सोबत मैत्री करायचे व अर्थातच पार्टी ऑल नाईट ची संधि मिळायचि.

आरोग्या बाबत जागृत असल्याने संपूर्ण लैंगिक संबंध सोडले तर तिथे काय होते हे मी
सांगायला नकोच्. त्यावेळी मला तिथल्या मुलीने सांगितले की तुम्ही लोक फारच गळ्यात पड़ता इट वाज जस्ट अ फन डेट नॉट अ रिलेशन शीप हे तुम्ही पटवून घेत नाही मग कितीही इन्टुक का असेनात .

थोडक्यात हा किस्सा कोरेगाव पार्क पुणे भारत इथे अनुभवलेला आहे हे नमूद करतो.

तेच तर. मग शाळेपासूनच सुरवात करावी भारतीयांना फन शिकवण्याची. रोलेशन्शिप फाट्यावर मारा आन केवळ एंजोय करा असा पाचवीपासून शिकवले पाहिजे साला त्याशिवाय ह्या गोर्‍यांप्रमाणे प्रगत होता येणार नाही.

बर्फाळलांडगा's picture

15 Jan 2014 - 1:45 pm | बर्फाळलांडगा

रिलेशनशिप अन एंजॉय या दोन वेगळ्या गोष्टी आहेत... infact पुरेसा एंजॉय जाहला असेल तर रिलेशन शिप फ़ाट्यावर मारायची वेळ येतच नाही. पण केवळ रिलेशनशीप सारखे दाट नात्याचे ओझे नाही म्हणून एंजॉय करू नये हां अटटहास दुराग्रही आहे. जसे जीवनसाथी हुड्काय्च्या नादात मैत्री विसरणे योग्य... तसेच

मारकुटे's picture

15 Jan 2014 - 2:01 pm | मारकुटे

ओके. खुलाशाबद्दल धन्यवाद

तुम्ही खरोखर मिपाचे संपादक असायला हवे होते अशी माझी मनोमन खात्री पटली.

का बाबा धावती गाढवं सोडतोयस माझ्यावर?

बर्फाळलांडगा's picture

15 Jan 2014 - 4:12 pm | बर्फाळलांडगा

कुत्री म्हणा कुत्री...! अन नंतर लिहा मला कुत्रा न्हवे गाढव अभिप्रेत होत . केज्रिवालां इतके आम बनून कसं चालेल ?

ती द्वैत संपवून टाकते विविध वय जात लिंग कर्तुत्व अधिकार वगैरे भ्रम माया वगैरे तात्पुरते बाजुला पडून नशापान करणारे फ़क्त एका सामान भावावर स्थिर होतात तो म्हणजे आपण फक्त एक एंटिटी आहोत अगदी एकसमान, म्हणुनच मैत्री घट्ट करणारी विण म्हणजे नशा होय.

रात गयी बात गयी हे तुम्हाला कळतच नाही

दोन्हीसाठी +१ आणि टाळ्या!

- (बर्फाळ पेये आवडणारा) सोकाजी

ज्या वयात 'आपण काहीतरी या जगाला करुन दाखवाव' त्या वयात हे असले धन्दे या पोरन्चे सुरु असतात.

अशी मुक्ताफळे उधळणार्‍या दुढ्ढाचार्यांनी आयुष्यात काय दिवे लावले तेवढे सांगावे, मग पुढचे बोलता येईल.

शिद's picture

15 Jan 2014 - 4:23 pm | शिद

आयुष्यात काय दिवे लावले तेवढे सांगावे

काही करता आलेच नाही हिच जळ्जळ असावी बहुतेक, ईनो घ्या म्हणावे. ;)

बॅटमॅन's picture

15 Jan 2014 - 4:41 pm | बॅटमॅन

अगदी अगदि!!!! इनोवाल्यांनी मिपाशी करार केला पाहिजे डिस्कौंटचा. इतका इनोसप्लाय झालाय मिपावर =))

अत्रुप्त आत्मा's picture

15 Jan 2014 - 5:17 pm | अत्रुप्त आत्मा

@अशी मुक्ताफळे उधळणार्‍या दुढ्ढाचार्यांनी आयुष्यात काय दिवे लावले तेवढे सांगावे, >>>. : D
नाव पहा कि हो त्यां.....चं! =))
काय हे!? =))

टवाळ कार्टा's picture

15 Jan 2014 - 6:17 pm | टवाळ कार्टा

=))

बॅटमॅन's picture

15 Jan 2014 - 6:33 pm | बॅटमॅन

हाहाहा =))

काहीतरी बनुन दाखवण्यासाठी हे असले उद्योग करण्याची गरज पडत नाही. आई-वडिलान्चा धाकच पुरेसा असतो.
:-)

त्या धाकामुळेच पुणे सोडवत नसेल, हो की नाही?

वासु's picture

15 Jan 2014 - 4:46 pm | वासु

होय

बॅटमॅन's picture

15 Jan 2014 - 4:49 pm | बॅटमॅन

मग काय कामाचा तो धाक???? धड नोकरीसाठी गाव सोडवत नै अन पोरांवर टीका करू लागले तुम्ही.

कैलासवासी सोन्याबापु's picture

15 Jan 2014 - 6:54 pm | कैलासवासी सोन्याबापु

जबरदस्त!!!!

भांगेत तुळस तसं "हँबर्गरांत" "वडापाव"

आम्ही बी गावाकडं असलं करायचो (वजा पोरी)अन विषय पण अमक्याने तमक्या पक्षाच्या तालुका अध्यक्षाचीच मेव्हणी कशी पटवली अन तालुक्याल्लाच तिला कसा "बँड बाजा बारात" दाखवला असलाच असायचा (फोटो प्रुफ नेसेसरी होते), पर ह्येलाच नाईट ओव्हर म्हणतेत हे नोते मालुम मले बा!!!.

पुण्यात अभ्यासाला आलो तेव्हा एक अश्याच "नाईट ओव्हर " ला गेल्तो, पोरी ढोसताना पाहुन गपगार झाल्तो, इतला की पुरा रम चा हाफ कोरा मारुन बी मले चढेच नाही!!!, वापस नाही कई चान्स आला!!!

बादवे, खरेच गावाकडल्या मंड़ळींनी ह्यात कायतर वंगाळ असल्याचा आव आणु नये!!!, उसाच्या फडाला, तुरीचा पाठी, वढ्यात, अन आमराईत काय होतं ? दारु नसली तरी ह्या पोरी पोरं दारु पिऊन करतात तेच दारु न पिता होतं!!! अजुन काय!!!, आपण तर वस्तीला पैदा होऊन राजधानीस्तोवर पोचलोय!, पळसाला पाने तिनच!!!

असो!!!, लिवलंय ब्येस!!! तेवढं प्रोफाईल्ल अपडेट चं बघा :)

टवाळ कार्टा's picture

15 Jan 2014 - 7:15 pm | टवाळ कार्टा

दारु न पिता ....आणखीनच मज्जा की मग ;)

बाबा पाटील's picture

15 Jan 2014 - 8:31 pm | बाबा पाटील

कुठ कुठ घुसताय बाप्पु,फकिस्त कोयनाळात घुसताना जरा जपुन बर तर, नाय तर नकु तिथ काटा घुसायचा अन सगळाच बल्ल्या व्हायचा....

कैलासवासी सोन्याबापु's picture

16 Jan 2014 - 8:11 am | कैलासवासी सोन्याबापु

हा हा हा काय पण पाटील तुम्ही बी!!!, अनुभव दांडगा दिसतोय कोयनाळातला ;)

प्यारे१'s picture

16 Jan 2014 - 1:09 pm | प्यारे१

कोयनाळ म्हणजे नक्की काय?
(करवंदीची जाळी माहिती आहे, तसं काही असतं का? बेशरमची झाडं पण माहिती आहेत)

- इमानदारीत प्रश्नकर्ता

कोयनेलची झाडं असतात त्यांचं जंजाळ काय? बहुता वर्षांपूर्वी आमच्या घराला लाकूड + कोयनेलची झाडे असे कुंपण होते.

बाबा पाटील's picture

16 Jan 2014 - 7:06 pm | बाबा पाटील

कुबाभळीची रान किंवा येडी बाभळ, ,नेहमीच्या बाभळीपेक्षा मोठा काटा असतो.एकदा पायात घुसला की पाय टम्म फुगतो,बराचदा चप्पल मधुन पण भोक पाडुन टोचतो. भिमा नदीच्या काठाने या वनस्पतीची प्रचंड अनियंत्रीत वाढ झाली आहे गावात ओढा,पाणवठा,पांद,मसनवाटा याच्या आजुबाजुस बर्‍यापैकी आढळतो.

बॅटमॅन's picture

16 Jan 2014 - 1:06 pm | बॅटमॅन

बादवे, खरेच गावाकडल्या मंड़ळींनी ह्यात कायतर वंगाळ असल्याचा आव आणु नये!!!, उसाच्या फडाला, तुरीचा पाठी, वढ्यात, अन आमराईत काय होतं ? दारु नसली तरी ह्या पोरी पोरं दारु पिऊन करतात तेच दारु न पिता होतं!!! अजुन काय!!!, आपण तर वस्तीला पैदा होऊन राजधानीस्तोवर पोचलोय!, पळसाला पाने तिनच!!!

जबरदस्त!!!!!!

कैलासवासी सोन्याबापु's picture

17 Jan 2014 - 9:02 am | कैलासवासी सोन्याबापु

सालं सेक्स टॅबु असणा-या ह्या देशात १२२ कोटी लोक पैदा झालेत!!!! फिश!!!! माझ्या मते इस्ट्रोजेन ,टेस्टेस्टेरोन प्रभुती मंडळींस "संस्क्रूती, भद्र, अभद्र, नैतिक" वैगैरे झोल झपाटे झेपतच नसतात!!! सबब त्याचे सिक्रिशन कोणातच थांबत नसते!!

बॅटमॅन's picture

17 Jan 2014 - 2:58 pm | बॅटमॅन

पूर्ण सहमत.

फक्त एक लहानशी दुरुस्ती म्हणजे व्हिक्टोरियन काळ येईपर्यंत सेक्स टॅबू मानत नसत. तो वायझेडपणा त्यानंतर सुरू झाला. हार्मोन्स उसळी मारण्याच्या वयात लग्ने होऊन शरीर संबंध येऊन पोरे होत असत, सबब फ्रस्ट्रेशन तितके असेल असे वाटत नाही.

बाकी साडेतीन टक्क्यांची तथाकथित मोरॅलिटी देशाला चिकटवणे अलीकडे लैच सुरू आहे. मजा म्हणजे हे साडेतीन टक्केवालेही मस्त मजा मारत असत. जुन्या काळी बाकी काही असले तरी असला दिखाऊपणा नव्हता. अलीकडे हे ढोंग फार वाढलेय.

(साडेतीन टक्केवाले म्हणजे सर्वच हुच्चभ्रू आले. त्याच नावाने ओळखल्या जाणार्‍या जातीला उद्देशून हे वाक्य नाही याची नोंद घेणे.)

कपिलमुनी's picture

17 Jan 2014 - 3:07 pm | कपिलमुनी

साडेतीन टक्केवाले म्हणजे सर्वच हुच्चभ्रू

आम्ही ब्राह्मण्यावर टीका करतो .. ब्राह्मणांवर नाही .. असे पूर्वी चालायचे त्याचीच आठवण झाली ..

डॉ सुहास म्हात्रे's picture

17 Jan 2014 - 3:10 pm | डॉ सुहास म्हात्रे

म्हंजे घटकंचुकी वेग्रे का? :)

घटकंचुकी लीव्ज टू मच टू चान्स...

ते उदाहरण एकदम क्लिशे झालंय- चैनीची परमावधी म्हणून ;)

पण दॅट अपार्ट, लग्नाबाहेर मजा मारणे हे कै जातींवर अवलंबून नव्हते अन याची बरीच प्रमाणे जुन्या आत्मचरित्रांमधून मिळतात.

पैसा's picture

17 Jan 2014 - 3:45 pm | पैसा

गाथा सप्तशतीमधे कित्येक गाथा आहेत तशा!

आणि तरी लोक आपल्या संस्कृतीचे नाही तिथे गोडवे गातात!!!

आपले पूर्वज आपल्यापेक्षा बरेच 'कूल' होते. आपण मात्र नुस्ते वांझपणे चुकीच्या गोष्टींचे गोडवे गात बसतो. अन सगळ्यांत मोठा विरोधाभास हा आहे की व्हिक्टोरियन काळातले रोपण सार्वकालिक आहे अशी आपली समजूत असते =))

या विरोधाभासात इतका केविलवाणेपणा आहे की बोलायची सोय नाही.

कैलासवासी सोन्याबापु's picture

18 Jan 2014 - 7:26 am | कैलासवासी सोन्याबापु

ते आले हो बॅटमॅन आमच्या ध्यानी!!!!, ३.५ % पेक्षा "आहे रे" गट म्हणाला असतात तर लगेच झेपले असते!!! ;)

अरे हो की. लक्षातच आले नव्हते हे तर :)

दोघेही भलतेच जजमेंटल दिसताय!

कैलासवासी सोन्याबापु's picture

17 Jan 2014 - 9:03 am | कैलासवासी सोन्याबापु

जजमेंटल (शॉर्ट फॉर जरा जरासे मेंटल ) *lol*