अपेक्षा

Primary tabs

मि मिपाचा मित्रच's picture
मि मिपाचा मित्रच in जे न देखे रवी...
10 Jan 2014 - 1:08 pm

नमस्कार

माझा मिपा वर हा प्रथमच लिहिण्याचा प्रयत्न ..

काय लिहावे असा विचार करत असताना वृद्धाश्रम वरील शतशब्द कथा वाचली आणि खालील कविता - संग्रही असलेली - आठवली ,कविता खूप जुनी आहे, मी लिहिलेली नाहीय - पण भावना पोहचवण्या साठी अश्या गोष्टींची गरज नसते..
स्वतःचे लिखाण नसेल तर ते मीपा वर टंकता येते कि नाही हे माहित नाही, हि कविता या आधी मिपा वर पूर्व-प्रकाशित झाली आहे कि नाही ते पण माहित नाही. जर अशी परवानगी नसेल किंवा पूर्व प्रकाशित असेल तर आधीच क्षमस्व.

!! अपेक्षा !!

आपल्या आईला किंवा बाबांना वृद्धाश्रमाच्या दारात नेऊन ठेवताना जरा थांबा & आठवा -

हिनेच ना प्राणाशी झगडून तुम्हाला जन्म दिला
रात्रीचा दिवस आणि तळहाताचा पाळणा करून,
आजारपणे तिनेच काढली ना ??
स्वतःचे दुध पाजून, स्वतः रांधूनच वाढवले ना ??
पहिले पाऊल टाकताना अडखळला ,
तेव्हा तिनेच पकडून सावरले ना ??
पहिला शब्द तिनेच शिकवला ना ??
शाळेच्या पहिल्या दिवशी,
तुमचे चिमुकले बोट सोडवून घेऊन,
तुम्हाला आत पाठवले तेव्हा,
कासावीस होऊन शाळेच्या दाराशी तीच उभी होती ना ??
पहिले बक्षीस तुम्ही घेतले तेव्हा,
गर्दीमध्ये एका कोपरयात उभी राहून,
पदराने तिनेच डोळे पुसले ना ??
तुमच्या प्रत्येक यशात आणि अपशायात,
ती हसली आणि रडली ना ??

मग आता जेव्हा तिला आणि हो, वडिलांनाही, तुमची खरेच गरज आहे, तुमच्या आधाराची अपेक्षा आहे, तेव्हा तुम्ही आपले हात सोडवून घेणार ??

घेऊ शकाल ??

कविता

प्रतिक्रिया

मारकुटे's picture

10 Jan 2014 - 1:22 pm | मारकुटे

काव्यरस:
aai
baba

नवीनच प्रकार म्हणायचे की काव्यरसाचे?
आणखी कोणते होऊ शकतील प्रकार?