....................... पोटदुखी...........

आशु जोग's picture
आशु जोग in जनातलं, मनातलं
5 Jan 2014 - 1:25 pm

मी माझा एक वैयक्तिक प्रॉब्लेम घेऊन इथे आलो आहे.
कृपया मार्गदर्शन करावे...
.
;).
परवा मी माझा ट्रक घेऊन दिल्लीला चाललो होतो,
माझ्या मागे आणखी एक ट्रक होता, ज्याचा ड्रायवर नवशिका होता.
वाटेत घाटातून जाताना त्या नवशिक्या ड्रायवरने मला मागे टाकले. त्या ट्रकवर मागच्या बाजूला मोठ्ठ्या अक्षरात लिहीलेले होते.
--
..
--
"बघतोस काय रागानं ओव्हरटेक केलं बघ वाघानं !"
:)

तेव्हापासून मला 'पोटदुखी'चा प्रचंड त्रास सुरु झाला आहे. कृपया कुणाकडे काही उपाय असेल तर सांगा !

(त्या नवशिक्या ड्रायव्हरच्या नावाने मी जमेल तितके खडे फोडतोच आहे, पण मळमळ थांबत नाहीये)
.

वावरविचार

प्रतिक्रिया

कवितानागेश's picture

5 Jan 2014 - 1:31 pm | कवितानागेश

हा शब्द 'वरटेक' असा लिहितात.
बाकी चालू द्या.
दील्ली दूर नही है! :)

पैसा's picture

5 Jan 2014 - 4:12 pm | पैसा

वड्याचं तेल वांग्यावर. दुसर्‍या ट्रकवाल्यालाला भीती वाटेल अशा पद्धतीने वरटेक करा. म्हणजे पोटदुखी पळून जैल.

आयुर्हित's picture

5 Jan 2014 - 4:28 pm | आयुर्हित

चिंता करू नका, दिल्लीलाच चाललात ना.

तिथे

वाघ नही, "आप" हि होंगे!

आपला लाडका : आयुर्हीत

आयुर्हित's picture

5 Jan 2014 - 4:46 pm | आयुर्हित

आपल्या येथे जसे डोंगरे बालामृत मिळते तसे तेथे
"शिलाजित" यांचे ६०० लिटर मोफत पाणी मिळते असे ऐकले आहे, मिळाले तर तेवढे विकत घेऊन प्या.
म्हणजे पोटदुखी जाईल.

विकत नाही मिळाले तर अजितदादांना मू..ला घेऊन जा, म्हणजे तिकडील धरणेहि भरतील.

आपला लाडका: आयुर्हीत

नितिन थत्ते's picture

5 Jan 2014 - 4:52 pm | नितिन थत्ते

ते ६६७ लीटर असते असे ऐकले आहे.
मोफत पाणी विकत कसे घ्यायचे?

आयुर्हित's picture

5 Jan 2014 - 5:26 pm | आयुर्हित

१) एक तर ६०० लिटर मोफत पाणी मिळेल असे सांगितले आहे, पण ते मोफत मिळायला हवे!!!
कारण तेथेही tanker वाले पाणी माफिया आहेतच कि!
२) पोटदुखी घालवायला म्हणजेच गुण यायला मोफतचे काहीही चालत नाही.
3) एक छान वाक्य वाचलेले आठवते : there is no free lunch in the world!!!
यात lunch चा अर्थ प्रत्येकाने त्याच्या पद्धतीने लावायचा!

आपला लाडका: आयुर्हीत

नितिन थत्ते's picture

5 Jan 2014 - 4:46 pm | नितिन थत्ते

पुढे आणखी मोठा अरुंद रस्त्याचा आणि खूप अवघड घाट आहे. तिथे हा नवशिका ड्रायव्हर मागे पडेल आणि तुमच्या आड येणार नाही अशी आशा ठेवा. :)

आशु जोग's picture

11 Feb 2015 - 7:13 pm | आशु जोग

नवशिक्याने मैदान मारले

नानीचा नाना's picture

5 Jan 2014 - 7:00 pm | नानीचा नाना

आपल्याला पचायला जड असलेल्या गोष्टींकडे दुर्लक्ष केलेले बरे Smile

जेनी...'s picture

7 Jan 2014 - 11:54 pm | जेनी...

=)) आयडी चं नाव मस्त्चय.
नानीचा नाना

काळा पहाड's picture

5 Jan 2014 - 7:35 pm | काळा पहाड

थोडा चेंज करावा लागेल "वोरीजीनल" वाक्यासाटी.
बगतूस काय रागानं वरटेक केलंया वागानं !

अनुप ढेरे's picture

5 Jan 2014 - 10:14 pm | अनुप ढेरे

बटाट्यांनी भरलेला अजून एक ट्रक मागे आहे. त्याला पण रेस लावायचिये. त्या बटाट्याच्या ट्रकवाल्यांनी या नवशिक्या ड्रायवरच्या ट्रकला पावरबाज विंजिन लावून दिलय म्हणे !

प्यारे१'s picture

5 Jan 2014 - 10:26 pm | प्यारे१

फारच गंभीर परिस्थिती!
कंडीशनल योगा नि प्राणायाम करा किंवा तोंड बंद ठेवून उपोषण करा .
किर्पा प्राप्त होगी!

इन्दुसुता's picture

5 Jan 2014 - 11:50 pm | इन्दुसुता

वैयक्तिक प्रॉब्लेम येथे मांडलात तेच बरे झाले, नक्कीच मौलिक सल्ला मिळेल असे खात्रीचे ठिकण आहे हे!!! :)

आम्हाला या बाबतीत अनुभव नाही परंतु "इनो घ्यावे" असा सल्ला येथेच पूर्वी वाचला आहे, जाणकार सांगतीलच. :)
पोटदुखीवर लवकरच परिणामकारक उपाय तुम्हास मिळो ही कळकळीची ( ! ) शुभेच्छा... पोट्दुखी निवारण झाल्याचे आम्हाला कळवायचे विसरू नका हां ! :)

आशु जोग's picture

14 Jan 2014 - 10:33 am | आशु जोग

आपबिती आहे

आयुर्हित's picture

6 Jan 2014 - 5:20 pm | आयुर्हित

कालच बोललो, आणि आज खरे झाले कि हो.
आपले अजित दादा निघाले दिल्लीला, लोकसभा निवडायला.
Source :
NCP to field Ajit Pawar in 2014 Lok Sabha polls
http://zeenews.india.com/news/maharashtra/ncp-to-field-ajit-pawar-in-201...

कळावे, लोभ असावा
आपला लाडका, आयुर्हीत

आशु जोग's picture

6 Jan 2014 - 10:07 pm | आशु जोग

पाणीच पाणी चहूकडे

श्रीरंग_जोशी's picture

6 Jan 2014 - 10:46 pm | श्रीरंग_जोशी

कदाचित पोटदुखी ही एक मनाची अवस्था असेल.

गुरूच्या एस्केप व्हेलॉसिटीच्या वेगाने आपल्या प्रकॄतीस आराम पडो. (व्हेलॉसिटीच्या वेगाने ;-) )

ganu's picture

7 Jan 2014 - 12:02 pm | ganu

नवशिक्या ड्रायवरचे नाव नवशिका वाघ असणार बहुदा.वाघाच्या मिशाचे भस्म कपाळावर लावा.मग'पोटदुखी'चा प्रचंड त्रास थाम्बेल.

डॉ सुहास म्हात्रे's picture

7 Jan 2014 - 12:10 pm | डॉ सुहास म्हात्रे

कै तरी काय ! यात पोटदुखी कश्याला व्हायला पायजे?

असा आचरटपणा कोणी केला की आम्ही सांगतो, "आमची गाडी नेहमी पायलट कारच्या मागून जाते. इतका वेळ कुठे उलथला होतास?"

प्रभाकर पेठकर's picture

7 Jan 2014 - 12:19 pm | प्रभाकर पेठकर

>>>> आम्ही सांगतो, "आमची गाडी नेहमी पायलट कारच्या मागून जाते. इतका वेळ कुठे उलथला होतास?"

आम्ही म्हणतो, त्याला भिती वाटत असेल की त्याची बायको, त्याच्या गैरहजेरीत, महाचालू शेजार्‍याकडे गेली असेल. म्हणून तो इतक्या फास्ट घरी निघाला आहे.

आशु जोग's picture

7 Jan 2014 - 3:05 pm | आशु जोग

____/\____

आशु जोग's picture

7 Jan 2014 - 3:06 pm | आशु जोग

+++++११११११
_____/\_____

उगाच काहीही मनू नगा. ओव्हरटेक केलेलं नाय कूनी तुम्हाला दिल्लीला जाताना. तुम्हीच पैलं जानार. आणि पोटदुखीचं कोन्तं चिन्न पेप्रात छापून का नाही आलं?

नवशिक्या ड्रायवर वरती अनुभवी माणसाचा हात असेल तुम्ही मागेच पडणार.ह्या पोटदुखीला इलाज नाही.

आशु जोग's picture

14 Jan 2014 - 6:15 pm | आशु जोग

+१ सचीन

आशु जोग's picture

20 Feb 2014 - 10:41 am | आशु जोग

या सर्व प्रकरणात भाजपने मात्र स्वतःचे हसू करून घेतले

हसून हसून दुखले पोट

मराठी_माणूस's picture

20 Feb 2014 - 8:02 pm | मराठी_माणूस

@संपादक मंडळः असे धागे ठेवले जातात आणि ज्या धाग्याच्या प्रतिसादातून मीळालेली माहीती बऱ्याच जणांना उपयोगी पडली असती , तो धागा का ऊडवला जातो

बहुदा नामशेष होउ घतलेले वाघ वाचवा मोहीमेसंबधी ते वाक्य असावे..! असा प्राथमीक कयास आहे. वन्यजिवांविषयी प्रेमभाव जोपासावा अस सुरेख संदेश दिलेला दिसतोय.

आशु जोग's picture

10 Feb 2015 - 2:45 pm | आशु जोग

आमच्या पार्टीला मत द्याल तर देशभक्त अन्यथा तुम्ही अराजकवादी

अशी मांडणी करणार्‍या प्रचारकांना जनता बहुधा जुमानत नाही