कान गुंतले बोंड्यांमध्ये!!

वडापाव's picture
वडापाव in जनातलं, मनातलं
2 Jan 2014 - 8:13 pm

लहानपणी आजोबांसाठी बाबांनी एकदा वॉकमन आणून दिला होता. आजोबा रोज सकाळी आणि रात्री झोपण्यापूर्वी त्यातून गाणी ऐकत बसायचे. तो वॉकमन आणून आता दहा-बारा वर्षं झाली असावीत. किंवा जास्तच... आज तो घरातल्या कपाटात इतर अडगळीच्या गोष्टींसमवेत पडलेला आहे. त्याच्यावर असं धूळ खात पडण्याची वेळ आणली मोबाईलच्या क्षेत्रात झालेल्या तंत्रज्ञानाच्या क्रांतीने!! नवनवीन मोबाईल्स, आणि त्यांच्याबरोबर येणारे विविध रंगांचे, आकारमानांचे, कमी-जास्त ताकदीचे(ऐकवण्याची आणि टिकण्याची ताकद) हेडसेट्स. त्यांना कोणी हेडफोन्स म्हणतं, कोणी कॉड्स म्हणतं. आमच्या घरी, त्यांना 'बोंडं' म्हणतात. आणि ते दिवसभर कानात घालून गाणी ऐकत बसणा-या/फिरणा-या मला - बोंडूराम!! किंवा बोंड्या!!

काय करावं, हे सुचेनासं झालं, कशातच मन रमेनासं झालं, की मी कानात ही बोंडं घालून मनाला सुखावणारी गाणी ऐकत बसतो. त्या वेळी मला बाहेरच्या जगाचा विसर पडतो, आणि मी माझ्याच एका वेगळ्या जगात एंट्री मारतो. अशा वेळी मला टेलिफोनची घंटी, दाराबाहेरची घंटा, घरात कोणीही मला मारलेली हाक, किंवा माझ्यासमोर येऊन मला देण्यात येणा-या सुचना यांपैकी काहीही ऐकायला येत नाही. मग वैतागून बाबा मोठ्याने आतल्या खोलीतून अख्ख्या कॉलनीला दचकवेल इतक्या मोठ्या आवाजात हाका मारत सुटतात. आईने यावर एक शक्कल लढवलीये. मला बोलवायचं असलं, की ती टाळ्या वाजवते. त्या मला ऐकायला येतात. मध्यंतरी बोंडं घालणं कमालीचं वाढलं होतं, तेव्हा टाळ्या वाजवायची आईला इतकी सवय झाली होती, की मी गाणी ऐकत नसतानासुद्धा आई मला बोलावण्यासाठी टाळ्या वाजवायलाच सुरुवात करायची. दादा मला खिजवण्यासाठी त्याला जे काही बोलायचं असेल ते मुद्दामून पुटपुटत बोलायचा, आणि मी 'काय??' असं विचारल्यावर 'बघ ती बोंडं घालून तू बहिरा होत चाल्लायस' असं म्हणायचा.

माझी आजी यांना 'भोकरं' म्हणते. ही भोकरं मी घातलेली तिला दिसली, की ती तिचं नेहमीचं पालुपद चालू करते.

'हे बघ, तू ते कानात घालत जाऊ नकोस. त्याने तुझ्या शरीराला त्रास होतो. पेपरात रोज लेख येतायत... ही भोकरं वापरणा-याला दहा वर्षांत कॅन्सर होणार हे सिद्ध झालंय. मी काय सांगत्येय ते ऐक. तुला आत्ता कळणार नाही. मी उगाच सांगत नाहीये. ती बोंडं घालून तू बहिरा होशील.'

प्रसंगी ती मला संदर्भासाठी पेपरातले असे लेखही आणून देते. मी त्या सगळ्याबद्दल तिच्याशी सहमती दाखवतो आणि तिचं बोलून झालं की पुन्हा ती भोकरं कानात घालतो. घरी जायला निघालो, की -

'हे बघ. रस्त्यावर असताना, कुठेही जाताना कानात घालून जायचं नाही. हा... नुसती मान डोलावू नकोस मी काय सांगत्येय ते ऐक. रस्त्यात गाड्या-बिड्या असतात त्यांचे हॉर्न वगैरे ऐकायला येणार नाहीत...' इत्यादी इत्यादी सुचना दिल्याशिवाय निरोप देत नाही. इतक्यावरच तिचं समाधान होत नाही. ती खिडकीत येऊन मी बोंडं घातली नाहीयेत ना, याची खातरजमा करून घेते. घातली असतील, तर खिडकीतून तिच्या अंगातली सगळी शक्ती एकटवून ओरडत सुटते. कारण तसं तिनं ओरडल्याशिवाय मला ते ऐकायलाच येत नाही. मग मी तिच्या नजरेच्या टप्प्याआड जाईपर्यंत बोंडं काढतो आणि मग लगेच ती कानात घालून चालू पडतो.

खरं तर हे एक व्यसनच आहे. ही बोंडं कानात घातली की माणसाला किक लागते आणि तो त्याच्या अशा एका वेगळ्याच जगात रममाण होतो. या जगाचा आनंद लुटत असताना कोणीही डिस्टर्ब करून तो सुखानुभव 'पॉज' करायला लावला, की खूप वैताग येतो. या व्यसनाची ओढ एवढी असते, की समोरचा काय बोलतोय, हे ऐकू येत नसलं, तर आपण हज्जारदा त्याला 'काय? काय?' असं विचारत बसतो, पण कानातलं एकही बोंडूक काढणं जीवावर येतं. शेवटी तो माणूसच कंटाळून आपल्याला 'ते कानातलं काढ आधी.' असं म्हणतो. या व्यसनाचा अतिरेक व्हायला सुरुवात कधी होते हे व्यसनाधीन झालेल्या माणसालाही लक्षात येत नाही. माझा स्वतःचा अनुभव असा, की माझं डोकं दुखायला लागतं, कान दुखायला लागतात, प्रसंगी कानात छोटीशी जखम होते(खरचटल्यागत), आणि आपल्याला खरंच कमी ऐकायला येतंय असं वाटू लागतं. मग मी ठरवून, मनाशी निश्चय करून गाणी ऐकणं बंद करतो. हा निश्चय काही दिवस, काही आठवडे, प्रसंगी एखाद-दोन महिने टिकतो. मग थोडं-थोडं, अधुन-मधुन करत पुन्हा गाडी व्यसनाच्या वळणावर येते.

पण तरी या व्यसनाचा अतिरेक इतरांच्या तुलनेत माझ्या बाबतीत कमीच झालाय असं वाटतं. एकदा काही मित्र गप्पा मारत बसलो होतो. मी गमतीत म्हटलं -

'अरे, माझा एक मित्र कमोडात सुद्धा गाणी ऐकत बसतो.' असं म्हणून मी हसायला लागलो. सगळे मित्र माझ्याकडे 'यात हसण्यासारखं काय?' अशा भावनेनने बघत होते. मला कळेना.

'त्यात काय एवढं? मी सुद्धा ऐकतो.' - एक मित्र.
'हो मी सुद्धा ऐकतो. करायचं काय साफ होईपर्यंत?' - दुसरा.
'अरे त्याचं ठीक आहे तो कमोडात जातो, तुझ्या घरी तर संडास आहे ना, तू सुद्धा?' - मी.
'हो मग? संडास असला म्हणून काय झालं? माझ्याकडे सुद्धा संडासच आहे, मला जमतं ना.' - तिसरा.
'कसं जमतं पण? तो मोबाईल हातातच धरून बसता की कुठे ठेवता काय करता काय नेमकं?' - मी.

तेव्हा एक उतावळा मित्र मला (पँट न काढता) प्रात्यक्षिक दाखवायला गेला. बाकीच्यांनी त्याला आवर घातला. पण तेव्हा या व्यसनाच्या शिगेवर आपण अद्याप तरी पोचलेलो नाही, हे मला जाणवलं.

बाकी या बोंडांचा कधीकधी फायदासुद्धा होतो. गाणी ऐकत असल्याचं नाटक करत, नुसतीच बोंडं कानात घालून ठेवून आपल्याला, आपल्यासमोर असलेल्या लोकांचे संवाद ऐकू येत नाहीयेत, असं सोंग घेता येतं... आणि सगळं ऐकता येतं. अर्थात, ही शक्कल सुद्धा आता सर्वज्ञात झाली असल्याने, माणूस बोंडांत गुंतलाय म्हणजे तो आपल्या गप्पांना बहिरा असेलच असं नाही, हे लक्षात घेऊन लोक सांभाळूनच बोलतात. तसंही मला, लोकांच्या गप्पा चोरून ऐकायची हौस नाही, पण माझं बोलणं असं ऐकलं गेल्याचा अनुभव आहे म्हणून इथे नमूद करतोय.

ह्या बोंडांच्या वायरीचा नेहमी गुंता झालेला असतो. तो सोडवत बसणं म्हणजे कटकट असते. कधी कधी आपण शिवणकाम करतोय असं वाटतं. या वायरींप्रमाणेच आपणही कळत-नकळत या बोंडांमध्ये गुंतत जातो. रस्त्यातून चालताना, ट्रेनमध्ये, बसमध्ये, थोडक्यात प्रवासात, वेळ घालवायला इतर काहीही सुचत नसताना, आपण एकटे असताना, आपसुकच हात खिशात किंवा बॅगेत जातो आणि ही बोंडं बाहेर निघतात. काही माणसांना तर पोट साफ करतानासुद्धा ते लागतं. ही सवय, हे व्यसन, सहजपणे सुटत नाही. ते प्रयत्नपूर्वकच सोडवावं लागतं. ते कायमचं सुटतंच असंही नाही. आपला निर्धार कायम ठेवावा लागतो. माझं हे व्यसन मी तीच तीच गाणी ऐकून ऐकून कंटाळलोय आणि मुद्दामून कोणाकडूनही नवी गाणी घेत नाहीये त्यामुळे कमी कमी होत चाल्लंय. पण बरीच माणसं रेडिओ ऐकत बसतात.

बहिरेपण, आणि कॅन्सरसारख्या रोगांची शक्यता नसती, तर हे व्यसन बाळगायला काहीच हरकत नव्हती. पण दुर्दैवाने तसं नाहीये. व्यसन म्हणजे एखाद्या बाबीबाबत आटोक्यात न ठेवता येणारी, अतिरेकामुळे दुष्परिणाम भोगायला लावणारी सवय. तेव्हा ही बोंडं शक्य तेवढी कानापासून लांब ठेवावीत, आणि गरजेपुरतीच (समजा दोन्ही हात खराब आहेत, किंवा मुलींनी मेहंदी काढलीये, आणि कोणाचा तरी फोन आलाय) वापरावीत... मला अधून-मधून अशी उपरती होतच असते. त्यानुसार मी स्वतःवर नियंत्रण ठेवत असतो. या व्यसनातून माझी आणि माझ्यासारख्या अनेकांची लवकरात लवकर पुर्णपणे सुटका व्हावी, अशी आशा करतो, अजुन काय!!

जीवनमानराहणीमौजमजाविचारअनुभवमत

प्रतिक्रिया

Atul Thakur's picture

2 Jan 2014 - 8:20 pm | Atul Thakur

मजा आली वाचुन :)

सूड's picture

2 Jan 2014 - 8:32 pm | सूड

चान चान !!

सूड's picture

2 Jan 2014 - 8:32 pm | सूड

चान चान !!

प्यारे१'s picture

2 Jan 2014 - 9:17 pm | प्यारे१

चान चान!!

बॅटमॅन's picture

2 Jan 2014 - 11:11 pm | बॅटमॅन

:)

चान छान.

अत्रुप्त आत्मा's picture

2 Jan 2014 - 11:37 pm | अत्रुप्त आत्मा

http://www.sherv.net/cm/emo/happy/music.gif

कवितानागेश's picture

3 Jan 2014 - 12:26 am | कवितानागेश

छान. :)

छान .
मिपाव्यसनी -तथास्तु

वेल्लाभट's picture

3 Jan 2014 - 12:24 pm | वेल्लाभट

सहमत; आणि असहमत.
व्यसन आहे; किक बसते; झिंग येते; अतिरेक नको; सहमत.
पण म्हणून ती गोष्टच वाईट आहे; असहमत. अतिरेक नाही पण मी एखादवेळेस एकटा ट्रेन, बस ने जाणार असेन तर ऐकायला भारी गाणी हवीत; आणि लई भारी आवाज हवा ही माझी `गरज' असते. ती संधी मी दवडत नाही. मल तो `ट्रान्स' आवडतो.

मला अशी सवय लागली होती जेव्हा माझ्याकडे sony ericsson w550i होता. त्याचे हेडफोन इतके जबरदस्त होते,की एकदा गाण प्ले केल्यावर माझा संपूर्ण जगाशी संपर्क तुटायचा,राहायचा तो फक्त गाण्याशीच.
Sony
नंतर एमपी३ प्लेअरवर गाणी ऐकायचो आता एमपी४वर ऐकतो... पण ती मजा अजुन अनुभवता आली नाही. त्यासाठी मी हेडफोन्स देखील बदललले... सध्या skullcandy चा in ear headphone वापरतोय, पण त्यात सुद्धा ती मजा नाही जी सोनीच्या हेडफोन मधे होती. सध्या Sennheiser चे Headphones घ्यायचा विचार चालला आहे,ज्या वेळी skullcandy चे in ear headphone घेतले होते तेव्हा Sennheiser सुद्धा पाहिले होते,पण त्यांचे in ear headphone त्यावेळी उपलब्ध नव्हते.
ज्यांना उत्तम दर्जाचे हेडफोन {in ear headphone}अनुभव असेल त्यांनी चांगले हेडफोन सुचवले तर त्या पर्यांयाचा मला नक्कीच उपयोग होईल.

उपाशी बोका's picture

3 Jan 2014 - 2:28 pm | उपाशी बोका

Klipsch चे हेडफोन वापरून बघा. माझा अनुभव चांगला आहे.

मदनबाण's picture

3 Jan 2014 - 2:36 pm | मदनबाण

नक्की मॉडेल कंच ? तुलना करण्यास सोप्पे जाईल म्हणुनशान इचारतो...

उपाशी बोका's picture

3 Jan 2014 - 2:44 pm | उपाशी बोका

Klipsch S4-II. जर मायक्रोफोनसहित हवे असेल तर Klipsch Image S4i-II

मदनबाण's picture

3 Jan 2014 - 2:56 pm | मदनबाण

व्होक्के... शोधतो जालावर. :)

मबा.. बोसचे एअरफोन सुद्धा आलेत. ८-१० हजार, अर्थातच महाग.. पण बोस.. आउट ऑफ द वर्ल्ड असं म्हणण्यासारखी एकच कंपनी आहे ती.

@गवि :-
बोसच्या वेबपेजवर सुद्धा जाउन आलो... पण सध्या तरी बोसवर उडी मारावी असे वाटत नाही. शिवाय एक अनामिक भिती सुद्धा वाटते... ती म्हणजे ते मला आवडले नाहीत तर ! माहित आहे की साउंड मधे बोस चे नाव आहे,पण प्रत्येकाला ते आवडलेच असे नाही.तसेच असाही विचार येतो की ब्रँन्ड नेममुळे यांची किंमत अधिक,असाच पर्फोमन्स जर दुसरा ब्रँड देउ शकत असेल तर... ?
वरती उपाशी बोक्यानी सुचवलेला आणि त्याने अनुभवलेला klipsch देखील चांगला वाटतोय. जर घेतला तर हा घेइन असे वाटते...{यांच्या वेबपेजवर सुद्धा जाउन आलो}
एक तुलना दोन ब्रांड्न्स्ची...
http://head-phones.findthebest.com/compare/16-1044/Bose-IE2-vs-Klipsch-I... { बोक्याने सुचवलेला Klipsch S4-II. आहे हे लक्षात आहे माझ्या,उगाच एक अशीच तुलना वरच्या दुव्यात पाहिली.}

लॉरी टांगटूंगकर's picture

10 Jan 2014 - 10:01 pm | लॉरी टांगटूंगकर

bowers and wilkins, Cambridge SoundWorks, JBL-Harman, onkyo आणि अर्थातच klipsch हे बोसचे प्रतिस्पर्धी मानले जातात. बोस घेण्याच्या आधी हे पण बघा.

मदनबाण's picture

14 Jan 2014 - 10:45 am | मदनबाण

थँक्स मन्द्या...
मला bowers and wilkins, Cambridge SoundWorks यांच्या बद्धल माहित नाही. JBL-Harman चे नाव ऐकले आहे.onkyo च्या सिस्टीम्सची माहिती तर मला जरा वेगळ्या पद्धतीने झाली...म्हणजे ज्या वेळी Winamp माझ्यासाठी अगदी नवे होते. { आठवा तो काळ ज्यावेळी डायलअप मॉडेम वापरले जायचे... त्या मॉडेम्सचा तो आवाज ! काही तासांच्या इंटरनेट वापरता येण्याच्या सिडीज मिळायच्या... कोणाला आठवत असेल तर आठवुन पहा ते कलटायगर,मंत्रा ऑनलाईनचे दिवस होते.} त्यावेळी Winamp ची onkyo Skin मी वापरली होती. मग हे onkyo नक्की काय आहे ते शोधले आणि मग त्यांच्या बद्धल कळले.
खरं तर ज्या दुकानात मी skullcandy चे हेडफोन्स घेतले होते त्या दुकानातल्या मुलाने चक्क सिल्ड पॅक असलेले skullcandy आणि Sennheiser पॅक्स माझ्यासाठी फाडले आणि मला ऐकवले होते. शक्यतो अशा पद्धतीने तुम्हाला कोणताही दुकानदार हेडफोन्स ऐकायला देत नाही.पण यामुळे माझी हेडफोन्स मधली रुची वाढण्यास मदत झाली.
अवांतर :- जुने इंटरनेटचे दिवस आठवल्याने त्यांचे लोगो खाली देत आहे...
Caltiger
MantraOnline

मदनबाण's picture

4 Mar 2015 - 7:56 pm | मदनबाण

खरं तर ज्या दुकानात मी skullcandy चे हेडफोन्स घेतले होते त्या दुकानातल्या मुलाने चक्क सिल्ड पॅक असलेले skullcandy आणि Sennheiser पॅक्स माझ्यासाठी फाडले आणि मला ऐकवले होते.
आता Sennheiser HD 202 II अनुभवतो आहे. जेव्हा मी पहिल्यांदा { दुकानातला वरचा किस्सा { ते Sennheiser हेडफोन मॉडेल वेगले होते} } ऐकले होते तेव्हाच त्याच्या आवाजाच्या सुस्पष्टतेची जाणीव झाली होती...
बजेट मोठे नसल्याने बरेच वेगवेगळे हेडफोन्स पाहिले... एक तर फार आवडला होता...पण बजेट मधे बसणार नाही म्हणुन मोठ्या कठीण मनाने मी त्यायला घ्यायचे टाळले.... त्यामुळे हा { HD 202 II } घेतला.
गाण्यातले डिटेल्स ऐकायचे असतील... सुस्पष्टता अनुभवाची असेल तर हा तुम्हाला नक्कीच आवडेल.
या फेडफोनची एक त्रुटी आढळली... ती म्हणजे काय च्या काय लांब लचक फेडफोन केबल.

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- पांगळेपणाचे डोहाळे

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

4 Mar 2015 - 9:37 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

सेनहेइजर शी फक्त आणि फक्त बोसचेच हेडफोन स्पर्धा करु शकतात. एवढी ऑडीओ क्लिआरिटी दुसर्‍या कुठल्याही हेडफोन्स ला मिळत नाही. शिवाय मटेरिअल क्वालिटीला तोड नाही. हो गरजेपेक्षा खुप जास्तं केबल मिळते सेन बरोबर.

एवढी ऑडीओ क्लिआरिटी दुसर्‍या कुठल्याही हेडफोन्स ला मिळत नाही.
अगदी... इतके दिवस काय ऐकत होतो ? असा प्रश्न पडला ! प्रत्येक बीट एकदम क्लीअर... एल्टिमेट आनंद ! :)
आता खालचं गाणं ऐकल... :)

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Chupana Bhi Nahin Aata... { Baazigar }

कपिलमुनी's picture

8 Jan 2014 - 7:19 pm | कपिलमुनी

Klipsch Image S4i-II

हेच का ते ?

उपाशी बोका's picture

8 Jan 2014 - 8:23 pm | उपाशी बोका

पण माझ्याकडे काळ्या रंगाचे हेडफोन्स आहेत, पांढरे नाहीत.

लोटीया_पठाण's picture

3 Jan 2014 - 3:11 pm | लोटीया_पठाण

sony extra bass

सध्या हे वापरतोय. चांगले वाटले.

उपास's picture

3 Jan 2014 - 8:41 pm | उपास

अहो गुंता कसला आलाय, ब्लू टुथ वापरतोय ओव्हर द इअर बीएच ५०३, नोकियाचे मस्त चाल्लय.. इतकं वापरुन सुद्धा ४-५ दिवसातून एकदा चार्ज केलेला पुरतोय आणि तो युनिव्हर्सल आहे म्हणजे जगात कुठेही वापरा..
पोळ्या लाटताना/ भांडी धुताना सुद्धा फोन वर गप्पा मारत किंवा गाणी ऐकत असा मस्त वेळ जातो ना की कामाचं ओझं जाणवत नाही आणि वायरी गळ्यात येत नाहीत. शिवाय कानाची भोकंही दुखत नाहीत, एकूणात मस्ट हॅव प्रकरण!
मज्जा माडी!

कंजूस's picture

4 Jan 2014 - 11:02 am | कंजूस

नोकिआ आशा ५०३ का ?
मुळात गाणी प्ले होणाऱ्या डिवाइस मधून १०० हटझ फ्रिक्वेन्सी गाळून टाकली असेल तर चांगला हेडफोन घेऊनही 'बेस 'आवाज(खर्ज) (भीमसेन जोशी ,मल्लीकार्जुन मन्सुर )येणार नाही .

पैसा's picture

5 Jan 2014 - 8:55 pm | पैसा

छान लिहिलंय

सौंदाळा's picture

8 Jan 2014 - 6:48 pm | सौंदाळा

मस्तच, छोट्या छोट्या गोष्टींवरुन मोठे तरीपण मस्त लेख लिहीणार्‍या लोकांचा मला नेहमीच हेवा वाटतो.

हाहाहा. खूप हसले. छान आहे.

माझीही शॅम्पेन's picture

11 Jan 2014 - 10:36 am | माझीही शॅम्पेन

जबरा लेख एक संडास चा अनावश्यक उल्लेख सोडला तर !!!
(ट्रान्स्-लविंग ) माझीही शॅम्पेन