अनाहिता ठाणे कट्टा

भावना कल्लोळ's picture
भावना कल्लोळ in जनातलं, मनातलं
26 Dec 2013 - 2:23 pm

नमस्कार,
आजच्या ठळक बातम्या ………

तर दिनांक २२ डिसेंबर २०१३ रोजी अतिचर्चित आणि दर वेळे प्रमाणे फाटे न फुटता खूप वेळेपासून गाजत असलेला अनाहिताचा पहिला वाहिला कट्टा हा ठाणे येथील स्वाद उपहारगृहामध्ये नियोजित वेळेपेक्षा एक तास उशिरा का होईना पार पडला. परदेशी वास्तव्यास असलेल्या आमच्या काही मिपा अनाहिता अनाहुतपणे भारतवारी करण्यास आल्या होत्या आणि त्या आपसुकच या आमच्या कट्ट्या मध्ये गवसल्या. या कट्ट्याचे सर्वेसर्वा लिमाउजेट उर्फ माऊ यांनी अनाहितावर धागा काढला आणि बाकी सर्वं अनाहिताना पिंगवले. ज्या ज्या अनाहिता पिंगा घालत घालत कट्ट्यात सामील झाल्या होत्या त्याची नावे पुढील प्रमाणे : सानिकास्वप्नील, सविता ००१, पद्मश्री चित्रे, दुर्गावी, मीच मधुरा, भावनाकल्लोळ, सूर, अजया, लिमाउजेट, दिपालीकिरण. तसेच आपापल्या आयांचे प्रतिनिधित्व करत तीन छोट्या अनाहिता पण या कट्ट्यात सामील झाल्या होत्या. मीच मधुरा यास कडुन स्विनी तर सूर यास कडुन आर्या व फक्त ४ महिनाच्या अनन्या यांनी या कट्ट्यात सामील होत सर्वांत लहान मिपाकर होण्याचा मान मिळवला. तर यांच्या बाललीलांनी कट्ट्याला अधिकच समृद्ध केले. तर कट्ट्याचा वृतांत पुढील प्रमाणे.

.

काही मुंबईकर व परदेशी वास्तव्यास असणाऱ्या आमच्या काही अनाहीतानी संगनमत करून रविवारचा दिवस कट्ट्यासाठी आखला. त्याप्रमाणे मजल दरमजल करत सर्वं अनाहिता पैकी सगळ्यात पहिली हजेरी अजया यांनी वेळेआधी लावली. पण त्यांनी या वेळेचा सदउपयोग स्वतःला एक छान साडी घेऊन केला आणि लवकर आल्याचा स्वतःलाच स्वतः भुर्दंड पाडून घेतला.हा खर्च त्या उशिरा आलेल्या अनाहिताकडून करून घेणार असल्याचा मानस त्यांनी कट्ट्या दरम्यान बोलून दाखवला हि पण नंतर रंगलेल्या गप्पानी त्यांना याचा विसर पाडला. (हे बाकी आमच्या बायकाचे बाकी बरे असते, गप्पा मध्ये महत्वाचे विसरूनच जातो, असो शेवटी फायदा बाकी अनाहिताचा झाला). मग फोनाफोनी करून सगळ्या नक्की आल्या आहेत न यांची खात्री करून घेण्यात आली. सगळ्याजणी १०-१५ मिनिटांच्या अंतराने इच्छित जागी पोहचल्या.

a

मग स्वाद मधल्या बेसमेंट मध्ये ठाण मांडण्यात आले. अस्मादिकाना मात्र वसई विरार परिवहन यांच्या रविवारच्या सुस्त सेवेपोटी इच्छित जागी पोहचण्यास १ तासाचा विलंब लागला. पण स्वाद मध्ये जाताच कोणीही खाद्य म्हणुन आपला फडशा पडू नये उशिरा आल्यामुळे म्हणुन दरवाजा उघडून आत शिरताच "समुद्रामध्ये मोती शोधणे सोपे पण हे हॉटेल शोधणे महाकठीण असा शेरा हास्य वदनाने देत शामिल झाले". (काय करणार सगळ्या भुकेलेल्या वाघिणी होत्या न आणि उशिरा आलेली मीच एक म्हणुन हा खटाटोप). पण सगळ्यानी हसत हसत मला अनुमोदन दिले आणि स्थापन्न होताच समोर रुचकर घरगुती जेवणाची चव असलेली स्वादची मर्यादित थाळी ठेवली गेली.

a

(आमच्यापेक्षा हॉटेल मालकालाच खुप घाई होती म्हणुन आमच्या अन्नपुरवठ्याकडे जास्त लक्ष दिले जात होते, काय करणार बाहेर माणसे ताटकळत उभी होती आणि आम्ही मात्र निवांत पणे गप्पा टप्पा मारत जेवण करत होतो).

.

तर असे जास्त वैचारिक देवाणघेवाण न करता मस्त पैकी एकमेकांची शाळा घेत जेवण उरकले. जेवणातर गुलाबजाम आणि बासुंदी वर यथेच्छ ताव देत मेजवानी फस्त केली.

.

तिथे उभ्या असलेल्या (मालक कि मेनेजर?) कोण जाणे याच्या चेहऱ्यावर बायांनो आता खण आणि नारळ हवे तर घेऊन येतो पण या दहा जागा खाली करा ग असे काहीसे भाव पाहुन आम्ही बाहेर पडलो. पण हॉटेल बाहेर येताच एकमेकीचे भ्रमण ध्वनी क्रमांक घेत पुढचा कट्टा हा हॉटेल मध्ये न करता एका अनाहितेच्या घरी करण्याचे ठरवुन एक छानसे समुहचित्र टिपले गेले. मग प्रत्येकजणीने टाटा बाय बाय म्हणत या कट्ट्याची सांगता केली.

.

या बरोबरच कट्ट्याचा वृतांत संपला, पुन्हा भेटुया नवीन कट्ट्याचा वृतांता सोबत. तो पर्यंत याच कट्ट्याच्या वृतांतावर समाधान माना.

नमस्कार.

छायाचित्रकार सानिकास्वप्नील/ अजया सोबत वार्ताहर भावनाकल्लोळ ठाणे येथुन.

हे ठिकाणइतिहासजीवनमानमौजमजासद्भावनाशुभेच्छाबातमीमाहितीविरंगुळा

प्रतिक्रिया

सुबोध खरे's picture

26 Dec 2013 - 2:28 pm | सुबोध खरे

अरे वा कट्टा उत्तम झाला
पण गुलाबजाम आणि बासुंदी चा फोटो बघून जळजळ होत आहे

पेस्तन काका's picture

26 Dec 2013 - 3:11 pm | पेस्तन काका

गुलाबजाम आणि बासुंदी खाउन आजीबात जळजळ होते हे अजीबात खरे नाही. दोघेही आतिशय शीत मिष्टान्न आहेत.

बाकी वृतांत फक्कड जमलाय.

प्रचेतस's picture

26 Dec 2013 - 2:42 pm | प्रचेतस

वा..!!!
खुसखुशित वृत्तांत.

स्वादच्या आमच्या कट्ट्याची आठवण झाली आणि मोदकाने संपवलेल्या बासुंदीच्या वाट्यांची. =))

माझीही शॅम्पेन's picture

29 Dec 2013 - 10:36 pm | माझीही शॅम्पेन

अरे वा तुमचा कट्टा कधी झाला म्हणायचा ,

मागे आम्ही , गवि , रामदास काका , स्पा , विमे , माउ, सूड आणि बाकी काही ह्याचा पावसाळ्यात स्वाद मध्ये एक जबरा कट्टा झाला होता..

आनाहिता कट्टा पण छान झाला अस दिसतोय , वृतांत आवडला आणि पु-क-शु :)

सूड's picture

26 Dec 2013 - 2:50 pm | सूड

मुकटा नेसून येतो हो प्रतिसाद द्यायला!! ;)

बायकांचा कट्टा. एव्हढा काही सोवळा झाला नसावा!

प्रभाकर पेठकर's picture

26 Dec 2013 - 2:51 pm | प्रभाकर पेठकर

ज्जे बाSSत. हार्दिक अभिनंदन.

उपहारगृहाच्या मालकाचे (किंवा मॅनेजरचे) टेन्शन घेऊ नये. दर अर्ध्या तासाने तो कांही सांगायला आला की एखाद दुसरा चहा मागवावा. बिचारा, मुकाट परत जातो.

पुढील कट्ट्यास अनेकानेक शुभेच्छा..!

मुक्त विहारि's picture

26 Dec 2013 - 2:59 pm | मुक्त विहारि

छानच झालेला दिसतोय कट्टा....

यशोधरा's picture

26 Dec 2013 - 3:01 pm | यशोधरा

मस्त वृत्तांत आणि फोटो! :)

:)
वृत्तान्ताची इष्टाईल आवल्डी! :)

बॅटमॅन's picture

26 Dec 2013 - 3:06 pm | बॅटमॅन

उत्तम वृत्तांत!!

पियुशा's picture

26 Dec 2013 - 3:10 pm | पियुशा

जियो !!!! लै भारी अजुन भरवा कटटे होउ दे खर्च मिपा आहे घरच ;)

मदनबाण's picture

26 Dec 2013 - 3:11 pm | मदनबाण

वृत्तांत आवडला !

जाता जाता :- माउ ताईचा गाल प्रत्येक नव्या फोटुत अजुनच फुगीर कसा दिसतो ? ते आज बासुंदी व गुलाबजाम पाहुन लक्षात आले. :P

कवितानागेश's picture

26 Dec 2013 - 3:41 pm | कवितानागेश

अरे, मी हसले की तसं दिसतं... :)

डॉ सुहास म्हात्रे's picture

26 Dec 2013 - 3:11 pm | डॉ सुहास म्हात्रे

वा वा ! मस्तच झालेला दिसतोय कट्टा !!

कवितानागेश's picture

26 Dec 2013 - 3:13 pm | कवितानागेश

आमच्या गप्पा बघून खरोखरच मालक टेन्शन्मध्ये होते बिच्चारे.
एक आजोबा सविताला विचारत होते की हा कुठला ग्रुप आहे तुमचा?
पण तिनी पत्ता लागू दिला नाही! ;)
आमचं सोवळ्यातलं असतं ना सगळं.... =))
मिस कल्लोळ, सानिकानी आपल्यासाठी खाउ आणला होता हे सांगितलच नाहीस गं. :)

ह्या वाक्याने मात्र जळजळ झाली आहे....

जळवा तिच्यायला....

ओके...ठीक आहे....

पेठकर काका पुढच्या महिन्यात येत आहेत....

तेंव्हा ह्या वाक्याचे साग्रसंगीत उट्टे काढल्या जाईल....

(आपले काय जाते, (खरोखरच्या) हलवायाच्या घरावर तुळशीपत्र ठेवायला.)

त्रिवेणी's picture

26 Dec 2013 - 3:32 pm | त्रिवेणी

पेठकर काका आमच्यासाठी पण आणणार आहेत खाऊ.
होय की नी हो पेठकर काका?

प्रभाकर पेठकर's picture

26 Dec 2013 - 9:09 pm | प्रभाकर पेठकर

सर्वसाक्षींना भेटा. मागिल कट्ट्याचे वृत्तांत मिळतील. असो.
सर्व कट्टोपासक सदस्यांना जाहिर निमंत्रण मिळेलच.

मी-सौरभ's picture

27 Dec 2013 - 10:47 pm | मी-सौरभ

खाऊ नाही पिऊ आणा ;)

भावना कल्लोळ's picture

26 Dec 2013 - 3:49 pm | भावना कल्लोळ

एवढा आठवणीने आमच्या साठी खाऊ आणला आणि मी विसरले वृत्तांता मध्ये लिहण्यास, (जोहार मायबाप जोहार), काय करणार वृत्तांत लवकर लिहीण्याच्या घाईत. (जाऊ दे लहान बहिण समजून माफ कर हो सानिका ;) ) आणि हो माऊताई एवढ्या गोंधळात कळलेच नाही त्या आजोबांनी कधी विचारले ते. राहिले थाळी साधी असण्याचे तर मिपाबंधुनो जसा विचार तसा आहार…… आम्ही साऱ्याचजणी तश्या सोज्वळ, सात्विक म्हणून रविवार असूनही साधी थाळीच. ( घरी जाऊन बापुशी आणि नवरोबाने केलेले मस्त पैकी कोंबडी रस्सा आणि भात हाणला तेव्हा रविवार कुठे तरी सार्थकी लागला हे कोणास सांगणे न लागे). तश्या आम्ही खुपच साध्या बाई …. हो कि नाही ग गर्ल्स्स ….

विश्वनाथ मेहेंदळे's picture

26 Dec 2013 - 4:30 pm | विश्वनाथ मेहेंदळे

(जोहार मायबाप जोहार)
??????

तो अभिवादनार्थ वापरला जाणारा वाक्प्रचार आहे. क्षमायाचनेसाठी नव्हे.

विश्वनाथ मेहेंदळे's picture

27 Dec 2013 - 1:25 pm | विश्वनाथ मेहेंदळे

तू गप रे. तुझे लग्न झाले आहे का? नाही ना. मग जोहारच बरोबर !!!

नित्य नुतन's picture

27 Dec 2013 - 1:54 pm | नित्य नुतन

*ROFL*
*HAPPY*
*new_russian*
*clapping*
*wink*

आयमाय स्वारी हां विमेकाका =))

आता जालीय जोहारच करतो, कसें ;)

जेपी's picture

26 Dec 2013 - 3:18 pm | जेपी

लय भारी............

ब़जरबट्टू's picture

26 Dec 2013 - 3:22 pm | ब़जरबट्टू

मस्त वृत्तांत आणि फोटो!

बा़की सोहळा एवढा मोठा, पण थाळी त्या मानाने साधी की हो... ( पळायचा रस्ता शोधलेला आहे.. :) )

जाता जाता.. :- या कधीतरी आमच्या पुण्याच्या दुर्वांकूर ला :))

दिपक.कुवेत's picture

26 Dec 2013 - 3:25 pm | दिपक.कुवेत

कोण कुठल्या अनाहिता ते नावानीशी सांगा कि. एक माउतै सोडली तर (ते सुध्दा तीच्या गाल आणि बॉबकट मुळे) बाकि काय ओळखु येई ना.

पैसा's picture

26 Dec 2013 - 3:28 pm | पैसा

तुम्ही मुंबैकर आणि पुणेकर खरे तर "महा" कट्टा भरवू शकता असाच!

काय बोलणार?

आता तुम्ही काडी टाकलीच आहे, मी पण एक काडी टाकतो....

इ,ए. साक्षी आहेत.

मुंबईकर कट्टा करायचे ठरवतात आणि ऐनवेळी कित्तीही संकटे आली तरी पार पाडतात.लोकेशन बदलले,वेळ बदलली, तरी मुंबईकर मागे हटत नाहीत.हे पुणेकरांचे मात्र काही खरे नसते.

आता येतात सगळे पुणेकर अंगावर...

प्रचेतस's picture

26 Dec 2013 - 3:38 pm | प्रचेतस

बस का मुविकाका..जेमतेम २/३ तासांत कट्टा ठरवून सुद्धा १० जण जमले होते आणि ते पण वर्किंग डे ला आणि ते पण ठिकाण आधी फिक्स नसताना. =))
एक्का काका साक्षी आहेतच. ;)

बॅटमॅन's picture

26 Dec 2013 - 3:39 pm | बॅटमॅन

सहमत =))

अन असे कितीक कट्टे झालेत, अन होतही राहतील.

त्रिवेणी's picture

26 Dec 2013 - 3:29 pm | त्रिवेणी

बा़की सोहळा एवढा मोठा, पण थाळी त्या मानाने साधी की हो... >>>>>>>>>>>> थाळी सुद्धा आम्हा अनहितासारखीच साधी, सरळ आहे.
लय भारी गं अनहितानो.

पिलीयन रायडर's picture

26 Dec 2013 - 3:37 pm | पिलीयन रायडर

भावना.. खाली इनोची पाकीटं लावायचीस ग धाग्याला.. आणि एक तीट पण.. !!

सविता००१'s picture

26 Dec 2013 - 4:13 pm | सविता००१

लै जबरी लिवलंय!
खरचच भन्नाट मज्जा आली. पहिल्यांदाच सगळ्या जणींना भेटत असूनही असा काही गप्पांचा फड जमला होता की बास. त्या हॉटेल मॅनेजर/ मालकाचा चेहरा आठवतोय अजुन. बिचारे दर वेळी यायचे आणि या काही एवढ्यात जात नाहीत याची खात्री पटून अधिकाधिक कष्टी व्हायचे. होतील नाहीतर काय! हॉटेलबाहेर ही रांग लागलेली आणि आम्ही उठायचं नाव घेत नव्हतो.

बाकी जे आजोबा विचारत होते नं, की कुठला ग्रूप तुमचा? ते दोघे (आजोबा-आजी)खरच आमचं एकत्र येणं आणि दंगा करणं जाम एन्जॉय करत होते. एकदम नॉस्टॅल्जिक झाले होते बहुतेक. दोघं जाम गोड हसत होती आमच्याकडे बघून. सांगणार तरी काय त्यांना? पहिल्यांदा भेटलोय आज म्हणून???????????

सखी's picture

26 Dec 2013 - 9:45 pm | सखी

दंगा आणि मजा मस्तच केलेली दिसतेय पोरींनो....अनाहीतावरपण आजी+आजोंबाबद्द्ल वाचुन एका चांगल्या कट्ट्याला येता आले नाही याची हळहळ वाटलीच.

भावना कल्लोळ's picture

26 Dec 2013 - 4:13 pm | भावना कल्लोळ

आताच १००० इनो पाकिटाची ऑडर दिली आहे आणि हे घे . लावले आहे…. पिरे तेरे लिये कुछ भी यार ….

राही's picture

26 Dec 2013 - 4:16 pm | राही

खुसखुशीत वृत्तांत आवडला.

युगन्धरा@मिसलपाव's picture

26 Dec 2013 - 4:18 pm | युगन्धरा@मिसलपाव

काय खाउ आणला होता?

भावना कल्लोळ's picture

26 Dec 2013 - 4:21 pm | भावना कल्लोळ

चोकलेट, हि एवढी एवढी मोठाली पाकीट आणली होती.

सविता००१'s picture

26 Dec 2013 - 4:21 pm | सविता००१

खूप खूप चॉकोलेट्स आण्ली होती सानिकाने. जामच खूश सगळ्या जणी. आणि ती पॅकेट्स पाहिल्यावर छोट्या बाहुल्यांचे चेहरे तर केवळ सुंदर, अप्रतिम :)

भावना कल्लोळ's picture

26 Dec 2013 - 4:35 pm | भावना कल्लोळ

हो तर सवे … माझा चेह्ऱ्यावरचा आनंद हि किती ओसांडून वाहत होता न, बादवे … आमच्याकडचे पाकीट संपवण्यातहि आलेले आहे. कोणी ते विचारू नये…. खिक .

स्टेशनवर आल्यावर एकमेकींना ओळखायचे कसे? याचे उत्तर माऊताईने दिले होते ,जिथे काही मुली अतिशय आनंदाने जोरजोरात गप्प मारताना दिसतील तो ग्रुप.हॉटेलमध्ये भेटल्यावर आम्ही तिचे उत्तर खर्या अर्थाने सार्थक केले.थाळी गप्पा मारता मारता कधी रिकामी झाली ते कळले नाही मग गोड खायचे टुम निघाली.ते बर्यापैकी उशिराने येउनही गप्पांची भूक काही भागेना,मग माऊताईच्या निमित्ताने चहा घ्यायचे पण चालले होते पण हॉटेलमालकांनी खरच खणानारळांनी ओटी भरुन ,हाताला धरुन बाहेर काढले असते म्हणुन आवरावे लागले पण हॉटेलबाहेर परत गप्पासत्र चालु!!

स्टेशनवर आल्यावर एकमेकींना ओळखायचे कसे? याचे उत्तर माऊताईने दिले होते ,जिथे काही मुली अतिशय आनंदाने जोरजोरात गप्प मारताना दिसतील तो ग्रुप.हॉटेलमध्ये भेटल्यावर आम्ही तिचे उत्तर खर्या अर्थाने सार्थक केले.थाळी गप्पा मारता मारता कधी रिकामी झाली ते कळले नाही मग गोड खायचे टुम निघाली.ते बर्यापैकी उशिराने येउनही गप्पांची भूक काही भागेना,मग माऊताईच्या निमित्ताने चहा घ्यायचे पण चालले होते पण हॉटेलमालकांनी खरच खणानारळांनी ओटी भरुन ,हाताला धरुन बाहेर काढले असते म्हणुन आवरावे लागले पण हॉटेलबाहेर परत गप्पासत्र चालु!!

अजया's picture

26 Dec 2013 - 4:40 pm | अजया

बाकी सोवळ्यातल्या अनाहितांच्या कट्ट्याचा ओवळ्यातला व्रुत्तांत खूप आवडला,भावना . :)

स्पा's picture

26 Dec 2013 - 4:54 pm | स्पा

झकास वृतांत

बाकी "गॉसिप" काय झाले तेही येउंद्यात :D

कवितानागेश's picture

26 Dec 2013 - 5:06 pm | कवितानागेश

आलंय की.
पण त्यो धागा "हिकडं" न्हाय! ;)

अजया's picture

26 Dec 2013 - 5:42 pm | अजया

आमचं म्हणुन काय तरी आहे ना पेशल,अनाहितावर;)

अत्रुप्त आत्मा's picture

26 Dec 2013 - 11:46 pm | अत्रुप्त आत्मा

@स्पा -

बाकी "गॉसिप" काय झाले तेही येउंद्यात>>> =))

पांडू अता तूझं http://www.easyfreesmileys.com/smileys/free-fighting-smileys-570.gif
=))

भावना कल्लोळ's picture

26 Dec 2013 - 4:54 pm | भावना कल्लोळ

:p

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

26 Dec 2013 - 5:31 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

ृतांत छान. सर्व आयोजकांचे आणि सहभागी महिला मिपाकरांचे पहिलाच कट्टा यशस्वी केल्याबद्दल अभिनंदन...!!!

(महिला फक्त उणी दूणी काढायला जमतात असा एक जो माझा पारंपरिक समज होता आज त्या विचाराला तडा गेला) ;)

-दिलीप बिरुटे

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

26 Dec 2013 - 5:37 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

नसेल द्यायची तर नको. :)

-दिलीप

अनन्न्या's picture

26 Dec 2013 - 8:52 pm | अनन्न्या

भावना झक्कास वृत्तांत, अगदी अनाहितांसारखा परफेक्ट!

मितान's picture

26 Dec 2013 - 9:24 pm | मितान

अनन्याशी सहमत !
लै भारी कट्टा नि लै भारी फोटू :)

आनन्दिता's picture

26 Dec 2013 - 10:37 pm | आनन्दिता

झकास गं पोरिंनो!!!! काय कल्ला केला असेल याची कल्पना करु शकतेय....

अत्रुप्त आत्मा's picture

26 Dec 2013 - 11:48 pm | अत्रुप्त आत्मा

व्वा... छान बातमीपत्र..आपलं ते हे वृत्तांत! =))

@पण हॉटेल बाहेर येताच एकमेकीचे भ्रमण ध्वनी क्रमांक घेत पुढचा कट्टा हा हॉटेल मध्ये न करता एका अनाहितेच्या घरी करण्याचे ठरवुन>>> ह्हांsssssssssss अता कसं बरं साजेसं बोल्लात! http://www.easyfreesmileys.com/smileys/lol-041.gif
........................................
http://www.easyfreesmileys.com/smileys/free-scared-smileys-1044.gif

अर्धवटराव's picture

27 Dec 2013 - 12:17 am | अर्धवटराव

किती अपेक्षेने उघडला धागा. पण कट्टावृत्तांत वाटावा असं एक वाक्य नाहि. खंप्लीट डिसअपॉइण्टेड.
हे म्हणजे गणपा भाऊंची चमचमीत रेसिपी उघडावी आणि त्यात उकडलेल्या भेंडीच्या भाजीचं वर्णन असावं असं झालय.
काय ग म्याऊ... नक्की तुच ऑर्गनाइझ केलास ना कट्टा??

प्यारे१'s picture

27 Dec 2013 - 12:24 am | प्यारे१

हत्ती हा एक शांत प्राणी आहे. हत्तीला दोन प्रकारचे दात असतात. एका प्रकारच्या दातांनी तो खातो. दुसरे दात 'चीज' म्हणून स्माईल करुन दाखवण्यासाठी असतात. ह्या दातांना सुळे सुद्धा म्हणतात. सुळे कधी कधी टोचू शकतात. कधी कधी सुळ्यांचा उपयोग शोभेच्या वस्तू.....

भावना कल्लोळ झाला! ;)

प्यारे१'s picture

27 Dec 2013 - 4:37 am | प्यारे१

कट्टा छान बरं!
(हे सांगायचं राहिलं ते नंतर लक्षात आलं. ;) )

बॅटमॅन's picture

27 Dec 2013 - 12:28 am | बॅटमॅन

हम्म, ते बाकी खरं. जरा जास्तच शिक्रणछाप झाला आहे. अर्थात शिक्रणदेखील ठीक वाटते काहीदा हे आहेच.

आनन्दिता's picture

27 Dec 2013 - 4:18 am | आनन्दिता

होक्का?. ब्वॉर्र्र

हो ना,किती शिक्रणछप! कोणी बासूंदी पिऊन तर्राट झालं नाही, शिग्रेटी फुंकल्या नाहीत्,बायकांबद्दल तारे तोडले नाहीत, घर्,चूल,मूल फाल्तु विषय चघळले असतील झालं. नथींग हॉट....पुरुषी कट्टे कसले भारी असतात नै.

ब़जरबट्टू's picture

27 Dec 2013 - 9:20 am | ब़जरबट्टू

:))

पुरुषी कट्टे कसले भारी असतात नै.

हे बाकी बरोबर... :)

नित्य नुतन's picture

27 Dec 2013 - 12:29 pm | नित्य नुतन

+ १...
हो ... ह्या बायका सगळे under the sun कसे काय ब्वा इंजोय्माडी .... हं ....

बॅटमॅन's picture

27 Dec 2013 - 12:49 pm | बॅटमॅन

ओ हॅलो...वृत्तांताबद्दल बोललोय. प्रत्यक्ष कट्ट्यात तुम्ही मस्त धमाल केली असेलच त्याबद्दल वाद नाही. ते प्रतिसादांवरूनही दिसते आहेत. तस्मात न समजून घेऊन तारे तोडणे कृपया थांबवावे. जे वक्तव्य होते ते निव्वळ वृत्तांतलेखनाबद्दल होते.

तेही खुपत असेल तर उडवा, आमचं काय नै का?

विश्वनाथ मेहेंदळे's picture

27 Dec 2013 - 1:44 pm | विश्वनाथ मेहेंदळे

कोणी बासूंदी पिऊन तर्राट झालं नाही

एकाच गोष्टीचे परत परत स्पष्टिकरण देउन कंटाळा आला आहे. तेव्हा जे सुचित केले आहे त्याचा निषेध व्यक्त करुन तुर्तास थांबतो.

प्यारे१'s picture

27 Dec 2013 - 2:05 pm | प्यारे१

सोड रे!
ते प्रतिकात्मक का काय ते अस्तंय असं समजूया.
बाकी आम्ही बासुंदी, सोलकढी, फ्रेश लाईम सोडा नि गप्पा ह्याने'देखील'(हे चाणाक्ष लोक ओळखतील) तर्राट होतो.
तर्राट व्हायला बर्‍याचदा फक्त सोबतीची गरज असते. दारु काय अथवा गुलांबजाब काय, सिर्फ बहाना हय :)

बिपिन कार्यकर्ते's picture

27 Dec 2013 - 8:50 pm | बिपिन कार्यकर्ते

हो ना,किती शिक्रणछप! कोणी बासूंदी पिऊन तर्राट झालं नाही, शिग्रेटी फुंकल्या नाहीत्,बायकांबद्दल तारे तोडले नाहीत, घर्,चूल,मूल फाल्तु विषय चघळले असतील झालं. नथींग हॉट....पुरुषी कट्टे कसले भारी असतात नै.

सामान्यीकरण! (जनरलायझेशन!) :( असो.

नाही ,बिका,जनरलायझेशन नाही. प्रोव्होक्ड म्हणू शकता! (:

:( उदा. तुम्ही असा शिकरण्छाप प्रतिसाद दिला असतात का? नव्याने मुख्य बोर्डावर काहीतरी लिहिण्याचा प्रयत्न करणार्याला? असो!

बिपिन कार्यकर्ते's picture

27 Dec 2013 - 11:02 pm | बिपिन कार्यकर्ते

नाही! पण...

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

27 Dec 2013 - 11:12 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

स्वतःला 'अनाहिता' म्हणवणार्‍यांनी प्रोव्होकेशनला सणसणीत उत्तर दिलेलं पाहून आनंद झाला. चिअर्स.

बिपिन कार्यकर्ते's picture

27 Dec 2013 - 11:02 pm | बिपिन कार्यकर्ते

मान्य! पण...

भावना कल्लोळ's picture

27 Dec 2013 - 2:19 pm | भावना कल्लोळ

माफ करा, हा वृतांतलिखाण आपल्या पसंतीस पडले नाही. मला जसे सुचले तसे लिहिले, मी काही तुमच्याइतकी पोच पावलेली, अत्यंत गहन अभ्यास असलेली लेखिका नाही. जे माझ्या मनाला साध्या शब्दात सुचले ते मी लिहिले. त्यावरून उगाच वादावादी नको. अर्धंवटरावाची हि माफी मागते उगाच त्यांनी माऊ ताईला का असे प्रश्न विचारावे. चूक माझी झाली कि पोच नसताना सुद्धा मी वृतांत टाकण्याचे धाडस केले. क्षमा असावी. या पुढे अशी चूक होणे नाही.

बॅटमॅन's picture

27 Dec 2013 - 2:23 pm | बॅटमॅन

वादावादी आजिबात नाही. तुम्हाला त्रास झाला असेल तर मी तुमची माफी मागतो.

भावना कल्लोळ's picture

27 Dec 2013 - 2:35 pm | भावना कल्लोळ

माफीची अपेक्षा नाही आहे, बॅटमॅन भाऊ, फक्त वाद नको हीच इच्छा आहे.

पिलीयन रायडर's picture

27 Dec 2013 - 2:42 pm | पिलीयन रायडर

बॅटमॅन से शांतता चाहती हो..? बडी ना समझ हो.. ये क्या चाहती हो..

(ह.घ्या म्हणुन काय रे ब्याट्या.. बघ तिला नकोय भांडण तिच्या धाग्यावर.. आपण ख.व मध्ये झिंज्या उपटु एक्मेकांच्या..!)

अवश्य. पण एक बारीक दुरुस्ती: सोल्जरकट केलाय नुकताच त्यामुळे उपटण्याइतक्या झिंज्या मला नाहीत.

यशोधरा's picture

27 Dec 2013 - 2:50 pm | यशोधरा

भावना, दुर्लक्ष कर बरं नकारात्मक प्रतिसादांकडे. शिंपल. :)

यशोधरा's picture

27 Dec 2013 - 2:27 pm | यशोधरा

छान लिहिले आहेस भावना. लिहायला वगैरे थांबवायची काही गरज नाही. बिन्धास लिहिनेका. आम्ही आहोत वाचायला. :)

प्यारे१'s picture

27 Dec 2013 - 2:28 pm | प्यारे१

अरे??????
अनाहिता ना तुम्ही? अशी माघार? नामंजूर!
लवकरात लवकर आणखी एक कटटा करा नि वृत्तांत तुम्हीच टाका.
अनाहिताची अधिकृत प्रवक्ती पिरा नि तुम्ही अधिकृत वृत्तांतकार.
होऊ दे खर्च, मिपा आहे घरचं!

बॅटमॅन's picture

27 Dec 2013 - 2:33 pm | बॅटमॅन

चार कमेंटींनी माघार घेणार काय अनाहिता? बघा बुवा.

होऊ दे खर्च, मिपा आहे घरचं!

+१११११११११११११११११११.

भावना कल्लोळ's picture

27 Dec 2013 - 2:36 pm | भावना कल्लोळ

:)

कोलाहले काककुलस्य जाते विराजते कोकीलकूजितं किम् |
परस्परं संवदतां खलानां मौनं विधेयं सततं सुधीभिः ||
(व्याकरणदृष्ट्या चुका असू शकतील कदाचित)

परस्परं संवदतां खलानां मौनं विधेयं सततं सुधीभिः

साधु भो: सूडमहाशयः | सत्यमेव खलु |

पिशी अबोली's picture

27 Dec 2013 - 11:13 pm | पिशी अबोली

ओह् सिरियस्ली??

पिलीयन रायडर's picture

27 Dec 2013 - 2:37 pm | पिलीयन रायडर

अग ए.. हे असलं नसतं लिहायचं इथे..

"निमंत्रण दिलं होतं का वाचायचं? नसेल आवडला, नका वाचु.. गेलात उडत.. " वगैरे वगैरे... हे लिहायचं होतस की.. किमान "मोठे व्हा".. गेला बाजार "वाढदिवसाच्या शुभेच्छा " तरी..

आणि अनाहिताला पाण्यात पहाणारे बक्कळ लोक आहेत इथे (जळतात मेले..).. इग्नोर मारने का.. ;)

प्यारे१'s picture

27 Dec 2013 - 2:42 pm | प्यारे१

गुणाची हो पोर! ;)
अगदी योग्य हातात प्रवक्तेपद दिलं गेलं.
आता पैसातै डोळे मिटायला मोकळी. (अहो वामकुक्षीसाठी!)

भावना कल्लोळ's picture

27 Dec 2013 - 2:49 pm | भावना कल्लोळ

आता तू खाणार आहेस मार ज्योताईच्या हातचा.