अर्थक्षेत्र भाग - ३ - (ट्रेडिंगपद्धतीची ओळख.)

ज्ञानव's picture
ज्ञानव in अर्थजगत
21 Dec 2013 - 12:32 pm

===================================================================================
अर्थक्षेत्र भाग - १ - (शेअर मार्केटमधला पहिला लॉस )
अर्थक्षेत्र भाग - २ - (पहिल्या लॉस नंतरची सुरुवात )
===================================================================================
ट्रेडर म्हणजे जो ट्रेड करतो तो आणि ट्रेड म्हणजे "खरेदी आणि विक्री." खरेदी केलेली वस्तू जो पर्यंत तुम्ही विकत नाही तो पर्यंत ट्रेड कम्प्लीट झाला असे म्हणता येणार नाही. थोडक्यात देवाण आणि घेवाण म्हणजे ट्रेड.
आर्थिकदृष्ट्या कमाल फायदेशीर आणि समाधानकारक ट्रेडिंगकरिता प्रत्येकाने प्रथम कोणत्या पद्धतीचे ट्रेडर होणे योग्य आहे ते तपासले पाहिजे. त्यासाठी आपले व्यक्तिमत्व, आपला वेळ आणि आपले भांडवली गुंतवणूक किती असली पाहिजे ते जाणून घेणे आवश्यक आहे. आपली रिस्क घेण्याची क्षमता लक्षात घेऊनच ट्रेडर्स एक किंवा अधिक विभागान्द्वारे आर्थिक वृद्धी लक्ष केंद्रित करतात.

  • वृद्धीकेंद्रित ट्रेडिंग.
  • : ह्या प्रकारात त्या कंपन्या विचारात घेतल्या जातात ज्या स्वतःच्या वाढीबरोबरच नफ्याचा समतोलही ठेऊ शकतात. अशा वेळी सामान्यतः ज्या कंपन्यांमध्ये जलद वाढ होण्याची शक्यता आहे अशा नवीन नवीन कंपन्यांचा विचार हे व्यापारी करतात. जशी कंपनीची आर्थिक किंवा सर्वांगीण वाढ होईल तशी वेळपरत्वे शेअरची किंमत आणि पर्यायाने व्यापार्याचा फायदा वृद्धिंगत होत जातो. आयपीओद्वारा केलेली गुंतवणूक वृधीकेंद्रित गुंतवणूक किंवा व्यापाराचे उत्तम उदाहरण आहे. त्याद्वारे उत्तम नफा मिळण्याची शक्यता असते पण ते शेअर्स येताना अपयशाचा धोकासुद्धा घेऊन येतात. जे व्यापारी वृध्दीकेंद्रित व्यापारनीती अवलंबतात त्यांना आपल्या अन्तः प्रेरणेवर विश्वास ठेऊन निर्णय घेणे जास्त महत्वाचे असते.

  • किंमत किंवा भाव अधिष्ठित व्यापारनीती.
  • : ह्या प्रकारात व्यापारी त्या शेअर्सच्या शोधात असतात ज्यांचा बाजारभाव वाजवीपेक्षा कमी (UNDERVALUED)असतो आणि कंपनीची आर्थिक तब्येत अतिशय उत्तम असल्याने भविष्यात त्याचा बाजारभाव वाढण्याची शक्यता अधिक असते. असे शेअर्स शोधण्यासाठी ज्या कंपनीचे शेअर्स बाजारभावापेक्षा कमी आहेत त्या कंपनीचे बाजारात असलेले स्पर्धक आणि त्यांची किंमत ह्याची तुलना करून निर्णय घेतला जातो. पण हि तुलना करताना एका गोष्टीचे भान ठेवणे गरजेचे आहे कि बाजारभावापेक्षा कमी भाव पातळीसाठी कंपनीने काही लबाडी तर
    केलेली नाही ना ! एकदा का UNDERVALUED बाजार्भावाबरोबरच कंपनीच्या प्रामाणिकपणाबद्दल खात्री पटली, म्हणजे रिस्क कमी आहे जे जाणून हे व्यापारी निर्धास्तपणे आपली खरेदी उरकतात.

  • उत्पन्न किंवा कमाई देणारे ट्रेडिंग
  • : हि सगळ्यात जुनी व्यापारनीती आहे ज्यात भांडवल सुरक्षितता हे मुख्य तत्व आहे. कमी हे मुख्य धोरण असल्याने सामान्यतः मोठ्या आणि सर्वश्रुत कंपन्यांचा विचार इथे केला जातो किंवा निवडल्या जातात.उत्पन्न किंवा कमाईअधिष्ठित तत्वधारक व्यापारी हे जुन्या, स्वतःच्या पायावर घट्ट उभ्या असलेल्या, चांगले व्यवस्थापन असलेल्या अशा कंपन्याच बाळगून असतात.

आता वर दिलेल्या ट्रेडिंग पद्धती पैकी आपल्याला कुठली योग्य वाटते ते ज्याने त्याने आपली मानसिकता आणि भांडवल ह्याची सांगड घालून ठरवणे गरजेचे आहे. "प्रत्येक खरेदीमागे एक विक्री असते" हा जगातल्या प्रत्येक शेअर मार्केटला तसेच गुंतवणूकदार आणि व्यापारी ह्यांना लागू असणारा साधा नियम आहे.
जवळ जवळ सगळ्याच प्रकारच्या ट्रेडिंग पद्धती फायदेशीर ठरू शकतात. पण फक्त उत्तम शेअर निवड हा फायदेशीर व्यापाराचा निकष होऊ शकत नाही त्याबरोबरीने इतर अनेक घटक ह्या ठिकाणी कार्यरत असतात.

आपल्या व्यापारनीतीमध्ये वरील पद्धतीच्या वापरामध्ये लवचिकता अपेक्षित असते, ज्या द्वारे आपण मार्केट बरोबर जुळवून
घेतल्यास आपण निश्चित फायदा काढू शकू.

प्रतिक्रिया

जेपी's picture

21 Dec 2013 - 12:41 pm | जेपी

उत्तम माहिती .

यसवायजी's picture

21 Dec 2013 - 1:03 pm | यसवायजी

वाचतोय.
फक्त १ विनंती- अवघड मराठी शब्दांसोबतच कंसात इंग्रजी शब्दही द्या.. कामी येतील आमच्या.

चाणक्य's picture

21 Dec 2013 - 1:14 pm | चाणक्य

हेच लिहिणार होतो

ज्ञानव's picture

21 Dec 2013 - 7:02 pm | ज्ञानव

मी उगाच डिक्शनरी धुंडाळून मराठी शब्द लिहितोय.....बोली भाषेतच लिहीन ह्यापुढे.

ज्ञानव's picture

23 Dec 2013 - 10:05 am | ज्ञानव

वृद्धीकेंद्रित ट्रेडिंग. (GROWTH ORIENTED)
किंमत किंवा भाव अधिष्ठित व्यापारनीती.(VALUE ORIENTED)
उत्पन्न किंवा कमाई देणारे ट्रेडिंग (INCOME ORIENTED)

सांश्रय's picture

24 Dec 2013 - 11:08 am | सांश्रय

उत्तम माहिती.

प्रसाद१९७१'s picture

24 Dec 2013 - 3:42 pm | प्रसाद१९७१

Syndicate Bank घ्या ९२ च्या आसपास. ६ महिन्यात १२० चा भाव दिसेल नक्की.

तुषार काळभोर's picture

25 Dec 2013 - 5:39 pm | तुषार काळभोर

अशा टीप्स चं काय करायचं?

आज Syndicate Bank ९४.८ ला जाउन आला. आत्ता ९४.५ ला आहे. बघा मी काय सांगीतले होते.

प्रत्येक टीप समजवून सांगणे शक्य नाही. तुम्ही पण थोडा अभ्यास केला पाहीजे.
हे प्रश्न स्वता ला विचारा
१. Syndicate Bank कुठल्या sector मधे येते.
२. त्या sector मधले दुसरे स्टॉक न सांगता Syndicate Bank च का? काहीतरी कारण असेल च ना.

तुषार काळभोर's picture

26 Dec 2013 - 3:23 pm | तुषार काळभोर

अशी ३ वर्षे NYSE/NASDAQ मध्ये ट्रेडर म्हणून काम केले आहे. २००३ मध्ये SE ला डाऊन झाल्यानंतर एक पार्टटाईम जॉब केला होता, ते पैसे शेअर्स मध्ये गुंतवून कधी डे-ट्रेडींग तर कधी शॉर्ट-टर्म ट्रेडींग केले आहे/करत आलो आहे.
कुठे पेपरमध्ये/सीएनबीसी सारख्या चॅनेलवर बघून जर एखाद्या कंपनीची एखादी टीप दिसली, तर मी आधी तुम्ही म्हणता तसा (जर कंपनी नावाजलेली असेल तर. ८-१० वर्षात तेवढा अंदाज आला आहे.)आधी थोडा बेसिक अभ्यास करतो. म्हणजे तीच किंमत का? उदा सिंडीकेट बँकेत गुंतवले, तर ११० पर्यंतच का जाईल? १०० किंवा १६५ का नाही? इ
पण अशी टीप पाहून बेधडक उडी मारणारे लोक पाहावत नाहीत हो.. म्हणून ज्ञानव यांना विनंती केली होती, की अशा टीप्स चं काय करायचं त्याचंही मार्गदर्शन करा. कारण, मी शेअर्स मध्ये वैयक्तिक फायद्याकरता पैसे गुंतवतो, तर ज्ञानव हे सल्लागार म्हणून काम करत असल्याने ते अधिक योग्य पद्धतीने, अधिक योग्य शब्दात सांगू शकतील.
आणि प्लीज, माझा पहिला प्रतिसाद वैयक्तिक घेऊ नका... तो प्रश्न इन जनरल, एका अनुभवी व्यक्तीला विचारला होता.

प्रसाद१९७१'s picture

26 Dec 2013 - 6:12 pm | प्रसाद१९७१

Syndicate बँकेच्या टीप बद्दल चे माझी कारण मिमांसा देतो.
१. सरकारी बँक आहे, त्यामुळे प्रमोटर नी केलेली लफडी नाहीत.
२. PSU बँका सध्या फार च खाली आल्या आहेत, त्याला कारणे ही आहेत. पण
३. Syndicate Bank चे NPA बाकी सरकारी बँकां पेक्षा बरे आहेत.
४. Divident return खूप चांगला आहे. ६-७ % म्हणजे ग्रेट च
५. P/E फक्त ३ आहे, म्हणजे downside risk कमी आहे.
६. जेंव्हा हा sector वर जाईल तेंव्हा ही बँक outperform करेल ( कारणे वर आहेत )
७. १२० च लक्ष का? कुठलीही पोझिशन घेताना लक्ष ठरवून च घ्यावी. ह्या स्टॉक च्या आधीच्या किमती प्रमाणे १२० शक्य आहे. जास्त पण जाउ शकते.
८. जरी भाव फार वाढला नाही तरी ६-७ % dividend (टॅक्स फ्री ) मिळत राहील.

मला ह्यात काही वयक्तीक फायदा नाही. माझी स्वताची पोझिशन आहे, म्हणुन सांगीतले.

ज्ञानव's picture

25 Dec 2013 - 5:56 pm | ज्ञानव

काहीतरी सांगतय त्याकडे लगेच दुर्लक्ष करू नये तसेच लगेच त्याच्या आहारीही जाऊ नये.
त्यात तथ्य आहे का हे तपासून निर्णय घ्यावा.

चित्रगुप्त's picture

25 Dec 2013 - 6:05 pm | चित्रगुप्त

कलाकृतींच्या लिलावात त्या कोट्यावधींमधे विकल्या जातात, त्यामागे अर्थशास्त्र काय असते?

ज्ञानव's picture

25 Dec 2013 - 6:47 pm | ज्ञानव

मी तरी कधी फिरकलो नाही त्यामुळे मलाही कुतूहल आहे.
कोलते सर शेजारी होते रोज भेटत होते पण तेव्हा हे विचारायला सुचले नाही.

गायतोंडे सरांचे पेंटिंग आत्ता हि हाय प्राईजला "ट्रेड" होते हा त्यांच्या नावाचा, कलाकृतीचा आणि विकत घेणार्याच्या (व्यवसाईक किंवा / आणि कलात्मक)बुद्धीचा एकत्रित परिणाम असावा.
पण तज्ञ वास्तव काय आहे ते सांगू शकतील.
बाकी ह्यात "नजरेचा" भाग जास्त कि "नजराण्याचा" हे ते पेंटिंग घेणारच जाणो.

विअर्ड विक्स's picture

26 Dec 2013 - 1:16 am | विअर्ड विक्स

वाचनखुणा साठवतोय....

पुलेशु...

पैसा's picture

26 Dec 2013 - 6:24 pm | पैसा

सगळ्या लेखांवर प्रतिक्रिया दिल्या नाहीत. पण वाचते आहे. चांगली ओळख करून देत आहात!

ज्ञानव's picture

14 Jan 2014 - 9:25 pm | ज्ञानव

वाचक आणि प्रतिसादकर्ते सर्वांना मनापासून धन्यवाद