अर्थक्षेत्र.....एक उपेक्षित क्षेत्र

ज्ञानव's picture
ज्ञानव in जनातलं, मनातलं
6 Nov 2013 - 1:39 pm

दिवाळी ते मे महिना कसली नि कसली शिबिरे चालू असतात. व्यक्तिमत्व विकास शिबीर, क्रिकेट शिबीर, टेनिस शिबीर, तबला पेटी नृत्य गायन ह्याचा रतीब चालूच असतो म्हणजे पर्यायाने खेळ गायन पाककृती कलादालन (मीपवारही अर्थ दालन असावे असे वाटते.) वगैरे बरेच काही विषय पैसे देऊन हाताळले जातात. बरे पालक पण किती चोखंदळ असतात देव जाणे कारण शेजारचा जातो म्हणून माझा जातो इथपासून ते "आहो तेवढाच आम्हाला मोकळा वेळ मिळतो!!" पर्यंतची मुक्ताफळे मी पालकांकडून ऐकत आलो आहे. म्हणजे कुठलीही कला येणे खेळ येणे वाईट नाही पण आयुष्यात अनेक महत्वाचे जे संस्कार आहेत त्यातही आर्थिक साक्षरता हि मुलांना माहीतच नसते ह्याचे अतीव दुख होते.
६३ वर्षाचे माझे एक क्लायंट मला सांगतात "अरे मुलाला वेळच नाही त्याची सगळी गुंतवणूक / करविषयक बाबींकडे मला आणि त्याची मुले माझ्या हिला सांभाळावी लागतात." (आजी आजोबांचे प्रेम वगैरे ठीक आहे रे पण आम्ही मोकळे होणार कधी ?) आणि कहर असा कि सुनेची गुंतवणूक विषयक आणि करविषयक व्यवस्था तिचे वडील पाहतात जे माझेच क्लायंट आहेत. हे पाहून खूप त्रास होतो बरे दोन्ही कुटुंबे सु-शिक्षित आहेत आर्थिक दृष्ट्या सक्षम आहेत पण तरीही खूपशा गोष्टी जेव्हा माझ्याबरोबर शेअर होतात तेव्हा वेदना होतात कारण दोष कुणाचा हे कळते पण सांगणे कठीण जाते.
माझे आईवडील फारसे शिकलेले नव्हते त्यांनी उरापोटावर मेहनत करून आणि आपल्या आवडीनिवडी बाजूला सारून (हे कर्म कठीण असते असा माझा वैयक्तिक अनुभव आहे) आम्हाला शिकवले कारण त्यांना शिक्षणाचे महत्व कळले होते. आजच्या पिढीकडे शिक्षण आणि पैसा दोन्ही आहे मग त्यांनी मुलांना काय आणि कोणत्या वयात दिले पाहिजे (वयावरून आठवले लैंगिक शिक्षणाचादेखील उहापोह चालूच असतो सर्व माध्यमातून!!)असा प्रश्न तुम्हालाही पडतो का?
आर्थिक साक्षरता हा एक महत्वाचा भाग आहे आणि तो संस्कारक्षम वयातच शिकवला पाहिजे. चेक बुक, पे in स्लीप, घराचे बजेट, शाळेसाठी, वाढदिवसासाठी केलेला खर्चाचे टिपण मुलांनि ठेवायला सुरुवात केलीतर त्यात हळूहळू त्यांना गोडी निर्माण होते असे मी पहिले आहे. बँकिंग चालते कसे? पैसे येतात कसे? नोकरीच केलीतर पैसे येतात कि आणखीहि काही मार्ग आहेत त्यातले वैध आणि अवैध कोणते ते कसे ओळखायचे त्याबाबतीत काय कायदे आहेत. तुम्ही कंपनीत जॉब करता त्याचा ओनर कुठे नोकरी करतो ? एक ना हजार भरपूर प्रश्न लहान मुले विचारतात आणि आपल्याला आपली पातळी दाखवून देतात. बाबा तुम्ही बिल गेट का नाही? तुम्ही हि सोफ्टवेरच बनवता ना?
मुलांनी कुठले प्रश्न विचारावेत हे आपण च्येनालैझ करू शकतो जर टी.वी आणि अवांतर मधून आपण बाहेर पडलो आणि मुलांकडे, त्यांचे फोकस तयार करण्याकडे लक्क्ष देऊ लागलो तर.
सर्व इतर क्षेत्रांप्रमाणे अर्थक्षेत्र हे हि एक उपयुक्त क्षेत्र आहे. त्यातहि क्रिएटिव्ह, happpening असे भरपूर काही आहे पण दुर्दैवाने दुर्लक्षित आहे. वयाच्या तिशीला माझा मुलगा आणि परक्याकडे जाणारी माझी मुलगी आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र आणि साक्षर व्हावेत हे एकच ध्येय असावे कि .........दुसरा काही ऑप्शन आहे ????

हे सर्व लिहिण्यामागचे कारण एवढेच कि जे माझ्या आजूबाजूला आहे तेच तुमच्या आजूबाजूला आहे का?

दिवाळी नंतर लड लावतोय. होऊन जाऊ द्या.....

अर्थकारणविचार

प्रतिक्रिया

मुक्त विहारि's picture

6 Nov 2013 - 3:03 pm | मुक्त विहारि

पैसा कमावणे फार सोपे पण टिकवणे फार कठीण.

अर्धवटराव's picture

7 Nov 2013 - 6:56 am | अर्धवटराव

एक महत्वाचा विषय चर्चेला आला. अभिनंदन.

शरीरात जे महत्व रक्ताचं तेच आयुष्यात पैशाचं. त्याबद्दल जागरुक असणं आवश्यक आहेच. नौकरी पेशा करणार्‍यांपेक्षा ज्यांचे बिझनेस, दुकानं असतात त्यांच्याकडे मुलांना अर्थसाक्षर करण्यावर भर दिसतो... पारंपारीक बिझनेस कम्युनीटी, ज्यांना सिंधी-मारवाडी असे सर्वनाम दिलं जातं, तिथे हमखास हे आढळेल. तसं पाहिलं तर शैक्षणीक जीवनातच या ज्ञानाचा अंतर्भाव असावा... पण आपल्या शिक्षण व्यवस्थेत पीटी, नागरीकशास्त्र वगैरे विषयांना जो सन्मान मिळतो ते बघुन अर्थसाक्षरता घरातुनच सुरु झाली तर बरं असं वाटतं.

सहज's picture

7 Nov 2013 - 7:49 am | सहज

अर्थक्षेत्र - एक उपेक्षित क्षेत्र - एक उपेक्षित धागा वाटत आहे. :-(

कारण बहूतेक -
१९८० नंतर जन्मलेल्या पोरांचा ह्या बाबत सॉलिड परफॉर्मन्स असल्याने काहीही लोचा नसावा, समस्या संपली असावी असे उपलब्ध माहितीवरून दिसते आहे. व्हॉट्स नेक्स्ट? :-)

अवांतर - महत्त्वाचा विषय आहे पण बहुदा चर्चाविषय म्हणुन आवडत नसावा लोकांना.

ज्ञानव's picture

7 Nov 2013 - 8:25 am | ज्ञानव

@ सहज
१९८० नंतर जन्मलेल्या पोरांचा ह्या बाबत सॉलिड परफॉर्मन्स असल्याने काहीही लोचा नसावा, समस्या संपली असावी असे उपलब्ध माहितीवरून दिसते आहे. व्हॉट्स नेक्स्ट?
वास्तविक ज्यांच्याकडे पैसा आहे ती मध्यम वयीन पिढी (४०-४५)स्वतःतच मश्गुल आहे असे वाटते किंवा स्वतःच्याच कर्तुत्वाने हुरळून गेली आहे असे वाटते.मागच्या पिढीकडे लक्ष नाही आणि पुढच्या पिढीचा सुसंगत विचार नाही. शाळा, क्लासेस,ट्युशन,मोल्स,एम सी डी, सी सी डी ह्यातच ते गुंगले आहेत. अर्थसाक्षरता, संवाद कौशल्य वगैरे विसरून स्क्रींनपुढे बसणारी पिढी तयार होते आहे.मोबाईल, संगणक,tab तत्समची गुलाम पिढी होते आहे. संगीत, चर्चा, उत्तम लेखक गायक देणारी मराठी संस्कृती कुठे सरकते आहे? न्युक्लिअर कुटुंबव्यवस्थेची बीजे पेरली गेली आहेत आणि मग आमच्यावेळी असे नव्हते हा गळा काढण्यापलीकडे आपण काय करतो आहोत?
अर्थ साक्षरता म्हणजे काय असा प्रश्न भले भले विचारतात तेव्हा खूप वेदना होतात पण त्यात त्यांचा दोष नाही कारण त्यांचे आईवडील कसा संसार "चालवत" होते ते कधी त्यांनी सांगितले नाही आम्ही विचारले नाही आणि आता १०० पैकी ९० कथांमध्ये आई - वडिलांनी कसे आम्हाला घडवले ह्याबद्दल कृत्रिम, सहानभूती गोळा करण्यासाठीचे लेखन हजारो मैल लांब आपल्या आईवडिलांकडे लक्ष ना देता अनेक माध्यमातून लिहिले जाते

वर बरेच अवांतर झाले आहे कारण आर्थासाक्षर्ते बरोबर येणारे अनेक विषय आहेत जे टाळता येत नाहीत. असो.

विअर्ड विक्स's picture

7 Nov 2013 - 1:20 pm | विअर्ड विक्स

लेखातील सर्व मुद्द्यांशी सहमत.....

आपण ज्या ओढीने दशहरा पाटीवर अंकांची सरस्वती काढून साजरी करतो तेवढ्या उत्साहात लक्ष्मी पूजन साजरे करत नाही. अपवाद मराठी व्यापारी वर्ग . जोपर्यंत money rolling आणि profit बुकिंग संकल्पना समजून अमलात आणत नाही तोपर्यंत हे असेच चालायचे.

तळटीप - मी स्वतः सुद्धा सध्याच्या घडीला सुशिक्षित नोकर वर्गातील आहे पुढे बघू कितपत झेप घेतायेते स्व बळावर....