आता तुमीच सांगा रायल बुलेट वापरावी का? ऑ?

पाषाणभेद's picture
पाषाणभेद in जनातलं, मनातलं
2 Nov 2013 - 7:49 pm

आता तुमीच सांगा रायल बुलेट वापरावी का? ऑ?

तसं म्हनाल तर आपला बारदाना लई मोट्टा है. चाळीसपंनास एकर उस है. निम्मा उस जातोय साकरकारखान्यात. निम्या उसाचं गुर्‍हाळं लागत्यात. द्राक्षे है. मागल्या सालाच्या मागल्या साली वायनरी फैक्ट्रीचे सत्तर टक्के शेर घेतले. द्राक्षे वायनरीत नाय तर फारेनला जात्यात. सोसायटी, ग्रामपंचायत झालंच तर पंचायत समिती आपल्याच ताब्यात है. पुढल्या सालाला झेडपीत उडी मारायची है. दोन गण आपलेच है त्यामुळे फिकीर नै. उगाच नै कै पंचक्रोशीत बाळासायेब म्हनून आपल्याला वळखतेत. काय?

तस सौंसारपानी बरा चाललाय. घरामदी एकाला तिन तिन गाड्या हैत. म्हंजी स्कार्पीओ, सपारीचं नवं माडेल स्टार्म, मारूतीची ग्रांडे वैतरणा है. लई बेस हायती या गाड्या. पन बायलीला सालं बुलेटच पसंत हाय. काय तर म्हंती, 'तुमी लय गुनाचं दिस्ता बुलेटवर. लई मर्द वाटता बुलेटवर. तुमी शेतातून परतायच्या रातीच्या वेळी गाडी कितीबी लांब आसूद्या, पार नदीकाठच्या गढीवरून जरी तुमची गाडी येत आसली का मला आवाज पार आपल्या वाड्यात येतूया बघा.'

काय कळंना बाबा. आसं काय हाय त्या बुलेटमधी काय जानो. म्या काय म्हंतो, तुमाला काय समजलं का काय हाय ते?

मौजमजाअनुभवप्रश्नोत्तरेविरंगुळा

प्रतिक्रिया

मुक्त विहारि's picture

2 Nov 2013 - 8:30 pm | मुक्त विहारि

पण अजून थोडा फुलवता आला असता.

प्रचेतस's picture

2 Nov 2013 - 11:22 pm | प्रचेतस

=))

बुलेटचा आवाज बायलीला सावध करतो जनू.

वा वा वा अत्यंत र्‍हद्य गोष्ट.
१) आपल्या धन्याने बुलेटच चालवावी असे घर धनीणीला का वाटले?
२) घरधन्याने द्राक्षे कोणत्या देशात पाठवली.
३) वायनरी म्हणजे काय? द्राक्षे वायनरीत न पाठवता परदेशात पाठवली म्हणजे नक्की काय केले?
४) वायन्री फॅक्ट्रीचे ७०% शेअर जर एका माणसाला घेता येतात तरीदेखील तो द्राक्षे वायनरीला न पाठवता परादेशात पाठवतो ही इतर ३० % भागदारकांसाठी धोकादायक गोष्ट कशी नाही?
५) झेड पी त उडी घेण्यासाठी किती खोल उडी मारावी लागते? झेडपी चे गण म्हणजे काय? (सं) दर्भासहीत स्पष्टीकरण द्या?
६ ) सपारी, ग्रांडे या गाड्या आणि बुलेट यांची तुलना करा.

प्यारे१'s picture

3 Nov 2013 - 12:23 am | प्यारे१

>>>दर्भासहीत
त्यांच्याकडे एक तरी ठेवायचा होतात ...दर्भ! ;)

जीवनभाऊंच्या , मंदार दादा ह्यांच्या पंगतीला आणलंय की पा भे ना.

आदूबाळ's picture

3 Nov 2013 - 12:46 am | आदूबाळ

भाग दोनः

बायलीचं म्हायेर पार खाल्ल्या अंगाच्या गावचं. सगळा कोरडवाहू भाग तिच्यायला, ऐनवेळी श्येताकडंला बसाय लागलं तर नंतर पुसाय गवताचं पातं मिळायचं नाय. आपल्याला तितं फिरकायलाबी आवडत नाही. बाईलच जाती वर्सातून दोनदा म्हायेरपनाला. जा म्हंतो मी - उगा कमी करत नाय कशाला आपण, हां...

येरवां एपीएम्शीत द्राक्षांची लेवल कराय ग्येलो होतो. सफेद कापडांतलं एक बेनं ओळखीचं हसलं. मीबी दाताड वासलं. (आता झेड्पी म्हनल्याव जपून रहाय लागतंय. असायचा आमदाराचा पावना, कुणाल ठावं.) जवळ आला अन म्हनला काय म्हंत्यात वैनीबाय? म्हनलं तुला रं काय चवकशा? तर म्हनतो कशी - मैतरी आमची जुनी. गावी आमच्या घरांचं जोतं लागूनच येकम्येकाला. लय जुन्न्या गोष्टी सांगू राहिला. बोलता बोलता पार्किंगात आलो. स्टार्म बगून बेन्या म्हनला, वैनीबाय बसतात व्हंय यात? डिज्जेलच्या वासाचा लय तोथरा त्याना पहिल्यापासून. त्यापरीस आपली... बोलता बोलता थांबला. घाईघाईन निरोप घेतला. बुलेटचा फड फड फड आवाज घुमला.

डोकं भिन झालंय तवाधरनं...

बॅटमॅन's picture

3 Nov 2013 - 1:09 am | बॅटमॅन

अगागागागागा जबरीच =))

नि:शब्द सारखी कथा विण्याचे सामर्थ्य यात आहे खासच ;)

प्यारे१'s picture

3 Nov 2013 - 1:14 am | प्यारे१

आगागागागा!
हा भाग वाईट्ट्ट्ट्ट्ट आहे.
देव करो नि अशी 'बुलेट' कुणाला न 'लागो'. :)

टवाळ कार्टा's picture

3 Nov 2013 - 8:14 am | टवाळ कार्टा

_/|\_ अप्रतिम

आतिवास's picture

3 Nov 2013 - 8:35 am | आतिवास

भाग २ मस्त.
आता 'वैनीबाय' काय म्हणतात ते कोण बरं सांगेल? :-)

अत्रुप्त आत्मा's picture

3 Nov 2013 - 9:42 am | अत्रुप्त आत्मा

@त्यापरीस आपली... बोलता बोलता थांबला.>>> :-D बेक्कार! =))

मन१'s picture

3 Nov 2013 - 11:40 am | मन१

खतरनाक

पैसा's picture

3 Nov 2013 - 9:49 am | पैसा

मस्त! दोन्ही भाग भारी आहेत!

तिमा's picture

3 Nov 2013 - 9:55 am | तिमा

छानच जमलेत दोन्ही भाग. आता वयनीबायचं म्हननं काय असावं?
'नको मारुस हाक, मला घरच्यांचा धाक' आठवलं.

हाण्ण तेजायला... दोन्ही भाग झक्कास... आणखी येवू दे..

चित्रगुप्त's picture

3 Nov 2013 - 12:44 pm | चित्रगुप्त

घ्या वं, घिऊन टाका रायल बुलेट बायली येवडं म्हन्तिया तर. पन त्यंवडं घरामंदी, क्यामेराबी लावाया इसरू नगा, येटियम मिशिनिच्या खोलीत बशिवल्येला असतोय तसला.

पैसा's picture

3 Nov 2013 - 1:21 pm | पैसा

आम्चं ध्यान कोर्पिओ घ्येऊन भटकतंय. सरपंच बी हाये त्येला भरीला घालणारा, "आवो बाबासायेब, तुमी आता झेडपीला उभे र्‍हावाच! आमी हाय न्हवं!" आता ह्यो सरपंच माज्या मावशीचा पुतण्या लागतुय. त्यो आन म्या एका साळंत शिकलु न्हवं का! येतु कवा कवा च्यापान्याला.

शिवाय माज्या म्हायरच्या गावचा शिरपती हाये, आमच्या शेजार्‍याचाच, पैल्यापास्नं माजा मैतर त्यो. आता आम्चं गाव जवळच हाये म्हणताना तसं येनंजानं अस्तय की मैतरांचं. येतुय कवाकवा. पण आम्चं ध्यान शेतावर असतंय सदान कदा. त्ये कवा घरला यील काय सांगता यीना.

शिरपती बुलेटवरनं येतु, तिच्यावर फेटा बांधून त्यो बसला की अक्षी राजावानी दिसतुया. पन कसलं हेंगाडं खटलं गा त्ये! ५ मैलावर्नं आवाज येतुया. मंगं म्या म्हनलं आसं हाय व्हय! आवाज येतु त्ये बरंच की! मंग धन्यास्नी बी आता आघ्रेव करतो, बुलेट घ्या म्हनून. म्हंजी जरा बरं दिसंल आम्चं ध्यान आनि घरी कवा येतंय त्ये बी मला आदीच कळंल म्हंन्त्ये मी!

स्पंदना's picture

6 Nov 2013 - 6:09 am | स्पंदना

:))
:))

रोयल एनफिल्ड घ्याच! म्या बी घेणारेय! पन आता लगीच नाय जमायचं.. प्रोब्लेम येकच! अजुन तिला मध्ल्या स्टॅंडावर लावताना घाम येतो.. स्टॅंड लागता लागत नाय राव..

टवाळ कार्टा's picture

3 Nov 2013 - 2:15 pm | टवाळ कार्टा

;)

मुक्त विहारि's picture

3 Nov 2013 - 7:04 pm | मुक्त विहारि

गाडी घेवून टाका...

मधला स्टँड, गाडी घेतला की लागतो बरोबर.आपोआप होतेच सवय.....

मधल्या स्टँडचे आणि गाडीच्या व आपल्या वजनाचे काहीही नाते नाही...

बॅटमॅन's picture

3 Nov 2013 - 11:04 pm | बॅटमॅन

+१११११११११११.

आणि तसेही बुलेटचे वजन आहे किती? २०० किलो? दीडशे किलो वजनाच्या युनिकॉर्नचे स्टँड आरामात लावता येते, साला बुलेट क्या चीज है?

किसन शिंदे's picture

3 Nov 2013 - 11:39 pm | किसन शिंदे

म्या म्हनलं ह्ये पाभेला अस्लं परश्न कसं पडाया लागलं.;)

लय कल्ला हायेत दोन्ही भाग. :ड

स्पंदना's picture

6 Nov 2013 - 6:08 am | स्पंदना

बघितलासा?
समद आस जग्गजाहीर करुनच! आस कवा बी सोताच सोता काय बी ठरवत न्हायत. कोन म्हनल, शेअर घे! घेट्ल, कोन म्हनल गुराळ लाव! लावल!
ह्ये समद आस बगा. काव येतु मला! आता सांगायच बी काय काय? तसा माझ्या माह्येरातला शिरपती, असा पल्याड्च्या उंबर्‍याचा! कदी मदी त्याच्या बुलेटावरन मला लिफ्ट दिउन शिफ्ट बी करायचा! अक्षी अश्या मुंग्या यायच्या अंगात बुलेट धडधडली की! लय वाटत तश्या मुंग्या भराव्या गाडीत बसल की, ह्ये काय श्कॉर्पिओ आन श्तॉर्म अन वैतरणा, धुवाया भार आन मुंग्या नावालाबी न्हायत! म्हनुन म्हनलो तर हित्त गावाला इचरायला हाजर? काय म्हनाव तरी काय?

पैसा's picture

6 Nov 2013 - 9:17 am | पैसा

त्ये ध्यान हाय न्हवं! मंगं तसंच हुयाचं!!

पाषाणभेद's picture

7 Nov 2013 - 7:09 am | पाषाणभेद

चालूद्या धमाल!

मांजरांनी तोंड लावलंय दुधाला. आता मुकाट डोळे बंद करा. करता काय? बोम्ब ठोकली तर उगाच गावात बोभाटा होईल. इलेक्शनच्या टायमावर परवडन्याजोगी गोष्ट नाही भाऊ.
एक काम करा बायडीले भिडवा प्रचाराला. तुम्ही निवडून आला तर तिचाच फायदा नव्हं! मग पाच वर्ष तरी तिची कटकट मिटली. बघा करा झोकात प्रचार करते ती तुमचा.
अन तुमचा बी फायदाच की! एकदा का पॉवर आली की मंग काय मजाच मजा की? भायर तोंड मारायला तुम्हास्नीबी रान मोकळं? बायडी पण काय बोलणार नाय!
मंग म्या म्हणतो भाऊ घिउन टाका चकाचक रायल बुलूट. अन नंबर भी घेऊन टाका पैसा फेकून. एकदम भारी चमकला पायजे रेडीयम मध्ये दादा नाना असा.
काय म्हनता?
पेढे चारायला विसरु नका म्हन्जे झालं.

( पाटलांचा मुलगा मुंबईला शिकायला गेल आणि तिकडून त्याने रात्री बापाला e-mail केला। )

" ति. बाबा,
शि. सा. न.

मी इकडे खुप छान आहे. काळजी नसावी।

मला फ़क्त वाईट वाटते की माझे सर्व मित्र, शिक्षक लोकल ट्रेन ने येतात व
मी माज्या नविन स्कार्पियो(Diesel) मधून येतो।"

( सकाळी बाबांचा मेल आला होता )

"प्रिय बाब्या,
फार वाईट वाटते की सर्व मित्र, शिक्षक लोकल ट्रेन ने येतातव तू स्कार्पियो मधून येतो मी आजच तुला पैसे पाठवतो, तू पण लोकल ट्रेन घेउन टाक.
कुठे कमी पडायच नाय "

होउ दे तोटा, पप्पा आहे मोठा.. !!!

रमताराम's picture

10 Nov 2013 - 6:36 pm | रमताराम

होउ दे तोटा, पप्पा आहे मोठा.. !!! >> हे आवाल्डं. म्हजी 'होऊ दे खरचं' परीस लै जंक्शान ए हे.

हा हा हा, आवडले. हा ज्योक एका अरब राजपुत्रासंदर्भात वाचला होता वरिजिनली.

डॉ सुहास म्हात्रे's picture

10 Nov 2013 - 9:07 pm | डॉ सुहास म्हात्रे

+D

माहितीतला एक कॉलेज विद्यार्थी दरवर्षी घरून लॉग टेबल आणायला (ते टेबल लय भारीचं आणि मोट्टं असतया असं सांगून) साखर कारखानदार वडिलांकडून मोठी रक्कम आणत असे ते आठवले.

पाषाणभेद's picture

11 Nov 2013 - 1:25 am | पाषाणभेद

मंडळी म्या काय म्हंतो. तुमा लोकांचा कायतरी सालीड गोंदळ झालाय बगा. म्हंजे आसं का आमच्याकडं बुलेट हायच हो. घरामदी एकाला तिन तिन गाड्या हैत. म्हंजी स्कार्पीओ, सपारीचं नवं माडेल स्टार्म, मारूतीची ग्रांडे वैतरणा है. पन बायलीला सालं बुलेटच पसंत हाय. काय तर म्हंती, 'तुमी लय गुनाचं दिस्ता बुलेटवर. लई मर्द वाटता बुलेटवर. तुमी शेतातून परतायच्या रातीच्या वेळी गाडी कितीबी लांब आसूद्या, पार नदीकाठच्या गढीवरून जरी तुमची गाडी येत आसली का मला आवाज पार आपल्या वाड्यात येतूया बघा.'

येवढ्या मस्त मस्त गाड्या हायती पन बायलीला बुलेटच आवडतीया. म्हंती श्येतावर जाता येता वैतरणा काय कामाची? शेरात न्यावा की आसल्या गाड्या.

आन मुक्त विहारि म्हनंतेत तसं मधल्या स्टैंडवर गाडी लावाया येती. सुरवातीला लय तरास व्हतो पन नंतर सवयीचं व्हतं सगळं.

चार वर्सं झाली, तशी आपल्याला आठवड्याला एक रॉयल ष्टॅग लागती. ही आपली पसंत, कोणी पावणारावळा, दोस्तयार भेटला तर ओल्डमंकला नाय म्हनत नाय. घरात सोय नाय, म्हातारी कच्चा खाईल. मंग आपलं कदी ढाब्यावर कधी हैवेजवळ खोली हाय तिकडं. या असल्या गोष्टी काय हड्डीबिगर व्हतात व्हय. फरसान, दाणे, शेवचिवडा येगळं.

परिनाम काय व्हनार - मोड आले मागल्या भागात. टेललाईट लावल्याली गाडी पायली की मन कसं करुनेनी भरून येतंय. सरळ बसता येईना झालंय राव. ष्टार्म आनि ग्रांडेची गुबगुबीत शीट पन खुपाय लागली राव. दोन दोन लोड आणून ठिवले मधल्या शिटात - तिरकं बसाय सोपं पडतं. लोकान्ला वाटतं भाऊंचा काय रुबाब. खाली काय जळतंय कोनाला सांगनार, आँ?

आदी यन्फील्डच्या शिटा बा*** दगडाच्या करतात जनू. वर ती जीवघेनी थरथर आनि आमच्याहिकल्डे रस्ते म्हंजे तिज्यायला... त्यात हा नवीन हट्ट बायलीचा - मर्द दिसता म्हने बुलेटवर. आता तिला काय सांगनार न कसं सांगनार. तरी कुरकुरायलीय की कैलास जीवणच्या बाटल्या हप्त्याला दोन कशा खपत्यात म्हनून. आता थोडं उमजून घ्याव की मानसानं...

__/\__!!!

:))

डॉ सुहास म्हात्रे's picture

11 Nov 2013 - 11:18 am | डॉ सुहास म्हात्रे

आत्ता ! आयला, तुमची कता येगळ्याच अंगाला ग्येली म्हनावं का काय ? असु द्या. असु द्या. व्हतंय कदी कदी. पन पर्कुर्तीची काळजी घ्या. म्हंतात ना बूड सलामत तर बुलेट हज्जार. कसं?

आटवड्याच्या बाजारात तिसर्‍या वडाखाली एक दाडिवाला "रामबाण"ची पाटी लावून बसलेलं असतंय बगा. वरच्या आळितल्या पर्श्याचा विलाज त्यानंच केला नव्हं का. जंक्शन उपाय, दोन आटवड्यात फरक पड्तूया बगा. मंग बसू वाड्यावं काय ते रॉयल ष्टॅग फॅग घेऊन. कसं ?

प्यारे१'s picture

11 Nov 2013 - 6:55 pm | प्यारे१

कन्च्या गावचं वो तुमी?

सादा उपाय म्हाईत न्हाई व्हय?
एकांदी स्कूटरची 'टूप' बांदायची वरनं हवा भरुनशान.
मदी गोलात 'बरुब्बर' बसायचं.

शिंपल्ले!

ह्या ह्या ह्या ह्या!

म्या शिरपती. न्हाय न्हाय. अंगावं नाय उडनार. थांबा. .... (पच्च्याक्क्क)
हा तर रामराम!

आमच्याबद्दल ऐकलं आसंनच की. वैनीबाय म्हनता ना तुमी त्या तिज्या (च्यायला आटावली तरी कसंसंच हुतंय) घराला लागून आमचं घर. आता हुंबरा हुता लागून त्यात काय आमची चूक? झालो ल्हानाचं मोट्टं येका साथीनं.

उमजाय लागल्यापसनं बायलीची लईच्च तयार! पोरी लय लवकर शान्या हुत्यात. पाक येड लावलेलं. आता वयात आल्यावर व्हनार की थोडं हिकडं तिकडं. झालं. पन आयच्यान काय जास्त नाय.
उगा आपलं हिकडं तिकडं. पोर्गी तशी खानदानी. आमी पन काय मनाला लावूनच नाय घेतलं. त्यातच दुसरी घावली. खालच्या आळीची. केली मजा आनि परत गेली की सोडून.
आलु परत हिकडं म्हनलं बये चूक झाली घे पदरात. लगीन करन म्हनलं. कानसुलात दिली वो! दोन चार पोरं होती संगतीला. लई अपमान झाला. पन शेजारी हुती म्ह्नून गप बसलो.
आयच्यान लई पेटलो. म्हनलं गेली ...!

पन काय का म्हनना. परत पोरीमागं नाय. कुटल्याच! आपन भलं आनि काम भलं. नशिबानं पन हात दिला. तालमीत आमदारसायेबांनी बगिटला. तालुक्याचं उपाध्येक्ष हाय. कशाला कमी न्हाय.
दोन सालामागं बुलेट घेटलो. मजेत आस्तंय काम.

बरं ती तुमची वैनीबाय आलती गावाकड. कुन्ची ती मोट्टी थोर्ली स्कार्पिओ घिऊन.
सोनं नानं मस्त हुतं अंगावं आन लई खिदळत बी हुती.
उगा डिवाचलं. म्हनं त्वांड बगा. बुलेट घिऊन फिरनाराचं.
मला कानसुलात दिल्याली आटावली. जरा म्हनलं मजा करु.

आनि त्यादिशी नेमकंच 'पावनं' दिसलं....

स्पंदना's picture

12 Nov 2013 - 4:05 am | स्पंदना

आर तुज मड बशीवलं.
तूच व्हय त्यो मिरचीचा बोद? ( टिक्क, पोतं, आणि त्याहुन मोठ, साधारण वजनाने हलक्या गोष्टी भरायला वापरतात्[आम्ही तंबाखू भरतो, एक बोद ७५-७८ किलो] त्याला बोद म्हणतात)