विडंबनांमुळे कवींच्या सर्जनशीलतेवर परिणाम होतो का ?

होय. कविता केल्यास तिचे विडंबन होण्याच्या शक्यतेमुळे सर्जनशीलता कमी होते.
5% (1 vote)
होय. आपल्या कवितांचे विडंबन वाचून कविता करण्यास आणखी हुरूप येतो.
24% (5 votes)
नाही. कविता निर्मितीच्या प्रक्रियेत आधीच्या कवितांच्या विडंबनांचा काहीही परिणाम होत नाही.
71% (15 votes)
एकुण मतं : 21

संत श्री सर्किटेश्वर महाराज

हे असे कौल घेण्यापेक्षा आपला जगप्रसिद्ध (येथे अमेरिकन व्याख्येनुसार जग म्हणजे काउंटी किंवा सब-डिविजन) ग्रंथ "कातडी निबर करण्याचे १०१ मार्ग" यांतील सुरूवातीचे पाठ शिकवायला सुरूवात करावी. जुने आणि नवे सर्वांना त्याचा अमूल्य फायदा होईल. Wink

सदर ग्रंथ

सदर ग्रंथ गद्य लेखन करणार्‍यांना / विडंबकांना अधिक उपयुक्त आहे. कवीच्या हळव्या मानसिकतेमुळे आम्ही ग्रंथात सुचवलेले मार्ग त्यांच्या कामी येतील असे वाटत नाही.

मुळात ह्या ग्रंथातील १०१ मार्गांपैकी ८७ मार्ग हे आम्ही विडंबनकारांकडूनच शिकलो आहोत. ते येथे शिकवणे म्हणजे आधीच विस्तृत झालेले विडंबकांचे संप्रदाय आणखी विस्तृत करणे.

- सर्किट

विडंबनांचे विडंबन

येथे शिकवणे म्हणजे आधीच विस्तृत झालेले विडंबकांचे संप्रदाय आणखी विस्तृत करणे.

तशीही आमच्यासारखी पामरं केवळ विडंबनच वाचत असतात. विडंबकांचे सांप्रदाय विस्तृत करताना काही कवी-कवयित्री कविता सोडून विंडबने करू लागली तर त्यात त्यांचाच फायदा होईल. भरघोस प्रतिसाद येतील आणि प्रसिद्ध विडंबकांनाही विडंबनांचे विडंबन झाल्याने स्वतःच्या सर्जनशिलतेवर काही परिणाम होतो का (शक्यता ०.००१ असली तरी) Wink हे कळून चुकेल.

टक्केवारी कशी काढली?

प्रियाताई,
आता तुला ०.००१ ही एग्जॅक्ट शक्यता कशी कॅल्क्युलेट केली ते स्पष्ट करायला लागणार!
(संख्याशास्त्री)बेसनलाडू

नाही बॉ!

आता तुला ०.००१ ही एग्जॅक्ट शक्यता कशी कॅल्क्युलेट केली ते स्पष्ट करायला लागणार!

आता तुला मी कातडी निबर करण्याच्या ग्रंथातला एक पाठ सांगते (तसा तुला तो आधीच माहित असावा, पण ग्रंथाची थोडी फुकट जाहिरात)- बिनधास्त विधाने करायची पण त्यांची जबाबदारी घ्यायची नाही. यानुसार, ०.००१ ते ९९.९९ टक्क्यांच्या शक्यता स्पष्ट करायला मी संख्याशास्त्री थोडीच आहे. Wink

(अंदाजपंचे) प्रियाली

हे भारी ...

>> बिनधास्त विधाने करायची पण त्यांची जबाबदारी घ्यायची नाही.
हा हा हा ...
सहमत आहे ...
असे वागले तरच डोक्याला त्रास होण्याची शक्यता अंमळ कमी होते.
(सहमत)छोटा डॉन

बाकी विडंबनाचा कविता निर्मांण होण्याच्या प्रक्रियेशी काही संबंध नाही असे मी मानतो ...

अवांतर : "तो ग्रंथ" कुठे सवलतीत उपलब्ध असल्यास कळवावे. मुळ किमतीला घेणे परवडणार नाही ...
बघु, तो वाचुन आम्ही "काव्य आणि विडंबन" वगैरे काही शिलक्यास कमीत कमी योग्य ठिकाणी प्रतिसाद तरी देता येतील.

( गरिब ) छोटा डॉन

छोटा डॉन
[ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ]
बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....

१ आणि २च्या मध्ये

"कविता विडंबनास योग्य वाटणे" ही एका प्रकारे प्रशंसाच आहे.

पण सुरुवातीला ते कळत नव्हते. सुरुवातीला मिसळपावावर कविता दिल्या, आणि "आवडली नाही" म्हणून प्रतिसाद आला की वाईट वाटत असे. त्या काळात मी कौलात पर्याय "१" निवडला असता.

आता सकारात्मक टीकेमुळे फायदा होतो असे लक्षात आले आहे. त्यामुळे "२" निवडला आहे.

आपल्या

आपल्या कवितेवर 'आवडली नाही' असा प्रतिसाद येणे आणि तिचे विडंबन येणे ह्या दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या आहेत. कवितेचे विडंबन हे कविता आवडली नाही म्हणूनच केले जाते असे नाही कधी कधी उलटे देखिल असते. एकूणच तुम्ही थोडेसे गोंधळलेले वाटता.

शक्य आहे

आपल्या कवितेवर 'आवडली नाही' असा प्रतिसाद येणे आणि तिचे विडंबन येणे ह्या दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या आहेत.
अर्थातच.

प्रतिसाद १

प्रतिसाद १ हा "होय. कविता केल्यास तिचे विडंबन होण्याच्या शक्यतेमुळे सर्जनशीलता कमी होते." असा आहे. त्याच्याशी "आवडली नाही" म्हणून प्रतिसाद आला की वाईट वाटत असे" ह्याचा संबध नाही.

गोंधळ मान्य आहे

यापुढील चर्चा खरडवहीत करावी ही विनंती.

हो होतो

हो होतो. एखादा चांगला कवी केवळ सुमार विडम्बानातच अडकुन पडतो.
विडम्बन हा काव्य प्रकार परोपजीवी वनस्पती प्रमाणे आहे. दुसर्‍याने केलेल्य शब्दांवर टवाळकी करण्यातच स्वतःची प्रतिभा अडकवुन ठेवणे हा त्या उत्तम बुद्धीमत्तेचा अपमानच आहे
पडत्या पावसाला पाहुन तुम्ही आतुन भिजला नाहीत तर स्वतःच्या कोरडेपणाची तारीफ करु नका तर हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात भिजवणारे क्षण आलेच नाहीत

सहमत

विजूभाऊ,
तुमच्या नेमक्या प्रतिक्रियेशी सम्पूर्ण सहमत.
"विडम्बन हा काव्य प्रकार परोपजीवी वनस्पती प्रमाणे आह" -- परफेक्ट !!
पण - सर्जनशील आणि सॄजनशील यातील फरक कोणी समजावेल काय ?
(मूळ कवितेची चिरफाड म्हणून सर्जन तर नव्हे ....?)
योग्य मराठी शब्द कोणता ?

माझे उत्तर

नाही. कविता निर्मितीच्या प्रक्रियेत आधीच्या कवितांच्या विडंबनांचा काहीही परिणाम होत नाही.

याच्याशी मी सहमत आहे. फक्त राहून राहून एक प्रश्न पडतो की मूळ काव्यच जर "विडंबन" वाटत असेल तर त्या विडंबनाचे "विडंबन" म्हणजे नक्की काय होऊ शकेल?

विडंबनाचे विडंबन

त्या विडंबनाचे "विडंबन" म्हणजे नक्की काय होऊ शकेल?

त्यातून भावनेचा आविष्कार व्हावा अशी अपेक्षा आहे.

- सर्किट