नको

वेल्लाभट's picture
वेल्लाभट in दिवाळी अंक
26 Oct 2013 - 9:01 am

एक व्हावी भरारी ही भिन्न आसमंत नको
माझ्या आणि माझ्यामधे आरशाची भिंत नको

नीज यावी शांत रोज कशाचीही भ्रांत नको
असे त्याचा गर्व नको नसे त्याची खंत नको

परा कामी येत जावे; स्वत:प्रत निश्चिन्त नको
सूज्ञ व्हावी मने मात्र जगाला या संत नको

ठेवुनी जावे स्वत:ला घेवुनी जावे जरी
भुवनी इथल्या अपूर्व, अस्त व्हावा अंत नको

११-७-१२ अपूर्व ओक

दिवाळी अंक २०१३

प्रतिक्रिया

मिसळलेला काव्यप्रेमी's picture

1 Nov 2013 - 2:10 pm | मिसळलेला काव्यप्रेमी

छानच..

पैसा's picture

2 Nov 2013 - 1:25 pm | पैसा

छान लिहिलंय!

कवितानागेश's picture

3 Nov 2013 - 1:25 am | कवितानागेश

फार छान आहे कविता. आवडली. :)

इन्दुसुता's picture

6 Nov 2013 - 9:17 am | इन्दुसुता

अतिशय आवडली.

हरवलेला's picture

6 Nov 2013 - 6:41 pm | हरवलेला

माझ्या आणि माझ्यामधे आरशाची भिंत नको
__//\\__

भुवनी इथल्या अपूर्व, अस्त व्हावा अंत नको
__//\\__

चाणक्य's picture

17 Nov 2013 - 7:34 pm | चाणक्य

मस्त झालीये