आवाहन, दिवाळी अंकाच्या मुखपृष्ठाविषयी.

अभ्या..'s picture
अभ्या.. in काथ्याकूट
17 Oct 2013 - 11:49 am
गाभा: 

सर्व मिपाकरांना नमस्कार
दिवाळी अंकाची सूचना तर मिळाली आहेच. एव्हाना लेखनाची तयारी पण सुरु असेल.
आता हे आवाहन आहे दिवाळी अंकाच्या मुखपृष्ठाविषयी.
मिपासदस्यांना यातही सहभागी करुन घ्यायचा विचार आहे.
दिवाळी अंकाचे मुखपृष्ठ म्हणले की आपल्याला मुद्रीत दिवाळी अंकाची देखणी मुखपृष्ठं आठवतील. किस्रीम, जत्रा, आवाज सारखे दिवाळी अंक कव्हरमुळे लक्षात राहायचे. आपल्या दिवाळी अंकाचे मुखपृष्ठ पण असेच संस्मरणीय अन संग्राह्य व्हावे हि इच्छा आहे. तेंव्हा मिपाच्या दिवाळी अंकाच्या मुखपृष्ठाविषयी काही कल्पना असतील तर त्या सुचवाव्यात. ज्या सदस्यांना ग्राफीक्सचे ज्ञान आहे त्यानी पूर्ण तयार मुखपृष्ठ दिले तरी चालेल. ज्यांना छायाचित्रणाचा छंद आहे त्यांनी ती छायाचित्रे पाठवलेली चालतील. चित्रकलेची आवड असणार्‍यांनी चित्र दिले तरी चालेल. ज्यांना मुखपृष्ठाविषयी काही कल्पना असतील त्यांनी त्या शब्दात लिहून पाठवल्या तरी चालतील. त्यांना आम्ही मूर्त रुप द्यायचा प्रयत्न करु.
योग्य निकषांचा वापर करुन कल्पना किंवा चित्र निवडले जाईल. त्या सद्स्याचे नामनिर्देशन केले जाईल.
तेंव्हा मंडळी लेखनाची मुदत संपत आलीय. मुखपृष्ठाला थोडासा अवधी शिल्लक आहे.
लवकरात लवकर आपल्या कल्पना सादर करा.
.............................................................................................
फक्त एवढे लक्षात ठेवा.
त्याचा आकार उभा ए ४ एवढा असावा. (मिमि मध्ये २१० बाय २७०)
देणार आहात ते छायाचित्र प्रताधिकारमुक्त असावे.
त्याचे कलर मॉड्युल शक्यतो आरजीबी असावे.
शब्दांमध्ये कल्पना सुचवणार्‍यानी ती प्रत्यक्षात (ग्राफीक्स वापरुन) उतरवता यावी अशी असावी.
आणि महत्वाचे म्हणजे अंक दिवाळीचा अन आपल्या मिपाचा वाटायला हवा.
...............................................................................................
शब्दांतली कल्पना या धाग्यावर सुचवली तरी चालेल. चित्र किंवा छायाचित्र मात्र mipa.sampadak@gmail.com या स्वतंत्र ईमेल आयडीला ईमेलद्वारे पाठवावे.

प्रतिक्रिया

सौंदाळा's picture

17 Oct 2013 - 12:27 pm | सौंदाळा

आवाजची (थोडीशी)चावट चित्रे मला खुप खुप आवडतात.
असे एक तरी चित्र या दिवाळी अंकात असावे, मुखप्रुष्ठ असले तर उत्तम.

बॅटमॅन's picture

17 Oct 2013 - 2:31 pm | बॅटमॅन

आवाजसारखे कै केले तं लै जब्री होइन, शंकाच नै.

अत्रुप्त आत्मा's picture

17 Oct 2013 - 1:41 pm | अत्रुप्त आत्मा

मि पा अशी अक्षरे असलेले, काही फुलांच्या रांगोळीत करू का? फोटोमधे अवडले तर त्याचा उपयोग करता येइल का? :)

येइल नाही तर येणारच . :) करूयात आपण .
गुरजी मस्त आयड्या आहे :)

किसन शिंदे's picture

17 Oct 2013 - 3:00 pm | किसन शिंदे

हि आयड्या लय मस्तंय हो बुवा, फक्त आणखी त्यात प्रज्वलित केलेल्या मातीच्या पणत्याही असू द्यात म्हणजे आणखीन भारी दिसेल. :-)

सुधीर's picture

17 Oct 2013 - 9:23 pm | सुधीर

फटू बघायला आवडतील.

सार्थबोध's picture

17 Oct 2013 - 3:28 pm | सार्थबोध

नमस्ते ,
"मिपा"वर मी एक अक्षरबद्ध (acrostic) कविता केली होती, तिचा वापर करता येईल का?
कवितेचा दुवा इथे देत आहे...
http://www.misalpav.com/node/25757

- सार्थबोध

अभ्या..'s picture

18 Oct 2013 - 12:34 am | अभ्या..

हो. ती कविता सुध्दा आपण सुलेखन करून वापरू शकू.
सुरेख रचना होइल सार्थबोधजी. धन्यवाद :)

सार्थबोध's picture

21 Oct 2013 - 11:08 am | सार्थबोध

धन्यवाद अभ्याजी,बघतो आणि काय सुचते का.

चौकटराजा's picture

17 Oct 2013 - 5:04 pm | चौकटराजा

दिवाळी अंक म्हणजे बाई पहिजेच. पण एक अडचण आहे. मी चित्र काढतो. पण मॉडेल नाय ना घावत !

अभ्या..'s picture

18 Oct 2013 - 12:39 am | अभ्या..

अशा कलाकारान्साठि एक कार्यशाळा आयोजित करूयात. ;-)
वेगवेगळि मॉडल्स आणण्यात येतील. मग पाडा हवि तेवढि चित्रे. मी पण काढेन.
फ़क्त येताना सौ. काकूना तेवढे सोबत घेउन या बरे. ;-)

हा अभ्या फारच कलाकार आहे बुवा! तुझ्या डोक्यातून काय काय कल्पना निघतील ते सांगण कठीण! आम्ही कल्पना करून करून कशाची करणार तर पैठणी नेसलेली बाई हातात पणती धरून नाहीतर रांगोळीत पणती. फारतर आकाशकंदिलाचा फोटू. तसलं काही तुम्हाला चालयचं नाही.

प्रचेतस's picture

17 Oct 2013 - 8:43 pm | प्रचेतस

हे असे काहीसे चालेल का रे?

a

यशोधरा's picture

17 Oct 2013 - 8:46 pm | यशोधरा

हे भुलेश्वर का रे वल्ली?

प्रचेतस's picture

17 Oct 2013 - 8:48 pm | प्रचेतस

व्हय. किती सुंदर आहे ना. :)

अत्यंत अप्रतिम आहे हे वल्ली.
आता हे अन्काचे कव्हर म्हणून कसे दिसेल ते उद्या दाखवतो. :)
सर्वच सदस्याना नम्र विनंती आहे की बिनधास्त चित्रे छायाचित्रे किंवा कल्पना मांडा. त्याचे रूपान्तर एकदम आकर्षक कव्हरामध्ये होइलच होइल.
आणि रेवतीतैनी म्हणल्याप्रमाणे मी फ़क्त एडिट करणार आहे. मुळ कल्पना व् श्रेय सदस्याचेच राहील.
माझच डिझाइन वापरायचे असते तर मी हां धागा काढलाच नसता.
आणि एकच कव्हर सिलेक्ट झाले तरी इतर डिझाइन्स अंकात असणारच आहेत. त्यामुळे प्लीज प्लीज और आयड्या आन दो. :)

प्रचेतस's picture

17 Oct 2013 - 9:18 pm | प्रचेतस

धन्स रे.
बाकी अजूनही कित्येक फोटो आहेत. पिकासा लिंक व्यनि करतो. हवीत ती बिंधास्त घे.

हायला वल्लीशेठ आमाला बी व्यनी करा की लिंक राव. आमी तुमचे फटु नुसते बघु म्हनतोय....

प्रचेतस's picture

17 Oct 2013 - 9:31 pm | प्रचेतस

करतो की.
हाकानाका :) पण ते फोटू इतर कुठे वापरू नका म्हणजे झालं. ;) जस्ट किडिंग.

डॉ सुहास म्हात्रे's picture

18 Oct 2013 - 10:42 am | डॉ सुहास म्हात्रे

मला पण ती लिंक पाठवू शकाल का?

प्रचेतस's picture

18 Oct 2013 - 11:25 am | प्रचेतस

नक्कीच

अभ्या..'s picture

18 Oct 2013 - 12:01 pm | अभ्या..

वल्ली तुला म्हणल्याप्रमाणे तू काढलेला फोटो आपल्याला असा पण वापरता येईल दिवाळी अंकाच्या मुखपृष्ठासाठी. :)
valli
बाकी ज्या सद्स्यांना वल्ली त्याने काढलेल्या फोटोची लिंक देणार आहे त्यांच्यासाठी.
हे फोटो त्याने बरेच त्रास घेऊन, पदरमोड करुन आणि केवळ त्याच्या अभ्यास व छंदासाठी काढलेले आहेत. आपल्याला सर्वानाच ते पाहावेसे वाटतात, कौतुक वाटते. साहजिक आहे, पण त्याचेच फोटो इतर बर्‍याच ठिकाणी स्व:तचे म्हणून दुसर्‍यांनी वापरलेले आहेत. आजकाल जालावरती अशा प्रकाराने स्वप्रसिध्दी मिळवायचे प्रकार जास्त आहेत. वल्ली बिचारा साधा वॉटरमार्क पण वापरत नाही. त्यामुळे या फोटोचा वापर जपुन करा. दुसर्‍या कोणा चमको लो़कांच्या हाती ते पडू नयेत हिच इच्छा.

प्रचेतस's picture

18 Oct 2013 - 12:52 pm | प्रचेतस

हायला.
काय देखणी दिसतेय रे दर्पणसुंदरी.
हाडाचा कलाकार आहेस तू.

कोमल's picture

18 Oct 2013 - 1:04 pm | कोमल

+१००
>> हाडाचा कलाकार आहेस तू.

बॅटमॅन's picture

18 Oct 2013 - 4:25 pm | बॅटमॅन

घनश्याम नयनी आला
सखे, मी काजळ घालू कशाला ?

याचे मस्त चावट विडंबन या निमित्ताने आठवून हसलो. धन्यवाद =))

पिलीयन रायडर's picture

18 Oct 2013 - 3:41 pm | पिलीयन रायडर

मुळ फोटो पण सुंदर.. आणि मुखपृष्ठ सुद्धा..!!

वल्ली.. भुलेश्वर बद्दलची माहिती कुठे लिहीली आहेत का? असल्यास लिंक द्याल का?

यशोधरा's picture

18 Oct 2013 - 4:02 pm | यशोधरा

मस्त दिसते आहे! ह्याच टेक्श्चरमध्ये कृष्ण धवल कसे दिसेल अभ्या?

फोटोंबाबत सहमत.

अभ्या..'s picture

18 Oct 2013 - 4:08 pm | अभ्या..

चालेल की पण मला ते कॄष्ण्धवल कव्हरपेज म्हणलं की साधनाचे मुखपॄष्ठ आठवते. वारी फेम संदेश भंडारेचे अप्रतिम फोटो असलेले. :)
रंगीत संगीत माणसांचा अंक पण असु दे की रंगीत (इति गवि आणि नीलकांतमालक उवाच) :)

यशोधरा's picture

18 Oct 2013 - 1:05 am | यशोधरा

भुलेश्वर भूल पाडणारेच आहे! :)

चौकटराजा's picture

18 Oct 2013 - 9:45 am | चौकटराजा

ह्यी चालन ! काय रायल्टी बिल्टी ची भान्गड नाय !

पैसा's picture

17 Oct 2013 - 8:58 pm | पैसा

काही सुचलं तर नक्की सांगेन!

जेनी...'s picture

17 Oct 2013 - 9:37 pm | जेनी...

आव्हान फुले आव्हान !!! सासुबैन्ना सुचलं कि मी येउन सांगेन =))

पैसा's picture

17 Oct 2013 - 9:44 pm | पैसा

तुला काही सुचेपर्यंत दिवाळी संपून शिमगा सुरू होईल!

जेनी...'s picture

17 Oct 2013 - 9:46 pm | जेनी...

:-/

ए तुमच्या मुखप्रुष्ठावर आम्हा सासुसुनेचा फोटो हवाय हं ! एकमेकिन्च्या गळ्यात गळे
घालुन पणत्या लावताना :D :P

अभ्या..'s picture

17 Oct 2013 - 9:50 pm | अभ्या..

सिलेक्ट आय्ड्या.
आता दोन्ही आयड्यानि तो फ़ोटो तेवढा पाठवा आग लावताना. सॉरी दिवे लावताना. :-D

पैसा's picture

17 Oct 2013 - 9:52 pm | पैसा

>>>आग लावताना फोटो म्हणे>>>

रॉकेल कुठे मिळतंय हल्ली?

यशोधरा's picture

17 Oct 2013 - 10:51 pm | यशोधरा

कशाला रॉकेल? तुम्ही दोघींनी एकमेकींकडे पाह्यलं तरी पुरे ना? :D

अत्रुप्त आत्मा's picture

18 Oct 2013 - 12:08 am | अत्रुप्त आत्मा

@तुम्ही दोघींनी एकमेकींकडे
पाह्यलं तरी पुरे ना?>>> =)) +++++१११११ =))

दोन्ही ऑप्शनमध्ये खेचतोयेस की बे ;) =))

डॉ सुहास म्हात्रे's picture

18 Oct 2013 - 10:45 am | डॉ सुहास म्हात्रे

"...पणत्या लावताना..." ऐवजी "...दिवे ओवाळताना..." म्हटलेले जास्त योग्य दिसेल नै का? :) ;)

मी पण बघतो वीकांतास काही रंगरंगोटीचं काम करता आलं तर. सोम्मारपत्तोर पाटिवलं तर चालतंय का??

अभ्या..'s picture

18 Oct 2013 - 4:04 pm | अभ्या..

आर पाटीव सुडा. कवा बी पाटिव. म्याच हाय हितं. घ्यायलाच बस्लोय. :)
फक्त नर्कचतुर्दशीची आंघोळ करुन पाठवु का म्हणु नकोस. ;)
जर्रा उगी आपलं बिगि बिगि ह्या शन्वार्रैवार करायच बग अन पाटव.

ज्ञानोबाचे पैजार's picture

18 Oct 2013 - 4:47 pm | ज्ञानोबाचे पैजार

Krishna

कोमल's picture

18 Oct 2013 - 6:03 pm | कोमल

अप्रतिम,
मूर्तीही आणि देखावाही..

अवांतर : ठिकाणाची माहिती देणार का पैजारबुवा?? नक्की जाईन..

कान्ह्याच्या प्रेमात असलेली

जेनी...'s picture

18 Oct 2013 - 10:05 pm | जेनी...

अय्या तु पण ??
मी पण :)

ज्ञानोबाचे पैजार's picture

19 Oct 2013 - 10:15 am | ज्ञानोबाचे पैजार

धन्यवाद कोमलताई,

तो श्रीकृष्ण राजगुरु नगर जवळील आनंद व्हॅली रीसॉर्ट मधला आहे.

मला तो बघताक्षणीच आवडला होता.

मीनल's picture

20 Oct 2013 - 4:28 am | मीनल

अरे दिवाळी ला अनुसरून काही तरी पाठवा. उदा: दिवे,पणती, आकाश कंदिल, रांगोळी, फराळ, वगैरे.

जेपी's picture

20 Oct 2013 - 10:53 am | जेपी

मला वाटत मिपा च वेगळेपण त्याच्या सदस्यनामातही आहे . असली (वि)चित्र नाव मी आधी कधी पाहिली , वाचली नाहीत . बघा काही जमतय का .