दुबईचा सफरनामा भाग १ व २

शशिकांत ओक's picture
शशिकांत ओक in जनातलं, मनातलं
13 Oct 2013 - 1:53 pm

मित्रांनो, विजयादशमीच्या सर्व मिपाकरांना हार्दिक शुभेच्छा...
नुकतीच दुबई व आबुधाबीची सपत्निक सफर घडली. त्याच्या संबंधी काही प्रवासवर्णनात्मक ललितलेखन झाले ते 1 ते २ सादर करतो. आवडले तर पुढील धाग्यातून भाग ७ पर्यंत सादर करेन.
दुबई सफरनामा भाग – 1
साईदत्त टुरिझमचे देखणे आयोजन – दुबईची सैर

साईदत्त टुरिझम कडून 'दुबई व अबूधाबी सहलीसाठी फक्त ६जागा शिल्लक!' असा मेसेज आला. त्याच्याकडे मी दुर्लक्ष केले. पण नेमका तो मेसेज अलकाच्या मोबाईलवर देखील आला. सायंकाळी मी घरी आलो तोवर नेहा, चिन्मय, वरदा समावेत अलकाचे दुबईस काय काय खरेदी करायचे बेतही तयार होते! त्याला तसे कारणही होते. १८५०० रुपयात ४ रात्री? शिवाय अबूधाबी सफर! अविश्वसनीय भाड्याने डोळे विस्फारले गेले नाहीत तरच नवल! शिवाय नुकताच निवृतीवेतनातील फरक मिळवून चार पैसे खिशात खुळखुळत होते.
झाले, अलका व मी जाऊन भेटून खरे की काय याची चाचपणी करायला साईदत्तच्या ऑफिसात पोहोचलो. तिथे एक एक बिंगे बाहेर पकडायला लागली! १८५०० रुपयांशिवाय ४५०डॉलरचा चढावा द्यायला लागणार हे कळताच मी मनातल्या मनात गणित करून ५०, ०००च्या आता मामला फिट होतोय असा कयास केला. अलकाच्या मनात लाखात ५ दिवसीय दुबई यात्रा साईदत्त तर्फे करायचे होतेच. मग काय आम्ही पैसे भरून परतलो. हे घडले ३-४ सप्टेंबरला. आणि आज दि. २० सप्टेंबरला विमानात बसून प्रवासात विरंगुळा म्हणून हे लेखन करत आहे.


विमानतळावर उतरलो तेंव्हा दिसलेला रनवे चा भाग"
2
दुबईचा देखणा विमानतळ पुढील दिवसात भव्य नेत्रदीपक स्थळांची झलक दाखवत असावा...
Figure 3
बोलक्या अलका व अंजली बहिणीद्वय दोन्ही बाजूला व मधे शांत शांत त्यांच्या मावशी, सोबत पत्नी अलका.

--------
दुबई सफरनामा भाग 2

दुबईचे म्युझियम

विमान दुबईस उतरले तेव्हा तिथले सकाळचे ९.३० झाले होते. आम्ही ३५ जण होतो. त्यातील १२ जाणार मारवाड़ी समाजाच्या होते. पुढे परते पर्यंत त्यांच्या व्यापारी नजरेतून जग पहायच्या भूमिकेचे कौतुक व हेवा वाटला. असो.
उत्तुंग इमारती, नवनव्या मॉडेल्सच्या कार्सची गर्दी, मेट्रो लाइन व स्टेशन पहात पहात हॉटेल अँबॅसेडोर कधी आले कळले नाही. बाहेर सणाणून गर्मी वाढवायचा आता आमची वाट पहातात असलेल्या बसमधून आम्ही जवळच्या म्युझियम पहायला निघालो.
सर्वांचे पासपोर्ट हॉटेलवाल्यांच्या स्वाधीन करून झाल्याने ते झंझट संपले होते.
एका गढीवजा मातीच्या भिंतीवरती लिंपण लावलेले होते. मधल्या बखळीसारख्या जागेत एक बिनपाण्याची रहाट- विहीर, जुनाट दोरखंड, एक ब्रिटिश ब्रिटिश कालीन लाकडी नाव, तोफ...मडक्यांच्या विखुरलेल्या खापऱ्या वगैरे माल पाहून ज्यांना 'इतिहास' नाही त्यांना असे काही तरी ठेवून वेळ व जागा भरून काढायला लागते असे वाटले.
सहलीवरून परतताना विमानात बसून दुबईतील थक्क करणारे अनेक प्रकल्प आठवून नवा इतिहास रचण्याची त्यांची जिगर पाहून प्राचीन भारताचा इतिहास पाठीवर ओझ्याप्रमाणे बाळगणाऱ्या आम्हाला नवा इतिहास घडवण्याचा संदेश दुबई देते आहे याची जाणीव झाली.
1
असाच नौकेतून अरबांचे इतर देशांशी संपर्क होत असत.
2
ऐतिहासिक तोफा व मातीने लिंपलेल्या धाब्याच्या गढ्या"
3
नवनिर्माणाचा नवा इतिहास "
4
गगनचुंबी इमारतीतून ओसंडणारा संपत्तीचा झरा"

भाग 2 समाप्त पुढे चालू...

मौजमजाविरंगुळा

प्रतिक्रिया

प्रचेतस's picture

13 Oct 2013 - 2:00 pm | प्रचेतस

वा काका.
सुरेख सुरुवात.

पुढचे भागसुद्धा पटापट येऊ द्यात.

धन्या's picture

13 Oct 2013 - 2:12 pm | धन्या

काका, मोठे फोटो टाका. आणि भागही मोठे टाका. :)

काही घटना व स्थळे यांच्या संबंधी अनुभव सांगतोय ते आटोपशीर असलेले बरे...

चित्रगुप्त's picture

13 Oct 2013 - 4:50 pm | चित्रगुप्त

छान सुरुवात. पुढील सर्व भागांच्या प्रतिक्षेत.

पुढे परते पर्यंत त्यांच्या व्यापारी नजरेतून जग पहायच्या भूमिकेचे कौतुक व हेवा वाटला.

या 'व्यापारी नजरेतून जग पहायच्या भूमिके' बद्दल पुढे अवश्य लिहावे. आम्ही आजपर्यंत 'व्यापारी नजर' ही एक धिक्कारणीय बाब आहे असेच ऐकत्/समजत आलेलो होतो, तुम्हाला ती कौतुकास्पद, हेवास्पद वाटली म्हणून मुद्दाम विचारत आहे.

अग्निकोल्हा's picture

13 Oct 2013 - 5:51 pm | अग्निकोल्हा

जेब्बात! असे म्हणेन.

शशिकांत ओक's picture

13 Oct 2013 - 7:26 pm | शशिकांत ओक

मराठी माणसाच्या स्वभाव वैशिष्यात पैसे कसे कमवायचे यासाठी खटपट करायला नव्हे शाब्दिक चर्चा करायला देखील तो संकोचतो हे जाणवते. ते हीन मानसिकतेचे लक्षण आहे असे तो मानतो. माझे मारवाडी मित्र व त्यांच्या घरवाल्या फॅशनेबल ड्रेसेसमधे खरेदीला जात व भरपूर सामान व सोने विकत आणत. त्यातही घासाघीस करण्यासाठी दुकाने कोणती चांगली, बरी व बेकार याची चर्चा त्यांच्यातल्या त्यांच्यात रंगताना आम्ही पाहात होतो. इकडे सफरीला निघायच्या आधी घेतलेल्या मीटींगमधे दोन नंबरचे पैसे कसे नेता येतात असा टेढा सवाल करून आपली तशी तयारी असल्याचे सांगून आपली वेगळी ओळख दिली होती.
सफरीत विविध उंच उंच इमारतींचे कारनामे पाहत असता, हे लोक अशा इमारतींची कॉन्ट्रॅक्ट मिळवायला काय करावे लागेल व लायसन्स काढायला काय करावे लागेल यावर गाईडशी चर्चा करत होते. जेंव्हा त्यांना कळले की इथल्या अरब शेखांशी पार्टनरशिप केल्याशिवाय कुठलाही व्यवसाय किंवा व्यापार करायला परवानगी मिळत नाही. यावर पुढील वेळी दुबईत येऊन असे शेख शोधायला यायचे बेत ते करत होते! अशा लोकांच्या विचारात व्यवसायाच्या गणिताचे त्रैराशिक भिनलेले पाहून मला त्यांचा हेवा वाटला व एकापरीने अभिमान वाटला.
एकांशी बोलताना माझे पुर्वीपासूनचे त्यांच्या समाजाबाबतचे विचार व्यक्त केले. ते ऐकून ते थक्क झाले. ते म्हणाले की सिनेमे व अन्य माध्यमातून आमच्याबद्दल जे चित्र रंगवले जाते याचा खेद वाटतो.
मी म्हटले माझे मत आहे की जोवर आपल्या देशाचा पंतप्रधान मारवाडी समाजाचा होत नाही तोवर आपल्याला व्यावहारिक जगात व्यापारीपत प्राप्त होणार नाही. देशाचे संरक्षण पारशी व आणखी महत्वाची पदे माहेश्वरी समाजाकडे गेली तर एक नवे नेतृत्व उदयाला येईल. जातीसमूह प्रथेचे काही सकारात्मक पैलू आहेत त्यांच्या गुणांची कदर व्हावी. ते म्हणाले, 'आत्ता तरी असे होईल असे वाटत नाही'. मी म्हणालो, 'खरे आहे पण तुमच्या नव्या पिढीला त्यावर तोड काढायला लागेल.'

मुक्त विहारि's picture

13 Oct 2013 - 9:26 pm | मुक्त विहारि

फोटो मस्त आले आहेत...

दुबईच्या म्युझियम संदर्भात अजून माहिती दिली असती तरी चालले असते.

सध्यातरी मी पाहिलेले जमीनीखालील एकमेव संग्रहालय आहे ते...

जगात अजून कुठे जमिनीखाली असलेले संग्रहालय माहीत नाही...

इरसाल's picture

14 Oct 2013 - 9:59 am | इरसाल

पॅरीसचे लुव्र हे पण अर्धे जमिनीखाली आणी अर्धे जमिनीवर आहे.

मुक्त विहारि's picture

14 Oct 2013 - 10:54 am | मुक्त विहारि

माहितीबद्दल मनापसून धन्यवाद..

(कधी पॅरीसला गेलो आणि रात्रीच्या सफरीतून वेळ मिळाला तर अवश्य बघीन, असे लिहीणार होतो पण)

ज्या अर्थी तुम्ही लिहीताय त्याअर्थी आधी संग्रहालय बघीन आणि मग पॅरीसमध्ये भटकीन..

शशिकांत ओक's picture

14 Oct 2013 - 10:36 am | शशिकांत ओक

माहिती बद्दल धन्यवाद.

शशिकांत ओक's picture

14 Oct 2013 - 10:39 am | शशिकांत ओक

यावर प्रतिक्रिया नजरेतून सुटलेली दिसतेय!

अनिरुद्ध प's picture

14 Oct 2013 - 12:03 pm | अनिरुद्ध प

फोटु पण माहिती फारच त्रोटक वाटली,पु भा प्र

पैसा's picture

14 Oct 2013 - 4:30 pm | पैसा

छान सुरुवात!

वाचतोय, फोटु जरा मोठे टाका की...

शशिकांत ओक's picture

14 Oct 2013 - 4:49 pm | शशिकांत ओक

अंगापेक्शा फोटो चाहिए बोंगा मोठा नको म्हणून टाळतोय.

शशिकांत ओक's picture

14 Oct 2013 - 4:50 pm | शशिकांत ओक

अंगापेक्शा फोटोचा बोंगा मोठा नको म्हणून टाळतोय.

असं नाही होत. प्रवासवर्णन फोटोंमुळे अधिक चांगले होते.

फोटो अगदी कलात्मक असायला हवेत असं काही नाही. फोटोंचा भर त्या ठीकाणच्या वैशिष्टयांवर ठेवून व्यक्तीगत फोटो टाळले की झालं.

गुप्ता जी
चित्रे काढायला आपण पुन्हा रंगलेले दिसताय.
यावरून आठवले - माझा एक हवाईदलातील मित्र, स्वतः धुम्रपान करीत नसे. पण ते करणाऱ्या इसमांच्या मुखशलाका पेटवून द्यायाला आपणहून मदत करत असे. विशेषतः पेटवलेली काडी न विझवता धुम्र श्वसनेंद्रियांच्या खोलीत पसरेपर्यंत काढावा लागणारा धीर व नंतर विझलेल्या काडीला योग्य ठिकाणी फेकण्यातील झोकदार झटका फक्त 'रजिनीकांथ' ला च जमतो असे नाही अशा भावात तो कार्य साग्रसंगीत करत असे. 'कारे लेका, या मागचा तुझा हेतू काय? असतो असा विचारता तो म्हणायचा, 'अरे हा हलकट, मला बोलायला चान्सच देत नाही. बॉस पडला... आता तो झुरके घेताना मला बोलायचा चान्स मिळतो रे... असो.
सांगायचा भाग असा की चित्रे काढण्यात प्रवीण व दोऱ्याला लंबक लटकवून विद्याभ्यास केलेले विशारद त्यांच्या प्रतिसादाला दिलेले उत्तर न वाचताच झुरका घ्यायला गुप्त झाले की काय...

चित्रगुप्त's picture

20 Oct 2013 - 2:54 pm | चित्रगुप्त

देशांतरी गेलेलो होतो, नुक्तेच परतलो आहोत.

चित्रगुप्त's picture

20 Oct 2013 - 7:52 pm | चित्रगुप्त

व्यापारी दृष्टिकोनाबद्दल वाचून आम्हाला असा दृष्टिकोण लाभावा, असा ग्रहयोग पत्रिकेत नसल्याबद्दल पुन्हा एकदा धन्यता वाटली.
एक बरे, की ही मंडळी दुबई, सिंगापूर वगैरेलाच जातात.

आमच्यासारख्यांस प्रिय असलेले गड-किल्ले, प्राचीन एकांतपूर्ण स्थळे, वगैरे या धंदेवाल्यांपासून सदैव दूर राहोत.
जादूचे प्रयोग, संगीत, चित्रकला, भटकंती, लेखन-वाचन इ.मधे व्यतीत झालेले जीवनच आम्हाला बुवा जास्त श्रेयस्कर वाटते. व्यापारी नजर लाभली नाही, हे आमचे अहोभाग्य.

शशिकांत ओक's picture

20 Oct 2013 - 11:33 pm | शशिकांत ओक

- दुसरे काय?
जर तुम्ही मारवाडी असता तर, पत्रिकेतील बिचारे ग्रहतारे करतील? गड-किल्ले पहाता व चितारता चितारता मनात, बनवलेल्या चित्रांचे ढीग कसे विकता येतील याची शक्कल लढवून, एव्हाना मकबूल फिदाला मागे टाकून आपल्या सुचित्रांच्या खरेदीसाठी बोल्या लावायला परदेशात स्थायिक झाला असता. असो.
जो तो आपल्या आपल्या अखत्यारीत मजेत जगावा - असावा.