गालिब च्या शायरी चा आस्वाद भाग १

गुल-फिशानी's picture
गुल-फिशानी in जनातलं, मनातलं
9 Oct 2013 - 10:20 am

शेर

सब कहॉ, कुछ लाला-ओ-गुल मे नुमायॉ हो गई
खाक मे क्या सुरते होंगी कि पिनहॉ हो गई.

आस्वाद

या सुंदर शेर मध्ये शायर असे सुचवित आहे की जगातले सर्वकाही असे जे सौंदर्य आहे ते अजुन ही पुर्णपणे कुठे लाला-ओ-गुल(अफिम चे लाल सुंदर फुल) मध्ये पुर्णपणे व्यक्त झालेले आहे. (नुमायॉ होणे -व्यक्त होणे ) आता दुसर्‍या ओळीत ह्या मार्मीक प्रश्नाचे उत्तर देतांना तो अतिशय तरलतेने indicate करतो ते अजुनही अव्यक्त राहीलेल्या अशा त्या अनुपम अवर्णनीय अशा सौंदर्या कडे. म्हणजेच खाक मध्ये च लुप्त झालेल्या ( पिनहॉ -लुप्त होणे ) सुरते कडे.

म्हणजे तो असे म्हणतो की जे या फुला च सौंदर्य पाहुन आपण हरखुन गेलोय त्यांना तो म्हणत आहे की अरे हा तर tip of iceberg च आहे. खर सौंदर्य तर अजुन अव्यक्त च आहे.याच अनुभवाला स्प्ष्ट करणार एक गाण येसुदास च्या आवाजतल आठवुन बघा " तुम्हे देखकर जग वाले पर क्योकर यकीन नही होगा जिसकी रचना इतनी सुंदर वो कितना सुंदर होगा.?"

मग काय होइल हो या अव्यक्त अशा सौंदर्या च कोण अनुभवेल त्याला काय माहीत बुवा पण आपल्या कुसुमाग्रजां ना विचारल तर ते अस म्हणाले की....................

माझ्या अंतरात गंध कल्प कुसुमांचा दाटे
पण पाकळी तयांची, कधी खुलणार नाही

आता या अंतरिच्या सौंदर्या बद्द्ल अजुन काही बोलु म्हटल तर आपला Wittgensteinभाउ रागाउन म्हणतो कसा “Whereof one cannot speak, thereof one must be silent.”

flower

शब्दक्रीडाआस्वाद

प्रतिक्रिया

रामदास's picture

9 Oct 2013 - 10:26 am | रामदास

काहीतरी नविन वाचायला मिळेल अशी आशा वाटते आहे.
थोडे विस्ताराने लिहीलेले वाचायला आवडेल.
म्हणजे हा लेख अपुरा आहे असे नाही पण पुरेसा नुमायला (व्यक्त झाला) नाही एव्हढंच.

रमेश आठवले's picture

9 Oct 2013 - 11:40 am | रमेश आठवले

'है औरभी दुनियामे सुखनवर बहुत अच्छे
केहते है की गालिब का अंदाजे बयान और'
आणखी गालिबचे शेर येऊ द्या
त्यांच्यावर शेरे मारणारे मिपा सदस्य खूप भेटतील.

वेल्लाभट's picture

9 Oct 2013 - 2:46 pm | वेल्लाभट

गुड.

मिर्झा असदुल्लाह खान गालिब हे एक विद्यापीठ आहे.

कब वो सुनता है कहानी मेरी
और फिर वो भी जबानी मेरी

अत्रुप्त आत्मा's picture

9 Oct 2013 - 2:51 pm | अत्रुप्त आत्मा

वाचिंग! :)

मिसळलेला काव्यप्रेमी's picture

9 Oct 2013 - 5:01 pm | मिसळलेला काव्यप्रेमी

येऊ द्या पुढचा भाग..

लिहाल तितकं कमी आहे. शब्दार्थ सांगणारे अनेक असतील, तुम्ही अन्वयार्थ सांगाल अशी अपेक्षा!

पुलेशु!

अर्धवटराव's picture

9 Oct 2013 - 8:44 pm | अर्धवटराव

दसरा-दिवाळीची मेजवानी मिपावर सुरु झाली म्हणायची.

हा शेर स्वतः पूर्ण असला (म्हणजे सौंदर्याचा टीप ऑफ आईसबर्ग सुचवण्यापुरता) तरी ते अव्यक्त सौंदर्य गालीब साहेबांनी आपल्या शायरीत कसं मुरवलं हे वाचण्याची तल्लफ आहेच.

पुभाप्र.

पैसा's picture

9 Oct 2013 - 10:27 pm | पैसा

आणखी लेख लिहा, आणखी विस्तार करून लिहा!

प्यारे१'s picture

10 Oct 2013 - 12:32 am | प्यारे१

संपलं????
सुरु व्हायच्या आधीच?
दोन घास तोंडात टाकून काय मस्त टेस्ट आहे म्हणेपर्यंत संपलं?
नाय चालणार मियाँ नाय चालणार!