ती आणि मी - सुख म्हणजे आणखी काय असते.. (८)

तुमचा अभिषेक's picture
तुमचा अभिषेक in जनातलं, मनातलं
8 Oct 2013 - 10:11 pm

२ ऑक्टोबर २०१३
.
.

तापलेल्या तव्यावर चरचरणार्‍या मच्छीचा वास.. स्वयंपाकघरातून दिवाणखान्याला चकमा देत, चुरचुरत थेट, बेडरूममध्ये माझ्या नाकाला झिणझिण्या द्यायला आत शिरला.. अन दिवसभराच्या कामाचा अर्धा थकवा तिथेच पळाला. श्रावणापाठोपाठ गणपती अन त्यामुळे थंडावलेला मत्स्याहार.. जर आजचा हा वार चुकला तर पुढचे काही दिवस नवरात्री निमित्त पुन्हा जिभेला लगाम घालावा लागणार हा विचार खायची इच्छा आणखी प्रबळ करून गेला.. अर्थात बाहेर हॉटेलात खायला तेवढी परवानगी होती, पण तिथे घरची, आईच्या हातची चव कुठे येणार.. ते नेहमीच ताकाची तहान दूधावर वाटते मला.... म्हण मुद्दामच उलटी म्हटली कारण दूधापेक्षा ताकच जास्त आवडते मला..

रात्रीचे दोन घास कमीच खायचे असतात, हे मानून आणि पाळूनही आज चार घास जास्तच गेले. तळलेली मच्छीची तुकडी आणि सारभात असले की हे माझे नेहमीचेच आहे, पण आजवर ना कधी मळमळले ना कधी अजीर्ण झाले. आज तेवढे जेवण जरा अंगावर आले.. घरच्या घरी केलेली शतपावली यावर उतारा म्हणून पुरेशी असते, पण आज चार पावले जरा जास्तच चालावीशी वाटली.. आधी आमच्या जुन्या घरी चाळीचा कॉमन पॅसेज मुबलक उपलब्ध व्हायचा, पण आता थेट रस्त्यावर उतरावे लागले. अर्थात तू तिथं मी या उक्तीला अनुसरून जोडीनेच उतरलो.. खरे तर लग्न झाल्यावर नवे जोडपं म्हणून रोजच रात्री जेवल्यावर बाहेर फेरफटका मारायचा शिरस्ता होता आमचा.. नाक्यापलीकडच्या चौकापर्यंत चालत जायचे अन तिथेच एखादा बसस्टॉप गाठून त्यावर बैठक जमवायची.. मग दिवसभरातील गप्पा, उद्याचे प्लॅन, उगाळलेला भूतकाळ अन रंगवलेली भविष्यातील स्वप्ने... संसारात गुरफटलो तसे रोजच्या रूटीनमध्ये हे सारे मागे पडले.. पण त्याची खंत अशी कधी वाटली नाही, ना आवर्जून पुन्हा तसे करावेसे वाटले.. आज मात्र पुन्हा तसाच फेरफटका मारायच्या विचाराने तिचेही मन उल्हासित झाले एवढे मात्र खरे.. विचारणा करताच तिचे लगबगीने तयार होणे यातच ते सारे आले.. रात्रीची वेळ असूनही तिचे नेहमीचेच, मी काय घालू अन मला काय चांगले दिसेल, हे प्रश्न विचारणे चालूच होते.. सवयीनेच मी विचार न करता एखादा निर्णय देऊन टाकला.. अन तिनेही अखेर नेहमीप्रमाणेच जे तिच्या मनात होते तेच परिधान केले..

बिल्डींग खाली उतरलो अन समोर रस्त्यावर नजर टाकली, तर माझगावच्या महालक्ष्मीचे वाजतगाजत आगमन होत होते. अपशकुन मी मानत नाही मात्र शुभशकुनांवर विश्वास ठेवतो. देवीला आडवे जाण्यापेक्षा सामोरी जाऊन तिचे दर्शन घेतले. मिरवणूकीची गर्दी असल्याने बायको लांबवरच थांबली, मात्र मी थेट देवीच्या चरणापर्यंत पोहोचलो.. नुकतेच गणपती येऊन गेलेले, तेव्हा त्या गणरायाच्या मुर्त्या पाहताना जगात यापेक्षा सुंदर अन देखणे शिल्प असूच शकत नाही असा जो विश्वास वाटायचा त्यावर मात्र या देवीच्या चेहर्‍यावरील सात्विक भावांनी मात केली. कदाचित देवी हि एक स्त्री असल्याने तिच्यात मातेचे रूप दिसत असावे अन हि सात्विकता त्यातूनच आली असावी.. काही का लॉजिक असेना, जय माता दी म्हणत नकळत मजसारख्या नास्तिकाचेही हात जोडले गेले. दुरून पाहणार्‍या एखाद्याला यात भक्तीभावच दिसला असता पण माझ्यासाठी मात्र हा संस्कारांचा भाग होता.. गर्दीतून वाट काढत अन उधळल्या जाणार्‍या गुलालाला चुकवत, मी मागे फिरलो तर खरे, पण थोडे चालून गेल्यावर लक्षात आले की देवीचा फोटो काढायची छानशी संधी हुकवली.. मागे सोडून आलेल्या गर्दीमध्ये आता पुन्हा मिसळायची इच्छा होत नव्हती, मात्र हे वेळीच का सुचले नाही याची चुटपुट मात्र लागून राहिली.. अन याच चुटपुटीत मागे वळून वळून पाहत पुढे पुढे चालत राहिलो ते अगदी वळण येईपर्यंत..

मिरवणूकीच्या आवाजाला सोडून दूर निघून आलो तसे वातावरणात एक शांतता जाणवू लागली.. पण त्याच बरोबर एक गारवादेखील.. अचानक एखादी दुचाकी वेगाने सुसाट निघून जायची तर एखादी चारचाकी स्पर्शून जातेय की काय असे वाटायचे.. काळजीपोटी मग तेवढ्यापुरते फूटपाथवरून चालणे व्हायचे पण मोकळ्या ठाक पडलेल्या रस्त्यावरून चालायचा मोह किती काळ आवरणार.. तिचा हात हातात घेऊन आणि तिला उजव्या हाताला सुरक्षित ठेऊन त्या नीरव शांततेचा आस्वाद घेत जमेल तितके रस्त्याच्या कडेकडेने चालू लागलो..

आमच्या नेहमीच्या.., म्हणजे एकेकाळच्या नेहमीच्या बसस्टॉपवर काही मुलांचा ग्रूप बसलेला दिसला.. तसे त्याला टाळून पुढच्या बसस्टॉपच्या शोधात निघालो.. गेल्या काही वर्षांत बसने प्रवास करण्याचा योग आला नसल्याने आपल्याच विभागात कुठेकुठे बसस्टॉप आहेत याचीही आपल्याला माहीती नसल्याची जाणीव झाली.. अन मग ते शोधायच्या नादात काही अश्या गल्ल्या फिरू लागलो ज्यांना मी स्वता कित्येक वर्षे मागे सोडून आलो होतो.. त्या गल्यातच मग मला एकेक करत काहीबाही गवसू लागले.. काही जुन्या चाळी जाऊन टॉवर उभे राहिलेले तर काही चाळी आणखी विदीर्ण अवस्थेत पोहोचल्या होत्या.. ओळखीच्या वडापाव-पावभाजीच्या गाड्या उठल्या होत्या तर एका चिंचोळ्या गल्लीतही नवे चायनीज रेस्टॉरंट उघडलेय याचा शोध लागला.. मध्येच एखाद्या वाडीकडे बोट दाखवून मी हिला सांगू लागलो की इथला गोविंदापथक एकेकाळी खूप फेमस होता, ज्याबरोबर हंड्या फोडायला एके वर्षी मी देखील गेलो होतो.. तर पुढे एक मैदान लागले जिथे क्रिकेट खेळण्यात माझे अर्धे बालपण गेलेले.. बघता बघता जुन्या आठवणी गप्पांचे विषय बनू लागले, जे बोलताना ना मला थकायला होत होते, ना ऐकताना तिला पकायला होत होते.. मात्र या नादात ज्या गोष्टीच्या शोधात आम्ही फिरत होतो त्या बसस्टॉपलाच विसरून गेलो.. पाय थकले तेव्हा जाणवले आता कुठेतरी बूड टेकायलाच हवे कारण घरापासून खूप लांबवर निघून आलो होतो..

एकट्याने नॉस्टेल्जिक होण्यापेक्षा कधीतरी कोणाच्या साथीने नॉस्टेल्जिक होण्यात एक वेगळीच मजा असते.. अर्थात ती साथही तशीच खास असावी लागते जिला आपल्या गत आयुष्याबद्दल जाणून घेण्यात रस असेल.. अन या जागी आयुष्याच्या जोडीदाराची जागा दुसरा कोण घेऊ शकेल.. बालपणीचे किस्से एकमेकांना सांगत स्वताला दुसर्‍यासमोर आणखी आणखी उलगडवत नेणे या आमच्या आवडीच्या गप्पा.. ज्या आज रात्रीच्या शांततेत बसस्टॉपच्या खांबावर अगदी चंद्रतार्‍यांच्या साक्षीने खुलून आल्या होत्या.. काही वेळापूर्वी रस्त्याकडेने चालताना भेसूर अन भयाण वाटणार्‍या मगासच्या त्या झाडांच्या सावल्या.. आता मात्र मोजकाच तो चंद्रप्रकाश आमच्यावर सोडून मंदधुंद वातावरणनिर्मिती करत होत्या.. मध्येच एखाद्या कुत्र्याने घेतलेला आलाप आता बेसूर वाटत नव्हता.. त्यापैकीच एक श्वान बसस्टॉपच्या त्या टोकाला जणू आमची प्रायव्हसी जपण्याची काळजी घेतच लवंडला होता.. पण आमच्या गप्पा काही संपणार्‍यातल्या नव्हत्या ना डोळे पेंगुळणार होते.. मात्र वेळाकाळाचे भान आले तसे पुढचा किस्सा घरी सांगतो असे तिला म्हणतच आम्ही उठलो..

परतीच्या वाटेवर घरापासून चार पावले शिल्लक असताना, आमची हि नाईट सफारी संपत आली असे वाटत असतानाच, समोर पाहिले तर काय.... मगासची देवीची मिरवणूक या एवढ्या वेळात जेमतेम शंभर पावले पुढे सरकली होती.. आमच्या ‘डी’ विंगचा निरोप घेऊन निघालेली ती आता ‘ए’ विंग वाल्यांना दर्शन देत होती.. चमत्कारांवर माझा विश्वास नाही मात्र नशीबावर आहे.. नुसतेच दर्शन नाही तर दर्शनाची स्मृती फोटोरुपात जपण्याची संधी मला देणे हे तिच्याच मनात असावे.. अन इथे बायकोनेही माझ्या मनातले भाव ओळखून मला फोटो काढायला पिटाळले.. आता मात्र झोपताना कसलीही चुटपुट मनाशी राहणार नव्हती.. सुख सुख जे म्हणतात त्याची व्याख्या आजच्या रात्री तरी माझ्यासाठी हिच होती..

- तुमचा अभिषेक

---------------------------------------------------------------------------------------------------------
ती आणि मी - सुख म्हणजे आणखी काय असते.. (१) - http://misalpav.com/node/24985
ती आणि मी - सुख म्हणजे आणखी काय असते.. (२) - http://misalpav.com/node/25031
ती आणि मी - सुख म्हणजे आणखी काय असते.. (३) - http://misalpav.com/node/25051
ती आणि मी - सुख म्हणजे आणखी काय असते.. (४) - http://misalpav.com/node/25068
ती आणि मी - सुख म्हणजे आणखी काय असते.. (५) - http://misalpav.com/node/25116
ती आणि मी - सुख म्हणजे आणखी काय असते.. (६) - http://misalpav.com/node/25499
ती आणि मी - सुख म्हणजे आणखी काय असते.. (७) - http://misalpav.com/node/25550
---------------------------------------------------------------------------------------------------------

मुक्तकरेखाटनप्रकटनविचारआस्वादलेखअनुभव

प्रतिक्रिया

अर्धवटराव's picture

8 Oct 2013 - 11:13 pm | अर्धवटराव

खरच... सुख म्हणजे वेगळं आणखी काहि नसतं :)
पुढील अंगरखा लवकर दाखवा.

स्पंदना's picture

9 Oct 2013 - 4:06 am | स्पंदना

हं!

विटेकर's picture

9 Oct 2013 - 11:10 am | विटेकर

मजा आली ! नेहमीप्रमाणे ..

दादा कोंडके's picture

9 Oct 2013 - 11:33 am | दादा कोंडके

अजीर्ण होण्यासारखं दवणीय लेखन.

उरलीसुरली कसर,

अपशकुन मी मानत नाही मात्र शुभशकुनांवर विश्वास ठेवतो.
जय माता दी म्हणत नकळत मजसारख्या नास्तिकाचेही हात जोडले गेले.
चमत्कारांवर माझा विश्वास नाही मात्र नशीबावर आहे

वा ओळींनी भरून काढली.

प्यारे१'s picture

9 Oct 2013 - 12:33 pm | प्यारे१

चान चान!

अवांतरः कधीतरी मोराच्या समोर उभं राहून पिसारा बघावा माणसानं.
सदानकदा कसं मागं जाऊन उघडं ढुंगण बघायची इच्छा?
बरं बघितलं तर बघितलं, गप बसावं की... सगळ्यांना सांगत बसायचं!

विटेकर's picture

9 Oct 2013 - 12:47 pm | विटेकर

अवांतर आवडले..
छिद्रान्वेषीपणा निव्वळ ! उगा मताची पिंक टाकून शुभ्र पांढर्यावर डाग पाडायचे.

दादा कोंडके's picture

9 Oct 2013 - 1:23 pm | दादा कोंडके

:D

आपल्या मताचा आदर आहे. ते मत कितीही वेळा सगळ्यांना सांगण्याच्या स्वातंत्र्याबद्दलदेखिल आदर आहे.

प्यारे१'s picture

9 Oct 2013 - 2:15 pm | प्यारे१

आभारी आहे. :)

एच्टूओ's picture

9 Oct 2013 - 1:26 pm | एच्टूओ

*lol* *LOL* :-)) :)) =)) +)) :-))) :))) :lol:

प्यारे काका संपादक पदासाठी हार्दिक शुभेच्छा ;)
.
.
आणि अवांतर विटेकरबुवा,
पांढरेशुभ्र वातावरण पण सुतकी वाटू लागते हो नंतर. किंवा प्रियदर्शनचा चित्रपट पाह्ल्याचे फील येते.
शुभ्रावर आहे रंगीबेरंगी प्रतिसादाची सोय तर असु द्या की थोडे पिंक, थोडे मरून. काय बिघडले?
.
(फ्यान ऑफ दि मिपा आयडी दादा कोंडके)

प्यारे१'s picture

9 Oct 2013 - 2:27 pm | प्यारे१

खिक्क्क.
अरे ते प्यासा मधलं गुरुदत्तचं गाणं टाका रे कुणीतरी...
ये दुनिया गर मिल भी जाये तो क्या हय ;)

'संपादक पदे दु:खाची शिराणी' रे अभ्या...

अब्या मुकि बात्छी नलीतु नेयार =))
फॅन लंबर २

तुमचा अभिषेक's picture

9 Oct 2013 - 9:55 pm | तुमचा अभिषेक

मला मुळात दवणीय या शब्दाचा अर्थच माहीत नसल्याने आपल्या मताशी सहमती किंवा असहमती तुर्तास दाखवू शकत नाही.
तसेच आपण याचा अर्थ उलगडण्यास मला मदत व्हावी या हेतूने ज्या पोस्ट कोट केल्यात त्यातूनही काही अर्थ लागत नाहीये.
याला माझे अज्ञान समजू शकता मात्र एकंदरीत आपल्याला हि लिखाणाची शैली भावली नाही असा सूर लागतोय, म्हणूना खास आपल्या सोयीसाठी माझे इतर काही विविध शैलीतले लिखाण खाली देतोय. कृपया त्यावर मत द्यावे जेणेकरून आपली आवड समजेल.

..............

१) पाच आदमी एक उस्सल और पाव नही ??? -- http://misalpav.com/node/23912 - यात हृदयस्पर्शी लिहिण्याचा प्रयत्न केलाय, अन बहुतेक तो जमलायसा वाटतो, माझ्या आवडत्या कथांपैकी एक.

२) च्याईला परत तिचा फोन आला -- http://misalpav.com/node/23959 - यात जराशी खुसखुशीत सुरुवात करून शेवट थोडासा सेंटी कसा करता येईल हे बघितलेय.

३) माझी पहिली ऑर्कुट डेट - http://misalpav.com/node/24008 - हा माझ्या डेटींगचा एक किस्सा पुष्पक फेम कमल हसन छाप विनोदी अंगाने लिहायचा प्रयत्न केलाय.

४) एक रात्र सरपटलेली - http://misalpav.com/node/24103 - भयप्रद अन अंगावर काटा आणणारी किळसवाणी कथा.

५) माझी गडचिरोली सफर - एक थरारक अनुभव -- http://misalpav.com/node/24225 -- नावाप्रमाणेच थरारक, आणखी काय वर्णावे !

६) माय ईंग्लिश वॉल्कींग - http://misalpav.com/node/24483 -- एक प्रयत्न आचरट विनोदी लेख लिहिण्याचा.

७) एक सिगारेट पिणारी मुलगी -- http://misalpav.com/node/24641 -- या कथेला कोणत्या कॅटेगरीत टाकावे हे समजत नाही, आपणच वाचून एखादा शब्द सुचवावा.

८) हो मीच ती एक सिगारेट पिणारी मुलगी -- http://misalpav.com/node/24715 -- वरच्या कथेचाच पार्ट टू.. पण मुलीच्या दृष्टीकोनातून विचार करून..

९) बालक पालक आणि मी -- http://misalpav.com/node/24832 -- हा एक लेख लिहायचा प्रयत्न.. कितपत जमला सांगालच..

१०) एक हरवलेली मैत्री -- http://misalpav.com/node/24872 --- कथा क्रमांक १) उस्सलपावसारखीच हि देखील एक हृदयस्पर्शी कथा, अन हि देखील माझ्या आवडत्यापैकी एक..

११. अ) सावल्या -- http://misalpav.com/node/25331
ब) वॅलेंटाईन डे -- http://misalpav.com/node/25337
क) धाडस -- http://misalpav.com/node/25382
या तीनही अनुक्रमे शतशब्दकथा आहेत... प्रत्येकात शेवटी एक ट्विस्ट देण्याचा प्रयत्न केलाय..

१२) फिर मिलेंगे भाईजान - http://misalpav.com/node/25594 -- दादा कोंडके प्रोफाईल नावाला जागायचे म्हटले तर हि सुद्धा आवडू शकते.. ;)

....................

थोडेफार लिखाण इतर आयडीने केले असल्याने ते तुर्तास सांगू शकत नाही त्याबद्दल क्षमस्व !

तरी यातले आपल्याला कुठल्या प्रकारचे वाचायला आवडेल हे समजल्यास आणि पुढच्या वेळी तसे काही लिखाण करायचा योग आल्यास आपल्या खरडवहीत येऊन लिंक देऊन जाईन.

मात्र कृपया "आवरा" असे म्हणू नका, प्रत्येक लिखाण प्रत्येकालाच आवडेल असे नसते, काही लिखाण मला स्वतासाठीही करूद्या की. ज्या दिवशी माझे नाव बघूनच इथले लोक त्यावर क्लिकायचे बंद होतील, वाचनांची संख्या आटेल त्या दिवशी मी स्वता आवरते घेईन, अर्थात लिखाण नाही तर इथे प्रकाशित करायचे थांबवेन.

तळटीप - वर मी माझ्या कथांच्या लिंका दिल्यात याला कृपया जाहिरात करतोय असे समजू नका.. हवे तर स्वस्तुती समजू शकता, कारण ती मी करतो.. मला ते आवडते.. ज्या गोष्टीने दुसर्‍याला त्रास होत नाही पण मला स्वताला आनंद मिळतो ते सारे मी करतो.. (एक शंका - हा डायलॉग सुद्धा दवणीय मध्ये मोडतो का?)

अवांतर - माझे नामबंधू अभ्या यांच्याशी सहमत, थोडे प्रतिसादांचे वेगवेगळे रंग धाग्यावर उधळू देण्यात काहीच हरकत नाही, त्या निमित्ताने मिपाकरांना तुमचा अभिषेक नामक इंद्रधनुष्यातील आठवा रंग बघायला मिळेल. :)

प्यारे१'s picture

9 Oct 2013 - 11:38 pm | प्यारे१

तोंडघशी...

आता मात्र आवराच.

दादा कोंडके फॅन नं ३

दादा कोंडके's picture

10 Oct 2013 - 10:08 am | दादा कोंडके

हा हा... :)

(प्यारेंचा फ्यान) दादा

दादा कोंडके's picture

10 Oct 2013 - 10:05 am | दादा कोंडके

दवणीय म्हणजे मराठीत 'मशी'. :)

मी प्रत्येक प्रतिसाद देताना लेखकाबद्दल कोणताही पुर्वग्रह न ठेवता मत देण्याचा प्रयत्न करतो. तुम्ही वरती लि़ंक दिलेले बरेच सगळेच लेख मी वाचलेत. आवडल्याबद्द्ल प्रतिक्रियाही दिल्यात. पण "ती आणि मी - सुख.." ही मालिका जरा जास्तच ताणत आहे असं वाटलं. माझी वैयक्तीक आवड म्हणा (बाकी वपु पहिल्यापासूनच आवडत नाहीत) किंवा वाढत्या वयाचा परिणाम म्हणून हे असलं शब्दबंबाळ, गोग्गोड, गुलाबी लेखन वाचवत नाही. त्यात रात्री-अपरात्री निघालेल्या देवीच्या मिरवणुका, गुलाल उधळणारी गर्दी, रस्त्यावरची भटकी कुत्री, बस स्टॉपवर बसलेलं टोळकं यांना यु टर्न घेउन रोमँटीक संवाद वाचणं म्हणजे पिटातल्या प्रेक्षकांना खुष करण्यासाठी हिंदी चित्रपटातला वन रूम किचेन मध्ये राहणारा हिरो "सेहत के लिये मै स्विझ्झर्लंड जाउ?" संवाद ऐकण्यासारखं वाटलं.

तरी यातले आपल्याला कुठल्या प्रकारचे वाचायला आवडेल हे समजल्यास आणि पुढच्या वेळी तसे काही लिखाण करायचा योग आल्यास आपल्या खरडवहीत येऊन लिंक देऊन जाईन.

हा हा. :)

मात्र कृपया "आवरा" असे म्हणू नका, प्रत्येक लिखाण प्रत्येकालाच आवडेल असे नसते, काही लिखाण मला स्वतासाठीही करूद्या की.

ते "आवरा" म्हणजे एक वाचक म्हणून या लेखाला दिलेली स्पाँटॅनिअस प्रतिक्रिया होती. त्याच्याशी तुम्ही लिखाण थांबवण्याचा संबंध नाही.

ज्या दिवशी माझे नाव बघूनच इथले लोक त्यावर क्लिकायचे बंद होतील, वाचनांची संख्या आटेल त्या दिवशी मी स्वता आवरते घेईन, अर्थात लिखाण नाही तर इथे प्रकाशित करायचे थांबवेन.

ऐसा कैसे मिया? तुम लिकते जाओ. हमकु भाया तो तारीफ करेंगे नै तो गाली देंगे. पर बुरा मान्नेका और रुकने का नै. :D

तुमचा अभिषेक's picture

10 Oct 2013 - 11:04 am | तुमचा अभिषेक

काही हरकत नाही दादा, मी पण तेवढीच संधी घेतली लिंका देऊन जाहीरात करायची, तुमच्या प्रतिक्रियेत वापरलेल्या शब्दांबद्दल राग नव्हताच, कारण मला या सुखाच्या मालिकेवर दोन्ही प्रकारचे प्रतिसाद मिळताहेत, आणि ते मी स्विकारोनही लिखाण चालू ठेवतोय कारण काही जणांना हे आवडत नाही म्हणून ज्यांना आवडते त्यांच्यासाठी तरी लिहायला हवेच ना... ज्यात एक मी स्वताही आहे आणि माझी बायकोही आहे..

बाकी शंका असलीच तर ती हेतूवर होती, तुम्हाला माझ्यापेक्षा मराटी आंतरजाल जास्त माहीत असेल, काही जण चांगल्याला चांगले म्हणणार नाहीत पण जिथे खुसपट काढायची संधी मिळते ती सोडणार नाही, अर्थात अश्यांना मी इग्नोरच करतो, पण वर म्हटल्याप्रमाणे जाहीरात बाजी करायचा चान्स घेतला... असो, पण आपण यातील नक्कीच नाहीत याची खात्री पटली, क्षणभरासाठी गैरसमज झाला त्याबद्दल क्षमस्व ! :)