मिसळपाव: एक व्यक्तिगत इतिहास - भाग ३

Primary tabs

Anonymous's picture
Anonymous (not verified) in जनातलं, मनातलं
16 Jul 2008 - 8:19 am

(भाग एकः http://www.misalpav.com/node/2462

भाग दोनः http://www.misalpav.com/node/2557)

मंडळी, याआधीच्या भागात आपण पोहोचलो आहोत, इसवी सन १६०० च्या आसपास. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य ह्या संकेतस्थळाची स्थापना केली. इतर पाचही शाही स्थळांनी स्वराज्यस्थळांत अफझलडॉन, शाहिस्तेडॉन नावाचे डॉन सदस्य पाठवून वाहतूक मुरंबा घडवून आणण्याचा प्रयत्न केला. पण शिवाजीने एका कुशल संकेतस्थळचालकाच्या भूमिकेतून ह्या सर्व डॉन लोकांची वाट लावली. हे संकेतस्थळ सुरू व्हावे ह्यासाठी अपार मेहनत घेणारे दादोजी कोंडदेव काही कार्यबाहुल्यामुळे सदर स्थळाच्या दैनंदिन कारभारात लक्ष देईनासे झाले, तेव्हा शिवाजीने ह्या स्वराज्य स्थळासाठी नवीन अष्टप्रधान नावाचे सल्लागार मंडळ नेमले. शिवाजीचे चातुर्य बघा, ह्या अष्टप्रधान मंडळात नेमक्या आठच सदस्यांचा समावेश करण्यात आला.

परंतु सदर मंडळ स्वराज्यस्थळावर वारंवार लेखन करत नाही, अशी सदस्यांची तक्रार राहिलीच. (नव्हे, त्यातील फक्त तीनच प्रधान सदस्यांच्या रोजच्या गरजा भागवतात, अशीही तक्रार होती. परंतु महाराजांनी, "सदर अष्टप्रधानमंडळ नेमताना, आम्ही तुम्हाला विचारले नव्हते" असे जाहीर करून ह्या सामान्य - की क्षुद्र - सदस्यांची तक्रार रद्दबातल ठरवली.) ह्यातील एक प्रतापराव नावाचा प्रधान तर त्यांच्या कंपूतील फक्त सहा सदस्यांसह इतर संकेतस्थळांच्या सदस्यांवर तुटून पडतो, आणि स्वराज्य स्थळाची जी स्थैर्याची गरज आहे, ती पूर्ण करत नाही, ही तक्राररूपी खरड तर महाराजांनी स्वत:च केलेली आढळते. पण त्या खरडी आधीच, "त्या दुसऱ्या स्थळावरचे सदस्य येथे येवून काहीच्या बाही प्रतिसाद देवून जातात, त्यांची नीट तजवीज करावी" अशी खरडही महाराजांनी आपल्याला प्रतापरावांच्या खरडवहीत केलेली दिसते. आता, विरोधी स्थळाच्या धुमश्चक्रीत आपल्या प्रधानास गुंतवून घेण्यास भाग पाडल्याने महाराजांना दोष द्यावा, की पुरेशी सदस्यसंख्या स्वत:सोबत न घेऊन गेल्याने पाडाव झालेल्या ह्या प्रधान सदस्यास दोष द्यावा, हे कळणे कठीण. मंडळी, इतिहास एका सरळ रेषेत जात नाही. इतिहासाचा मागोवा असा तिरपा-तिरपाच घ्यावा लागतो. आजच्या इतिहाससंशोधकांसाठी संकेतस्थळावरील तिरप्या-तिरप्या प्रतिसादशृंखलेचा मागोवा घेणे हे यासाठीच आवश्यक ठरते.

असो. दादोजींचे नेटवर्क कनेक्षन बंद पडले. स्वराज्यस्थळाच्या चालकांना नवीन उपदेशकाची चणचण भासू लागली. ती पोकळी "रामदास" ह्या सदस्याने भरून काढली. हे सदस्य तसे यऽयऽयऽयऽ सीनीयर. म्हणजे सदर स्थळाचे ऑफिशियल उपदेशक म्हणून नियुक्त होण्याआधी, त्यांनी "मन्याचे श्लोक" नावाची काव्यरचना आपल्या "मन्या" नावाच्या बोक्यासाठी रचली होती. (सदर सदस्य लग्नाच्या वेदीवरून पळून गेले अशी त्यांची ख्याती असल्याने, सर्व स्त्रीजातीप्रती त्यांची नाराजगी आधीच व्यक्त झाली होती. कुठल्याही मांजरीसाठी त्यांनी "मनीचे श्लोक" लिहिल्याची इतिहासात नोंद नाही. ह्यावरून स्त्रीजातीप्रती त्यांच्या घृणेची खात्री पटावी.) हे मन्याचे श्लोक त्यांनी सर्व भुजंगप्रयात नावाच्या वृत्तात रचले. त्यावरून त्यांची यऽयऽयऽयऽ सीनियॉरिटी लक्षात यावी.

हे सदस्य स्वराज्यस्थळावर नियमीत लिखाण करीत नव्हते. ह्याचे कारण "भांडारकर हुच्चविद्या संशोधक मंडळ" नावाच्या इतिहास संशोधकांच्या कंपूला कळते, ते असे. एक तर रामदास हे सदस्य "शिवथर घळ" नावाच्या ठिकाणी राहायचे. तिथे नेटवर्क कनेक्टिव्हिटी तशीही कमीच. त्यामुळे अधून मधून सज्जनगड नावाच्या ब्रॉडबॅण्ड हबला जायचे तेव्हा काही खरडी स्थळचालकांच्या खरडवहीत टाकायचे, आणि पुन्हा कनेक्षनविहीन व्हायचे. पण जाहीरपणे खाजगी विचार लिहिण्यास युक्त अशा खरडवहीचा वापर गुप्त संदेश पाठवण्यासाठी करण्यात रामदास खूपच माहीर झाले होते. ह्या ऐतिहासिक खरडवह्यांतून संशोधित एकच खरड बघितली की आपल्याला सदर सदस्याची माहिरी लक्षात येईल. ही खरड स्वराज्य स्थळावरच्या एका आगामी संकटाची नांदी म्हणून समर्थांनी (हे ह्या सदस्यांचे दुसरे टोपणनाव. अनेक टोपणनावांनी संकेतस्थळांवर वावरण्याची पुरातन प्रथा अशी आपल्या इतिहासात वारंवार दिसून येते) स्वराज्यस्थळाच्या चालकांना लिहिलेली होती.

संकटातुन दूर व्हावे
जो जे वांछील ते करावे
पद्याला प्राधान्य द्यावे
राजमार्गी पद ठरावे
वारूणीमाजी रमावे
नेणत्यामागून जावे
दिन असे जरि जात जावे
लेउनी वस्त्रे जरी ती
ली घराण्यास शरण जावे ।।

चंगळी तव विलीन व्हावे
चीन मध्ये लीन ऱ्हावे
परखुनी सगळे असावे
रतिछायाचित्र द्यावे
तरिही ना मीन व्हावे
कधिही न मागे सरावे
रागिणी आलापून अपुली
वीण जपुनी धुंद व्हावे ।।

मंडळी, कुठल्याही संकेतस्थळचालकाला त्याच्या उपदेशकाने दिलेला पद्य उपदेश म्हणून आपण सर्वसाधारण सदस्य ही खरड वाचू. परंतु, रामदास ह्या सदस्याला अनन्यसाधारण कविश्रेष्ठता तर होतीच, परंतु आपल्या कविगुणांचा (दहा पैकी दहा गुण, नेहमीच) वापर जाहीर माध्यमांतून करूनही खाजगी (म्हणजे प्रायव्हेट) संदेश पोहोचवण्यात हा सदस्य अत्यंत कुशल होता. अजूनही आपल्याला वरील खरडीतून रामदासांनी स्वराज्यस्थळाच्या चालकाला दिलेला गुप्त संदेश लक्षात आला नसेल, ह्याची आम्हाला खात्री आहे. (एक हिंट देतो: सदर खरडीतील ज्या काव्यपंक्ती आहेत, त्यातील प्रत्येक पंक्तीतील पहिले अक्षर एका वाक्यात जुळवावे, संदेश लक्षात येईल.)

परंतु सदर उपदेशक मौजूद असतानादेखील स्वराज्यस्थळावर संकट आले ते आलेच. दिलेरडॉन आणि मिर्झाडॉन ह्या नावाचे दोन सदस्य स्वराज्यस्थळावर येऊन सदस्यांना त्रास देऊ लागले. सर्व सदस्य पुन्हा एकदा चालकांना खरडीमागून खरडी लिहू लागले. महाराजांनी पुरंदरकंपूतील मुरारबाजी ह्या सदस्याला सदर डॉनांची खबर घेण्यास धाडले. पण कळफलकावरचे दोन्ही हात निकामी झाल्यामुळे दिलेरडॉनाने त्याचा पाडाव केला. (हस्तविहीन सदस्य शिरविहीन सदस्यापेक्षाही अनुपयुक्त.) महाराजांनी शेवटी हार पत्करली, आणि पदपातशाही ह्या स्थळावर आम्ही दिवसाला दोनदा रागमालिकेविषयी लेखन करू, असा तह केला. परंतु त्यांच्या लेखनाला पदपातशाहीतील सदस्यांकडून योग्य तो प्रतिसाद मिळेना. (रागमालिकेविषयी साक्षात औरंग्याडॉन मख्ख. त्याच्या स्थळाचे सदस्य सदर रागमालिकेला काय प्रतिसाद देणार?) "आमचे स्वतंत्र स्थळ असोन, आम्ही तुमच्या स्थळावर लेखन करण्यास तयार जाहलो असोन, तुमची एवढी मोठी सदस्य संख्या असोन, आम्हास योग्य तो प्रतिसाद मिळत नाही" अशा खरडी पदपातशाहीच्या चालकाला, म्हणजे अौरंग्याडॉनला महाराजांनी लिहिल्या, परंतु त्या खरडींचे काहीही उत्तर नाही, असे पाहून महाराजांनी काहीतरी गेम करायचे ठरवले. आपल्या टोपणनावाखालून हिरोजी नावाच्या आपल्या फर्जंदाला प्रतिसाद द्यायला लावून महाराज त्या स्थळावरून सटकले, ते कायमचेच. मंडळी, आपल्या टोपणनावावरोन आपल्या फर्जंदांना आपल्या नावडत्या संकेतस्थळावर प्रतिसाद द्यायला लावोन आपण तेथोन पळते होणे, हीदेखील आपली थोर परंपरा महाराजांनी सतराव्या शतकात सुरू केली, हे आपल्यासारख्या इतिहासाच्या विद्यार्थ्यांना विसरोन चालणार नाही.

आम्ही वर्णन केल्याप्रमाणे सदर स्वराज्यस्थळ अनेक घटिका-पळे चालले. परंतु, ह्या चालकांना मात्र सदर स्थळाने उत्तरेतल्या गुरगाव येथील निर्मित स्थळाचा स्वत: स्थापन केलेल्या स्थळाने केलेला पाडाव बघण्याइतके आयुष्य लाभले नाही. उत्तरेतील संकेतस्थळांचा पाडाव झाला, ते पुढच्या शतकात. त्याचा आढावा आपण पुढच्या भागात घेऊया.

महाराज स्वत:चे स्थळ उत्कृष्टपणे चालवण्यात इतके मग्न झालेत, की त्यांचे स्वत:च्या कुटुंबाकडे दुर्लक्ष झाले. सदर स्थळ त्यांच्यामागे कुणी चालवावे, ह्याचे नियोजन करण्यात ते कमी पडले. मंडळी, ह्या इतिहासाचे अवजड ओझे बाळगून आपल्याला शिकायला मिळते, ते हेच, की स्वत:चे संकेतस्थळ बहरीला येऊन तेथील वाहतुकीवर नियंत्रण ठेवणे आवश्यक असेल, तर आपले नेटवर्क कनेक्षन पुढेमागे गुढगी ह्या डिनायल-ऑफ-सर्विसने बंद पडल्यास ह्या संकेतस्थळाचे बिझिनेस-कंट्युनिटी-प्लॅनिंग आपण आपले नेटवर्क व्यवस्थित असतानाच करणे आवश्यक असते.

महाराजांनी हे केले नाही, आणि मग पुढे स्वराज्य ह्या स्थळावरील संभाजी आणि राजाराम ह्या दोन कनिष्ठ सदस्यांमध्ये हे स्थळ कुणी चालवावे, ह्याबद्दल मतभेद निर्माण झाले. आणि हे सदस्यलेखनाधारित संकेतस्थळ पुढे श्रीवर्धनातून आलेल्या एकमेव संपादकाच्या एकाधिकारशाहीत परिवर्तित झाले. ते पुढे येईलच.

(अर्थात सदस्यांची मर्जी असेल तर: क्रमश:)

विचारहे ठिकाण

प्रतिक्रिया

मुक्तसुनीत's picture

16 Jul 2008 - 8:29 am | मुक्तसुनीत

कॉपी पेस्ट करताना डब्बल घोडा झाला राव !

प्रचंड करमणूक झाली हे सांगणे न लगे !

सर्किट's picture

16 Jul 2008 - 8:33 am | सर्किट (not verified)

अरे घोडा कुठे झाला, हे कळव ना ?

- सर्किट

मुक्तसुनीत's picture

16 Jul 2008 - 8:40 am | मुक्तसुनीत

लेख दोनदा पोस्ट झाला होता. बहुदा पडद्यामागील सूत्रधाराने दोनदा पोस्ट झालेला लेख दुरुस्त केला असे दिसते आहे...

बाय द वे , तुमचे हे लेख वाचून आम्हाला कितीतरी इतिहास अज्ञात होता आणि अज्ञातच राहील याचे ज्ञान झाले. तीन लेखांमधे एन्क्रीप्टेड असणार्‍या मजकूराचे प्रमाण खूपच आहे. काही प्रसंग/पात्रे ओळखू येतात ; पण धूसर राहील अशा गोष्टी पुष्कळच आहेत...

पुलंच्या "गाळीव इतिहासाची " याद आणून देईल अशा प्रकारचे लिखाण. ज्याना तुमच्या लिखाणामुळे श्रद्धास्थानांवर टोले बसतात असे वाटते त्यानी पुलंचे गाळीव इतिहासाचे पुस्तक जरूर वाचावे असा मी सल्ला देईन. किंवा ठणठणपाळ वाचावा...

सर्किट's picture

16 Jul 2008 - 8:48 am | सर्किट (not verified)

मुक्तसुनीतजी,

आदरणीय भाईकाकांनी आजवर ऐतिहासिक अशा सर्व मंडळींचा ऊडवलेला धुव्वा आपण (गाळीव इतिहासात) वाचला असेलच.

सदर लेखक आमच्या शिरोधारी आहेत. परंतु त्यांचाच एक बनावट पुतण्या स्वतःची श्रध्धास्थाने विखरण्याचा आमच्यावर आरोप करतो आहे. ह्याबद्दल आम्ही काय म्हणावे. ह्या पुतण्यच्या बनावटपणाची खात्री पटते, एवढेच लिहू शकतो.

त्यांच्या नावाने छापलेल्या तिकिटांच्या इमेजेस स्वतःच्या दारू बैठकीच्या वर्णनपूर्वक लेखनात छापणे एवढेच पुतणेपण सदर सदस्य सध्या दाखवू शकतो. असे असल्यास भाईकाकांचा आत्मा किती तळमळत असेल, ह्याचा विचार करा.

- सर्किट

छोटा डॉन's picture

16 Jul 2008 - 8:35 am | छोटा डॉन

मी आधी वाचताना प्रचंड कंफ्युज झालो की "सदस्यांची मर्जी असेल तर क्रमश:" हे लिहुन पुढे अजुन बरेच काही लिहले कसे आहे ?
ते पुढचे बरेच काही वाचल्यावर कळले की ते पुढचे बरेच काही नसुन मागचेच बरेच काही आहे ...

असो. प्रचंड करमणुक झाली असेच म्हणतो ...

[ सध्याचा "असेच म्हणतो " व भविष्यातला "वाचनमात्र " ] छोटा डॉन
[ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ]
बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....

विसोबा खेचर's picture

16 Jul 2008 - 8:34 am | विसोबा खेचर

किंवा काहीतरी अफलातून लिहीण्याची आपल्याकडून लोकांना अपेक्षा आहे अशा वृथा अभीमानाने तारतम्य सोडून आम मराठी जनतेच्या श्रद्धा स्थळांवर सवंग लिहीणे कृपया टाळावे.

सहमत आहे!

आपली श्रद्धा स्थळे थोडी देखील डागाळली जाऊ नये ही तीव्र मनीषा आहे.

सहमत आहे.

अरूणराव, आपल्याशी सहमत आहे. म्हणूनच मी या भागाला कुठलाही प्रतिसाद दिला नव्हता. मी शिवछत्रपती, दादोजींचं नांव दुसर्‍या इतर कोणत्याही संदर्भात वाचू शकत नाही. परंतु मराठी माणसांनीच या लेखाला भरभरून प्रतिसाद दिल्यामुळे माझी मान शरमेने खाली गेली आहे!

या पुढे ही लेखमाला इथे ठेवायची किंवा नाही या बद्दल सिरियसली विचार करावा लागेल...

तात्या.

सर्किट's picture

16 Jul 2008 - 8:39 am | सर्किट (not verified)

एकः आपण मनोहरजींनी दुसर्‍या भागाला लिहिलेल्या प्रतिसादावर तिसर्‍य भागात उपप्रतिसाद लिहिलेला आहे. असे नसावे असे वाटते. एका लेखाला त्याच लेखात प्रतिसाद यवे, असे का कोण जाणे राहून राहून वाटते.

दोनः सदर भागात कॉपीपेष्टात काहीतरी घोळ झालेला दिसतो आहे. दोन दोन अवृत्ती टाळण्यसाठी काही करता येईल का ? आपल्याला संपादनाचे अधिकार आहेत असे आम्हस क्ळले आहे.

- (क्शमाशील) सर्किट

विसोबा खेचर's picture

16 Jul 2008 - 8:44 am | विसोबा खेचर

दोन दोन अवृत्ती टाळण्यसाठी काही करता येईल का ?

नाही!

अरूणजींना दुसर्‍या भागात मी जो उपप्रतिसाद दिला होता तोच इथेही मुद्दामून दिला आहे!

आपल्या प्रतिभेला सलाम परंतु जी रुपके आपण वापरली आहेत ती मी तरी एक मराठी माणूस म्हणून सहन करू शकत नाही. अरूणजींप्रमाणेच इतरही काही सभासदांच्या या बाबतीत तक्रारी आहेत. मला कदाचित ही संपूर्ण लेखमाला येथून काढून टाकावी लागेल!

त्यावर कदाचित आपण पुन्हा 'येथून निघून जाईन' असं म्हणाल, त्यालाही आता माझी तयारी आहे. अती झालं अन् हासू आलं असा प्रकार सध्या चालला आहे!

तात्या.

सर्किट's picture

16 Jul 2008 - 9:24 am | सर्किट (not verified)

अरूणजींप्रमाणेच इतरही काही सभासदांच्या या बाबतीत तक्रारी आहेत. मला कदाचित ही संपूर्ण लेखमाला येथून काढून टाकावी लागेल!

अरुणजींप्रमाणे आपण लिहिलेल्या "इतर" काही सभासदांची संपूर्ण नामावली, "बेसनलाडू" ह्या एकाच नावात संपते, असे आमचे गुप्तहेरखाते आम्हास कळवते. सदर सदस्याची पूर्वीची वाटचाल बघितल्यास सदर सदस्यास "फाट्यावर मारणे" हे एकमेव धोरण आपण आजवर सांभाळत आला आहात. हे धोरण असे तडकाफडकी बदलण्यचे कारण कळणे अर्थातच शक्य नाही. परंतु कदाचित रघुनाथराव हे आद्य काका सदर पुतण्यचे "ऐकणे" ही येथे परत येण्यसाठी "प्रीकण्डिशन" ठेवत असतील, तर खुशाल सदर पुतण्यची री आपण ओढावी.

- सर्किट

केशवसुमार's picture

16 Jul 2008 - 3:34 pm | केशवसुमार

होता होय.. :?
मला वाटले तर्रीत क्रमशः पाणी घालायची पद्धत त्या काळापासून होती असे तुम्हाला दाखवायचे होते.. :B
(क्रमशः)केशवसुमार

बेसनलाडू's picture

16 Jul 2008 - 8:41 am | बेसनलाडू

परंतु मराठी माणसांनीच या लेखाला भरभरून प्रतिसाद दिल्यामुळे माझी मान शरमेने खाली गेली आहे!
आपली श्रद्धास्थाने,त्यांची ताकद पडताळून पहायचा शहाजोग सल्ला देणार्‍यांच्या ****पणाचा दैदीप्यमान पूर्वेतिहास सुपरिचित आहेच.त्याउप्परही लेखनाला मिळालेला 'उदंड' प्रतिसाद संवेदनशील मराठी माणसाला लाजवल्याशिवाय रहायचा नाही,हेच खरे.
(सुस्पष्ट)बेसनलाडू

विसोबा खेचर's picture

16 Jul 2008 - 8:55 am | विसोबा खेचर

सदर विडंबनात्मक, रुपकात्मक लेखनात/लेखमालेत शिवछत्रपती आणि त्यांच्या संदर्भातील इतर माणसं यांच्या नावाचा जो उल्लेख झाला आहे त्याबद्दल मी माझा तीव्र आक्षेप नोंदवतो...!

एक मराठी माणूस म्हणून मला याची लाज वाटते!

तात्या.

मुक्तसुनीत's picture

16 Jul 2008 - 9:02 am | मुक्तसुनीत

एकूण सदस्यांच्या तीव्र भावना लक्षात घेऊन मी या लेखमालिकेवरील माझ्या प्रतिक्रिया इथे थांबवतो. कुणालाही दुखावण्याइतके कुठल्याच प्रतिक्रिया लिहीणे महत्त्वाचे नाही. असो.

- (ग्रीन कार्डाच्या मागे लागलेला , पण श्रद्धास्थानांचे आणि माणसांच्या भावनांचे महत्त्व ओळखणारा एक सर्वसामान्य मिपा सदस्य )

सर्किट's picture

16 Jul 2008 - 9:03 am | सर्किट (not verified)

अर्थात, ग्रीनकार्ड मिळवण्याच्या मागे लागलेल्यांना, किंवा मिळालेल्या सर्वांनाच या तीव्र आक्षेपाचं कारण समजेलच असं नाही!

आपली महिती किमान पाच वर्षे जुनी आहे.

ग्रीनकार्ड मिळवोन आज सहा वर्षे झालीत. छत्रपतींविषयी प्रेम मात्र यापेक्षाही अधीक वर्षांपासून आहे. त्यांन "देव" म्हणून नव्हे तर "स्नेही" म्हणून त्यांची अमच्या हृदयात जपणूक जन्मापसून आहे.

छत्रपतींवर , आम्ही फक्त गेली काही अनेक वर्षे महाराष्ट्रात राहतो, म्हणून, आमचाच अधिकार आहे, ह्या मुजोरीला आजकाल कुणीही महत्व देत नाही.

हेच भाईकाकांचे, हेच स्वरभास्करांचे, हेच वसंतरावांचे. केवळ भौगोलिक जवळुकीमुळे अधिकार दाखवण्याचे दिवस गेले आता.

सदर संकेतस्थळावर ग्रीनकार्डित सदस्यांचे प्रमाण २५ टक्के आहे. एवढे लक्षात आले तरी पुरे.

- सर्किट

विसोबा खेचर's picture

16 Jul 2008 - 9:07 am | विसोबा खेचर

मुक्तराव आणि सर्कीट,

माझ्या प्रतिसादातला ग्रीनकार्डाचा मुद्दा मी बिनशर्त मागे घेत आहे. क्षमस्व!

तात्या.

सर्किट's picture

16 Jul 2008 - 9:15 am | सर्किट (not verified)

हे असले क्षमस्व वगैरे चालणार नाही , बरे का?

अरे तात्या,

मिसळपाव हे स्थळ सदस्यांना स्वतःच्या मनात जे काही असेल ते मुक्ततेने व्यक्त करता यावे, (प्रशासकीय अनुमतीची गरज भासू नये) ह्यासाठी आजवर तरी प्रसिद्ध होते.

येथील वाहतूक मुरंब्यासाठी किंबहुना हेच कारण ठरते.

उगाच कुणी तरी "आम्हाला हे पटत नाही. सदर लेखन काढून टाकण्यात यावे" असे लिहिले, म्हणून सदर सदस्यांची वाटचाल लक्षात न घेताच, त्यांच्या वतीने आपल्याच संकेतस्थळाच्या पायावर धोंडा पडवून घेणे, हे कसे चालणार ?

२४ तास वाट पहावी. अश्टप्रधान मंडळ काय म्हणते ते बघावे. जे प्रधानही नाहीत त्यांच्या तक्रारीला उगाच "भाव" देणे हे छत्रपतींच्या शिकवणीत बसत नाही.

- सर्किट

विसोबा खेचर's picture

16 Jul 2008 - 9:19 am | विसोबा खेचर

उगाच कुणी तरी "आम्हाला हे पटत नाही. सदर लेखन काढून टाकण्यात यावे" असे लिहिले, म्हणून सदर सदस्यांची वाटचाल लक्षात न घेताच, त्यांच्या वतीने आपल्याच संकेतस्थळाच्या पायावर धोंडा पडवून घेणे, हे कसे चालणार ?

अद्याप ही लेखमाला येथून काढून टाकलेली नाही ही बाब आपल्या लक्षात येते आहे का?

तरीही खरडी, व्य निं मार्फत अनेक तक्रारी आल्या आहेत हीदेखील वस्तुस्थिती आहे. मला कदाचित त्याची दखल घ्यावी लागेल. मग भले मिपाला कुणी कितीही नावं ठेवली तरी बेहत्तर! मला फिकीर नाही. लोकं इथे यायची बंद झाली तर मिपा बंद करून टाकीन!

तात्या.

आनंद's picture

16 Jul 2008 - 1:00 pm | आनंद

तात्या आपल्या बद्द्ल पुर्ण आदरच आहे. अशे संकेत स्थळ काढुन ते यशस्वी रित्या चालवणे खरेच ग्रेट आहे. पण अश्या गर्भित धमक्या देवु नकात बुवा.
चालु करणे तुमच्या हातात होते, पण बंद करणे तुमच्याही हातात नाहीय. तुम्ही बंद केल्यास थोड नाव बदलुन का होइना हे संकेस्थळ चालु राहील, खात्री बाळगा.

विसोबा खेचर's picture

16 Jul 2008 - 1:22 pm | विसोबा खेचर

पण अश्या गर्भित धमक्या देवु नकात बुवा.

धमकी मुळीच दिलेली नाही. मी उगाच कशाला कुणाला धमकी देऊ? संबंध काय माझा?

चालु करणे तुमच्या हातात होते, पण बंद करणे तुमच्याही हातात नाहीय.

का बरं? बंद करणंही माझ्याच हातात आहे! डोक्याला फार ताप होऊ लागला तर बंद करून टाकीन!

या जगात कुणाचंही कुणावाचून अडत नाही असा माझा विश्वास आहे त्यामुळे मिसळपाव बंद पडले तरीही कुणाचं काहीही अडणार नाही. मराठीत इतरही संकेतस्थळं आहेत, इच्छुक तिथे जाऊ शकतील. तसेच नवीन संकेतस्थळ काढणेही आजकाल कुणालाही सहज शक्य आहे.

तुम्ही बंद केल्यास थोड नाव बदलुन का होइना हे संकेस्थळ चालु राहील, खात्री बाळगा.

मला आनंदच आहे. मीदेखील त्या संस्थळाचं सभासदत्व (घेऊ दिल्यास!) घेईन आणि तिथे लेखन करीन!

खात्री बाळगा.

खात्री आहेच. ती न बाळगण्याचं मला काहीच कारण नाही! अन्य काही वेगळ्या स्पेलिंगचं डोमेन वापरून एखाद्याला याच नावाच्या सदृष दुसरे एखादे संकेतस्थ़ळ सहज काढता येईल.

आपला,
(कुणालाही धमक्या न देणारा आणि कुणाच्याही धमक्यांना न घाबरणारा!) तात्या.

धमाल नावाचा बैल's picture

16 Jul 2008 - 9:24 am | धमाल नावाचा बैल

आदरणीय तात्या,

अहो मग आमच्या मताचे काय? आम्हाला आवडली की राव ही टवाळकी!!

महाराजांचं म्हणाल तर त्यांच्या नावासाठी आम्ही आजही आमचे प्राण देऊ!!!! पण ह्यात कुठेच तसली टवाळकी जाणवली नाही दादा....

इथं चेष्टा आणखी दुसर्‍याकुणाचीच केली जातेय हे तुम्हाला कसे कळत नाही????? मला नविन असुन देखिल ते कळालं राव.

बैलोबा

सर्किट's picture

16 Jul 2008 - 9:31 am | सर्किट (not verified)

ऐका, तात्या ऐका !

आपल्या स्वराज्यातील मावळ्यांचे ऐका !

उगाच निजामशाहीतून आपली साथसंगत करण्यास आलेल्या मनसबदारांचेच ऐकू नका. ते लेकाचे नाही तरी निजामशाही तून निघून कुतुबशाहीत काय मिळते, ह्याच्या फिकिरीत नेहमीच असतात. दोन्ही शाह्यांची मनसबदारी एकाचवेळी कशी बाळगता येईल ह्या फिकिरीत असतात.

त्यापेक्षा आपल्याला सर्वस्व वाहिलेल्या, स्वराज्याच्या चरणी वाहून घेतलेल्या ह्या मावळ्यांचे ऐका.

- सर्किट

विसोबा खेचर's picture

16 Jul 2008 - 9:13 am | विसोबा खेचर

छत्रपतींविषयी प्रेम मात्र यापेक्षाही अधीक वर्षांपासून आहे. त्यांन "देव" म्हणून नव्हे तर "स्नेही" म्हणून त्यांची अमच्या हृदयात जपणूक जन्मापसून आहे.

हो का? माझ्याकरता तर ही न्यूजच आहे!

असो, ऐकून आनंद वाटला. मनापासून आभार...!

तात्या.

प्रकाश घाटपांडे's picture

16 Jul 2008 - 10:00 am | प्रकाश घाटपांडे


छत्रपतींवर , आम्ही फक्त गेली काही अनेक वर्षे महाराष्ट्रात राहतो, म्हणून, आमचाच अधिकार आहे, ह्या मुजोरीला आजकाल कुणीही महत्व देत नाही.

हेच भाईकाकांचे, हेच स्वरभास्करांचे, हेच वसंतरावांचे. केवळ भौगोलिक जवळुकीमुळे अधिकार दाखवण्याचे दिवस गेले आता.


या मुद्द्याशी सहमत आहे. श्रद्धेची चिकित्सा केली की माणस दुखावतात. पण हे दुखावण देखील गतानुगतिकतेसारखे असते. प्रत्येकाच्या संवेदनशीलता वेगळ्या असु शकतात. तरी श्रद्धेच्या दुखावण्याच राजकारण वेगळच असतं. विडंबन हा साहित्यातील अविभाज्य घटक आहे. घडलय बिघडलय सारख्या विडंबनातुन काढलेला अर्थ हा टीका म्हणुन घेतला, आणि टीका म्हणजे शाब्दिक हल्ला असा अर्थ घेउन त्याचा प्रतिवाद करण्यापेक्षा प्रत्यक्ष हल्ला करणे सोपे जाते. म्हणुन स्टुडिओवर हल्ले होतात.
इथे ज्योतिषाच विडंबन पहा. त्याकाळात केलेले. चिकित्सेसाठी विडंबनाचा फार च उपयोग होतो.
(सश्रद्ध?)
प्रकाश घाटपांडे

एकलव्य's picture

17 Jul 2008 - 2:24 am | एकलव्य

तात्या - आता आपण विषय काढलाच आहात तर - या लेखमालेतील उघड उघड विडंबनाकडे आम्ही दुर्लक्ष करू. पण आपल्या "डायर" या टोपणनावाने आम्हाला मरणयातना होतात आणि शरमेने मान खाली जाते. धिक्कार!

विसोबा खेचर's picture

17 Jul 2008 - 2:41 am | विसोबा खेचर

"डायर" या टोपणनावाने आम्हाला मरणयातना होतात आणि शरमेने मान खाली जाते. धिक्कार!

मान्य! बिनशर्त मान्य...! उद्याच हे नाव बदलतो...

और बोलो मलिक! :)

तात्या.

आणिबाणीचा शासनकर्ता's picture

17 Jul 2008 - 2:52 am | आणिबाणीचा शासनकर्ता

पुढे बोला एकलव्यराव! :)

आपला,
आणिबाणीचा शासनकर्ता
(पूर्वीचा जडा!)

विजुभाऊ's picture

16 Jul 2008 - 9:59 am | विजुभाऊ

ली घराण्यास शरण जावे ।।
=)) =)) =))
धमाल करमणुक करणारा लेख
एक सामान्य सदस्य म्हणुन आम्हाला कोणतेच संदर्भ माहीती नाहित. मागील संदर्भांशिवायही छान करमणुक झाली.
स्वगतः इतका मस्त लेख रद्द करु नये

पडत्या पावसाला पाहुन तुम्ही आतुन भिजला नाहीत तर स्वतःच्या कोरडेपणाची तारीफ करु नका तर हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात भिजवणारे क्षण आलेच नाहीत

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

16 Jul 2008 - 10:10 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

संस्थळाच्या गमती जमतीचा इतिहास वाचायला मजा येत आहे.
फक्त ज्यांच्याबद्दल प्रचंड आदर,अभिमान आपण बाळगतो त्यांच्या नावाचा उल्लेख येऊ नये असे वाटते. त्या नावांऐवजी दुसरे अनेक नावे आपण वापरु शकता, ती प्रतिभा आपल्याकडे नक्कीच आहे, असे आम्हाला वाटते. आपल्या लेखनाला शुभेच्छा !!!!

अवांतर : सर्किट वाचनमात्र ही बातमी ऐकून किती आनंद झाला होता आम्हाला. मनोभावे श्री गणेशाला हात जोडले. त्याच्या लिलेपुढे दंडवत घातला. आणि दुस-या दिवशी ते सदस्य ऎक्टीव झालेले पाहुन माझा देवावरचा विश्वास उडाला, आम्ही नास्तिक झालो. खरे तर ज्या ज्या सदस्यांनी आपणास आग्रहाने बोलावले त्यांची नावे आम्हाला एकदा मिळू देत मग आम्ही पाहतो :)

केशवसुमार's picture

16 Jul 2008 - 10:20 am | केशवसुमार

सर्किटशेठ,
तुमच्या साठी वेगळी मार्क देण्याची पध्दत शोधावी लागेल तोवर १०/१०
रामदासांनी देलेला संदेश वाचून ह.ह.पु.वा पडलो...
(हहपोदु)केशवसुमार
बाय द वे , तुमचे हे लेख वाचून आम्हाला कितीतरी इतिहास अज्ञात होता आणि अज्ञातच राहील याचे ज्ञान झाले. तीन लेखांमधे एन्क्रीप्टेड असणार्‍या मजकूराचे प्रमाण खूपच आहे. काही प्रसंग/पात्रे ओळखू येतात ; पण धूसर राहील अशा गोष्टी पुष्कळच आहेत...
मुक्तीशेठशी सहमत..
(सहमत)केशवसुमार
तात्या
हा लेख काढू नये ही जाहिर विनंती..
रुपक वापरणे आणि अपमानकारक/अवमानकारक लिहिणे ह्यात फरक आहे .
असो शेवट आपण जो निर्णय घ्याल तो अम्हाला मान्य आहे..
(व्यथित)केशवसुमार

बेसनलाडू's picture

16 Jul 2008 - 10:41 am | बेसनलाडू

रुपक वापरणे आणि अपमानकारक/अवमानकारक लिहिणे ह्यात फरक आहे .
सहमत. संत रामदासांचे महान साहित्य हे मन्या नावाच्या बोक्याला लिहिलेले श्लोक्,मनीला नाही;त्यांचे बोहल्यावरून पळून जाणे = समस्त स्त्रीजातीप्रती त्यांच्या मनात असलेली घृणा हो (?);फक्त घृणाच ती,तिच्याबद्दल,मनाच्या श्लोकांबद्दल,संत रामदासांबद्दल असे लिहिणे हा काय अवमान?! छे!!
हां मात्र येथे प्रस्थापित मतांना,श्रद्धांना जे काही विरोध करणारे मत मांडले गेले,त्यामुळे तर यऽयऽयऽयऽ (सात्त्विक) संताप झाला कोणाचातरी.प्रत्यक्ष मान्य नको करू देत वा करू देत;पण आम्हांला कवाच् कळ्ळं बॉ! बहुदा कोणालातरी तो अवमानच वाटला असावा नै?
(मुद्देसूद)बेसनलाडू

विजुभाऊ's picture

16 Jul 2008 - 11:06 am | विजुभाऊ

पाडगावकरानी उदासबोध लिहिला ते अजुनही कोणालाही कशाचाही अवमान वाटला नाही.
मग मनातले श्लोक / मनीचे श्लोक / मन्याचे श्लोक यात अवमान वाटुन झिरमिळ्या पडल्यासारखे का वाटावे.?
आपण भारतियानी आपल्या साहित्यात बर्‍याच देवांना शिव्याही दिल्या आहेत याचा कोण्या देवाने ( असलाच तर) साधा निषेध केल्याचे ऐकिवात नाही.
दशावतारी नाटकाची खिल्ली उडवणारे " वस्त्रहरण" पाहुन काही सनातनधर्मियाना" राग आला होता; पण तो त्याम्च्या बालबुद्धीचा भाग असल्यानी तो निषेध ये महाराष्ट्रादेशी तरी कोणी फारसा मनावर घेतला नाही.

पडत्या पावसाला पाहुन तुम्ही आतुन भिजला नाहीत तर स्वतःच्या कोरडेपणाची तारीफ करु नका तर हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात भिजवणारे क्षण आलेच नाहीत

बेसनलाडू's picture

16 Jul 2008 - 11:19 am | बेसनलाडू

देअर यू आर्! म्हणूनच माझ्या प्रतिसादात दिलेला दुवा पहा;तिकडची चर्चा वाचा;त्याशिवाय प्रतिसाद थुंकू नकात :)
(सूचक)बेसनलाडू

आनंदयात्री's picture

16 Jul 2008 - 11:33 am | आनंदयात्री

>>त्याशिवाय प्रतिसाद थुंकू नकात

भाषा ??
बेला तुमच्या सारख्या सुजाण सदस्या कडुन अश्या शब्दांचा वापर पाहुन व्यक्तिशः वाईट वाटले.

बेसनलाडू's picture

16 Jul 2008 - 11:37 am | बेसनलाडू

लिहिताना वाईट वाटले (होते).पण सदरहू लेखन आणि प्रतिसादांचा एकंदर क्वालिटी मेट्रिक्स पाहता याशिवाय दुसरा शब्द सुचला नाही. बाकी "फाट्यावर मारलेल्या" सदस्यांच्या लेखन-प्रतिसादांत अशा भाषेव्यतिरिक्त दुसरी भाषा असण्याची अपेक्षा व्यर्थ नाही काय यात्री? :)
भावनेच्या भरात लिहून गेलो खरे. चूक निदर्शनास आणून दिल्याबद्दल आभार मानतो आणि विजुभाईंची संपूर्ण माफी मागतो.
(क्षमाप्रार्थी)बेसनलाडू

आनंदयात्री's picture

16 Jul 2008 - 12:01 pm | आनंदयात्री

>>बाकी "फाट्यावर मारलेल्या" सदस्यांच्या लेखन-प्रतिसादांत अशा भाषेव्यतिरिक्त दुसरी भाषा असण्याची अपेक्षा व्यर्थ नाही काय यात्री?

कोणता सदस्य फाट्यावर मारलेला आहे, कोणी मारलेला आहे, हे सगळे तुमच्या जुन्या मित्रवर्गाच्या वादविवादांचे विषय झाले. जुना मित्रवर्ग सोडुन तुम्ही कोणासाठी फाट्यावर मारले गेले असण्याचे काहीच कारण नाही, आमच्यासाठी तर नाहीच नाही, अन हिच भावना बहुतांश इतर सदस्यांमधे असावी / आहे.

>>चूक निदर्शनास आणून दिल्याबद्दल आभार मानतो

असा समजुतदारपणा विरळाच.

-
(समाधानी) प्रसादलाडु

विजुभाऊ's picture

16 Jul 2008 - 12:31 pm | विजुभाऊ

तिकडची चर्चा वाचा;त्याशिवाय प्रतिसाद थुंकू नकात
सर्व चर्चा वाचली...आम्हा केवळ मिपा वरच्या सदस्याना या चर्चांचे ऐतिहासीक संदर्भ
माहित असण्याचे काहिच कारण नाही. हे आम्ही एक लिखाण म्हणुनच वाचतो.
तुम्ही माफी मगितलेलीच आहे त्यामुळे तुमचे शब्दावर पुन्हा काही बोलत नाही. भावनेच्या भरात असे प्रमाद घडतात.
असो...
जर जालावर केवळ वैयक्तीक उद्देशुन लिहायचे आहे. इतराना त्यांचे संदर्भ लागु नयेत ही अपेक्षा असेल तर फोन असतात ई मेल असते , गृप मेल असते. ज्या कोणाला उद्देशुन लिहायचे असेल त्याला सरळ लिहिता येते.
नवे सदस्य याचा अर्थ असा नव्हे की त्याना साहित्यीक जाण नसते.त्यांचे वाचन नसते. पण एकुणच असे जाणवते की जुने जाणते( म्हण्जे काय माहित नाही) सदस्य नव्या सदस्याना नेहमी गौण लिंबु टिम्बु लेखत असतात.
मी आणखी काय बोलु.
या असल्या बखरीवर खरेतर एक अर्ध नवसदस्य म्हणुन काही प्रतिसाद द्यायला नकोच होता.

पडत्या पावसाला पाहुन तुम्ही आतुन भिजला नाहीत तर स्वतःच्या कोरडेपणाची तारीफ करु नका तर हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात भिजवणारे क्षण आलेच नाहीत

बेसनलाडू's picture

16 Jul 2008 - 1:26 pm | बेसनलाडू

नवे सदस्य याचा अर्थ असा नव्हे की त्याना साहित्यीक जाण नसते.त्यांचे वाचन नसते. पण एकुणच असे जाणवते की जुने जाणते( म्हण्जे काय माहित नाही) सदस्य नव्या सदस्याना नेहमी गौण लिंबु टिम्बु लेखत असतात.
नव्यांच्या(?) साहित्यविषयक जाणीवांवर कोणाचे काही म्हणणेच नाही;माझे तरी नाही.नव्या सदस्यांचे दुर्दैव हेच,की-
१. 'इतिहास' हा जुन्यांना जास्त 'अप्रिशिएट्' करता येतो.
२. नव्यांना 'इतिहास' ज्यांनी लिहिला,त्यांच्या त्या सादरीकरणावर,त्यांनी पुढे केलेल्या मसुद्यांवर व संदर्भांवर(च) विश्वास ठेवावा(च) लागतो;आणि 'इतिहास'रचनेमागच्या उद्देशाचा प्रामाणिकपणा पडताळता येत नाही,कारण त्यासाठी 'ऑल्रेडी' काही इतिहास माहीत असावा लागतो :)
(ऐतिहासिक)बेसनलाडू

आनंद's picture

16 Jul 2008 - 11:59 am | आनंद

मस्तच हो सर्किट राव चालु द्या अजुन.
बाकी आमच्या श्रद्धा इतक्या कुमकुवत नाहीत कि थोड्या टवाळकीने त्या दुखावल्या जाव्यात.

साती's picture

16 Jul 2008 - 1:25 pm | साती

लेख चांगला आहे.
साती

प्रियाली's picture

16 Jul 2008 - 3:12 pm | प्रियाली

व्यक्तिश: मला लेख आवडला. कोणा एका लेखकाच्या टवाळकीने श्रद्धास्थाने डळमळीत व्हावीत अशा श्रद्धा मी बाळगत नसल्याने असेल बहुधा.

सर्किटरावांनी प्रसवलेले काव्य तर लाजवाब!

कोलबेर's picture

16 Jul 2008 - 10:46 pm | कोलबेर

व्यक्तिश: मला लेख आवडला.
सर्किटरावांनी प्रसवलेले काव्य तर लाजवाब!

ऋषिकेश's picture

16 Jul 2008 - 10:50 pm | ऋषिकेश

व्यक्तिश: मला लेख आवडला.

असेच म्हणतो. या भागत सर्कीटराव आधीच्या भागांपेक्षा रुपक-रुपक जास्तच खेळले आहेत :) मला तर अनेक संदर्भ लागले नाहित. तरीही मजा आली लेख वाचताना.

सर्किटरावांनी प्रसवलेले काव्य तर लाजवाब!

+++१

-('मिसळ'लेला) ऋषिकेश

धनंजय's picture

16 Jul 2008 - 11:08 pm | धनंजय

प्रथमाक्षर-संदेशाचे काव्य फारच मजेदार!

... बरळणे चालत राहू दे!

(या प्रतिक्रियेचा आणि आदरस्थळांच्या अवमानाचा संबंध याक्षणी तरी नाही.)

खरा डॉन's picture

15 Aug 2008 - 11:26 pm | खरा डॉन

पुढचा भाग कधी? की तुम्हीही वाचवुन ठेवलाय तो दिवाळी साठी?

खरा डॉन
बाकीचे क्लॉन...

घाटावरचे भट's picture

16 Aug 2008 - 2:53 pm | घाटावरचे भट

धमाल लेख हो सर्किटराव....
आपल्याला श्रद्धास्थानांच्या रुपकात्मक वापराबद्दल काहीच हरकत नाही. जोपर्यंत शिवाजीमहाराज, दादोजी कोंडदेव वगैरे मोठ्या लोकांबद्दल प्रत्यक्ष अवमानकारक लेखन होत नाही (आणि आपला तसा उद्देशही दिसत नाही), तोपर्यंत त्यांच्या नावाच्या वापरात मला व्यक्तिशः तरी काही आक्षेपार्ह वाटत नाही. पण एवढे मात्र खरे की आजकाल (म्हणजे गेल्या काही दिवसांत (यासाठी मला जरा आर्काईव्ह्ज पाहाव्या लागल्या, कारण शेवटी 'वय माझे तर दो हप्त्यांचे')) मिपाकर खूपच स्पर्शकातर (पहा - चित्रपटः चुपके चुपके) झालेले दिसतात....काय बरे कारण असावे????

--आपलेच (आणि घाटावरचे) भट...
उत्तिष्ठत, जाग्रत, प्राप्य वरान्निबोधत ~ स्वामी विवेकानंद