आईना - ए -गजल लेखक डॉक्टर विनय वाईकर/ डॉक्टर जरीना सानी

भ ट क्या खे ड वा ला's picture
भ ट क्या खे ड वा ला in जनातलं, मनातलं
8 Sep 2013 - 9:12 pm

गजल ऐकताना काहीवेळा एखादा उर्दू शब्द कानी पडतो, त्याचा अर्थ न समजल्यामुळे तो शेर मनाला भिडत नाही. "डॉक्टर जरीना सानी आणि डॉक्टर विनय वाईकर" यांनी लिहिलेले "आईना -ए -गजल" हे पुस्तक हाताशी असेल तर हा रसभंग टाळता येतो. या पुस्तकात ८५०० पेक्षा जास्त शब्द आणि ५५०० पेक्षा जास्त शेर अर्थासह दिले आहेत. अर्थ मराठी आणि इंग्रजी भाषेत दिले आहेत.

शेर निवडताना लेखक द्वयींनी अभ्यास पूर्ण निवड केली आहे. गजल ऐकताना आपल्याला जो शब्द समजत नाही तो शब्द शोधताना त्या शब्दा खाली नेमका आपण ऐकत असलेला शेर सापडतो असे बरच वेळा घडते.
उदा. गुलाम आली यांची प्रसिद्ध गजल चुपके चुपके या गजल मधील एक शेर
"तुझको जब तन्हा कभी पाना तो "अजराहे लिहाज"
हाले दिल बातोही बातो में जताना याद है ||
हा शेर ऐकताना जर "अजराहे लिहाज" हा शब्द तुम्हाला अडला तर नेमका हाच शेर त्याच्या अर्थासह सापडतो
अजराहे लिहाज = शर्म कि खातीर, लाजेखातर , with due respect and modesty
असे हिंदी, मराठी आणि इंग्रजी मध्ये अर्थ मिळतात.

पुस्तक प्रथम १९८३ ला प्रकाशित झाले. दुर्दैवाने पुस्तक प्रसिद्ध होण्यापूर्वीच डॉक्टर जरीना सानी निर्वतल्या, परंतु त्यांचे पती अब्द्दुल सानी आणि डॉक्टर विनय वाईकर यांनी पुस्तक पूर्ण केले. १९९६ ला या पुस्तकाची चौथी आवृत्ती प्रकाशित झाली. त्या नंतर काही आवृत्ती निघाली असल्यास माहिती नाही
डॉक्टर विनय वाईकर हे एक चतुरस्त्र व्यक्तिमत्व होते.
या पुस्तकानंतर त्यांनी "गजल दर्पण" आणि गालिब च्या गजलांवर आणखी एक पुस्तक लिहिले आहे.
M B B S झाल्यावर १० वर्षे आर्मीत नोकरी केली १९६२,१९६५,१९७१ हि तिन्ही युद्धे त्यांनी जवळून अनुभवली या अनुभवांवर आधारित तांचे "रक्तरंग आणि फौजी" हे दोन कथासंग्रह सुद्धा वाचनीय आहेत. उर्दू ,मराठी ,हिंदी, इंग्रजी या भाषांवर त्यांचे प्रभुत्व होते. आर्मीतील १० वर्षाच्या सेवे नंतर त्यांनी नागपूर मध्ये भूल तज्ञ म्हणून प्रसिद्धी मिळवली. तरीही त्यांची खरी ओळख 'आईना -ए -गजल मुळेच रसिकांना जास्त आहे. हा ग्रंथ गजल अभ्यासकांना संदभ ग्रंथ म्हणून उपयुक्त आहे.
या व्यतिरिक्त त्यांनी वृत्तपत्रांमध्ये स्तंभ लेखन हि केल आहे. "उर्दू गजल एक परीचय" या विषयावर त्यांनी अनेक व्याख्याने दिली होती. या वर्ष्याच्या सुरवातीस ०२ जानेवारी ला ते स्वर्गवासी झाले.

गझलसाहित्यिकमाहिती

प्रतिक्रिया

पैसा's picture

8 Sep 2013 - 9:33 pm | पैसा

लेखक द्वयींची आणि पुस्तकाचीही. बरेचदा ऊर्दू/फारसी शब्द माहित नसल्याने गजलचा अर्थ नीट कळत नाही. पण हे पुस्तक जवळ असेल तर बर्‍याच गजल समजतील. धन्यवाद!

मनिम्याऊ's picture

8 Sep 2013 - 10:47 pm | मनिम्याऊ

मिपा वरचाच एक सुन्दर धागा आठवला...
http://www.misalpav.com/node/9823

विजुभाऊ's picture

9 Sep 2013 - 2:45 am | विजुभाऊ

खरच खूप सुंदर आहे पुस्तक

मुक्त विहारि's picture

10 Sep 2013 - 3:47 pm | मुक्त विहारि

कारण

भाषा...

आता हे पुस्तक वाचून परत एकदा "गजल" शिकायचा प्रयत्न करतो..

मैत्र's picture

10 Sep 2013 - 10:31 pm | मैत्र

पण मिळाले नाही नंतर..
कॉलेजच्या गजलांच्या प्रेमात असण्याच्या काळातलं अतिशय आवडतं पुस्तक. उत्तमोत्तम गजला, शब्दांचे अर्थ आणि उलगडून मांडलेले शेर.. खूप कष्ट घेऊन तयार केलेलं अप्रतिम पुस्तक..

भ ट क्या खे ड वा ला's picture

12 Sep 2013 - 12:30 am | भ ट क्या खे ड वा ला

डॉक्टर विनय वाईकर यांची गजल दर्पण आणि गालिब हि पुस्तके गेल्या वर्षी पर्यंत म्येजेस्टिक डोंबिवली येथे मिळत होती. नक्की मिळतील

यशोधरा's picture

11 Sep 2013 - 8:04 am | यशोधरा

अरे वा! धन्यवाद ह्या पुस्तकाच्या ओळखीबद्दल.
मिळाले तर जरुर घेणार.

एम्-जे's picture

11 Sep 2013 - 10:39 pm | एम्-जे

या पुस्तकातीलच एक शेर आठवला!

इन्ही पत्थरोंसे चलकर अगर आ सको तो आओ,
मेरे घरके रास्तेमे कोई कहकशा नहीं है!

रमेश आठवले's picture

11 Sep 2013 - 11:35 pm | रमेश आठवले

मी बर्याच वर्षापूर्वी इटारसी स्टेशनवर मिर्झा गालिबचे गझल आणि शेर यांचे देवनागरी लिपीत लिहिलेले पुस्तक विकत घेतले होते. त्यात प्रत्येक पानावर सर्वसामान्य लोकाना समजणार नाही अश्या उर्दू शब्दांचे तळटिपेत हिंदीत भाषांतर दिलेले होते. ही सोय गालिब साहित्याचा आस्वाद घेण्यासाठी फार उपयोगात आली.
पुस्तक माझ्या संग्रही अजून आहे कि नाही हे शोधण्याचे काम माझ्या सौ.नी अंगावर घेतले आहे. पुस्तक सापडले तर येथेच त्याचा संदर्भ टाकीन.

भ ट क्या खे ड वा ला's picture

12 Sep 2013 - 12:20 am | भ ट क्या खे ड वा ला

डॉक्टर विनय वाईकर यांची गजल दर्पण आणि गालिब हि पुस्तके गेल्या वर्षी पर्यंत म्येजेस्टिक डोंबिवली येथे मिळत होती. नक्की मिळतील

रमेश आठवले's picture

12 Sep 2013 - 6:00 pm | रमेश आठवले

उर्दू भाषा ही फारसी, अरेबिक आणि खडी बोली (हिंदी) यांच्या मिश्रणातून निर्माण झाली अशी मान्यता आहे. ही निर्मिती ब्रिटीशांच्या नोकरीत असलेल्या देशी सैनिकांच्या छावण्यात बोली भाषा म्हणून झाली. त्यामुळे उर्दू शेरो-शायरीत फारसी शब्दही भरपूर सापडतात.
कवी माधव जुलियन हे फारसी भाषेचे अभ्यासक होते आणि राजाराम कॉलेज कोल्हापूर येथे फारसीचे प्राध्यापक ही होते.
बादशाह औरंगजेब याची कन्या झेब- उन -निसा ही शिवाजी आग्रा येथे बादशाहाच्या दरबारात गेला असताना त्याच्या प्रेमात पडली आणि तीने शिवाजीला प्रेमपत्रे लिहिली होती अशी एक दंतकथा (fable ) आहे . यावर आधारित माधव जुलिअन यांनी खालील ओळी शिवाजीचे उत्तर म्हणून लिहिल्याचे आठवते. शब्दश: आठवते असे नाही परंतु गोषवारा बरोबर असावा.-
तू मज जे पत्र लिहिलेस बेगमे गे
ईश्की दमिश्कि दिलनुर काहीच नाही उमगे
जरी या मराठमोळ्या शिवबास बोध व्हावा
तरी मज फारसी मराठी शब्दकोश पाठवावा.