शतशब्द कथा _________मस्ती

अभ्या..'s picture
अभ्या.. in जनातलं, मनातलं
24 Aug 2013 - 4:42 pm

फ्लाईट टेकऑफ़ होताच...

हवाईसुंदरी: काय हवेय?
पोपट: काही नाही, बटन चेक करत होतो.
हवाईसुंदरी: ओके, तुम्हाला काही हवे असल्यास मला बोलवा.
पोपट: परत एकदा बोलवू काय?
शेजारचा गाढव: का त्रास देतोस तिला?
पोपट:अरे मस्ती हाय रे माझ्यात.
हवाईसुंदरी: आता काय हवेय?
पोपट: माझ्याशी मय्यतरी करणार काय?
हवाईसुंदरी: परत अशी नाटके केलीस तर खाली फेकून देईन.
पोपट: गाढवा ही नुसत्या पोकळ धमक्या देते.तू बोलव परत तिला. काय करती बघू.

गाढवच ते.....................बोलावते. .

हवाईसुंदरी: उठा दरवाज्याकडे चला. . .

हवाईसुंदरीच्या मस्त लाथेसोबत पोपट आणि गाढव विमानाबाहेर........ .

आता.........

पोपट: उडता येते का?
गाढव: नाही रे…….
पोपट: मग मस्ती कशाला करायची….

मांडणीप्रकटन

प्रतिक्रिया

ओऽऽओऽऽओऽऽओऽऽओ पंख होते तो उड आती रे ऽऽ ऽऽ

पैसा's picture

24 Aug 2013 - 4:54 pm | पैसा

गाढवाचा पोपट झाला.

टवाळ कार्टा's picture

24 Aug 2013 - 8:20 pm | टवाळ कार्टा

आणि म्हणुन गाढव वाचला ;)

:)) :)) :))

मस्त केलीयेस रे मस्ती...
;)

किसन शिंदे's picture

24 Aug 2013 - 4:59 pm | किसन शिंदे

या रांडेच्या गाढवाला नाय काही अक्कल, कशाला उगाच पोपटाचं अनुकरन करायला जायचं? पडलं ना थोबाडावर?! :D

सभ्यपणाचा महामेरु असलेल्या श्री किसन शिंदे यांच्याकडून अशा असांसदीय भाषेची अपेक्षा नव्हती.

प्रचेतस's picture

24 Aug 2013 - 9:44 pm | प्रचेतस

अगदी अगदी.
धनाजीरावांशी पूर्णपणे सहमत.

जेनी...'s picture

24 Aug 2013 - 10:10 pm | जेनी...

मी पण मी पण
धन्याकाकाशी समत ... शोभतं का किसन काकाला असं चार्चौघात बोलनं :-/
शी बै :-/

प्रचेतस's picture

24 Aug 2013 - 10:13 pm | प्रचेतस

हो ना.

माझा मराठीचा बोल वाजे काळजात खोल..
ओवीमधून पाझरे निळ्या अमृताची ओल..

अगदी स्वतःच्या सहीच्या विपरीत वागणं आहे बघ किसनदेवाचं.

अत्रुप्त आत्मा's picture

24 Aug 2013 - 10:27 pm | अत्रुप्त आत्मा

मी पण ... मी पण ... मी पण ... सगळ्ळ्यांस्शी ...........................................................
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
अ सहमत! http://www.easyfreesmileys.com/smileys/lol-040.gif

प्रचेतस's picture

24 Aug 2013 - 10:29 pm | प्रचेतस

बरं मग?

अभ्या..'s picture

24 Aug 2013 - 10:55 pm | अभ्या..

बर मग काय.
ठोकायाची मांड आक्टिव्हावर आन चलो बादशाही.
व्हय का नाय गुरजी?
गुरुजींची माज्यावर लै माया. मोठे मोठे प्रतिसाद देतेत एकदम :-D

गुरुजींची माज्यावर लै माया. मोठे मोठे प्रतिसाद देतेत एकदम

असं आहे तर.

भ ट क्या खे ड वा ला's picture

24 Aug 2013 - 10:43 pm | भ ट क्या खे ड वा ला

"मराठीतील असभ्य म्हणी आणि वाक्प्रचार"" हे पुस्तक एकदा वाचाच

बट्क्या काका कुठे मिळेलोए पूस्तक???

भाषाकोविद वटवाघूळशास्त्री, सांगा हो हे पुस्तक कोठे मिळते ते.

भ ट क्या खे ड वा ला's picture

24 Aug 2013 - 11:13 pm | भ ट क्या खे ड वा ला

म्येजेस्टिक ला मिळेल दादर, ठाणे डोंबिवलीत ,
नाहीतर आप्पा बळवंत चौकात नक्की
लोकसत्तात या पुस्तकाचे परीक्षण आले होते . त्या नंतर खप वाढला होता असे 'म्येजेस्टिक" डोंबिवली ने सांगितले मला

किसन शिंदे's picture

24 Aug 2013 - 10:51 pm | किसन शिंदे

@ धन्या, वल्ल्या अनं पुजा बै

ब्वॉर्रर्रर्र...!! ;)

अभ्या..'s picture

24 Aug 2013 - 10:59 pm | अभ्या..

ब्वार्र .....
यवढच ?
मनातून खरेतर "बघून घेइन" असेच ना किसना ;-)

किसन शिंदे's picture

24 Aug 2013 - 11:01 pm | किसन शिंदे

नाय रे बाबा. आपल्याला काय करायचेय कोणाला बघून घेऊन, हि सगळी आपलीच दोस्तमंडळी तर आहेत.

हा विनोद ऐकला होता.. शेवट असा होता- "आधी उडायला शिका आणी मग चढायला.." :D

प्रभाकर पेठकर's picture

24 Aug 2013 - 5:36 pm | प्रभाकर पेठकर

पण ही शतशब्द कथा नाही. ३ शब्द कमी आहेत.

स्पंदना's picture

24 Aug 2013 - 5:56 pm | स्पंदना

अहो त्याने टेक ऑफ अन हवाई सुंदरी हे शब्द जोडुन लिहीलेत.

प्रभाकर पेठकर's picture

24 Aug 2013 - 6:02 pm | प्रभाकर पेठकर

तसे म्हंटल्यास ४ शब्द जास्त होतात. म्हणजे पुन्हा शतशब्द कथा नाहीच.

स्पंदना's picture

24 Aug 2013 - 6:11 pm | स्पंदना

नाही हो..३ जास्त होताहेत.
ए अभ्या .....शत म्हणु फशिवतोस व्हय रं?

म्या कुणाला कशापायी फसवू?:-(
शीर्षक धरायाचे असते म्हणे त्यातच.
नायतर अजुन लिहायला लै मज्जा येत होती.

प्रचेतस's picture

24 Aug 2013 - 9:35 pm | प्रचेतस

तू लिही रे अजून.
कथेला खरं तर १०० शब्दांतच बंदिस्त करणं फारसं पटत नाही.

किसन शिंदे's picture

24 Aug 2013 - 6:34 pm | किसन शिंदे

अरेच्या!! शतशब्दकथा म्हणताना शंभरच शब्द हवेत का? एक-दोन पुढे मागे नाही चालत का??

प्रभाकर पेठकर's picture

24 Aug 2013 - 6:46 pm | प्रभाकर पेठकर

मलातरी तसे वाटते. मोजक्या आणि नेमक्या शब्दात संपूर्ण आशय सामावणे ही एक कला आहे. त्याचेच कौतुक आहे.

स्पंदना's picture

24 Aug 2013 - 7:24 pm | स्पंदना

आणि आम्हाला अभ्या...या नावाचेच कौतुक असले तर?
काय नाही रे अभ्या....लिही तु. होउ दे एकाद दुसरा शब्द कमी जास्त!

अभ्या..'s picture

24 Aug 2013 - 10:41 pm | अभ्या..

हो अपर्णा तै
तुटके मुटके का होइना मी लिहित राहणार. जिलब्याचा वसा सोडणार नाही.
प्रोत्साहनाबद्दल धन्यवाद:)

प्रभाकर पेठकर's picture

25 Aug 2013 - 2:26 am | प्रभाकर पेठकर

लिहीण्याबद्दल आक्षेप नाहीए. जरा शंभरात बसवायचा प्रयत्न करा मजा येईल.
जरी नाही बसविले तरी आम्ही आस्वाद घ्यायचा प्रयत्न करणारच.

सस्नेह's picture

25 Aug 2013 - 12:07 pm | सस्नेह

एकदा शंभरी भरली की मजा कुठली ?
हवाई सुंदरीने स्माईल दिले तरी सजाच !

प्रभाकर पेठकर's picture

25 Aug 2013 - 1:00 pm | प्रभाकर पेठकर

हवाई सुंदरीने स्माईल दिले तरी सजाच !

कांही अनुभव नाही.

डॉ सुहास म्हात्रे's picture

24 Aug 2013 - 6:45 pm | डॉ सुहास म्हात्रे

याला फार तर "जवळ जवळ शतशब्द असलेला विनोद" म्हणता येईल.

स्प्ष्टवक्तेपणाबद्दल दु:ख आहे... पण अगोदर इतक्या नामी शतशब्द कथा वाचल्यावर हा विनोद बरा वाटला नाही.

आतिवास's picture

24 Aug 2013 - 6:54 pm | आतिवास

हं!
हा विनोद आधी माहिती होता.
तुमचं नवीन/स्वतःचं लेखन वाचायला आवडेल.

अत्रुप्त आत्मा's picture

24 Aug 2013 - 9:38 pm | अत्रुप्त आत्मा

You are here
स्वगृह » शतशब्द कथा _________मस्ती
शतशब्द कथा _________मस्ती
प्रेषक, अभ्या.., Sat, 24/08/2013 - 17:12

फ्लाईट टेकऑफ़ होताच...

हवाईसुंदरी: काय हवेय?
पोपट: काही नाही, बटन चेक करत होतो.
हवाईसुंदरी: ओके, तुम्हाला काही हवे असल्यास मला बोलवा.
पोपट: परत एकदा बोलवू काय?
शेजारचा गाढव: का त्रास देतोस तिला?
पोपट:अरे मस्ती हाय रे माझ्यात.
हवाईसुंदरी: आता काय हवेय?
पोपट: माझ्याशी मय्यतरी करणार काय?
हवाईसुंदरी: परत अशी नाटके केलीस तर खाली फेकून देईन.
पोपट: गाढवा ही नुसत्या पोकळ धमक्या देते.तू बोलव परत तिला. काय करती बघू.

गाढवच ते.....................बोलावते. .

हवाईसुंदरी: उठा दरवाज्याकडे चला. . .

हवाईसुंदरीच्या मस्त लाथेसोबत पोपट आणि गाढव विमानाबाहेर........ .

@आता.........

पोपट: उडता येते का?
गाढव: नाही रे…….
पोपट: मग मस्ती कशाला करायची…. >>> http://www.easyfreesmileys.com/smileys/lol-044.gif http://www.easyfreesmileys.com/smileys/lol-044.gif http://www.easyfreesmileys.com/smileys/lol-044.gif

प्रचेतस's picture

24 Aug 2013 - 9:45 pm | प्रचेतस

फक्त हसणार्‍या स्मायलीच टाकायच्या होत्या तुम्हाला तर इतकं सगळं पेस्टवायची गरज काये म्हणून?

अत्रुप्त आत्मा's picture

24 Aug 2013 - 10:33 pm | अत्रुप्त आत्मा

@ तर इतकं सगळं पेस्टवायची गरज काये म्हणून?>>>ल्ल्ल्ल्ल्ल्ल्ल्ल्ल्ल्ल्ल्लूऊऊऊऊउ :-/ गपा तुंम्ही...! :-/ मेरी मर्जी..! :-/
अगोबा ढगोबा छळकर..! http://www.sherv.net/cm/emoticons/memes/troll-face-meme-smiley-emoticon.gif

छलकर छलकर, छलकर लेण्याचा राजा :-D
वल्हव रे वल्ल्या हो वल्हव:-D:-D

वल्हव रे वल्ल्या हो वल्हव

याच्यापुढे "रे जाडया" असं लिहायचं राहीलं का?

अभ्या..'s picture

24 Aug 2013 - 11:01 pm | अभ्या..

रे जाड्या नाही.
लाव रे काड्या असे लिहायचे होते ;-)

अत्रुप्त आत्मा's picture

25 Aug 2013 - 2:05 pm | अत्रुप्त आत्मा

@लाव रे काड्या>>> =))

शतशब्द कथा महिन्यातनं एखादी आली की वाचायला बरी वाटते ... दिवसाला रतिब पडतोय इथे
त्यापेक्षा शतशब्द विनोद रोज टाकला तरी चालेल आम्ही हसु रे अब्या
कीपिटप :D

सस्नेह's picture

25 Aug 2013 - 12:09 pm | सस्नेह

शतशब्द नसले म्हणून काय झाले ? झटका तर भारीच जमलाय.