दुनियादारी ___ शतशब्दकथा

तुमचा अभिषेक's picture
तुमचा अभिषेक in जनातलं, मनातलं
22 Aug 2013 - 9:21 pm

दारूचा चौथा ग्लास जळजळतच घशाखाली उतरला.

सहा महिने तो त्या दोघांना फिरताना बघत होता..
मोबाईल बदलावेत तसे त्याच्या मैत्रीणी बदलायच्या..
यावेळी पठ्ठ्या लग्न करायला निघालेला..

तिच्याही आयुष्यातील तो पहिलाच मुलगा नव्हता.. वाडीतच दोन प्रकरणे होती तिची..
त्याला ‘सावध’ करणे गरजेचे होते..
शेवटी मित्र होता त्याचा... जिवलग असा..

बालपण, शाळा, कॉलेज, कट्टा.... कट्ट्यावरची कटींग चाय.. अन दोघांत ओढलेली एकच सिगारेट..!!
क्षणात डोळ्यासमोर तरळले अन त्याच तिरमिरीत तो उठला..
पाचवा पेग अर्धाच सोडून.. दुनियादारीला विसरून..
यारीदोस्ती निभावायला..!
................
................
...........
....
....
लग्नाच्या दिवशी सहजच कोणीतरी विचारले, "आज तुझा जिगरी दोस्त दिसत नाही कुठे??"
त्याने एकवार तिच्याकडे पाहिले,
"पडला असेल बेवडा कुठेतरी पिऊन....." म्हणत, विषयच संपवून टाकला.

- तुमचा अभिषेक

कथाप्रकटनविचारआस्वाद

प्रतिक्रिया

किसन शिंदे's picture

22 Aug 2013 - 10:37 pm | किसन शिंदे

थोडा घोळ होतोय. दोनदा वाचली त्यासाठी पण सुधरेना.

यसवायजी's picture

22 Aug 2013 - 10:55 pm | यसवायजी

सेम हिअर.

किसन शिंदे's picture

24 Aug 2013 - 4:52 pm | किसन शिंदे

तुम्हारा अंदाज चुक्याच. :D

अर्धवटराव's picture

23 Aug 2013 - 1:05 am | अर्धवटराव

एक मित्र दुसर्‍याला मित्रत्वाच्या नात्याने "सावध" करायला निघाला आहे (कदाचीत तो अपघातात मेला देखील) तर नवरदेव साहेबांना लग्नाच्या दिवशी आपल्या मित्राचं नसणं अजीबात खटकत नाहिए...

असच काहिसं आहे का हो??

स्पंदना's picture

23 Aug 2013 - 4:56 am | स्पंदना

मेरेकु समझ्या है,लेकिन वो अच्छी तरहासे उतरा नही है लेख मे।
तिच्यापासुन सावध करायला गेलेला स्वतः तिचा सावज झाला. मग त्याची मैत्री निकालात काढुन तो अन ती विवाह बंधनात बद्ध झाले.

अविनाश पांढरकर's picture

23 Aug 2013 - 5:03 pm | अविनाश पांढरकर

मलाही असच काहितरी वाटतय!!!

कौस्तुभ_अत्रे's picture

23 Aug 2013 - 9:59 pm | कौस्तुभ_अत्रे

'दुनियादारी' हे नाव वाचून सर्वांनी लेख वाचला पण समजला नाही हो कोणाला. please खुलासा करा हो.

खटपट्या's picture

23 Aug 2013 - 10:06 pm | खटपट्या

"आज तुझा जिगरी दोस्त दिसत नाही कुठे??"
कोण कोणास म्हणाले ?

"पडला असेल बेवडा कुठेतरी पिऊन....."
कोण कोणास म्हणाले ?

तुमचा अभिषेक's picture

24 Aug 2013 - 11:22 am | तुमचा अभिषेक

माझ्या बायकोला समजली म्हणून जास्त सुलभ न करता टाकली ओ..

असो, तरीही बरेच जणांचा खरेच गोंधळ उडत असेल तर नसेल स्पष्ट.. करतो थोडासा खुलासा..

एक मित्र जो दारू वगैरे पिणारा आहे.. तो आपल्या एका मित्राला एका मुलीबरोबर फिरताना बघतोय, आणि त्या मुलीचे आधीचे रेकॉर्ड (आधीची प्रकरणे) याला ठाऊक आहेत.. आजवर याने दुर्लक्ष केले कारण त्याचा मित्रही काही धुतल्या तांदळाचा नव्हता, तर त्या मित्राच्या देखील आजवर बरेच गर्लफ्रेंड झाल्या होत्या.. या मुलीलाही हा काही दिवसांने सोडेल असे त्याला वाटलेले.. पण आता तो तिच्याशी लग्न करायला निघाल्याने तो मित्रकर्तव्य निभवायला, त्याला सावध करायला म्हणून जातो आणि तोंडावर आपटतो... (तिथेही तो चार पेग मारून पिलेल्या अवस्थेतच जातो हि गोष्ट वेगळी, पण तसे असो वा नसो, हेच घडले असते).. तर त्याचा मित्र याच्याशीच मैत्री तोडून त्याच मुलीशी लग्न करतो आणि जेव्हा लग्नात कोणीतरी त्याच्या मित्राला सहज विचारते कि तुझा खास दोस्त कुठेय तेव्हा तो त्याचा बेवडा कुठेतरी पिऊन पडला असेल असा उल्लेख करून मैत्रीचा किस्साच खल्लास करून टाकतो..

मॉरल - दरवेळी मैत्रीचाच नाही तर दुनियादारीचाही विचार करायचा असतो. किंवा नाही केला तरी ती मध्ये येतेच.

पैसा's picture

24 Aug 2013 - 10:45 pm | पैसा

कलाटणीची सवय झाल्यामुळे लोकांचा गोंधळ उडाला. इथे कलाटणी न देता अभिषेकने वेगळी शतशब्दकथा लिहिली आहे त्याबद्दल अभिनंदन!

तुमचा अभिषेक's picture

25 Aug 2013 - 5:09 pm | तुमचा अभिषेक

ह्म्म शक्य आहे :(
आपल्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद :)