काही पालुपदे...

शशिकांत ओक's picture
शशिकांत ओक in जनातलं, मनातलं
18 Aug 2013 - 11:29 am

मित्रांनो,
गाण्यात जसे तेच तेच ओळींचे लकेर येतात त्यांना पालुपद म्हणतात, तसे बोलताना न कळत आपल्या जिव्हेला लागलेल्या लकबींचा भाग म्हणजे मराठी लोकांच्या संभाषणातील काही आठवतात ती पालुपदे...
आपलं....
म्हणून म्हटलं...
काय समजलं...

हिंदी भाषिक -

मतलब किंवा मतबल...
आप बिलीव नहीं करोगे...

इंग्रजी संवादात -

आय मीन...
प्रौढी दर्शक - आय से...

आपण आता यात भर घालावी ... बर का ...

शब्दक्रीडाविरंगुळा

प्रतिक्रिया

सुबोध खरे's picture

18 Aug 2013 - 11:34 am | सुबोध खरे

वगैरे वगैरे
काय समजलात?
आणि बरं का

माझ्या एका क्लायंटला बोलताना मधे मधे "माने" असं म्हणायची सवय होती. मूळचा आसामी भाषिक असल्याने आधीच भाषेतल्या लिंगभेदांचा आनंदीआनंद होता. त्यातून हे "माने". अगदी कोणाला कचकावून शिव्या घालताना सुद्धा "माने" असायचंच. त्यामुळे कोणा मानेला शिव्या घालतोय असं चित्र निर्माण व्हायचं.

उदा.
"वो भें** माने मा**** को मैने बताया रिको देनेको, लेकिन माने भो**** सुनेगही नहीं तो क्या करें" :)

मित्रांनो,
कधी कधी कैच्याकै वाटणारे शब्द समूह हास्यनिर्मिती करताना ... माने... मज़ाक वाटतात... आदू बाळ...

पक पक पक's picture

18 Aug 2013 - 1:17 pm | पक पक पक

आमचा एक मारवाडी मित्र त्याच्या प्रत्ये दोन वाक्यानंतर आपल्याल समजलय कि नाही हे जाणण्या साठी 'युं' अस कुंथ्त असतो.

या धाग्याला "वॉचर" लावला आहे का? माझा प्रतिसाद दोन मिनिटांत उडाला.

प्रतिसाद टाकताना अगदी निरागस मनाने टाकला होता. प्रतिसाद उडाल्यानंतर तो का उडाला याचा विचार करु लागलो आणि मीच उडालो. भलताच अर्थ निघत होता त्यातून, अर्थात तसा अर्थ काढायचा ठरवला तर ;)

असो. ओक काकांनी नाडी या विषयावर धागा न टाकता वेगळा विषय हाताळला आहे हे चांगलं झालं. (माझ्या उडालेल्या प्रतिसादाचा अर्थ हाच होता :( )

पक पक पक's picture

18 Aug 2013 - 2:00 pm | पक पक पक

च्यामारी माझा पण 'निरगस' प्रतिसाद भुर्रर्रकन उड्ला.. ;)

पक पक पक's picture

18 Aug 2013 - 2:04 pm | पक पक पक

मला पण सारख वाक्यामागे 'च्यामारी' म्हणयची सवय आहे ... ;) त्यामुळे आता किमान वरील प्रतिसाद तरी उडु नये.. :)

आशु जोग's picture

18 Aug 2013 - 3:07 pm | आशु जोग

प्रतिसादातील काही शब्दांमुळे मिसळ हँग होवू शकते.

ऑ ! अहो ते शब्द देखिल वारंवार वाचावे लागणारेच होते... :crazy:

तिमा's picture

18 Aug 2013 - 1:59 pm | तिमा

हिंग्लिशमधे ऐकलेले,
बट, लेकिन.....
लेकिन यू नो,
वोके डिअर
इत्यादि इत्यादि.

प्रकाश घाटपांडे's picture

18 Aug 2013 - 2:01 pm | प्रकाश घाटपांडे

आमच्या हापिसात एक जण होते त्यांचा संवाद नेहमी या फॊरम्याट मधे असायचा.
त्याच काय आहे...........
बरं का साहेब.........
आल का ध्यानात.

आमच्याही हापिसात असंच एक "मी मोठा शहाणा" क्याटेगरीतील पात्र आहे. दोन वाक्य बोलून झाली की तो त्याच्या आवडीचं "तुम समझ रहे हो ना?" हे पालुपद आळवतो.

जसं काही त्यालाच सारं कळतं. बाकीचे म्हणजे डोक्यावर पडलेले. :)

बॅटमॅन's picture

18 Aug 2013 - 3:32 pm | बॅटमॅन

"तुम समझ रहे हो ना?"

दि अंग्रेझ मधील सलीम फेकू मल्लिका शेरावतबरोबरच्या मजेचे वर्णन इस्माईलभाईला अगदी फुलवून सांगतो ते आठवलं.

"वो मेरेको लप्टी उस्ताद..लपटके इधर उधर.....तुम समझ रहे हो ना?" =)) =))

पक पक पक's picture

18 Aug 2013 - 3:55 pm | पक पक पक

"चला खुप काम आहे" अस वारंवार बोलुन परत तिथेच गप्प मारत बसायची सवय आमच्या एका शेजारणीला आहे.. ;)

अनिरुद्ध प's picture

20 Aug 2013 - 1:09 pm | अनिरुद्ध प

गुरुजी,बोलताना 'हे अस आहे' हे शब्द वारन्वार बोलायचे.

दादा कोंडके's picture

20 Aug 2013 - 2:22 pm | दादा कोंडके

माझे आण्भव.

मराठी खास करून स्थानिक भाष्णात: या ठिकाणी
इंग्रजी: सी, लाइक, यु नो, आय मीन. माझा एक मित्र बर्‍याचदा वाक्यातल्या विशेष नामा नंतर 'ऑर सम शिट लाइक द्याट' असं म्हणतो. :)
हिंदी: कंबख्त, भेंचोद

या निमित्ताने, 'यु सी, वी हॅव बीन हेल्ड हिअर युसी फॉर मोअर दॅन फोर हाफ पास्ट सिक्स आवर्स यु सी...' हे आठवलं.

काही पालुपदे खालीलप्रमाणे.

मराठी: या ठिकाणी (हे भाषणात स्पेस फिलर म्हणून लै वापरले जाते), कळ्ळं का, बरं का, इ.इ.

हिंदी: भेंचोद, गां*, इ.इ.

इंग्रजी (सौधिंडियन): "आय से", उदा. व्हॉट इज धिस आय से?"

इंग्रजी (जण्रल): यू नो दॅट, यू सी, अ‍ॅज इट वेअर, (या प्रत्येकाचा उच्चार जितका जास्त साहेबी तितके अधिक भारी), इ.

बंगाली: बाणा (पुरुषी बोलीतच आढळतो), साला (उच्चार: शाला),इ. अन्य काही आहेत पण हे सर्वव्यापी आहेत.

आदूबाळ's picture

21 Aug 2013 - 12:02 pm | आदूबाळ

"या माध्यमातून" राहिलं की!

त्यावरून आठवलं: एका प्रथितयश तबला कलाकाराच्या तबला अ‍ॅकॅडमीच्या उद्घाटनाचा कार्यक्रम होता. तिथे त्या भागाच्या नगरसेवकाला बोलावलं होतं. बरीच गर्दी पाहून साहेबांना चेव चढला.

"या ठिकानी (पॉज) आपन जे सर्व जमलेलो आहोत (पॉज) ते या अत्यंत मंगलमयी प्रसंगासाठी. (पॉज) आपल्या वॉर्डच्या सर्वांगीन विकासासाठी या माध्यमातून (पॉज) जे प्रयत्न होत आहेत (पॉज) त्याबद्दल मी या ठिकानी (पॉज) #### यांचे आभार मानतो..."

त्यानंतर रामदास पळसुलेंच्या एकल तबलावादनाचा कार्यक्रम होता. ते आधीच येऊन बसले होते. या बाबांची लांबण संपेनाच. त्यांच्या चेहेर्‍यावर हतबल झाल्याचे भाव होते. ते बघून समोरचे श्रोते हसू दाबत होते.

अखेर चाळीस मिनिटांनी भाषण संपलं आणि लोकांनी टाळ्यांचा कडकडाट केला.

तेही या "माद्यमातूण" असे असते बर्‍याचदा =))

बाकी किस्सा टि"प्पि"कल एकदम!!

दादा कोंडके's picture

21 Aug 2013 - 12:33 pm | दादा कोंडके

बाकी किस्सा टि"प्पि"कल एकदम!!

सहमत. आणि भाषणातल्या प्रत्येक नावाआधी 'माननिय' अगदी मस्टच. मला वाटतं, एक पण्णास-साठ शब्दांचा संग्रह असलेली माणसं असली शेकडो भाषणे देउ शकतील

- (अशी अनेक भाषणं ऐकलेला) दादा

बॅटमॅन's picture

21 Aug 2013 - 12:45 pm | बॅटमॅन

अगदी अगदी :D शेकडो हजारो भाषणांचा भवसागर या थोड्याशा चवैतुहिंनी आरामात पार करता येतो.

(अशी अनेक भाषणे ऐकून पकलेला) बॅटमॅन.

आदूबाळ's picture

21 Aug 2013 - 12:58 pm | आदूबाळ

सारखे सारखे पॉज का घेतात हे मला पहिले कळायचं नाही. असली खूप भाषणं ऐकल्यावर एके दिवशी ट्यूब पेटली. माईकवर बोलणार्‍याला स्वतःचा आवाज थोड्या डीलेने ऐकू येतो. आपला आवाज कसा ऐकू येतोय याची उत्सुकता तर असतेच. त्यामुळे चार-पाच शब्द बोलून पॉज घेतात, जेणेकरून ऐकता येईल.

नवख्या "मान्नीय" वक्त्याचा कधीकधी एक विचित्र पोपट होतो. आपला आवाज ऐकण्याच्या गडबडीत आपल्याला पुढे काय बोलायचंय हेच मान्नीयसाहेब विसरून जातात! मग पुढे काहीही अनकनेक्टेड बोलतात. मग श्रोत्यांची करमणूक होते किंवा ते बुचकळ्यात पडतात की काय चालू आहे बुवा. अशा वेळी पत्रकारांचं कौतुक वाटतं. या गाळातून ते बरोब्बर काय हवं ते टिपून घेतात!

भावना कल्लोळ's picture

20 Aug 2013 - 3:21 pm | भावना कल्लोळ

माझी मामी जुन्नरची, जेव्हा ती लग्न करून आली होती तेव्हा ती तिच्या बोलण्यात नेहमीच वाईज, राहू द्या वले असे शब्द बोलायची, मला काहीच कळायचे नाही, मग समजले कि हि तिची पालुपदे आहेत म्हणुन. :)

प्रकाश घाटपांडे's picture

7 Dec 2013 - 4:16 pm | प्रकाश घाटपांडे

मस्तच! जाउं द्या वले! जाउं दे वली! जाउं द्या वला! ही पालुपदे तिकल्डीच. बोलण्यातील सहजता व सहवेदनेतील आश्वासकता या पालुपदांनी अगदी सार्थ केली. बर्‍याच दिवसांनी ऐकल्यावर बर वाटल.

क्रेझी's picture

21 Aug 2013 - 12:39 pm | क्रेझी

माझ्या बॉसला संभाषण सुरू करतांना,'व्हेअर आय एम कमिंग फ्रॉम इझ', असं म्हणायची सवय आहे ;)

शशिकांत ओक's picture

23 Aug 2013 - 12:01 am | शशिकांत ओक

मित्रांनो,
हवाईदलात असताना मुर्दाड व नाठाळ लोकांशी बोलताना भाषेला धार नसेल तर गुळुमुळू बोलणे हवेत विरून जाई असे दिसून आल्यावर काम फटक्यात व्हावे अशा आवेशात बोलता-बोलता न कळत काही शब्द असे जिभेवर येत असत. त्यात
ब्लडी फेलो, निनकंपूप, गुड फॉर नथिंग अशी व अन्य न लिहिता येतील अशी दूषणे माझ्यामुखातून वाक्यावाक्याला झरू लागली. घरी मुलांचा अभ्यास घेताना ती मुलांवर डाफरायला ही वापरात येऊ लागल्यावर अभ्यास राहायचा बाजूला व आमच्या वरिष्ठांची झकाझकी व्हायला लागली. तेंव्हा विचारपुर्वक मी त्यावर नियंत्रण केले खरे पण तरीही कधी कधी जशी खोकल्याची उबळ थांबवता येत नाही तसे व्हायचे कधी कधी ... पुढे (वयाने वाढला एरंड?) अर्थात जेष्ठ झाल्यावर निवृत्तीनंतर कॉलेजात नोकरी करताना खट्याळ मुला-मुलींना त्यांच्या वात्रटपणाच्या तंगड्या त्याच्या गळ्यात अडकवता अडकवता मला 'व्हाट यू कॉल', असे पालुपद नकळत ओठी येऊ लागले. एकदा कॅन्टीन मधे माझ्या मागील टेबलवर माझ्या चालढालीची नक्कल करत नंतर 'व्हाट यू कॉल' असे म्हणून पोरपोरी फिदीफिदी हसल्याचे माझ्या चाणाक्ष नजरेला व तिखट कानांना जाणवल्यानंतर मी ही शब्द योजना काढून टाकीन असे दाढी करताना स्वतःच्या चेहऱ्याकडे पहात सेल्फटॉक मधे स्वतःला बजावत दुरुस्त करून घेतली तो भाग वेगळा.

शशिकांत ओक's picture

3 Dec 2013 - 9:58 pm | शशिकांत ओक

मी माधवनगरकर होतो तेव्हाची गोष्ट. आमच्या बंगल्याशेजारच्या बंगल्यात एक कुटुंब राहायला आले. साहेब कॉटन मिलमधे वरिष्ठ अधिकारी होते साहजिकच दरमहा भरपूर पगाराचे पाकीट. त्यांच्या पत्नी ही सढळ हाताने खर्च करणाऱ्या. सदरहू साहेबांचा मूड नेहमी पत्नीला खुष ठेवायचा असायचा. त्यांना 'नाही म्हणजे काय यै 'असा तकिया कलाम घेऊन पत्नीची येता जाता तारीफ करताना ऐकून आम्हा मित्र मंडळींना मजा वाटे. एकदा,'नाही म्हणजे काय यै' म्हणून आम्हाला त्यांनी जेवायच्या निमंत्रण दिले. कारण त्यांच्या मते सौ. फुलके फार छान करतात असा दावा ते करत असत. दर शुक्रवारी फुकट स्क्रीन वाचायला मिळत असे म्हणून आम्ही त्यांच्या तकिया कलामाला दुर्लक्ष करून भोजनाला बसलो. फुलक्या पानात पडल्या की दरवेळी नाही म्हणजे कशा झाल्यात आमच्या हिच्या हाताच्या फुलक्या ? एका घासात पुरीच्या आकाराच्या फुलक्या फस्त करून आमचा मित्र ( खरे नाव सुधीर ज्याला आम्ही त्याच्या अपरोक्ष गठ्ठ्या म्हणायचो!) म्हणाला, नाही म्हणजे काय यै अशा फुलक्या कधीच खाल्या नव्हत्या. शिवाय नाजुक हातानी बनवताना अशा फक्कड दिसतात काही विचारू नका. गॅस वरील फुलका पालथा करताना बोटं चटकेखात असताना चेहरा हसरा ठेवून फुलके ताटात त्या टाकत राहिल्या.
साहेब खुष होत म्हणाले, नाही म्हणजे कशी फुगतेय पहा..!
होना इतक्या टंच! गठ्ठ्या हळूच म्हणे.
नाही म्हणजे आवडल्या का? साहेब विचारते झाले.
नाही म्हणायला जागाच नाही! स्थूल पोटावरून वरून हाथ फिरवत गठ्ठ्या म्हणाला, नाही म्हणजे रोज अशी
गर्मागरम फरमाइश!
मग काय कशी काय वाटली ? या फरमाईशला उत्तर देत म्हणाला.
असो. नुकताच दिवंगत मित्र सुधीरच्या मिश्किलपणाला समर्पित थोडासा फुगवून व फुलवून सांगितलेला किस्सा...

शशिकांत ओक's picture

7 Sep 2018 - 12:05 am | शशिकांत ओक

अनेक जण लकबीतून आपले व्यक्तिमत्त्व साकार करतात. काहींची एक भुवई वर जाते. डोक्यावरची गांधी टोपी पुढे सारून निगरगट्टपण साधून, तर हक्काने टाळी मागणारे हात पुढे करून, तरुणी पदराशी चाळे करून लक्षवेधन करतात.

ज्ञानव's picture

3 Dec 2013 - 10:09 pm | ज्ञानव

'नाही म्हणजे काय यै '

ह्या वरून आठवले
माझा एक "पुतण्या " कारण बरेच जण हल्ली मला काका म्हणून संबोधतात तो फोन केल्यावर "हाय हलो" वगैरे न म्हणता "ओ ऐका ना...मी काय म्हणतो " अशी सुरुवात करतो.

"जल्ला तुला कल्ला"