गंप्या ची विनोद ग्रहिता

राजा सोव्नी's picture
राजा सोव्नी in जनातलं, मनातलं
23 May 2013 - 9:59 pm

गंप्या च्या मते आनंदी जीवनात विनोदाचा फार मोठा वाटा आहे,चेहऱ्या वरचे हास्य
सर्वाना आनंद दाई वा टते ,मनात आणले तर छोट्या,छोट्या गोष्टीतहि विनोद सापडू शकतो ,
विनोद शोधण्या साठी चौकस बुद्धी व निरीक्षण शक्ती चांगली हवी
स्वयंपाक घरातल्या पंचपाल्यात देखील विनोद सापडतो ,काळा मसाला ला ,काळा मस आला ,
म्हंटले तिखट आहे ला ती खट आहे म्हंटले कि विनोद होतो.
गंप्या सतत काहिना काही विनोद शोधण्याच्या मागे असतो ,असेच एकदा त्याला एका महिला
मंडळाची स्मरणिका वाचून खूपच गंमत वाटली .
स्मरणिकेच्या संपादक मंडळात तसेच कार्यकारी मंडळात महिलांच्या नावांची भली मोठी नामावली
होती ,हल्ली च्या प्रथे प्रमाणे महिलांनी नवा नंतर माहेर चे आडनाव व नंतर सासरचे आडनाव लिहिले
होते ,ती नावे वाचून गंप्या ला खूपच गंमत वाटली .
संपादक मंडळात सौ. सुनयना काणे डोळे,सौ. कुंतल टकले डोके,सौग़ुलाब बोचरे काटे . सौ. जुही फुले
गजरे होत्या .
कार्यकारी मंडळात सौ कडू वाटाणे ,सौ… दुबळे नातू ,सौ …।खोटे वैद्य ,सौ … खरे आठवले ,सौ ।ओक लेले ,
सौ … प्रचंड बडबडे ,सौ … हिरवे फाटक ,सौ … वाकडे सुळे ,या प्रमाणे भली मोठी यादी होती
माहेर सासर चे आडनाव लावल्याने अशी गंमत होऊ शकते ,गंप्याला स्मरणिकेतल्या बाकी लेखा
पेक्षा हि नावे वाचूनच खूप मज्या वाटली

शब्दक्रीडाअनुभव

प्रतिक्रिया

प्यारे१'s picture

23 May 2013 - 11:00 pm | प्यारे१

चान चान!

+१

मला पण खुप खूप मज्या वाटली

बॅटमॅन's picture

31 May 2013 - 5:50 pm | बॅटमॅन

+२.

मल पन खुप खुप मज्य वतलि.

प्रकाश घाटपांडे's picture

27 May 2013 - 8:25 am | प्रकाश घाटपांडे

हॅहॅहॅ
मजा आली वाचताना. काही लोक श्लेषातून चावट विनोद करण्यात मशहूर असतात.

ब़जरबट्टू's picture

30 May 2013 - 9:53 am | ब़जरबट्टू

गंप्या बदनाम हुआ राजा तेरे लिए..

अनिरुद्ध प's picture

30 May 2013 - 1:24 pm | अनिरुद्ध प

परोपकारी गम्पु,पु ल देशपान्डे यान्ची आठ्वण झाली,त्यामुळे 'गम्पु' हे पात्र विनोदासाठी वाहिलेले आहे असे वाटते.

"हसू नका बरे" हे सदर माझ्या लहानपणी "चंपक"मधे यायचे. अजूनही येत असेल. त्या तोडीचं किंबहुना त्याला मागे टाकणारं लिखाण आज बर्‍याच वर्षांनी वाचलं.

रामपुरी's picture

30 May 2013 - 10:58 pm | रामपुरी

हल्ली त्या तोडीचे सदर 'महाराष्ट्र टाईम्स' मध्ये 'हसा लेको' या नावाने येते. पण या लेखाने(?) सगळ्यांना मागे टाकले आहे.

मराठे's picture

31 May 2013 - 12:32 am | मराठे

अरे वा ! भलतीच मज्या आहे! (संदर्भ: माझा शत्रुपक्ष- पु.ल.)

अत्रुप्त आत्मा's picture

31 May 2013 - 4:56 pm | अत्रुप्त आत्मा

@ ,काळा मसाला ला ,काळा मस आला ,
म्हंटले तिखट आहे ला ती खट आहे म्हंटले कि विनोद होतो.>>> http://www.freesmileys.org/smileys/smiley-laughing006.gif

आशु जोग's picture

28 Jul 2013 - 12:15 am | आशु जोग

मारुतीला किती डोळे

चित्रगुप्त's picture

28 Jul 2013 - 2:33 am | चित्रगुप्त

इश्श्य... काहितरीच मेलं... चहाटळ कुठ्ले...
-- चित्रा गुप्तगंगातीरकर मादागास्करकर

जॅक डनियल्स's picture

28 Jul 2013 - 7:50 am | जॅक डनियल्स

खरच कधी विचार केला नव्हता की असे सासर-माहेर चे आडनाव लावल्यानी विनोद होत असेल. आत्ता नवीन दृष्टी मिळाली ;)