"मिसळ"णारी कोण कोण??? - इस्ट कोस्ट मध्ये?? भाग २

वरदा's picture
वरदा in जनातलं, मनातलं
11 Jul 2008 - 5:35 pm

आधीच्या धाग्यावर खूप जास्त प्रतिसाद झाल्यामुळे हा नवीन धागा सुरु करतेय. आधीची चर्चा इथे वाचता येईलः

तर आत्ताच्या चर्चेनुसार नक्की येणारे:
वरदा
प्राजु
शितल
मुक्तसुनीत
खादाड बोका
मानस
पुण्याचे पेशवे
विकास
अनामिक
वात्रट
चतुरंग

कदाचित

धनंजय
संदिप चित्रे
चित्रा
लंबूटांग

ठिकाणाचे ऑप्शन: वरदाचे घर (जरा अस्तव्यस्त असेल पण समजून घ्यालच ;)
न्यूजर्सीचा कुठलाही बीच (तसा माझ्या कम्युनिटीचा प्रायव्हेट बीच आहे पण मी अजून पास घेतला नाहीये आज उद्या विचारते मिलाला पास तर नथिं लाईक ईट)
न्युयॉर्क : काय एवढे जवळ येता आणि माझ्याकडे येत नाही :( (मला वाट्टं कँसलच करावी ही आयडीया)
किंवा जरा वेळ बीच वर भेटू बार्बेक्यु करु मग माझ्या घरी येऊ असलं काहीतरी...पण फार घोळ होईल एक ठीकाण ठरवणं सोप्पं असतं

मेनू: मिसळ मिसळ मिसळ....
बाकीचा मेनू: जरा आयडिया द्या ना.....

वि. सू. सगळ्यांचे इमेल मला व्यनि ने कळवा प्लीज मग मी ठीकाण ठरल्यावर डायरेक्शन्स टाकेन

मौजमजाविरंगुळा

प्रतिक्रिया

प्रत्येकाच्या घरुन येणारे किती आहेत म्हणजे एकून मेंबरांच्या संखेचा अंदाज येईल आणि मेनू ठरवता येईल.
माझे ५ मेंबर्स आहेत.

मेनू सुचवणी - मिपा वर दिलेली पेठकर काकांची पावभाजी करता येईल. मी करुन आणण्याची जबाबदारी घेतो.

चतुरंग

विसोबा खेचर's picture

12 Jul 2008 - 12:06 am | विसोबा खेचर

माझे ५ मेंबर्स आहेत.

तुम्ही दोघं अन् तीन मुलं की काय? रंगा आता पुरे हो! कुटुंबनियोजन कर आता.. :)

आपला,
(कुठलंही औरस-अनौरस अपत्य नसलेला) तात्या.

शितल's picture

11 Jul 2008 - 5:51 pm | शितल

आम्ही अडीज माणसे
यश ३ व. त्यामुळे तो लि॑बु टि॑बु
पण ४ जणा॑ना पुरेल एवढा.
मी आणि प्राजु मिसळ
काय ग प्राजु
मिसळ बनवु या ना झणझणीत कोल्हापुरी.

वरदा's picture

11 Jul 2008 - 5:54 pm | वरदा

आता मी एकदम वाट पहातेय्...तुला फोन करेन आज्...वरची तयारी मी करेन तुमची लिंबू, कोथिंबीर, कांदा वगैरे...
"The future belongs to those who believe in the beauty of their dreams" ~ Eleanor Roosevelt

प्राजु's picture

11 Jul 2008 - 6:47 pm | प्राजु

मात्र मिसळीचा तो तर्रीदार कट.. वरदाच्या घरीच करावा लागे. त्याचा मसाला नेऊ वाटून पण तिथे तयार करू? चालेल ना वरदा??

आम्ही पण अडीच .. म्हणजे मी, नवरा आणि अथर्व (वर वर्षे ४)
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

वरदा's picture

11 Jul 2008 - 5:52 pm | वरदा

सह्ही मज्जा येईल....
हो खरय जरा बेरीज करुयात किती जणं आहे त्याची...मग मलाही पार्टी सिटीत जायला बरं :)
मी घरी आइस्क्रिम किंवा कुल्फी करेन, कशी आहे आयडीया? (पेठकर काका रेसिपी द्याल ना मला पण?)

"The future belongs to those who believe in the beauty of their dreams" ~ Eleanor Roosevelt

शितल's picture

11 Jul 2008 - 6:03 pm | शितल

अग मीच करते तुला फोन
कारण उद्या कदाचित आमचे बोस्टन आहे
आणि तु कुल्फी /आईस्क्रीम करणार आहेस ना
पहिलीच वेळ असेल तर नको :)
काय ग बळीचा बकरा बनवते काय ;) (ह.घे.)

वरदा's picture

11 Jul 2008 - 6:14 pm | वरदा

मी कुल्फी बनवली होती आधी पण घरातच कारण ८ कुल्फ्यांचा साचा आहे..म्हणून म्हटलं त्याचं डब्यात आईस्क्रीम करु शकेन कदाचित्... नाहीतर आहेच इंडीयन शॉप्स्..सरळ घेऊन येईन ;)
तुझ्याकडे मेनू ची आणखी काही आयडीया आहे का?
"The future belongs to those who believe in the beauty of their dreams" ~ Eleanor Roosevelt

लंबूटांग's picture

11 Jul 2008 - 11:02 pm | लंबूटांग

कुठे येणार आहात ?

वरदा's picture

11 Jul 2008 - 5:56 pm | वरदा

प्रॉब्लेम मुळे माझ्या घरी जमू आणि संध्याकाळी मला पासेस मिळाले तर कम्युनिटी बीच वर जाऊ....ठरलं तर..ओके?

"The future belongs to those who believe in the beauty of their dreams" ~ Eleanor Roosevelt

प्राजु's picture

11 Jul 2008 - 6:50 pm | प्राजु

हे चालेल वरदा...
पावभाजी आणि मिसळ आणि मग आइस्क्रिम... छे कधी तो २६ जुलै उजाडणार?? 8>
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

यशोधरा's picture

11 Jul 2008 - 6:51 pm | यशोधरा

मी येऊ?? :)

प्राजु's picture

11 Jul 2008 - 6:58 pm | प्राजु

यशोधरा ताई, हा घरचाच कार्यक्रम आहे. येऊ काय विचारता... तुम्ही किती लोक आहात ते फक्त सांगा..
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

शितल's picture

11 Jul 2008 - 7:06 pm | शितल

अग ती बेगलोर ला आहे.
ती माझ्यावर जरा नाराज झाली आहे तीला सोडुन कट्टआ करतो य ना :)
काय ग यशोधरे.
बरोबर ना

शितल's picture

11 Jul 2008 - 6:54 pm | शितल

प्राजु त्याआधी आपण भेटु एकदा
नाही तर मिसळ फक्त तु, मी आणि वरदा तीघीच स॑पवायतो.
काय म्हणतेस ;)

प्राजु's picture

11 Jul 2008 - 6:58 pm | प्राजु

या रविवारी जर काही तुझा आणि माझा दुसरा प्रोग्रॅम नसेल तर आपण भेटू...
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

यशोधरा's picture

11 Jul 2008 - 7:05 pm | यशोधरा

प्राजू, मला ताई म्हणालीस तर मी तुला आज्जी म्हणेन.... :>
मी मजा केली गं, मी बंगळुरुला असते, आता तिकीट, व्हिसा वगैरेची व्यवस्था केलीस तर येते बापडी, तुझा आग्रहच असेल तर!!
;;)

चालेल ना.. यशोधरे...
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

यशोधरा's picture

11 Jul 2008 - 7:13 pm | यशोधरा

:) हो गं, जरुर.

वरदा's picture

11 Jul 2008 - 7:21 pm | वरदा

खरच तु आलीस की करु पुन्हा कट्टा मज्जा येईल...

सगळेजण प्लीज व्यनि मधे किती माणसं आणि एमेल आयडी टाका ना...मी ग्रुप एमेल टाकते म्हणजे...
"The future belongs to those who believe in the beauty of their dreams" ~ Eleanor Roosevelt

चतुरंग's picture

11 Jul 2008 - 9:03 pm | चतुरंग

मेल आय्-डी आणि आपल्या बरोबर येणार्‍या लोकांची संख्या पटापटा कळवा रे वरदाला.
अरेंजमेंट्स करणं सोपं जातं. एवढी लोकं जमणार म्हणल्यावर कट्टा नीट व्हायला हवा ना?

चतुरंग

वरदा's picture

11 Jul 2008 - 9:09 pm | वरदा

कुणीच कळवत नाहीये....

"The future belongs to those who believe in the beauty of their dreams" ~ Eleanor Roosevelt

llपुण्याचे पेशवेll's picture

11 Jul 2008 - 9:28 pm | llपुण्याचे पेशवेll

२६ ला जरा घाई होईल पण ठीक आहे. :) मिसळीसाठी काहीही करायला तयार आहे.. :)
पुण्याचे पेशवे

ब्रिटिश टिंग्या's picture

11 Jul 2008 - 9:55 pm | ब्रिटिश टिंग्या

मिपाच्या इस्ट कोस्ट कट्ट्याला माझ्या मनापासुन शुभेच्छा!
मिसळ चापा! पावभाजी खा! मजा करा!

(शुभेच्छुक) टिंग्या

अवांतर - दि. २१-२२ जुलैला युकेमध्ये मिसळपावचा एक मायक्रो मिनी कट्टा आयोजित केलेला आहे! इच्छुकांनी त्वरित नावनोंदणी करणे.

आपला,
टिंग्या
अध्यक्ष/संयोजक,
मिसळपाव मायक्रो मिनी कट्टा क्र. २
युनायटेड किंगडम

अतिअवांतर - मज्जाए नै, एकाच आठवड्यात दोंदोन कट्टे :)

प्राजु's picture

11 Jul 2008 - 11:56 pm | प्राजु

कट्ट्याचा स्वतंत्र धागा सुरू करून चर्चा करावी. इस्ट कोस्ट्च्या चर्चेमध्ये लिहू नये अशी त्या मायक्रोमिनी कट्ट्याच्या अध्यक्षांना विनंती.. (ह्.घ्या.)
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

वरदा's picture

12 Jul 2008 - 12:39 am | वरदा

प्राजु झ्याक गं आपल्याला अस्संच हाकलवलं होतं गेल्यावेळी सगळ्यांनी.....:))))
"The future belongs to those who believe in the beauty of their dreams" ~ Eleanor Roosevelt

प्राजु आणि शितल : कोल्हापुरी मिसळ
चतुरंगः पेठकर काकांची चीझ पावभाजी
अनामिकः आम्रखंड
अजून आयडीया टाका
"The future belongs to those who believe in the beauty of their dreams" ~ Eleanor Roosevelt

लंबूटांग's picture

11 Jul 2008 - 11:09 pm | लंबूटांग

आत्ताच पाणी सुटू लागले आहे.
पाणी पुरी ??

धनंजय's picture

12 Jul 2008 - 2:00 am | धनंजय

बहुतेक हा कट्टा हुकेल.

पण आलो तर मी एकटाच येईन. तसा मी खायला फार नाही... (व्यायामाचा कंटाळा करतो तेव्हा भुईला भार होतो खरा.)

व्यनि ने माहिती मागवून घेतो. कट्ट्यापूर्वी एक आठवडा आधी तरी नक्की हो-नाही कळवतो.

स्वाती दिनेश's picture

18 Jul 2008 - 1:28 pm | स्वाती दिनेश

कट्ट्याला खूप खूप शुभेच्छा!
फोटो आणि वृतांत नंतर द्या रे कोणीतरी म्हणजे तेवढीच दुधाची तहान ताकावर..
स्वाती

मनस्वी's picture

18 Jul 2008 - 2:14 pm | मनस्वी

मिसळपाव इस्ट कोस्ट कट्ट्याला माझ्या मनापासून शुभेच्छा!


मनस्वी
* केस वाढवून देवआनंद होण्यापेक्षा विचार वाढवून विवेकानंद व्हा. *

नक्की टाकू व्रुत्तांत....
स्वाती तू केलेयस मिसळ? मस्तच दिसतेय...
मनस्वी ती फुलं खूपच आवडली...:)
"The future belongs to those who believe in the beauty of their dreams" ~ Eleanor Roosevelt

स्वाती दिनेश's picture

18 Jul 2008 - 8:50 pm | स्वाती दिनेश

मिसळ आणि फुलं दोन्ही मनस्वीचीच आहेत ग..:)चाफा आहे ना मनस्वी ?छान दिसतो आहे गुच्छ! आणि मिसळीने तर खवळलं की तोंड..

नीट पाहिलच नाही मी...
"The future belongs to those who believe in the beauty of their dreams" ~ Eleanor Roosevelt

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

18 Jul 2008 - 9:35 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

वरदा मॅम,
इस्ट कोस्टच्या कट्ट्याला सर्व बीग-बी जमताहेत, तेव्हा कट्ट्याला आमच्या सही दिलसे शुभेच्छा !!!
कुछ हटके कट्टा करो यार !!! शेरोशायरी, कविता, साहित्य, माणसं या बद्दल भरभरुन बोला :)

वृत्तांत डिटेल द्या, जसे, पहिल्यांदा कोण आलं, किती वाजता, सुरुवातीला काय बोलणं झालं, चवीला विषय कोणते होते. खाणं काय झालं, (पीणं नक्कोच ) आणि प्लीज हसरे फोटो टाकायला विसरु नका :)

वरदा's picture

18 Jul 2008 - 11:34 pm | वरदा

काम कुणाकडे देऊ सांगा बरं? सगळेच छान लिहितात्....(अर्थात मी सोडून)
"The future belongs to those who believe in the beauty of their dreams" ~ Eleanor Roosevelt

मदनबाण's picture

18 Jul 2008 - 9:45 pm | मदनबाण

इस्ट कोस्टच्या मिपाकरांना माझ्या शुभेच्छा !!!!!
सर्वांचे फोटो पाहण्यास उत्सुक.. :)

मदनबाण.....

वरदा's picture

18 Jul 2008 - 11:33 pm | वरदा

येस्स फोटो टाकू लगेच....
"The future belongs to those who believe in the beauty of their dreams" ~ Eleanor Roosevelt

प्राजु's picture

18 Jul 2008 - 9:49 pm | प्राजु

मी तमाम मिपाकरांना अशी खात्री देते की, हा इस्ट कोस्ट स्पेश्शल कट्टा.. एकदम हटके असेल.. न भूतो न भविष्यती.. खाणेही भरपूर पिणे फक्त कोकसारकेह सोफ्टड्रींक्स.. ताक इ. आणि भरपूर् खेळ, गाणी, साहित्यावर गप्पा गोष्टी... आय बेट यू ऑल.. हो ना वरदा?? :)
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

वरदा's picture

18 Jul 2008 - 11:32 pm | वरदा

नक्की...ते फक्त साहित्यावर गप्पा गोष्टी मधे माझी जरा बोंब असेल
स्वगतः बघ वरदा आई लहान पणापासून सांगत होती जरा वाचन कर पण नाही आता बस...
आणि मला ' वरदा मॅम' अहो का वाट लावता माझी? :( प्लीज वरदा म्हणा फक्त....

"The future belongs to those who believe in the beauty of their dreams" ~ Eleanor Roosevelt

विसोबा खेचर's picture

18 Jul 2008 - 11:44 pm | विसोबा खेचर

खाणेही भरपूर पिणे फक्त कोकसारकेह सोफ्टड्रींक्स..

कोकसारखे सॉफ्टड्रिंक्स? धत तेरीकी, मग काय उपेग?...! :)

वरदा's picture

19 Jul 2008 - 12:19 am | वरदा

आम्ही 'सात्विक' कट्टा किती छान असू शकतो ते करुन दाखवणारे..पहा तुम्हाला आवडेल नक्की....
"The future belongs to those who believe in the beauty of their dreams" ~ Eleanor Roosevelt

झकासराव's picture

18 Jul 2008 - 10:10 pm | झकासराव

माझ्यादेखील अनेकोत्तम शुभेच्छा इस्ट कोस्ट कट्ट्याला :)
................
http://picasaweb.google.co.in/zakasrao

वरदा's picture

18 Jul 2008 - 11:36 pm | वरदा

आता कट्टा अजुनच 'झकास' होईल
"The future belongs to those who believe in the beauty of their dreams" ~ Eleanor Roosevelt

चित्रा's picture

18 Jul 2008 - 11:53 pm | चित्रा

मिपाच्या इस्ट -कोस्टच्या कट्टयाला शुभेच्छा!
कट्टा जवळच, म्हणजे न्यूजर्सीला असूनही मी येऊ नाही शकणार, याचे वाईट वाटते आहे.
मजा करा (करालच म्हणा, ते सांगायला नकोच!) आणि लवकर भेट होईल अशी आशा आहे.

वरदा's picture

19 Jul 2008 - 12:18 am | वरदा

चित्रा...
हो भेटू की परत नाहीच जमलं तर तुला...
"The future belongs to those who believe in the beauty of their dreams" ~ Eleanor Roosevelt

एकलव्य's picture

19 Jul 2008 - 10:29 am | एकलव्य

@@