टंकलेखन साहाय्य
सामर्थ्यदाता : गमभन !
मिपाची पिकनीक
प्रेषक सखाराम_गटणे™ ( गुरू, 07/10/2008 - 22:50) .
मिपावाले सगळे मिळुन पिकनीक ला जाउ शकतात काय?
पिकनीक साधारणतः अशी असावी
१. कालावधी: १ आठवडा
२. स्थळः भारत
३. खर्चः प्रत्येकी INR 20000
आपण काही स्थळे, पिकनीक च्या कल्पना द्यावे ही विनंती.
ज्याला कोणाला पिकनीक ला यायचे असेल त्याने आपले नाव, सुयोग्य काळ, खर्च करण्याची तयारी, आवडते स्थळ, येणारी माणसे याबद्द्ल माहीती द्यावी.
»
- प्रतिक्रिया प्रकाशित करण्यासाठी येण्याची नोंद करा अथवा सदस्य व्हा.
- मुद्रणसुलभ आवृत्ती



पिकनिक..
हि साधारण १ च दिवसाची असते. आणि ८ दिवसांची असते त्याला ट्रीप म्हणतात बहुतेक..
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
ठिक आहे
ठिक आहे ट्रीप सुदधा चालेल !!!!!!!!!
सखाराम गटणे
अरे १-२ दिवसाची
काढा आधी मग त्यात १ आठवड्याच्या ट्रीप चा प्लॅन बनवा ना....
फुकटचा सल्ला देणारी
वरदा
"The future belongs to those who believe in the beauty of their dreams" ~ Eleanor Roosevelt
काढा आधी
काढा आधी मग त्यात १ आठवड्याच्या ट्रीप चा प्लॅन बनवा ना
हो बनवु ना,
आधी तुमची तयारी सांगा,
सखाराम गटणे
अरे
अट नं दोन मधे प्रॉब्लेम नाहीतर नक्की आले असते....
स्वगतः अगं वरदा तुझ्याच्याने तो कट्टा नाही झेपत तु कसली १ आठवड्याची ट्रीप काढनारः(
"The future belongs to those who believe in the beauty of their dreams" ~ Eleanor Roosevelt
महत्वाची सूचना..!
१. कालावधी: १ आठवडा
एवढी सवड नाही...
आपला,
(व्यस्त) तात्या.
३. खर्चः प्रत्येकी INR 20000
परवडणार नाही...!
आपला,
(गरीब) तात्या.
महत्वाची सूचना - सदर वर्गणीची कल्पना चर्चाप्रस्तावक सखाराम गटणे यांची वैयक्तिक आहे, मिपा प्रशासनाचा त्याचाशी काहीही संबंध नाही याची कृपया नोंद घ्यावी...
मिसळपाव डॉट कॉम हे संकेतस्थळ सभासदांना कोणत्याही प्रकारचे आर्थिक आवाहान करत नाही. मिसळपाव डॉट कॉमच्या नावाचा आधार घेऊन कोणत्याही प्रकारची आर्थिक मदत, वर्गणी, साहाय्य, इत्यादी मागण्यास मिसळपाव डॉट कॉमचा सक्त विरोध आहे!
कळावे,
आपला नम्र,
तात्या अभ्यंकर, ऊर्फ विसोबा खेचर, ऊर्फ जनरल डायर, ऊर्फ सरपंच,
मालक,
मिसळपाव डॉट कॉम.
--
पैसा वाईट! त्याच्याशी निगडीत गोष्टी वेळीच स्पष्ट केलेल्या बर्या!
एवढी सवड
एवढी सवड नाही...
परवडणार नाही...!
तात्या तुमची काय तयारी आहे?
महत्वाची सूचना - सदर वर्गणीची कल्पना चर्चाप्रस्तावक सखाराम गटणे यांची वैयक्तिक आहे, मिपा प्रशासनाचा त्याचाशी काहीही संबंध नाही याची कृपया नोंद घ्यावी...
खरे म्हणजे ही टीप मीच टाकायला हवी होती, माफ करा मी विसरलो.
सखाराम गटणे
२००
तात्या तुमची काय तयारी आहे?
दोनशे रुपये...!
फार फार तर अडिचशे!
आपला,
(मुंबईकर कनिष्ठ मध्यमवर्गीय) तात्या.
तात्या चेंगट
फार फार तर अडिचशे!

आमची १२ वर्षा पुर्वी ६वी त असताना सहल गेली होती त्याला मी २५० रु दिले होते.
http://picasaweb.google.com/prashants.space
यात एव्हढं
यात एव्हढं हसण्यासारखं काय आहे खविसा? तु दिले असशील सहावीत तेव्हढे पैसे.. तुझे नक्कीच नसतील ते, आई बाबांकडून वगैरे..
तसं तू 'मिसळपाव' सारखी साईट देखील सुरू केली नाहीयेस..आता हसू का मी पण ?
बाकी, प्रस्तावाबद्द्ल, मला पण वाटते की ट्रीपचा कालावधी आणि वर्गणी जास्त आहे.. सगळ्यांना एकदम जमण्याचे चान्सेस कमी होतील त्यामुळे..
लोक हलकं का घेत नाहीत ?
च्यायला ? मी फक्त फक्त आणि फक्त गम्मत केली होती .... ईथं लोक फार वेगळं काही तरी दाखवण्याचा प्रयत्न करतात.
भाग्यश्री ताई तुम्हाला काय प्रूव्ह करायचंय यातून? माझं (लोळून लोळून) हसण्यामगचं मन हे साफंच होतं हे ध्यानात असू द्या..
मला टिंगल टवाळी करायची हौस आहे.. तात्यांचीही केली पण तीही प्रमाणात. तात्यांबद्दल मला फार आदर आहे. मिसळपाव सारखं ऊत्तम संकेतस्थळ सांभाळण्याबद्दल त्यांच कौतूक पण आहेच.. पण त्यांच्या लिखणाचा मी चाहता आहे
प्लिज हागर्या-पादर्या गोष्टींचा एवढा बाऊबोभारा करू नका ..
तुझे नक्कीच नसतील ते, आई बाबांकडून वगैरे..
वेगळ सांगायची गरज नाही .. ६वीलाच होतो. मी काही टाटा-बिर्ला खाणदानातला नाही.तो फक्त एक टीझर होता. हलका फुलका!
तसं तू 'मिसळपाव' सारखी साईट देखील सुरू केली नाहीयेस..आता हसू का मी पण ?
हसा मी काही हरकत घेणार नाही. तात्यांच्या निम्म पणं वय नसेल माझं.
मी फार हर्ट झालोय. यापूढे ईथे लिहावं की नाही हाच विचार करतोय.
याऊपरही तात्यांना काय वाटलं हे सर्वांत महत्वाचं ... मी जर काही निर्लज्ज्पणा केला असेल तर तात्यांनी मला हद्द्पार करावे.
तात्या ऊत्तराची वाट पहातोय.
खोडसाळ पण निष्पाप मनाचा ) कु.ख.
प्लीज..
अरे जाऊ दे रे बाबांनो, भांडू नका. तुझी आणि भाग्यश्री या दोघांचीही हवं तर मी क्षमा मागतो.
तात्या.
इथे लोकं
इथे लोकं जनरली हलकेच घेतात.. मला तरी तुमचं बोलणं पटलं नाही, मजेत सुद्धा.. म्हणून बोलून दाखवलं.. तुम्ही जसे हर्ट झालात तसाच समोरचा माणूस देखील होऊ शकला असता.. तात्यांनी तितकं मनावर घेतलं नाहीये,म्हणून मी ही काहीच बोलत नाही आता.. आणि विषय वाढवत नाही... बाकी, पुढे लिहीणं-न लिहीणं,काय लिहीणं हा तुमचा प्रश्न आहे.. मी फक्त माझं मत थोडं सारकॅस्टीकली सांगितलं.. सॉरी...
भाग्यश्री
भाग्यश्री ताई तुम्हाला काय प्रूव्ह करायचंय यातून? माझं (लोळून लोळून) हसण्यामगचं मन हे साफंच होतं हे ध्यानात असू द्या..
कुबड्या,
त्या आंबोळीने तुझे कुबड कलम करायचे फर्मान काढले तेव्हा बरे हलके घेतले नाहीस ते?
प्राजुने हसुन लोळणारी स्मायली टाकली तर तीचे दात तोडायची धमकी दिलीस. हा दुटप्पीपणा नाही का?
सार्वजनिक ठीकाणी कसे वागायचे ह्याचे जरा भान ठेव ना!
-बगाराम
कुबड्या
कुबड्या खातय वाटत मार आता तात्याचा!
आंबोळ्यान कुबड कलम करायच फर्मान सोडलच हाये..कुबड्याचा काय खरं नाय आता..
कुबड्याच नाव हित बघीतल मला कायम हे पिच्चर आठवतय!
हलकेच घे रे बाब... नायतर यायचास माज्याच बरगड्या मोडायला
-बैलोबा
अरे हेच
म्हणत होते की कुणालाच एवढा एक आठवडा वेळ नसणार्..शनिवार रविवार छोटीशी पिकनिक असेल तर येतील सगळे...
"The future belongs to those who believe in the beauty of their dreams" ~ Eleanor Roosevelt
म्हणत होते
म्हणत होते की कुणालाच एवढा एक आठवडा वेळ नसणार्..शनिवार रविवार छोटीशी पिकनिक असेल तर येतील सगळे...
मी माझे मत टाकले, सगळे काय म्हणतात त्याप्रमाणे ठरवु.
ट्रीप
नमस्कार,
चालेल कुठेही चालेल पण ८ दिवस झेपणार नाही . ( काम फार आहे )
पण २ दिवस कोणतेही ,वीक एंड च पाहिजे असं नाही.
हे राज्यं व्हावे ये तो श्रींची इच्छा.
आपले नाव,
आपले नाव, सुयोग्य काळ, खर्च करण्याची तयारी, आवडते स्थळ, येणारी माणसे याबद्द्ल माहीती द्यावी.
सखाराम गटणे
दिवाळी पर्यंत
दिवाळी पर्यंत व्यस्त.
जमणार नाही, क्षमा असावी.
सध्या
तरी वेळ नाही ऑगस्ट संपल्यावर जमेल.
पण एवढा कालावधी आणि इतके पैसे नाही जमणार.
माझी तयारी तात्याच्या थोडसच पुढे जावुन आहे ५०० रु.
(तात्या सारखाच एक कनिष्ठ मध्यमवर्गीय) झकास
अवांतर : एक ग्रुप बनवुन जमेल तितके रविवार गड किल्ले यांच्या भ्रमंतीत घालवले तर जास्त मजा येइल का??
................
http://picasaweb.google.co.in/zakasrao
अवांतर : एक
अवांतर : एक ग्रुप बनवुन जमेल तितके रविवार गड किल्ले यांच्या भ्रमंतीत घालवले तर जास्त मजा येइल का??
++१
मी तयार आहे. फार फार तर १००-१५० रु. खर्च येतो याला....
--
ध्रुव
अवघड आहे गड्या ...
तुझा प्लान तर झ्याक आहे पण काय म्हणतात ते व्यवहारीक दॄष्ट्या "फिसीबल" नाही ...
एक तर आम्ही राहतो "घरापासुन दुर" असे कुठेतरी, त्यात कामाचा लोड, सुट्ट्यांची मारामार, मिळाली तरी"ऑन फोन टच" आहेच.
अशा परिस्थीतीत वट्टात ८ दिवस जमणे अशक्य ...
जास्त कशाला माझच घे ना, मी ८ दिवस सुट्टी काढतो, त्यात माझी मरणाची पळापळ होते, अनेकांना भेटायचे असते.
पुण्यातल्या "मिपाकरांना" भेटण्यासाठी किती जंग जंग पछडले हे तुला माहित आहेच.
मागे एकदा सर्व ठरवुन [ आठव तो आमचा जगप्रसिद्ध "काडी कट्टा" ] ऐनवेळी कंपनीची काशी झाल्याने मला हात चोळत बसावे लागले, तेव्हा प्रश्न होता फक्त "३-४ तासांचा" आणि आता तु म्हणतो आहे ते "अख्खे ८ दिवस" त्यामुळे जमणे अशक्य आहे. एखादे एक्सेप्शन म्हणुन फारफार तर "१ दिवस " जमेल पण त्या पण आमच्या घेतलेल्या सुट्ट्यात ऍडजस्ट करुन. खास त्यासाठी सुट्टी घेणे "अनपरवडेबल". कारण आमचा "बेंगलोर - पुणे" प्रवासच एक दिवसाचा ...
शिवाय खर्चाचे आहेच की, २०००० मोठी रक्कम आहे राजा...
आपले सोड, आपण जमवले कसेतरी, पण त्याच वेळी बाकीच्यांना जमायला नको का ?
एक तर जवळपास सगळे आपापल्या "व्यापात मग्न" असतात, त्यात दिवसातले "२ तास" इथे येणे आणि अख्खे ८ दिवस जमणे या अतिशय भिन्न गोष्टी आहेत.
थोडक्यात काय तर कल्पना चांगली पण "व्यवहारीकदॄष्ट्या अशक्य" !!!
काही स्वस्तातले आणि कमी वेळाचे असेल तर सांग, पाहु काय होतेय ते ...
अवांतर : ह्या २००८ मध्ये जमणे जवळजवळ अशक्य. दिवाळीत पाहु जर मी भारतात असलो तर, पण ते ही अशक्य ...
व्यवहारीक छोटा डॉन
[ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ]
बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....