मिसळपाव: एक व्यक्तिगत इतिहास - भाग १

(सदर लेखमालेचा शेवटचा भाग मिसळपावाच्या प्रथम वाढदिवसाला, म्हणजे गणेश चतुर्थीला प्रकाशित होईल. हे आधीच सांगून टाकलेले बरे, कारण नाहीतर उगाच लोक विचारतात.)

मंडळी, हल्लीच काही चर्चांतून असे लक्षात आले आहे, की आपल्या आवडत्या "मिसळपाव" ह्या संकेतस्थळावरील जुन्या आणि नव्या सदस्यांमधील दरी अधीकच रुंदावत चाललेली आहे. नव्या सदस्यांना जुन्या सदस्यांनी त्यांच्या लेखनात दिलेले संदर्भ कळत नाहीत, आणि म्हणून त्यांचा एकतर विरस तरी होतो, किंवा दुसरे, ते येथील चालकांना त्या संदर्भांचा अर्थ विचारून हैराण करतात. ह्यावर बऱ्याच लोकांनी सुचवलेला उपाय, म्हणजे जुन्या सदस्यांनी अशा प्रकारचे लिखाण (म्हणजे, जुने संदर्भ देणारे) करूच नये. कदाचित ते बरोबरही असेल (बाळपणीचा काळ सुखाचा वगैरे दीड-दोनशे वर्षांपूर्वीच्या सुरस आणि चमत्कारिक कथांविषयी कदाचित काही तरुण सदस्यांना असेच वाटत असेल. पण तो भाग अलाहिदा.)

पण मंडळी, जुन्या काही स्थळांपासून सुरू झालेल्या लेखमालिका अजूनही इथे येत असतात (सध्या भाग चौदा). तेव्हा त्यांचे आकलन होण्यासाठी आपल्याला "जुने जाऊ द्या मरणालागुनी" असे म्हणून चालत नाही. त्यासाठी जुने सर्व साहित्य धुंडाळावे लागते. एकूण काय, की मराठी संकेतस्थळांवर वावरणाऱ्या प्रत्येकाला पुरातत्व विभागात काम करावे लागते. आता तर काय, सदस्यांच्या लेखनावर आधारित मराठी संकेतस्थळांची रेलचेल आहे. म्हणून कुठल्याही ख्यातनाम संकेतस्थळावरचा एखादा लेख असो, किंवा कुणाच्या अनुदिनीवरची छोटीशी खरड, ह्यांचे नीट रसग्रहण करायचे असेल, तर इतिहासाचे सखोल ज्ञान असणे आवश्यक आहे. उदाहरणार्थ, कुणी मल्लिकेचा अनुष्केशी संबंध स्वत:च्या अनुदिनीवर जरी लावला, तरी त्यासाठी किमान ४-५ युद्धे, तह, घटना, आणि सनावली ह्यांचे संदर्भ लक्षात आणावे लागतात.

हे सर्व मराठी संकेतस्थळांच्या नवीन सदस्यांना झेपणार नाही. म्हणून हा प्रपंच. सदर टवाळकीचे शीर्षक जरी "मिसळपाव" ह्या आपल्या आवडत्या स्थळाविषयी असले, तरी महामहीम (लावा बघू संदर्भ? नाही कळला ? हिंट: शिवाजीनगर स्टेशण) रिचर्ड बाक ह्यांनी त्यांच्या "वन" ह्या पुस्तकात म्हटल्याप्रमाणे, सर्व काही एकमेकात गुंतले असते. आपण एकच आयुष्य जगतोय, असे आपल्याला वाटते, पण खरे प्रत्येक वेळी आपल्याला निर्णय घेण्याचा प्रसंग उद्भवतो, तेव्हा कुठल्यातरी जगात, तो दुसरा निर्णय घेणारी आपलीच ब्रॅंच जगत असते. असो, पण आपल्याला आता, द्विमितीतल्या मुंगीला जसे सर्व जग सपाटच आहे असे वाटेल, तसेच, आपल्याच निर्णयांतून निर्माण झालेले हे बहुमित जग कसे दिसणार ?

(खुलासा: सदर तत्वज्ञान आम्ही कुठल्याही द्राक्षासवाच्या अंमलाखाली लिहिले नसून, पूर्ण शुद्धीत लिहिलेले आहे. द्राक्षासवाच्या अंमलाखाली आम्ही नेहमीच विडंबने लिहितो, आणि इतरांनी लिहिलेल्या विडंबनांची अफाट स्तुती करतो. - केसु, कसा आहेस ?- काही वरिष्ट मंडळी आमच्याविषयी नेहमीच चुकीचा विचार करीत आलेली आहेत, हेच त्यांचे लेखन दर्शवते.)

आता वरील परिच्छेद पुन्हा-पुन्हा वाचा आणि, ह्या प्रश्नाचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न करा: समजा एका संकेतस्थळाच्या चालकाला (नाव मुद्दामच घेतलेले नाहीये. उपनिरीक्षकांनी कृपया नोंद घ्यावी) माय-एसकयूएल हा डेटाबेस नीट ट्यून कसा करावा हे माहिती असते, तर नुकतेच झालेल्या येथील एका सदस्याच्या लग्नात श्रीखंडाच्या ऐवजी जिलब्या असत्या का?

मंडळी, ह्या प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी आपल्याला किमान दोन वर्षांचा इतिहास तरी अभ्यासावा लागेल. रिचर्ड बाक सांगतात, त्याप्रमाणे ह्या दोन घटनंाचा (वरवर वेगळ्या वाटत असल्या तरी) परस्परांशी खूपच जवळचा संबंध आहे. कारण ह्यांना जोडणारे दुवे अनेक आहेत. चीनमधले फुलपाखरू फडफडले, तर अमेरिकेत वादळ येऊ शकते, असे सांगणारी "केऑस थियरी" येथेही कामी येते, मंडळी.

असो, प्रत्येकाला (विशेषत: येथील साहित्यसेवा नियमीत चाखणाऱ्या - अय्या कित्ती छान लिहिलंय, नाही ? मला तर माझ्या आईची आठवण येऊन रडूच आलं - सदस्यांना) ह्या पुरातत्व विभागात इंटरेस्ट असेलच असे नाही. त्यामुळेच आम्ही हा इतिहास लिहायला घेतला आहे.

पण मंडळी, आपले आवडते मिसळपाव हे काही असे फक्त गेल्या वर्षातच तयार झालेले नाही. त्यामुळे गणेशचतुर्थी २००७ ही मिसळपावाची जन्मतिथी म्हणणे जरी जनसामान्यात योग्य ठरेल, तरी आपल्या आवडत्या स्थळाचा खरा इतिहास समजायचा असेल, तर आपल्याला अगदी मागे जावे लागेल. मागे म्हणजे, फक्त दोन वर्षे मागे नाही, बरे का मंडळी ? तो तर कालपरवाचा इतिहास झाला. आपल्याला किमान ८०० वर्षे मागे जावे लागेल. किंवा त्यापेक्षाही मागे. तेव्हा जाऊ या तर:

इसवी सन ०: येशू ख्रिस्ताचा जन्म. येथूनच "इसवी" सनाची सुरुवात झाली. यापुढे "इसवी" सन असे लिहिले की नव्या सदस्यांना त्याचा अर्थ शोधण्यासाठी जुनी संकेतस्थळे चाळायला नकोत. "मराठी प्रतिशब्द हवेत - भाग ३४५७: "इसवी" ला मराठी प्रतिशब्द काय?" असे उगाच कुणी विचारायला नको, म्हणून हा प्रपंच.

इसवी सन १०० (च्या सुमारास): गौतम बुद्धाचा जन्म. (हेही उगाच नाही. पुढे कधीतरी सशस्त्र क्रांतिकारकांचा आणि त्यायोगे गांधींचा, आणि त्यामुळे अहिंसेचा उल्लेख येईल, तेव्हा हे कामी पडेल, मंडळी.)

इसवी सन ८०० (च्या सुमारास): पहिले मराठी संकेतस्थळ, "श्री चामुंडराजे करवियले, आणि आम्हासी त्यांच्या संकेतस्थळावरून हाकलले" हा एका सदस्याचा प्रतिसाद जिवाला अजूनही टोचणी देतो. (पुढे ह्याच सदस्यांनी आपली एक स्वतंत्र अनुदिनी एका शिलालेखावर स्थापून, "त्या चामुंड्याच्या आयचा घो" असे लिहिलेले आढळते, पण ते इतिहासाच्या पडद्याआड गेले आहे. आम्ही नसतो, तर ते कुणी शोधून काढले असते?

इसवी सन १२०० (च्या सुमारास): ज्ञानेश्वर विठ्ठलपंत कुळकर्णी, ह्यांचा जन्म. ह्यांनी स्वत:च्या तीन भावंडांना जमवून एक संकेतस्थळ उभारले, आणि त्यावर भग्वद्गीतेचे ट्रान्स्लेशन करायला सुरुवात केली. पण त्याकाळच्या आळंदीच्या ब्राह्मणांनी हे स्थळ हाणून पाडले. आमचा प्रशासक हा संस्कृतातच बोलतो, त्यामुळे तुमचा हा तेलगू-संमिश्रीत मराठीत बोलणारा प्रशासक कसा चुकीचा आहे, हा मूळ मुद्दा. पण, खरे कारण की सदर संकेतस्थळाच्या प्रशासकाच्या वडिलांनी "आम्ही आता मूळ स्थळांपासून फारकत घेतली" म्हणून बाहेर पडूनही पुन्हा जुन्याच स्थळात एक प्रतिसाद लिहिला. त्याची खुन्नस मूळ प्रशासकांना आली. विठ्ठलपंत पडले मानी. त्यांना हा सारखा "प्रशासकीय अनुमतीचा" जाच आवडेना. पण विठ्ठलपंतांकडे ना साहित्य प्रसवण्याची क्षमता होती, ना मराठी साहित्याच्या उन्नतीसाठी संकेतस्थळ निर्माण करण्याची क्षमता. पण त्यांनी हार मानली नाही. आपला ज्ञानोबा उत्तम लिहितो, निवृत्ती छान संकेतस्थळे निर्माण करू शकतो, मुक्ती संपादन छान करते. सोपाना सदर संकेतस्थळाची लोकप्रियता वाढवू शकतो, हे त्यांच्या आधीच लक्षात आले होते. आणि म्हणून त्यांनी ह्या चारही भावंडांना नवीन मराठी संकेतस्थळाची निर्मिती करायला लावून स्वत: रामराम घेतला. सुरुवातीला ज्ञानोबांनी लिहायला सुरुवात केली, तेव्हा काहीच प्रतिसाद न आल्यामुळे निवृत्ती बुचकळ्यात पडले. पण नंतर त्यांनी सदर संकेतस्थळ नेवाश्याला हालवले, आणि प्रत्येक अध्यायाला ७५ प्रतिसाद मिळू लागले मंडळी. ही "अमृतानुभव" नावाची मालिका तीनेक वर्षे चालली. पुढे पुढे तर मालिकेतील दर दोन वाक्यांमागे चार प्रतिसाद यायला लागले. तेव्हा सदर मालिका लेखक ज्ञानोबा ह्यांना ह्या प्रसिद्धीचाच कंटाळा आला, वाटले की आता आपण लुप्त व्हावे. आणि हे संकेतस्थळ सोडून ते नाहिसे झाले.

(क्रमश:)

वाचतो आहे...

पहिल्या भागातल्या काही काही गोष्टी झकास वाटल्या...

चालू द्या....! Smile

तात्या.

तात्या

कुठल्या गोष्टी आपल्याला आवडल्या, ( आणि कुठल्या नाही) हे कृपया लिहा ना ?

आपल्या अष्टप्रधान मंडळाला आवडेल असे लिहिणे आम्हाला क्रमप्राप्तच आहे. पण तुम्ही तर छत्रपती, तुम्हाला आवडलेल्या गोष्टी हमखास आठांनाही आवडतीलच, आणि मग आमच्या टवाळक्यांवर गदा येणार नाही.

तेव्हा काय आवडले आणि काय नाही, असे स्पष्ट लिहा बुवा.

म्हणजे आम्हाला पुढच्या भागात ती काळजी घेता येईल. काय ?

- (पाठीत सुरा भोसकणारा आपला सात जन्मांचा प्रेमी) सर्किट

संदर्भ हवाय

>>>उदाहरणार्थ, कुणी मल्लिकेचा अनुष्केशी संबंध स्वत:च्या अनुदिनीवर जरी लावला,
अनुष्का कोण? टॉलीवूड ची अनुष्का शेट्टी का ?
सर्किटराव , ऊठाठेव जबराट.... अजुन पटापट येऊ द्या !


तू भारी ...तर मी लई भारी...


http://picasaweb.google.com/prashants.space

अनुष्का

अनुष्का कोण? Nail Biting Nail Biting Nail Biting
येवढा उपमर्द? कोण आहे रे तिकडे? या खवीसाला घेउन जा आणि याचे कुबड कलम करा........ At Wits End
नविन सभासदांसाठी इतिहासाची उठाठेव खरच गरजेची आहे.... Wink

आंबोळी

काय आंबोळ्या...

या खवीसाला घेउन जा आणि याचे कुबड कलम करा........

Rolling On The Floor Rolling On The Floor Rolling On The Floor Rolling On The Floor
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

डिवचू नका म्हागात पडेल

>>या खवीसाला घेउन जा आणि याचे कुबड कलम करा........
आम्हाला हात तर लावा बरगड्यांसोबत ऊखडून काढू.
कारे रे आंबापोळ्या का आंबोळ्या .. माजलास काय?
बर्‍याचदा तो अपूरा संदर्भ वाचन्यात आला म्हणून विचारलं. तुझा तो कंदील घे आणि पेटवत बस !!!
आणि हसणार्‍यांना फुकटचा सल्ला : दंतविमा काढून घ्या.

डिवचू नका महागात पडेल( काय ते विचारून स्वतःची रंगीत करून घेउ नये)

सडेतोड आणि निबार कुबड असलेला)
कुबड्या खविस


तू भारी ...तर मी लई भारी...


http://picasaweb.google.com/prashants.space

विषयाला धरुनच प्रतिसाद द्यावेत

कृपया सदस्यानी विषयाला धरुनच प्रतिसाद द्यावेत ही विनन्ती.
वैयक्तीक प्रतिसाद देण्यासाठी खरडवही आहे.
प्रतिसाद विषयानुरुप द्यावेत व्यक्तीनुरुप नकोत.
माजलास काय?
वगैरे प्रतिसाद विषयाशी विसंगत आहेत.
एकमेकांचा योग्य तो मान ठेवुन बोलुयात.
(वाजपेयींची एक कविता आहे की
युद्धात एकमेकांवर असे वार करु की पुन्हा नन्तर कधी भेटलो तर केलेल्या कृतीने ओशाळवाणे नको वाटायला.)

पडत्या पावसाला पाहुन तुम्ही आतुन भिजला नाहीत तर स्वतःच्या कोरडेपणाची तारीफ करु नका तर हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात भिजवणारे क्षण आलेच नाहीत

विषयालाच धरून आहोत

सरजी ...
आमच्या वर झालेली टिका ही वैयक्तिक नाही काय ? महामहीम जिल्लेलाही कंदिलकुलभूषन आंबोळीचंद्र रावजीं नी आमचे कुबड कलम करायची जी धमकी दिली ती काय विषयाला धरून होती ? मी एक निरागस प्रश्न केला होता .. कमीत कमी तो तरी विषय सोडून नसावा. असो..कूणाचा माज काढल्याबद्दल जाहिर माफी. अजुनही काही कंटेंट होते ते जनरल डायरने काढून टाकले. कोणी आमचे कुबड कलम करेल तर त्याला आम्ही प्रेमाने कलमी आंबे खायला घालू.
शिघ्रकोपी पण निरागस) कु. ख.

तू भारी ...तर मी लई भारी...


http://picasaweb.google.com/prashants.space

युद्धात

युद्धात एकमेकांवर असे वार करु की पुन्हा नन्तर कधी भेटलो तर केलेल्या कृतीने ओशाळवाणे नको वाटायला.)
हे आवडलं

--
ध्रुव

आंबोळ्या कंदील कुठे आहे?

पुण्याचे पेशवे

आम्हाला

आम्हाला हात तर लावा बरगड्यांसोबत ऊखडून काढू.
आम्हाला हात तर लावा :--त्याची काही गरज नाही आंबोळी कडे वेपन ऑफ कंदीलु आहे..त्याच्या नादी लागु नकोस,,
आणि आफ्रिकेत आहेस म्हणुन तु सेफ आहेस असे समजु नकोस.. त्या कंदीलाची रेंज सॉलिड आहे.. फक्त चिठठी वर टारगेट च नाव लिहायच आणि पेटवायचा तो कंदील्,,टारगेट लगेच परलोकी जातं..
तुझा तो कंदील घे आणि पेटवत बस !!!
Loser तुझं नशीब..
(विनाश काले आंबोळीशी पंगा) असे म्हणणारा..
मदनबाण.....

खविसांचे कंदिल काय वाकडे करणार

मदनबाणा .. अरे खविस हे जिवंत नसतातच ... त्यांना कोण मारणार ?
आणि " हात ऊखडण्याबद्दल " कोणाला आजनवायच असेल तर खरंच पंगा घ्या बॉ... मला फुसक्या धमक्या द्यायची सवय नाही. पण दंत आणि अस्थीविमा जरूर काढून घ्या .

जाहीर आवाहन : मी जे काही बोललो ते कोणालाही दुखवण्याच्याहेतूने नव्हे. मी एक शांत मुलगा आहे (माझं नाव ही प्रशांत आहे)
पण नाग शांत झोपला आहे म्हणजे त्याला डसता येत नाही असे नसते. तात्या कुठे लिमिट क्रॉस झाले असेल तर बेंबी पासून माफी मागतो. जे स्पष्ट करणे गरजेचे होते ते केले. थोडं जास्त झालं असं मला ही वाटत ,,पण कोण ऊगाच कलम करा आंबे लावा आस्ले फिल्मी डायलॉग मारण्यापेक्षा आणि सर्वव्यापी लोकांनी गडबडाट हसण्यापेक्षा नीट सांगितलं असतं तर बर्र वाटलं असंत !

पुन्हा एकदा आंबोळ्या पासून तात्यांपर्यंत... सगळ्याची माफी ....

लै भारी....

लै भारी कुबड्या खवीस जी,
आपली प्रतिक्रिया वाचली, किंबहुना वाचल्या.
आंबोळी ह्यांनी विनोदी पध्दतीने लिहिलेल्या प्रतिक्रियेवर आपली येवढी संतप्त प्रतिक्रिया?????
त्यातहि
आम्हाला हात तर लावा बरगड्यांसोबत ऊखडून काढू.....
माजलास काय?.....दंतविमा काढून घ्या......डिवचू नका महागात पडेल...

हि असलि धमकीची भाषा ?????
प्राजुताइ ह्या मिपा वरच्या ज्येष्ठ महिला सदस्या आहेत. त्यांना दंतविमा काढून ठेवा अशी धमकी?
मला वाटते कि मिसळपाव हि ओर्कुटसारखी कम्युनिटी नाहि,कि आपल्या गल्लीतला किंवा कोलिजातील कट्टा नाहिये
कि तिथे असली भाषा सहज चालून जावी.

जाहीर आवाहन : मी जे काही बोललो ते कोणालाही दुखवण्याच्याहेतूने नव्हे. मी एक शांत मुलगा आहे (माझं नाव ही प्रशांत आहे)
पण नाग शांत झोपला आहे म्हणजे त्याला डसता येत नाही असे नसते. तात्या कुठे लिमिट क्रॉस झाले असेल तर बेंबी पासून माफी मागतो. जे स्पष्ट करणे गरजेचे होते ते केले. थोडं जास्त झालं असं मला ही वाटत ,,पण कोण ऊगाच कलम करा आंबे लावा आस्ले फिल्मी डायलॉग मारण्यापेक्षा आणि सर्वव्यापी लोकांनी गडबडाट हसण्यापेक्षा नीट सांगितलं असतं तर बर्र वाटलं असंत !

पुन्हा एकदा आंबोळ्या पासून तात्यांपर्यंत... सगळ्याची माफी ....

अहो नाग शांत झोपलाय म्हणजे काय?
जे स्पष्ट करणे गरजेचे होते ते केले...?
" हात ऊखडण्याबद्दल " कोणाला आजनवायच असेल तर खरंच पंगा घ्या बॉ... मला फुसक्या धमक्या द्यायची सवय नाही. पण दंत आणि अस्थीविमा जरूर काढून घ्या .??????????

हा काय प्रकार आहे?हे काय चाललय??
हे काय कोलेजचे कँटिन आहे का?

संदर्भ माहित नव्हता तर हि असली भाषा वापरण्यापुर्वी दोघातिघांना विचारायचे तरी आधि.
माफी मागतानाहि नम्र पणा कुठेहि जाणवला नाहि.

तात्या,
ह्या असल्या प्रकाराची आपण गंभीर नोंद घेवून योग्य ती समज संबधितांना द्यावी,
अशी विनंती.

अभिज्ञ.

अभिज्ञशी

अभिज्ञशी सहमत आहे.

बरगड्या तोडीन, दात पाडीन असले धमकीवजा लेखन इथे येऊ नये ह्याची तात्या तसेच इतर मॉडरेटर्सनी देखिल काळाजी घ्यावी.

सार्वजनिक स्थळी कसे वगावे ह्याचे भान देखिल सदस्यांनी सोडू नये.

-बगाराम

समज कसली

समज कसली देता आहेत तुमचे तात्या. उलट त्यांनी कुब्ड्या खवीस ह्यांचि (भाग्यश्री ह्यांच्या वतिने) क्शमा मागित्ली आहे.

निव्व़ळ माझ्या आयडीचे नाव इथल्या आण्खी एका सदस्याशी जुळते म्हणुन काही लोकांनि टावळकी केल्यावर मी तात्यांना समज द्यायला साम्गीतली तर मला काय म्हणाले होते ते लक्शात आहे.

सहमत..

काय र मुलांनो, काय गडबड आहे?

अभिज्ञरावांशी सहमत आहे. कुबड्याने मारामारीची भाषा वापरू नये. अर्थात, इतरांनीही कुबड्याला धमकीची भाषा देऊ नये!

आपसात जरा समजुतीने घ्या रे! आधीच मला खूप टेन्शन आहे त्यात आणखी टेन्शन देऊ नका! मिपावरील मुक्त वातावरणाचा गैरफायदा घेऊ नका. शक्य तिथे खरडींचा वापर करा...

तात्या.

खुलासा आणि जाहीर माफी.. पण थोडा दूटप्पी पणा वाटला ...

सर्वप्रथम जाहीर माफी. भाषा चुकीची असली तरी दिल साफ आहे...आणि ते फक्त शाब्दिक होतं.. हात ऊखडणार म्हण्जे काय लगेच खरोखर ऊखडणार नाही. आता जर आंबोळ्या आमचं कुबड कलम करत असेल तर तुमचा त्याला आक्षेप का नाही? मी ते फक्त शब्दीक घेतलं (त्यात अजून एक ज्येष्ठ मेंबर त्याला हसून लोळून अनूमोदन देतो म्हणजे आंबोळ्याच्या कुबड कलमाचे समर्थन करतो यास तुम्हा लोकांचा आक्षेप नाही? )
ते फक्त कागदी होत हे तुम्हाला खरं तर मी सांगायची पाळीच येवू नये... असो. मी ईथून ७ समूद्र पार करून कोणाला मारायला जाईल ?आमच्या असल्या प्रतिक्रीयांचा का बाऊ बोबारा व्हावा ? आणि मारामारी हा माझा पेशा नाही ! मी एका चांगल्या सॉफ्ट्वेअर कंपनीत चांगलं शांत राहून काम करतो. तुम्ही सगळे लोक एकमेकांना आधीपासून ओळखता एकाला काही बोललं की लगेच दूसर्‍याला राग येणे स्वाभाविकच. आणि मग त्यातून वादावर वाद. जर मी एक प्रश्न विचारला तर त्याचं ऊत्तर अपेक्षित होतं. ऊगाच फिल्मी डायलॉग आणि असल्या कुचकट प्रतिक्रीया नक्कीच नाही.ईथे तुमच लक्ष का वेधलं नाही जात ? का हा नविन म्हणून सगळे तूटून पडायंच ?
दंतविमा हा एक तर विनोदी हेतूने वापरला होता जसा कोणी तरी कूबड कलमासाठी वापरला होता.

प्राजुताइ ह्या मिपा वरच्या ज्येष्ठ महिला सदस्या आहेत. त्यांना दंतविमा काढून ठेवा अशी धमकी?
त्यांना बोललं की दुखावता .. मग आमचा स्वाभिमान नाही .. आम्हाला राग येत नसेल ? का आम्ही नवे म्हणून कमी लेखता ?

संदर्भ माहित नव्हता तर हि असली भाषा वापरण्यापुर्वी दोघातिघांना विचारायचे तरी आधि.
कोण दोघे-तिघे? विषयाचा धागा सूरू झाला त्यात विचारणे काय गैर ? का प्रश्न विचारणे मिपा च्या संहीतेत बसत नाही ? आणि भाषा कशी न कुठून सूरू झाली ?

माफी मागतानाहि नम्र पणा कुठेहि जाणवला नाहि.
कसा जाणवेल ? काळा चष्मा घातला की दुनिया काळी दिसते.

असो .. हे सगळं असं होतं... ईथे दूटप्पी पणा वाटला. पण तरी ही माझ्या वाटेची मी सर्व दुखावलेल्यांची माफी मागतो.
(आमचं दूखणं पेनकिलर खाऊन शामवू)

ह्या असल्या प्रकाराची आपण गंभीर नोंद घेवून योग्य ती समज संबधितांना द्यावी,
असल्या कुचकट तक्रारी करू नयेत. विजाभौंनी मला व्यवस्थित व्यनी करून सांगितलं. त्यामूळे त्यांच्या बद्दल आदर वाढला.
आपण आदर दिला तरंच आपल्याला आदर भेटतो.. फोर्स करून आदर प्राप्त करता येत नाही..

शेवटचे निवेदन : असल्या वादात पडून पुन्हा पोळून न घेण्याचा प्रयत्न करिन.ईथे कुठे ही हाणामारी शब्दश: पण आलेली नाही. तरी ही काही चुकलेच तर आगाऊ माफी.

आणि आता नावच बदलतोय.

हाहाहाहा

संकेतस्थळांचा गाळीव इतिहास आवड्तोय चालू दे !!! Smile

जे आपल्याला कळत नाही, एकतर समजून घ्यावे किंवा सोडून द्यावे, लगेचच चर्चा प्रस्ताव टाकू नये.

पूर्वेतिहास

"आप मरे जग डूबे"च्या धर्तीवर "मी जन्मिलो घडली सृष्टी" असा माझा विचार असल्यामुळे, फक्त ए.एम.(आफ्टर मी) काळातीलच घडामोडींकडे मी लक्ष देत आलो आहे. हा माझ्या आधीचा (बी एम - बिफोर मी काळातला) पूर्वेतिहास वाचून काही माहिती मिळेल वाटते.

फिरकी-इंटिग्रेटेड सर्किट-शैली ही खासियत तर आहेच. मिसळपावावर शिलालेख लिहिताना माझ्या कित्येक छिन्न्या बोथट झालेल्या आहेत. पण यांची छिन्नी भेदक असतेच!

तसा मी गौ आदमी - तरतमभाव करायचाच तर कोणी गौ-तर असेल तर मी गौ-तम. त्यामुळे कित्येकदा भावार्थ दीपिलेल्या डोळ्यांना दिसत नाही. मथितार्थ समजणारे जाणते मग माझ्याबद्दल "वराहाग्री मुक्ताई" (शुद्ध मराठीत "पर्ल्स बिफोर स्वाईन") अशी टिंगल करत असल्याचा मला भास होतो.

:-)

"आप मरे जग डूबे"च्या धर्तीवर "मी जन्मिलो घडली सृष्टी" असा माझा विचार असल्यामुळे,

सृष्टीके पहले सत् भी नही था, असत् भी नही ! अंतरिक्ष भी नही था, आकाश भी नही !
छिपा था क्या ? कहां ? किसने ढका था ?
उस पल तो अगम, अटल जल भी कहां था ?

Smile

वराहाग्री मुक्ताई

ह्याबद्दलच आम्ही आपले चाहते आहोत, धनंजयराव !

पर्ल्स बिफोर स्वाईन, हे स्टीफन पास्टिस चे कार्टून आमचेही आवडते आहे. Wink

(पण ते वराहाग्री उच्चारायला अंमळ खटकतेच.)

- सर्किट

अंमळ

सदर तत्वज्ञान आम्ही कुठल्याही द्राक्षासवाच्या अंमलाखाली लिहिले नसून, पूर्ण शुद्धीत लिहिलेले आहे

अंमल केवळ आसवांचा नसतो तो आसनांचा बी आस्तोच कि. म्हजी अस पघा कि राच्च्याला चंद्राचा प्रभाव अस्तोय दिवसाला सुर्याचा प्रभाव आस्तोय. पौर्निमेच्या राती चंद्र वर्ती सुर्य खाली. अमावस्येला संगतीच पोजिशन व्हतीय; समाजातील तुमची पोजिशन, लेखकाची वाचकाच्या मनातील पोजिशन, वाचकाची लेखकाच्या मनातील पोजिशन, थोडक्यात पोजिशन म्याटर्स. मंग त्याच प्रतिमेत रुपांतर ; पुढे प्रतिभेत रुपांतर.मंग मिसळपावात रुपांतर.
प्रकाश घाटपांडे

या

या इतिहासाचे ओझे नव्या सदस्यानी का वाहुन न्यावे.
मिसळपाव खाताना झणझणीत पणा महत्वाचा.
केऑस थेअरीचा असलाच तर त्याना तिटकाराच असेल.
पॉयशा असेल तर वाटेल तसले डास आणि झुरळे पिटाळुन लावता येतात

प्रचंड मनोरंजन

>>बाळपणीचा काळ सुखाचा वगैरे दीड-दोनशे वर्षांपूर्वीच्या सुरस आणि चमत्कारिक कथांविषयी कदाचित काही तरुण सदस्यांना असेच वाटत

ठोss

>>अय्या कित्ती छान लिहिलंय, नाही ? मला तर माझ्या आईची आठवण येऊन रडूच आलं - सदस्यांना
>>पूर्ण शुद्धीत लिहिलेले आहे. द्राक्षासवाच्या अंमलाखाली आम्ही नेहमीच विडंबने लिहितो, आणि इतरांनी लिहिलेल्या विडंबनांची अफाट स्तुती क

ठोss ठोss

>>सदस्यांनी आपली एक स्वतंत्र अनुदिनी एका शिलालेखावर स्थापून, "त्या चामुंड्याच्या आयचा घो" असे

ठोss ठोss ठोss

Rolling On The Floor Rolling On The Floor Rolling On The Floor

जियो सर्किटराव जियो !!
अगाध कल्पनाशक्ती अन अफाट विनोदबुद्धीच्या जोरावर तुम्हाला असे प्रचंड विनोदी साहित्य प्रसवता येते .. पुढचा भागाची वाट पहातोय.

चालू द्या

या मिपार्थाची हिस्टरी | स्वयें सर्किटु विवरीं |
अज्ञ जनता प्रश्न करी | चमत्कारोनि || Smile

[मूळ श्लोक या पानावर सत्तरावा]

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

आई ग !

साक्षात माउलींचा वरदहस्तच लाभलाय, म्हणजे !

आता काही खरे नाही.

(हिस्टरी काय चपखल बसले आहे, वा !)

- सर्किट

चपखल

मस्त जमले आहे..

चपखल वर्णन! डोळ्यासमोर चित्र उभे राहिले..

वाट पाहतोय

मनसोक्त हसण्यासाठी पुढील भागांची वाट पाहतोय.. खूप सह्हि चालु आहे.. खास सर्कीट लेख Smile)

-('मिसळ'लेला) ऋषिकेश

हा हा हा!!

(- केसु, कसा आहेस ?- )
सर्किटशेठ,
मी एकदम उत्तम आहे..
खुलासा एकदम जबरा..लेख वाचून खो खो खो हसलो..चांगल चालू आहे चालू द्या.. Smile) Smile) Smile)
(द्राक्षासवाच्या अंमलाशीवाय विडंबन आणि प्रतिसाद लिहिणारा)केशवसुमार :\
स्वगत: 'नाव कळसूबाई आणि हाती कथीलाचा वाळा' ही म्हण ह्या माणसाच्या बाबतीत चूकीची आहे Nerd

मिसळपाव: एक व्यक्तिगत इतिहास

बराच मनोरंजक इतिहास!
सर्कीटरावांच्या लेखणीतून असे गहन लेखन पुन्हा प्रसवू लागले

सर्कीटराव, अजून येऊ द्यात!

संजय अभ्यंकर
http://smabhyan.blogspot.com/

असेच म्हणतो..

सर्कीटरावांच्या लेखणीतून असे गहन लेखन पुन्हा प्रसवू लागले

हे 'प्रसव' नेमाने यावे इतकीच अपेक्षा!! Wink

इतिहासाचार्य

जुन्या जाणत्यांसाठी...

कथा है पुरूषार्थ की ये स्वार्थ की परमार्थ की... Batting Eyelashes

नव्यांसाठी..

पुनी पुनी कितनी हो सुनी सुनाये, (ह्या ढुढ्ढाचार्यांच्या) दिल की प्यास बुझत ना बुझाए At Wits End

अशी अवस्था आहे

इतिहासाचार्य सर्कीटरावांचा हा लेख रंगत जाईल अशी नुसती अपेक्षाच नाही तर खात्री आहे! सदर मालीकेचे हे "ज्ञानोबा" ऐतिहासीक मालीकेचा पाया रचतनाच कळस करतील असे दिसतयं Smile

मस्त आहे! चालू द्या.

आवरा रे याला!

इतिहासाचार्य सर्किट राजवाडे,

आमचा इतिहास दुर्योधन, प्रशासन दु:शासन, युयूत्सु Wink वगैरे पासून सुरू होतो. हे ख्रिस्ताला कुठून ओढून आणलेत. आणि ज्ञानेश्वर विठ्ठलपंत कुळकर्णी यांच्या काळातील कोरे लेख आणि प्रतिसाद देणार्‍या चांगदेवाचे काय झाले?

असो, ते विकासराव स्वतःचे केस ओढून घेताहेत, सर झंडूबाम कपाळाला चोळताहेत, केसु चष्मा सावरतोय आणि मी शोधाशोध करते आहे - आमच्या कोकणात म्हणे एक भूत रात्रीचं दारापाशी येऊन उभं राहतं आणि विचारतं "येऊ का?" (या भूताचं नाव मी विसरले, काहीतरी सर्किट्सारखं असावंसं वाटतंय) चुकूनमाकून मालक "ये" म्हणाला तर आत शिरून गोंधळ घालतं आणि मग कोणाची खैर नसते.

च्यामारी! तुम्हाला कोण "ये" म्हणालं हो?

:-) :-)

च्यामारी! तुम्हाला कोण "ये" म्हणालं हो?

गेल्या काही वर्षांतली आमची वाटचाल बघता, आम्हाला "ये" म्हणण्याची घोडचूक कुणीही करणार नाही. "जा" म्हणायला सगळेच उत्सुक असतात Wink

आमच्या कोकणात म्हणे एक भूत रात्रीचं दारापाशी येऊन उभं राहतं आणि विचारतं "येऊ का?"

भुताचे नाव कळवा. त्याच्या जनुकसंचाची आमच्याशी तुलना करता येईल.

- सर्किट

हाण त्या सर्किटला (अर्थात, मराठी संस्थळांचा बे-मालूम इतिहास!;))

सर्किटराव, आपल्या तुलनेत तसा आमचा मराठी संस्थळावरचा इतिहास हा फार म्हणजे फारच अलीकडचा.
आमचा पहिलाच मुक्काम मिसळपाव. सुरुवातीला इथे आल्यावर इथल्या काही 'प्रेमळ चर्चा' वाचून इतर काही संस्थळांवर त्या चर्चांच्या 'ऐतिहासिक उत्खननाचे' अवशेष पहाण्याच्या निमित्ताने आम्ही जाऊन आलो त्याचवेळी आपल्या बहुआयामी प्रतिभेने आमच्या मनात घर केले!
आपले वैचित्र्यपूर्ण, व्यंगात्मक, विनोदरसाने परिपूर्ण, प्रच्छन्न 'ऐतिहासिक' लिखाण द्राक्षासवाच्या एखाद्या मैफलीसारखे असेच उत्तरोत्तर रंगत जावो हीच त्या गजाननाचरणी प्रार्थना! Cool

चतुरंग

द्राक्षासव अमंल वगैरे...

खुलासा: सदर तत्वज्ञान आम्ही कुठल्याही द्राक्षासवाच्या अंमलाखाली लिहिले नसून, पूर्ण शुद्धीत लिहिलेले आहे.

आपले वरील वाक्य वाचले आणि एकदम अस्मादीकांनी लिहीलेला "दारू एक दृष्टांत" हा लिहीलेला लेख/चर्चा प्रस्ताव आठवला...त्यातील तात्पर्य इतकेच होते की "नशा ही केवळ दारूनेच (अथवा आपल्या संदर्भात द्राक्षासवानेच) चढते अशातला भाग नाही. ती एक मनाची अवस्था आहे. कदाचीत अज्ञानोबासाठीची उन्मनी अवस्था म्हणूया फारतर..." Big Grin

खुलासा: वरील दुवा जरी दुसर्‍या मराठी संकेतस्थळाचा असला तरी तो देण्याचा उद्देश त्या दुव्यातील लेखापुरताच मर्यादीत आहे.