अबोलीच्या निमीत्ताने...

नीलकांत's picture
नीलकांत in जनातलं, मनातलं
19 Apr 2013 - 12:45 pm

नमस्कार,
अबोली नावाचा नवा विभाग मिपावर सुरू करायचे ठरले. पाडव्याला याची घोषणा झाली. आता एवढ्यात हा विभाग सुरू होईल.
अपेक्षेप्रमाणे मिपावर याबाबतीत उलटसुलट चर्चा सुरू झाली. मिपावर काही एक नवीन होतंय तर त्यावर मिपाकरांच्या प्रतिक्रिया अपेक्षीत आहेत. काहींना हा विभाग आवडला तर काहींना अजिबात नाही आवडला. काहींनी आपला संबंधच नाही त्यामुळे कोरड्या शुभकामना दिल्यात तर काहींनी विभाग कधी सुरू होतो अशी चौकशीसुध्दा केली. मात्र काही लोकांच्या प्रतिक्रिया जरा मर्यादा सोडलेल्या वाटल्या त्याचे वाईट वाटले. आता त्याचे कारण काय? याच्या खोलात जायला नको. मात्र तरीही काही विचार या निमीत्ताने मांडायचे आहेत.

मिपावर स्त्रीयांना त्यांच्या विषयावर बोलायला तेवढे मोकळे वातावरण नाही असा काहींचा सुर होता. मला असं म्हणायचं होतं की विषय जसा असेल तसा मिपाकर प्रतिसाद देतात. उत्तम विषय असला तर डोक्यावर घेतील आणि नाहीच पटलं तर 'वाढदिवसाच्या शुभेच्छा' देऊन चेष्टा करतील. मिपाची प्रकृती अशीच आहे. मात्र तरी प्रश्न त्यांचा उरतोच, की आमच्या रोजच्या आयुष्यात असं खुप काही असतं जे आमच्यासाठी खुप महत्वाचं असतं मात्र पुरूषांसाठी त्याची काहीच किंमत नसते. किंवा असे काही विषय आहेत की ज्यावर पुरूषांनी बोलणे सुध्दा अपेक्षीत नसते. मात्र मुख्य बोर्डावर अशी सुचना तर देऊ शकत नाही ना, की यावर केवळ निमंत्रीतांनीच बोलणे अपेक्षीत आहे... हे शक्य नाही... मात्र एक शक्य आहे की एक असा कप्पा तयार करता येऊ शकतो जेथे अश्या विषयांवर चर्चा होऊ शकते. अन्य लोकांना या भागात प्रवेश नसेल, कारण हे चर्चा विषय त्यांच्यासाठी नसतील, त्यांना ज्या विषयांशी संबंध नाही किंवा चर्चेत केवळ टर उडवायच्या शिवाय ज्यांना सहभाग देता येणार नाही त्यांना धागा अवांतरात नेण्याची मुभा नको. ह्या एका साध्या विचारावर हा विभाग आहे.

मात्र काल परवा उत्साहात निघालेल्या धाग्यांत जे तारे तोडल्यागेलेत ते वाईट वाटावेत असेच आहेत. त्यात असा विभाग काढायला नको होता इतपत बोलणे किंवा मतप्रदर्शन ठिक आहे, मात्र ज्या संकेतस्थळाच्या व्यवस्थापनाच्या निर्णयाचा निषेध करावासा वाटत असेल त्या संकेतस्थळावर आपण येऊच नये ना ! तसे मात्र नाही, येथे यायचे आणि उगाच राळ उडवत रहायची असा प्रकार हा आहे. मिपा व्यवस्थापन चालवून घेतय... मऊ लागतंय... असा प्रकार हा वाटतोय. मी कधी नव्हे तर एवढा कठोर बोलतोय मात्र यासाठी झालेला वैताग एवढा आहे की असं बोलावं लागतंय.

त्यानंतर ह्या विभागात काहीही गुप्त राहणार नाही असा प्रचार चालला आहे. खरं तर ह्या विभागात गुप्त राहण्यासारखे काहीच नसेल. ह्या विभागात 'त्यांना' वाचनमात्र ठेवावे ज्यांना या विषयात सामान्यतः रस नसतो म्हणून वेगळा विभाग, मग केवळ वाचनमात्रच न ठेवता प्रवेशच नको असा विचार केला. यात अगदी लिंगाधारीत अन्याय कारक रचना वगैरे असे काही नाही. आणि स्त्री- पुरूष समानतेचाही असा काही विचार आवश्यक नाही. कारण ह्या सरळ्या स्त्रीया मुख्य बोर्डावर लिहीणार आहेतच. त्यामुळे हा विभाग हॅक करून दाखवण्याच्या गप्पा करने सर्वथा अनाठाई आहे. स्त्रीयांच्या विशेष विभागात पुरूषांनी येऊ नये असा संकेत आपण ठरवतोय. याउप्पर कुणी घुसखोरी केलीच तर त्या विकृतीला आपण काय म्हणावं ? त्यामुळे ह्या विभागात काय चालतंय याच्याशी अन्य लोकांना काहीही रस असू नये. काही चुकीचं होणार नाही , वातावरण उत्तम रहावं यासाठी संपादक आहेत ते काळजी घेतील. या विभागाबाबत ज्यांना आपला विरोध नोंदवायचा आहे ते मला व्यनि करू शकतात. त्यामुळे माझ्या काही जवळच्या मित्रांना विनंती आहे की काळजी करू नका असा विभाग निघाल्यामुळे काही लागलीच जगबुडी होणार नाही.

ह्याच चर्चेत काही अश्या प्रकारची कागाळी झाली आहे की ज्याने संपादकांना बडवे वगैरे उपमा देण्यात आली आणि त्याला एका राजकीय उल्लेखाचा संदर्भ दिल्याने ते नकारात्मक उद्द्येशाने बडवे बोलल्यासारखे होते. हे अत्यंत चुकीचे आहे. आणि अजिबात मान्य नाही. संपादक आपल्यातीलच एक आहेत. आपला वेळ ते आपल्या मिपासाठी देतात. त्यांच्या कष्टांची कल्पना मला पुर्णपणे आहे. त्यामुळे त्या कमेंटवर व्यवस्थापन कारवाई तर करेलच मात्र अन्य सर्व सदस्यांना पुन्हा एकदा सुचना देतो की संपादकांविषयी काहीही बोललेलं खपवून घेणार नाही.

काही लोक कायम मिपावर येतात ते मिपाविषयी, मिपा व्यवस्थापना विषयी वाईट बोलायलाच येतात असे दिसते. कारण चांगल्या चर्चांत यांचा सहभाग नसतो. चांगले लेख यांना लिहीता येत नाही. मात्र नावे ठेवायलाच हे येतात असे दिसते. अश्या लोकांना सुधारण्यासाठी बराच वेळ दिलेला आहे. यापुढे खरडवहीत सुध्दा चुकीचे लिहीलेले आढळले तर अश्या लोकांवर कारवाई केली जाईल.

शेवटी पुन्हा एकदा सर्व सदस्यांना आवाहन आहे की मिपा व्यवस्थापन जे करते त्याबाबत चर्चा करण्याची आपले मत प्रदर्शन करण्याची सर्वांना मुभा आहे. मात्र मिपाचं वातावरण आपल्या लिहीण्याने गढूळ होत असेल तर असे लेखन जाहीर न करता मला व्यक्तिगत निरोप पाठवा. माझ्याशी चर्चा करा. मुख्य बोर्डावर निषेधाचे धागे, हॅक करण्याची आव्हाने आणि संपादकांना नकारात्मक पदव्या का म्हणून सहन कराव्यात?

मिपा आपलं आहे, ते सकारात्मक पुढे नेऊया. त्यासाठी सर्वांचं सहकार्य अपेक्षीत आहे.

- नीलकांत

हे ठिकाणधोरणमांडणीप्रकटनविचार

प्रतिक्रिया

स्पा's picture

19 Apr 2013 - 12:47 pm | स्पा

सहमत

यशोधरा's picture

19 Apr 2013 - 12:50 pm | यशोधरा

ताकीदसुधा संयमित शब्दांत द्यायची हे तुझ्याकडून शिकावे :)
पुन्हा एकदा, हा विभाग सुरु केल्याबद्दल आभार.

चुचु's picture

19 Apr 2013 - 3:38 pm | चुचु

+१

उपास's picture

19 Apr 2013 - 6:42 pm | उपास

नक्कीच..

स्पंदना's picture

19 Apr 2013 - 1:05 pm | स्पंदना

मिपा आपलं आहे, ते सकारात्मक पुढे नेऊया. त्यासाठी सर्वांचं सहकार्य अपेक्षीत आहे

.
अतिशय आवडलेलं वाक्य अन शब्दाशब्दाशी सहमत. मिपा आमचं आहे पेक्षा आपलं आहे हा दृष्टीकोण बरेच काही सांगुन जातो.

भावना कल्लोळ's picture

19 Apr 2013 - 3:44 pm | भावना कल्लोळ

+१

गवि's picture

19 Apr 2013 - 4:24 pm | गवि

अगदी..

या नीलकांतच्या निवेदनासारखं साध्या सरळ शब्दात अत्यंत परिणामकारकरित्या सर्व सांगता येतं याची जाणीव नसल्याने आपण कितीतरी वेगवेगळ्या चतुर,धूर्त,क्लिष्ट किंवा गूढ शब्दरचना करत राहतो हे जाणवलं.
आवश्यक तिथे कठोर आणि अन्यत्र मृदू आणि कोणालाही न ओरबाडता मनातलं मांडणारं असं थेट निवेदन आवडलं.

सुमीत भातखंडे's picture

19 Apr 2013 - 1:31 pm | सुमीत भातखंडे

.

अग्निकोल्हा's picture

19 Apr 2013 - 1:40 pm | अग्निकोल्हा

बर्‍याच लोकांनी अबोली या नावास विरोध केवळ चुकुन अबोल या शब्दाचे स्त्रिलिंगी रुप आहे असं समजुन केला जे वास्तव न्हवे. अबोली हे केवळ फुलाचे नाव आहे हे कृपया समजुन घ्यावे

संपादकांना नकारात्मक पदव्या का म्हणून सहन कराव्यात?

खर तर आपला वेळ ते आपल्या मिपासाठी देतात. त्यांच्या कष्टांची कल्पनाही आता मला येत आहे. परंतु बहुतांशांच्या नकारात्मक पदव्या ही बाब अजिबात वैयक्तिक नाही हे त्यांनी लक्षात लक्षात घेतल्यास संपादकांना याचे अनावश्यक दडपण नक्किच वाटणार नाही. मी भारतात राहतो, मला काही चालु निर्णय पटले नाहीत तर मी पंतप्रधांनावर व्यंगात्मक परखड टिकाही करतो. मग तो कोणत्याही पक्षाचा का असेना. याबाबत ओबामांनी चिनमधील कॉलेजच्या मुलांसमोर फार छान विवेचन केल्याचे स्मरतयं.

त्यांना ज्या विषयांशी संबंध नाही किंवा चर्चेत केवळ टर उडवायच्या शिवाय ज्यांना सहभाग देता येणार नाही त्यांना धागा अवांतरात नेण्याची मुभा नको. ह्या एका साध्या विचारावर हा विभाग आहे.

हम्म. पण हे फारच टोकाचे इनोसन्ट मत वाटत आहे. पण निलकांत या आयडीच्या प्रांजळ हेतुवर मात्र यातुन अजिबात शंका नाही.

मिपा आपलं आहे, ते सकारात्मक पुढे नेऊया. त्यासाठी सर्वांचं सहकार्य अपेक्षीत आहे.

नक्किच. माझ्या पापांचा घडा भरलेला असल्यास त्वरीत विनासुचना निष्कासीत केले जावे ही नम्र विनंती.

छोटा डॉन's picture

19 Apr 2013 - 1:43 pm | छोटा डॉन

अत्यंत समयोचीत संवाद असे मी ह्याचे वर्णन करेन.
ताकिद, धमकी, इशारा वगैरे सोडुन द्या, मला ह्याला एक संवादच म्हणावेसे वाटले.
असो, आमचे सहकार्य आणि शुभेच्छा आहेतच.

- छोटा डॉन

पैसा's picture

19 Apr 2013 - 1:53 pm | पैसा

आशा आहे सर्वांपर्यंत यातील कळकळ पोचेल. पुन्हा एकदा सर्व पाठिंब्यासाठी नीलकांतला धन्यवाद आणि महिला विभागाला शुभेच्छा!

अक्षया's picture

19 Apr 2013 - 2:02 pm | अक्षया

+ १

पिलीयन रायडर's picture

19 Apr 2013 - 2:23 pm | पिलीयन रायडर

मात्र ज्या संकेतस्थळाच्या व्यवस्थापनाच्या निर्णयाचा निषेध करावासा वाटत असेल त्या संकेतस्थळावर आपण येऊच नये ना ! तसे मात्र नाही, येथे यायचे आणि उगाच राळ उडवत रहायची असा प्रकार हा आहे

आणि

काही लोक कायम मिपावर येतात ते मिपाविषयी, मिपा व्यवस्थापना विषयी वाईट बोलायलाच येतात असे दिसते. कारण चांगल्या चर्चांत यांचा सहभाग नसतो. चांगले लेख यांना लिहीता येत नाही.

अगदी पटले...

अभ्या..'s picture

19 Apr 2013 - 2:33 pm | अभ्या..

मला पण अगदी पटले. सहमत.

सुहास झेले's picture

19 Apr 2013 - 2:31 pm | सुहास झेले

अगदी सहमत...

अद्द्या's picture

19 Apr 2013 - 4:10 pm | अद्द्या

लाइक च बटन आहे का रे इथे

किसन शिंदे's picture

19 Apr 2013 - 4:17 pm | किसन शिंदे

महत्वाच्या वेळी अगदी नेमक्या शब्दात आलेलं प्रकटन!!

मालोजीराव's picture

21 Apr 2013 - 11:43 pm | मालोजीराव

नविन विभागास शुभेच्छा :)

सुधीर's picture

19 Apr 2013 - 4:28 pm | सुधीर

सहमत.

ऋषिकेश's picture

19 Apr 2013 - 4:38 pm | ऋषिकेश

एखादा विषयाधारित समुदाय काढून त्यात प्रवेश प्रत्येक सदस्याला ऐच्छिक स्वरूपाचा ठेवला असता (हवं तर त्यावर अप्रुवल ठेवलं असतं) तर अधिक उचीत वाटले असते. लिंगाधारित विभागाचा निर्णय तितकासा पटला नाही.

असो.

शुभेच्छा होत्या आणि आहेतच!

श्रीरंग_जोशी's picture

19 Apr 2013 - 6:31 pm | श्रीरंग_जोशी

नीलकांत यांनी परिणामकारकरित्या बहुतांश सामान्य मिपाकरांच्याच भावना मांडल्या आहेत. अन या भावनाच मिपाचे सर्वात मोठे शक्तिस्थान आहेत.

सार्वजनिक स्तरावर उदार दॄष्टिकोनाला बरेचदा कमजोरी समजण्यात येते. या लेखनाद्वारे योग्य तो संदेश योग्य ठिकाणी पोचला असेल अशी आशा करूया अन यापुढेही सकारात्मक पद्धतीने आपापला सहभाग देऊया.

या विभागाची संकल्पना मला पटते अन त्यातून अनेक स्त्री वाचनमात्र स्त्री सदस्यांना अभिव्यक्त होण्यास नवे व्यासपीठ उपलब्ध करून दिल्याबद्दल नीलकांत व संपादक मंडळाचे मनःपूर्वक आभार!!

लाल टोपी's picture

19 Apr 2013 - 6:47 pm | लाल टोपी

निलकांतजी एक नविन सुरुवात करीत आहात. चांगला आणि स्तुत्य उपक्रम आहे विशेषतः भूमिका स्पष्ट केल्यानंतर विरोधी मते राहू नयेत असे वाटते.

जिथे नांदायचे तिथे सुखाने नांदायचे एवढेच आपल्याला माहीत आहे. तेव्हा हुक्म सर आंखोपर. नीलकांत यांनी हस्तक्षेप करुन मुद्द्याला "राइट पर्स्पेक्टीव्ह" दिलेला आहेच. तेव्हा माझ्याकडून तरी वाद व स्वगत थांबवत आहे.

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

19 Apr 2013 - 8:31 pm | निनाद मुक्काम प...

समय सूचित लेख
पूर्णतः सहमत
Sarcastic applause
विठ्ठल विठ्ठल करत जुन्या जाणत्या लोकांनी, संपादक मंडळींवर ताशेरे ओढले गेल्यावर जी सहमती दर्शक प्रतिक्रिया दिली ती पाहून वाईट वाटले.
लिहित राहा अधून मधून
असे मी पूर्वी म्हणालो होतो त्याचा आज खेद वाटत आहे.
Thumbs down

मुक्त विहारि's picture

19 Apr 2013 - 9:30 pm | मुक्त विहारि

सहमत आहे..

तर्री's picture

19 Apr 2013 - 9:43 pm | तर्री

इतक्या प्रतिसादात एकही विरोधी प्रतिसाद नसावा ? सगळेच अनुमोदन आणि उपविष ? काय आश्चर्य ?
मिपा वर कल्याणकारी हुकुमशाही आली की काय ? पु.लं च्या माझे पौष्टिक जीवन मध्ये बदललेल्या पोस्टाचे वर्णन आहे तसे मिपा होणार की काय ?

सतत सभ्य ,गोड गोड आणि गुळचट होत जाणाऱ्या जगात मिपा सारखे स्पष्ट /झणझणीत / रोख ठोक काही तरी असावे असे वाटते.

मालकांच्या हया लेखानंतर सगळे "सर्वोदयी" होणार की काय हया भीतीने ग्रासलो गेलो आहे.

प्रसाद गोडबोले's picture

19 Apr 2013 - 10:08 pm | प्रसाद गोडबोले

वरील निवेदन कम तंबी कम ढोस लेख इतक्या संयत भाषेत लिहिलाय की कोणाला खुसपट काढायला जागाच ठेवली नाहीये .

एका लेखात नीलकांत ह्यांचा मी पंखा झालो आहे :)

(फक्त एक प्रश्न अन्नुत्तरीत राहिला असे वाटले : पुरुषांसाठी स्वतंत्र विभाग निघणार का ? एव्हन स्त्रीयांनीही त्याला हरकत घेतली नाहीये .
अवांतर : आता हे विचारलं म्हणुन माझ्यावर कारवाई नाही ना होणार ? :घाबरलेला स्मायली : )

गोगलगाई लेखातही ज्यांना खुसपट काढायचे ते काढतात. हा लेख नीलकांत यांचा आहे म्हणून खुसपटं निघत नाहीयेत. अ‍ॅज सिंपल अ‍ॅज दॅट!! :)

काय दिवस आलेत. शुचि तैंशी सहमत व्हावे लागले. ;)
जे नीलकांत म्हणतोय तेच आमच्या ताया-बहीणी कधी पासुन सांगत होत्या, पण कुणी ऐकायला तयार असेल तर ना.

दंगा करणार्‍या वर्गात हेडमास्तर आले की कसं शांत शांत होतं तसच. :)

प्यारे१'s picture

19 Apr 2013 - 11:09 pm | प्यारे१

मॉनिटर्स! यु टु????????? ;)

काय दिवस आलेत. शुचि तैंशी सहमत व्हावे लागले.

हाहाहा

गुलाम's picture

19 Apr 2013 - 11:12 pm | गुलाम

खरोखर प्रचंड संयमी आणि परिणामकारक लेख. दुसरा एखादा असता तर म्हणाला असता- हे संकेतस्थळ मी पदरचे पैसे आणि वेळ खर्चून चालवतो. मग मला जे हवं तेच होईल. तुम्हाला यावं वाटलं तर या नाहीतर जा ऊडत.

नीलकांत साहेब, या निमित्ताने तुमचे आभार मानून घेतो. ज्या कष्टाने आणि चिकाटीने तुम्ही आणि संपादक मंडळ हे संकेतस्थळ चालवता त्याला तोड नाही. दुर्देवाने आमच्यातल्या काही जणांना फेसबूक आणि मिपा यातील फरक कळतच नाही. तुम्ही त्यांना फाट्यावर मारून पुढे जात जा..

अबोली साठी सर्व मिपाभगिनींना मनापासून शुभेच्छा!!!

इरसाल's picture

20 Apr 2013 - 9:41 am | इरसाल

गुलामाचा पुर्ण प्रतिसादाशी सहमत.
नीलकांताचे आभार.

अत्रुप्त आत्मा's picture

21 Apr 2013 - 9:23 pm | अत्रुप्त आत्मा

@नीलकांत साहेब, या निमित्ताने तुमचे आभार मानून घेतो. ज्या कष्टाने आणि चिकाटीने तुम्ही आणि संपादक मंडळ हे संकेतस्थळ चालवता त्याला तोड नाही. दुर्देवाने आमच्यातल्या काही जणांना फेसबूक आणि मिपा यातील फरक कळतच नाही. तुम्ही त्यांना फाट्यावर मारून पुढे जात जा.. >>> +++++++++++++++११११११११११११११११११११११११११११

आजानुकर्ण's picture

19 Apr 2013 - 11:58 pm | आजानुकर्ण

नवीन सदरासाठी शुभेच्छा.

मात्र मुख्य बोर्डावरील बहुसंख्य संपादिका या स्त्रीआयडीधारक असताना (सर्वच) स्त्रिया (की ज्या बाय डिफॉल्ट सभ्यच असतात) किंवा (काही) सभ्य पुरुषांसाठी (शिवराळ वातावरण व अश्लील शेरेबाजी करून) अनकंफर्टेबल वातावरण निर्माण करणाऱ्या सदस्यांविरुद्ध कारवाई करण्याऐवजी लिहिणे टाळणाऱ्या स्त्रियांना 'तुमचं घर सावलीत बांधू' अशी मखलाशी करण्याचा हा प्रकार वाटला.

विशेषतः तुम्ही स्त्री असल्याची खात्री करण्यासाठी खरे नाव व फोन नंबर यासारखी पर्सनली आयडेंटिफायेबल माहिती संकेतस्थळाच्या संपादकांना देत असल्यास एखाद्या विषयाच्या संदर्भात मुख्य बोर्डावर एखादी गोष्ट लिहिणे जर स्त्रीला अनकंफर्टेबल वाटत असेल तर तीच गोष्ट या बंदिस्त बोर्डावर लिहिताना तिने खबरदारी घ्यावी ही सूचना ठळकपणे दाखवावी. (कोणीतरी सुरक्षिततेची भ्रामक भावना असा चपखल शब्दप्रयोग केला आहेच), कारण लिखाणाची जबाबदारी संकेतस्थळाची नसून सदस्याची असते.

अशा माहितीचा गैरवापर होणार नाही हे आश्वासन असले तरी त्यासंदर्भातील सर्व कायदेशीर खबरदारी (नॉन डिसक्लोजर अग्रीमेंट वगैरे) मिपा व्यवस्थापनाने घेतली असेल असा विश्वास आहेच.

स्पंदना's picture

20 Apr 2013 - 5:24 am | स्पंदना

विशेषतः तुम्ही स्त्री असल्याची खात्री करण्यासाठी खरे नाव व फोन नंबर यासारखी पर्सनली आयडेंटिफायेबल माहिती संकेतस्थळाच्या संपादकांना देत असल्यास एखाद्या विषयाच्या संदर्भात मुख्य बोर्डावर एखादी गोष्ट लिहिणे जर स्त्रीला अनकंफर्टेबल वाटत असेल तर तीच गोष्ट या बंदिस्त बोर्डावर लिहिताना तिने खबरदारी घ्यावी ही सूचना ठळकपणे दाखवावी. (कोणीतरी सुरक्षिततेची भ्रामक भावना असा चपखल शब्दप्रयोग केला आहेच), कारण लिखाणाची जबाबदारी संकेतस्थळाची नसून सदस्याची असते.

खरे नाव अन फोन नंबर हा काही त्या ठिकाणी डिस्प्ले होणार नाही आहे. एकुणात त्या ठिकाणी लिहितानाही स्त्रीया त्यांच्या मिपावरच्या आयडीनेच लिहितील अन ओळखल्या जातील. आजही तुम्ही जेंव्हा मिपाच्या सदस्यत्वासाठी अर्ज करता (रिक्वेस्ट) तेंव्हा तुमचा मुळ मेल आयडी तुम्ही इथल्या प्रशासनाला देताच. अगदी तीच संकल्पना पण फक्त स्त्री असल्याचे कन्फर्मेशन म्हणुन काही माहीती मगितली जाइल ती एकदा आयडी कन्फर्म झाली की पुन्हा त्याची गरजही लागणार नाही. इतका काही त्याचा कंगावा करण्याची गरज आहे असे मला तरी वाटत नाही.
मुख्यत्वे अबोलीच्या सदस्या या एकमेकीच्या ओळखीने येणार्‍या असाव्यात. अन तेथे लिहिले जाणारे लेख हे काही अगदी एखाद्याच्या वैयक्तीक आयुष्यात धमाका उअडवणारे असतील असे नाही. उद्या एखाद्या नवशिकेने जर फोडणी जमत नाही म्हंटल तर काय अन कसले प्रतिसाद येतील हे तुम्ही जाणताच. आण्खी नवे लोक घाबरतात ते या असल्या टर उडवण्यालाच. अर्थात आपण म्हणजे मी तरी माफक चेष्टा एंजॉय करतो, पण लिहिणारा असे करेलच असे नाही. म्हणुन त्यातल्यात्यात निदान नवशिक्या स्त्रीया तरी कुठेतरी व्यक्त होउ शकतील असा दृष्टीकोण आहे.
एक अत्यंत महत्वाचा मुद्दा या विभागाची मागणी इथल्या काही स्त्री सद्स्यांनी आपण होउन आमच्याकडे केली. अन आम्ही ती नीलकांतपर्यंत पोहोचवली इतकेच. त्यांना हवे असते तर त्या इतर ठिकाणी अश्या उपलब्द्ध असणार्‍या गटात जाउ शकत होत्या पण त्यांना मिपावर राहुनच असा विभाग हवा आहे. अन तसे करण्यात गैर असे काहीही नाही असे मला वाटते.

आजानुकर्ण's picture

20 Apr 2013 - 6:59 pm | आजानुकर्ण

प्रथमतः एक गोष्ट स्पष्ट करतो की हे खाजगी संकेतस्थळ आहे. त्यामुळे संकेतस्थळाच्या व्यवस्थापनाला त्यांचे निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य आहे व त्याचा मी आदर करतो. हे निर्णय पटणे व न पटण्याचा अधिकार वाचक म्हणून मला आहे व त्याबाबतीत मी काही करु शकत नसलो तरी एक मत मांडू शकतो.

सामान्य सदस्यत्व घेताना देण्यात येणारा इमेल आयडी हा काहीही असू शकतो उदा अबक @ मिसळपाव .कॉम. हा पत्ता मी प्रशासनाला देतो तेव्हा या पत्त्यावरुन माझी काहीही माहिती प्रशासनाला कळत नाही. माझा आयपी ऍड्रेस संकेतस्थळाच्या लॉगमध्ये असतो. मात्र त्यावरुनही मी कुठे राहतो इतपतच ढोबळ माहिती कळू शकते. ही माहिती संकेतस्थळाच्या तांत्रिक प्रशासनापुरती माहिती असते. त्याचा फारसा गैरवापर होऊ शकत नाही.

आता या नवीन मॉडेलमध्ये इमेल आयडी, पूर्ण नाव, फोन नंबर ह्या गोष्टी प्रशासनाच्या तांत्रिक चमूसोबतच संपादकांनाही माहिती होण्याची शक्यता आहे. ही जाणीव सदस्यांना करुन देणे जरूरीचे आहे. संकेतस्थळाचे संपादक हे कायम नसतात. या संकेतस्थळाचा मी स्वतः काही महिन्यांसाठी संपादक होतो. उद्या दहा नवीन लोक संपादक असू शकतात. त्यामुळे ही फोन क्र वगैरे माहिती ज्या संपादकांकडे आज आहे त्यांनी ती काळजीपूर्वक वापरावी व संपादकपदावरुन निघून गेल्यानंतरही ती गुप्त ठेवावी हे संकेतस्थळाने कसोशीने पाळावे असे वाटते.

आता या स्वरुपाच्या विभागासाठी देण्यात येणारी कारणमीमांसा अत्यंत भोंगळ आहे असे वाटते. मुळात असा विभाग करण्याची प्रशासनाची इच्छा असेल तर कोणतेही कारण न देता तसा विभाग तयार करण्याचे अधिकार व तारतम्य त्यांच्याकडे आहेतच.

मात्र
१. सदस्यांची टवाळी होते
२. अश्लील शेरेबाजी व ताशेरे सदस्यांना अनकंफर्टेबल वाटतात
३. आम्हाला बायका बायकांना (अशी माहिती की जी चारचौघात सांगताना संकोच होतो मात्र ओळखीच्या चार बायकांसोबत मनमोकळेपणाने बोलू शकू असे खाजगी) बोलायचे असते.

या कारणांसाठी नवा विभाग सुरु करणे हे योग्य उत्तर नाही. एक तर नवीन सदस्यांची टवाळी होते किंवा अश्लील शेरेबाजीमुळे त्यांना लिहावेसे वाटत नाही यावर असे करणाऱ्या सदस्यांवर कारवाई हे एकमेव उत्तर आहे. जर बायका बायकांना काही खाजगी बोलायचे असेल तर अगदी स्वतःची ओळख जाहीर करुन अशी माहिती संकेतस्थळावर शेअर करण्यामधले धोके त्यांना माहीत असतीलच असे नाही. नवशिक्या स्त्रियांना लिहिताना ज्या अडचणी येतात त्या नवशिक्या पुरुषांनाही येणारच. मग असा स्ट्रिक्टली मॉडरेटेड विभाग स्त्री व पुरुष दोघांसाठीही करणे आवश्यक आहे.

थोडक्यात असा विभाग सुरु करायचा असल्यास तो करण्याचे स्वातंत्र्य संकेतस्थळाकडे आहेच. मात्र त्यासाठी काही अनावश्यक स्पष्टीकरणे देत बसल्यास त्या स्पष्टीकरणांमागील घोळ आमच्यासारखे सदस्य मांडू शकतात.

जेनी...'s picture

20 Apr 2013 - 7:34 pm | जेनी...

ह्म्म्म .. खरच या बाजुने विचार केला तर तुमच मत बरच पटतय .....

माफ करा पण संपर्क-माहिती इथे पाठवण्याबाबतच्या मुद्द्यावर जरा अधिकच संवेदनशीलता दाखवताय असे वाटते.

नाव, इमेल पत्ता हे सरळ सरळ जालावर लिहिल्याने नेमका काय फरक पडू शकतो? कुणी इमेलमधून त्रास दिल्यास तो इमेल आयडी ब्लॉक करता येतो. पुन्हा दुसर्‍या इमेल आयडीने त्रास देणे सुरू केल्यास सायबर सेलकडे तक्रार करता येईलच. पण कदाचित एवढेही करायची गरज नाही सरळ दुर्लक्ष केल्यास काही दिवसात तो माणूस नाद सोडेलच.

फोन क्रं. - हा मात्र ज्याचा त्याचा प्रश्न आहे. पण कितीतरी ठिकाणी आपला फोन क्रं. नोंदवावा लागतोच उदा घरपोच सेवा पुरवणारी दुकाने वगैरे. मग तो फोन क्रं. चुकीच्या व्यक्तिच्या पडण्याची शक्यता असतेच. पण कुणी त्रास दिलाच तर त्यावर करायचे कायदेशीर उपाय करता येतातच अन आपण काही सेलिब्रिटी नसतो की कुणी इतका त्रास देईल.

उदाहरण म्हणून सांगतो ऐश्वर्या राय रिलायन्सचा भ्रमणध्वनी वापरते हे सिद्ध करण्यासाठी तिच्यासाठी भरला गेलेला कुठलातरी फॉर्म स्कॅन करून ढकलपत्रात फिरत होता (२००५-०६ साली). त्यामुळे आपला फोन क्र. आपल्याला हव्या त्याच लोकांना ठाऊक असावा हे काही वास्तविकतेला धरून नाही.

आजानुकर्णांशी प्रचंड सहमत!!!

दादा कोंडके's picture

20 Apr 2013 - 8:21 pm | दादा कोंडके

प्रतिसादाशी १००% सहमत.

संयत भाषेतला धागा आवडला. पण या विषयावरती विरोधी प्रतिक्रिया येणं गरजेचं होतं. त्यामुळे मालक आणि चालक मंडळींचा शुद्ध हेतू असून देखिल या निमित्तानं यातले धोके, खाच-खळगे त्यांच्याकडून सांगितले गेले. आणि उगाच गुडबुकात जाउन बसण्यासाठी संपादक आणि भावी संपादकांनी सगळ्याच आदर्श गोग्गोड प्रतिक्रिया दिल्यात त्याचं आश्चर्य मात्र वाटलं नाही.

काही घडलेल्या घटणा आणि पराच्या खालच्या प्रतिसादातली घटणा वाचून संकेतस्थळ म्हणजे सगळ्यांसाठीच चार घटका करमणुकीसाठी असंतं असं नव्हे हे कळलं.

पैसा's picture

20 Apr 2013 - 8:50 pm | पैसा

जर बायका बायकांना काही खाजगी बोलायचे असेल तर अगदी स्वतःची ओळख जाहीर करुन अशी माहिती संकेतस्थळावर शेअर करण्यामधले धोके त्यांना माहीत असतीलच असे नाही.

लिहिणार नव्हते, पण परत एकदा लिहिते, या विषयावर या धाग्यावर आणि अन्य धाग्यावर २/३ वेळा तरी स्पष्ट लिहिलेलं आहे, की तुम्ही म्हणताय तसे नाव पत्ते जाहीर होणार नाहीत. त्या महिलांचे जे मिपावरचे आयडी आहेत, तेच त्या विभागातही वापरात राहतील. आणि नव्या स्त्री सदस्यांना तिथे प्रवेश देताना आवश्यक ती काळजी घ्या असे सांगितले जाईल याची खात्री बाळगा. हे डिटेल्स ४ महिला संपादिका वगळता कोणालाही माहिती होणार नाहीत. पत्ता डिटेल नको आहे तर गाव सांगितले तरी पुरे, म्हणजे जवळच्या भागात रहाणार्‍या संपादिकांना संपर्क करणे सोपे जाईल.

स्वतः पुरुष असताना स्त्री असल्याचे भासवल्याचा प्रकार हल्लीच मिपावर घडलेला आहे. तसे भासवत कोणी पुरुषाने सगळ्यांची फसवणूक करू नये केवळ एवढ्यासाठी संपादिकांपैकीच कोणीतरी त्या इच्छुक सदस्यांशी प्रत्यक्ष बोलतील. आणि तेवढे होताच फोन नंबर्सचीही गरज नाही. ते मिपा/गुगल सगळीकडून डिलिट केले जातील. मिपावर आज असा एकही फोन नंबर ठेवलेला नाही. उद्या समजा या संपादिकांपैकी कोणी बदललीच तर तिला हे नंबर्स घेऊन काय फायदा आहे हे मला कळत नाही. तशा विकृत आज तरी कोणी संपादिकांमधे नाहीत.

श्री गावसेना प्रमुख's picture

20 Apr 2013 - 8:41 am | श्री गावसेना प्रमुख

काही लोक कायम मिपावर येतात ते मिपाविषयी, मिपा व्यवस्थापना विषयी वाईट बोलायलाच येतात असे दिसते. कारण चांगल्या चर्चांत यांचा सहभाग नसतो. चांगले लेख यांना लिहीता येत नाही. मात्र नावे ठेवायलाच हे येतात असे दिसते. अश्या लोकांना सुधारण्यासाठी बराच वेळ दिलेला आहे. यापुढे खरडवहीत सुध्दा चुकीचे लिहीलेले आढळले तर अश्या लोकांवर कारवाई केली जाईल.

कार्यवाही झालीच पाहीजे........अश्या लोकांइनवर

आम्ही आपलं हा पेशल विभाग कधी सुरु होतोय याचीच वाट बघतोय.

काही बारीक प्रश्न : बंद विभागात पुरुष आयड्यांना लिखाण करता येणार नाही / वाचता येणार नाही हे ठीक. पण जे लोकं सदस्यत्व न घेता नुसतेच वाचतात त्यांचं काय? जर त्या बायका असतील अन त्यांना अबोलीतलं वाचायचं असेल तर ते शक्य आहे का? कसं? मग लॉगीन न होता इतर पुरुषसुद्धा वाचु शकतील की !

अबोलीचे सदस्यत्व नसेल तर नाही जमणार वाचायला.

शिल्पा ब's picture

20 Apr 2013 - 10:02 am | शिल्पा ब

म्हणजे अबोलीसाठी वेगळ्याने सदस्यत्व घ्यायचं? का फक्त संपादिकांना सांगायचं?

पैसा's picture

20 Apr 2013 - 10:08 am | पैसा

तुला अबोलीचे सदस्यत्व पाहिजे ना? धाग्यात लिहिल्याप्रमाणे तुझे डिटेल्स कोणत्यातरी महिला संपादिकेला/सल्लागार चित्रा यांना कोणत्याही माध्यमातून कळव. इथे व्यनि कर, फेसबुकवरून, नायतर इमेल कर.

यशोधरा's picture

20 Apr 2013 - 10:22 am | यशोधरा

धागा वाच की गं शिपातै नीट.

यशोधरा's picture

20 Apr 2013 - 10:23 am | यशोधरा

शिल्पा*

किणकिनाट's picture

20 Apr 2013 - 10:50 am | किणकिनाट

माफ करा, पण एक श॑का मनात आलि. ती विचारतोच.

जे नवरा बायको / स्त्री पुरुश एकच आयडी घेउन जॉइ॑ट लॉगइन करुन मिपा वर वावरतात, त्ञाचेबाबत अबोली विभागात कशी खबरदारी घेतलि जानार आहे हो?

किणकिणाट

किणकिनाट's picture

20 Apr 2013 - 10:56 am | किणकिनाट

अर्थात आपण म्हणजे मी तरी माफक चेष्टा एंजॉय करतो,

एका प्रतिसादातील वरिल वाक्यामुळे श॑का बळ्कट झाली. अर्ठात मोक्याच्या वेळि किबोर्ड एरर हि होउ शकते हे मान्य आहेच.

तसे असेल तर बिनशर्त माफि. पण तरी श॑का उरतेच.

किणकिनाट

पिलीयन रायडर's picture

20 Apr 2013 - 11:16 am | पिलीयन रायडर

मला तरी "अबोली" अभेद्य आहे.. इथे पुरुष कधीच घुसु शकणार नाही..इथल्या गोष्टि अत्यंत गोपनिय असतील असे काही भ्रम नाहीत. कारण शेवटी हे आंतरजाल आहे.. प्रशासन त्यांच्या कडुन पुर्ण पणे प्रय्त्न करत आहे. पण त्यालाही मर्यादा आहेतच. नीलकांत म्हणत असल्या प्रमाणे विकृतीला काय करणार? त्यामुळे शेवटी "विश्वास" हा एक फॅक्टर उरतोच. आपण मि.पा वर आणि मि.पा ने आप्ल्यावर...!!

स्पंदना's picture

21 Apr 2013 - 4:55 am | स्पंदना

आपण करतो, मी करते. किबोर्ड एरर नाही की काही नाही, आपणला पुरुषार्थी क्रियापद लागते कायम. मी जाउन येते, आपण जाउन येउ. मी बोलते, आपण बोलतो.
आता उगा संशय घेउन दाखवुन बाजी मारायची असेल तर माझ काही म्हणन नाही. चालु द्या. काय करणार संपाद्क आहोत ना? संपादकाचा अर्थ तुम्हाला वेडवाकड बोलण्याचा एक पुर्ण अधिकार असणे असाच घेउन चालायचा पायंडा पाडलाय तुम्हा लोकांनी.

पिलीयन रायडर's picture

20 Apr 2013 - 11:10 am | पिलीयन रायडर

मला एक गोष्ट नीटशी कळत नाहीये..की इथे देण्यात येणार्‍या माहितीचा गैरवापर होऊ शकतो असा एक समज पसरवण्यात येत आहे.
१. तुमचा इमेल आयडी तुम्ही तसाही व्यवस्थापनाला देताच. त्याचा आजवर कधी गैर्वापर झालेला नाहीये मग आता का होईल?
२. अबोली वर चर्चा करताना "मी परवाच १० तोळ्याचा हार केला" किंवा "आम्च्या ह्यांना अमुक अमुक लाख पगार आहे" असं कुणी म्हणेल आणि लगेच तरी मिपा वरुन ही बातमी फुटुन दरोडा पडेल असं तर नाहीये ना? इथे काय आणि किती शेअर करायचं हे आंतर्जालावर येऊन बोलु शकणार्‍या व्यक्तीला कळायला हवच. जर कळत नसेल तर ती व्यक्ती इथेच काय कुठेच सुरक्षित नाही.
३. तुमचे खरे नाव कळल्यानी (म्हणजे असं धरुन चालु की तुम्ही दिलेली माहिती प्रशासनातुन बाहेर फुटली..) काय फरक पडेल? लोक तुम्हाला चे.पु वर शोधतील..तुमचा फोटो पाहतील.. महिती पाहतील (हे सगळं तुम्ही तिथेही फक्त मित्रांपुरतं सीमीत ठेवु शकता..) तुमचं आडनाव कळुन तुमच्या बद्दल मत बनव्तील.. हे सगळं तुम्ही फाट्यावर मारुच शकता.. फार तर सुंदर ललनेच्या मागे एखादा टुकार कार्टा लागेल.. (जो आंतर्जाला वरच लागु शकतो असे नाही.. कुठेही लागु शकतो..)... तुम्ही त्यालाही ब्लॉक करु शकताच..अति झालं तर सायबर सेल असते मदतीला..
थोडक्यात काय तर तुमची माहिती फुटली तरी फार तर तुमचं नाव कळेल, फोन नंबर कळेल, इमेल आयडी कळेल.. अनेक लोक इथे खरे नाव घेऊन वावरतात. मैत्री असेल तर फोन नंबर पण सर्रास देतात.. त्यांना नाही कधी त्रास झाला माझ्या मते. मला तरी ज्या व्यक्तींना मी माझी माहिती देत आहे त्यांवर विश्वास आहे.आणि ती फुटली तरी मला वाटत नाही की जग्बुडी येणारे..
आणि या उप्पर असुर्क्षित वाटत असेल तर सदस्यत्व न घेताही वाचमात्र राहु शकताच...

माझ्य अल्प्मतीला अजुन काही धोके अस्तील जे दिसत नसतील तर उदार मानाने ते इथेच सांगावेत...

यशोधरा's picture

20 Apr 2013 - 11:21 am | यशोधरा

असुर्क्षित वाटत असेल तर सदस्यत्व न घेताही वाचमात्र राहु शकताच... >> त्याहून बेष्ट म्हणजे येऊच नका. कसं?

पिलीयन रायडर's picture

20 Apr 2013 - 11:26 am | पिलीयन रायडर

हेच लिहीलं होतं आधी पण म्हणलं नीलकांतचा आदर्श घ्यावा...!!

अभ्या..'s picture

20 Apr 2013 - 11:57 am | अभ्या..

सॉरी नो जमेश. :(
मनात आणि लिहिण्यात एकवाक्यता आली की जमेल. ;)

पिलीयन रायडर's picture

20 Apr 2013 - 12:39 pm | पिलीयन रायडर

इतक्यात कुठलंहो जमायला!
मला जमेलस वाटतही नाही.. कारण नेहमी इतक्या शांतपणे लिहीणे अवघड आहे...

मनात आणि लिहिण्यात एकवाक्यता आली की जमेल.

एकवाक्यता आहे.. फक्त भाषेला जरा टोन डाऊन केलय....

यशोधरा's picture

20 Apr 2013 - 12:50 pm | यशोधरा

:)

प्रभाकर पेठकर's picture

20 Apr 2013 - 4:11 pm | प्रभाकर पेठकर

'अबोली' हे नांव तितकेसे रुचले नाही. त्यापेक्षा 'मुक्ता' अधिक योग्य वाटते. परंतू असो. मिपाचा अंतिम निर्णय मान्य आहेच.

फक्त स्त्रीयांचा नविन विभाग सुरू केल्या बद्दल निलकांताचे अभिनंदन. समस्त महिला सदस्यांना अनेकानेक शुभेच्छा..!

ह्याच बरोबर मुख्य फलकावरही, मधुनमधुन, थोडी शिस्तभंग कारवाई करत जावी आणि संस्थळाच्या मोकळ्या स्वभावाचा गैरफायदा घेणार्‍या अस्सल आणि बुरखाधारी सदस्यांना समज द्यावी, मनाई हुकुम बजावावा, प्रसंगी हकालपट्टी करावी जेणेकरून निखळ आनंद उपभोगण्यासाठी इथे येणार्‍या, 'वादे वादे जायते तत्वबोधः' ह्यावर विश्वास ठेवणार्‍या सदस्यांनाही इथे पुन्हा पुन्हा यावेसे, व्यक्त व्हावेसे वाटेल आणि आपल्या ओळखितल्या इतर अनेकांना मिसळपाव सदस्यत्व घेण्यासाठी उद्युक्त करावेसे वाटेल.

शेवटच्या परिच्छेदाबद्दल पेठकर काका तुम्हांला पूर्ण अनुमोदन.

कवितानागेश's picture

20 Apr 2013 - 4:23 pm | कवितानागेश

थोडक्यात पण अतिशय महत्त्वाचे निवेदन.
धन्यवाद नीलकांत. :)

बंडा मामा's picture

20 Apr 2013 - 4:51 pm | बंडा मामा

मिपाचे सर्वेसर्वा नीलकांत ह्यांची ताकिद आलेली पाहून आनंद झाला. तरीही थोडा उशीरच झाला असे वाटते. स्त्रीसुलभ गोष्टींसाठी महिलांना विभाग काढून देणे ह्यात पुरुषांच्या पोटात दुखण्यासारके काहीच नव्हते. इतर वेळेला 'काय हे बायकी विषय', 'मामी गृहशोभिकेत शोभेल हे लिखाण' असले टोमणे हेच पुरुष लोक मारायचे. अशा वेळेस महिलांना वेगळा कप्पा उघडुन देणे ह्यात काय अयोग्य आहे? माझ्या आठवणी प्रमाणे रजोनिवृत्ती वगैरे अत्यंत स्त्रीसुलभ गोष्टींवर मूख्य बोर्डावर कशी चर्चा करणार? असा सवालही कुणीतरी अखेर केला होता तरीही ह्या विभागाचे सदस्यत्व द्या असा पुरुषांनी घोषा लावणे म्हणजे विकृतीच नाही का? नाना चेंगट ह्यांनी काढलेला धागा हा तर निव्वळ व्यवस्थापनावर राळ उडवण्यासाठी होता पण तरीही तो टिकला आणि बरेच सिनियर सदस्य त्यावर हिरिरिने बोलताना पाहुन ह्या विषयावर मौन पाळणेच योग्य वाटले होते. आता खुद्द नीलकांत ह्यांनीच हे निवेदन दिल्याने मत मांडत आहे.

विश्वनाथ मेहेंदळे's picture

20 Apr 2013 - 5:20 pm | विश्वनाथ मेहेंदळे

लेखातील भावनेशी १००% सहमत आहे. पण एका मुद्द्यावर थोडे स्पष्टीकरण देऊ इच्छितो. वरील लेखात "हॅक करण्याची आव्हाने" असा दोनदा उल्लेख आला आहे. तो माझ्या ह्या प्रतिसादाला उद्देशून असेल अशी शंका आली. तसे नसेल तर खालील प्रतिसाद रद्दबातल ठरवावा.

"मी हॅकिन्ग बद्दल बोलत नाही आहे" असे तिथे दोनदा लिहून सुद्धा परत तोच मुद्दा इथे का यावा ते कळले नाही. मला व्यक्तिश: अबोलीत काय गोंधळ घातला जातो यात काडीचा इंटरेस्ट नाही. पण त्या धाग्यावर शुचीमामींनी एक रास्त मुद्दा मांडला. लीमाऊ यांनी तिथे प्रतिवाद केला. त्यांचा मुद्दा खोडायला मी एक शक्यता मांडली. जे आव्हान दिले ते प्रत्यक्ष हॅक करण्याचे किंवा साधा एक्सेस मिळवण्याचे पण नव्हते तर ते एखाद्याला करायचे असेल तर कसे करता येईल हे "ऑन पेपर" सिद्ध करण्याचे होते. (एथिकल हॅकिन्ग नावाची एक शाखा अस्तित्वात आहे हे सर्वांना माहित असलेले बरे. मला ते इथे करण्यात व्यक्तिश: रस नाही हे परत एकदा सांगू इच्छितो)

मुळात मला उत्तर द्यायचे कारणच काय असे कुणी विचारेल. तर उत्तर मी एका वाक्यात तिथे दिले होते. ते परत लिहितो. "False sense of security is very dangerous". आता तपशीलवार लिहितो. सर्कशीत झुल्यावर कसरती करणारे या भरवश्यावर असतात की खाली जाळी आहे. पडतो तरी धोका नाही. आता समजा एखादा कसरतकार खाली पडला आणि जाळी जवळ आल्यावर त्याच्या लक्षात आले की जाळीला आपण जिथे पडणार तिथे एक छानसे भोक आहे. काय होईल?? हेच छिद्र त्याला वरून दिसले असते तर त्याने कसरत केलीच नसती किंवा सांभाळून केली असती. अबोली सांभाळणाऱ्या व्यक्तीकडून जेव्हा "कशावरुन स्त्री विभागातील गोष्टी बाहेर फुटतील? " असा प्रश्न विचारला जातो तेव्हा चुकीचा संदेश जातो असे मला वाटले. म्हणून तो प्रतिसाद लिहिला.

या बाबीवर परत परत स्पष्टीकरण देण्याची इच्छा नाही. पंगा यांच्या स्वाक्षरीत म्हटल्याप्रमाणे "मी काय बोलतो याची जबाबदारी मी घेऊ शकतो, तुम्ही काय समजत याची घेऊ शकत नाही"

विश्वनाथ मेहेंदळ्यांच्या संपूर्ण प्रतिसादाशी सहमत !

परिकथेतील राजकुमार's picture

20 Apr 2013 - 5:50 pm | परिकथेतील राजकुमार

खरेतर ह्या विषयावरती एक अक्षर देखील न लिहिण्याचे ठरवले होते, पण आता राहावत नाही म्हणून लिहितो आहे. हा किस्सा वाचावा आणि स्वतःचे काय ते मत ठरवावे. उद्या ह्या विषयावर मी पुन्हा कुठलीही चर्चा करणार नाही हे आताच सांगतोय.

तर किस्सा असा :-
असेच दालन असलेल्या एका संस्थळावरती (हे संस्थळ मराठी नाही) साधारण दिड वर्षापूर्वी, पुरुष सदस्यांच्यात 'स्वत:ला फार शहाणी समजणारी' म्हणून प्रसिद्ध असलेल्या एका महिलेने आपला एक अनुभव लिहिला आणि पुन्हा काही जाणीव झाल्याने संपादकांना सांगून उडवला. अर्थात संपादक देखील महिलाच. आता हा अनुभव फार विचित्र होता. ह्या महिलेची त्याच संस्थळावरती कोणा पुरुष सदस्याशी ओळख झाली. त्याने सहकुटूंब भारतात आल्यावरती तिला भेटण्याची इच्छा व्यक्त केली. सदर स्त्री आणि तो एका हॉटेलात भेटले. मात्र तो त्या हॉटेलात रुम घेऊन राहात होता आणि त्याचे इरादे काही वेगळे आहेत हे कळल्यावरती त्या स्त्रीने ताबडतोब त्या हॉटेलातून काढता पाय घेतला. त्याने सांगीतल्याप्रमाणे त्याची बायको वैग्रे कोणीच त्याच्या सोबत नव्ह्ते. तेंव्हा इतरांनी सावध रहावे म्हणून तिने तो किस्सा शेअर केला होता. अर्थात तिने तो उडवायला देखील लावला. मात्र हा किस्सा एका संपादीकेने आपल्या नवर्‍याला सांगीतलाच. सदर नवरोबा हा किस्सा एका दारुच्या पार्टीत बोलून गेले. काही दिवसांनी त्या स्त्री बरोबर संस्कृतीच्या कुठल्यातरी विषयावरती वाद झाल्यावर 'त्या' दारू पार्टीत हजर असलेल्या एका सदस्याने सरळ सरळ तिला उद्देश्यून 'नुसती आंतरजालावरती ओळख असलेल्या पुरुषाला एकांतात हॉटॅल रुमवरती भेटायला जाणार्‍यांनी आता आम्हाला संस्कार शिकवू नयेत' असे खाडकन लिहून टाकले. त्यावरुन व्हायचा तो राडा झालाच, सदर सदस्य तर अगदी मी हॉटेलचे नाव सुद्धा सांगतो इ. मुद्दे मांडायला लागले. बहूदा त्या दिवसानंतर त्या स्त्री ने आंतरजाल सोडले ते कायमचेच. इतर आंतरजालीय परिचीतांशी, तय संस्थळावर वावरणार्‍या तिच्या ओळखीच्या, ऑफिसातल्या लोकांशी अथवा नातेवाईकांशी तिचे संबध पुढे कसे राहीले असतील ह्या विषयी न बोललेलेच बरे.

हा अनुभव नेहमीच येतो, किंवा सर्वच स्त्रीयांच्या बाबतीत असे घडते असे देखील नाही. पण असे देखील कधी कधी घडू शकते ह्याची जाणीव सर्व बहिणींना असावी येवढीच इच्छा. सदर संस्थळावरती संपादीका पत्नी आणि सदस्य नवरा अशी जोडी होती पण इतरही अनेक जोड्यांच्या गॉसीपमुळे असे घडू शकते हे देखील ध्यानात ठेवावे.

जेनी...'s picture

20 Apr 2013 - 7:40 pm | जेनी...

बाप्रे !!! :( :( :(

पिंपातला उंदीर's picture

20 Apr 2013 - 7:53 pm | पिंपातला उंदीर

भयानक

बॅटमॅन's picture

20 Apr 2013 - 8:19 pm | बॅटमॅन

आईचा घो!!!!!!!! :(

कवितानागेश's picture

20 Apr 2013 - 11:58 pm | कवितानागेश

वाईट घटना आहे. :(

प्रभाकर पेठकर's picture

21 Apr 2013 - 3:09 am | प्रभाकर पेठकर

हम्म्म्म..! भयानक आहे सर्व. मुद्दा नक्कीच विचारकरण्यायोग्य आहे.

स्पंदना's picture

21 Apr 2013 - 5:06 am | स्पंदना

माझ म्हणन- अश्या घडलेल्या गोष्टी सांगुन त्या स्त्री ने असही घडु शकत हे बाकिच्यांना सांगायचा प्रयत्न केला. तीची विश्वास ठेवण्यात चुक झाली पण हे करायला पाहणारा खरा गुन्हेगार अन या गोष्टीचा वापर करुन तीचा अपमान करणारा दुसरा गुन्हेगार.
आपल्याकडे व्हिक्टीमला खाली दाखवण्यात धन्यता मानली जाते. हे बदलले पाहिजे. अन ते बदलण्यासाठी समाजाची मानसीकता बदलली पाहिजे, निदान व्हिक्टीमची मानसीकता बदलली पाहिजे. पाश्च्यात्त देशात व्हिक्टीमला सपोर्ट केला जातो, व्हाइल इथे व्हिक्टीमला लज्जीत केले जाते.
अगदी पराने सुद्धा मोठ्या सहानुभुतीचा आव आणत त्या बाईला अस झाल तुम्हाला पण अस होइल अशी भिती घातली आहे, जेंव्हाकी पराने असा विश्वास ठेउन पुढे जाउन वैयक्तीक संबंध वाढवु नका असा संदेश त्या बाईने दिला होता तो इथे उद्धृत करायचा होता. पण पडली मानसिकता शेवटी.
दुसरी गोष्ट इथे वर कुणीस परत संपादक अन होउ घालणारे संपादक री ओढताहेत अस लिहिलं आहे जे पुर्णतः चुकीचे आहे.

परिकथेतील राजकुमार's picture

21 Apr 2013 - 9:43 am | परिकथेतील राजकुमार

तीची विश्वास ठेवण्यात चुक झाली पण हे करायला पाहणारा खरा गुन्हेगार अन या गोष्टीचा वापर करुन तीचा अपमान करणारा दुसरा गुन्हेगार.

आमच्या दृष्टीने 'स्त्रीयांना मोकळे होण्यासाठी' म्हणून उघडलेल्या त्या दालनाची संपादीका खरी गुन्हेगार. कारण पुरुषांसमोर चर्चा करता येत नाही, किंवा टिंगल होईल अशा भितीने जो विभाग उघडला गेला, त्या विभागतल्याच गोष्टी पुरुषांकडे पोचल्यावरती अजून काय होणार ? आणि जुने स्कोर सेटल करणे ही काय फक्त मराठी संस्थळांचीच मक्तेदारी नाही. ;)

अगदी पराने सुद्धा मोठ्या सहानुभुतीचा आव आणत त्या बाईला अस झाल तुम्हाला पण अस होइल अशी भिती घातली आहे,

मी भिती वैग्रे काहीही घातलेली नसून स्पष्ट शब्दात मला माहिती असलेले अनुभव इथे सांगीतलेला आहे. त्यातून प्रत्येकानी योग्य ते आचरण अमलात आणावे.
मी माझ्या प्रतिसादात काय लिहिले आहे ते निट वाचा. :-

हा अनुभव नेहमीच येतो, किंवा सर्वच स्त्रीयांच्या बाबतीत असे घडते असे देखील नाही. पण असे देखील कधी कधी घड शकते ह्याची जाणीव सर्व बहिणींना असावी येवढीच इच्छा. सदर संस्थळावरती संपादीका पत्नी आणि सदस्य नवरा अशी जोडी होती पण इतरही अनेक जोड्यांच्या गॉसीपमुळे असे घडू शकते हे देखील ध्यानात ठेवावे.

आणि मला सहानुभुती वैग्रे काहीही नाही. जे इथल्या भगिनींनी माहिती असावे असे वाटले ते इथे लिहिले. हा जो अनुभव मी शेअर केला आहे, तो तुम्हा स्त्रियांना गैर वाटत असेल किंवा उगाच भिती वैग्रे घालणारा वाटत असेल तर तो उडवून लावला तरी माझी हरकत नाही. शेवटी आम्ही फक्त सावध करु शकतो. तेही नाही जमले, तर 'मरु दे ना.. कुठे आपल्या सख्या आया बहिणी आहेत' असा विचार करून गप्प बसू.

कवितानागेश's picture

21 Apr 2013 - 12:58 pm | कवितानागेश

स्त्रीयांना मोकळे होण्यासाठी याचा अर्थ कुणी काढेल असं वाटले नव्हतं.
'इथे येउन आपली सगली सीक्रेट्स सान्गा हो!' असा बोर्ड इथे कुणीही टान्गलेला नाही.
उलट,
७. विभागातले विषय वा पोस्टी ह्याबद्दल विभागाबाहेर न बोलणे हे पथ्य प्रत्येकीने पाळावे.
ही सूचना आधीच दिलेली आहे.
आधीचा धागा कुणीही नीट न वाचता आपल्या मनचे वाट्टेल ते अर्थ काढणे अजूनही सुरु आहे असं दिसतय. स्त्रियांना "मोकळेपणा"नी बोलण्यासारख्या सतराशे साठ गोष्टी असतात. पुन्हा तेच सान्गतेय,
अगदी घरगुती वस्तू असोत, खास कलागुण असोत, प्रकृतीच्या तक्रारी असोत, स्वैपाकातल्या साध्या साध्या गोष्टी असोत, किंवा इतर कुठल्या व्यावहारीक गोष्टींबद्दलची माहिती असो, यासाठी स्त्रियांना एक व्यासपीठ हवे आहे. ज्या स्त्रियांना राजकीय, आर्थिक किंवा अन्य चर्चांमधे रस नसतो पण इतर स्त्री सदस्यांशी इंटरअ‍ॅक्शन आवडेल, त्या मोकळेपणाने अशा दालनात वावरू शकतील. अश्या वेगळ्या दालनामुळे आपल्या नेहमीच्या माहितीतल्या ४ जणींऐवजी अजून १०० जणींचे मत जाणून घेता येइल. फक्त स्त्रियांना रस वाटेल अश्या अनेक गोष्टी आहेत ज्या मुख्य पानावर सर्वांना अपील होणार नाहीत. उदाहरणार्थ; मध्ये आलेला एक 'फ्रॉक'चा धागा. त्यावरची शिवणाची चर्चा होउच शकली नाही. त्यावरच्या थट्टा-मस्करीला विरोध नाही, पण तरीही त्यात काहीजणींचा उत्साह मावळतो आणि इतर काहीजणींची काही छोट्या गोष्टी शिकण्याची संधीही जाते. "अबोली" हे दालन अश्या सर्व गोष्टींना व्यक्त होण्यासाठी स्थापन करण्यात येत आहे.

परिकथेतील राजकुमार's picture

21 Apr 2013 - 1:10 pm | परिकथेतील राजकुमार

निट न वाचता प्रतिक्रिया का देत आहेत सगळे ?

ज्या संस्थळावरती हा किस्सा घडला, त्या संस्थळावरती असे दालन हे 'स्त्रीयांना मोकळे होण्यासाठी' म्हणून काढलेले होते असे मी सांगत आहे.

कवितानागेश's picture

21 Apr 2013 - 1:18 pm | कवितानागेश

पश्चिम युरोप आणि उत्तर रशिया यान्च्या बॉर्डरवर असलेल्या फॉकल्यान्ड्मध्ये १० वर्षांपूर्वी एक माणूस हाटीलात चहा प्यायला गेला. तो तिथेच टेबलावर त्याचे एटीएम कार्ड विसरून गेला. त्या कारडाच्या कव्हरवर त्यानी त्याचा पिन नम्बर लिहून ठेवला होता. ते कार्ड हाटेलाच्या म्यानेजराला मिळाले आणि त्याने सर्वच्या सर्व अकाउन्ट लुटले. तेंव्हापासून मी आणि माझ्या नात्यातल्या सगळ्यांनी एटीएम कार्ड वापरणे बन्द केले.

परिकथेतील राजकुमार's picture

21 Apr 2013 - 1:22 pm | परिकथेतील राजकुमार

आपण १० वर्षापूर्वी ए टी एम कार्ड वापरायचो ह्याची जाहिरात करण्याचा क्षीण प्रयत्न.

निषेध !

मस्त प्रतिसाद आणि चपखल उदाहरण बेहद्द आवडले.

मलाही मूळ प्रतिसादातल्या किस्स्याचे प्रयोजन समजले नाही. सदर स्थळावर स्त्रीयांसाठी दालन होते इतका संदर्भ सोडल्यास तो किस्सा इथल्या चर्चेशी काहीच सुसंगत नाही. सदर महिलेने टाकलेला धागा महिला दालनात टाकला होता की मूख्य बोर्डावर ह्याचाही खुलासा नाही. दुसरे म्हणजे असे खरेच घडले असेल तर त्या महिलेला धागा काढून टाकणे, आणि त्यानंतर आंतरजालावरुन निवृत्ती घेणे हे पटणारे नाही. त्यापेक्षा त्या दारू पार्टीतील ऐकिव माहितीवर आरोप करणार्‍या धटिंगणाला शाब्दिक चोप द्यायला हवा होता. मिपावरील अ‍ॅक्टिव महिलांपैकी कुणाशी असा प्रसंग झाला असता तर त्यांनी भर बोर्डावर त्या इसमला फोडून काढला असता आणि अनेक सदस्यांनीही पाठींबा दिला असता. तितके सुज्ञ् सदस्य इथे नक्कीच आहेत.

पर्‍या तु म्हण्ला हूतास ना .. कि यावर चर्चा करणार नै म्हणुन ???? :(

किणकिनाट's picture

22 Apr 2013 - 11:03 am | किणकिनाट

जे नवरा बायको / स्त्री पुरुश एकच आयडी घेउन जॉइ॑ट लॉगइन करुन मिपा वर वावरतात, त्ञाचेबाबत अबोली विभागात कशी खबरदारी घेतलि जानार आहे हो?

माझ्या एका प्रतिसादाला झापून झालेच आहे स॑पादिका बैन्चे. पण एक रास्त श॑का दुर्लक्शित केली गेली आहे. आयडी शेअर करणे फार कॉमन आहे. तेथे कशी खबरदारी घेतलि जानार आहे ? एवढेच प्रामाणिकपणे विचारले होते. ऊत्तराची सक्ति नाहिच, पण दिल्यास चा॑गले वाटेल.

किणकिनाट

पैसा's picture

22 Apr 2013 - 11:10 am | पैसा

आज ना उद्या पकडले जातातच. तेव्हा आयडी शेअर करणार्‍या दोघांचीही नाचक्की होईल हे सरळ आहे. वाईट हेतूने कोणीतरी यायचा प्रयत्न करणार हे गृहीत धरून फोनवरून ओळख पटवायची कल्पना आहे. आपला आयडी दुसर्‍याला वापरू देणार्‍या महिलेला सुद्धा पकडले जाऊन शिक्षा कधीतरी होणारच.

विश्वनाथ मेहेंदळे's picture

22 Apr 2013 - 11:34 am | विश्वनाथ मेहेंदळे

पैसा ताई, कसे पकडणार हो? समजा माझा आयडी वापरून माझा मित्र लॉगीन करत असेल तर तुम्हाला कळण्याची काही सोय आहे का? फार फार तर दोन IP दिसतील तुम्हाला पण त्यावरून दोन व्यक्ती आहेत हे कसे सिद्ध करणार?

प्रश्न उरला नाचक्की चा. आजवर कुणाची झाली आहे नाचक्की? डु आयडी कळला कि तुम्ही त्याला उडवून टाकता, विषय संपतो. नाचक्की झाली तरी ती चावडीवर होत असेल. त्यामुळे या विधानाला फार काही अर्थ नाही.

असे दावे करणे हे सद्य स्थितीत counter effective आहे. त्यापेक्षा असे होऊ शकते हे मान्य आहे. आणि हे गृहीत धरूनच अबोलींनी वावरायचे आहे असे सांगणे जास्त बरे.

पैसा's picture

22 Apr 2013 - 1:00 pm | पैसा

हल्लीच प्रसाद आणि अनुराधा या पतीपत्नींच्या प्रतिसादावरून ही गोष्ट अन्य सदस्यांच्या लक्षात आली होती आणि चुकून लॉगिन केले ते राहिले असे त्यांनी सांगितले. त्रासदायक काही नसल्यामुळे कोणी एवढे गंभीरपणे घेतले नाही. पण अशा संशयास्पद सदस्यांना "अबोली"मधे प्रवेश दिला जाणार नाही.

दुसर्‍याचा आयडी वापरणे हा गुन्हाच आहे. आमच्या बॅंकेत काही जणांवर त्यासाठी क्रिमिनल केसेस झालेल्या आहेत. आणि गुन्हेगार कितीही हुशार असला तरी कधीतरी पकडला जातोच.

त्यापेक्षा असे होऊ शकते हे मान्य आहे. आणि हे गृहीत धरूनच अबोलींनी वावरायचे आहे असे सांगणे जास्त बरे.

हे बरोबरच आहे. आणि आतापर्यंत आम्ही ज्यांच्याशी बोललो आहोत त्यांना याची कल्पना आहे.

किणकिनाट's picture

22 Apr 2013 - 1:30 pm | किणकिनाट

पैसाताई, प्रणाम,

सन्तुलीत, विचारपूर्वक, जेन्युईन आणि हो, पदग॑ड नसल्याचे जाणवणारा आपला प्रतिसाद आवडला.

किणकिनाट

श्रावण मोडक's picture

22 Apr 2013 - 1:27 pm | श्रावण मोडक

असे दावे करणे हे सद्य स्थितीत counter effective आहे. त्यापेक्षा असे होऊ शकते हे मान्य आहे. आणि हे गृहीत धरूनच अबोलींनी वावरायचे आहे असे सांगणे जास्त बरे.

अजानुकर्णाने हेच सांगितले होते. अतिरिक्त किंवा अवांतर (नेमका शब्द त्यांच्या प्रतिसादातच सापडेल) स्पष्टीकरणे दिलीत तर त्याविषयी प्रश्न येणारच, असे त्यांनी म्हटले आहे. तो इशारा पुरेसा ठरला नाही आणि आता तुम्हाला तेच सांगावे लागले.
तंत्रज्ञान असल्याने प्रश्नांना, रादर आधी मुद्द्यांना, सीमा नसते.
पण तारतम्य हा गुण थोडा दुर्मीळच असतो.
त्यात लोकशाही आहे. अभिव्यक्ती वगैरेचे स्वातंत्र्य आहे. त्यामुळं 'बालीश बहु 'बडबडणे'' चालू राहते. नीलकांत काही लिहितोय म्हटल्यावर संपादक मंडळातील व्यक्तींनी सदस्यत्वाच्या आयडीद्वारे संपादकाच्या भूमिकेतून काही लिहिण्याची गरज नाही, नव्हती. पण नाही. तांत्रीक प्रश्नांवर त्यांना बहुदा नीलकांतापेक्षा अधिक ज्ञान असावे. मग विषयाचा चोथा झाला किंवा होतोय म्हणून ओरडण्यात हशील नसतो. पण पुन्हा तारतम्यापाशी येऊन गाडी थांबते. असो.

प्रीत-मोहर's picture

22 Apr 2013 - 1:32 pm | प्रीत-मोहर

श्रामोंशी सहमत.

बिपिन कार्यकर्ते's picture

22 Apr 2013 - 2:51 pm | बिपिन कार्यकर्ते

:)

त्यामुळं 'बालीश बहु 'बडबडणे'' चालू राहते. नीलकांत काही लिहितोय म्हटल्यावर संपादक मंडळातील व्यक्तींनी सदस्यत्वाच्या आयडीद्वारे संपादकाच्या भूमिकेतून काही लिहिण्याची गरज नाही, नव्हती. पण नाही. तांत्रीक प्रश्नांवर त्यांना बहुदा नीलकांतापेक्षा अधिक ज्ञान असावे. मग विषयाचा चोथा झाला किंवा होतोय म्हणून ओरडण्यात हशील नसतो. पण पुन्हा तारतम्यापाशी येऊन गाडी थांबते. असो. >>>>

हा हा हा हा !!!
सहमत होण्याशिवाय पर्यायच नाही.

पैसा's picture

22 Apr 2013 - 5:12 pm | पैसा

मला काही तांत्रिक ज्ञान आहे असा दावा मी कुठेही केला नाही. किंवा इतर तुम्ही म्हणताय तसे सुरक्षितता इ इ मुद्द्यांवर दावे मी तरी केलेले नाहीत. मला काय माहिती आहे आणि काय नाही याबद्दल माझे कोणतेही गैरसमज नाहीत. पण आतापर्यंत एकाचे झाले की दुसरे अशा प्रकाराने जे मुद्दे (आधीच्या चर्चा न वाचता) उभे केले जात आहेत त्याचा आता वीट आला आहे. नीलकांतने घेतलेल्या कोणत्याही निर्णयाला पाठिंबा देणे हे एक संपादक म्हणून मी माझे कर्तव्य समजते. एक नक्की, या विभागावरील चर्चेच्या निमित्ताने अनेकांनी आपाआपले खाजगी हिशेब चुकते करून घेतले हे पाहून मौज वाटली. मला तारतम्य नाही हे इतके स्पष्ट सांगितल्याबद्दल धन्यवाद.

कवितानागेश's picture

21 Apr 2013 - 1:08 pm | कवितानागेश

मुळात अश्या वेगळ्या दालनाची मागणी स्त्री-सदस्याकडून झाली आहे. आणि पुष्कळ स्त्रियांनी त्यात उत्साह दाखवला आहे. त्याचे कारण म्हणजे, कुठल्याही स्त्रीची दुसर्‍या कुठल्यीही स्त्रीबरोबर एक प्रकारची हार्मनी असते, पण ती अनुभवून कळते. ती अशी शब्दात सांगता येणार नाही. ( कदाचित तशीच पुरुषांचीही असे, मला कल्पना नाही)
पण येणारी सदस्या स्त्रीच आहे याची खात्री करुन घेण्यासाठी स्वतः बोलणे गरजेचे आहे. त्यात फक्त फोनसाठी सोयीचे जावे यासाठी राहण्याचे गाव विचारले आहे. बाकी रंग, वय, उन्ची, वजन, शिक्षण, पगार, बॅन्क अकाउन्ट आणि मॅरिटल स्टेटस या गोष्टी विचारलेल्या नाहीत. माहित करुन घेण्यात इथे कुणालाही रसही नाही.