स्पर्श

भावना कल्लोळ's picture
भावना कल्लोळ in जनातलं, मनातलं
18 Apr 2013 - 4:45 pm

एक असह्य वेदना आणि मग एक विचित्र मोकळेपणाचा आभास …. डोळ्यावर आलेली ती तंद्री, तरी पण त्या मध्ये घड्याळाकडे पाहण्याची तळमळ. वेळ पहिली आणि डोळे आपोआप मिटले. आजूबाजूला होणारी लगबग, आवाज, वेदनाच्या किंकाळ्या सर्व काही एकू येत होत, जाणवत होत. पण शरीर खूप थकल होत. मग मला उचलून स्ट्रेचर वर ठेवण्यात आल. वार्ड बोय आणि मावशाची धावपळ उमगत होती. पण डोळे बंदच होते, जणू कल्पोकल्पाचा भार वाहून आज मी मोकळी झाली होते त्यातून. सिस्टर कसले तरी गाठोळे माझ्या मांडी वर देऊन मला बाहेर नेण्याची सूचना करत होत्या मावशींना . दरवाजा उघडण्याचा किरकिर आवाज ऐकला आणि बाहेर येताच आईचा हाताचा स्पर्श जाणवला कपाळावर. आईला पाहण्याची इच्छा असून सुद्धा डोळे उघडत नव्हते. काही वेगळीच जाणीव होती ती. घश्याला कोरड पडली होती, ओटीत प्रचंड वेदना होत होत्या. छाती भरून आल्यासारखी वाटत होती. आई सोबत होती तरी पण एक एकटेपणाची जाणीव न जाणो का होत होति. लिफ्ट ने जनरल वार्ड मध्ये पोहचलो. मांडीवरचे गाठोळे हलत असल्याचा भास होत होता. काय संवेदना, भावना काही समजण्याचा पलीकडे होते मी. जसे एखादा ग्रह उगाच आसमंतात फिरत राहतो तसा, त्याचा त्यालाच मार्ग सापडत नाही असे काहीसे. मग आईने ते गाठोळे उचलले. मला बेड वर ठेवण्यात आले. अजूनही हि मी माझ्यात नव्हते . आईने ते गाठोळे माझ्या बाजूला ठेवले हळूच. काय आहे ते हे पाहण्याची पण ताकत नव्हती. हळू हळू सगळे काही शांत होऊ लागले आणि एक निरव शांतता. कसलीच जाणीव,आवाज, हरकत काहीच कळत नव्हते .बस एक शांत असा प्रकाश, एक मधुर आवज. एकदम गाढ झोप लागली मला. जणू शरीरातून माझ्या आत्माच निघून गेली आहे. किती वेळ अशी होते माहित नाही. परत हळूहळू तेच आवाज, गोंगाट एकू आले. डोळे उघडल्यावर सिलिंग वरचा पंखा जीव नसल्यागत फिरत होता. ओठ कोरडे झाले होते. अंग आता खूप हलके वाटत होते. मी माझ्यात येत होते आणि त्याक्षणी मला चाहूल लागली. मान वळवून पहिले. पांढऱ्या रंगाच्या कपड्यात होती " ती". आता तिला माझ्या कुशीत घेण्यासाठी आतुर झाले होते मी. पण उठण्यास हि ताकत नव्हती. आई बाजूलाच होती. जवळ येउन तिने गोंजारले मला. न सांगताच मला उठण्यासाठी मदत केली. शेवटी आईच ना! बेड ला रेलून नीट बसवले मला. मांडी घालवत नव्हती तरी पण घातली कशीतरी. कारण मला "तिला " घ्यायचे होते कुशीत माझ्या. आईने हळूच ते गाठोळे उचलून माझ्या हातावर दिले. मगास पासून गाठोळे भासणारा तो जीव माझ्या हातात होता. डोळे किलकिले करून, थोडासा आ वासून, आपली इवलीसी जीभ बाहेर काढून माझ्याकडे पाहत होता. अचानक धुसर झाला चेहरा तिचा, नकळत आसवे आली डोळ्यात.मी एका जीवाला जन्म दिला यावर विश्वासच होत नव्हता. एवढा वेळ जो त्रास, त्या प्राणांतिक यातना सहन केल्या होत्या मी त्या कुठल्या कुठे विस्मृतीत गेल्या. तिचे नाजूक हात, पाय, बोटे, कपाळ सर्व सर्व काही मी स्पर्श करून अनुभवत होते. तिचा स्पर्श मला एक वेगळीच अनुभूती करून देत होता. माझा जन्म तुझ्या येण्याने पूर्णत्वाला गेला असे मूकपणेच मी तिला सांगत होते. तू माझी आहेस, माझा अंश, आमच्या प्रेमाचे प्रतिक खूप आणि अश्या किती तरी भावना मनात दाटून येत होत्या.तेव्हा कोणीच नव्हते तिच्या आणि माझ्यात... आपण दोघीच एकमेकीना पूरक होतो. तू हळूच माझे पकडलेले बोट, तुझ्या ओठाची हालचाल, तुझे ते पहिले रडणे सर्व सर्व काही डोळ्यात साठवत होते मी अतृप्त असल्यासारखी. तुझे रडणे शांत करण्यासाठी तुला पदर आड छातीजवळ घेताना, तुझ्या ओठाचा तो पहिला स्पर्श किती आसवे आनंदाची आली असतील मलाच कळले नाही. बस डोळे मिटून अनुभवत होते हे मी सगळे. कारण आज मी " आई " झाले होते तुझी आणि तू माझे सर्वस्व. तुझ्या एका स्पर्शाने आज मी मुक्त झाले होते देवाने दिलेल्या जन्मातून पण तुझ्यात गुरफटले होते.

मुक्तकअनुभव

प्रतिक्रिया

यशोधरा's picture

18 Apr 2013 - 4:53 pm | यशोधरा

:)

कवितानागेश's picture

18 Apr 2013 - 5:05 pm | कवितानागेश

छान लिहिलय. :)

वाचण्यासारखं काहीतरी.

michmadhura's picture

18 Apr 2013 - 5:29 pm | michmadhura

भावनांचं सुंदर प्रकटन. मला माझ्या मुलीचा पहिला स्पर्श आठवला.

जेनी...'s picture

18 Apr 2013 - 7:08 pm | जेनी...

सुंदर :)

फक्त परिच्छेद पाडुन लिहिन्याकडे थोडं लक्ष दे ... बाकि आवडलं ....

भावना कल्लोळ.लेखन आवडले.

अर्धवटराव's picture

18 Apr 2013 - 9:10 pm | अर्धवटराव

अप्रतीम उतरले आहे प्रकटीकरण.

अर्धवटराव

स्पंदना's picture

19 Apr 2013 - 4:48 am | स्पंदना

अप्रतिम!
सुरेख! मधली ती तंरगल्यासारखी भावना तर अगदीच खास उतरली आहे.
अन बाळाचा पहिला स्पर्श. सगळच.

धनुअमिता's picture

19 Apr 2013 - 2:00 pm | धनुअमिता

अप्रतिम!

मुक्त विहारि's picture

19 Apr 2013 - 2:53 pm | मुक्त विहारि

मस्त..

आदिजोशी's picture

19 Apr 2013 - 3:12 pm | आदिजोशी

शब्दातीत अनुभव छान शब्दांत मांडला आहे.

स्पा's picture

19 Apr 2013 - 3:18 pm | स्पा

मस्तच लिहिलय

भावना कल्लोळ's picture

19 Apr 2013 - 3:38 pm | भावना कल्लोळ

@ पूजा, नक्की सूचना लक्षात ढेवेन. बाकी सर्वाचे मनापासून धन्यवाद

चुचु's picture

19 Apr 2013 - 3:39 pm | चुचु

सुरेख !!!

पैसा's picture

19 Apr 2013 - 3:48 pm | पैसा

शब्दापलिकडचा अनुभव शब्दात पकडलात!

सुर's picture

19 Apr 2013 - 4:54 pm | सुर

अगदी हेच आणी असच स्वःता अनुभवलय. निव्वळ अप्रतिम..:)

प्यारे१'s picture

19 Apr 2013 - 5:32 pm | प्यारे१

सुरेख.

स्मिता.'s picture

19 Apr 2013 - 5:45 pm | स्मिता.

खूप सुंदर लिहिलंय, आवडलं.

हा लेख वाचायचा राहिला होता.
छान उतरवल्यात भावना!

सुंदर . ते नुकतच जन्मलेलं मुल कित्ती छोटं असतं . मला भीती वाटते एवढ्या लहान मुलाला हातात घ्यायची

नजरेतून कैसा क्या छुट्या की. लय जब्राट.

खूप सुंदर लिहिलंय!!! एखादी मूव्ही पाहत आहे तशा प्रकारे वाटले वाचताना!!!