दादांना झालय तरी काय???

वेताळ's picture
वेताळ in काथ्याकूट
7 Apr 2013 - 12:54 pm
गाभा: 

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी कॉग्रेसचे नेते श्री. अजितराव(दादा) पवार ह्यांनी आज सकाळी इंदापुर येथिल निबोंडी गावी झालेल्या सभेत एकदम वन्टास फुल्टु झालेल्या माणसासारखे भाषण केले. महाराष्ट्रात पडलेल्या दुष्काळाची त्यानी खिल्ली उडवली.

त्यानी लाईट येत नसलेमुळे लोक मनोरंजन म्हणुन पोर जन्माला घालतात हाही शोध मांडला आहे. ह्या बाबत सविस्तर वृत मटा मध्ये आले आहे

http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/19425252.cms
अजितदादाना मुख्यमंत्री व्हायचे आहे,तिकडे युवराजाना पंतप्रधान व्हायचे आहे. पण दोघेही आड ना बुड पध्दतीने भाषणे ठोकत आहेत्.आता ह्या दोघाचे करायचे तरी काय? इतक्या गलिच्छ भाषेत भाषण करणारयाना राज ठाकरे किंबा बाळासाहेबाच्या भाषणावर टिका करण्याचा हक्क आहे काय? जाणत्या राज्यानी गावातल्या पोराटोराना सल्ला देण्यापेक्षा आपल्या घरीच संस्कार वर्ग सुरु करावेत काय?
मिपाकराना काय वाटते?

प्रतिक्रिया

प्रभाकर पेठकर's picture

7 Apr 2013 - 1:04 pm | प्रभाकर पेठकर

महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्र्यानेच महाराष्ट्राची लाज घालवली. धाडसी आणि कृतीशील वाटणार्‍या नेत्याचे अत्यंत अश्लाघ्य वर्तन.

दादा कोंडके's picture

7 Apr 2013 - 4:25 pm | दादा कोंडके

धाडसी आणि कृतीशील वाटणार्‍या नेत्याचे..

हा नेता वृद्ध मुरलेल्या राजकारण्यासारखा एकेक शब्द मोजून मापून बोलत नाही, फाटक्या तोंडाचा आहे, गुंड प्रवृत्तीचा आहे पण तो धाडसी आणि कृतीशील आहे अशी प्रतिमा 'सकाळ' ला हाताशी धरून केलेली आहे. फेकलेला राजिनामा शेपुट घालून मागं घेउन रुजू झालेल्या दुसर्‍याच दिवशी 'दादांनी चालवला पुन्हा कामाचा धडाका' या आशयाची सकाळला बातमी होती.

मुळात तशी वैचारिक बैठकच नसली तर ही प्रतिमा म्हणजे सरड्याचे रंग असतात. मा. शरदच्चंद्र पवरांना थप्पड मारल्याची बातमी सांगितल्यावर जेष्ठ गांधीवादी अण्णा हजारे 'बस, एक ही मारा?' असं म्हणाले होते याची आठवण झाली. :)

श्री गावसेना प्रमुख's picture

7 Apr 2013 - 1:22 pm | श्री गावसेना प्रमुख

राष्ट्रीय लेव्हल ला जसे काँग्रेस ला वाटते की आपण काहीही केले तरी ही जनता आपल्यालाच निवडुण देते, तशीच महाराष्ट्रात पवारांची अशीच धारणा असावी, आपले कोणीच काही वाकडे नाही करु शकत ह्या भ्रमात ते असावेत.
मोठे पवार आता स्पष्टीकरण देतील की अजीतच्या विधानाचा मिडीयाने विपर्यास केला.

यशोधरा's picture

7 Apr 2013 - 1:32 pm | यशोधरा

चॅनेल्सवरुनही दाखवले हे वक्तव्य, तेह्वा तसे म्हणू शकतीलच असे नाही. कदाचित काकांना हे वक्तव्य १० लोकांनी पाहिले तर परस्पर मार्ग मोकळा झाल्याचेही वाटू शकते ना? कल्पवृक्ष लावण्यासाठी तितकेच सोपे!

श्रीगुरुजी's picture

7 Apr 2013 - 7:47 pm | श्रीगुरुजी

>>> राष्ट्रीय लेव्हल ला जसे काँग्रेस ला वाटते की आपण काहीही केले तरी ही जनता आपल्यालाच निवडुण देते, तशीच महाराष्ट्रात पवारांची अशीच धारणा असावी, आपले कोणीच काही वाकडे नाही करु शकत ह्या भ्रमात ते असावेत.

मग त्यात चुकीचं काय आहे? महाराष्ट्राची व देशाची ६५ वर्षांत पूर्ण वाट लावूनसुद्धा हे परत निवडून येतातच ना! आज अजित पवार जे काही बरळले त्यामुळे बारामतीतून त्यांचं १ मत तरी कमी होणार आहे का? असंख्य चुका करूनसुद्धा यांना जनतेने वारंवार मते दिल्यामुळे हे उन्मत्त झाले आहेत. हे उन्मत्त व्हायला यांना उन्मत्त व्हायची वारंवार संधी देणारी जनताच जास्त जबाबदार आहे.

Afterall people deserve their rulers! जनतेला त्यांच्या लायकीचेच सत्ताधारी मिळतात असे एक सुप्रसिद्ध वचन आहे.

चौकटराजा's picture

7 Apr 2013 - 8:22 pm | चौकटराजा

Afterall people deserve their rulers! ना ना ना गुर्जी, हे वाक्य असे हवे बिफोर ऑल पिपल डिझर्व देअर रूलर्स !

श्रीगुरुजी's picture

7 Apr 2013 - 7:49 pm | श्रीगुरुजी

>>> राष्ट्रीय लेव्हल ला जसे काँग्रेस ला वाटते की आपण काहीही केले तरी ही जनता आपल्यालाच निवडुण देते, तशीच महाराष्ट्रात पवारांची अशीच धारणा असावी, आपले कोणीच काही वाकडे नाही करु शकत ह्या भ्रमात ते असावेत.

मग त्यात चुकीचं काय आहे? महाराष्ट्राची व देशाची ६५ वर्षांत पूर्ण वाट लावूनसुद्धा हे परत निवडून येतातच ना! आज अजित पवार जे काही बरळले त्यामुळे बारामतीतून त्यांचं १ मत तरी कमी होणार आहे का? असंख्य चुका करूनसुद्धा यांना जनतेने वारंवार मते दिल्यामुळे हे उन्मत्त झाले आहेत. हे उन्मत्त व्हायला यांना उन्मत्त व्हायची वारंवार संधी देणारी जनताच जास्त जबाबदार आहे.

Afterall people deserve their rulers! जनतेला त्यांच्या लायकीचेच सत्ताधारी मिळतात असे एक सुप्रसिद्ध वचन आहे.

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

7 Apr 2013 - 10:39 pm | निनाद मुक्काम प...

एकदा टग्या हे टेग लागल्यावर आता अजून काय तुम्हाला अपेक्षित आहे.
ही ग्रामीण भागातील जनता एरवी वर्षभर साप दिसला की त्याला ठेसून मारतील मात्र नागपंचमीला त्याची पूजा करतील ह्या अत्र्यांच्या विधानांची आठवण झाली.

पिंपातला उंदीर's picture

8 Apr 2013 - 10:18 pm | पिंपातला उंदीर

अहो प्रमुख ज्यांच्या विशेषनावरून तुम्ही हे नाव घेतले आआहे त्यांच्या शिवराल भाषनाबद्दल काही बोला की. का ते पण सनातन हिंदू धर्माचा पुरस्कार करायचे म्हणून सगळे माफ होते त्याना.

हे आले स्युडोसेक्युलर. मुद्दा काय, बोलताय काय, नक्की काय चाल्लंय? पण असोच. झोपेचे सोंग घेतल्या गेले के असेच होते. सो चालूद्या.

आशु जोग's picture

7 Apr 2013 - 1:44 pm | आशु जोग

राजीनामा फेकला होता
त्याचे काय झाले

श्री गावसेना प्रमुख's picture

7 Apr 2013 - 2:22 pm | श्री गावसेना प्रमुख

http://www.youtube.com/watch?v=Z7co7fgK_WU
हे बघा,दादा काय म्हणतोय ते

चौकटराजा's picture

7 Apr 2013 - 2:49 pm | चौकटराजा

आदा मदा कोणकोण दादा
दादा बोलला जसा घोडा ****

दादांना काहीही झालेले नाही... ते वरिजनल तसेच आहेत.

चेतनकुलकर्णी_85's picture

7 Apr 2013 - 3:21 pm | चेतनकुलकर्णी_85

इथेही दादांचे हस्तक दिसत आहेत..लगेच प्रतिसाद उडविला गेला... जय हो...

अत्रुप्त आत्मा's picture

7 Apr 2013 - 6:59 pm | अत्रुप्त आत्मा

तेच...तेच जाहलं आम्चंही :(

संपादक मंडळ's picture

8 Apr 2013 - 2:48 pm | संपादक मंडळ

मिसळपाववरील कार्यकारी मंडळ कुठल्याही राजकीय पक्षांचे पुरस्कारकर्ते नाहीत.
सद्य परिस्थितीत राज्यकर्त्यांनी जरी मर्यादा सोडल्या असल्या तरी या संस्थळावर वावरताना सदस्यांनी आपले भान सुटणार नाही याची काळजी घ्यावी.

- धन्यवाद
संपादक मंडळ.

देव काय करेल ते खरं :( औघड आहे.

दादा कोंडके's picture

7 Apr 2013 - 9:25 pm | दादा कोंडके

१.

'पाणीच नाही तर काय सोडणार?... मुतता का आता तिथे?...' अशी अर्वाच्य भाषा वापरून दुष्काळग्रस्तांच्या जखमेवर मीठ चोळणा-या अजित पवारांना सगळ्यांनी मिळून शिवाम्बू पाजायला हवी, अशी सणसणीत चपराक शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी लगावली आहे.

मुख्यमंत्री आणि शरद पवारांना थोडी जरी लाज-शरम असेल तर त्यांनी अजितदादांना मंत्रिमंडळातून लाथ मारून हाकलून द्यावं, अशी मागणीही त्यांनी केली आहे.

२.

'पाणीच नाही तर काय सोडणार?... मुतता का आता तिथे?...' अशी अर्वाच्य भाषा वापरून दुष्काळग्रस्तांच्या जखमेवर मीठ चोळणा-या अजित पवार यांना राज यांनी आज खास ठाकरे शैलीत उत्तर दिले. आगामी निवडणुकीत मतदार अजित पवारांना ' मत ' नव्हे तर ' मूत ' देतील. त्यात ते वाहून जातील. त्यावेळी तुम्हाला अडवायला ना कसले बंधारे असतील ना धरणं... या शब्दात राज यांनी अजित पवारांच्या वादग्रस्त वाक्याचा समाचार घेतला.

लोल. :)) :))

सौजन्यः मटा

दादा कोंडके's picture

7 Apr 2013 - 10:12 pm | दादा कोंडके

आणि थोडं राज्याच्या राजकारणात खूटं झालं की लगेच बातमी देणार्‍या सकाळ मध्ये अजून तरी ही बातमीच दिसत नाहिये.

मैत्र's picture

8 Apr 2013 - 12:31 am | मैत्र

स्पष्ट जाहीर असं मुखपत्र आहे ते..
दादांना दोन तीन वर्षात अचानक पुढे आणून त्यांचा तडफदार नेते म्हणून उदो उदो करण्यात किंवा वर लिहिलंय तशी प्रतिमा निर्माण करण्यात सकाळचा खूप मोठा हात आहे.
नुकत्याच झालेल्या राजीनामा नाट्यात सकाळचे मथळे पण नाट्यपूर्ण असायचं..
दादांच्या राजीनाम्याने सरकार हादरले.. वगैरे..
याची स्पष्ट बातमी कधीही येणार नाही.. वादळ शमलं की सकाळ न्यूज नेटवर्क या नावाखाली वाटेल ती वैयक्तिक मतं बातमी म्हणून छापतील..

मैत्र's picture

8 Apr 2013 - 12:09 pm | मैत्र

सकाळमध्ये बातमी आहे आणि पहिल्या पानावर आहे
दुवा

अधिराज's picture

8 Apr 2013 - 12:13 pm | अधिराज

इ-सकाळ वर ती बातमी पाहिली, त्यात त्यांनी ह्यांना आणि राजना एकाच पंक्तीत बसवल्यागत वाटलं.

श्रीगुरुजी's picture

8 Apr 2013 - 12:53 pm | श्रीगुरुजी

>>> सकाळमध्ये बातमी आहे आणि पहिल्या पानावर आहे

इतर सर्व पक्षांप्रमाणेच राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही नेतृत्वासाठी स्पर्धा आहे. सुप्रिया व अजित या दोघांपैकी एकजण शरद पवारांनंतर राष्ट्रवादीचा सर्वेसर्वा होणार हे नक्की. "सकाळ" गेल्या काही महिन्यांपासून सुप्रियाला प्रमोट करत आहे. सुप्रियाचे 'स्त्रीभॄणहत्या वाचवा' आंदोलन व 'महिला सबलीकरण' मेळावे गेले अनेक दिवस "सकाळ"चे पहिले पान व्यापून आहेत. आज अजित पवारांचे बेताल वक्तव्य "सकाळ"च्या पहिल्या पानावर मोठी बातमी देऊन छापले गेले याचे अजिबात आश्चर्य वाटले नाही.

दादा कोंडके's picture

10 Apr 2013 - 9:10 pm | दादा कोंडके

अर्वाच्य भाषेत दुष्काळग्रस्तांच्या जखमेवर मीठ चोळलं म्हणून उपमुख्यमंत्री अजित पवारांचा धिक्कार करणा-या मनसे आणि शिवसेनेनंही आपल्या आंदोलनादरम्यान सभ्यतेच्या मर्यादा ओलांडल्याचं दुर्दैवी चित्र पाहायला मिळालं. दादरमध्ये मनसैनिकांनी एका शाळकरी मुलाला अजितदादांच्या फोटोवर लघुशंका करायला लावली, तर औरंगाबादमध्ये शिवसैनिकांनी त्यांच्या प्रतिमेला मूत्र पाजलं. त्यांनी केलेला हा प्रकार अजितदादांच्या उद्गारांइतकाच ओंगळवाणा आहे.

सौजन्यः मटा

बॅटमॅन's picture

11 Apr 2013 - 11:36 am | बॅटमॅन

औघड आहे :(

पाषाणभेद's picture

7 Apr 2013 - 9:41 pm | पाषाणभेद

नेत्यांचे असल्या शिवराळ भाषेतले वक्तव्य वाचून फार वैषम्य वाटले.

सततच्या दुष्काळावर मानवी प्रयत्न करायचे सोडून भ्रष्ट मार्गातून पाण्यासारखा पैसा इतके वर्ष सतत वाहत असतांना त्यावर ठोस उपाययोजना करायचे सोडून कमरेचे सोडून केवळ वाचा(ळ)विर होणारे आपले नेते पाहून पुरोगामी विचारसरणीच्या महाराष्ट्रात आपण राहत आहोत काय हा प्रश्न कुणाही सुजाण नागरीकाला पडेल.

भिक नको पण कुत्रे आवर ही म्हण दुष्काळावर उपाययोजना नको पण भाषणबाजी आवर अशी हवी.

तर्री's picture

7 Apr 2013 - 10:01 pm | तर्री

आगामी निवडणुकीत मतदार अजित पवारांना ' मत ' नव्हे तर ' मूत ' देतील. त्यात ते वाहून जातील.
आ.अत्रेंच्या नंतर असे थेट बोलणारा वक्ता/ नेता म्हणून राज चे कौतुक.

नाना चेंगट's picture

7 Apr 2013 - 10:54 pm | नाना चेंगट

सहमत आहे.

बाकी ठाकरी शैलीला नाके मुरडणार्‍या विचारवंतांना अजित पवारांच्या मुतारीचा वास येऊन उर्ध्व लागला आणि काही बोलण्याच्या मनस्थितीत उरले नाही असे आमचा वार्ताहर कळवतो.

बंडा मामा's picture

8 Apr 2013 - 10:24 pm | बंडा मामा

बाकी ठाकरी शैलीला नाके मुरडणार्‍या विचारवंतांना अजित पवारांच्या मुतारीचा वास येऊन उर्ध्व लागला आणि काही बोलण्याच्या मनस्थितीत उरले नाही असे आमचा वार्ताहर कळवतो.

कोण बरे असे हे विचारवंत? माझ्या पहाण्यात तरी अजित पवारांच्या विधानाचा सगळ्यांनीच निषेध केलेला दिसला.

नाना चेंगट's picture

8 Apr 2013 - 11:00 pm | नाना चेंगट

चश्मा बदलून पहा.

बंडा मामा's picture

8 Apr 2013 - 11:04 pm | बंडा मामा

त्याने काय होइल? नसलेले दिसायला लागेल का?

नाना चेंगट's picture

8 Apr 2013 - 11:08 pm | नाना चेंगट

शक्यता नाकारता येत नाही.

बंडा मामा's picture

8 Apr 2013 - 11:33 pm | बंडा मामा

मग चश्म्या शिवायच बरे आहे.
नसलेले दिसणे आणि असलेले न दिसणे असला चश्मा न घातलेलाच बरा.

नाना चेंगट's picture

8 Apr 2013 - 11:41 pm | नाना चेंगट

तुम्ही कोणताही चष्मा वापरत नाही हे सांगितल्याबद्दल धन्यवाद.

चालायचंच! ज्या ठाकरी शैलीला नावं ठेवली जायची/जातात त्या शैलीचे अफाट चाहते आहेत, त्यांच्याकडून मिळणारा टाळ्यांचा कडकडाट, हशा, शिट्या ह्यांची कुणाला कधी भुरळ पडली नाही तरच नवल. 'सेकंड इन कमांड' ह्यांनाही कदाचित प्रयोग करुन पहावासा वाटला असेल!
आमच्या सत्तावीस गुरुंपैकी एक - दादा कोंडके ह्यांनी कोल्लापूरात शिवसेनेच्या प्रचाराच्या वेळी केलेलं भाषण ज्यांनी ऐकलं असेल त्यांना ह्या निंबोडीच्या भाषणात काही गैर वाटणार नाही.

बाकी, सभेच्या मंचावरुन अशा पध्दतीनं बोलणं हे नैतिकदृष्ट्या चूक की बरोबर हे ठरवण्याची पात्रता अन अक्कल माझ्यात मुळीच नाही. पण एक गोष्ट मात्र आवर्जुन जाणवतेय, आजकाल आपण अकारणच अतिसंवेदनशील झालो आहोतसं वाटतंय. अगदी आपल्या घरातल्या आजी-पणजींच्या तोंडी असलेल्या शिवराळ म्हणीदेखील काही कमी ठसक्याच्या अन झणझणीत नसायच्या. पण आजकाल आपल्या भावना फार लवकर दुखावू लागल्या आहेत असं मला वाटतं.
शुचिता अन सभ्य-असभ्यतेच्या अतिरेकातून अशा प्रकारच्या प्रतिक्रिया (अगदी वृत्तपत्रांतूनदेखील) उमटताहेत असं माझं वैयक्तिक मत आहे.

हां, कोणावर भाषणातून शिवराळपणा, अश्लिलपणा,'बिलो द बेल्ट' वार करणं ह्याबद्दल ऊठसूठ तोंडसुख घेणं, अन आपल्या भाषणातही तेच करणं ह्या दुटप्पीपणाबद्दल मात्र आपेक्ष जरुर आहे. (स्वगतः घे भाड्या आक्षेप! कोण हिंग लाऊन विचारतोय तुझ्या आक्षेपाला? )

असो! बदलत्या काळानुरुप लज्जारक्षणाची वस्त्रं तोकडी होत अंगं उघडी पडत चालली असताना, भाषेला मात्र व्हिक्टोरियन काळातल्यासारखं सभ्यतेच्या कॉर्सेटमध्ये आवळणं मज मूढाच्या अल्पमतीपल्याडचं आहे. :)

मरुद्या तिच्यायला! ते बोलणार, मिड्या त्याचं भांडवल करणार, ते सावरुन घेणार, विरोधक त्याचंही भांडवल करणार....
आपण मात्र आहोत तिथंच. आपल्या छटाकभराच्या अडचणी काय कमी आहेत आपल्याला? म्हणतात ना, मुंगीला 'मूताचा' पूर! तीच गत आपली.
ह्या मोठ्या माशांच्या खेळ्या आपल्याला काय कळाव्यात?

-(शिवराळ) धम्या.

दादा कोंडके's picture

7 Apr 2013 - 11:28 pm | दादा कोंडके

त्यांच्या वक्तव्यातला पहिला भाग, 'तो एकतर देशमुख का कुणतरी आझाद मैदानावर उपोषणाला बसलाय...' यातलाच जो बेदकारपणा, असंवेदनशीलता आणि माज दिसतो त्याचीच पहिल्यांदा किळस आली.

आणि आज्यांनी माजघरात किंवा चार गावठी मित्रांचं पानटपरीवर बोलणं आणि उपमुख्यमंत्राचं जाहीर भाषण यात काही फरक आहे की नाही? परिथितीचं गांभिर्य आणि दुष्काळ, भारनियमन वगैरेची संवेदनशीलता बाजूला ठेउ.

या निमित्ताने सगळ्यांनीच तोंडाच्या गटारी उघडल्यात.

धमाल मुलगा's picture

8 Apr 2013 - 12:11 am | धमाल मुलगा

त्यांच्या वक्तव्यातला पहिला भाग, 'तो एकतर देशमुख का कुणतरी आझाद मैदानावर उपोषणाला बसलाय...' यातलाच जो बेदकारपणा, असंवेदनशीलता आणि माज दिसतो त्याचीच पहिल्यांदा किळस आली.

अर्थातच बिनशर्त सहमती!
पण मला एक सांगा, बेदरकारपणा, माज, असंवेदनशीलता(! सदरहू प्रभृतीसंदर्भात हा शब्द वापरतानाही अंमळ हात कापले हों!) हे काय नविन आहे का? आज कित्येक वर्षं हे असंच चालू आहे. त्याला आज तथाकथीत अश्लिलतेची फोडणी मिळाली म्हणून कदाचित आज ते ऊठून दिसतंय.

आणि आज्यांनी माजघरात किंवा चार गावठी मित्रांचं पानटपरीवर बोलणं आणि उपमुख्यमंत्राचं जाहीर भाषण यात काही फरक आहे की नाही?

नक्कीच आहे. फरक नक्कीच आहे. पण मंचावरुन भाषणात असे शब्द वापरणं हे चूक की बरोबर हे ठरवण्याची निदान माझीतरी कुवत नाही. आज आपण २०१३ मध्ये आहोत. १९८८ मधलं दादांचं भाषण ऐकलंयत? ६८-७० पासूनची बाळासाहेबांची भाषणं ठाऊक असतीलच, आचार्य अत्र्यांची भाषाही सोवळी बिलकुल नव्हती. माझं म्हणणं केवळ इतकंच आहे की आपण एक समाज म्हणून आजच्या घडीला जास्तच संवेदनशील झालो आहोत असं वाटतंय.

लक्षात घ्या, माझा मूळ मुद्दा हा त्या भाषणातल्या वृत्तीबद्दल मुळीच नाही. त्या गोष्टीचं समर्थन होऊच शकत नाही.
म्हणणं इतकंच आहे, की आजच्या घडीला आपण भाषेला आलवण नेसवून माजघरात कोंड्तोय का? ज्या प्रकारच्या प्रतिक्रिया समाजातून येत आहेत तितकं अश्लाघ्य अन अश्लिल ते बोलणं होतं का? तसं असेल तर कोकणातल्या घराघरातल्या अगदी दशग्रंथी ब्राह्मणांमध्येही पुर्वी सहजी ऐकू येणारा - अगदी घरातल्या पोरांनाही उद्देशुन 'रांडेंच्या' हा शब्द आपण कोणत्या वर्गवारीत बसवणार? कोल्हापूरात सहजपणे एखादं विशेषण असल्यासारखा येणारा 'भाड्या' कसा जस्टिफाय करणार?
मला कळतंय, मी देतोय ती उदाहरणं खाजगी जिवनातली आहेत, आणि सभाशास्त्र वेगळं असतं. अहो, पण ते कोणासाठी? सभाशास्त्र पंडितांना लागू...पंडिंतांच्या सभेत! जनमानसाशी बोलायचं ते त्यांच्या भाषेत हे राजकारणातल्या सभांचं एक हुकमी पान नव्हे का?

मिष्टर पवारांनाही बोलतानाच आपला तोल (रुढार्थानं) ढासाळल्याचं लक्षात आलंच. आता त्यावर काही मखलाशी केली तर तत्क्षणी घेतलेल्या त्या पावित्र्यापासून कोलांटी मारल्यासारखंच होणार. आणि बहुतेक ते तसं पुढंमागं म्हणतीलही कदाचित. कुणी सांगावं?

>> परिथितीचं गांभिर्य आणि दुष्काळ, भारनियमन वगैरेची संवेदनशीलता बाजूला ठेउ.
अनागोंदीवादी पक्षात सातबारा, पाणलोट, आणि सहकारी ब्यांका ह्यापलिकडं नक्की कशाची संवेदनशीलता एरवि असते असं तुम्हाला आढळलंय? :)

दादा कोंडके's picture

8 Apr 2013 - 12:46 am | दादा कोंडके

त्याला आज तथाकथीत अश्लिलतेची फोडणी मिळाली म्हणून कदाचित आज ते ऊठून दिसतंय.

हो. फक्त अश्लिल आहे म्हणून नव्हे तर हा 'नेमेची येणारा दुष्काळ' नैसर्गिक नसून मानव निर्मीत आहे हे सिद्ध झाले असून, महाराष्ट्रात बहुतांश वेळेला सत्तेत असून, पाटबंधारे खाती यांच्याच अखत्यारीत असून कोट्यावधी रुपयांचा भ्रष्टाचाराचा आरोप झालेल्या आणि त्यामुळे राजिनामा द्यावा लागलेल्या अजित पवारांनी दुष्काळात होरपळत असताना अश्या नाजूक वेळेला असं वक्तव्य करावं का हा प्रश्न आहे.

मागे विधानसभेमध्ये 'पोर्न क्लिप' बघणार्‍या मंत्र्यावर टिका झाली. त्यातली अश्लिलता बाजूला ठेवली तरी जनतेच्या प्रश्नांकडे केलेली अक्षम्य डोळेझाक महत्वाची आहे. त्याऐवजी एखाद्या मंत्री बाई वाती वळत बसल्या असत्या तर तोही तेव्हडाच अक्षम्य अपराध होय.

पण मंचावरुन भाषणात असे शब्द वापरणं हे चूक की बरोबर हे ठरवण्याची निदान माझीतरी कुवत नाही. आज आपण २०१३ मध्ये आहोत. १९८८ मधलं दादांचं भाषण ऐकलंयत? ६८-७० पासूनची बाळासाहेबांची भाषणं ठाऊक असतीलच, आचार्य अत्र्यांची भाषाही सोवळी बिलकुल नव्हती.

हे ही निषेधार्थ आहेच. आणि घटनात्मक विशेष अधिकार आणि जबाबदार असलेल्या व्यक्तीनी थोडा ताळतंत्र बाळगावा अशी अपेक्षा असते.

बंडा मामा's picture

8 Apr 2013 - 10:27 pm | बंडा मामा

धमाल मुलगा -
तुमच्या प्रतिसादाशी असहमत असलो तरी तुमचा स्टँड मला आवडला. इतरवेळेला ज्याभाषेला ठाकरी भाषा म्हणून कुरवाळायचे आणि आपल्या नावडत्या पक्षातील मात्र कुणी हीच भाषा वापरली की लगेच आकाश पाताळ एक करायचे हा दुटप्पीपणा निदान तुमच्याकडे तरी दिसला नाही.

आजानुकर्ण's picture

8 Apr 2013 - 10:33 pm | आजानुकर्ण

या प्रतिक्रियेशी सहमत आहे.

ऋषिकेश's picture

8 Apr 2013 - 11:50 am | ऋषिकेश

असो! बदलत्या काळानुरुप लज्जारक्षणाची वस्त्रं तोकडी होत अंगं उघडी पडत चालली असताना, भाषेला मात्र व्हिक्टोरियन .....

धम्या उत्तर तुच दिलंयस.
वर असताना ऐवजी असल्यामुळे लिहिलं की हल्ली नेते असे का बोलतात याचं उत्तर मिळेल :)
हल्ली नेत्यांना कर्तृत्त्वाची वस्त्र तोकडी पडताहेत.. तेव्हा फक्त असल्या भाषणबाजीवर जोर आहे.. सगळीकडे.. सगळ्याच पक्षात...
काय म्हणतोस?

मालोजीराव's picture

8 Apr 2013 - 12:35 pm | मालोजीराव

अजित पवार गावाकडच्या सभांना अशीच भाषणं ठोकतात त्यामुळे विशेष वाटल नाही, अजित पवार वि राज ठाकरे सामना रंगवण्यासाठी मिडीयाने हे भाषण क्याच केलं एव्हडच म्हणता येईल.बाकी राष्ट्रवादी च्या नेत्यांकडून अशीच भाषा अपेक्षित त्यामुळे जनतेने त्यांना तोंड आवरायला सांगण्यापेक्षा स्वतः ला सवय लावून घ्यावी हे असलं ऐकायची.2014 ला बदल नाही घडला तर अजून ५ वरीस सोसायची तयारी ठेवा

मालोजीराव's picture

10 Apr 2013 - 11:59 am | मालोजीराव

आत्ताच फेसबुकवर पाहिलेली कविता… साभार - अनिकेत बोंद्रे

एक मुतारी द्या मज आणुनी
फुंकीन तीत मी स्वप्राणाने
भेदून टाकीन दुष्काळ सगळा
दीर्घ तिच्या त्या पिचकारीने !
--- दादाकवी

आले आले आले आले बारामतीवाले आले

यशोधरा's picture

8 Apr 2013 - 6:38 pm | यशोधरा

तुझा मुद्दा फारसा पटत नाहीये. दोन्ही पोस्टी वाचल्या.

आचार्य अत्रे, बाळ ठाकरे ह्यांच्या भाषेचं समर्थन करत नाही, पण दोघेही महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून बोलत नव्हते हा मोठा फरक आहे. तेच दादा कोंडकेंबद्दल. इथे 'माननीय' अजित पवार, ज्यांनी उपमुख्यमंत्रीपद "भूषवलेलं" असताना, आणि आता इतकी वर्षं सत्तेत असून दुष्काळाबाबत काहीही ठोस पावलं न उचलता, हे उचलली जीभ लावली टाळ्याला ह्या पद्धतीने बोलणं निदान उपमुख्यमंत्री पदावर असताना तरी टाळायला हवं, निदान त्या पदाची इभ्रत राखण्यासाठी, कारण ते महाराष्ट्राचं पद आहे. कोण्या एका राजकीय पक्षाचं किंवा गुंडगिरीच्या आणि पैशाच्या जोरावर अर्धा अधिक महाराष्ट्र खिशात घालणार्‍यांच्या खाजगी मालकीचं नाहीये - इतकी तरी जाणीव असावी.

आणि 'रांडेंच्या', 'भाड्या' बद्दल म्हणशील तर ते शब्द जी जवळीक दाखवण्यासाठी वा प्रसंगी कान उपटण्यासाठी जसे वडिलकीच्या वा मैत्रीच्या अधिकारात आणि ज्या लहेजात वापरले जातात, त्यात आणि ह्या भाषणात काही फरक नाहीच म्हणतोस? असेलही. दादांची ही दुष्काळग्रस्त जनतेविषयी माया आणि आपुलकी दाखवायची खास ष्टाईल म्हणायची की काय? तरी बरं, हे सगळं बोलता बोलता त्यांना स्वतःलाच शंका आली की आपण सकाळीच पावशेर टाकून आलो की काय!

बाकी आजकाल बहुतांशी राजकारणी बिनमुद्द्याचं आणि जास्त करुन गुद्द्याचं बोलत आहेत... काही चांगले काम करणारे असतीलही पण अशांबद्दल फारसं समजून येत नाही आणि कर्तव्यशून्य राज्यकर्त्यांना कोणत्याही कारणाने का होईना, प्रसिद्धी मिळत राहते.

नाना चेंगट's picture

8 Apr 2013 - 11:01 pm | नाना चेंगट

>>>दोघेही महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून बोलत नव्हते हा मोठा फरक आहे.

हाच फरक अनेकांना समजलेला नाही... अजूनही.

मृत्युन्जय's picture

9 Apr 2013 - 5:04 pm | मृत्युन्जय

धम्या एक गोष्ट लक्षात घे की मुख्य आक्षेप भाषेला नाही आहे. सामान्य जनतेप्रती जो बेदरकारपणा दाखवला गेला आहे आणि त्यांच्या भावनांची जी कुचेष्टा केली गेली आहे त्याला आहे.

ठाकरे काय किंवा अत्रे काय प्रसंगी शिवराळ भाषा वापरत असतील, प्रतिस्पर्ध्याची आईमाईदेखील काढत असतील. पण त्यांनी गोरगरीब जनतेच्या असहाय्यतेची आणि दुर्दैवाची टिंगलटवाळी तरी केली नव्हती.

पाण्याचे दुर्भिक्ष्य आहे तर आहे. ते पैसेखाऊ राजकारण्यांमुळे किती, सरकारच्या नाकर्तेपणामुळे किती आणि निसर्गाच्या अवकृपेने किती याची मीमांसा करता येइल पण म्हणुन तुम्ही सामान्य जनतेला "आता काय मुतु काय?" असे जर विचारायला लागलात तर ते एक अतिशय निर्लज्ज कृती आणि असंवेदनशील विधान असेल.

शिवाय गेली अनेको वर्षे वीजेची बोंबाबोंब सुरुच आहे. इतके वर्ष सत्तेवर असुनही अजुन यांना परिस्थिती सुधारता आलेली नाही. ठीक आहे. पण मग किमान निर्लज्जपणे लोकसंख्यावाढीची विधाने करु नयेत ना.

बाळ सप्रे's picture

9 Apr 2013 - 5:54 pm | बाळ सप्रे

+१
भाषेपेक्षा सहानुभूतीचा अभाव जास्त खटकतो इथे.. टगेगिरी करायची ही जागा नव्हे इतके समजत नसेल तर उपमुख्यमंत्रीम्हणून रहाण्याची लायकी नाही असेच वाटते!!

उपास's picture

9 Apr 2013 - 6:18 pm | उपास

अगदी अगदी.
विरोधकांवर हल्ला केला तर समजू शकतो, पण सामन्य जनतेशी असं बोलत असाल तर तो माजच आहे, विनोद सुद्धा कुठे कसा आणि कुणाबद्दल करावा ह्यावर तुम्ही तुमची लायकी दाखवून देता.
माफी वगैरे ठीक आहे पण प्रायश्चित काय? त्याच उत्तर द्या दादासाहेब!

श्रीरंग_जोशी's picture

7 Apr 2013 - 11:23 pm | श्रीरंग_जोशी

हे साहेब गेल्या साडेतेरा वर्षांपासून सतत सत्तेमध्ये आहेत. या काळात त्यांनी राज्यासाठी नेमकी काय भरीव काम केले म्हणून बरेच लोक त्यांचे धडाकेबाज, कार्यक्षम म्हणून कौतुक करत असतात हा प्रश्न मला नेहमीच पडतो. त्यांनी ज्या ज्या खात्यात काम केले उदा ऊर्जा, जलसंधारण, अर्थ त्या त्या क्षेत्रात राज्याची वाट लागली.

स्वतःचे सख्खे काका राजकारणात एवढा दीर्घकाळ असूनही सुसंकृततेच्या बाबतीत एक आदर्श असताना त्यांनी ही वाट चोखाळावी, ईश्वर त्यांना सद्बुद्धी देवो.

शिल्पा ब's picture

7 Apr 2013 - 11:56 pm | शिल्पा ब

अजित पवार गुंडप्रवृत्तीचे म्हणुनच प्रसिद्ध आहेत, त्यांच्या काकांसारखा मुखवटा का होईना घातलेला नाही. त्यामुळे त्यांना जनतेने निवडुन का दिलं हाच एक प्रश्न.

बाकी स्वतः जाहीरपणे अश्लाघ्य भाषा वापरुन सोज्वळपणे इथे प्रतिसाद देणारे लोकं पाहीले की करमणुक होते.

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

8 Apr 2013 - 2:31 am | निनाद मुक्काम प...

ज्या प्रभाकर देशमुख वरून हा सगळा वादंग झाला,
त्यांचे ह्या सर्व घटनेवर त्यांचे मत
ह्यामुळे बरीच माहिती मिळाली.

चिरोटा's picture

8 Apr 2013 - 7:50 am | चिरोटा

महाराष्ट्रात पडलेल्या दुष्काळाची त्यानी खिल्ली उडवली.

म्हणूनच त्यांना लाज वाटली पाहिजे. खिल्ली कुठल्या गोष्टींची उडवायची ह्याला मर्यादा असते.अजित पवारांनी हे वक्तव्य केल्यावर सभेतल्या ईतरांनीही त्यावर टाळ्या वाजवल्या.

हुप्प्या's picture

8 Apr 2013 - 8:31 am | हुप्प्या

ह्या अर्वाच्य, असभ्य, असंस्कृत बोलण्यामागे मुंब्रा परिसरातील अवैध बांधकामावरचे लक्ष उडवून लावावे असा उद्देश असेल. नुकत्याच झालेल्या पडझडीमुळे ते एक नवे शुक्लकाष्ठ राष्ट्रवादीच्या मागे लागण्याची शक्यता आहे, तशात अल्पसंख्य लोक गाडले गेले असल्यामुळे प्रश्न अधिकच नाजूक बनला आहे त्यामुळे काकासाहेबांच्या सल्ल्यानेच हा शिमगा केला गेला असण्याची शक्यता आहे.
कितीही उर्मट असला तरी अजित पवार हा एक राजकारणी आहे. निष्कारण चिखलफेक तो करेल असे मला वाटत नाही.

बॅटमॅन's picture

8 Apr 2013 - 11:20 am | बॅटमॅन

+१११११११११११.

असे असण्याची शक्यता आजिबात नाकारता येत नाही. गुड पॉइंट.

हुप्प्याजींच्या कॉन्स्पिरसी थेअरीज मजेशीर असतात.

आजानुकर्ण's picture

8 Apr 2013 - 10:43 pm | आजानुकर्ण

राष्ट्रवादी व आव्हाड तर नालायक आहेतच. पण महानगरपालिकेत शिवसेना भाजपाची सत्ता आहे. त्यांना बेकायदेशीर बांधकामांबाबतीत काही करता येणे शक्य नव्हते काय असा प्रश्न मनात येतो.

श्रीरंग_जोशी's picture

8 Apr 2013 - 10:49 pm | श्रीरंग_जोशी

महानगरपालिकेत आयुक्त अधिक सर्वाधिक शक्तिशाली असतो व तो राज्यसरकारद्वारा नियुक्त केलेला असतो त्यामुळे महापौरपद हे फारसे अधिकार नसलेले पद असते असा दावा करून दिड दशकापूर्वी महापौर परिषदेचा प्रयोग करण्यात आला होता.

या मुद्द्यावर (महानगरपालिकेतील सत्ताधारी पक्ष अधिक शक्तिशाली की मनपा आयुक्त...) यावर जाणकारांचे मत जाणण्यास उत्सुक.

आजानुकर्ण's picture

8 Apr 2013 - 10:53 pm | आजानुकर्ण

मागील महापालिका निवडणुकीच्यावेळी शिवसेनेने 'करुन दाखविले'च्या फलकांचा धमाका सर्वत्र केला होता. शिवाय वर्तमानपत्रामध्येही जाहिराती येत होत्या. आयुक्तांच्या कार्याचे श्रेय लाटण्याचा हा प्रकार वाटतो.

श्रीरंग_जोशी's picture

8 Apr 2013 - 11:02 pm | श्रीरंग_जोशी

मनपामधील सत्ताधारी पक्षाची भूमिका जनता व मनपा आयुक्त यांना जोडणारा दुवा अशी असावी. आयुक्त काही जनतेतून निवडून येत नाही त्यामुळे जनतेने बहुसंख्येने निवडून दिलेल्या पक्षाचे वा आघाडीचे नगरसेवक जनतेच्या गरजा आयुक्तापेक्षा निश्चितच अधिक व्यवस्थितपणे समजून घेत असावे. व त्यावर पाठपुरावा करून आयुक्त व मनपामधील इतर अधिकार्‍यांद्वारे अंमलबजावणी करवून घेत असावेत.

या कामाचे श्रेय घेतल्यास त्यांनी त्यांच्या कर्तव्य पार पाडल्याचेच श्रेय घेतले असे समजायला काही हरकत नाही.

महाराष्ट्रात अंदाजे २० च्या आसपास मनपा असाव्यात. सगळीकडे याच प्रकारे श्रेय घेणे / हरकत घेणे सुरू असते.

अर्थात या विषयाच्या जाणकारांचे विस्तॄत मत जाणणे अधिक महत्वाचे.

दादांच्या काळात लाइट रात्री असायची का हो …????

आणी हे कधी म्हणजे दिवसा की रात्री जन्मले ???

श्री गावसेना प्रमुख's picture

8 Apr 2013 - 9:33 am | श्री गावसेना प्रमुख

दादा कोणते ?दादा पवार म्हणत असाल तर ते ना दिन मे ना रात मे,ना घर मे ना घर के बाहर्,ना जमी पर ना हवा मे,अशा परिस्थितीत आल्याचे बारामती प्राथमिक आरोग्य केंद्रात नोंद आहे असे ऐकीव आहे

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

8 Apr 2013 - 9:32 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

अतिशय बेताल वक्तव्य. महाराष्ट्राचं दुर्दैव की असे उप-मुख्यमंत्री आपल्याला सोसावे लागतात. मग्रुरी,सत्ता,संपत्ती, याची नशा चढते आणि नशेत माणसं बरळतात असा तो अर्थ. आता विरोधी पक्षांने त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे, सत्ताधारी पक्षाने श्रेष्ठींकडे अशा बेताल वक्तव्याचा निषेध व्यक्त करावा, आणि पदावरुन पायउतार करण्यास भाग पाडावे, आता ते होईल की नाही माहिती नाही. आणि लोक पुन्हा त्यांना निवडून देणार नाही, याच्यावर बॉ आपला विश्वास नाही.

-दिलीप बिरुटे

त्यांच्या वक्तव्यावर लोक ज्याप्रकारे खदखदत होते, तेही चीड आणणारे होते.

त्यांच्या वक्तव्यावर लोक ज्याप्रकारे खदखदत होते, तेही चीड आणणारे होते.
हेच तर उद्वेग जनक आहे.
ज्यांचे पु.लं. , चिं.वी. , ह्यांच्यासारख्या दर्जेदार, अभिरुची संपन्न विनोदावर पोषण झालेले नाही त्यांना अश्या विनोदात आनंद वाटतो. चांगले पहायचे नाही , चांगले वाचायचे नाही , चांगले ऐकायचे नाही. चांगले निवडायचे नाही.
आणि मराठीच्या , महाराष्ट्राच्या , मराठ्यांच्या गप्पा झोडायच्या !

मदनबाण's picture

8 Apr 2013 - 10:47 am | मदनबाण

सत्तेची नशा आणि माज याच हे मूर्तीमंत उदाहरण महाराष्ट्रातल्या जनतेला दिसलं...
दुष्काळग्रस्त महाराष्ट्राची आणि जनतेची कुठलीच सानभुती आणि तमा न-बाळगताना त्यांनी महाराष्ट्राचा आणि जनतेचा अपमान केला असुन निर्लज्य पणाचा कळस कसा गाठायचा याचे उदाहरण जनते समोर ठेवले !
ह्या असल्या राज्यकर्त्यांना निवडुन देणारी जनता ही सुद्धा तितकीच जवाबदार आहे कारण अश्या धेंडांना उन्मत्त होण्यासाठी हीच जनता मदतनारुपी मदत करते.
इथे महाराष्ट्रातल्या लोकांना प्यायला पाणी नाही,वानखेडे स्टेडियला पाणी मारले जाते त्याची आकारणी १००० लिटरला ४०रु या प्रमाणे केली जात आहे,पण लोकांना पिण्यासाठी पाणी हवे त्याचा मात्र काळाबाजार ! परिस्थीती इतकी भयंकर आहे की महाराष्ट्रातले तहानने व्याक्युळलेले लोक आता रेल्वेस्टेशन मधे गर्दी करु लागले आहेत आणि ट्रेनच्या संडास मधला जो फ्लश असतो त्याचे पाणी भरुन घेतले जात आहे ! :( राज्यातल्या राज्यकर्त्यांना दुष्काळ दिसेनासा झाला असुन लोकांना विचारणारा लोकप्रतिनिधी जणु अद्रुष्य झाला आहे.कोड्यावधी रुपये खर्चुन महाराष्ट्रात आयपील सामने खेळवले जाणार आणि दुष्काळ ग्रस्तांची अशी क्रुर थट्टा आपले नेते करत राहणार हे वास्तव आपण आपल्या डोळ्यांनी पाहत आहोत. :(
अजित दादांच्या वक्तव्यात हसणार्‍या मंडळीत स्त्रीयांचाही सहभाग होता हे पाहुन या सर्व हसणार्‍यांची वॄत्ती आणि समज हीन स्वरुपाचीच असावी असे माझे ठाम मत झाले. ! :(

जाता जाता :--- महाराष्ट्रात दुष्काळाने थैमान घातलेले असुन सुद्धा लोकांपेक्षा उध्योगपतींना आणि राजकारणार्‍यांना आयपीलची काळजी जास्त आहे हे दुसुन आले ! मी या क्रिकेटसामन्यांवर माझ्या वैयक्तिक बहिष्कार आधीच घातला आहे. आपण ही त्याचा बहिष्कार आणि निशेष आपपल्या पद्धतीने करावा.... अशी मी नर्म विनंती करतो.

चिरोटा's picture

8 Apr 2013 - 11:14 am | चिरोटा

मी या क्रिकेटसामन्यांवर माझ्या वैयक्तिक बहिष्कार आधीच घातला आहे

+१ आय.पी.एल. म्हणजे काळा पैसा देशभर फिरवायचा तो मार्ग आहे.ह्या सामन्यांमागे ड्रग्स्,वेश्याव्यवसाय हे काळे धंदे चालु असतात ते वेगळेच.

क्रिकेट सामन्यावर बहिष्कार योग्य आहे.पण मैदानावर हिरवळ टिकवण्यासाठी पाणी मारावे लागते.ते पाणी मैदानावर
चि़खल होईल इतके जास्त नसते.दुष्काळाबद्द्ल सर्वांना सहानुभूती आहेच पण अनेक शेतकर्यांनी अनेक वेळी मिळतील तितकी कर्जे घेतलेली आहेत.इतरांना मदतीचे जाऊ द्या पण त्यांनी स्वतःची कर्जेदेखिल फेडली नाहीत.त्यांनी आय.पी.एल.सामने होऊ नयेत असे का म्हणावे ? श्रीमंत लोकांचा पैसा त्यांनाही काम करूनच व आयकर भरून मिळालेला असतो त्या पैशाबद्दल द्वेश नसावा.व तो पैसा कसा खर्च करावा हे त्यांना स्वातंत्र्यही पाहिजे.तर लोकशाही म्हणता येईल.दुष्काळग्रस्त निधीस आयकर सवलत दिल्यास ते लोकही देणग्या देतील.क्रिकेटच्या अती प्रसाराने इतर खेळांचे नुकसान होते म्हणून माझाही क्रिकेटसामन्यांवर वैयक्तिक बहिष्कार आहेच.

मदनबाण's picture

8 Apr 2013 - 4:05 pm | मदनबाण

पण मैदानावर हिरवळ टिकवण्यासाठी पाणी मारावे लागते.ते पाणी मैदानावर चि़खल होईल इतके जास्त नसते.
मी दिलेल्या प्रतिसादातील व्हिडीयो पहा,मग कळेल की मैदानावर पाणी दिले जाते त्याने किती लोकांची तहान भागु शकेल !आणि मैदानावरील हिरवळ टिकवण्या पेक्षा जिवंत लोकांची तहान जास्त भागवणे यातले जास्त महत्वाचे काय ?
संत एकनाथ महाराजांनी कावडीने पाणी घेऊन जाताना महादेवाच्या अभिषेकाचे पाणी गाढवाला पाजले होते हा महाराष्ट्रातील संतांनी घालुन दिलेला धडा आपण आठवायला हवा.
इतरांना मदतीचे जाऊ द्या पण त्यांनी स्वतःची कर्जेदेखिल फेडली नाहीत.त्यांनी आय.पी.एल.सामने होऊ नयेत असे का म्हणावे ?
शेतकर्‍यांनी खचितच कर्ज काढली असतील तर ती शेतीसाठी किंवा स्वतःच्या पोरीबाळींची लग्न करण्यासाठी ! ती न देता आल्याने सुद्धा आत्महत्या करणार्‍या शेतकर्‍यांची संख्या कमी नसावी ! तसेही दुर्दैवाने शेतकर्‍यांच्या आत्महत्येत महाराष्ट्र आघाडीवर आहे. :)मुळात पाण्यासाठी दारोदार हिंडणार्‍या आणि विस्थापित महाराष्ट्रातील शेतकरी वर्ग आणि जनतेची तुलना आयपील सामन्यांशी होउच शकत नाही ! शेतकर्‍यांच्या कर्जा बाबत आपण बोलता तेव्हा आयपीलएलच्या थकबाकी बद्धल आपण चकार शब्द काढत नाही ! का ?
काही दुवे :-
IPL dues: HC says Maharashtra govt may attach defaulters' properties

BCCI, Maharashtra pulled up for not paying police dues

श्रीमंत लोकांचा पैसा त्यांनाही काम करूनच व आयकर भरून मिळालेला असतो त्या पैशाबद्दल द्वेश नसावा.व तो पैसा कसा खर्च करावा हे त्यांना स्वातंत्र्यही पाहिजे.
सहमत ! पण ही मंडळी ज्या समाजात आपण राहतो त्याच समाजाचा एक भाग आहेत्,हे कसे विसरुन चालेल ? इथे लोक तहानेने दारोदार हिंडताना दिसत असताना आणि राज्यात भिषण दुष्काळ असताना क्रिकेटवर पैसा ओतणे हे कुठल्या श्रीमंतीचे लक्षण आहे ?
दुष्काळग्रस्त निधीस आयकर सवलत दिल्यास ते लोकही देणग्या देतील.
दुष्काळ ग्रस्तांना पैसा नको तर पाणी हवे आहे !
माझ्या माहिती प्रमाणे आत्ता पर्यंत आयपीएल आयोजकांपासुन ते क्रिकेटरांव पैसा लावणार्‍या उध्योगपती आणि सिनेकलांवत यांनी राज्यातल्या दुष्काळ ग्रस्तांची साधी दखल घेतल्याचे उदाहरण दिसलेले नाही.

जाता जाता :--- माझ्या राज्यातले लोक दुष्काळाचा गंभीर सामना करत असताना मी क्रिकेटचे सामने पाहुन माझे मनोरंजन करु शकत नाही.मी त्यांच्या जागी असतो तर ते जे भोग भोगत आहेत ते मलाही भोगावे लागले असते

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

8 Apr 2013 - 4:53 pm | निनाद मुक्काम प...

म्हणून म्हणतो
बेटिंग कायदेशीर करा . तेवढाच सरकारला कर मिळेल

कपिलमुनी's picture

9 Apr 2013 - 12:13 pm | कपिलमुनी

शेतकरी मल्ल्या सारखे कर्जे बुडवून उधळपट्टी करत हिंडत नाहीत..
सर्वच श्रीमंत कर भरतात ?? दर मार्च ला खोट्या भाडे पावत्या आणि मेडिकल बिले देउन कर चोरणारे जास्त आहेत..
आणि पैसा खर्च करायचे स्वातंत्र्य नक्की आहे..
खेड्यातही लाईट द्या तेही बिल भरतात..तेही रोड टॅक्स भरतात , त्यांनाही तेवढाच हक्क आहे..
पाणी हे नैसर्गिक साधन संपत्ती आहे तिचेही समान वाटप करा ..तुमच्या वाट्याला येइल तेवढी उधळा की !!

एकांगी विचार करू नका ! परीस्थिती खुप गंभीर आहे

प्रसाद१९७१'s picture

9 Apr 2013 - 1:55 pm | प्रसाद१९७१

मेडिकल बिले देउन कर चोरणारे जास्त आहेत..

कर चुकवण्यात काय चुक आहे? भारतात कर कशाला भरायचा? राजकारण्यांच्या खिषात जातात ५० टक्के पैसे माझ्या कराचे आणि उरलेले ५०% सरकारी नोकरांच्या पगारावर.

कपिलमुनी's picture

9 Apr 2013 - 2:38 pm | कपिलमुनी

तुमच्या मुद्दलातच चुक आहे !
आपण ज्या देशात राहतो त्याच्या सैनिकांचे पगार त्या करा मधुन होतात ...एवढा साधा विचार करुन टॅक्स भरत चला ..

चोरी करणे चूक आहे ...भले ती चोराच्या घरी केली तरीही

अधिराज's picture

8 Apr 2013 - 12:05 pm | अधिराज

खरच अवघड आहे, तिकडे ते लक्ष्मण माने १५ दिवसांपासून फरार आहेत.

श्रीगुरुजी's picture

9 Apr 2013 - 7:36 pm | श्रीगुरुजी

>>> खरच अवघड आहे, तिकडे ते लक्ष्मण माने १५ दिवसांपासून फरार आहेत.

कालच ते पोलिसांसमोर हजर झाले व छातीत दुखायला लागल्याचे नाटक करून अटक टाळून सातार्‍यातल्या इस्पितळात भरती पण झाले. १९९९ मध्ये उदयन भोसलेला शरद लेवेच्या खुनाच्या आरोपावरून पोलिसांनी अटक केल्यावर ५ व्या मिनिटाला छातीत दुखायचे नाटक करून तो इस्पितळात भरती झाला होता व नंतर तब्बल २ वर्षे इस्पितळात राहून खटल्याचा निकाल आपल्या बाजूने लावल्यावर ५ व्या मिनिटाला खडखडीत बरा झाला होता.

इरसाल's picture

8 Apr 2013 - 1:15 pm | इरसाल

टिकडे काका ट्विटरवर माफी मागटाहेत म्हणे

प्रसाद गोडबोले's picture

8 Apr 2013 - 2:17 pm | प्रसाद गोडबोले

बोला जय महाराष्ट्र ! =))

सुज्ञ माणुस's picture

8 Apr 2013 - 4:13 pm | सुज्ञ माणुस

विनाशकाले विपरीत बुद्धी !
अशी म्हण ऐकली होती. ती सार्थ होताना बघतोय. ( मुळात विपरीत असायला बुद्धी असणे गरजेचे आहे म्हणा, बाकी आपण सुज्ञ आहातच. :) )

प्रसाद१९७१'s picture

9 Apr 2013 - 9:22 am | प्रसाद१९७१

विनाशकाले विपरीत बुद्धी !

ही म्हण जुनी झाली. आता विनाश आपला कारण विपरीत बुद्धी त्यांची.

श्री गावसेना प्रमुख's picture

8 Apr 2013 - 4:30 pm | श्री गावसेना प्रमुख

अनेक शेतकर्यांनी अनेक वेळी मिळतील तितकी कर्जे घेतलेली आहेत.इतरांना मदतीचे जाऊ द्या पण त्यांनी स्वतःची कर्जेदेखिल फेडली नाहीत.त्यांनी आय.पी.एल.सामने होऊ नयेत असे का म्हणावे ?
तुम्ही अध्यापक ना,बरोबर आहे ....
तिकडे बहुतेक सातारा जिल्ह्यातील एका धरणावर कुठल्याशा पिक्चर च्या शुटींगला दररोज मोटारी लावुन तिथल्या मैदानावर पाणी मारतात्,तिथला कुठला अधिकारी म्हणत होता की शेतकरी देउन देउन १००० /५०० देतो वर्षाचे,ह्या शुटींग वाल्यांनी दिड का दोन लाख कर भरलाय म्हणे,शेवटी महसुल हवा की नको असेही म्हणाला, असे हे निगरगठ्ठ अधिकारी.

भावना कल्लोळ's picture

8 Apr 2013 - 5:22 pm | भावना कल्लोळ

दादाला काय बी झालं नाही, पैकाच्या बंडली मोजून मोजून वाईज खुळावल हाय गडी, रात दीवस पैकच पैक मोजयच खायचं काम नाही गड्या वो… बारामुतीच बेण हाय ते, निगरगट्ट कातडीच कीती बी काय बी बोला …. इकच उत्तर येईल बघा …

" काका मी चुकलो माफ करा " पकरण संपल ….

आजानुकर्ण's picture

8 Apr 2013 - 6:13 pm | आजानुकर्ण

अत्यंत निर्लज्ज आणि अश्लाघ्य वक्तव्य. अशा घाणेरड्या भाषेचा वापर सत्ताधाऱ्यांकडून अपेक्षित नाही. राज आणि उद्धव नेहमीप्रमाणे 'सामना'च्या 'लोकमूत' परंपरेला जागलेले दिसताहेत.

प्रसाद गोडबोले's picture

8 Apr 2013 - 6:57 pm | प्रसाद गोडबोले

मुळ मुद्द्यावरचा फोकस इतरत्र कसा फिरवावा हे आपल्या कडुन शिकावे !!

मुळ मुद्दा दुष्काळग्रस्तांची अशाघ्य भाषेत केलेली मस्करी तर फोकस राज , उध्दव काय बोलले ह्यावर !
राज उध्दव काय बोलतात ह्यावर स्वतंत्र चर्चा करा की राव ... इथे सत्तेतल्या मोठ्ठ्यानेत्याने केलेल्या भाष्याबाब्त बोलुदे लोकांना ...

(अशीच अजुनही खुप उदाहरणे पाहण्यात आहेत इतरांकडुन
मुळ मुद्दा २६/११ तर फोकस करकरेंना तिथे कोणी पाठवले
मुळ मुद्दा गुजरातचा विकास झालाय की नाही तर फोकस मोदी यमदुत आहेत
मुळ मुद्दा हुतात्मा चौकात स्मारकाची विटंबना केणी केली तर फोकस आसाम मधे अत्याचार होतात म्हणे
मुळ मुद्दा दिल्ली गॅन्ग रेप केस मधले सगळे भय्ये आहेत तर फोकस राज देश तोडताहेत
मुळ मुद्दा एका विशिष्ट समाजाची लोकसंख्या इतरांच्या प्रमाणात प्रचंड वाढत आहे तर फोकस त्या समाजामधे शिक्षणाचा अभाव आहे म्हणुन
मुळ मुद्दा एक पक्ष परंपरागत भ्रष्टाचारात गुंतला आहे तर फोकस भाजपानेही भष्टाचार केला .

म्हणजे मुळ मुद्दा क्ष आहे तर फोकस य ही एक मुद्दा आहे ह्यावर

हे भारीये )

असो बाकी चालुच द्या

आजानुकर्ण's picture

8 Apr 2013 - 7:12 pm | आजानुकर्ण

अत्यंत निर्लज्ज आणि अश्लाघ्य वक्तव्य. अशा घाणेरड्या भाषेचा वापर सत्ताधाऱ्यांकडून अपेक्षित नाही.

यापेक्षा आणखी काय लिहायला हवे होते? राज/उद्धव यांनी अगदी सुसंस्कृत प्रतिक्रिया दिलेल्या आहेत काय?

गणामास्तर's picture

9 Apr 2013 - 11:05 am | गणामास्तर

राज/उद्धव यांनी अगदी सुसंस्कृत प्रतिक्रिया दिलेल्या आहेत काय?

उद्धव यांच्या प्रतिक्रियेत मला तरी असुसंस्कृत असे काही वाटले नाही. त्यांनी त्यांच्या स्वभावाप्रमाणेच
सौम्य शब्दांत प्रतिक्रिया मांडली आहे.

प्रसाद गोडबोले's picture

9 Apr 2013 - 11:47 am | प्रसाद गोडबोले

उध्दव ह्यांची प्रतिक्रिया वाचली नाही , पण राज ह्यांची प्रतिक्रियाही निषेधार्हच आहे , फक्त त्यावर इतरत्र चर्चा व्हाव्ही , राज हेही अश्लाघ्य बोलले हे दाखवुन उपमुख्यमंत्रा काय बोलले हे डायलुट करु नये इतकेच म्हणायचे होते

आणि दुष्काळ , युध्द, अंतर्गत धार्मिक कलह सारख्या अंतर्गत गंभीर बाबतीत पक्षीय राजकारण बाजुला ठेवायला आपण कधी शिकणार ? ( इथे आपण म्हणजे भारतीय ह्या अर्थाने )

पिंपातला उंदीर's picture

8 Apr 2013 - 9:19 pm | पिंपातला उंदीर

सत्तधारी निर्लज्ज आहेत म्हणून विरोधकानी पण बेशराम् व्हयाच का? अजित पवार यांचा निषेध करायचा तर या शिवराल विरोधी नेत्यांचा का नको. महाराष्ट्रात शिवराल संस्कृती रुजवन्यात त्यांचा पण खारीचा वाटा आहेच की

आजानुकर्ण's picture

8 Apr 2013 - 9:44 pm | आजानुकर्ण

खारीचा की वाघाचा?

या मूत्रप्रकरणावरून सामनामध्ये आलेला वटवटवागळे हा अग्रलेख आठवला. दुर्दैवाने त्याचा दुवा सापडत नाही... पण त्यात आयबीएन लोकमूत व दर्डाशेठचे मूत वगैरे पत्रकारितेचे रासायनिक विश्लेषण मोठ्या प्रमाणावर केले होते.

आजानुकर्ण's picture

8 Apr 2013 - 9:42 pm | आजानुकर्ण

जालावर हे चित्र सापडले.

पिंपातला उंदीर's picture

8 Apr 2013 - 9:48 pm | पिंपातला उंदीर

घरात नाही पीठ आणि मागतात विद्यापीठ

मराठवाड्याचा काय महारवाडा करायचा आहे का

काय हजरातबाल हजरातबाल लावून ठेवल आहे इथे या आणि (एका विशिष्ट अवयवाकडे इशारा करून) वाटेल तेवढे बाल घेऊन जा

-एका विशिष्ट हृदयसम्राताने केलेली भाषण

मात्र ही भाषण ठाकरी शैली म्होऊन नावजाली गेली.

आजानुकर्ण's picture

8 Apr 2013 - 9:54 pm | आजानुकर्ण

असं बोलायचं नाही! शिवराळपणा आणि ठाकरी शैली असा फरक ही वक्तव्ये कोण करते यावर अवलंबून असतो. दिवंगत ठाकऱ्यांच्या एका सभेमध्ये 'केवळ हिंदूंना पुरावे विचारले जातात मात्र, हजरतबलचा केस हरवला तेव्हा आम्ही विचारले होते का तो डोक्याचा केस होता की इतर कुठल्या अवयवाचा (येथे कमरेजवळ गिटार वाजवल्यासारखा हात हलवण्याचा अभिनय)" असे वाक्य ऐकल्यानंतर अनेक महिला सभेतून उठून गेल्या होत्या हे आठवते.

बंडा मामा's picture

8 Apr 2013 - 10:34 pm | बंडा मामा

इतके मागे कशाला जायचे? अगदी परवाच एका विराट सभेत राज ठाकरे 'सकाळी उठून काय उपटायची आहेत?' असे काहीतरी बोलले होते. आता बोला..

आजानुकर्ण's picture

8 Apr 2013 - 10:38 pm | आजानुकर्ण

त्यांना बागेतील झाडे वगैरे उपटायची असतील. सकाळी सकाळी दवबिंदुंमुळे माती मऊ असते. (उपटायला सोपे) मिपावर ह्या वाक्याचा निषेध वगैरे झाला नसल्याने विचारजंत म्हणून तुम्हीच चुकीचा अर्थ लावत आहात असे वाटत आहे. (तुम्ही जेएनयूत प्राध्यापक वगैरे आहात की काय?)

कपिलमुनी's picture

9 Apr 2013 - 12:24 pm | कपिलमुनी

ठाकरे चुकीचे बोलत होते म्हणून अजित पवारांच्या चुकीचे समर्थन कसे करता येइल ?
ठाकर्‍यांनी ( बाळासाहेब , राज ) यांची भाषा अनेक ठिकाणी चुकीचीच होती ! त्याचाही निषेध..
पण त्या एकाच मुद्द्यावर अजित पवारांचे भाषण समर्थनिय नाहिये !

अजित पवार एका प्रतिष्ठित पदावर आहेत ..ज्या प्रमाणे विधिमंडळ सदस्याला हक्क असतात तसेच सामाजिक जबाब्दारी आणि कर्तव्ये असतात.. बाळासाहेब , राज कोणत्याही राजनैतिक पदावर नाहित ..
( तरीही त्यांचे समर्थन नाहीच ) ..पण पदावर असताना जनते बद्दल असे वक्तव्य पूर्ण चुकिचे आहे .. ही प्रवृती शासना मधे , अधिकार्यामधे आणि कार्यकर्य्तात पोचेल म्हणून जास्तच चुकीचे !!

अमोल केळकर's picture

9 Apr 2013 - 1:56 pm | अमोल केळकर

एकदम सहमत. संतुलीत प्रतिसाद आवडला

अमोल केळकर

खादाड_बोका's picture

8 Apr 2013 - 10:07 pm | खादाड_बोका

ह्या वरुन एक वाचलेले आठवतोय, जे तंतोतंत खरे होवुन राहीले आहे. ते मी ईंग्रजी मध्येच देतो आहे.
When Mr. Clement Attlee, Prime Minister of United Kingdom, in June 1947, introduced the Indian Independence Act in the British Parliament, Sir Winston Churchill, war time Prime Minister of England, argued:- "Independence to India? Why??----------Power will go to the hands of rascals, rogues, freebooters; all Indian leaders will be of low caliber & men of straw. They will have sweet tongues & silly hearts. They will fight amongst themselves for power & India will be lost in political squabbles. A day would come when even air & water... would be taxed in India."

Who is responsible ; We The Indian People

ह्यातील जवळ्पास सगळे खरे झाले आहे, फक्त "sweet tongues" हा प्रकारही नाहीसा होताना दिसतोय.

बंडा मामा's picture

8 Apr 2013 - 10:20 pm | बंडा मामा

सिनेमात टिपिकल राजकीय व्हिलन जसा दाखवतात तश्या मग्रुरीत केलेले अर्वाच्य भाषण हे ते ही उपमुख्यमंत्री ह्या उच्च पदावरुन हे मराठी माणसाला लाज आणणारे आहे.

श्रीरंग_जोशी's picture

8 Apr 2013 - 10:22 pm | श्रीरंग_जोशी

लोकसत्तेच्या संकेतस्थळावर प्रकाशित झालेली बातमी

'ते' वक्तव्य माझ्या राजकीय जीवनातील सर्वांत मोठी चूक - अजित पवार

मुंबई Published: Monday, April 8, 2013 निंबोळी गावातील सभेत केलेले वक्तव्य ही आजपर्यंतच्या माझ्या राजकीय जीवनातील सर्वांत मोठी चूक होती. माझ्या वक्तव्यामुळे महाराष्ट्रातील जनतेच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. त्याबद्दल मी सर्वांची माफी मागतो, अशी भावना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सोमवारी मुंबईत व्यक्त केली.
इंदापूरमधील निंबोळीमध्ये अजित पवार यांनी केलेल्या बेताल वक्तव्यामुळे त्यांच्यावर सर्वस्तरांतून टीका करण्यात आली. केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी अजित पवार यांच्या वक्तव्याबद्दल त्यांच्यावतीने माफी मागितली. अजित पवारांनी विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहात निवेदन करून घडल्या प्रकाराबद्दल माफी मागितली. त्यानंतर सोमवारी संध्याकाळी त्यांनी वृत्तवाहिन्यांच्या माध्यमातून पुन्हा एकदा जनतेची माफी मागितली.

अजित पवार म्हणाले, कोणच्याही भावना मला दुखवायच्या नव्हता. माझा तो हेतू नव्हता. ही गोष्ट खरी आहे की राज्यात महत्त्वाच्या पदावर काम करीत असताना मी शब्दांचा वापर जबाबदारीने करायला हवा. दुष्काळ निवारणाच्या मोहिमेला कोणतीही बाधा पोहोचू नये, अशी माझी मनापासूनची इच्छा आहे. आजपर्यंत सार्वजनिक जीवनात काम करताना आतापर्यंत अनेक चढउतार मी पाहिले आहेत. मात्र, हे वक्तव्य माझी सर्वांत मोठी चूक होती.
--------------------------------------------------------------------

या सर्व घटनाक्रमावरून एक सुविचार आठवला
Nothing shows a man's character more than what he laughs at.

यात किंचीतसा बदल केल्यास या प्रकरणातून घ्यावयचा बोध दर्शवता येईल.
Nothing shows a man's character more than what he makes fun at.

शिल्पा ब's picture

8 Apr 2013 - 10:31 pm | शिल्पा ब

लोकांनी त्याना माफ करुन पुढच्या निवडणुकीत जिंकुन दिलं नाही म्हणजे मिळवली. समजा विरोध झाला नसता तरी त्यांनी माफी मागितली असती का? शक्यता वाटत नाही.

श्रीरंग_जोशी's picture

8 Apr 2013 - 10:37 pm | श्रीरंग_जोशी

विधानसभेच्या निवडणूकीला अजूनही दिड वर्ष आहे. जनस्मृती फारकाळ टिकत नाही असे म्हणतात.

साडेतेरा वर्षांपासून राज्यातील व नऊ वर्षांपासून केंद्रातील सत्तेत सहभागी असूनही राष्ट्रवादीने भरीव असे कोणते कार्य केले यावर मतदारांनी गंभीरपणे विचार केल्यास राष्ट्रवादीचा पराभव होणे काही अवघड वाटत नाही.

येणारा काळ उत्तर देईलच...

इंदापूरमधील निंबोळीमध्ये अजित पवार यांनी केलेल्या बेताल वक्तव्यामुळे त्यांच्यावर सर्वस्तरांतून टीका करण्यात आली.

नाना चेंगट, कृपया इकडे लक्ष द्याल का?

आजानुकर्ण's picture

8 Apr 2013 - 10:41 pm | आजानुकर्ण

माध्यमांचा अप्रामाणिकपणा, आऊट ऑफ कन्टेक्स्ट वाक्य, भाषणाचा संदर्भ वगैरे घोळ घालत न बसता चूक मान्य केली हे चांगले झाले. असाच पवित्रा इतर राजकारणी व राजकारणबाह्य संघटनांनी घ्यावा असे वाटते.

सगळे वक्तव्य जसेच्या तसे चित्रमुद्रित झालेले असताना लोकांनी चुकीचा संदर्भ घेतला, पत्रकारांनी विपर्यास केला वगैरे नेहमीच्या यशस्वी सबबी देणे अवघड झाले असावे.
त्यामुळे त्यांच्या माफी मागण्याची तोंड फाटेपर्यंत तारीफ करण्याआधी त्यावर ते काय प्रायश्चित्त घेणार, मुळात काही प्रायश्चित्त घेणार का याविषयी बोलावे.
पाण्याकरता उपोषण करणारे, दुष्काळात होरपळणारे ह्या लोकांची क्रूर थट्टा करून सवंग हशा आणि टाळ्या घेतल्याबद्दल ह्या माणसाला शिक्षा काय होणार? मला वाटते काहीही नाही.

आजानुकर्ण's picture

9 Apr 2013 - 12:53 am | आजानुकर्ण

मुळात त्यांचे भाषण विनोदी अंगाने पाहिले तर कोणाला ते विनोदी वाटू शकते. समोर बसलेले प्रेक्षकही फिदीफिदी हसत आहेत. भाषण करतानाही त्यांनी 'जरा विनोदी बोलतो' म्हणून हा एक ब्ल्याक कॉमेडी टाईप विनोद केला आहे. या स्वरुपाचे स्पष्टीकरण त्यांना देणे शक्य होते. मुळात अजित पवार यांची सर्व भाषणे अशीच असतात. हे एकच भाषण हायलाईट झाल्याचे पाहून आश्चर्य वाटले. मात्र अगदी बलात्कारित पीडित व्यक्तीही भारतातील आहे की इंडियातील हे पाहून तिथेही संस्कृतीचा उदोउदो करणारे वाक्य जसेच्या तसे यूट्यूबवर पाहूनही काही लोकांनी त्याबाबत घोळ घातलाच होता. त्या पार्श्वभूमीवर अशी चूक मान्य करणे मला योग्य वाटले.

या भाषणाचे हे समर्थन नाही. हा प्रकार निर्लज्ज व किळसवाणाच आहे.

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

8 Apr 2013 - 11:07 pm | निनाद मुक्काम प...

.माझ्या मते दादांवर टीका ही त्यांच्या भाषाशैलीच्या वरून नव्हे तर कोणाला उद्देशून केली ह्यामुळे झाली.
दुष्काळग्रस्त भागातील शेतकरी हा महाराष्ट्रात सध्या कळीचा मुद्दा आहे.
त्याच्या एका प्रतिनिधीला उद्देशून त्यांच्या जखमेवर मीठ चोळणारे वक्तव्य केले ह्या बाबत जनतेच्या मनात चीड निर्माण झाली.
हे स्वतःला शेतकरी समजतात. इतर पुढाऱ्यांना शेतीमधील काही कळते का असे सुद्धा विचारतात.
आणि शेतकऱ्यांच्या भावना समजत नाहीत, ह्यांना समजत नाहीत. का समजून काहीच न समजल्याचं वर्तन करायचे.
हतबल झालेल्या शेतकऱ्यांची मागणी जर अव्यवहार्य वाटत असेल तर त्यांना ते पटवून देऊन काही तोडगा काढणे अपेक्षित आहे. पश्चिम महाराष्ट्राच्या पलीकडे ,अलीकडे सुद्धा माणसे राहतात ज्यांचे उत्तरदायित्व आपल्यावर मंत्री म्हणून आहे. ह्यांचे भान असणे गरजेचे आहे.
आता दादांनी ओविसी वर असे विधान केले असते तर मराठी जनता , प्रसार माध्यमे ह्यांनी एवढे रान उठवले नसते.
येथे बाळासाहेबांच्या विधानांचा दाखला चुकीचा आहे.
कारण ह्यात मुलभूत फरक म्हणजे ह्या तिन्ही विधानाच्या पाठी जे मुद्दे होते त्यावर बाळासाहेबांची एक स्पष्ट भूमिका होती. व त्या भूमिकेच्या पूरक अशी विधाने होती.
येथे दादा शेतकऱ्यांचे कैवारी समजले जातात व त्यांच्याच जखमेवर मीठ चोळतात.
दादा तुमच्या लघु शंकेने नाही पण खर्या खुर्या पश्चात्तापाचे अश्रू त्या धरणात पडले तर भरून पावलो.
तसा वक्तव्यावर खेद किंवा माफी तर माझ्या सारखा सामान्य माणूस सुद्धा हजारवेळा
मागतो ,
अजित दादांचे मित्र नाना पाटकर ह्यांची प्रतिक्रिया अजून पाहण्यास नाही आली.
मागे दगड युद्ध झाले तेव्हा त्यांनी वागळे ह्यांना मुलाखत देतांना शेवटी जनता लाचार नाही ह्याची जाणीव ठेवा असे सांगितल्याचे कळते.

श्री गावसेना प्रमुख's picture

9 Apr 2013 - 8:53 am | श्री गावसेना प्रमुख

येथे अजीत पवारांचा विषय चालु असतांना चर्चा उगीच ठाकरे कुटुबिंयाकडे वळवली जात आहे ,

इथे वर माझ्या आय डी बद्दल बोलणार्यांनी आसाम दंगलीबद्दल किंवा शिख हत्याकांडाबद्दल किंवा आझाद मैदानात झालेला नंगानाच ह्याबद्दल आपले दोन शब्द खर्च करावे ही नम्र इनंती(अगोदर बोलले असतील तरी अजुन बोलावे )

प्रसाद गोडबोले's picture

9 Apr 2013 - 11:56 am | प्रसाद गोडबोले

ठाकरेंविषयी बोलुन ह्या धाग्याचे अन दादांच्या वक्तव्याचे डायलुटीकरण थांबवा ... येवढेच हवे असेल तर ठाकरी शैली वर स्वतंत्र धागा काढा तिथे चर्चा करा ...

ठाकरेही अश्लाघ्य बोलले हे दाखवल्याने दादा काय बोलले ह्याचे महत्व कमी होत नाही !!

चेतन माने's picture

9 Apr 2013 - 12:58 pm | चेतन माने

सगळेच अजित पवारांची भाषा आणि ठाकरी भाषा एकच मानत आहेत पण, बाळासाहेब हि भाषा त्यांच्या विरोधकांसाठी वापरत होते!!! हे लक्ष्यात घ्यायला हवे. अजित पवारांच्या भाषेतून दुष्काळग्रस्त आणि दुष्काळ ह्यांच्याविषयी त्यांची काय (खालच्या पातळीची) मानसिकता आहे ते कळते !!! आणि हि वक्तव्य करताना त्यांच्या तोंडावरचा आनंद ओसंडून जाताना दिसतोयच, त्यामुळे माफी वगैरे सगळे ढोंग आणि काय.

त्यात राज ठाकरेंनी वापरलेली भाषा देखिल त्याच शैलीत मोडते असे अनेकाचा आक्षेप आहे. परंतु राज ठाकरेनी सरकार मधील कोणत्याही पदावर नसताना आपल्या भाषणात त्या शब्दाचा वापर केला आहे. तसेच राज ठाकरेचा रोख हा व्यक्ती सापेक्ष ह्योता न कि तो कोणत्या समाजा किंवा दुष्काळाने होळपरनार्‍या जनते बद्दल होता.जनतेला राज ठाकरेनी कधीच शिव्या घातल्या नाहीत. इथे दादा चक्क सोलापुर साठि पिणेस पाणी मागणार्‍या उपोषण करणार्‍या शेतकरी संघटनेच्या लोकाना पाण्या एवजी इतर गोष्टीबद्दल बोलले त्याबद्दल लोकांना चीड आहे.

त्यांनी परत वीज कपाती मुळे शेतकरी रात्री मनोरंजन म्हणुन मुले पैदा करतात असा जोक मारला.आता ह्याबद्दल तुम्हाला काहीच वाटत नाही का? अहो शेताला दिवसा पाणी देता येत नाही कारण सगळी कडे सिंगल फेज लाईट असते. रात्री १० ते सकाळी ६ अशी ८ तास हे लाईट देतात. मग शेतकरी पिकास पाणी पाजण्यास काय काय उपद्वाप करत असेल हे जे शेतकरी कुटुंबाशी जवळ आहेत त्याना माहित आहे.अश्या परिस्थीतीत तो रात्री पाणी पाजायचे सोडुन कामक्रिडेत वेळ कशाला घालवेल? आणि हो ९९.९९% शेतकर्‍याना एक किंवा दोन अशीच मुले आहेत. त्याना कुटुंब नियोजनाचे महत्व कळाले आहे. मग हे लोक अधिक मुळे पैदा कशाला करतील?
तरी राज ठाकरे कधीच अशी सर्वसामान्य लोकांची खिल्ली उडवत नाहीत.

अत्रुप्त आत्मा's picture

9 Apr 2013 - 1:44 pm | अत्रुप्त आत्मा

@जनतेला राज ठाकरेनी कधीच शिव्या घातल्या नाहीत. >>>+++++++++११११११११११११११११ जबरी सहमत.

हाच तर कालपासुन घोळ चाल्लाय...शिवि असो/ओवि असो/शस्त्र असो... ते कुठे?कोणत्या हेतुनी? आणी कुणावर चालवलं जातं यावर त्याच पावित्र्य अवलंबुन आहे. सुरिनी पोट फाडणे ही क्रिया चोर आणी डॉक्टर दोघेही करतात. हा फरक अजिबात ध्यानात न घेता कालपासुन,''इतर राजकिय लोकंही शिवराळ बोलतात...त्याचे काय?'' असा गाढवपणानी मुद्दा उपस्थित केला जातोय. हे म्हणजे अफजलखान शिवाजिला गळा अवळुन खंजिर मारतो,यापेक्षा शिवाजीनीपण वाघनख/बिचवा मारून हिंसकपणा केला... अशी कागाळी करण्याइतकं अचरटपणाचं आहे.

पाषाणभेद's picture

10 Apr 2013 - 2:43 am | पाषाणभेद

एक नंबर प्रतिसाद!!!

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

10 Apr 2013 - 11:42 pm | निनाद मुक्काम प...

हे भाषण करणारे अजित दादा आहेत हे कुणाला आज ऐकून खरे वाटणार नाही.

श्री गावसेना प्रमुख's picture

11 Apr 2013 - 8:34 am | श्री गावसेना प्रमुख

आता गल्लीतल कुत्र सुद्धा गल्लीतच भुंकत,

प्रसाद१९७१'s picture

9 Apr 2013 - 1:59 pm | प्रसाद१९७१

दादांना काही बोलायचे नाही!!!. आमच्या सारख्या दादा समर्थकांच्या भावना दुखवतात त्याने.
दादा म्हणजे राजा माणुस. तुमची लायकी तरी आहे का त्यांचे नाव घ्यायची.

दादा आणि आम्ही सज्जन म्हनुन हे सगळे खपवुन घेतोय पण जर एकदा सटकली आमची तर बघा

प्यारे१'s picture

9 Apr 2013 - 5:42 pm | प्यारे१

याठिकानी मा. ना. (हे म्हन्जे तेच जे तुमच्या डोक्यात आलं) प्रसाद यांनी जी आभार प्रदर्शनाची जी भाशा बोलली आहे ती अतिशय तुत्य(जीभ सटकली... तेच म्हनायचं आहे) आहे.

याठिकानी मा. ना.(रिपीट कर रे वरचं!... संध्याकाळची आठवन आली च्यामार्री) दादांणा(कोंडूकाका- सौजन्य पूजादादा- मोट्टाच इनोद झाला. सौजन्य नि पूजा? ह्या ह्या ह्या) कोनीही काहीही बोललेलं आमी खप्पून घेनार न्हाई.

याठिकानी सगळ्यांना सगळ्या कामासाटी पानी देन्यात येईल व पाजन्यात देखील येईल... (थांबू? दोन मिन्टं) आम्च्या मंडळाचे पण्णास कारेकर्ते ह्या ठि कानी सगळ्या जणतेला पानी पाजायला चोव्वीस तास उपलब्द हायेत.

येवडे बोलून मी माजे भाषण संपवतो.

- प्यारेदादा येडे पाटील (उपाध्यक्ष, चवथी गल्ली)
ए कुनीतरी बिसलेरी आना रे! कोरड पडली च्यामारी.

हुप्प्या's picture

10 Apr 2013 - 5:38 am | हुप्प्या

http://mdramteke.blogspot.in
अजित पवारच्या गलिच्छ विनोदाच्या निमित्ताने असले हरामटेके लोक पुलंवर घसरले आहेत. त्यांच्या मते अजितदादांच्या करारा स्वभावात दडलेली विनोदबुद्धी इंदापूरकरांना लोटपोट करुन गेली. पत्रकारांनी सूडबुद्धीने ह्या निर्मळ विनोदबुद्धीचा विपर्यास केला.
पूर्वी पुल देशपांड्यांनी ह्याहीपेक्षा गलिच्छ विनोद केले होते आणि तमाम समाजाने त्यांचा हजरजबाबी म्हणून गौरव केला.
ह्या मरतुकड्या रामटेक्याने दिलेली उदाहरणे पाहिली की हसावे का रडावे ते कळत नाही.
अजित पवारची लाळ घोटण्याच्या निमित्ताने त्या पुरुषोत्तमावर थुंकायचा नस्ता उपद्व्याप ह्या नालायक माणसाने का करावा हे अनाकलनीय आहे!

प्रतिभा, नि:स्वार्थीपणा, सेवाभाव, भाषाप्रभुत्त्व, उदारपणा, कुठल्याही बाबतीत पुलंच्या जवळपासही फिरकू शकणार नाहीत असे लोक त्यांच्याविषयी इतका आकस बाळगून असतील असे वाटले नव्हते.

पुलंच्या त्या उद्धृत विनोदात मुख्यतः अनवधानाने घडलेल्या चुकीची चेष्टा हेच आढळून येते. चावटपणा म्हणजे अश्लीलता वा हीनपणा नव्हे.
पण झोपेचे सोंग घेतलेल्या रामटेक्यासारख्या रेम्याडोक्याला झोपेतून उठवणार तरी कसे?
पण असल्या प्रवृत्ती समाजात आहेत हे कळले पाहिजे.

पिलीयन रायडर's picture

10 Apr 2013 - 11:50 am | पिलीयन रायडर

http://misalpav.com/node/22760

हे घ्या...

सुहास's picture

10 Apr 2013 - 5:39 am | सुहास

लोडशेडिंगचा जोक अजित पवारांनी केला असला तरी असाच जोक (किंबहुना अजित पवारांच्या विधानाचा व्यत्यास) ऑगस्ट २००९ मध्ये गुलाम नबी आझाद या केंद्रीय आरोग्य मंत्र्याने मारला होता.

http://www.deccanherald.com/content/13278/azads-population-control-mantr...

पण या विधानाचा उल्लेखही न करता जणू हा जोक अजित पवारांनीच प्रथम केलाय असे म्हणून ओरडा करणार्‍या ईलेक्ट्रॉनिक माध्यमांचा जाहीर निषेध..! ;-)

रच्याकने, आमच्या एका मराठी च्यानेलीने तर (तेच ते जापानी तेल आणि "एक स्ट्रॉबेरी काय करू शकते?" च्या जाहीराती ब्रेक्समध्ये दाखवते) त्या भाषणात "महत्त्वाच्या" ठिकाणी "दुंईईईईई" करून आवाज टाकला आणि आपण किती सोज्ज्वळ आहोत हे दाखवले ते बघून ही गंमत वाटली..!

बाकी चालू द्या..

-- सुहास

हुप्प्या's picture

10 Apr 2013 - 10:18 pm | हुप्प्या

पुतन्याच्या मुतन्याची तीव्रता कमी व्हावी म्हणुन काकासाहेबांनी चंची थोओओडी ढिली केली असेल आणि ह्या व्यवहारचतुर च्यानेलने आपले उखळ पांढरे करुन घेतले असेल!

श्रीरंग_जोशी's picture

11 Apr 2013 - 8:47 pm | श्रीरंग_जोशी

http://www.mtmobile.in/regular/details.php?storyid=1&section=mumbai

वर वर पाहता सनानुभूतीची वातावरणनिर्मिती करण्याचा एक प्रयत्न दिसतोय. पण अंतस्थ हेतू काय असेल हे सांगता येणे कठीणच आहे. कदाचित सलग ३ वेळा सत्ता मिळूनही उल्लेखनीय कामगिरी न केल्याचे पातक ऐन वेळी इतर कुणाच्या माथी मारले जावे अशी पळवाटही असू शकते.

हुप्प्या's picture

15 Apr 2013 - 3:27 am | हुप्प्या

http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/19537856.cms

दादांना खरोखरच पश्चात्ताप झाला असे दिसते आहे कारण एक दिवसाच्या उपोषणाची अत्यंत कठोर शिक्षा घेऊन चित्तशुद्धी करण्याची त्यांची क्रिया मोठी बोलकी आहे.
आता हे उपोषण लिंबू पाणी घेऊन सोडणार का कुण्या दुष्काळग्रस्ताकडून काही अन्य पेय घेऊन ते बघितले पाहिजे!

आता तरी लोकांचे समाधान होईल आणि ह्या थोर नेत्याचा मुख्यमंत्रिपदाकडे जाण्याचा प्रवास पूर्ववत सुरू होईल अशी आशा!
दुष्काळग्रस्तांनी आता नस्त्या उठाठेवी सोडून करवंटीने घागरीत पाणी भरण्याचा उद्योग पुन्हा सुरु करावा ही नम्र इनंती.

श्रीरंग_जोशी's picture

15 Apr 2013 - 3:38 am | श्रीरंग_जोशी

एक दिवसीय उपोषणाचे हे लोण तामिळनाडूतून सुरू होऊन महाराष्ट्राच्या शेजारच्या राज्याद्वारे महाराष्ट्रात येऊन पोचले तर.

मार्च १९९८ मधील लोकसभा निवडणूकांचे महाराष्ट्रातील निकाल पाहून 'कष्टाने कमावले ते बोलण्याने गमावले' या शीर्षकाचा अग्रलेख आला होता. आता वर्षभराने होणार्‍या लोकसभा व दिड वर्षाने होणार्‍या विधानसभा निवडणुकांत काय होते हे रोचक असेल.

श्रीगुरुजी's picture

15 Apr 2013 - 12:09 pm | श्रीगुरुजी

>>> दादांना खरोखरच पश्चात्ताप झाला असे दिसते आहे कारण एक दिवसाच्या उपोषणाची अत्यंत कठोर शिक्षा घेऊन चित्तशुद्धी करण्याची त्यांची क्रिया मोठी बोलकी आहे.

India's Best Dramebaaz !