पुरानी जीन्स

हरिप्रिया_'s picture
हरिप्रिया_ in जनातलं, मनातलं
26 Mar 2013 - 5:58 pm

इक हि डाली पर कुछ हसते गाते पत्ते थे।
हरदम खुश रहा करते थे।
फिर हमेशा की तरह पतझड का मौसम आया।
हलकीसी हवाके झोकेसे सब पत्ते बिखर गये।
न जाने कहा कहा चले गये ।
हर कोई अलग अलग राहोंपर गुमाशुदासा होता चला गया।
अब कोई न पहेचानता, के इनकी दुनिया कभी इकसाथ हुआ करती थी ।
अब कोई न पहेचानता, के यही वो पत्ते है जो हरघडी साथ रहा करते थे।
- - -
"अग ये परे आटप कि भरभर, तुझ झाल कि बाकीच्यांचं आवरायचं आहे तुला. तू स्वतःचच आवरत राहणार कि आमचा पण मेकअप करणार आहेस? नाहीतरी आता तुझ्याकडे कोणी बघणार नाहीऐ. तुम्ही आता दुसऱ्या कुणाच्या तरी आहात हे साऱ्या जगाला माहित आहे हं." पल्ली ओरडत होति. "हो पण अवि तर येणार ना खास मला साडीत बघायला त्यामुळे नीट आवरु दे बाई मला , मग बघते तुमच्या सगळ्यांकडे " परी स्वतःला आरशात बघत बोललि. तेवढ्यात अनुजाने तिसऱ्यांदा निऱ्या नीट जमल्या नाही म्हणून साडी परत फेडली आणि वैतागून काकींना हाक मारली. आणि दरवर्षी प्रमाणे ह्यावेळी ही पल्लीच्या आईच मदतीला धावून आल्या. "कधी ग तुम्ही पोरी साड्या नेसायला शिकणार? आता लग्न व्हायची कि तुमची" मागून आज्जी बोलल्या. "एवढ्यात नाही ग बाई" पल्ली लगेच म्हणाली. सगळा गोंधळ माजला होता घरात. सगळ्याचं काहीना काही तरी आवरणं सुरु होत पण कविता नेहमी प्रमाणे आपल्याच तंद्रीत होती. परीने पल्लीच सगळ आवरून दिल आणि त्या दोघी कविताकडे एकटक बघू लागल्या, कधी जाग्या होतील कविताबाई ते बघायला.
किलबिलाट बंद झाला म्हटल्यावर कविता लगेच भानावर आली, पण चिडवायचं सोडेल ती परी कसली "हो हो बघशीलच थोड्या वेळात तुझ्या अतुलला. जरा वेळ थांब की. लगेच स्वप्नात जायची गरज नाही ". "ते नाही ग, मी विचार करत होते कि हि आपली शेवटची वेळ, साडी घालून कॉलेजला जायची"
आज बी ई आयटी चा फोटो सेशनचा दिवस होता. म्हणजे तस तर सगळ्या शेवटच्या वर्षातल्या मुलांनी त्यांच्या हॉड आणि बाकी प्रचार्यांसोबत फोटो काढायचा हा दिवस. ह्या एकच दिवशी सगळी मुल पूर्ण फ़ोर्मल ड्रेसमध्ये येतात अन मुली साड्या नेसून. अन अस का माहित नाही. गेली कित्येक वर्ष असेच येतात सगळे. ह्या सगळ्या त्या दिवसाची खूप आतुरतेने वाट पहात होत्या. कधी एकदा ह्या कॉलेजमधून बाहेर पडू अस वाटत होत. ते कटकटे आणि काही न शिकवता येणारे प्रोफेसर्स आणि हजेरी मुळे न चुकता बसावे लागणारे कंटाळवाणे तास. (तसा ह्यावर उपाय शोधला होता हा भाग वेगळा )सगळ सगळ संपणार होत, हे कॉलेज संपल की.
काही वेळ सगळ्याचजणी जणू विचारात गढून गेल्या. तेवढ्यात अनु म्हणाली "अस कस ?आज संध्याकाळी परत साडी नेसणार आहोत, आपण दोघी तरी" तिला साडी घालायचा मुळात कंटाळा पण बिचारीला आज दोनदा साडी घालावी लागणार होती . तेवढ्यात परी ओरडली "अग ये बायांनो आटपा. कांचीचा सातव्यांदा मिस कॉल येउन गेला. मारेल ती सगळ्यांच " मग लगबगिने चौघीजणी आवरून निघाल्या. तेवढ्यात कांची दारात हजर. अन तिचे हातवारे करत बोलण सुरु झाल. "कधीची येउन थांबले मी कॉलेजमध्ये. आता याल मग याल. किती वेळ वाट पहायची? मला आठ वाजता यायला सांगून तुम्ही नऊ वाजले तरी इथेच आहात. हे काय वागण झाल का?" उंच अन एकदम काटकुळी कांची जोरजोरात हात फिरवतांना एकदम मजेशीर दिसायची.
तिच्या पासून सुरक्षित अंतरावर उभी राहत पल्ली म्हणाली "अग हो, तुला आठला सांगितलं अन तू पावणे नऊ ला आलीस. आम्हला माहितच होत तू असच करणार. म्हणूनच वेळ लावला आम्ही" . पण परीने टीम बदलली. "काही नाही हा कांचे, मी ह्यांना गेली वीस मिनिट म्हणते आहे चला चला म्हणून, कांची आपली वाट पाहत असेल. पण एक पण आरश्या समोरून हालेना. "
"काही सांगू नकोस परे तू पण त्यांच्यातलीच आहेस, ओळखते मी तुला चांगलच " कांचीचा आवेश पाहून आता हे भांडण जगाच्या अंतापर्यंत असच सुरु राहतंय अस वाटल अनुला. ती मध्ये पडली "चला लवकर नाहीतर आपल्याशिवायचं फोटो निघतील सगळे" "अस कस वर्गातली सगळ्यात हुशार विद्यार्थी आपल्या सोबत आहे" कांचीच्या गळ्यात गळा टाकत पल्ली बोलली. कांचीचा गेले तीन वर्ष पहिला नंबर येत होता. ह्या वर्गातल्या सगळ्यात टारगट ग्रुपमध्ये ती कशी आली ह्याची एक स्वतंत्र गोष्टच होईल.
पल्लीच्या घरापासून कॉलेज दोन मिनिटाच्या अंतरावर होत. त्यामुळे काहीहि लागल तर ह्या सगळ्या नेहमी इथे यायच्या. म्हणजे भूक लागणे, चप्पल तुटणे पासून कधी कधी घरच्यांना दाखवायला अभ्यास करण्या पर्यंत. पण कॉलेज चुकवून दंगा करायचा असेल. कधी निवांत झोपून द्यायचं असेल किंवा कॉपी-पेस्ट करत सबमिशन करायचं असेल तर एकच हक्काच ठिकाण होत. अनुजा-परवीन ची रूम. जरा लांब होती खरी, पण घरी राहणाऱ्या बाकी तिघींना हवीहवीशी वाटणारी आणि तिथल्या चाची पण एकदम मस्त होत्या. किती पण दंगा करा कधी एका शब्दाने पण ओरडायच्या नाहीत.
साडी सावरत सावरत पाचीजणी कॉलेज मध्ये पोहोचल्या. आयटी विभागाच्या समोरच्या हिरवळीवर बरेचजण थांबले होते. बाकी सगळ कॉलेज त्यांच नेहमीच आयुष्य जगत होते. येता जाता काही ज्युनिअर्स "दीदी मस्त दिख रहे हो " म्हणून जात होत. वरून काही सेकंड यीअरचे विद्यार्थी आमचा हा दिवस कधी येणार अश्या थोड्याश्या मत्सरी भावनेने सगळ्यांकडे बघत होते. तस तर ह्या कॉलेज मध्ये पोहचल्यावर काही दिवसातच सगळे हा विचार करू लागतात. ह्या पाची जणींनी पण कालपर्यंत तसच वाटत होत. पण आता चेहऱ्याच रंग का थोडासा फिकट वाटत होता कुणास ठाऊक. थोड्या वेळातच सगळे प्रोफेसर पण जमले अन पाचच मिनिटात ऑफ़िशियल फोटो काढून झाले. नंतर सुरु झाले सगळ्या विद्यार्थ्यांचे फोटो सेशन. प्रत्येकजण आपापल्या मोबाईलच्या कॅमेऱ्यात फोटो काढून घेऊ लागला. काहींनी घरून कॅमेरे आणले होते. सगळ्यांनी आपल्या कॉलेज मधल्या शेवटच्या काही क्षणांना कैद करायचे प्रयत्न चालवले होते. तेवढ्यात परीला समोरून अतुल येताना दिसला. अन तिने कविताला चिडवायला सुरवात केली. पण कविता लगेच सगळ्यांना तिच्या एकदम गंभीर आवाजात म्हणाली "प्लीज, मला अतुल वरून बिलकुल चिडवायच नाही. मला त्याच्या डोक्यात काहीही घालायचं नाहीये. आता अभ्यासाचे दिवस जवळ येत आहेत. शेवटच्या परीक्षा संपल्या कि मग बोलता येईल ह्या विषयावर. " पण शांत बसेल ती परवीन थोडीच "तुला ह्या फालतू परिक्षेच पडलय? अग तू नाही म्हटलीस तर तो आयुष्याच्या परीक्षेत नापास होईल त्याच काय? " तेवढ्यात अतुल पोहचला "अरे आता काय परिक्षेच बोलत आहात . बास करा हा … नाहीतर कांची इथेच पुस्तक उघडून बसायची तुमच्या टेन्शन देण्याने" कांचीला तिच्या अभ्यासावरून कोणी चिडवल म्हणजे तिथेच तिच्या सहनशीलतेचा अंत व्हायचा. अतुलच्या पाठोपाठ सोमेश अन विश्वजीतला येतांना पाहून ती म्हटली "मला अभ्यास तर करता येतो तुम्हा तीन माकडांना उड्या मारत फिरण्याशिवाय येत काय? " आपला महत्वाचा वेळ बोलण्यात वाया घालवण्यापेक्षा माघार घेऊन काम साधुयात असा विचार करत अतुल म्हटला "ते जाउदे . आपण एकत्र फोटो काढूयात का? सगळ्यांचा आठवण म्हणून? " "आता कसा मुद्याला आला, पण सगळ्यांचा कशाला उगीच? ज्याच्या सोबत हवा आहे त्या व्यक्तीच सरळ नाव घे की " इति पल्लवी. "अस कस ग? तुमचे भरपूर फोटो निघतील हा तुमच्या लग्नात. कविता तूच काढ आमच्या सगळ्यांचा फोटो " परीने बरोबर अतुलचा प्लान गंडवला.
अस खर तर अस बऱ्याच जणांच होत. पहिल्या वर्षी आपल्या सिनिअर मुलीच सगळ्या मुलांना छान आहेत अस वाटत पण उपयोग नसतो (त्या आधीच सेटल झालेल्या असतात )मग दुसर्या- तिसर्या वर्षी एखादी ज्युनिअर मुलगी आवडते. पण तिने पत्ता कट केल्यावर शेवटच्या वर्षी तरी कुणीतरी मिळाव म्हणून नजर जाते आपल्याच वर्गातल्या पोरीवर. आणि अचानक जाणवत अरे इतकी वर्ष गबाळी दिसणारी ती इतकी कशी छान दिसू लागली आहे? तसच काहीस अतुलच झाल होत. आणि वर्गातल्या इतर काही जणांच पण. आता कॉलेज संपल्यावर नाही भेटली तर किमान एक फोटो तरी एकत्र असावा म्हणून बरेच जण धडपडत होते. मग कुणी आपण ज्या टपरीवर चहा पीत चार वर्ष काढली तिथे जाऊन फोटो होत तर कुणी तास बुडवून बसायच्या जागांवर जाऊन फोटो काढले. बंटी, आयटीचा आता पर्यंतचा पहिला GS प्रत्येका सोबत फोटो काढून घेत होता. आणि सगळ्यांना संपर्कात रहाच्या धमक्या देत होता. अन सगळेच "अरे तुम्हाला विसरण ह्या जन्मात तरी शक्य नाही" अस छातीठोक पणे सांगत होत.

अर्ध्या पाउण तासात सगळे क्लिक-क्लीकाट थांबले. संध्याकाळी सेन्डऑफचा कार्यक्रम होता. सगळ्यांचा त्याची काय काय तयारी करायची होती. सगळे पांगत होते. त्या वर्गाच्या इंडियन आयडॉलला त्याच्या गाण्याचा रियाझ करायचा होता.
टेक्नो प्रकाशला त्याच्या वर्गाला एक सरप्राईज द्यायचं होत. परीला तिच्या दहा मैत्रिणींसोबत डान्सची शेवटची तालीम करायची होती. कदाचित त्यांना पुन्हा स्टेज मिळेल न मिळेल. त्यामुळे सगळेच स्वतःच्याच सेन्डऑफला पण काहीतरी करणार होते.
कॉलेज मध्ये जायला बंटीने एक डीजे मागवला होता. सगळी पोर त्याच्या सोबत नाचत येत होती. दहा मिनिटाच्या रस्त्यानी यायला सगळ्यांनी तासभर घेतला. मग कसले कसले कार्यक्रम सुरु झाले. हॉडनी पुढच्या आयुष्यासाठी शुभेच्छ्या दिल्या अन त्याचं लांबलचक भाषण संपवलं. सगळ्यांना मस्त मस्त जेवणाचा वास येऊ लागला होता. खादाड बंटीने काय मेनू आहे हे पाहून ठेवले होते. अन सगळ्यांना सांगत सुटला होता. सगळे जण वरकरणी तरी हसत होते पण… संध्याकाळ होता होता सगळ्यांचीच मन चार (काहींच्या पाच - सहा) वर्षाच्या त्यांच्या प्रवासाच्या आठवणींनी भरून आल्यासारखी झाली होती. सगळेचजण स्वतःच्या मनाला समजावत होते 'अरे ह्याच दिवसाची तर वाट बघत होतास. आता का उदास होत आहेस? आणि खबरदार रडू नकोस हा सगळ्यांसमोर इज्जत का सवाल है " तेवढ्यात प्रकाशने तयार केलेला स्लाईड शो सुरु झाला सगळ्यांचेच जुने कुठले कुठले फोटो. काही ट्रिपचे काही वर्गातच सरांचे लक्ष चुकवून काढलेले. काही valentain डे चे तर काही असेच खादाडीचे. प्रत्येक ग्रुपचे अन प्रत्येक मुडचेसुद्धा. पडद्यावरची ती चित्र बघताच सगळेच आपल्या आठवणींच्या विश्वात रमले. आणि कानांवर आवाज येत होता इंडियन आयडॉलच्या गाण्याचा "पुरानी जीन्स और गिटार "…।

जमल असेल तरच क्रमशः नाहीतर समाप्त

साहित्यिकमौजमजाविरंगुळा

प्रतिक्रिया

प्राध्यापक's picture

26 Mar 2013 - 6:14 pm | प्राध्यापक

छान ललीत लेखन झाल आहे,अगदी आमच्या महाविद्यालयीन दिवसांची आठ्वण झाली.
इतक्यात समाप्त करु नका क्रमशःच ठीक आहे. पुलेशु.

एकच दिवस ४ भागात लिहिता आला असता. असो. क्रमश ठेवा.
कथा छान गुंफवायला खुप स्कोप आहे. पण कथेच्या केंद्रस्थानी कोण आहे हे अजुन तरी कळालेले नाही.
पुलेशु.

पैसा's picture

26 Mar 2013 - 6:26 pm | पैसा

अजून येऊ द्या!

लॉरी टांगटूंगकर's picture

26 Mar 2013 - 7:55 pm | लॉरी टांगटूंगकर

कोणाचे काही ऐकू नका. तुमच्या पद्धतीने येऊ द्या ,आत्ताच तर अप्रतिम जमलेलं आहे

अत्रुप्त आत्मा's picture

26 Mar 2013 - 9:32 pm | अत्रुप्त आत्मा

बरं लिवतासा हो! :-)

अवांतर-नावावरुन मला वाटलवतं,अली हैदरच्या, "पुरानी जीन्स और गिटार" वरुन कुणी तार छेडली कि काय?

तुमचा अभिषेक's picture

26 Mar 2013 - 10:31 pm | तुमचा अभिषेक

मस्तच... नक्कीच जमलंय.. येऊद्या.. वाट पाहतोय.. :)

हरिप्रिया मस्तच जमलय. पुढचा भाग टाकच, पण जरा पॅरेग्राफ तोडता येतात का पहा.
बाकि काही नाही मस्त जमलय. आमच्या साड्यांचा गोंधळ आठवला.

५० फक्त's picture

27 Mar 2013 - 8:18 am | ५० फक्त

मस्त लिहिलंय, तेवढं मध्ये मध्ये तोडायचं पहा म्हणजे अजुन मजा येईल.