शित्याची खोड

नरेश_'s picture
नरेश_ in जनातलं, मनातलं
19 Mar 2013 - 8:09 pm

शित्याशेट ज्याम दिवस गावातनं गायप झाल्ता.कुनाला कय खबर ना पता. नाय म्हनाल आशिला सांगला व्हता क मामासकरं जातू म्हनून!
शित्याशेट म्हनजे सिताराम म्हात्रे- हा तोच तो. एक नं. झोलर मानुस.मागं पन आपल्याला तो भेटलावता. आखोंशे सुरमा नीकालनेवाला.गावावरनं उतरून टाकलेला.जित्का झोंड तितकाच चामडीचोर.नाय म्हनायला आता जरा सुदरलेला,उगाच काय जिल्ल्याचे फुडार्‍यानं त्याला निवर्नूकीचा तिकीट दिल्ता ;) आं ?
हिकरं गावन चर्चा जोराव.उघरी-उघरीवर, न्हाव्याच्या दुकानान कंदाल्याना निस्ता ऊत.त्याच्यान दुनीयेची ऊधारी आंगावर.जीव दिला आसन म्हनून पयजा पून लागलेल्या.ज्याचे तोंडाला ज्ये जसं येल तसा लोका बोलत.म्हन्तात ना बोल्नाराचा तोंड धरवल पन पा*णाराचा ** नाही धरवनार :)
तिकरं शित्याशेट मामासचे गावान पावना गेलेला. मामास्चा दारूचा धंदा म्हन्जे ज्याम भारी काम.दिवसाला शे दोन्शे गिर्‍याका.म्हन्जे धंद्याला इतकी बरकत क मामाला मुताला पन फुर्सत मिलत नसं. आशात भाचा म्हन्जे त्याला फुकटचा देवदूत नाय वाटला त नवल. दोन चार दिवस सरले. मामास्ला अचानक भायेरगावी जायला लागलं.आता शित्या घरचा न हाक्काचा मानूस. मामास्ला तरी काय म्हायत.. शित्या गल्ल्याव-म्हन्जे गल्ला गललाच म्हनून!
झालंपन तसंच, गावातली साताठ टोलभैरव कारटी नि संगतीला पयल्या धारेची निकली पेटती दारु.आधीच शित्या न वर पियाला दारू...
<strong> वालाच्या शेंगा शिजल्यान क सांगा
नि दारु पिवाला बसला हा चांगा
वालाच्या शेंगा शिजल्यान क सांगा
नि दारु पिवाला बसला हा चांगा.
दारुडे बसलेन दारु पिवाला, बोल्वून झेतलय
चाहूदादाला, प्याग मारल्याव, नशा चडल्यावर
कोटींच्या करतन बाता.. हय (कोरस)
वालाच्या शेंगा शिजल्यान क सांगा
नि दारु पिवाला बसला हा चांगा
वालाच्या शेंगा शिजल्यान क सांगा
नि दारु पिवाला बसला हा चांगा.</strong>

हालूहालू गावातल्या कोंबड्या,न खलाटीतल्या वालाच्या शेंगा दिसेनाच्श्या व्हायला लागल्या.मामास्न त्ये पन सहन केलं. अशानच आटवर्‍यान गावान पोलिसपाटलाचे पोराचा लगन निंगाला. शित्या (शेट!) नि त्याचं चांडाळचोउकडीनी हालदीन गावान्च्या पोरीना छेरला. झाला.आता पानी पार डोचक्यावरून जायला लागला व्हता.गावकर्‍यानंनी ज्याम राडा केला.
दोन दिवसानी गावकीनं कडक कार्वाई केलि.शित्या आनि कं.चा चमन गोटा !! शित्या तरीपन चेर्‍याची रेष न हालवता हुबा व्हता.
|
|
|

च्यार दिवसाचा सरकारी पाहुनचार झोरल्याव...

खारपाडा गावान शित्याशेटच्या घरासमोर डोकराडोकरी, बायाबाप्यांची, पोराटोरांची ही झुंबडगर्दी!! मंडली, कसली काय इचारताव?तिरुपतीला जावन आल्याव गावजेवन नको घालाय?

टिप- सगळ्यांनी विशेषतः म्हात्रे व खारपाड्याच्या ग्रामस्थांनी हलकेच घ्यावे. कुनालाही दुखवण्याचा मुळीच उद्देश नाही :)

धोरणप्रकटन

प्रतिक्रिया

अभ्या..'s picture

20 Mar 2013 - 2:50 am | अभ्या..

=)) =))

स्पंदना's picture

20 Mar 2013 - 5:12 am | स्पंदना

तिरुपती.

व्वा! मस्त!

५० फक्त's picture

20 Mar 2013 - 7:48 am | ५० फक्त

बघा आणि लोकं श्रीमंत देवस्थानांबद्दल काही बाही बोलतात, असो.

घाशीराम कोतवाल १.२'s picture

20 Mar 2013 - 9:17 am | घाशीराम कोतवाल १.२

पन दादुस कं जमल न्हाई बोल ?
आजुन लिवाच नं

कं बाला...आवरं छोट क्याला लिवलं?? थोरं मोट तं लिवाच...बोल.

ही कोंकणी का? छान वाटते वाचायला. अन थोडे शब्द कलत नसले तरी अंदाज लागतो.

कथा आवडली. नायक राजकारणासाठी योग्य आहे.

घाशीराम कोतवाल १.२'s picture

20 Mar 2013 - 2:03 pm | घाशीराम कोतवाल १.२

नाही हि आगरी भाषा मि पा वर पहिल्यांदा आगरी भाषेतुन ब्रिटिशदादुस ने लिहिले आहे
सुख म्हंजे नक्की काय आसत
सारोजनीक गनपती उत्सव - खारपाडा

तुर्तास हे लिखाण वाचा

बॅटमॅन's picture

20 Mar 2013 - 12:09 pm | बॅटमॅन

हा हा हा....सहीच!!

प्यारे१'s picture

20 Mar 2013 - 2:18 pm | प्यारे१

खुसखुशीत!

ब्रिटीस दादुस ची आठवण आली.

सानिकास्वप्निल's picture

20 Mar 2013 - 2:27 pm | सानिकास्वप्निल

=)) =))

शित्या गल्ल्याव-म्हन्जे गल्ला गललाच म्हनून!

+११११११११११११११११११११

धमाल मुलगा's picture

27 Mar 2013 - 9:44 am | धमाल मुलगा

=)) =))
जल्लां किती दिवसांनी शित्या भेटला ना रं.
नं डाकटर, इतकं दिवस कुटं गायप झाल्ता रं? येऊ दे आजुन खारपाडा पेश्शल :)

पैसा's picture

27 Mar 2013 - 1:08 pm | पैसा

मजा आली! शित्याचे प्रताप अजून येऊ द्यात! =))