प्रश्न?

भावना कल्लोळ's picture
भावना कल्लोळ in जनातलं, मनातलं
18 Mar 2013 - 3:28 pm

खुप दिवसाने आज आरशात स्वतःला न्याहाळले.चेहरावरच्या सुरकुत्या खुप काही सांगून गेल्या. संसारात रमताना विसरलेल्या आठवणी जागवून गेल्या. डोळ्याखालच्या काळ्या वर्तुळात माझे मी पण दडपले होत. ते शोधताना डोळ्यातुन एक स्वप्न पटकन निसटून गेल होत. नात्याची अनेक रूपे जगताना स्वताला कधी जगले ते आठ्वु लागले. दाट काळ्या मोकळ्या केसातुन तो एक केस पांढरा स्वतःची अनुभूती करवून देऊ लागला. भरलेल्या घरात असुनही का हि एकटेपणाची सल जाणवली. डोळ्यात हजारो स्वप्न असताना शून्यात गेलेली ती नजर आठवली. कधी घेतला होता मी मोकळा श्वास, कधी स्वताला शोधण्याचा हा केविलवाणा ध्यास. आहे सर्वाची मी, पण माझे असे कोण? प्रत्येक नाती माझी, पण का रिती माझी पाती, सर्वाच्या अस्तित्व्याची वाहन मी, मग का माझ्याच अस्तित्व्याला शोधण्याची तहान हि, आरशात विचारले अनेक प्रश्न मी माझे मला, अनउत्तरीत आहेत अजून ते सर्व, नाटकचे दोन अंक संपले, तिसऱ्या घंटीची वेळ आहे, खरेच का हो आयुष्य दोन घडीचा खेळ आहे ?

मुक्तकविचार

प्रतिक्रिया

चिगो's picture

18 Mar 2013 - 4:26 pm | चिगो

छान लिहीलंय.. आपल्या भावनांना आणखी चांगल्या रुपात, थोडंसं नेटकेपणाने मांडण्याचा प्रयत्न करा. आणखी चांगलं लिहु शकाल..
एक अगावू प्रश्न : हा आयडी म्हणजे आपलं नाव आहे, की भावनांचा कल्लोळ झाल्याने असा आयडी घेतलाय? :-)

पैसा's picture

18 Mar 2013 - 4:35 pm | पैसा

अजून थोडा विस्तार करू शकला असतात. प्रत्येकालाच ही रिक्ततेची विरक्तीची भावना कधीतरी स्पर्श करून जाते. त्या एका क्षणात जगण्यात रस वाटू लागतो नाहीतर पुरा उडून जातो. कोणता रस्ता पकडायचा ते तुमचं तुम्हीच ठरवायचं असतं!

भावना कल्लोळ's picture

18 Mar 2013 - 5:06 pm | भावना कल्लोळ

नाही, माझे नाव हेमा आहे, भावना कल्लोळ हा फक्त आय डी घेतला आहे. तुमच्या आणि पैशाच्या सुचना लक्षात ढेवीन . प्रतिक्रियेबद्दल आभार.

छान लिहिलं आहे. मध्यम वयीन स्त्रीच्या भावना वाटतात,

स्पंदना's picture

20 Mar 2013 - 5:24 pm | स्पंदना

नेमकं. नेटकं. अन खर्‍या खुर्‍या भावनांनी दाटकं.
सुरेख. या पेक्षा जास्ती मी ही नाही लिहु शकणार. हल्ली काही कमवत नाही. घरात सगळ्यांंसाठी मी, पण मला दोन गोष्टी लिहायच्या आहेत, जरा शाम्तपणा हवाय....नो!

सुबोध खरे's picture

20 Mar 2013 - 6:52 pm | सुबोध खरे

हेमा ताई,
हा मध्य आयुष्यात येणारा रिक्तपणा फार छान लिहिला आहे. लिहित्या राहा.
आयुष्य ओघळोनी मी रिक्त हस्त आहे असे प्रत्येकाला कधी न कधी तरी मनात येतेच.

वैशाली हसमनीस's picture

22 Mar 2013 - 12:41 pm | वैशाली हसमनीस

ही रितेपणाची भावना सर्वव्यापी आहे.पण कायम टिकणारी नसते असे मला वाटते.

प्रश्न महत्त्वाचे आहेत हे - सगळ्यांना पडतात. पण अजून थोडं विस्ताराने वाचायला आवडलं असतं!

प्यारे१'s picture

22 Mar 2013 - 5:03 pm | प्यारे१

'जे माझं आहे ते मी नाही त्यामुळं त्याच्यावर माझी मालकी नाही'.... वास्तव स्वीकारणे. :)

अर्धवटराव's picture

22 Mar 2013 - 10:49 pm | अर्धवटराव

अवांतरः नवीन सदस्यांचा केवळ छळवाद होतो म्हणणार्‍या आयड्यांनी (त्यात मॅक्झीमम नवीन सदस्यच असतात) या धाग्यावरच्या प्रतिक्रिया बघाव्या. लिखाण चांगलं असेल तर मिपावर नवीन-जुना असा भेद होत नाहि... (हो हो... आजकाल आमचा सौजन्य सप्ताह सुरु आहे ;) )

अर्धवटराव

मन१'s picture

22 Mar 2013 - 11:31 pm | मन१

वरील प्रतिसादकांशी सहमत.
लिखाण आवडलं.